Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5829

अरबी समुद्रात अडकले १५ मच्छीमार; नौका बुडण्याची शक्यता

5

मुंबई: ४० मैलावर एका नौकेत १५ मश्चिमार अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाची नौका पोहोचली आहे. समुद्र खवळलेला असल्यानं त्यांची नौका कोणत्याही क्षणी बुडण्याची शक्यता आहे.

नौका बुडण्याची भीती असूनही मच्छीमार नौका सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यांची हरतऱ्हेने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंगळवारी गोराई जवळ बुडालेल्या नौकेचे भाग तटरक्षक दलाच्या विमानाला आढळले आहेत. बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी वरळीहून नौका पोहोचली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबईत करोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार; एक इंजेक्शन १ लाख रुपयांना

5

मुंबई: महाराष्ट्रात मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून करोनाबाधित रुग्णांची लूट सुरू आहे. दुसरीकडे करोनावरील उपचारासाठी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एक इंजेक्शन १ लाख रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीहून आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून १५ इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

करोनावरील उपचारासाठी अद्याप लस तयार झालेली नाही. मात्र, केंद्र सरकारने डॉक्टरांच्या सल्ल्याने आपत्कालीन परिस्थितीत काही औषधे आणि इंजेक्शनचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. () हे इंजेक्शन रुग्णांना दिले जाते. मात्र, या इंजेक्शनचा मुंबईत काळाबाजार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितले, की इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी आझम नसीर खान या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १५ इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई, संजीव गावडे आणि सुधीर जाधव यांच्या पथकाला याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. दिल्लीहून एक व्यक्ती मुंबईत इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. क्राइम ब्रँचने खबऱ्यांमार्फत आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर बनावट ग्राहक बनून त्याच्याशी संपर्क साधला. आम्हाला दोन इंजेक्शन तात्काळ हवे आहेत. कुटुंबातील दोन जणांना ते द्यायचे आहेत, असे त्याला सांगण्यात आले. त्यावर एका इंजेक्शनची किंमत एक लाख रुपये असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानुसार व्यवहार ठरला. आरोपी इंजेक्शन घेऊन आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १५ इंजेक्शन सापडले. ४० हजार रुपयांचे इंजेक्शन एक लाख रुपयांना विकत होता.

आझमची चौकशी केली असता, तो मूळचा उत्तराखंडमधील काशीपूरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. दिल्लीहून त्याला कुणीतरी इंजेक्शन विकण्यासाठी मुंबईत पाठवले होते. हे इंजेक्शन स्वित्झर्लंडहून भारतात एका बड्या कंपनीद्वारे मागवण्यात येते. त्यानंतर ते वितरीत केले जाते, अशी माहिती आझमने दिली. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत केवळ तीन ते चार वितरकांनाच हे इंजेक्शन विकण्याचा परवाना मिळाला आहे. त्यासाठीही कठोर अटी आहेत. मात्र, मुंबईत सर्रासपणे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सॅमसंगच्या जबरदस्त टीव्हीवर EMI चा पर्याय आणि १० हजारांचा स्पेशल डिस्काउंट

5

नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या जबरदस्त टीव्हीवर १० हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंटची घोषणा केली आहे. हा सॅमसंगचा लाइफस्टाइल टीव्ही The Serif आहे. सॅमसंग टीव्हीवरी हा ६ आणि ७ ऑगस्टच्या अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान मिळणार आहे. या ऑफरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या टीव्हीला २९१६ रुपयांच्या सुरुवातीच्या नो कॉस्ट ईएमआयच्या पर्यायावर सुद्धा खरेदी केले जावू शकते. तसेच सॅमसंगच्या सेल दरम्यान १९ टक्के डिस्काउंट, आकर्षक ईएमआय आणि कॅशबॅक ऑफर्स सोबत प्रसिद्ध फ्रंट लोड हायजीन स्टीम वॉशिंग मशीनला ७ किलोग्रॅम व्हेरियंटमध्ये आणत आहे.

वाचाः

टीव्हीच्या सर्व मॉडल्सवर मिळणार डिस्काउंट
अॅमेझॉन प्राइम सेल दरम्यान ग्राहकांना The Serif टेलिव्हिजच्या सर्व मॉडल्सवर १० हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे. ४३ इंचाचा The Serif टीव्ही ६९ हजार ९९० रुपयात खरेदी केला जावू शकतो. ४९ इंचाचा टीव्ही ८९ हजार ९९० रुपयांत खरेदी केला जावू शकतो. तर ५५ इंचाचा लाइफस्टाइल टीव्ही १ लाख ९ हजार ९९० रुपयात खरेदी केलेा जावू शकतो. ग्राहकांना २४ महिन्यांची नो कॉस्ट ईएमआय पर्याय सुद्धा निवडू शकता येते. ईएमआय २९१६ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

HDFC बँकेच्या कार्डवर १० टक्के तात्काळ कॅशबॅक
सॅमसंगच्या ७ किलो ग्रॅम कॅपिसिटीच्या फ्रंट लोड हायजीन स्टीम क्लीन वॉशिंग मशीनवर १९ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर याची किंमत २९ हजार ४९० रुपये होते. ग्राहकांना १२ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय सुद्धा निवडता येवू शकतो. याचा ईएमआय अनुक्रमे ११६६ रुपये आणि २४५८ रुपयांपासून सुरू होते. तसेच यात कोणतीही प्रोडक्ट खरेदी करताना एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के तात्काळ कॅशबॅक मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

बाबरी मशीद कायम राहील; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ट्विट

0

नवी दिल्ली: आज बुधवारी, ५ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन (Ram Mandir Bhoomi Pujan)करत आहेत. यानंतर मंदिर निर्मितीचे काम सुरू होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या काही तास आधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ट्विट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकाल अन्यायकारक असल्याचा उल्लेख करत बोर्डाने बाबरी मशीद होती आणि ती कायमस्वरूपी मशीदच राहील, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या वेळी बोर्डाने मशिदीचेही उदाहरण दिले आहे.

आपल्या ट्विटमध्ये म्हणते, ‘बाबरी मशीद होती आणि नेहमीच मशीदच राहील. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. अन्यायपूर्ण, दमनकारी, लज्जास्पद आणि बहुसंख्यंकांचे तुष्टीकरण करणाऱ्या निर्णयाद्वारे जमिनीवर झालेले पुनर्निर्माण हे बदलू शकणार नाही. दु:खी होण्याची आवश्यकता नाही. कोणतीही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही.’

वाचा- हागिया सोफियाचे पुन्हा मशिदीत झाले रुपांतर
१५०० वर्षे जुना असलेला वारसा असलेल्या आणि यूनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत समावेश असलेल्या हागिया सोफिया संग्रहालयाबाबत मोठा बदल करण्यात आला. गेल्याच महिन्यात जुलैमध्ये तुर्कस्थानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यब एर्दोगन यांनी हे ऐतिहासिक संग्रहालय पुन्हा मशिदीत रुपांतरीत केले आहे. सन १४३४ मध्ये हागिया सोफिया या मशिदीचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अनिल राठोड इतके लोकप्रिय का होते?

5

अहमदनगर: शिवसेना उपनेते माजी मंत्री यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिक शोकमग्न झाले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये भैय्या या नावाने राठोड यांना ओळखले जात होते. संकटकाळात प्रत्येकाच्या हाकेला ते धावून जात असल्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती. राठोड यांच्यावर हिंदुत्ववादी विचारांचा मोठा पगडा होता. ते सुरुवातीला हिंदुत्वादी संघटनेचे काम करीत होते. त्यांनी १९८७-८८ च्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातीला शहरप्रमुख व त्यानंतर जिल्हाप्रमुख अशा विविध पदावर काम केले. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर ते सलग २५ वर्षे नगर शहराचे आमदार होते. ज्यावेळी १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युती होती, त्यावेळी त्यांनी अन्न पुरवठा राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर ते शिवसेना उपनेते म्हणून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. नगर शहरामध्ये शिवसेनाच्या माध्यमातून तसेच आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली.

वाचा:

नगर शहरासह जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा होता. नगरमध्ये शिवसेनेचे काम वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २००३ मध्ये जेव्हा नगर महापालिका स्थापन झाली, त्यावेळी या महापालिकेवर पहिला महापौर शिवसेनेचा झाला. यामध्ये राठोड यांचा मोठा वाटा होता. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर त्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न मार्गी लावण्यात राठोड यांचा मोलाचा सहभाग होता. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राठोड यांची नेहमीच धडपड होती. सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला ते नेहमी धावून जात होते. त्यामुळे ते नगरकरांमध्ये ‘भैय्या’ या नावाने चांगलेच लोकप्रिय होते.

वाचा:

१९९० ते २०१४ अशी सलग पंचवीस वर्ष आमदार असणाऱ्या राठोड यांचा २०१४ मध्ये पहिल्यांदा पराभव झाला. मात्र, त्यालाही न डगमगता त्यांनी त्यांनी पक्षाचे काम पुढे सातत्याने सुरू ठेवले होते. विशेष म्हणजे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊन काळात गरीब व गरजू नागरिकांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून राठोड यांनी अन्नछत्र सुरू केले होते. नगरमध्ये विविध भागात त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मदत पुरवली होती. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पुण्यात तूर्त पाणीकपात नाही; १२ ऑगस्टनंतर निर्णय

5

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या वर्षी पाऊस लांबल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही या वर्षी ऑगस्ट महिन्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची आग्रही मागणी जलंसपदा विभागाने केली असली तरी गणपती होईपर्यंत पाणीकपात करू नये, अशी भूमिका पुणे महापालिकेने घेतली आहे. मात्र, पाणीकपातीबाबत १२ ऑगस्टच्या दरम्यान पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या बैठकीत आठवडाभरात पडणाऱ्या पावसावर शहरात पाणीकपात करायची की नाही, याचा निर्णय होणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाणीकपातीबाबत त्यांच्या दालनात मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त शान्तनू गोयल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजिव चोपडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी बैठकीस उपस्थित होते.

चोपडे यांनी सोमवारी ३ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त कुमार यांना पत्र पाठवून मुठा खोऱ्यांतील धरणांमध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी असा ९.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा असल्याचा दावा केला आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २७ जुलै रोजी घेतलेल्या बैठकीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी अत्यंत काटकसरीने वापरण्याची सूचना केल्याची माहिती चोपडे यांनी दिली आहे. त्यानुसार पाणीकपातीचा आग्रह चोपडे यांनी महापौरांच्या बैठकीतही धरला होता.

महापौर मोहोळ यांनी स्वत: हवाखान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी संपर्क साधून पावसाच्या शक्यतेची माहिती घेतली. त्यानुसार येत्या आठवड्यात कमी दाबाने; तर पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस पडणार असल्याने पाणीकपातीची आवश्यकता भासणार नाही. तसेच, गणपती असल्याने शहरात पाणीकपात करणे योग्य नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घ्यावाच लागला तर तो गणपतीनंतर घ्यावा, अशी सूचना मोहोळ यांनी केली आहे.

१२ ऑगस्टच्या दरम्यान बैठक

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती; तसेच धरणातील पाणीसाठा याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. सध्या धरणक्षेत्रात पाऊस पडत असून, पाणीसाठ्याची परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे. याबाबत आठवडाभरानंतर म्हणजे १२ ऑगस्टच्या दरम्यान बैठक आयोजित करून पाणीकपातीबाबत चर्चा करण्यात येईल. तोपर्यंत शहरात कुठलीही पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार जर धरण क्षेत्रात चार ते सहा दिवस चांगला जोराचा पाऊस झाला तर धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा असल्याचे कुमार म्हणाले.

‘गणपतीनंतरच पाणीकपातीचा निर्णय’

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चारही धरणांत जवळपास ९० टक्के पाणीसाठा होता. सध्याच्या परिस्थितीत धरणांमध्ये ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हवामान विभागातील डॉ. अनुपम कश्यपी या ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस; तर १५ ऑगस्टनंतर महिन्याच्या शेवटपर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. धरणक्षेत्रात जवळपास १०४ टक्के पाऊस होऊ शकतो, असा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे गणेशोत्सव होईपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले. पुढील काळात परिस्थितीचा अंदाज घेऊन पावसाने ओढ दिली तर गणपतीपूर्वी बैठक घेऊन त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, परंतु, सध्या तरी गणेशोत्सव संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची होणार नाही, असे मोहोळ म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ट्रम्प म्हणतात, लेबनानच्या बैरूतमधील स्फोट तर 'हल्ला'!

5

वॉशिंग्टन: मंगळवारी लेबनानची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाने सगळं जगंच हादरलं आहे. बैरूत बंदरात झालेला स्फोट हा बंदरातील वेअरहाउसमध्ये ठेवण्यात आलेला अमोनियम नायट्रेटमुळे झाला असल्याचे लेबनान सरकारने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळंच मत व्यक्त केले असून तो ‘हल्ला’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बैरूतमधील स्फोटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, बैरूतमधील स्फोट हे ‘हल्ल्या’सारखे आहेत. अमेरिकन लष्कराच्या जनरल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट एखाद्या बॉम्बनेच घडवून आणले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. लेबनानमधील घटना ही जगासाठी दुखद असून मोठे नुकसान झाले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. लेबनानने या घटनेची चौकशी बॉम्ब हल्ल्याच्या अनुषंगाने करायला हवी असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पेंटागॉनने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानावर असहमती दर्शवली. ट्रम्प यांच्या विधानावर व्हाइट हाउस कार्यालयच योग्य ते स्पष्टीकरण देणार असल्याचे वृत्त वृतसंस्था ‘एएफपी’ने दिले आहे.

वाचा:

दरम्यान, लेबननची राजधानी असललेल्या बैरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या घटनेत जवळपास ७३ ठार तर ३७०० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे स्फोट इतके भीषण होते की आजूबाजूच्या इमारती हादरल्या. यामुळे इमारतींमधील नागरिक भूकंप झाल्याच्या भीतीने बाहेर पडले. हे स्फोट बैरूतच्या बंदरात झाले. वर्षभरापूर्वी अतिसंवेदनशील स्फोटकं आणि साहित्य जप्त करण्यात आली होती. ही स्फोटकं एका ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्यांचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता लेबनानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.

वाचा:
बैरूतचा स्फोट इतका भीषण होता की अनेकांना अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणूबॉम्बची आठवण झाली. स्फोटांच्या घटनेनंतर लेबनानचे राष्ट्राध्यक्ष मायकल आउन यांनी तातडीची सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली. तर, पंतप्रधान हसन दियाब यांनी बुधवारी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्याची घोषणा केली आहे. या स्फोटात ७३ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ३७०० जण जखमी झाले आहेत. बैरूतचा स्फोट इतका भीषण होता की अनेकांना अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणूबॉम्बची आठवण झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

टीम इंडियाशी बरोबरी; ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला जमले नाही ते आयर्लंडने करून दाखवले

5

नवी दिल्ली: आयर्लंडच्या क्रिकेट संघाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध सनसनाटी विजय मिळवला. वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ३२९ धावांचे लक्ष्य दिले होते. आयर्लंडने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासात हा विजय नेहमी लक्षात ठेवला जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला असला तरी आयर्लंडने या एका विजयात अशी काही कामगिरी केली आहे जी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघांना करता आली नाही.

वाचा-
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या वनडेत पॉल स्टर्लिंग आणि बालबर्नी यांनी शानदार शतकी खेळी केली आणि संघाला ७ विकेटनी विजय मिळवून दिला. इंग्लंडने इयान मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर ३२८ धावा उभ्या केल्या पण विजयाचे लक्ष्य आयर्लंडने पार केले. इंग्लंडचा खेळ पाहता ते मालिका ३-० अशी खिशात घालतील असे वाटले होते. पण आयर्लंडने बाजी पलटवली. त्यांनी ४९.५ षटकात ३ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. स्टर्लिंगने १४२ तर बालबर्नीने ११३ धावा केल्या. विशेष म्हणजे आयर्लंडचा हा इंग्लंडच्या भूमीवरील पहिला विजय आहे.

वाचा-
इंग्लंडविरुद्ध जागतिक क्रिकेटमध्ये ३२० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य असताना विजय मिळवण्याबाबत आयर्लंडने भारतीय संघाशी बरोबरी केली आहे. भारताने अशी कामगिरी आतापर्यंत दोन वेळा केली. आयर्लंडने मंगळवारी मिळवलेल्या विजयासह या यादीत भारतासोबत स्थान मिळवले. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांना मागे टाकले. या तिनही संघांनी आतापर्यंत एक वेळा इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला आहे.

आयर्लंडचा संघ इंग्लंडमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवणारा संघ ठरला आहे. याआधी भारतीय संघाने २००२ साली नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ३२६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

वाचा-
वनडे क्रिकेटचा विचार केल्यास या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००६ साली ४३८ धावांचे टार्गेट पार केले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर देखील आफ्रिकेचा संघ आहे. त्यांनी २०१६ विरुद्ध पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच ३७२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून त्यांनी २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३६४ धावा केल्या होत्या. या यादीत भारत चौथ्या स्थानावर असून, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६२ धावा करत विजय मिळवला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे; रोहित पवारांचं जबरदस्त ट्वीट

5

अहमदनगर: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यामुळं अवघा देश आज राममय झाला आहे. सोशल मीडियावरून देशातील रामभक्त आपल्या भावना व्यक्त करत आहे. एकमेकांचं अभिनंदन करत आहेत. आजच्या या मंगलमय दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी रामनामाचा महिमा सांगणारं जबरदस्त ट्वीट केलं आहे. रोहित पवारांचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे.

सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खूण असते. साने गुरूजी म्हणायचे, ‘रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं’. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत.’

ते पुढं म्हणतात, ‘राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे’.

‘रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात, निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये,’ अशी अपेक्षा रोहित पवार यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

राज्यात आनंदोत्सव

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा प्रचंड उत्साह देशभरात दिसत आहे. महाराष्ट्रातही अनेक घरात भगवा ध्वज उभारून, रांगोळी काढून आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या केल्या जात आहेत. रामनामाचा जयघोष सुरू आहे. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

आंघोळ करताना महिलेचा व्हिडिओ काढला; नोकराने केली सेक्सची मागणी

5

नागपूर: महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन नोकराने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोकराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरमधील भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. चेतन खडतकर (रा. नंदनवन) असे नोकराचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजनी भागात पीडित ४० वर्षीय महिला राहते. तिचे पती सीए असून चेतन हा त्यांच्याकडे काम करतो. घरातच कार्यालय असल्याने चेतन याचा घरात सतत वावर असायचा. याच दरम्यान तो पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. नोकर असल्याने महिला त्याकडे दुर्लक्ष करायची. ६ जुलैला महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. याचदरम्यान चेतन याने महिलेचा मोबाइलद्वारे व्हिडिओ काढला. त्यानंतर त्याने महिलेच्या घरातीलच संगणकावर धमकीचे पत्रही तयार केले. हे पत्र पीडित महिलेला पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे महिला प्रचंड घाबरली. सुरुवातीला तिने चेतन याच्या काही मागण्या मान्य केल्या. तो महिलेशी अश्लिल चाळे करायला लागला. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला. त्यावर आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अखेर तिने याबाबत पतीला सांगितले. पतीने महिलेसह अजनी पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चेतन याचा शोध घेण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts