Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5781

नवनीत राणा यांना डिस्चार्ज; क्वारंटाइन राहावं लागणार

4

मुंबई: श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं तातडीनं नागपूरहून मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार यांना डिस्चार्ज मिळाला आहे. काल रात्री त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. तर, त्यांचे पती रवी राणा यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. (Amravati MP discharged from hospital)

नवनीत राणा यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं ६ ऑगस्ट रोजी समोर आलं होतं. सुरुवातीला अमरावतीतील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पाच दिवसानंतरही प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्यानं त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथंही प्रकृतीला आराम न पडल्यानं त्यांना नागपूरमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांना आयसीयूतून सर्वसाधारण कक्षामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काल रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

वाचा:

आयसीयूतून बाहेर आल्यानंतर शनिवारी संध्याकाळी नवनीत राणा यांनी फेसबुकवरून एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले होते. तसंच, लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला होता. मात्र, त्यांना डिस्चार्ज मिळाला असला तरी पुढील २० दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांनाही करोनाची लागण झाली होती. ते आता करोनामुक्त झाले असून त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

' महेंद्रसिंग धोनीला भारतरत्न मिळायला हवं,' नरेंद्र मोदींकडे केली मागणी…

5

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता धोनीला भारतरत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. धोनीला यापूर्वी खेलरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पण आता धोनाला भारतरत्न पुरस्कारही देण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. त्यामुळे धोनीला आता भारतरत्न का देण्यात येऊ नये, असा सवालही आता विचारला जात आहे.

धोनीला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी काही खासदारांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे केली आहे. मध्य प्रदेशमधील खासदार आणि पूर्व मंत्री पी. सी शर्मा यांनी धोनीला भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली होती. धोनीने भारताला बरेच काही मिळवून दिले आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा, तो या पुरस्काराचा हकदार आहे, असेही शर्मा यांनी यावेळी म्हटले आहे.

धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर शर्मा यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” संपूर्ण जगामध्ये भारतीय क्रिकेटला विजेता ठरवणारा महेंद्रसिंग धोनी हा देशाचे एक रत्नच आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. धोनीने क्रिकेटमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. हा सन्मान देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. त्यामुळे धोनी या पुरस्काराच्या लायक नक्कीच आहे.”

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आज सर्वांना धक्का देत अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली निवृत्ती जाहीर केली. धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे धोनीला भारतरत्न देण्याची मागणी आता जोर धरू लागली असल्याचे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शरद पवार यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह; चार दिवस भेटीगाठी बंद

5

मुंबई: काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सहा पोलिसांना संसर्गाची लागण झाली असून शरद पवार यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ( tests negative )

शरद पवार यांच्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री यांनी नगर येथे माध्यमांशी बोलताना माहिती दिली. शरद पवार यांची रॅपिड अँटिजेन डीटेक्शन टेस्ट घेण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही चाचणी करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी नमूद केले.

खबरदारी म्हणून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानातील संपूर्ण स्टाफची तसेच सुरक्षा ताफ्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांची करोना चाचणी घेण्यात आली. त्यात ६ सुरक्षा कर्मचारी वगळता बाकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पवार चार दिवस कुणालाही भेटणार नाहीत

शरद पवार यांच्या सुरक्षेतील सहा जणांना करोना संसर्ग झाल्याने तातडीने अनेक पावले उचलण्यात आली आहेत. त्यात पुढचे काही दिवस कोणताही दौरा न करण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनीही पुढील चार दिवस कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पवार साहेब आवश्यक असेलेली सर्व काळजी घेत आहेत. चिंतेचं कोणतंही कारण नाही, असे टोपे यांनी नमूद केले.

पवारांनी अनेक भागांचा घेतला आढावा

राज्यात करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. मुंबईतून मुख्यमंत्री राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असताना शरद पवार यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून स्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी राज्यभर फिरून चालणार नाही. ते सरकारचे कॅप्टन आहेत. म्हणून टीममधील आम्ही सहकारी ठिकठिकाणचा आढावा घेऊन त्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवत आहोत आणि त्यावर मुख्यमंत्री पुढील पावले उचलत आहेत, असे काही दिवसांपूर्वीच पवार यांनी नमूद केले होते. करोना काळात पवार यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा अशा अनेक जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यांदरम्यान सोशल डिस्टन्सिंग राखता यावे व विविध नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून सुरक्षा रक्षक नेहमीच दक्ष असायचे. या दरम्यानच एखाद्या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने सुरक्षा रक्षकांना करोना संसर्ग झाला असावा, अशी शक्यताही टोपे यांनी व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

निवृत्ती जाहीर केल्यावर धोनी रडायला लागला आणि रैनाबरोबर केली ही खास गोष्ट…

5

महेंद्रसिंग धोनी हा एक कॅप्टन कूल म्हणून ओळखला जायचा. कारण परिस्थिती कशीही असली तरी तो कधी डगमगला नाही. विजयानंतर जल्लोष नाही आणि पराभवानंतर निराश नाही. पण निवृत्ती घेतल्यानंतर मात्र धोनी चांगलाच भावुक झाला होता, असे म्हटले जात आहे. निवृत्ती जाहीर केल्यावर धोनीचा बांध फुटला होता आणि त्याने सुरेश रैनाबरोबर एक खास गोष्टही त्यावेळी केल्याचे आता समजते आहे.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आज सर्वांना धक्का देत अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली निवृत्ती जाहीर केली. धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे जेव्हा धोनीने निवृत्ती जाहीर केली तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये आपल्या क्रिकेटमधील अविस्मरणीय गोष्टी नक्की तरळल्या असतील. त्यामुळेच निवृत्तीनंतर धोनीचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएलची तयारी करण्यासाठी धोनी चेन्नईला पोहोचला होता. पण त्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल, असे कोणालाही वाटत नव्हते. अपवाद होता तो फक्त सुरैश रैनाचा. कारण रैनाला याबाबत कुणकुण लागली होती, असे त्याचे म्हणणे आहे. रैना म्हणाला की, ” जेव्हा आम्ही चेन्नईसाठी रवाना झालो तेव्हा धोनीही आमच्याबरोबर होता. त्यावेळी धोनी निवृत्तीचा विचार करत असल्याचे मला समजत होते. पण धोनी नेमका कधी निवृत्ती जाहीर करेल, हे मात्र मला माहिती नव्हते.”

निवृत्तीनंतर धोनीने काय केले, याबाबत रैना म्हणाला की, ” निवृत्ती घेतल्यानंतर धोनी माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारली. त्यानंतर आम्ही दोघं खूप रडलो, कारण एवढ्या वर्षांच्या आठवणीही आमच्याबरोबर होत्या. पण या गोष्टीचे जास्त वाईट वाटून घ्यायचे नाही, असे आम्ही ठरवले होते. त्यामुळे त्या रात्री आम्ही पार्टीही केली. आता कोणतेही दडपण आमच्यावर नसेल, त्यामुळे आयपीएलमध्ये आम्ही आता बिनधास्त खेळू शकतो.”

धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

… तर ट्रम्प, पुतीन यांचाही निषेध करणार का?; राऊत 'त्या' विधानावर ठाम

0

मुंबई: करोना संकटाच्या काळात देवदुतासारखे धावून आले. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. अशा डॉक्टरांविषयी आम्हाला नेहमीच आदर आणि आस्था आहे. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना ही चीनची हस्तक असल्याचं सांगून त्यांची रसद बंद केली आहे. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनीही डब्ल्यूएचओवर टीका केली आहे. मग त्यांचाही निषेध नोंदवणार आहात का?, अशा शब्दात नेते यांनी डॉक्टरांच्या संघटनांना फटकारले. तसेच अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, असंही त्यांनी सांगितलं.

डॉक्टरांपेक्षा मी कंपाऊंडरकडून औषधे घेतो. त्याला अधिक कळतं, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला आक्षेप घेत मार्डने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली असून राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना राऊत यांनी त्यांच्या प्रतिक्रियेवर ठाम असल्याचं सांगितलं. तसेच मार्डलाही फटकारले. डॉक्टरांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेनाच धावून आली. मी स्वत: अनेक प्रकरणात डॉक्टरांची बाजू घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण झाली तव्हा तोडफोड करणाऱ्यांना आम्हीच समजावून समेट घडवून आणला आहे. मात्र, सध्या विशिष्ट विचारसरणीचे लोक माझ्या विरोधात मोहीम चालवत आहेत, असं सांगतानाच डॉक्टरांचा मी अपमान केलेला नाही. डॉक्टरांबाबत मी कोणतंही चुकीच विधान केलेलं नाही. कशासाठी डॉक्टराचां अपमान करावा. माझ्या बोलण्याच्या ओघात एक शब्द तुटकपणे येतो आणि त्यावर राजकारण केलं जातं हे चुकीचं आहे, असं सांगतानाच अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, माझ्या बोलण्यामागची भावना समजून घ्या, असं राऊत म्हणाले.

राजकारणी आणि वकिलांवरही कोटी होते. वर्षानुवर्षे शीख समाजावरही कोटी केली जात आहे. पण तरीही ते सीमेवर लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो की मनमोहन सिंग… यांच्यावरही कोटी केली जाते. उलट माझ्याकडून बोलण्याच्या ओघात कोटी झाली असेल तर त्याचं कौतुकचं केलं पाहिजे. आपल्या देशातील डॉक्टर हे कंपाऊंडरलाही तयार करतात. त्यांनाही सक्षम करतात हे तर डॉक्टरांचं कौतुकच आहे, असं सांगतानाच कंपाऊंडर हे काही टाकाऊ नाहीत. त्यांचंही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठं आहे. कंपाऊंडरबद्दल गौरवोद्गार काढले म्हणजे विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या डॉक्टरांना राग यायचं कारण नाही, असं ते म्हणाले.

भाजपने मला पाठिंबा द्यावा

मी डब्ल्यूएचओबद्दल बोललो त्याचा आणि इथल्या डॉक्टरांचा काय संबंध नाही. मुळात मी डब्ल्यूएचओला आरोग्य संघटनाच मानायला तयार नाही. ती राजकारण्यांची बटीक झालेली नाही. हे माझं मत नसून स्वत: ट्रम्प यांचं मत आहे. त्यावर बोलायचं तर केंद्रीय आरोग्य मंत्री बोलतील, असंही ते म्हणाले. रशियाने डब्ल्यूएचओवर टीका केली आहे. तैवाननेही टीका केली आहे. ट्रम्प यांनीही टीका केली. अमेरिका तर आपला मित्र आहे. त्यामुळे भाजपने माझ्या विधानाला पाठिंबा द्यावा, असा चिमटाही त्यांनी काढला.

मोदींना का जाब विचारला नाही

आपल्या देशातील डॉक्टर व्यापारी मनोवृत्तीचे आहेत. नफेखोर आहेत. असं मोदींनी लंडनमध्ये जाऊन म्हटलं होतं. तिकडच्या डॉक्टरांनी मोदींचा निषेध नोंदवला. इथल्या डॉक्टरांनी निषेध नोंदवला नाही, याची आठवण करून देतानाच मी न बोललेल्या विधानाचं राजकारण केलं जातं, मग मोदी बोलले त्यावर का बोलत नाही, असा सवालही त्यांनी डॉक्टरांच्या संघटनांना केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

जिओचा मोठा धमाका, युजर्संना फ्री मध्ये पाहता येणार IPL 2020

5

नवी दिल्लीः रिलायंस जियो () यूजर्स साठी एक मोठी गुड न्यूज आहे. ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, स्टार इंडिया आणि जिओ यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या अंतर्गत जिओ युजर्संना चे फ्री अॅक्सेस मिळणार आहे. काही निवडक प्लान्सवर फ्री आयपीएल अॅक्सेस देण्यात येणार आहे. जिओ फायबर च्या काही निवडक प्लानमध्ये सुद्धा आयपीएल पाहण्याची संधी मिळणार आहे. ज्या युजर्सकडे डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन किंवा फ्री अॅक्सेस नसेल. त्यांना केवळ ५ मिनिटांपर्यंत आयपीएल २०२० लाइव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.

वाचाः

वाचाः

या प्लानमध्ये मिळणार ऑफर
रिपोर्टनुसार, जिओच्या ४०१ रुपये आणि २५९९ रुपयांच्या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार वर युजर्संना आयपीएल २०२० चे लाइव्ह स्ट्रीम पाहायला मिळणार आहे. या दोन्ही प्लानमध्ये स्ट्रिमिंग सर्विसचे फ्री अॅक्सेस मिळते. कंपनीने आतापर्यंत यासंबंधी अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

४०१ रुपयांच्या प्लानमध्ये 90GB डेटा
कंपनी ४०१ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. २८ दिवसांच्या वैधतेसबत ६ जीबी एक्स्ट्रा डेटा सुद्धा मिळतो. प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी फ्री कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी या प्लानमध्ये १ हजार मिनिट्स मिळतात.

वाचाः

वाचाः

२५९९ रुपयांच्या प्लानमध्ये 740GB डेटा
जिओचा हा ३६५ दिवसांचा प्लान आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १० जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. या हिशोबाप्रमाणे यात एकूण ७४० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर फ्री कॉलिंग मिळते. रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी १२ हजार मिनिट्स मिळतात.

जिओ फायबरच्या या प्लानमध्ये IPL 2020
जिओ फायबरच्या ८४९ रुपये आणि त्यावरील प्लानमध्ये IPL 2020 लाइव्ह स्ट्रिमिंग पाहू शकाल. कारण, या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जिओ फायबर्सच्या प्लानमध्ये ८०० जीबी व त्यापेक्षा जास्त १५००० जीबी पर्यंत डेटा ऑफर केला जातो.

वाचाः

वाचाः

डिज्नी+ हॉटस्टार सब्सक्रिप्शनची किंमत
आयपीएल २०२० ची लाइव्ह स्ट्रिमिंग साठी डिज्नी प्लस हॉटस्टार प्रीमियमचे किंवा व्हीआयपी सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारचे प्रीमियम सब्सक्रिप्शनचे मंथली किंमत २९९ रुपये आहे. एका वर्षासाठी याचा सब्सक्रिप्शन घेतल्यास १४९९ रुपये द्यावे लागतील. तसेच व्हीआयपी सब्सक्रिप्शनची किंमत ३९९ रुपये मंथली आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

नीलेश राणेंना करोना; रोहित पवारांनी केलं 'हे' ट्वीट

5

अहमदनगर: भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नीलेश राणे यांनी स्वत:च्या करोना चाचणी अहवालाबाबत काल संध्याकाळी एक ट्वीट केलं होतं. ‘करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी,’ असं आवाहन नीलेश राणे यांनी केलं होतं.

वाचा:

नीलेश राणे यांचं हे ट्वीट रोहित पवार यांनी रीट्वीट केलं आहे. ‘नीलेशजी लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत,’ असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी नीलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्विटरयुद्ध गाजलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखरेच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर नीलेश यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. साखर उद्योगाला आजवर झालेल्या मदतीचं ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली होती. रोहित पवार यांनी त्यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं होतं. त्यानंतर नीलेश यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. कालांतरानं हा वाद थांबला होता. त्यामुळंच रोहित पवारांच्या ताज्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी नेमकं काय करणार, मित्राने केला मोठा खुलासा…

5

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आज सर्वांना धक्का देत अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली निवृत्ती जाहीर केली. धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या. पण धोनी आता निवृत्तीनंतर नेमकं काय करणार आहे, हे कोणालाही माहिती नाही. पण धोनीच्या एका खास मित्राने मात्र या गोष्टीचा खुलासा आता केलेला आहे.

धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते.

धोनी एक तपाहून जास्त काळ भारताच्या संघात होता. त्यामुळे तो एवढी वर्षे व्यस्त होता. पण आता निवृत्ती घेतल्यावर मात्र त्याच्याकडे पुरेसा वेळ असणार आहे. पण धोनी हा वेळ वाया नक्कीच घालवणार नाही. कारण आतापर्यंत आयुष्यात ज्या गोष्टींना वेळ देता आला नाही, त्या गोषअटी धोनी करणार आहे.

धोनी आपला अखेरचा सामना गेल्या वर्षी इंग्लंडमधल्या विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर धोनी हा भारतीय आर्मीबरोबर एक महिना सराव करण्यासाठी काश्मीरमध्ये गेला होता. धोनी भारताच्या टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावर आहे. हे मानद पद धोनीला देण्यात आले आहे. धोनीला भारतीय आर्मीमध्ये रसही आहे. त्यामुळे तो आता भारतीय आर्मीबरोबर राहील, असेही म्हटल जात आहे.

धोनीचा खास मित्र आणि त्याच्या व्यवसायात पार्टनर असलेल्या अरुण पांडेने धोनी निवृत्तीनंतर काय करणार याबाबतचा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ” धोनी आतापर्यंत क्रिकेटमध्ये फार व्यस्त होता. पण निवृत्तीनंतर त्याला आता बराच वेळ मिळणार आहे. निवृत्तीनंतर खेळाडूंची ब्रँडमधील किंनत कमी होते, असे म्हटले जाते. पण धोनीचे तसे होणार नाही. भविष्यात काय करायचे आहे, हे धोनीला चांगलेच माहिती आहे. एक महिला तो आर्मीबरोबर राहीलेला आहे. त्यामुळे यापुढे आर्मीबरोबरच भविष्यात काही काळ व्यतित करण्याचे धोनीने ठरवले आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

बापरे! करोनाचा नवीन प्रकार; १० पट अधिक वेगाने पसरतोय संसर्ग

5

क्वालालंपूर: जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून संसर्गाला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता चिंता वाढणारे वृ्त्त समोर आले आहे. करोनाच्या संसर्गाचा नवा प्रकार समोर आला आहे. या प्रकारातील विषाणू तब्बल १० पट अधिक वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. या करोनाची सुरुवात मलेशियातील एका रेस्टोरंटच्या मालकापासून सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. भारतातून पुन्हा मलेशियात गेल्यानंतर या मालकाने १४ दिवसांचा क्वारंटाइनची मुदत पूर्ण केली नाही. जुलै महिन्यात हा बाधित आढळला होता.

भारतीय वंशाच्या या रेस्टोरंट मालकाला आता क्वारंटाइन नियम तोडल्याबद्दल पाच महिन्यांची शिक्षा दंड ठोठावण्यात आला आहे. या नव्या करोनाची बाधा फिलीपाइन्समधून पुन्हा मलेशियात येणाऱ्या एका गटातही झाल्याचे समजते. यातील ४५ जणांपैकी तीन जणांना या नव्या प्रकाराच्या करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी सांगितले की, या करोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची दाट शक्यता आहे.

मलेशियाच्या आरोग्य विभागाचे संचालक जनरल नूर हिशाम अब्दुला यांनी सांगितले की, करोनाच्या नव्या म्यूटेशनचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात. त्यामुळे आतापर्यंत लस बनवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. नवीन म्युटेशन या प्रकारातील आहे.

वाचा:

जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले?
करोनामुळे होणारे हे म्युटेशन अमेरिका आणि युरोपच्या अन्य देशांमध्येही वेगाने फैलावत आहे. तर, दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, विषाणूच्या म्युटेशनमुळे बाधित आणखी गंभीर होत आहेत, याबाबत काही ठोस पुरावा सापडला नाही. नुकत्याच एका प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटल की, सध्या विकसित होत असलेल्या लशींचा परिणाम या नव्या म्युटेशनवर प्रभावीपणे होणार नाही.

वाचा:
मलेशियाने केले आवाहन
मलेशियाच्या आरोग्य विभागाचे संचालक जनरल नूर हिशाम अब्दुला यांनी सांगितले की, लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. करोनाचा हा नवीन मलेशियात आढळला आहे. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा:

डी६१४ जी म्हणजे काय?
या नव्या करोना म्युटेशनला डी६१४जी म्हटले जात आहे. डी६१४जी हे प्रोटीनमध्ये असून विषाणूचा स्पाइक तयार करते. स्पाइक मानवी पेशींमध्ये घुसखोरी करतात. हे म्युटेशन डी (अॅसपॅट्रीक अॅसिड) ते जी (ग्लायसिन) मध्ये अॅमिनो अॅसिडमधील ६१४ वर बदलते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सॅमसंगपासून रियलमीपर्यंत जबरदस्त स्मार्टफोन, किंमत ८ हजारांपेक्षा कमी

5

एन्ट्री लेवल स्मार्टफोन सेगमेंट मध्ये खूप स्पर्धा वाढली आहे. मार्केटमध्ये असे अनेक स्मार्टफोन आहेत. जे या सेगमेंटमध्ये बेस्ट इन क्लास फीचर आणि खास वैशिष्ट्ये देत आहेत. लॉकडाऊन असल्याने युजर्संना स्वस्त स्मार्टफोन हवे आहेत. जे युजर्संची बेसिक गरज पूर्ण करतील. तसेच करमणुकीचे साधन म्हणून उपयोगी पडतील. त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही बेस्ट एन्ट्री लेवल स्मार्टफोन संबंधी माहिती देत आहोत. या ठिकाणी देण्यात येत आलेल्या स्मार्टफोनची किंमत ८ हजारांपेक्षा कमी आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. या फोनची किंमत ८ हजारांपेक्षा कमी असून यात जबरदस्त फीचर आणि खास वैशिष्ट्ये ऑफर करीत आहे. या ठिकाणी सॅमसंग पासून रियलमी पर्यंत स्मार्टफोनसंबंधी जाणून घ्या…

विवोच्या या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ८९० रुपये आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनची मेमरी एसडीकार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जो वॉटरड्रॉप नॉच सोबत येतो. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा एक रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,030mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा फोन दोन कलरमध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंगच्या या एन्ट्री लेवल स्मार्टफोनमध्ये ५.३ इंचाचा एचडी प्लस TFT डिस्प्ले दिला आहे. १ जीबी रॅम प्लस १६ जीबी इंटरनल स्टोरेज आणि २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक 6739 प्रोसेसर मिळणार आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनचा स्टोरेज वाढवता येवू शकतो. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट आणि ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत ६ हजार ५९० रुपये इतकी आहे.

मोटोरोलाच्या या फोनची किंमत ६ हजार ९९० रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 720×1280 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. या फोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. २ जीबी पर्यंत रॅम आणि १६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनमध्ये क्वॉड-कोर मीडियाटेक MT6737 चिपसेट दिला आहे. फोनच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सलचा आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी दिली आहे. स्वस्तात मस्त फोन हवा असणाऱ्या युजर्ससाठी मोटो सी चा हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

चीनची कंपनी रियलीचा सी २ या फोनची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जो वॉटर ड्रॉप नॉच डिझाईनसोबत येतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर सुद्धा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 चिपसेट दिला आहे. तुमचे बजेट ८ हजारांपेक्षा कमी असेल तर रियलमीचा हा फोन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Latest posts