Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5828

FBवर महिलांना हेरायचा, मॉडेल असल्याचे सांगून मैत्रीचे जाळे टाकायचा; मग…

0

ठाणे: फेसबुकवर दुसऱ्याच नावाने बनावट अकाऊंट तयार करून महिलांशी मैत्री करत ‘मॉडेल’ असल्याचे सांगणारा तसेच इतर खोटी कारणे देऊन महिलांची फसवणूक करणारा उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील याला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षाने नवी मुंबईतून अटक केले आहे. त्याने मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, पुणे, अमरावती, सातारा, रत्नागिरी येथील अनेक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ( Update )

वाचा:

कल्याणमधील एका गृहिणीची ३ लाख १९ हजाराची फसवणूक झाली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक करणाऱ्याने शुभम पाटील या नावाने बनावट अकाऊंटचा वापर केला होता. या महिलेला खोटी कारणे सांगितली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षातील पोलीस कर्मचारी यांनी शुभम पाटील या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवरील मोबाइल नंबरद्वारे चौकशी केली असता, हा नंबर नवी मुंबईतील सतीश मोरे याचा असल्याची बाब समोर आली. त्यानुसार तात्काळ पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईतील स्टेशन परिसरात फिरत असताना सतीशच्या मुसक्या आवळल्या.

सतीशच्या चौकशीत त्याने कल्याणमधील गृहिणीची फसवणूक केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुभम पाटील तसेच सोनू पाटील अशा नावांनी बनावट फेसबुक अकाऊंट तयार करत तो महिलांशी मैत्री करत असे. त्यानंतर महिलांचे मोबाइल नंबर प्राप्त करत तो महिलांशी संवाद साधायचा. शिवाय महिलांना विविध खोटी कारणे देत तसेच मॉडेल असल्याचे सांगून आमिष दाखवत त्याने राज्यातील अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या आरोपीला अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या पथकाने केली.

घणसोली येथील दत्तनगरमध्ये राहणारा सतीश सध्या बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाने त्याला ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, आरोपीने किती महिलांची फसवणूक केली याबाबत चौकशी सुरु असल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

… याला म्हणतात टाइमपास!; मनसेने आदित्य ठाकरेंना 'असे' दिले प्रत्युत्तर

0

मुंबई: ‘ हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘ टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल’, अशा शब्दात राज्याचे पर्यावरण मंत्री आणि नेते (Aditya Thackeray) यांनी केलेल्या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) प्रत्युत्तर दिले आहे. ‘करोनाकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचे सोडून मुख्यमंत्री उठता-बसता फेसबुक लाइव्ह करत होते… याला म्हणतात टाइमपासअशा शब्दात मनसेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांना लक्ष्य करत हे प्रत्युत्तर दिले आहे. ( has responded to the criticism made by )

मनसेचे सरचिटणीस यांनी एकावर एक ट्विट करत शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिंदे पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ, असे आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात टाइमपास.’

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करू, यात शिवसेनेने ३० वर्षे घालवली… याला म्हणतात टाइमपास, असे म्हणत शिंदे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना टोल्यावर टोले लगावले आहेत.

मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘टाइमपास टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल अशा शब्दांत मनसेवर टीकास्त्र सोडताना आदित्य ठाकरे यांनी मनसेकडे स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही,’ असे सांगत मनसेला फार गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सूचित केले होते. त्यावर मनसेचे कीर्तिकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मनसे नंतर भाजपनेही साधला निशाणा
एकीकडून मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केलेला असताना, दुसरीकडून भारतीय जनता पक्षाने देखील मनसेवर टीकेचे अस्त्र उगारले आहे. राम मंदिराच्या वर्गणीला विरोध करायचा आणि सार्वजनिक पदपथावरच्या लोकांकडून हफ्ता वसूल करायचा, अशा शब्दात भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी हा हल्ला चढवला आहे. हफ्ता वसुलीसाठी जर मुख्यमंत्र्यांचा फोटो कुणी वापरला असेल, तर त्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच. मात्र असा फोटो वापरणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

जळगाव: मॉर्निंग वॉकसाठी दोन महिला घराबाहेर पडल्या आणि …

0

म. टा. प्रतिनिधी,

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (दि. ४) सकाळी साडेपाच वाजता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या सामनेर गावात घडली. ही धडक इतकी जबर होती की, यात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. मनीषा साहेबराव पाटील (वय ५० वर्षे) आणि अनिता सहादू पाटील (वय ४८ वर्षे, दोघी रा. सामनेर), अशी या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सामनेर हे गाव जळगाव-पाचोरा रस्त्यावर आहे. या गावातील अनेक स्त्री-पुरुष दररोज मॉर्निंग वॉकला जात असतात. मनीषा पाटील व अनिता पाटील या दोन्ही महिला देखील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या होत्या. त्या रस्त्यावर फिरत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला दूरपर्यंत फेकली गेली. तर दुसरी महिला साधारण ५० मीटर अंतरापर्यंत वाहनासोबत फरपटत गेली. या अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले.

क्लिक करा आणि वाचा-
ही घटना घडल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी पाचोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस हवालदार रामदास चौधरी यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

निर्बंधांबाबत CM ठाकरे स्पष्टच बोलले; करोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी…

0

मुंबई: वरील लसीकरण वेगाने सुरु आहे परंतु, ब्रिटन, ब्राझिलमध्ये ज्या पद्धतीने फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनावरील सादरीकरणावेळी सांगितले. ( Latest Update )

वाचा:

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड इम्युनिटीमुळे) आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावे. सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन पसरले असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल.’

वाचा:

करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरु केले असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे, असे नमूद करतानाच केंद्राने जरी चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथील केले असले आणि महाराष्ट्रात देखील आपण आता बऱ्यापैकी व्यवहार सुरु केले असले तरी राज्यात सरसकट सगळे निर्बंध उठविले जाणार नाहीत व काळजीपूर्वकच आपण पुढे जाणार आहोत, असे स्पष्ट संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिले. अजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहचत आहेत. याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे, पण आणखी एकदा विनंती करून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळाच्या शहरातच विलगीकरणात ठेवावे असे सांगणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.

वाचा:

दुसऱ्या स्ट्रेनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी माहिती देताना सांगितले की, ब्रिटनमध्ये २० जानेवारी या एकाच दिवशी करोनाने १८२० मृत्यू झाले आहेत. ब्राझिलमध्ये दररोज करोनामुळे १ हजार मृत्यू होत असून दरदिवशी ५० हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. जून -जुलैनंतर या देशांत समूह प्रतिकारशक्ती येऊन रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती. पण चार पाच महिन्यानंतर करोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग आढळला जो ७० टक्के जास्त संसर्ग पसरविण्याची क्षमता असलेला होता. नुकत्याच केलेल्या पाहणीत हा स्ट्रेन केवळ संसर्ग वेगाने पसरविण्यातच नव्हे तर ४० टक्के जास्त मृत्यू यामुळे होऊ शकतात, इतका धोकादायक आहे असे आढळल्याचेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

साडेतीन लाख जणांना दिली लस

आतापर्यंत महाराष्ट्राला १८ लाख २ हजार कोव्हिशिल्ड, तर १ लाख ७० हजार ४०० कोव्हॅक्सिन अशा १९ लाख ७२ हजार ४०० लसी प्राप्त झाल्या आहेत. आजपर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ जणांना लस देण्यात आली आहे. त्यात ३ लाख ५१ हजार ४८ कोव्हिशिल्ड तर ३ हजार ५४५ कोव्हॅक्सिन लसी आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. बुधवारपासून फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यास सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

महाराष्ट्रातील मृत्यूदर कमी झाला

राज्याचा मृत्यू दर नोव्हेंबरमध्ये २.२६, डिसेंबर मध्ये १.९६ आणि जानेवारीत १.६३ टक्के इतका झाल्याची तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ४.५१ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोविडचा आलेख घसरत असला तरी अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा , नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग जास्त आहे तसेच चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर २० लाख प्रवासी

लोकल सर्वांसाठी सुरु केल्यावर २० लाख प्रवासी मध्य रेल्वेवर तर १४ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर नोंदवले गेले, अशी माहिती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी दिली. विवाह समारंभ, अंत्यसंस्कार यांना केंद्र सरकारने १०० जणांच्या उपस्थितीस परवानगी दिली असली तरी आपल्याकडे अजूनही ५० जणांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारासाठी अजूनही २० जणांनाच परवानगी आहे. त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ७५ टक्के उपस्थितीच्या अटींशिवाय सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कोल्हापूर: पावनगडावर ४०६ तोफगोळे आढळले; शिवकालीन असल्याचा दावा

0

म. टा. प्रतिनिधी,

पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावर गुरुवारी आढळले. हे गोळे शिवकालीन असल्याचा दावा दुर्गप्रेमी इतिहास संशोधकांनी केला आहे. (406 were found at pavangad in kolhapur)

हा किल्ला शिवरायांनी मार्कडेय डोंगरावर बांधला. या किल्ल्याच्या राजवाड्याशेजारी असलेल्या महादेव मंदिराजवळ टीम पावनगड आणि वनविभागाच्या वतीने दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी फलक लावण्यासाठी एक फूट उकरल्यावर काही गोळे दिसले. याची कल्पना टीम पावनगडच्या कार्यकर्त्यांनी सुखदेव गिरी आणि राम यादव याना दिली. त्यांनी पुरातत्व आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. तोपर्यंत त्या खड्यात जवळजवळ ४०६ तोफगोळे सापडले.

हा किल्ला वनखात्याच्या अखत्यारीत आहे. लवकरच हा किल्ला राज्य पुरातत्व खात्यात सामील व्हावा आणि सदर जागी लवकरात लवकर उत्खनन व्हावे अशी अपेक्षा राम यादव यांनी व्यक्त केली.

टीम पावनगडमध्ये अविनाश लंबे, निरंजन सुर्यवंशी, मारुती पाटील,सार्थक भोसले यांचा समावेश होता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ठाण्यातील 'या' तीन रस्त्यावर सकाळी ५ ते ७ या वेळात वाहनांना प्रवेश बंदी

0

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाणेकरांचे आरोग्य सदृढ राहवे यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘मॉर्निंग वॉकर्स’साठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या अभिनव योजनेमुळे ठाणेकरांना मॉर्निग वॉक करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळात होणार्‍या सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. उद्यापासून या उप्रकमाला सुरुवात होत आहे.

रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्ग ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे अभियान हाती घेतले आहे. परंतु, त्यातून केवळ वाहनचालकांसाठीच नव्हे, तर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीसुद्धा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही योजना मूर्त स्वरूप घेत आहे. केवळ मॉर्निग वॉकसाठी काही रस्ते आरक्षित असावे यासाठी सहपोलिस आयुक्त सुरेश मेखला आग्रही होते. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सर्व्हिस रोड, उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्रमांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी करण्यात आली आहे.

सकाळी पाच ते सात या वेळात या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. या रस्त्यांवर केवळ मॉर्निग वॉकर्स, जॉगर्स, योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणा-यांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. याबाबत वाहतूक विभागाकडून अधिसूचना जारी केली असून ही अधिसूचना ३० दिवसासाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली आहे. याबाबत काही सूचना, आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसूचना कायमस्वरूपी अंमलात आणण्यात येणार आहे.

मॉर्निग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरण्याचे प्रकार होतात. त्यांना रोखण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. मात्र, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून वॉक करणे महिलांना थोडे असुरक्षित वाटते. परंतु, आता या तीन रस्त्यांवर सकाळी कोणत्याही वाहनांना प्रवेश मिळणार नसल्याने महिलांसह प्रत्येक पादचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच, वॉक करताना या रस्त्यांवर अपघात होण्याचा धोकाही नसेल. या उपक्रमामुळे मॉर्निग वॉक करणा-यांच्या संख्येत निश्चित भर पडेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, ठाणेकरांना पहाटे उठून व्यायाम करण्याची सवय लागावी, यासाठी वाहतुकीचे निर्बंध ५ ते ७ पर्यंतच ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नायलॉन मांजासाठी टास्क फोर्स; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

राज्यात नायलॉन मांजावर (Nylon Manja) बंदी घालण्यात आली आहे. तरीही मांजाचा सर्रास वापर होत असून त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजावरील कारवाईसाठी (Task Force For Nylon Manja) तयार करीत असल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर केली. (we will set up task force for information given by state government)

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र लिहून नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. राज्य स्तरावर मंत्रालयानेही पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना आदेश देऊन आपापल्या क्षेत्रात टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश दिले होते व त्यानुसार कारवाई करण्यात आली. राज्यात नायलॉन मांजाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली.

आजही नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे आकाशातील शेकडो पक्षी जखमी होऊन मृत्यूमुखी पडतात. तसेच अनेक दुचाकीस्वारांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. या वर्षात शहरात आतापर्यंत तिघांचा नायलॉन मांजामुळे मृत्यू झाला. त्या अपघातांची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली.

क्लिक करा आणि वाचा-

या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून नायलॉन मांजाचा वापर विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स नेमल्याचे सांगितले. यावेळी न्यायालयीन मित्र अ‍ॅड. देवेन चौहान, महापालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट आणि राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज्याला मोठा दिलासा; अॅक्टिव्ह रुग्णांचा 'हा' आकडा दिलासादायक

0

मुंबईः आज राज्यात ५ हजार ३३९ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९५. ७१ टक्के झाला आहे. तर, राज्यात सध्या ३४ हजार ८६२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ()

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील करोनाची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण आणि रिकव्हरी रेटही वाढला आहे.

आज राज्यात ५ हजार ३३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आत्तापर्यंत १९ लाख ४८ हजार ६७४ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ९५ . ७१ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ७८ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, १,९११ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या २४ तासांत २ हजार ७३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे त्यामुळं राज्यातील एकूण करोना बाधितांचा आकडा २० लाख ३६ हजार ००२ इतका झाला आहे. तर, आज दिवसभरात ४६ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून करोना बळींचा एकूण आकडा ५१ हजार २१५ इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात १ कोटी ४८ लाख २१ हजार ५६१ चाचण्यांपैकी २० लाख ३६ हजार ००२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली

करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असतानाच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यांही कमी होताना दिसत आहे. आजच्या तारखेपर्यंत ३४ हजार ८६२ सक्रीय रुग्ण राज्यात असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईत ५ हजार ६४७, पुण्यात ६ हजार ५४५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्यात १.२६ टक्केच रुग्ण उपचाराधीन
जिल्ह्यातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.३१ टक्क्यावर गेला असून गुरुवारी १६५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत आढळलेल्या एकूण २ लाख ५४ हजार ८९६ रुग्णांपैकी २ लाख ४५ हजार ५०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १.२६ टक्के म्हणजेच ३ हजार २२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. गुरुवारी एकूण रुग्णसंख्येमध्ये २५४ नवीन रुग्णांची भर पडली. तर दिवसभरात ३ रुग्ण दगावल्याने करोनाबळीचा आकडा वाढत ६ हजार १६८ इतका झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर २.४१ टक्के इतका आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Nana Patole: विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंची 'ही' पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई: काँग्रेस आमदार (Nana Patole) यांनी आज संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. आता विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडून जाणार… नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल, अशा चर्चा ऐकायला येऊ लागल्या आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( gives his first reaction after resignation)

राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपल्या राजीनाम्यावर माहिती देताना नाना पटोले म्हणाले की, पक्षाने मला आदेश दिल्यानंतर मी त्याचे पालन केले आहे. पक्षाने मला राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर मी राजीनामा दिला. मी मंत्रिपदाची किंवा इतर कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही.

नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येण्याबाबतही पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून मला पक्षाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. पक्ष जो आदेश देईल त्याचे मी पालन करेन असेही पटोले पुढे म्हणाले. आपण राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहणार का?, असा प्रश्नही पटोलेंना विचारण्यात आला. त्यावर याबाबकचा निर्णय तीन पक्षांचे नेते मिळून घेतील. या संदर्भात तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात हा निर्णय घेतला जाईल, असे सांगतानाच विधानसभेचा अध्यक्ष निवडण्याची निवडणूक प्रक्रिया अधिवेशन काळात होते असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

‘माझ्या खुर्चीला मी जनतेची खुर्ची बनवली’
विधानसभा अध्यक्षपदावर काम करत असताना मी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली आणि याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रियाही पटोले यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे; भाजप नेत्याचं 'ते' ट्विट चर्चेत

0

मुंबईः राज्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून उपमुख्यमंत्री आहेत. यावरुनच भाजपचे नेते यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा खाते वाटप करण्यात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्री तर शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजपने निलेश राणे यांनी एक ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे.

वाचाः

‘अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे अजित पवार यांची परत नॉट रिचेबल होण्याची वेळ आली, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. तसंच, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

नाना पटोले यांनी अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभाध्यक्षपद कुणाला मिळणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. हे पद काँग्रेसकडेच राहणार की शिवसेनेकडे जाणार, अशीही चर्चा होऊ लागली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts