Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5808

सोलापूरमध्ये आढळल्या मगरी; वन अधिकारी म्हणतात, आमच्याकडे ट्रॅपच नाही!

5

( सूर्यकांत आसबे ) : सोलापुरातील देगाव परिसरातील घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये मोठ्या तीन मगरीचे दर्शन झाल्यामुळे पशुपालक आणि नागरिकांची झोप उडाली आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या मगरींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

साधारण सहा महिन्यांपूर्वी कोयना नगर येथील याच घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये एका शेतमजुराचा दिसली होती. मगर पकडण्यासाठी त्यावेळी वनविभागाने त्याठिकाणी ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावला होता . शिवाय वासामुळे मगर काठावर येईल म्हणून वनविभागाने सोललेली कोंबडीसुद्धा बांधली होती. आठवडाभरानंतरसुद्धा त्याठिकाणी कॅमेऱ्यात काहीच न दिसल्याने अखेर वनविभागाने मगरीचा शोध थांबवला होता. आता पुन्हा कोयना नगरपासून साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव परिसरातील याच ओढ्यामध्ये नागरिकांना एक नव्हे तर तब्बल तीन मगर दिसल्यानंतर तिचे फोटो काढून या प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी वन विभागाला दाखविल्यानंतर आता पुन्हा दिसलेल्या या मगरीच्या शोधासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

हनुमंत डोके या नागरिकाच्या सांगण्यानुसार याठिकाणी एकूण तीन मगरी आहेत. त्यातील दोन मगर नुकत्याच दिसल्या असून आणखी तिसरी एक मगर याच ठिकाणी वावरत आहे. सुरुवातीला पाण्यात सर्प असेल या अनुषंगाने त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकाने त्याला दगड मारला असता तो सर्प नसून मगर असल्याचे दिसताच त्याने तेथून धूम ठोकली. डोळ्याने पाहिलेली घटना त्याने गावात येऊन अन्य लोकांना व लोकप्रतिनिधींना सांगितली. बघता बघता गावात मगरींची बातमी वाऱ्यासारखी पसरली. खरे कि खोटे यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र लक्ष ठेऊन काहीजणांनी मगरीचे फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. आणि मग नागरिकांना भलीमोठी मगर पाहून घाम फुटला. आता देगाव येथील मगरींचे दर्शन झालेल्या ठिकाणी वनविभागाकडून कॅमेरे आणि पिंजरा लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सोलापूरचे वन परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे यांनी सोलापुरात मगर पकडण्यासाठी ट्रॅप नाही तर ट्रान्सपोर्टेशन पिंजरा असून सांगली येथून ट्रॅपची मागणी केली असता सांगली परिसरात पूर आला आहे,पुराच्या पाण्यातून प्राणी बाहेर येतात त्यावेळी त्यांना पकडण्यासाठी आपल्याकडे एकच ट्रॅप असल्याचे सांगत सांगली वन विभागाने दुसरीकडे बोट दाखविले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या प्रभागात मगरी दिसल्या आहेत त्या प्रभागाचे शिवसेनेचव नगरसेवक गणेश वानकर यांनी तत्काळ मंत्री आदित्य ठाकरे यांना संपर्क करून पत्रव्यवहार करत मगरी पकडण्यासाठी ट्रॅप आणि अत्याधुनिक पिंजरे देण्याची मागणी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोनाच्या काळात ट्वेन्टी-२० लीगला सुरुवात, १६ ऑगस्टला होणार फायनल

5

सध्याच्या घडीला करोनाच्या काळात ट्वेन्टी-२० लीगला सुरुवात करण्यात आली आहे. या लीगच्या फायनलचा सामना चाहत्यांना १६ ऑगस्टला पाहता येणार आहे. या लीगचे लाईव्ह सामने नेमके कुठे पाहायला मिळणार, पाहा…

शनिवारी एका ट्वेन्टी-२० लीगला सुरुवात झाली आहे. ही लीग ९ दिवस चालणार आहे. या लीगच्या पहिल्या सामन्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कारण जवळपास पाच महिन्यानंतर चाहत्यांना ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने पाहता आलेले नाहीत. त्यामुळे चाहत्यांनी या लीगला चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे.

ही ट्वेन्टी-२० लीग रंगणार तरी कुठेकरोनाच्या काळात ही ट्वेन्टी-२० लीग रंगणार तरी कुठे, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. ही ट्वेन्टी-२० लीग आफ्रिका खंडात रंगणार आहे. ही ट्वेन्टी-२० लीग रंगणार आहे टांझानियामध्ये. अॅडवान्स प्लेअर्स ट्वेन्टी-२० लीग, असे या स्पर्धेचे नाव आहे. या लीगमधील कामगिरीच्या जोरावरच राष्ट्रीय संघ निवडण्यात येणार आहे. या लीगचे लाईव्ह सामने कुठे पाहता येणार, पाहा…

लाईव्ह सामना कुठे पाहता येणार….अॅडवान्स प्लेअर्स ट्वेन्टी-२० लीग तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे. ही लीग gifincric.com या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे. भारतामध्ये टीव्हीवर या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवता येणार नाही. त्यामुळे वरील वेबसाईटवर चाहत्यांना लाईव्ह सामने पाहता येणार आहे.

करोनाच्या काळात बीसीसीआयनेही आयपीएलसाठी कंबर कसलेली आहे. यावर्षी आयपीएलला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी काही लीग सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना आयपीएलपूर्वी काही ट्वेन्टी-२० सामने पाहायला मिळणार आहे.

आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंना युएईमध्ये नेण्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या दोन करोना चाचण्या घेण्यात येणार आहे. जर या दोन्ही चाचण्यांमध्ये खेळाडू निगेटीव्ह सापडला तरच त्याला युएईला जाता येणार आहे. पण त्यावेळ किंवा युएईमध्ये पोहोचल्यावर खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला तर बीसीसीआयचे धाबे दणाणले जाऊ शकतात.

खेळाडू जरी करोना निगेटीव्ह सापडले तरी भारतामधूल किती खेळाडूंना आयपीएल खेळवण्यासाठी युएईमध्ये नेण्यात येऊ शकते, याबाबत बीसीसीआयने एक नियम बनवला आहे. आतापर्यंत प्रत्येत संघात जवळपास ३० खेळाडू असल्याचे पाहिले गेले आहे. पण तीन खेळाडूंना युएईमध्ये नेया येऊ शकणार नाही, असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार आता फक्त २४ खेळाडूंना युएईमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी नेण्यात येऊ शकते. त्यानुसार आयपीएच्या संघांना आपल्या संघात फक्त २४ खेळाडू ठेवता येतील, पण बाकीच्या खेळाडूंना मात्र त्यांना आता संघाबाहेर काढावे लागणार आहे. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूंना संघाबाहेर काढायचे, हा प्रश्न संघ मालकांपुढे पडलेला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचलेल्या बोटी परत मागवल्या

5

सांगली: सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण गावांना आपत्कालीन मदतीसाठी बोटी देण्याचा निर्णय मंत्र्यांच्या उद्घाटन समारंभामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी संबंधित गावांना दिलेल्या बोटी केवळ उद्घाटन समारंभासाठी परत मागवल्या होत्या. अखेर रविवारी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी समारंभपूर्वक बोटींचे वितरण करून आपलेच म्हणणे खरे केले. मुळातच वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर दिलेल्या बोटी केवळ फोटो सेशनसाठी माघारी घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल पूरप्रवण गावांनी उपस्थित केला आहे.

गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यातील १०४ गावांना महापुराचा फटका बसला. यातील अनेक गावांना पुराच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी जीव धोक्यात घालाव लागला. ब्रह्मनाळमध्ये जुनी लाकडी बोटी उलटून १७ जणांना जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूरप्रवण गावांना यांत्रिक बोटी देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २० जुलैला १५ गावांना बोटी सुपूर्द करण्याचे निश्चित झाले. प्रत्यक्षात मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी गावांना बोटी मिळाल्या नाहीत. अखेर जोरदार पावसामुळे पुन्हा महापुराचा धोका समोर दिसू लागताच गावांनी बोटी मिळाव्यात असा आग्रह धरला. जिल्हा परिषदेने गावांना निरोप देऊन बोटी घेऊन जाण्यास सांगितले. सात ऑगस्टला बहुतांश गावांनी बोटी ताब्यात घेतल्या. मात्र, बोटींच्या वितरणाचा समारंभ नाही, उद्घाटन नाही, फोटो सेशन झाले नसल्याने राज्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली.

वाचाः

गावात पोहोचलेल्या बोटी प्रशासनाने परत बोलवल्या. ब्रह्मनाळ ग्रामपंचायतीने मात्र प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करून बोट परत पाठवली नाही. प्रशासन आणि जिल्ह्यातील मंत्र्यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, पूरबाधित गावांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून अखेर जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रविवारी बोटींच्या वितरणाचा लोकार्पण सोहळा घेतलाच.

ब्रह्मनाळ वगळता अन्य गावांना बोटींची वितरण केले. यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ब्रह्मनाळकरांनी आततायीपण केल्याचा आरोपही केला. दरम्यान, २० जुलैलाच बोटी देणार होता, तर मग एवढा विलंब का लावला, असा सवाल पूरबाधित गावांनी उपस्थित केला आहे. तातडीच्या कामातही मंत्र्यांनी फोटो सेशनची संधी सोडली नाही, अशा भावना पूरबाधितांनी व्यक्त केल्या.

वाचाः

ब्रह्मनाळमध्ये दुर्घटनेच्या ठिकाणी वृक्षारोपण
ब्रह्मनाळमध्ये पुराच्या पाण्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्तीनिमित्त ब्रह्मनाळकरांनी दुर्घटनेच्या ठिकाणी वृक्षारोपण केले. मंत्री पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना ब्रह्मनाळच्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अधिका-यांनी तपासणी करूनच बोटी दिल्या होत्या. बोटी निकृष्ट किंवा सदोष असत्या तर खरेदीचा व्यवहार झालाच नसता. केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मंत्र्यांनी काहीही कारण सांगणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया ब्रह्मनाळकरांनी व्यक्त केल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नव्या नियमांप्रमाणे 'या' आयपीएलच्या संघातील खेळाडूंना मिळणार डच्चू

0

यावर्षीचे आयपीएल युएईमध्ये होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने काही नवीन नियमही बनवले आहेत. या सर्व नियमांचे पालन आता आयपीएलमधील सर्व खेळाडूंना करावे लागणार आहे. या नवीन नियमांनुसार आयपीएलमधईल काही संघांना आपल्या खेळाडूंना डच्चूही द्यावा लागणार आहे.

आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंना युएईमध्ये नेण्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या दोन करोना चाचण्या घेण्यात येणार आहे. जर या दोन्ही चाचण्यांमध्ये खेळाडू निगेटीव्ह सापडला तरच त्याला युएईला जाता येणार आहे. पण त्यावेळ किंवा युएईमध्ये पोहोचल्यावर खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला तर बीसीसीआयचे धाबे दणाणले जाऊ शकतात.

खेळाडू जरी करोना निगेटीव्ह सापडले तरी भारतामधूल किती खेळाडूंना आयपीएल खेळवण्यासाठी युएईमध्ये नेण्यात येऊ शकते, याबाबत बीसीसीआयने एक नियम बनवला आहे. आतापर्यंत प्रत्येत संघात जवळपास ३० खेळाडू असल्याचे पाहिले गेले आहे. पण तीन खेळाडूंना युएईमध्ये नेया येऊ शकणार नाही, असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार आता फक्त २४ खेळाडूंना युएईमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी नेण्यात येऊ शकते. त्यानुसार आयपीएच्या संघांना आपल्या संघात फक्त २४ खेळाडू ठेवता येतील, पण बाकीच्या खेळाडूंना मात्र त्यांना आता संघाबाहेर काढावे लागणार आहे. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूंना संघाबाहेर काढायचे, हा प्रश्न संघ मालकांपुढे पडलेला आहे. कोणत्या संघातील खेळाडूंनी आता बाहेर काढावे लागणार आहे, ते पाहा…

बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार काही संघांनी आतापर्यंत आपले २४ संभाव्य खेळाडू निवडलेले आहेत. पण आयपीएलमधील तीन संघ अजूनही असे आहेत की त्यांनी अजूनही नवीन नियमानुसार आपला संभाव्य संघ बनवलेला नाही. या तीन संघांमध्ये कोणाचा सहभाग आहे, ते पाहा…

बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार अजूनही तीन संघांनी बदल केलेला पाहायला मिळत नाही. कारण अजूनही त्यांच्या संघांमध्ये २५ संभाव्य खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्येकी एका खेळाडूला संघाबाहेर काढावे लागणार आहे. या तीन संघांमध्ये राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांचा समावेश आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

पंतप्रधान मोदींच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; १७ हजार कोटी रुपये केले वितरित

5

नवी दिल्ली: (PM Narendra Modi) यांनी आज रविवारी कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत () आर्थिक योजनांबाबत महत्वाची घोषणा केली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून पंतप्रधान योजनेच्या विविध योजनांची घोषणा केली. या बरोबरच पंतप्रधानांनी आपल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात कृषी पायाभूत सुविधा फंडांतर्गत साडे आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना १७ हजार कोटी रुपये वितरित केले. ( launches for )

आज लहषष्टी असून भगवान बलराम जयंती आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना, विशेषत: शेतकऱ्यांना हलछठ आणि दाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. हलषष्टी आणि भगवान बलराम जयंतीचे निमित्त साधत पंतप्रधान मोदी यांनी कृषीशी संबंधित सुविधा तयार करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा विशेष निधी उभारण्याची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर

देशातील साडे आठ कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या रुपात १७ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या योजनेचे लक्ष्य आता गाठले जात असल्याचे पाहून आपल्याला आनंद होत असल्याचेही मोदी म्हणाले. गेल्या दीड वर्षांच्या काळात या योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. यांपैकी २२ कोटी रुपये करोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत, असेही मोदी म्हणाले.

ही बातमी वाचा:

या योजनेमुळे गावांमधील शेतकरी समूहांना, शेतकरी समित्यांना, FPO ना वेअरहाऊस बनवण्यासाठी, तसेच कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी आणि फूड प्रोसेसिंगशी संबंधित लघु उद्योग सुरू करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी योजनेचा शुभारंभ करताना म्हटले आहे. पूर्वी e-NAM द्वारे एक तंत्रज्ञान आधारित एक मोठी व्यवस्था बनवण्यात आली आहे. आता कायदा तयार करून शेतकऱ्यांना बाजाराच्या तसेचे बाजार कराच्या कक्षेतून मुक्त करण्यात आले आहे.

पाहा

शेतकऱ्यांपुढे आता अनेक पर्याय

आता शेतकऱ्यांपुढे अनेक पर्याय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आपल्याच शेतात आपल्या पिकाची विक्री करावी असे जर शेतकऱ्याला वाटले, तर तो आता करू शकणार आहे. किंवा जे कोणी त्याला अधिक किंमत देत असेल असा e-NAM शी संबंधित व्यापारी आणि संस्थांना देखील तो आपले उत्पादन थेट विकू शकणार आहे. या देशातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांना घाबरवण्याचे काम सर्वाधिक झाले. आता या भीती घालण्याच्या तंत्रापासून देखील व्यापाऱ्यांची सुटका होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ही बातमी देखील वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'गवत खाईन, पण पाक लष्कराचे बजेट वाढवेन' शोएब भारताविरुद्ध पुन्हा बरळला

5

कारगिल युद्धात भारताविरुद्ध लढायला तयार असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा बरळल्याचे पाहायला मिळत आहे. एक वेळ गवत खाईन, पण लष्कराचे बजेट वाढवेन, असे वादग्रस्त वक्तव्य आता शोएबने केले आहे.

पाकिस्ताडनला सर्वात मोठा धोका हा भारताकडूनच आहे. कारण भारत वगळता अन्य कोणता जवळचा देश पाकिस्तानवर हल्ला करू शकत नाही, हे स्षष्ट दिसत आहे. त्यामुळे भारताला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपल्या लष्कराचे बजेट वाढवायला हवे, असे शोएबला वाटत आहे. एकवेळ दोन वेळचे जेवायला मिळाले नाही तरी चालेल, पण लष्कराचे बजेट वाढवायला हवे, असे शोएबचे म्हणणे आहे.

वाचा-

यावेळी शोएबने काही दाखलेही दिले आहे. तो म्हणाली की, ” भारतीय विमानं आमच्या देशात घुसली होती आणि मोठे नुकसान करून गेली. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर बरेच दिवस मी निराश होतो. हे असे का घडले, याचा विचारही मी करत होतो. पण या गोष्टींना उत्तर देण्यासाठी आपणही सक्षम असायला हवे, असे मला वाटते.”

यावेळी शोएब म्हणाला की, ” जर मला संधी दिली गेली, तर मी एकवेळ गवत खाईन, पण पाकिस्तानच्या लष्कराचे बजेट नक्कीच वाढवेन. सध्याच्या घडीला या गोष्टीची सर्वात जास्त गरज आपल्या देशाला आहे. त्यामुळे आता जर आपण लष्करावर २० टक्के खर्च करत असून तर यापुढे ६० टक्के करायला हवा.”

शोएब पुढे म्हणाला की, ” सध्याच्या घडीला आपल्यामधील वाद संपायला हवेत. लष्करामध्ये आपल्याकडे खासगी क्षेत्र का काम करत नाही, याचेही मला आश्चर्य वाटते. मी लष्कर प्रमुखांना सांगू इच्छितो की, आपण माझ्याबरोबर एकदा बसा. त्यानंतर लष्कराबाबत काही प्लॅन करू शकतो.”

वाचा-

यापूर्वी शोएबने भारताविरुद्ध कारगिल लढाईमध्ये लढण्याची तयारीही दाखवली होती. यासाठी त्याने इंग्लंडमधील एका क्लबबरोबरचा करार मोडला होता. त्यावेळी शोएबला पाकिस्तानकडून कारगिलमध्ये लढायचे होते, पण ही गोष्ट शक्य होऊ शकली नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

सीएच्या मदतीने रियाने सुशांतच्या एफडीमधून घेतले २.५ कोटी?

5

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीशी केलेल्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली. सुशांतच्या सीएनेही काही रक्कम घेतला असल्याचा आता संशय व्यक्त केला जात आहे.

सुशांतच्या कंपनीचं अकाउंट सांभाळणाऱ्या दोन सीएच्या अकाउंटमध्ये मार्चमध्ये काही रक्कम गेल्याचं खुलासा रियाने ईडीच्या टीमकडे केला. २ कोटी ६५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची केली होती. मात्र सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर रिया तिचा भाऊ शौविक आणि दोन सीएच्या मदतीने त्या एफडीमधले जवळपास अडीच कोटी रुपये काढले. यानंतर एफडी फक्त २ कोटींचेच राहिले.

याशिवाय सुशांतच्या कंपन्यांच्या पैशांच्या बँक खात्यांमध्येही ईडीला हेराफेरी केल्याचं दिसलं. याबाबतीत रियाला प्रश्न विचारले असता तिने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं दिली नाहीत.

सुशांतच्या वडिलांनी रियावर केले होते हेराफेरीचे आरोप

याआधी सुशांतच्या वडिलांनी यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करताना मुलाच्या पैशांवर रियाचा डोळा असल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये होते. मात्र वर्षभरात त्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. ज्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले त्यांचा आणि सुशांतचा काहीही व्यवहारीक संबंध नव्हता.

दरम्यान, केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होत आहे. ईडीने सुशांतच्या बँक अकाउंटच्या चौकशीत शुक्रवारी रियाची आठ तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत रियाने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं न दिल्यामुळे तिला पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

शुक्रवारी रियाच्या चौकशीनंतर शनिवारी तिच्या भावाची शौविकची १८ तास चौकशी करण्यात आली.आता सोमवारी पुन्हा एकदा रियाची चौकशी करण्यात येणार आहे. असं म्हटलं जातंय की यावेळीही रियाला तिची मालमत्ता आणि मिळकतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात येतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

धक्कादायक! मुकबधीर-अंध वृद्ध सासूला सूनेनेच जंगलात फेकले

5

म. टा. प्रतिनिधी, : जंगलात मध्यरात्री फेकलेल्या आणी विव्हळत पडलेल्या वृद्ध मुकबधीर महिलेचा जीव पोलिसांमुळे बचावला. तीन ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ही महिला कच्ची घाटी ते पीरवाडीकडे या रस्त्यावरील जंगलातील नाल्यात पडली होती. महिलेला फेकून देणारी बहिणीची सून आणि तिला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन ऑगस्ट रोजी रात्री ११च्या सुमासार कच्ची घाटी जवळील जंगलात एक महिला विव्हळत पडली असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. त्यानंतर आंधळे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. या महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता ती मुकबधीर आणि अंध असल्याचे दिसून आले. आंधळे यांनी नागरिकांच्या मदतीने महिलेला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना माहिती देण्यात आली असता, त्यांनी गंभीर दखल घेत महिलेला टाकून देणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक आंधळे यांना दिल्या. या महिलेचे छायाचित्र घेऊन चिकलठाणा पोलिसांनी आसपासच्या गावांतील परिसर पिंजून काढला. यावेळी ही महिला ब्रीजवाडी, नारेगाव येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता, या महिलेचा संभाळ तिच्या बहिणीची सून गेल्या आठ ते दहा वर्षांपासून करीत होती, मात्र तिच्या आजारपणाला कंटाळून तिने गल्लीत राहणारा रिक्षाचालक अमीर मुन्नाखान याच्या मदतीने कच्ची घाटी येथील जंगलात सोडल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

पोलिसांनी या सुनेला आणि अमीर मुन्नाखान याला ताब्यात घेतले असता त्यांनी याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिस नाईक रवींद्र साळवे यांच्या तक्रारीवरून आरोपी सून आणी रिक्षाचालक अमीरविरुद्ध माता, पिता आणि जेष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक आंधळे, जमादार अजिनाथ शेकडे, रवींद्र साळवे आणि सोपान डकले यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

धक्कादायक! पुण्यात तरुणीवर फॅमिली डॉक्टरने केला बलात्कार

4

म. टा. प्रतिनिधी, : उच्चशिक्षित तरुणीवर पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरला १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी सुरेश वडियार (वय ३६, आयुर क्लिनिक, शिवराजनगर, अप्पर इंदिरानगर) या डॉक्टरला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित तरुणी २२ वर्षांची आहे. वडियार संबंधित तरुणीच्या कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर होता. त्यामुळे मार्च २०१८पासून ती पाठ व खांद्याच्या दुखापतीच्या उपचारांसाठी वडियारकडे जात होती. बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर शिवराज नगर येथे सर्वे नंबर १० येथे सुरेश वडियार याचे आयुर नावाचे क्लिनिक आहे. संबंधित तरुणी उपचारांसाठी त्याच्या क्लिनिकमध्ये गेली असता त्याने तिचे चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर वडियारने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याच्या अत्याचाराला कंटाळून तिने घडलेला प्रकार घरी सांगितला. तिचे वकील. अॅड हेमंत झंजाड, अॅड. अरविंद खांडरे यांच्यामार्फत पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.

आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी डॉक्टरकडून त्यांनी चित्रीकरण केलेले व्हिडियो जप्त करायचे आहेत, ते व्हिडियो स्टोअर केले आहेत का, असल्यास ते सर्व साहित्य जप्त करायचे आहे; तसेच त्यांनी आणखी कोणाची या पद्धतीने फसवणूक केली आहे का, याबाबत तपास करायचा आहे, त्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी कोर्टात केली. आरोपी विक्षिप्त मनोवृत्तीचा असून, त्याने संबंधित तरुणीचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद फिर्यादीतर्फे अॅड. हेमंत झंजाड यांनी कोर्टात केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अयोध्येतील बाबरी मशिदीवर सुन्नी वक्फ बोर्डाचे मोठे विधान, म्हणाले…

5

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुस्लिम पक्षाला अयोध्येत मशिदीसाठी पर्यायी ५ एकर जागा देण्यात आली आहे. या जागेत मशिदीसह, रुग्णालय आणि संस्थेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे, तसेच रुग्णालयाचे नाव मशीद, आणि बाबरी हॉस्पिटल असे ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीच्या नावाबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.

पर्यायी जागेवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीला बाबरी असे नाव देणार नाही, असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

अयोध्येतील मशीद निर्मितीच्या कार्यक्रमात भूमिपूजन करण्याची इस्लाममध्ये परवानगी नसल्याचे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने निर्माण केलेल्या नव्या ट्रस्टच्या प्रवक्त्याने सांगितले. केवळ पाया खोदून मशीदीची निर्मिती केली जाते, मात्र या जमिनीवर रुग्णालय किंवा ट्रस्ट भवनची निर्मिती होताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येईल असेही ट्रस्टच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. मी नेहमीच माझे कार्य कर्तव्य आणि धर्म मानतो. मला माहित आहे की कोणीही मला मशीदीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला बोलावणार नाही. यामुळे मी जाणारही नाही, अशी प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी ५ ऑगस्ट या दिवशी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली होती.

वाचा-

अयोध्येजवळली रौनाहीमधील धन्नीपूर येथे तयार होणाऱ्या मशिदीला बाबराचे नाव देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. मात्र या निव्वळ अफवा असून या मशिदीचे नाव बाबराच्या नावावर ठेवण्यात येणार नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे.

वाचा-

सुन्नी वक्फ बोर्डाने नुकतेच इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टची निर्मिती केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्येत मशीद, रुग्णालय आणि कम्युनिटी किचन उभारण्यात येणार आहे. या बरोबरच येथे इस्लामिक विषयांवर संशोधन करण्यासाठी एक संशोधन केंद्र देखील असणार आहे.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts