Friday, June 2, 2023
Home Blog Page 5782

फेक अकाउंटप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि ट्विटरला नोटीस

0

नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टाने आज एक जनहीत याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकार आणि ट्विटरला नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार ट्विटर आणि अन्य इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक न्यूजच्या माध्यमातून समाजात पसरवली जाणारी ट्विट आणि जाहिरीतीचा तपास करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने यावेळी दिले आहेत. इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक न्यूज आणि फेक अकाउंटवरून आक्षेपार्ह मेसेजचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे.

वाचाः

इंटरनेट मीडियाच्या मनमानीला सरकार रोखणार
इंटरनेट मीडियाच्या मनमानीला रोखण्यासाठी केंद्र सरकार, आयटी नियमांत बदल करणार आहे. केंद्र सरकारने आयटी नियमांत बदल करण्याची माहिती संसद सभाग्रहात दिली आहे. सरकारच्या माहितीनुसार, आयटी नियमात संशोधन करून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय कायद्याच्या अंतर्गत उत्तर देणे बंधनकारक असणार आहे. डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय आचार संहितेचे पालन करणे कटिबद्ध असणार आहे.

वाचाः

इंटरनेट मीडिया कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न
सुप्रीम कोर्टात एक आठवड्यापूर्वी फेक न्यूजला रोखण्यासाठी इंटरनेट मीडियावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचे नियंत्रण आवश्यक असल्याच्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियाला नियमित कायद्यांतंर्गत आणण्यासाठी केंद्र सरकारकडे विचारणा केली होती. यानंतर सरकारकडून संसदेच याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र आणि ट्विटर यांच्यात संघर्ष सुरू असताना केंद्र सरकारकडून आयटी नियमांत बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

अमरावती: ४ दिवस दारू पाजली, आदिवासी महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या

0

अमरावती: राज्यात जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर करून तिची हत्या करण्यात आली. ( tribal woman and murdered) पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. नीलेश मेश्राम, सुधीर रघुपती वानखेडे, विनोद वानखेडे अशी आरोपींची नावे आहेत. चार दिवस महिलेला दारू पाजली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील शिरखेड () पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. एका गावातील आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नीलेश मेश्राम याला अटक केली. चौकशीत नीलेशने इतर आरोपींचीही नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत करणार असल्याचे सांगताच, आरोपींनी तिची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे.

स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने फरार आरोपींना अटक केली. नीलेश मेश्रामने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात हत्या आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपींना मोबाइल लोकेशनच्या आधारे अटक केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

भारताचे सहा क्रिकेटपटू फिटनेस टेस्टमध्ये नापास; वर्ल्डकपमधून आउट होणार?

0

मुंबई: भारतीय संघातील खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात बीसीसीआयची नवी फिटनेस टेस्ट पुन्हा चर्चेत आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सहा क्रिकेटपटू ही टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.

ज्या सहा खेळाडूंना बीसीसीआयची दोन किमी फिटनेस टेस्ट पास करता आली नाही, त्यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन, नितिश राणा, राहुल तेवतिया, सिद्धार्ध कौल आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेस कसा आहे हे तपासण्यासाठी नवी २ किमीची टेस्ट सुरू केली होती. पण ही टेस्ट वरील सहा खेळाडू पूर्ण करू शकले नाही.

वाचा-

बीसीसीआयने या आठवड्यात बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेस टेस्टचे आयोजन केले होते. टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही एक नवी फिटनेस टेस्ट असल्याने सर्वांना काही वेळ दिला गेला आहे. जेणेकरून ते पुन्हा एकदा टेस्ट देऊ शकतील. पण जर यावेळी ते टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता कमी आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. याआधी बीसीसीआयने फिटनेस टेस्ट आयोजित केला होती. २०१८ साली संजू सॅमसन, मोहम्मद शमी, अंबाती रायडू हे यो-यो टेस्ट पास करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यात संधी दिली गेली नव्हती.

वाचा-

एकूण २० क्रिकेटपटूची फिटनेस टेस्ट करण्यात आली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट आयोजित केली जाणार आहे. यात यो-यो टेस्ट आणि नवी २ किलोमीटर धावण्याच्या फिटनेस टेस्टचा समावेश केला गेलाय.

या टेस्टमध्ये एक फलंदाज, विकेटकिपर अथवा फिरकीपटूला ८ मिनिट ३० सेंकदात दोन किमीचे अंतर पार करावे लागते. तर गोलंदाजाला ८ मिनिट १५ सेंकदात हे अंतर पार करावे लागते. सहा खेळाडूंना ही टेस्ट पास करता आली नाही. काही खेळाडूंनी कशीबशी ही टेस्ट पास केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची हत्या, गर्लफ्रेंडनेच घेतला जीव

0

कौशांबी: प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाची करण्यात आली. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना घडली. गर्लफ्रेंडनेच तिच्या दोन मित्रांच्या मदतीने तरुणाची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह एका फ्लॅटमध्ये ठेवून पसार झाले, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर घटना उघड झाली. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.

गाझियाबादमधील वैशाली सेक्टर ४मध्ये बुधवारी एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला. नितीन चौधरी असे मृताचे नाव असून, तो सिकंदरपूरमधील रहिवासी होता. शवविच्छेदन अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका आरोपीला ताब्यात घेतले असून, आरोपी तरुणीचा शोध सुरू आहे.

बेडशीटमध्ये गुंडाळून किचनमध्ये मृतदेह ठेवला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनचे मोबाइल कॉल तपासले असता, त्याचे एका तरुणीशी बोलणे व्हायचे. नितीन आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद होऊ लागले. तिने दोन मित्रांच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. आरोपींनी फ्लॅटमध्ये हत्या करून मृतदेह बेडशिटमध्ये गुंडाळून किचनमध्ये ठेवला आणि ते पसार झाले.

फ्लॅटचा मालक आठ महिने आलाच नाही

फ्लॅटचा मालक दिल्लीत राहतो. त्याने आपल्या एका मित्राला फ्लॅट भाडेतत्वावर दिला होता. त्याच्या मित्राची चौकशी केली असता, त्यानेही तिसऱ्याच व्यक्तीला फ्लॅट भाडेतत्वावर दिला होता. करोना काळात मालक फ्लॅटवर आला नव्हता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शिवजयंतीसाठी नवी नियमावली; केला 'हा' मोठा बदल

0

मुंबईः करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं अवाहन शिवप्रेमींना केलं होतं. तसंच, यासाठी नियमावलीही जारी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीवर भाजपनं आक्षेप घेतला असून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर, सरकारकडून शिवजयंतीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत.

गुरुवारी राज्य सरकारकडून शिवजयंतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रभात फेरी, बाइक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसंच, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करुन १० जणांच्या उपस्थित शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या या आदेशावर भाजपनं टीका केली होती. त्यानंतर, या आदेशात बदल करुन शिवजयंती साजरी करण्यासाठी १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, बाइक रॅली आणि प्रभात फेरीबाबतचा आदेश कायम ठेवला आहे.

वाचाः

ही आहे नवीन नियमावली

– छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

– दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

– तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

– शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिमिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

– आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

– करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

भाजप नेते गोपीचंद पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल; गृहमंत्री म्हणतात…

0

पुणेः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणं भाजपचे आमदार यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शनिवारी शरद पवारांच्या उपस्थित होणार आहे. मात्र, आज पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहोचले आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन केलं. यानंतर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

वाचाः

गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा दावा केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. पोलिस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत असून उद्या शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण पार पडणार आहे, असं देशमुख म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र, त्याआधीच पडळकर यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. तसंच, शरद पवारांवर जोरदार टीका केली देखील केली आहे. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं हे खरं आहे. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व जातीयवादी माणसानं अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये, या पुतळ्याचं अनावरण करू नये, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळं आम्हीच हा सोहळा पार पाडला, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

संतापजनक! मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्येनंतर मृतदेह तलावात फेकला

0

हाजीपूर: बिहारच्या जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलाचे करून तिच्यावर करण्यात आला. त्यानंतर तिची करून मृतदेह घराजवळच असलेल्या तलावात फेकून दिला. कटहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कटहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून गेल्या शनिवारी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. ६ जणांविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत आहेत.

आरोपींच्या घराजवळील तलावात मृतदेह

गुरुवारी सकाळी आरोपींच्या घराजवळील तलावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, तेथे पोलीस पोहोचले. मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

गेल्या शनिवारी केले होते अपहरण

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या शनिवारी मुलीचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी याआधीही धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर मुलीचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह तलावात फेकला. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापे मारले आहेत. अद्याप कुणालाही अटक केली नाही, असे सांगण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

लहान मुलांसोबत रमतानाचा सलमान खानचा फोटो व्हायरल, यूझर म्हणाले…

0

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. शिवाय ”चं चित्रीकरण सुरु आहेच. या सगळ्या कामांसाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतंय. असं असताना सोशल मीडियावर त्याचा एक फोटो सध्या चर्चेत आलाय. या फोटोत तो लहान मुलांसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतोय.

अभिनेत्री यांनी त्यांच्या दोन नातवंडांसोबतचा सलमानचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी काही कॅप्शन दिलं नसलं तरी, चाहत्यांनी मात्र, या फोटोवर लाइक्स आणि कमेन्ट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, सलमानच्या एका चित्रपटाचं काम पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्यानं त्याला अजून एका ठिकाणी जावं लागणार आहे. हे ठिकाण आहे तुर्की आणि चित्रपट आहे ”. ” या सिनेमाच्या साखळीतील हा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण युएईमध्ये होणार होतं. पण आता हे ठिकाण बदललंय. याचं चित्रीकरण आता इस्तांबुलमध्ये होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची टीम रेकीसाठी तुर्कीला पाठवली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ हा शो संपल्यानंतर पुढील महिन्यात सलमान चित्रीकरणाला सुरुवात करेल असं दिसतंय. या सिनेमासाठी सलमान फिटनेसचं प्रशिक्षण घेत असल्याचंही कळतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Samsung Galaxy M62 चे सपोर्ट पेज लाइव्ह, पाहा आतापर्यंत समोर आलेली सर्व माहिती

0

नवी दिल्लीः सॅमसंगच्या गॅलेक्सी ए आणि एम सीरीजच्या हँडसेटवरून लागोपाठ बातम्या समोर येत आहेत. कंपनीच्या गॅलेक्सी एम ६२ स्मार्टफोनची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात माहिती उघड झाली होती. भारतात सॅमसंगची अधिकृत वेबसाइट वर गॅलेक्सी एम ६२ चे सपोर्ट पेज लाइव्ह करण्यात आले आहे.

वाचाः

Samsung सपोर्ट पेज लाइव्ह
मल्टिपल लीक आणि सर्टिफिकेशनच्या माहितीनुसार, Samsung Galaxy M62 ला मॉडल नंबर SM-M625F सोबत लाँच केले जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन गॅलेक्सी एफ ६२ चे रिब्रँडेड व्हेरियंट असणार आहे. गॅलेक्सी एफ ६२ चे मॉडल नंबर E625F असणार आहे. या फोनला भारतात १५ फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. भारतात गेल्यावर्षी आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ ला ब्राझीलमध्ये गॅलेक्सी एम २१ एस म्हणून लाँच केले होते. या दोन्ही फोनमध्ये कोणताही फरक नव्हता परंतु, एम२१ एस ला भारतात लाँच करण्यात आले नाही.

वाचाः

परंतु, आता गॅलेक्सी एम६२ सपोर्ट पेज लाइव्ह करण्यात आले आहे. म्हणजेच फोनला भारतात लाँच केले जाऊ शकते. सध्या गॅलेक्सी एम ६२ ची लाँचिंगच्या तारखेची कोणतीही माहिती नाही. अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही.

वाचाः

Samsung Galaxy M62 ची संभावित वैशिष्ट्ये
या फोनमध्ये एक्सीनॉस ९८२५ प्रोसेसर मिळणार आहे. हँडसेटमध्ये ६ जीबी रॅम व २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. याशिवाय, फोनमध्ये ४जी, ड्यूल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.०, एनएफसी, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाईप सी, अँड्रॉयड ११ ओएस सारखे फीचर्स देण्यात येणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

औरंगाबादमधील कुत्र्यांना झाला 'हा' त्वचारोग; नागरिकांना धोका

0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड शहरातील शेकडो कुत्र्यांना नावाचा झालेला आहे. या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी सिल्लोड शहरातील नागरिकांनी केली आहे.

सिल्लोड शहरासह तालुक्यात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागच्या वर्षी पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केले होते. शहरात प्रत्येक गल्लीत कुत्र्यांची दहशत आहे. शहरात अनेक भटके कुत्री आहेत. त्यांना त्वचारोगाने ग्रासले आहे. त्यांच्यामुळे इतर कुत्र्यांनाही संसर्ग होत आहे. नागरिकांनाही धोका होण्याचा संभव आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पशुवैद्यकीय विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वाचा:

कुत्र्यांना झालेला हा त्वचारोग कॅनाइन मेंज नावाचा संसर्गजन्य विकार आहे. या आजारामुळे प्रचंड खाज येऊन त्यांच्या अंगावरील केस गळून पडतात. या कुत्र्यांपासून इतर पाळीव प्राण्यांना संसर्ग होतो. या कुत्र्यांमुळे खेळणाऱ्या लहान मुलांना अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यांच्या गळालेल्या केसांमुळे बऱ्याच जणांना अॅलर्जिक दम्याचा त्रास होतो व आधीच दमा असलेल्या व्यक्तींचा त्रास बळावतो. ही साथ निश्चित आटोक्यात आणता येते. पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ला व उपचारांनी यातून त्यांची सुटका करता येते. दमा असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे ‘अभिनव प्रतिष्ठान’चे डॉ. संतोष पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts