नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर जगभरातील चाहते, संघातील आजी-माजी खेळाडू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)सर्व जण धोनीचे आभार व्यक्त करत आहेत आणि त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. धोनीच्या शानदार करिअरचे कौतुक करणाऱ्यांमध्ये आता देशांचे यांचा देखील समावेश झाला आहे.
वाचा-
धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानावर पंतप्रधान मोदी यांनी एक पत्र लिहले आहे. या पत्रावर धोनीने मोदींचे आभार व्यक्त करणारी पोस्ट ट्विट केली. सोशल मीडियावर फार कमी सक्रीय असतो. पण निवृत्ती घेताना मात्र त्याने इस्टाग्रामचा आधार घेतला. आता देखील मोदींचे आभार व्यक्त करणारी पोस्ट करण्याआधीची धोनीची अखेरची पोस्ट फेब्रुवारी महिन्यातील होती.
वाचा- वाचा –
मोदींनी पाठवलेले पत्र धोनीने दोन फोटो मध्ये शेअर केले आहे. हे पत्र शेअर करताना तो म्हणतो की, प्रत्येक कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना कौतुकाची अपेक्षा असते. त्याना वाटत असते की त्यांची मेहनत आणि बलिदानाबद्दल सर्वांना माहित असावे. तुमच्याकडून देण्यात आलेल्या कौतुकासाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी!
काय म्हणाले मोदी पत्रात…
धोनी तुझ्यामध्ये ‘न्यू इंडिया’ चा आत्मा दिसतो. ‘न्यू इंडिया’मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबियांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हीडीओ बरंच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावं, हेदेखील समजते.”
वाचा-
” धोनी, तुझ्या निवृत्तीमुळे १३० करोडो भारतीय निराश झालेले आहेत. पण गेल्या दीड दशकांमध्ये जे काही तु आम्हा सर्वाना दिले त्यासाठी देशवासीय तुझे आभारी आहेत. तुझ्या कारकिर्दीकडे जर आम्हाला पाहायचे असेल तर काही अंक किंवा आकड्यांचा चष्मा घालून आम्हाला पाहावे लागेल. तू भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये सामील आहेस. देशाला जगभरात अव्वल स्थानावर नेण्याची भूमिका तू योग्यपणे वठवली आहेस. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझे नावं, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार आणि कोणताही संकोच न करता सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये नक्कीच घेतले जाईल.”
वाचा-
मोदी यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, ” कठीण परिस्थितीमध्ये आत्मनिर्भर कसे असावे, हे तू दाखवून दिले. त्याचबरोबर एखादा सामना संपवण्याची तुझी शैली खास होती. खासकरून तु २०११ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेली अविस्मरणीय खेळी. धोनी, तुला फक्त आकडेवारीमध्ये आम्ही लक्षात ठेवू शकत नाही, तर एकहाती सामना जिंकवण्यासाठी तू आमच्या मनात राहशील. एका लहान शहरामधून तू आलास आणि एवढं मोठं नाव कमावलं. आजच्या करोडो युवांसाठी तू नक्कीच एक प्रेरणा आहेस. स्वत:ला सर्वोच्च स्तरावर कसे घेऊन जायचे, याचा त्यांच्यापुढे तू नेहमीच आदर्श असशील.”