Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5807

'पॉर्न' व्हिडिओ निर्मिती प्रकरणाचे धागेदोरे बॉलिवूडपर्यंत?

0

म. टा. खास प्रतिनिधी,

अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या नवोदित तरुणींचे पॉर्न व्हिडिओ तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आठव्या आरोपीला अटक केली असतानाच दुसरीकडे अशाच आणखी एका प्रकरणात मालवणी पोलिस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शान बॅनर्जी उर्फ दीपांकर असे अटक करण्यात आलेल्या आठव्या आरोपीचे नाव असून तो याआधी अटक केलेल्या रोवा खान हिचा पती आहे.

वाचा:

मालिका, वेब सिरीज तसेच चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देण्याचे अमिष दाखवून तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनविणाऱ्या पॉर्न प्रोडक्शन कंपनीचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गेल्या आठवड्यात पर्दाफाश केला. पोलिसांनी बंगल्यातून यासिन बेग खान उर्फ रोवा, प्रतिभा नलावडे, मोनू जोशी, भानुसुराम ठाकूर आणि मोहमद आसिफ या पाच जणांना अटक केली. यासिन बेग ही निर्माता दिग्दर्शक असून त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री गहना वसिष्ठ हिचे नाव पुढे आले होते. या व्हिडीओ चित्रफीत परदेशात विकणाऱ्या उमेश कामत यालाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे आर्थिक व्यवहार तसेच इतर पुराव्यांवरून आणखी आरोपींची नवे समोर येत असून मंगळवारी रोवा हिचा पती शान याला अटक करण्यात आली. पॉर्न प्रोडक्शन कंपनीला अर्थपुरवठा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीच्या कंपनीतून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिच्या पतीचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.

वाचा:

फसवणूक झालेल्या तरुणी तक्रार करण्यासाठी पुढे येत असून एका तरुणीने आपल्यासोबत असाच प्रकार घडल्याचे म्हटले आहे. तिने तिच्या तक्रारीमध्ये आरोपींची नावे वेगळी सांगितल्याने मालवणी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा लाख रुपये दे नाहीतर अश्लील व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल केला जाईल अशी धमकी देखील या आरोपींनी दिल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींचे या प्रकरणातील आरोपींसोबत लागेबंध आहेत की ही अन्य कंपनी आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सिंहगडावर एक कोटीचा ध्वज उभारण्याचा निर्णय; गडप्रेमी म्हणतात…

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगडावर जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची अडचण, गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृहासह इतर सुविधांची वानवा असताना महापालिकेने तेथे एक कोटी रुपये खर्च करून ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे यांच्या आग्रहावरून हा ध्वज उभारण्यात येत असताना गडप्रेमींकडून रस्ता; तसेच इतर सुविधा उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ध्वज उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ३० मीटर उंचीचा ध्वज स्तंभ, विद्युत प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुशोभीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. आमदार तापकीर यांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले.

वाचा:

शहरात सध्या उभारण्यात आलेले ध्वज वाऱ्याच्या वेगामुळे सातत्याने फडकवत ठेवणे अडचणीचे होते आहे. त्यात सिंहगडावरील ध्वज अधिक उंचीवर लावण्यात येणार असल्याने त्या ठिकाणच्या हवेचा वेग पाहता येथील ध्वज वाऱ्याचा वेग सहन करील का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. सिंहगडावर जाण्यासाठी रस्ता चांगला नसल्याने पर्यटकांचे हाल होतात. पावसाळ्यात अनेकदा हा रस्ता बंद ठेवावा लागतो. गडावरही पर्यटकांना पुरेशा व्यवस्था नाहीत. स्वच्छतागृहाची व्यवस्था अत्यंत मर्यादित असल्याने पर्यटकांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर गडावरील इतर व्यवस्था सुधारण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे

समाधीस्थळ परिसरात विकासकामे

सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ परिसरात विकासकामे करण्यासाठी ७५ लाख रुपये खर्चाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. समाधीस्थळाच्या परिसरातील आणि प्रवेशाद्वारावरील सुशोभीकरण करणे, समाधीस्थळामागील सीमाभिंतीची उंची वाढवणे, लॉनमधील मावळ्यांच्या पुतळ्यांना पर्यटकांकडून हानी पोहोचविण्यात येऊ नये म्हणून त्यास आयर्न कास्टिंग लावणे आदी कामे करण्यासाठीच्या निविदांना मंजुरी देण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Valentines Day निमित्त वनप्लसची जबरदस्त ऑफर, मोबाइल्स, टीव्हीसह या प्रोडक्ट्सवर बंपर सूट

0

व्हॅलेंटाइन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिनानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांनी ऑफर्सची घोषणा केली आहे. Valentine’s Day 2021 निमित्त सर्व स्मार्टफोन आणि टेक कंपन्या ग्राहकांना काहीना काही ऑफर करीत आहेत. या यादीत आता प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus ने आपल्या अनेक प्रसिद्ध उत्पादनावर व्हॅलेंनटाइन डे ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात OnePlus 8T आणि OnePlus Nord यासारखे पॉप्युलर स्मार्टफोन्स सोबत OnePlus Smart TV Series आणि OnePlus Band, OnePlus Buds Z, OnePlus Power Bank यासारख्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जात आहे. जर तुम्हाला या आठवड्यात वनप्लसचे कोणतेही प्रोडकट्स खरेदी खरायचे असेल तर तुम्हाला वनप्लसचे मोबाइल्स, स्मार्ट टीव्ही, फीटनेस बँड, ईयरबड्स, आणि पॉवर बँक वर डिस्काउंट मिळू शकतो.

व्हॅलेंटाइन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिनानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांनी ऑफर्सची घोषणा केली आहे. Valentine’s Day 2021 निमित्त सर्व स्मार्टफोन आणि टेक कंपन्या ग्राहकांना काहीना काही ऑफर करीत आहेत. या यादीत आता प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus ने आपल्या अनेक प्रसिद्ध उत्पादनावर व्हॅलेंनटाइन डे ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात OnePlus 8T आणि OnePlus Nord यासारखे पॉप्युलर स्मार्टफोन्स सोबत OnePlus Smart TV Series आणि OnePlus Band, OnePlus Buds Z, OnePlus Power Bank यासारख्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जात आहे. जर तुम्हाला या आठवड्यात वनप्लसचे कोणतेही प्रोडकट्स खरेदी खरायचे असेल तर तुम्हाला वनप्लसचे मोबाइल्स, स्मार्ट टीव्ही, फीटनेस बँड, ईयरबड्स, आणि पॉवर बँक वर डिस्काउंट मिळू शकतो.

Valentines Day निमित्त वनप्लसची जबरदस्त ऑफर, मोबाइल्स, टीव्हीसह या प्रोडक्ट्सवर बंपर सूट

व्हॅलेंटाइन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिनानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांनी ऑफर्सची घोषणा केली आहे. Valentine’s Day 2021 निमित्त सर्व स्मार्टफोन आणि टेक कंपन्या ग्राहकांना काहीना काही ऑफर करीत आहेत. या यादीत आता प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus ने आपल्या अनेक प्रसिद्ध उत्पादनावर व्हॅलेंनटाइन डे ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात OnePlus 8T आणि OnePlus Nord यासारखे पॉप्युलर स्मार्टफोन्स सोबत OnePlus Smart TV Series आणि OnePlus Band, OnePlus Buds Z, OnePlus Power Bank यासारख्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जात आहे. जर तुम्हाला या आठवड्यात वनप्लसचे कोणतेही प्रोडकट्स खरेदी खरायचे असेल तर तुम्हाला वनप्लसचे मोबाइल्स, स्मार्ट टीव्ही, फीटनेस बँड, ईयरबड्स, आणि पॉवर बँक वर डिस्काउंट मिळू शकतो.

​OnePlus 8T वर ३ हजारांपर्यंत सूट
​OnePlus 8T वर ३ हजारांपर्यंत सूट

OnePlus 8T वर ३ हजारांपर्यंत सूट

वनप्लसचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन OnePlus 8T ला जर तुम्ही ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान खरेदी केले तर तुम्हाला Amazon, OnePlus.in सोबत ऑफलाइन स्टोर वर SBI Credit Card वर ३ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. यासोबतच ईझी ईएमआय ट्रान्झॅक्शन ऑप्शन्स मिळू शकतो. तर OnePlus 8 ला Amazon, OnePlus.in आणि ऑफलाइन स्टोरवर एसबीआय सोडू कोणत्याही बँक कार्डवरून खरेदी केल्यास तुम्हाला २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतो.

​OnePlus 8T वर ३ हजारांपर्यंत सूट
​OnePlus 8T वर ३ हजारांपर्यंत सूट

OnePlus 8T वर ३ हजारांपर्यंत सूट

OnePlus 8T ला जर तुम्ही ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान खरेदी केले तर ३ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. OnePlus 8T ची किंमत सध्या ४२ हजार ९९९ रुपये आहे. एचडीएफसी कार्ड धारकांना ईझी ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे. या दरम्यान OnePlus 8 Pro 5G सोबत OnePlus Bullets wireless Z खरेदी करीत असाल तर वायरलेस ईयरफोनर २५ टक्के डिस्काउंट मिळू शकतो.

​OnePlus Nord आणि OnePlus Band
​OnePlus Nord आणि OnePlus Band

OnePlus Nord आणि OnePlus Band

वनप्लसचा स्वस्त ५ जी स्मार्टफोन OnePlus Nord ला खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या मोबाइलला OnePlus.in, Amazon आणि ऑफलाइन स्टोर वरून खरेदी केल्यास SBI Credit Card वर तुम्हाला १५०० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो. तसेच ईझी ईएमआय ट्रान्झॅक्शनची सुविधा मिळू शकते. वनप्लसने नुकतीच लाँच केलेली फिटनेस बँड OnePlus Band चे स्ट्रॅप्स जर oneplus.in किंवा OnePlus Store App वरून खरेदी केल्यास १४ फेब्रुवारी पर्यंत ५० टक्के डिस्काउंट मिळू शकतो.

​OnePlus Buds Z आणि OnePlus Power Bank
​OnePlus Buds Z आणि OnePlus Power Bank

OnePlus Buds Z आणि OnePlus Power Bank

व्हॅलेंटाइन डे ऑफर अंतर्गत ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान OnePlus.in, Amazon, Flipkart आणि OnePlus Stores वर OnePlus Buds, Buds Z आणि OnePlus BWZ Bass Edition वर ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच Red Cable Club members केलव ८८८ रुपयांत OnePlus Power Bank खरेदी करू शकतात. Red Cable Club members साठी १७ फेब्रुवारी पर्यंत वनप्लसच्या सर्व प्रोडक्ट्सवर ५ टक्के सूट मिळू शकते.

​OnePlus Smart TV Series
​OnePlus Smart TV Series

OnePlus Smart TV Series

व्हॅलेंटाइन डे ऑफर्स अंतर्गत वनप्लस स्मार्ट टीव्ही वर बंपर सूटची घोषणा करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान ग्राहकांना डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतील. भारतात OnePlus Smart TV ची किंमत १५ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. OnePlus Q1 Pro TV तुम्ही जर OnePlus.in, Amazon, Flipkart सोबत ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी केल्यास SBI Credit Card खरेदीवर ५ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट सोबत ईएमआय ट्रान्झॅक्शन मिळणार आहे.

​OnePlus Smart TV Series
​OnePlus Smart TV Series

OnePlus Smart TV Series

OnePlus Q1 Pro TV तुम्ही जर OnePlus.in, Amazon, Flipkart सोबत ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी केल्यास SBI Credit Card खरेदीवर ५ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट सोबत ईएमआय ट्रान्झॅक्शन मिळणार आहे. OnePlus TV Y Series 32 इंचाचा स्मार्ट टीवी OnePlus.in, Amazon आणि Flipkart वरून ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान खरेदी केल्यास १ हजार रुपयांची सूट मिळू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'सतत हॉर्न वाजवल्यास 'ऑटोमेटिक' दंड व्हायला हवा'

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
वाहतूककोंडीमध्ये अडकल्यावर किंवा इतर वेळीही सतत वाजवणाऱ्यांना स्वयंचलित पद्धतीने दंड ठोठावला जावा. लंडन पोलिसांची पद्धत यासाठी अंमलात आणली जावी आणि हे प्राधान्यक्रमाने व्हावे, अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली. रस्ते सुरक्षा महिन्याच्या पार्श्वभूमीवर हॉर्न जितके कमी वाजतील तितका आरोग्यावर परिणाम कमी होईल, संताप, चिडचिड कमी होईल आणि वाहतूकही अधिक सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आवाज फाऊंडेशन आयोजित हॉर्न आणि सुरक्षा या विषयासंबंधित चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. ओक यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी ध्वनी प्रदूषणासंदर्भात बोलायला सुरुवात केली. हा विषय आजही तितकाच तीव्र आहे हे या निमित्ताने समोर आले.

या चर्चासत्रामध्ये वाहतूक विभागाचे पूर्व उपायुक्त हरीश बैजल सहभागी झाले होते. बैजल यांनीही यावेळी सातत्याने वाजणाऱ्या हॉर्नविरोधात लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मांडले.

वाचा:

रस्त्यावरील वाढणाऱ्या गाड्यांमुळे मुंबई वाहतूक पोलिस सर्व संख्येने जरी रस्त्यावर आले तरी सगळ्या दोषींवर कारवाई होणार नाही, असे सांगत यासाठी जनजागृतीही गरजेची असल्याचे ते म्हणाले. आपण ब्रेकचा वापर विसरलो आहोत. तसेच ओव्हरटेक करताना दिव्यांचा वापर करता येतो याचाही विसर पडल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. बैजल यांच्या काळामध्ये हॉर्नविरोधी मोहिमेला सुरूवात झाली होती. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आपले मत नोंदवले.

आयोजिक सुमैरा अब्दुलली यांनी हॉर्नमुळे आपल्याला आपण सुरक्षित आहोत असे वाटते, मात्र ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याची मात्र आपल्याला जाणीव नाही, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मांडले.

वाचा:

जसलोक रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अल्ताफ पटेल यांनी शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर ध्वनीप्रदूषण, सतत वाजणारे हॉर्न यामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल सांगितले. कमला रहेजा इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे प्रा. हुसैन इंदोरवाला यांनी मुंबईमध्ये सातत्याने अधिकाधिक वाहने रस्त्यावर येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर कसा कमी झाला आहे हेही आकडेवारीतून दाखवले. अधिक खासगी गाड्यांमधून कमी माणसांची वाहतूक होते, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा आणि त्यातही आर्थिक घटकांचा आणि सोयीचा विचार करता बस, लोकल याच्या सुधारणेकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

वागणुकीत बदलाची अपेक्षा

या चर्चासत्रामध्ये सिग्नल यंत्रणेजवळ डेसीबल मीटर बसवावा अशी सूचना करण्यात आली. या सूचनेचे स्वागत करत यामुळे लोकांना आपण किती जोरात हॉर्न वाजवतो याची जाणीव होऊन हळुहळू वागणुकीत बदल होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली. आवाज फाऊंडेशनच्या माध्यमातून या मागण्या सरकार दरबारी पोहोचाव्या असेही यावेळी सांगण्यात आले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘मिरा-भाईंदर महापालिकेतील पाच नामनिर्देशित नगरसेवकांपैकी केवळ एका नगरसेवकाच्या नियुक्तीविषयी आक्षेप असताना नगरविकासमंत्री यांनी कायद्याचे उल्लंघन करत सर्वच नगरसेवकांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यामुळे मंत्र्यांचा ७ डिसेंबर २०२०चा स्थगिती आदेश हा उघडपणे बेकायदा आहे’, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश नुकताच रद्दबातल ठरवला. त्याचवेळी ‘मंत्र्यांनी या विषयाचा नव्याने विचार करावा आणि संबंधित तक्रारदार व नगरसेवकांना पूर्ण सुनावणी देऊनच कायद्यानुसार आठ आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा. तसेच तो निर्णय पक्षकारांना कळवावा. आदेश कोणत्याही पक्षकाराच्या विरोधातील असल्यास त्याची अंमलबजावणी पक्षकारांना कळवलेल्या तारखेपासून चार आठवड्यांपर्यंत करू नये’, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

वाचा:

मंत्र्यांच्या निर्णयाला भाजपचे तीन नगरसेवक व पक्षाचे गटनेते हसमुख गेहलोत यांनी ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ व अॅड. तरुण शर्मा यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे आव्हान दिले होते. याविषयीच्या सुनावणीअंती न्या. आर. डी. धनुका व न्या. व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाने मंत्र्यांचा आदेश रद्दबातल केला.

वाचा:

महापालिकेत पाच नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी २४ जानेवारी २०२० रोजी सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर इच्छुकांच्या कागदपत्रांची छाननी व पात्रता तपासल्यानंतर भाजपचे अजित पाटील, अनिल भोसले व भागवती शर्मा, शिवसेनेचे विक्रम प्रताप सिंग व काँग्रेस लोकशाही आघाडीचे शफिक अहमद खान यांच्या नावांची शिफारस आयुक्तांनी केली. त्यानंतर ७ डिसेंबर २०२० रोजी महापालिकेच्या आमसभेने ठराव करून विक्रम सिंग वगळता अन्य चार जणांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. विक्रम सिंग हे प्रताप फाऊंडेशनचे अध्यक्ष असून या संस्थेला पालिकेने १३ एप्रिल २०२० रोजी अन्नपदार्थांचे पॅकेट पुरवण्याचे कंत्राट दिलेले असल्याने त्यांना नामनिर्देशित नगरसेवक करता येणार नाही, या कारणाखाली त्यांचे नाव वगळण्यात आले होते. ‘हा आक्षेप चुकीचा असल्याने अन्य चार नगरसेवकांसह विक्रम सिंग यांनाही नगरसेवक म्हणून घोषित करावे’, असा ठराव शिवसेनेने ७ डिसेंबरलाच मांडला असता, तो महापालिकेने फेटाळून लावला. त्यानंतर भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या गीता जैन यांनी तातडीने त्याच दिवशी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली असता, शिंदे यांनी तात्काळ स्थगिती आदेश काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबर २०२० रोजी नगरविकास सचिवांनी स्थगिती आदेशाची माहिती पालिका व संबंधित नगरसेविकांना पत्राद्वारे कळवली होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई विमानतळ खरेदीची प्रक्रिया सुरू; पहिला हिस्सा 'अदानी'च्या ताब्यात

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहाची २३.५० टक्के हिस्सेदारी निश्चित झाली आहे. विमानतळ खरेदी करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली असून, त्याअंतर्गत आता ‘जीव्हीके’चा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी करणेच बाकी आहे.

‘जीव्हीके समूह’ मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. यामुळेच त्यांच्या ताब्यात असलेले खरेदी करण्याच्या हालचाली अदानी समूहाने २०१९मध्ये चालवल्या होत्या. पण, त्या वेळी जीव्हीकेने प्रयत्नपूर्वक अन्य ठिकाणाहून निधी उभा केला व विमानतळ वाचवले. पण, मागील वर्षी ‘जीव्हीके समूहा’विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी मुंबई विमानतळ विक्री करण्याचे ठरवले. त्यानुसार ”ने त्यांच्या विमानतळ विभागांतर्गत हे विमानतळ खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातील पहिला हिस्सा त्यांनी ताब्यात घेतला आहे. (मिआल) या कंपनीत जीव्हीके समूहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के आहे. तर, बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साउथ आफ्रिका’ यांची भागीदारी दहा टक्के आहे. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे. विमानतळ खरेदी करण्याच्या प्रक्रियेत अदानी एंटरप्राइझेसने यापैकी २३.५० टक्के हिस्सा १,६८५ कोटी रुपयांना पूर्ण खरेदी केला आहे. आता पुढील टप्प्यात फक्त जीव्हीके समूहाचा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी करणे बाकी आहे. हा हिस्सा खरेदी करण्याआधी ‘जीव्हीके’च्या डोक्यावर असलेले २,५०० कोटी रुपयांचे कर्ज भागभांडवलात परावर्तित करणार आहे. त्यानंतर लवकरच विमानतळाचा महत्त्वाचा हिस्सा अदानी समूहाच्या ताब्यात जाईल.

‘एएआय’ची मंजुरी मिळताच व्यवहार

अदानी समूहाच्या विमानतळ खरेदी करण्याच्या व्यवहाराला ‘एएआय’ने मागील महिन्यातच मंजुरी दिली. ही मंजुरी मिळताच अदानी समूहाने तात्काळ करार पुढे नेला, हे विशेष.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

तीरासाठी खुद्द PM मोदींनी हलवली सूत्रे; निघाला 'हा' महत्त्वाचा आदेश

0

मुंबई: मुंबईतील या पाच महिन्यांच्या चिमुकलीवरील उपचारासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते यांनी पंतप्रधान यांचे आभार मानले आहेत. ( Latest News )

वाचा:

तीरा कामत या ५ महिन्यांच्या बालिकेला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान दिले आणि यासाठी सुमारे १६ कोटी रुपये गोळा करण्यात आले. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे ६.५ कोटी रुपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे तीराच्या पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी राज्य सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानुसार या औषधावरील या सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी १ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली.

वाचा:

पंतप्रधान मोदी यांनी ही तातडीची बाब असल्याचे लक्षात घेऊन तसे लगेचच निर्देश दिले. त्यावर वेगाने कार्यवाही झाली आणि आज या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला आहे. पंतप्रधानांनी अतिशय संवेदनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कार्यवाही केल्यामुळे तीरा कामत हिचे प्राण वाचतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच या त्वरित कार्यवाहीबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. तीरा कामत हिला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा सुद्धा फडणवीस यांनी दिल्या आहेत.

वाचा:

दरम्यान, तीरासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारा सीमा शुल्क राज्य सरकारने आधीच माफ केला आहे. याबाबत आमदार यांनी ट्वीट केले आहे. तीराच्या औषधाविषयी राज्य सरकारने सहकार्याची भूमिका घेतली हे पाहून बरे वाटले, असे नमूद करताना राज्याप्रमाणे आता केंद्रानेही मानवतेच्या भूमिकेतून दुसरे पाऊल उचलावे, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. रोहित यांच्या ट्वीटनंतर काही वेळातच केंद्राच्या निर्णयाची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. हा तीरा व तिच्या पालकांसाठी खूप मोठा आधार ठरला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अवनी वाघिणीला ठार मारण्याचा कट रचला होता!; धक्कादायक प्रतिज्ञापत्र

0

नागपूर: परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी-१ () या वाघिणीला ठार मारण्याचा कट दोन पशूवैद्यकांचा होता, असे प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध शिकारी (वय ६३, रा. हैदराबाद ) आणि त्यांचा मुलगा असगर अली खान (वय ४०) यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. ( Latest News Update )

वाचा:

‘या पशुवैद्यकांनी महाराजबागमधील एका वाघिणीचे मूत्र अवनी वाघिणीच्या क्षेत्रात फवारले. यामुळे ती स्वत:ला व शावकांना असुरक्षित समजू लागली. तेव्हापासून ती एकाच रस्त्यावर दबा धरून राहायची. आम्ही तिला बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारला. पण, डॉट मारल्यानंतर वाघीण बेशुद्ध व्हायला किमान १० ते १५ मिनिटे लागतात. या दरम्यान ती अधिकच चवताळली व तिने पथकावर हल्ला केला. आम्ही खुल्या जिप्सीत होतो. चालकही घाबरल्याने वाहन रस्त्याखाली उतरले. अवनी ५ ते ७ मीटर अंतरावर असताना स्वत:च्या व पथकातील इतरांचा जीव वाचवण्यासाठी तिला ठार करावे लागले,’ असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

अवनी वाघिणीने जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रांतर्गत १३ जणांचा बळी घेतला. त्यानंतर तिला नरभक्षक ठरवून ठार करण्याचे आदेश वनविभागाने दिले. तिला ठार मारण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात अनेकदा आव्हान देण्यात आले. पण, उच्च न्यायालयाने ती वाघीण नरभक्षक असल्यावर शिक्कामोर्तब करून वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न करावेत. त्यात अपयश आल्यास पुढील मनुष्यहानी टाळण्यासाठी ठार मारावे असे आदेश दिले. तिच्या दोन छाव्यांना बेशुद्ध करून पकडावे व बचाव केंद्रामध्ये पाठवावे असेही आदेशात नमूक केले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर २०१८ रोजी अवनीला ठार मारण्यात आले.

वाचा:

दरम्यान, अवनीच्या दोन बछड्यांना पकडून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे; खासगी शिकारी शफत अली खान, असगर अली खान, मुखबिर शेख व पशुवैद्यक अधिकारी डॉ. बी. एम. कडू यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका वन्यजीव प्रेमी सरिता सुब्रम्हण्यम यांनी दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आता शिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सदर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. शिकारींतर्फे अॅड. आदिल मिर्झा, याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर आणि वनविभागातर्फे अॅड. कार्तिक शुकूल यांनी बाजू मांडली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

लोकसभेत आज नमो Vs रागा! PM मोदींसह राहुल गांधींचेही होणार भाषण

0

नवी दिल्लीः अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( ) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत ( ) पंतप्रधान मोदींनी ( ) कृषी कायद्यांशी ( farm laws ) संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. यादरम्यान त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आता आज बुधवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत भाषण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर ते भाष्य करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधी कॉंग्रेस हल्ल्याचे नेतृत्व करतील. यामुळे सर्वांच्या नजरा सभागृहाकडे लागल्या आहेत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विविध पक्षांच्या सदस्यांनी सहभागास परवानगी देण्यासाठी लोकसभा सोमवार आणि मंगळवारी उशिरा सुरू होत आहे.

राहुल गांधींचा PM मोदींवर आरोप

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या विकासाच्या मॉडेलमुळे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची (PSU) संख्या कमी होईल आणि यामुळे देशाचे नुकसान होईल, असा आरोप राहुल गांधींनी केला. मोदींच्या विकास धोरणात पीएसयूचे आकडे हे पहिल्या क्रमांकवरून घसरून दहाव्या स्थानावर गेले आहेत. यामुळे देशाचे नुकसान झाले आहे आणि पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांना याचा फायदा झाला, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी प्रत्येक आघाडीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत आहेत. अर्थसंकल्पासंबंधी असो वा शेतकर्‍यांशी संबंधित प्रश्न, भारत-चीन सीमा तणाव असो, ते सरकारला सतत प्रश्न विचारून धारेवर धरत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'चीनला संधी देताय, व्ही. के. सिंग यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा'

0

नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) व्ही. के. सिंग ( ) यांना काही दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य गळ्यात अडकलेला काटा बनले आहे. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) १० वेळा अतिक्रमण ( ) केले आहे तर भारताने एलएसीवर किमान ५० वेळा अतिक्रमण केलं असेल, असं तामिळनाडूच्या मदुराईमध्ये ते रविवारी म्हणाले होते.

कॉंग्रेस नेते आणि खासदार ( ) यांनी यावरून व्ही. के. सिंग यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. ‘भाजपचे मंत्री चीनला भारताविरूद्ध केस करण्याची संधी का देत आहेत? त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. त्यांची हकालपट्टी केली गेली नाही तर हा प्रत्येक जवानाचा अपमान असेल, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.

सिंग यांच्या वक्तव्यानंतर चीन आक्रमक

व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्यावरून चीनने भारतावर कुरघोडी करण्याची संधी सोडलेली नाही. भारताने नकळत आपली चूक कबूल केली आहे. यामुळे एलएसीवर चिनी सैन्याची उपस्थिती योग्य आहे. एलएसीवर भारत वारंवार ‘बॉर्डर प्रोटोकॉल’चे उल्लंघन करत आहे. यामुळे सीमेवर दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होत आहे. या भारताने कराराचे पालन करावे. जेणेकरून सीमेवर शांतता प्रस्थापित होईल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले. व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याच्या संदर्भत देत चीनने भारतावर हा निशाणा साधला आहे.

लडाखमध्ये २०२० पासून तणावाची स्थिती

लडाखमध्ये इथल्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ४० हून अधिक सैनिक मारले गेले. पण हे चीनने अद्याप जाहीर केलेलं नाही. चीनने एलएसीवरील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्ने केला होता. पण भारताने असे प्रयत्न कधीही केले नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts