जिल्ह्यातील रायतेवाडी या गावातील काही कलाकारांशी कोल्हापुरातील एका व्यक्तीने संपर्क साधून जागर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. त्यासाठी त्यांनी काही रक्कम ऑनलाइन अदा केली. ही रक्कम मिळाल्यानंतर नऊ कलाकार मंगळवारी कोल्हापुरात आले. ते गंजी गल्ली येथील एका खासगी यात्री निवासमध्ये उतरले. त्यांनी एका हॉटेलमधून जेवण मागवले. जेवल्यानंतर त्यांनी रात्री तेथेच मुक्काम केला.
या जेवणात अज्ञाताने गुंगीचे औषध घातल्याने सर्व जण बेशुद्ध पडले. रात्री त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटून अज्ञाताने पोबारा केल्याचे सकाळी उघडकीस आले. बराच वेळ रूमचा दरवाजा न उघडल्याने यात्री निवासचे मालक त्यांना जागे करण्यासाठी गेले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक गुजर अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, करत असताना संबंधिताने त्यांचे मोबाइल फोडून तेथेच टाकल्याचे निदर्शनास आले आहे. कुंताबाई कवरे, द्रौपदी सूर्यवंशी यांच्यासह नऊ कलाकारांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times