Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5809

तिसऱ्या टप्प्यात 'या' व्यक्तींना मिळणार लस; आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

0

मुंबई: राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण ५ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे.

वाचाः

आतापर्यंत कोविन पोर्टलवर १० लाख ५४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. ५ लाख ४७ हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी ४१ हजार ४५३ जणांना लस देण्यात आली आहे.

वाचाः

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व ज्यांना सहव्याधी आहे अशा ५० वर्षाखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे दि.१ मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरु होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल असेही टोपे यांनी सांगितले.

वाचाः

राज्यात लसीकरणा दरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरु असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

भाजप नेते आशीष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली 'ही' मागणी

0

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांनी भाषणामध्ये देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभा करण्यात याव्यात असे आवाहन देशाला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या अशा दोन संस्था उभ्या करण्याबाबत शासन म्हणून पुढाकार घ्यावा अशी विनंती करणारे पत्र भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी (CM Uddhav Thackeray) यांना लिहिले आहे. (bjp leader and mla writes a letter to )

९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कुसुमाग्रज यांच्या जन्मभूमीत होते आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी भाषेतील योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यापूर्वी मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण संस्था उभ्या राहिल्यास भाषेचा आणि महाराष्ट्राचा सन्मानच होईल, असे शेलार यांनी पत्रात म्हटले आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचा ७५ वा वर्धापन दिन आपण ज्यावेळी साजरा करू त्यापूर्वी या दोन संस्था उभा राहिल्यास मराठी भाषेला एक वेगळा आयाम मिळू शकेल, असेही शेलार यांनी पुढे म्हटले आहे.

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि मातृभाषेचा सन्मान प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्याने केलेले हे आव्हान एका अर्थी एक मोठी संधी आहे. त्यामुळे तातडीने या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत याबाबतही तातडीने केंद्र सरकारशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पुढे लिहितात की, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा एक विकासाचा महामार्ग वेगाने उभा राहतो आहे. या महामार्गाच्या लगत काही जागा राज्य सरकारने विविध व्यावसायिक उपयोगासाठी निश्चित केल्या आहेत. जर, अशा प्रकारच्या दोन संस्था या महामार्गाच्या लगत संरक्षित जागेवर उभ्या राहिल्यास या संस्थांसाठी लागणारी जागा ही तातडीने उपलब्ध होऊ शकेल व कनेक्टिविटी राहू शकेल.

व्हीजेटीआय, आयआयटी या सारख्या नामांकित संस्थांशी समन्वय साधून संलग्न करून तसेच केईएम, जे. जे. यासारख्या वैद्यकीय संस्थांशी संलग्न करून या संस्था मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी उभ्या राहायला हव्यात. असे झाल्यास भविष्यात मराठीतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीच्या हातून मराठीची सेवा घडेल, असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
ही ‘ज्ञानभाषा’ आणि ‘व्यवहार भाषा’ व्हावी यादृष्टीने पंतप्रधानांनी केलेले हे आव्हान महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने उपाय योजना करून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच या बाबत एक अभ्यास गट तातडीने नियुक्त करून जागतिक पातळीच्या आणि मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या संस्था उभ्या करुन मराठी भाषेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल सरकारने उचलावे, अशी विनंतीही आशीष शेलार यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

छत्रपतींचा राजेशाही थाट! फोटोतील व्यक्तीला ओळखलत का?

0

छत्रपतींचा राजेशाही थाट! फोटोतील व्यक्तीला ओळखलत का?छत्रपतींचा राजेशाही थाट! फोटोतील व्यक्तीला ओळखलत का?

आजचे फोटो – फोटोगॅलरी – Maharashtra Times

hasina begum: हसीना बेगम यांचे निधन; पाकिस्तानातून १८ वर्षांनी झाली होती सुटका

0

औरंगाबाद: पाकिस्तानातील तुरुंगात १८ वर्षांचा काळ व्यथित करून नुकत्याच २६ जानेवारी रोजी भारतात परतेल्या () यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. मायदेशी परतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हसीना बेगम यांचा दफनविधी औरंगबादमधील पीरगैब कब्रस्थानात करण्यात आला. त्यांना कोणीही वारस नसल्याने नातेवाईक आणि विभागातील नागरिकांनीच त्यांचा दफनविधी केला.

आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हसीना बेगम या १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यावेळी त्याचा पासपोर्ट हरवला. या कारणामुळे त्यांना तब्बल १८ वर्षांचा काळ तुरुंगात काढावा लागला. औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनंतर त्यांची सुटका झाली होती.

हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदापुरातील रहिवासी होत्या. त्यांचा विवाह दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. दिलशाद हे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे रहिवासी होते. त्यांच्या पतीचे नातेवाईक पाकिस्तानात होते. त्यानाच भेटण्यासाठी त्या सन २००४ साली रेल्वेने पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यांचा पोसपोर्ट लाहोर येथे हरवला. त्यानंतर त्यांना तरुंगात डांबण्यात आले. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी तेथील कोर्टाला सांगितले होते.

क्लिक करा आणि वाचा-
हसीना बेगम यांचे औरंगबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्याअंतर्गत घर आहे. ही माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानात पाठवली होती. त्यानंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली होती.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नगरमध्ये महिलांमध्ये प्रचंड दहशत; 'असं' काय घडलं शहरात?

0

म. टा. प्रतिनिधी, नगर: नगर शहरात काल एकाच दिवशी पाच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याच्या घटना घडल्या. यामुळे नगर शहरात महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी चौकाचौकात फलक लावून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे, तर शिवसेनेने पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या घटनांना आळा घालण्याची मागणी केली आहे.

नगर शहातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या चोरांनी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून नेले. यातील बहुतांश घटना वर्दळीच्या रस्त्यावर घडल्या. सायंकाळी पावणेसहा वाजता गुलमोहर रस्त्यावर पहिली घटना घडली. त्यानंतर तासाभरात विविध ठिकाणी अशा घटना घडल्या. प्रतिभा प्रशांत त्रिंबके यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपयांचे गंठण चोरीला गेले. त्या गुलमोहर रोडवरून जात असताना ही घटना घडली. त्यानंतर श्रद्धा सुशिल भंडारी (बुरूडगाव रोड), राजश्री रामसुख मंत्री (मार्केट यार्ड), शुभांगी कृष्णा गोसावी (बालिकाश्रम रोड) आणि सविता विकास दरवडे (टिळक रोड) यांच्या गळ्यातील दागिने अशाच पद्धतीने चोरीला गेले.

शहरातील पोलीस ठाण्यांत यासंबंधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेने यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. विक्रम राठोड, विनय वाखुरे , सागर ठाकुर , रोहित राठोड, साई शिंदे, पंकज राठोड यांनी पोलिसांना निवेदन देऊन तातडीने तपास करण्याची आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली.

पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते हाती लागले नाहीत. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी आता महिलांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली आहे. शहरात ठिकठिकाणी फलक लावून दागिने रोखण्यासाठी काय दक्षता घ्यावी, यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मधल्या काळात कमी झालेले हे प्रकार पुन्हा वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्याने चोरटे सक्रिय झाले आहेत, असे दिसून येते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Kalyan: लग्नाच्या भूलथापा, उच्चशिक्षित तरुणीला १६ लाखांचा गंडा

0

कल्याण: विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळखीनंतर डॉक्टर असल्याचे सांगून लग्नाच्या भूलथापा देऊन उच्चशिक्षित तरुणीला १६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणीने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. ही तरुणी खडकपाडा येथे राहते. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत ती मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. विवाह नोंदणी केल्यानंतर तरुणीशी एका व्यक्तीने संपर्क साधला. ब्रिटनमध्ये डॉक्टर असल्याची बतावणी त्याने केली. लग्नाच्या भूलथापा दिल्या. दोघांमध्ये चॅटिंगच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. जानेवारीत भारतात येणार असल्याचे त्याने तिला सांगितले. त्याने तिला भारतात येणार असल्याचे सांगितले. २३ जानेवारीला त्याने पुन्हा फोन केला. दिल्ली विमानतळावर आलो आहे. सोने असल्याने सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी पकडले असून, सुटका करून घेण्यासाठी सुरुवातीला त्याने तिच्याकडे ६५ हजार रुपयांची मागणी केली.

तरुणी त्याच्या भूलथापांना बळी पडली. तिने त्याला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर वेळोवेळी तिच्याकडून त्याने पैसे घेतले. एकूण १६ लाख ४५ हजार रुपये घेऊन तो गायब झाला. मात्र, आपली फसवणूक झाली आहे, असे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'या' आठवड्यात लाँच होणार शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्सचे 'हे' पाच स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

0

२०२० वर्षात स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता २०२१ या वर्षाला सुरुवात झाली आहे. स्मार्टफोन कंपन्या या वर्षी सुद्धा एका पेक्षा एक वरचढ स्मार्टफोन लाँच करणार आहेत. तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान करीत असाल तर या आठवड्यात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहेत. भारतीय बाजारात शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्स कंपनीचे स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. हे स्मार्टफोन भारतात लाँचिंग साठी तयार आहेत. तर काही ग्लोबली लाँच करण्यात येणार आहेत. आम्ही पाच अशा स्मार्टफोनची यादी बनवली आहे. जी या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहेत. जाणून घ्या या पाच स्मार्टफोन विषयी. या फोनची किंमत त्यांची खास फीचर्स आणि फोटो संबंधीची खास माहिती जाणून घ्या…

२०२० वर्षात स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता २०२१ या वर्षाला सुरुवात झाली आहे. स्मार्टफोन कंपन्या या वर्षी सुद्धा एका पेक्षा एक वरचढ स्मार्टफोन लाँच करणार आहेत. तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान करीत असाल तर या आठवड्यात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहेत. भारतीय बाजारात शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्स कंपनीचे स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. हे स्मार्टफोन भारतात लाँचिंग साठी तयार आहेत. तर काही ग्लोबली लाँच करण्यात येणार आहेत. आम्ही पाच अशा स्मार्टफोनची यादी बनवली आहे. जी या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहेत. जाणून घ्या या पाच स्मार्टफोन विषयी. या फोनची किंमत त्यांची खास फीचर्स आणि फोटो संबंधीची खास माहिती जाणून घ्या…

'या' आठवड्यात लाँच होणार शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्सचे 'हे' पाच स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

२०२० वर्षात स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता २०२१ या वर्षाला सुरुवात झाली आहे. स्मार्टफोन कंपन्या या वर्षी सुद्धा एका पेक्षा एक वरचढ स्मार्टफोन लाँच करणार आहेत. तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान करीत असाल तर या आठवड्यात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहेत. भारतीय बाजारात शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्स कंपनीचे स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. हे स्मार्टफोन भारतात लाँचिंग साठी तयार आहेत. तर काही ग्लोबली लाँच करण्यात येणार आहेत. आम्ही पाच अशा स्मार्टफोनची यादी बनवली आहे. जी या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहेत. जाणून घ्या या पाच स्मार्टफोन विषयी. या फोनची किंमत त्यांची खास फीचर्स आणि फोटो संबंधीची खास माहिती जाणून घ्या…

​Xiaomi Mi 11
​Xiaomi Mi 11

Xiaomi Mi 11

शाओमीने ८ फेब्रुवारी रोजी आपला लेटेस्टे स्मार्टफोन मी ११ ला ग्लोबली लाँच केले आहे. या फोनमध्ये ६.८१ इंचाचा २ के अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० ओएस बेस्ड MIUI 12 वर काम करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत १०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी यात 4600 बॅटरी दिली आहे. टर्बोचार्ज्ड ५५ वॉट वायर्ड आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनला १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ७० हजार १०० रुपये ठेवली आहे.

​नोकिया ५.४
​नोकिया ५.४

नोकिया ५.४

नोकिया पुन्हा एकदा भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी या फोनला १० फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. या फोनला ग्लोबली मार्केटमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये ६.३९ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्ऱॉयड १० ओएसवर काम करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर मिळणार आहे. ज्याला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी यात चार रियर कॅमेरे दिले जाणार आहे. ज्यात मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा लेन्स मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. या फोनची संभावित किंमत १६ हजार ९०० रुपये असू शकते.

​नोकिया ३.४
​नोकिया ३.४

नोकिया ३.४

नोकिया ५.४ सोबत कंपनी स्वस्त किंमतीचे मॉडल लाँच करणार आहे. नोकिया ३.४ ला लाँच करु शकते. यात ६.३९ इंचाचा एचडी डिस्प्ले मिळणार आहे. फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करू शकतो. मल्टिटास्किंग साठी स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर मिळणार आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले जाणार आहेत. यात १३ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा लेन्स मिळणार आहे. स्मार्टफोनची संभावित किंमत ११ हजार ९९९ रुपये असू शकते.

​इंफिनिक्स स्मार्ट 5
​इंफिनिक्स स्मार्ट 5

इंफिनिक्स स्मार्ट 5

इंफिनिक्स आपला लेटेस्ट स्मार्टफोन ‘स्मार्ट 5’ ११ फेब्रुवारी रोजी भारतात लाँच करणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये ६.६ इंचाचा वॉटरड्रॉव डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० गो एडिशनवर काम करणार आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर मिळणार आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला जाणार आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.

​इंफिनिक्स स्मार्ट 5
​इंफिनिक्स स्मार्ट 5

इंफिनिक्स स्मार्ट 5

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे दिले जाणार आहेत. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला जाणार आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त फोन असणार आहे. या फोनची किंमत ८ हजार रुपये असू शकते. या फोनला एक्सक्लूसिव म्हणून फ्लिपकार्टवर विकले जाणार आहे.

​रेडमी K40 प्रो
​रेडमी K40 प्रो

रेडमी K40 प्रो

चिनी कंपनी शाओमी आपला नवा स्मार्टफोन सीरीज १४ फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. रेडमी K40 प्रो स्मार्टफोनला या दिवशी लाँच केले जाऊ शकते. या सीरीजमध्ये रेडमी K40, रेडमी K40S सोबत टॉप व्हेरिएंट रेडमी K40 प्रो चा समावेश आहे. रेडमी K40 सीरीज च्या खास फीचर्समध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० आणि मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर सोबत लाँच केला जाऊ शकतो.

​रेडमी K40 प्रो
​रेडमी K40 प्रो

रेडमी K40 प्रो

रेडमी के ४० प्रोमध्ये फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनला ६ जीबी रॅम मध्ये लाँच केले जाऊ शकते. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा ड्यूल फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये ४८०० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळू शकते. या फोनची सुरुवातीची किंमत ३४ हजार ९९९ रुपये असू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

खडसेंच्या समोरच जयंत पाटील म्हणाले, परतफेड करा!

0

जळगाव: ‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसगावमध्ये ४ हजार मतांनी पराभूत झालो. परंतु २०२४ च्या निवडणुकीत याची परतफेड करा. महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांनी झपाट्याने कामाला लागा. २०२४ साली ही जागा निवडून यायलाच हवी,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री (Jayat Patil) यांनी आज केलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते () हे देखील त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

वाचा:

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं आज पाटील जळगावात आहेत. इथं पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सूचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी हे अपेक्षित आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले. ‘कार्यकर्त्यांची एक मोठी फळी इथं आहे. नेते व पदाधिकाऱ्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करा,’ असंही पाटील म्हणाले.

खडसेंच्या अनुभवाचा उपयोग होईल!

एकनाथ खडसे यांचंही त्यांनी कौतुक केलं. ‘खडसे साहेबांसारखे अनुभवी नेते आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फार उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही,’ असं पाटील म्हणाले.

ही जागा जिंकणं कठीण नाही – खडसे

‘महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. जिल्ह्यातही तो एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचं आहे. संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा. ही जागा निवडून आणणं मोठी गोष्ट नाही,’ असा विश्वास एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा, असं सांगतानाच, राजीवदादा तुझ्या पाठिशी आहोत, असं आश्वासनही खडसे यांनी दिलं. यावेळी भाजपमधील डझनभर खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सरकार ऐकेना! डॉक्टरांनी दिली उपोषणाची हाक, 'हे' आहे कारण

0

म. टा. प्रतिनिधी, नगरः कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आता अशाच एका अध्यादेशाच्या विरोधात डॉक्टरांनीही आंदोलन सुरू केले आहे. देशव्यापी बंद पाळूनही सरकारने लक्ष न दिल्याने आता डॉक्टरांच्या संघटनेतर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतरही सरकारने ऐकले नाही, चलो राजधानी असा नारा देत राजधानीत धडक मारण्याचा इशाराही इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.

आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे हे आंदोलन सुरू आहे. यासाठी पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणात सहभागी होत नगरमधील डॉक्टर आज आयएमए भवन येथे उपोषणाला बसले आहेत. केंद्र सरकारने परिपत्रक काढून आयुर्वेदिक डॉक्टरांना काही प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. याला एमबीबीएस म्हणजे अॅलोपॅथी शाखेच्या डॉक्टरांचा विरोध आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे डिसेंबरपासून विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. त्याची दखल न घेतल्याने आता उपोषण करण्यात येत आहे.

वाचाः

संघटनेच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, डॉ. सचिव सचिन वहाडणे, उपाध्यक्ष डॉ. सतीश सोनवणे, राज्य संघटनेचे पदाधिकारी डॉ. निसार शेख, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी आंदोलनात भाग घेतला. मुंबईहून राज्य पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे आले होते. या आंदोलनासंबंधी डॉ. पाटे यांनी सांगितले की, ‘आयुर्वेद हे आपल्या देशाचे प्राचीन आणि महत्वपूर्ण शास्त्र आहे. आम्हाला त्याबद्दल पूर्ण आदर आहे.

केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेने नोव्हेंबर २०२० मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार आयुर्वेदिक डॉक्टरांना काही शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली आहे. हा निर्णय आयुर्वेदिक शाखेचेही खच्चीकरण करणारा आहे. यामुळे नवीनच खिचडीपॅथी निर्माण होऊन आपली आरोग्य सेवाच धोक्यात येण्याची शक्यता आहे. याकडे आम्ही लक्ष वेधत आहोत. यासाठी आजवर केलेल्या आंदोलनांकडे सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

वाचाः

१ ते १४ फेब्रुवारी या काळात दिल्लीसह देशात विविध ठिकाणी साखळी उपोषण होणार आहे. सरकारला जागे करण्यासोबतच आम्ही लोकप्रबोधनही करीत आहोत. शेवटी हा प्रश्न लोकांच्याही आरोग्याशी निगडीत आहे. आंदोलन सुरू असले तर आम्ही दवाखाने सुरूच ठेवणार आहोत. इतर आंदोलनांप्रमाणे आम्ही थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही. मात्र, इतर आंदोलनांमुळे म्हणा किंवा इच्छा नाही म्हणून सरकार आमच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करीत आले आहे. उपोषणाची दखल घेतली नाही तर आम्ही राजधानी चलोचा नारा देत राज्याच्या राजधानीत जाणार आहोत. तेथे संबंधितांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे मागण्या सादर केल्या जातील. अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडेही मागण्या मांडणार आहोत. त्याही पुढे जाऊन या परिपत्रकाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयातही संघटना जाणार आहे,’असे डॉ. पाटे यांनी सांगितले.


वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'खरे मोदी कोण? हे आता मोदींनाच विचारायला हवं'

0

मुंबई: ‘पंतप्रधान हे एकीकडं विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करतात आणि दुसरीकडं त्यांचं कौतुकही करतात. त्यांचं राजकारण नव्या पिढीनं अभ्यासावं असंही सांगतात. मोदींच्या या भूमिकांवर आपण काय बोलू शकतो? खरे मोदी कोण हे आता त्यांनाच विचारायला हवं,’ असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी आज हाणला.

वाचा:

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज संपला. त्यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. आझाद यांना निरोप देताना मोदींनी त्यांचे तोंडभरून कौतुक केलं. आझाद हे स्वत:च्या प्रतिमेपेक्षा सभागृह आणि देशाला प्राधान्य देणारे नेते आहेत. आझाद यांच्याशी माझे नेहमीच मैत्रीचे संबंध राहिले आहेत. मित्र म्हणून त्यांचा खूप आदर करतो, हे सांगताना मोदी भावूक झाले होते. आझाद यांच्याबद्दल बोलताना त्यांनी यांचंही कौतुक केलं.

वाचा:

मोदींच्या या भाषणाबद्दल आणि पवारांच्या केलेल्या कौतुकाबद्दल विचारलं असता भुजबळ यांनी खास शैलीत टिप्पणी केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारसाहेबांवर टीका सुद्धा करतात. त्यांनी यू टर्न घेतल्याचंही बोलतात आणि त्यांच्याशी युती करायला सुद्धा तयार असतात. यावर मी काय बोलणार? आज कुणीतरी मला व्हॉटस्ॲपवर पाठवलंय की, मोदी राज्यसभेत बोलताना गहिवरले. त्यामुळं हे खरे की ते खरे असा प्रश्न मला पडलाय. खरे मोदी कोण हे आता त्यांनाच विचारायला हवं, असा चिमटा भुजबळांनी काढला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts