Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5783

BSNL चे 50Mbps स्पीड सोबत ३ नवीन प्लान, हे आहेत फायदे

5

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी तीन नवीन ब्रॉडबँड प्लान आणले आहेत. बीएसएनएलने या प्लान अंतर्गत 50Mbps स्पीडचा डेटा युजर्संना मिळणार आहे. बीएसएनएलच्या या प्लानध्ये ग्राहकांना कॉलिंगची कोणतीही सुविधा देण्यात येणार नाही. तसेच हे तिन्ही प्लान सध्या केवळ पंजाब सर्कलसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

वाचाः

BSNLने या प्लानची माहिती पंजाब सर्कलच्या वेबसाइटवर दिली आहे. या तिन्ही प्लानचे नाव 200GB CS111, 300GB CS112 आणि PUN 400GB आहेत. यात २०० जीबी बेसिक प्लान आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना ५० एमबीपीएस च्या स्पीडने २०० जीबी पर्यंत डेटा मिळणार असून याची वैधता एका महिन्याची आहे. डेटा संपल्यानंतर ही स्पीड ४ Mbps होईल. या प्लानची किंमत ४९० रुपये आहे.

वाचाः

300GB CS112 प्लानची किंमत ५९० रुपये आहे. यात 50Mbps स्पीडचा डेटा युजर्संना मिळणार आहे. डेटा संपल्यानंतर ही स्पीड ४ Mbps होईल. या प्लानमध्ये एकूण ३०० जीबी डेटा मिळणार आहे. आता अखेरचा प्लान 400GB आहे. याची किंमत ६९० रुपये आहे. या प्लानमध्ये सुद्धा 50Mbps स्पीडचा डेटा युजर्संना मिळणार आहे. या तिन्ही प्लानमध्ये कॉलिंगची सुविधा देण्यात येत नाही.

वाचाः

बीएसएनएलने नुकताच ३९९ रुपयांचा एक प्रीपेड प्लान आणला आहे. या प्लानमध्ये तुम्हाला ८० दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये रोज २५० मिनिट कॉलिंग मिळेल. या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये १०० एसएमएस रोज फ्री मिळणार आहे. हा प्लान १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

लडाख: LAC वरून मागे हटणे दूरच; चिनी सैन्य करतेय 'हे' काम

5

बीजिंग: लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC)ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणारे चिनी सैन्य अद्यापही मागे हटण्यास तयार नाही. एकीकडे भारतासोबत सुरू असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्याची टिमकी वाजवणाऱ्या चिनी सैन्याने आता लडाखमधील पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिक केबल लाइन टाकण्यास सुरुवात केली आहे.

ओपन इंटेलिजेंस सोर्स detresfa ने भारतीय माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सांगितले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. detresfa या भागातील काही सॅटेलाइट छायाचित्रेही समोर आणली आहेत. लडाख आणि अक्साइ चीन भागातील चिनी सैन्याची संख्या कमी झाली असली तरी १५९७ किमी अंतरावर त्यांची सैन्य अद्यापही असून मागे हटलेले नाही. लडाखमध्ये चिनी सैन्याच्या या हालचालींना चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाकडून परवानगी मिळाली आहे. हा विभाग राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अखत्यारीत येतो.

वाचा:

चीनकडून सातत्याने शांतता आणि स्थिरता यावर भाष्य करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळीच असल्याचेही समोर आले आहे. भारतीय सैन्याने पँगोग त्सोमधील जुने प्रशासनिक तळ हटवण्याची मागणी चीनने केली आहे. इतकंच नव्हे तर, कुगरंगमधील डोंगराळ भागातून भारतीय सैन्याला माघार घेण्यास चीनकडून सांगण्यात आले आहे.

वाचा:

वाचा: चीनकडून करण्यात आलेली ही मागणी भारतीय सैन्याने फेटाळून लावली आहे. सध्या असलेल्या ठिकाणी आपले सैन्य कायमच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची कोणतीही मागणी पूर्ण करणार नाही आणि असलेली स्थिती कायम ठेवण्यात येणार आहे. लष्करी आणि कूटनीतिक बैठकांनंतर चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून मागे हटण्यास तयार नाही. त्यानंतर भारतीय सैन्याने देखील कुगरंग नदीवर आपली जागा न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने घुसखोरी करण्याआधी असलेली स्थिती पूर्वपदावर यावी अशी मागणी भारताने केली आहे.

दरम्यान, भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्नामुळे तणाव निर्माण झाला आहे. तणाव निवळण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर अनेक चर्चेच्या फैऱ्याही पार पडल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत. भारताने सीमा प्रश्न आणखी जटील करू नये चीनने म्हटले आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून लडाख येथील चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेतून अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. त्यावर चीनने म्हटले की, सीमेवर आणखी तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कारवाई भारत करणार नाही अशी चीनला अपेक्षा आहे. सीमा भागात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षातील संबंध चांगले होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असेही चीनने काही दिवसांपूर्वी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शाओमी रेडमी ९ प्राईमचा आज पहिला फ्लॅश सेल

44

नवी दिल्लीः शाओमीकडून लेटेस्ट स्मार्टफोनला नुकतेच लाँच करण्यात आले आहे. याचा पहिला सेल आज सोमवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शॉपिंग साईट अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीची अधिकृत साईट Mi.com वर सुरू होणार आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन खरं म्हणजे Redmi 9 ग्लोबल व्हर्जनचा रिब्रँडेड व्हेरियंट आहे. या फोनला जूनमध्ये स्पेनमध्ये लाँच करण्यात आले होते.

वाचाः

Redmi 9 Prime ची किंमत
शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत ९९९९ रुपयांपासून सुरू होते. ही किंमत ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. या फोनचा दुसरा व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये येतो. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. फोनला चार कलरमध्ये म्हणजेच स्पेस, ब्लू, मिंट ग्रिन, सनराईज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक मध्ये खरेदी करता येवू शकते.

वाचाः

Redmi 9 Prime ची खास वैशिष्ट्ये
स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. पिक्सल डेंसिटी 394ppi देण्यात आली आहे. यात Aura 360 डिजाइन, रिपल टेक्सचर आणि 3D यूनीबॉडी डिझाईन दिली आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोससर दिला आहे. जे Mali-G52 जीपीयू सोबत येतो. फोनमध्ये डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्डचा स्लॉट सुद्धा दिला आहे.

वाचाः

या फोनमध्ये रियर वर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा वॉटरड्रॉप नॉच सोबत येतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh ची बॅटरी 18W चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'आत्मनिर्भर' होण्याचा ढोल वाजवून प्रश्न सुटणार नाही; शिवसेनेची टीका

5

मुंबई: पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य भारतात आहे. असं केंद्रीय मंत्री सांगत आहेत. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, असं सांगतानाच फक्त ‘आत्मनिर्भर’ होण्याचा ढोल वाजवून आर्थिक महासंकटाचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

देशात जे भूकमरी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे त्याच्याशी मुकाबला कसा करणार? हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते उपाशी पोटाची आग घेऊन घराबाहेर पडेल तेव्हा या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल अशी चिंता आम्हाला सतावत आहे. कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य भारतात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना व्यक्त केले. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो व जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेची टीका

>> पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले ते त्याच पद्धतीचे होते. पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्यापि आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-कश्मिरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत.

>> पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. करोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेहऱ्यावरचे भाव ‘मास्क’मुळे समजणे कठीण होते; पण पंतप्रधानांचा आवेश, जोश कमी झाला नव्हता.

>> देशात करोनाचा कहर झाला आहे. गेल्या २४ तासांत ६३ हजार ४८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर हजाराच्या आसपास लोक काल दिवसभरात मरण पावले. एका दिवसातला हा आक्रोश आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पंचवीस लाखांवर पोहोचली व आतापर्यंत पन्नास हजारांवर लोक या महामारीत मरण पावले. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी ‘लस’ येत आहे, असे लाल किल्ल्यावरून सांगणे आशादायक आहे.

>> प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाईल, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची स्थापना होईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. या आरोग्य ओळखपत्रात डॉक्टरांच्या भेटीपासून ते औषधोपचारांपर्यंत सर्व काही असेल. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावे; पण आजच्या करोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तत्काळ सुटेल असे वाटत नाही. आतापर्यंत देशात १४ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर बरे झाले असते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

48MP कॅमेऱ्यासोबत येतोय मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्लीः मोटोरोला लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासून फोनचे वैशिष्ट्ये आणि फोटो लीक होत आहेत. बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच लिस्टिंगवरून ही माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर दिला जावू शकतो. हा प्रोसेसर यावर्षी जानेवारीत आणला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन बजेट फ्रेंडली फोन आहे. आता प्रसिद्ध टिप्स्टर Evan Blass ने या फोनच्या वैशिष्ट्यांचा खुलासा केला आहे.

वाचाः

हे असतील फीचर्स
एका लिक पोस्टरमध्ये या फोनच्या फीचर्स संदर्भात सांगितले आहे. या नुसार, या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४० प्रोसेसर दिला जाणार आहे. फोन मध्ये 5,000mAh बॅटरी मिळणार आहे.

वाचाः

या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. हा कॅमेरा नाईट व्हर्जन सपोर्ट करणारा असणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केलेल्या Moto E6 Plus चा हा फोन सक्सेसर मॉडल असणार आहे.

वाचाः

मोटो ई ७ ची डिझाईन
या फोनमध्ये पुढच्या बाजुला वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. तर मागच्या बाजुला रियर कॅमेरा शिवाय फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. खालच्या बाजुला यूएसबी टाईप सी पोर्ट, स्पीकर ग्रील आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळणार आहे. फोनची लाँचिंग कधी करण्यात येणार आहे, याविषयी कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. परंतु, हा फोन पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात लाँच केला जावू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

या रे या, दर्शन घ्या!, गणरायाचं दर्शन व्हर्च्युअली घडवण्याचे हे पर्याय

0

अनुपम भाटवडेकर

लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी काही दिवसच बाकी आहेत. यावर्षी करोनाच्या संकटामुळे बहुतेक जणांना आपल्या गावी किंवा नातेवाईंकांकडे जाणं शक्य नाही. पण, अशा वेळी ज्यांच्या घरी विराजमान होणार आहेत ते टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन दर्शन घेण्याची सोय करु शकतात. ते कसं हे आजच्या लेखातून जाणून घेऊ या…

विविध अॅप्लिकेशन्सचे व्हिडीओ कॉल्स किंवा लाइव्ह फिचर वापरून ऑनलाइन दर्शन घडवता येईल. हे करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा…

वाचाः

– कॅमेऱ्याची जागा निश्चित करून ठेवावी.

– त्यासाठी ट्राय-पॉड किंवा स्टँडची सोय करावी.

– पुरेसा प्रकाश आहे ना हे बघावं.

– निश्चित केलेल्या ठिकाणापासून गणपती मूर्ती व्यवस्थित दिसेल ना याची खात्री करुन घ्यावी.

– व्हिडीओ कॉल्ससाठी लावलेल्या सेटअपचा गणपतीची पूजा किंवा आरती करताना अडथळा होणार नाही ना हे पाहावं.

गणपतीचं लाइव्ह दर्शन घडवण्यासाठी पर्याय पुढीलप्रमाणे…

वाचाः

इन्स्टाग्राम

खास गणेशोत्सवासाठी एक नवीन अकाऊंट बनवून त्या अकाऊंटने लाइव्ह जाता येईल. लाइव्ह गेल्यावर फॉलोअर्सना तुम्ही लाइव्ह आहात याचं नोटिफिकेशन जातं. त्यामुळे ते तुमच्याशी थेट संवादसुद्धा साधू शकतात. हल्लीच आलेल्या अपडेटमुळे हे लाइव्ह व्हिडीओ आयजीटीव्हीमध्ये सेव्ह करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

वाचाः

फेसबुक रूम

मे महिन्यात फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘फेसबुक रुम’ हे फिचर आणलं. हे फिचर वापरून आपल्या सर्व मित्रांबरोबर किंवा ठरावीक लोकांबरोबर लाइव्ह व्हिडीओ करता येतो. मीटिंगची लिंक शेअर करून त्यांना या रूममध्ये अॅड करता येतं. तुम्ही तत्काळ लाइव्ह न जाता थोड्या वेळानं जाणार असाल तरीही फेसबुक रूम तयार करून ठेवता येते. विशेष म्हणजे फेसबुक अकाऊंट नसणारेसुद्धा यात सहभागी होऊ शकतात.

गुगल मीट

गुगल हँगाऊट या व्हिडीओ कॉलिंग अॅपचं आधुनिक व्हर्जन म्हणजे गुगल मीट. एप्रिल २०२०पर्यंत हे अॅप फक्त जी सूट युजर्ससाठी उपलब्ध होतं. पण, आता गुगल अकाऊंट असणारी कोणतीही व्यक्ती हे अॅप्लिकेशन वापरू शकते. अधिकृत संकेत स्थळाचा वापर करु शकता किंवा अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध असलेल्या अॅपचा वापर करु शकता. आपल्या गुगल अकाऊंटने साइन इन करून मीटिंग सुरु करू शकतो किंवा एखादी मीटिंग शेअर केलेल्या लिंकने जॉइन करू शकतो. मीटिंग चालू असताना इतरांना अॅडही करता येतं.

युट्यूब लाइव्ह स्ट्रीमिंग

जर तुमचे युट्यूब चॅनेल असेल आणि तुम्ही युट्यूबच्या बेसिक क्राएटेरियामध्ये बसत असाल तर तुमच्या चॅनलला फोन नंबर व्हेरिफाय करून लाइव्ह स्ट्रीमिंगच्या पर्यायाचा वापर करु शकता. या लाइव्ह स्ट्रीमिंगची लिंक फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियावरसुद्धा शेअर करता येते. या लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये माइक आणि कंमेंट्स बंद करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

पेरिस्कोप

सोशल मीडिया अकाऊंट वापरून ट्विटरच्या अॅप्लिकेशनमध्ये लॉग इन करता येतं. हे अॅप्लिकेशन मोबाइल फ्रंट/बॅक कॅमेरा सोबतच थर्ड पार्टी जसं की, गो-प्रो कॅमेरासुद्धा सपोर्ट करतं. तुम्हाला कोणाबरोबर लाइव्ह व्हिडीओ शेअर करायचा आहे हे सुद्धा ठरवू शकता. म्हणजे तुम्ही एखादा ग्रुप तयार करून केवळ त्यांच्या करता लाइव्ह स्ट्रीमिंग करू शकता किंवा सगळ्यांबरोबरही ते शेअर करू शकता. हे व्हिडीओज साइटवर २४ तास राहतात.

जिओ मीट

हे अॅप्लिकेशन साधारणपणे गुगल मीट सारखंच काम करतं. यामध्ये एका वेळी शंभर जण मीटिंग करू शकतात. या अॅप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मीटिंग शेड्यूल करून इतर लोकांसोबत लिंक शेअर करू शकता. जिओ मीट गुगल प्ले स्टोर, अ‍ॅपल अ‍ॅप्स स्टोर, विंडोज आणि मॅक ओएस यावर उपलब्ध आहे.

वरील अॅप्लिकेशन्स वापरून सुरक्षित वावराच्या नियमांचं पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करू शकतो. या अॅप्लिकेशन्स बरोबरच नेहमीच्या व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, गुगल ड्युओ हे अॅप्स वापरूनही मर्यादित लोकांबरोबर व्हिडीओ कॉल करून त्यांना गणपतीचं लाईव्ह दर्शन घडवता येऊ शकेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Marathi Joke: आजोबांची शक्कल

0

डॉक्टर – सांगा, कुठे दुखतंय?

आजोबा – फी कमी घेणार असाल तर मी सांगतो.
.
.
.
.
.
नाही तर तुम्ही शोधून काढा.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा अखेर 'यांच्यासाठी' खुला

0

सुनील दिवाण, पंढरपूरः प्रकशाळ पूजेतील वादानंतर मंदिराचे कार्यकारी अधिकारी , व्यवस्थापक याना आता विठ्ठल गाभाऱ्यात पुन्हा प्रवेश खुला करण्यात आला आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या खुलाशास समितीचे समाधान झाले असून या अधिकाऱ्यांवरील गाभारा बंदी उठवण्यात आली आहे. या बैठकीचा सर्व अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे .

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह-भ-प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मंदिर समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

आषाढी यात्रा २०२० मध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा ९ जुलै २०२० रोजी रूढी व परंपरेनुसार संपन्न झाली. या पूजेच्या बाबतीत काही तक्रारी आल्या नंतर मंदिर समितीने सभा घेवून, मंदिराचे अधिकारी व कर्मचारी यांना गाभारा बंदीची कारवाई केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत मंदिर समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मंदिर समितीच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते.

त्यानुसार बैठकीमध्ये प्रक्षाळ पूजेच्या विषयावर चर्चा करण्यात आले. यासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले आहे. त्या बाबतचा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आलेली विठ्ठल मंदिरातील गाभारा बंदी देखील मागे घेण्यात आली असल्याचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

काय होता वाद

प्रकशाळ पूजेच्यावेळी देवाची गाभाऱ्यात पूजा सुरू असताना एक कर्मचाऱ्याने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या अंगावर पाण्याचा तांब्या ओतला होता. देवाचे स्नान सुरू असताना आशा पद्धतीने अधिकारी कर्मचाऱ्याने गाभाऱ्यात पाणी अंगावर घेतल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने यास आक्षेप घेतल्यावर समितीने या अधिकारी व काही कर्मचाऱ्यांना गाभाऱ्यात जाण्यास प्रतिबंध केला होता. यानंतर कर्मचारी संघटना आक्रमक होऊन त्यांनी काम बंदचा इशारा दिल्यावर समितीने अधिकारी कर्मचाऱ्यांचा खुलासा घेत गाभारा बंदी मागे घेतली आहे. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांवर संपूर्ण मंदिराची कायदेशीर जबाबदारी असते त्यांनाच इतके दिवस गाभाऱ्यात प्रवेश नसल्याने सर्व व्यवस्था विठ्ठल भरोसेच सुरू होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोना व्हायरसमुळे मानाच्या गणेश मंडळांचा हा मोठा निर्णय

0

म. टा. प्रतिनिधी, नगरः नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज पाचशेपेक्षा जास्त करोना बाधित आढळत आहेत. त्यातच गणेशोत्सव अवघ्या एका आठवड्यावरून येऊन ठेपला आहे. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय नगर शहरातील अकरा मानाच्या गणपती मंडळांनी घेतला आहे. यंदा प्रथमच गणपती विसर्जन मिरवणून न काढण्याचा मोठा निर्णयही या मंडळांनी घेतला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील अकरा मानाच्या गणपती मंडळांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीस शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मनेष साठे, स्वप्नील घुले, ऋषीकेश कावरे आदिंसह माळीवाडा परिसरातील मानाच्या गणपती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

करोनाच्या अनुषंगाने गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये मानाच्या मंडळांनी हा उत्सव चार भिंतीच्या आतमध्येच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरमधील करोना विषाणुची प्रादुर्भावाची परिस्थिती पाहत सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. गणेशोत्सव काळात मंडळांकडून कोणत्याही प्रकाराचे कार्यक्रम घेण्यात येणार नाहीत. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील वर्षी करोनाचे संकट दूर झाल्यावर मोठ्या स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याचे यंदा जाहीर करण्यात आले आहे.
या बैठकीस संगम तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्र मंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्वर मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, समझोता तरुण मंडळ, निलकमल मित्र मंडळ, शिवशंकर तरुण मंडळाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

मिरवणूक रद्द करण्याची पहिलीच घटना – आगरकर

‘गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक रद्द करण्याची ही पहिलीच घटना आहे,’ अशी माहिती ग्रामदैवत विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘नगरमध्ये दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आम्ही परंपरा बाजुला ठेऊन विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. विसर्जन मिरवणूक रद्द होण्याची ही आतापर्यंत झालेल्या गणेशोत्सव काळातील पहिलीच घटना आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पुण्यातील ब्रेनडेड महिलेने असे दिले ७ जणांना जीवदान

0

म. टा. प्रतिनिधी, पुणेः घरात पाय घसरून पडल्याने ३९ वर्षीय महिला ब्रेनडेड झाली. अखेर त्यांच्या पतीने अवयवदानाची परवानगी दिल्याने परराज्यात चेन्नई आणि हैदराबाद येथील गरजू रुग्णांना अवयव मिळू शकले. पुणेकर महिलेच्या अवयवदानामुळे या दोन राज्यांशी नाते जुळल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्याशिवाय पुण्यातील अन्य रुग्णांना अवयव मिळाल्याने सात जणांना जीवदान मिळाले.

‘करोनाच्या सद्यस्थितीत पुण्यात या वर्षातील मे महिन्यापासून आतापर्यंत नववे अवयवदान यशस्वी झाले. ३९ वर्षाची महिलेच्या मेंदूला दुखापत झाल्याने तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला ब्रेनडेड जाहीर केल्यानंतर पतीने अवयवदानाची संमती दिली. त्यानंतर त्या महिलेचे हृदय चेन्नईला आणि फुफ्पुस हे हैदराबाद येथील रुग्णांना देण्यात आले. तसेच यकृत मंगेशकर रुग्णालय आणि दोन्ही मूत्रपिंड हे बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आल्या. तसेच डोळ्यातील नेत्रपटल आणि यकृत हे मंगेशकर रुग्णालयातील नेत्रपेढीला दिले. या महिलेमुळे सात जणांना जीवदान मिळाले’, अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts