Wednesday, May 31, 2023
Home Blog Page 5830

बजेट स्मार्टफोन Realme C20 लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

0

नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी रियलमीने आपला लेटेस्ट एन्ट्री लेवल स्मार्टफोन ला लाँच केले आहे. बजेट स्मार्टफोनला कमी किंमतीत लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 5000 mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.

वाचाः

Realme C20 ची वैशिष्ट्ये
रियलमी सी स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित रियलमी यूआय वर काम करतो. रियलमी फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (720×1,600 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०.९ इतका आहे.

वाचाः

रॅम स्टोरेज आणि प्रोसेसर
स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर सोबत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

वाचाः

डिझाइन आणि कॅमेरा
रियलमीच्या या फोनमध्ये फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉच दिला आहे. खालील बाजुस बॉर्डरला पाहायला मिळू शकतो. रियलमी सी २० स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि फ्लॅश दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

बॅटरी क्षमता आणि कनेक्टिविटी
या फोनला पॉवर देण्यासाठी यात ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. याशिवाय या फोनमध्ये ३.५ मिलीमीटर हेडफोन जॅक, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, ड्यूल बँड वाय फाय, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. फोनच्या मागच्या बाजुला सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

फोनची किंमत
रियलमीच्या या फोनला दोन कलर व्हेरियंटमध्ये उतरवले आहे. सध्या या फोनला व्हिएतनाममध्ये लाँच केले आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ८०० रुपये आहे. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनला लाँच करणार की नाही, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

फडणवीसांची बाळासाहेबांना आदरांजली; शिवसेनेला चिमटे

0

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. या निमित्तानं विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी एक खास व्हिडिओ शेअर करून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे व विचारांचे कौतुक करताना फडणवीस यांनी या माध्यमातून शिवसेनेला टोले हाणले आहेत. ( Pays Tribute to )

वाचा:

चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचं वर्णन केलं आहे. बाळासाहेबांच्या काही भाषणांसह स्वत:च्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत. ‘अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मनं छोटी-छोटी होतात. ते आपल्यापलीकडं पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होतं. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशासाठी? पैशाचे लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नयेत. तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. तुमच्याकडं आदरानं लोक पाहताहेत तो आदर तसाच ठेवा…’ बाळासाहेबांच्या भाषणातील ही निवडक व सूचक वाक्य फडणवीस यांनी शेअर केली आहेत.

‘आम्ही कुठेही असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेला टोले हाणले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी! पत्री पुलाचे काम पूर्ण

0

म. टा. वृत्तसेवा,

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अखेर २६ महिन्यानंतर पूर्ण झाले असून सोमवारी, २५ जानेवारीला सकाळी १२.३० वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नियोजनानुसार शुक्रवारी ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना देताच अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. यामुळे अखेर वाहतूककोंडीतून सुटका होण्याचा मुहूर्त निश्चित झाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

वाचा:

ब्रिटिशकालीन पत्रीपुलावर १८ नोव्हेबर २०१८ला रेल्वेकडून हातोडा मारण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून ३६ कोटी रुपयांच्या निधीतून नवा ११० मीटर लांबीचा पत्रीपूल तयार करण्यात आला असून कमीत कमी वेळेत हा पूल पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांतून ठेकेदारावर दबाव येत असल्याने दिवसरात्र काम करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, सुरुवातीला रेल्वेकडून पुलाची लांबी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेली दिरंगाई, करोना लॉकडाउनमुळे ठप्प असलेली वाहतूकसुविधा यामुळे पहिल्या लॉकडाउनचा तीन महिन्यांचा कालावधी वाया गेला. मे महिन्यापासून पुन्हा एकदा शासनाच्या परवानगीने पुलाचे काम सुरू करण्यात आले.

वाचा:

नोव्हेंबर महिन्यात पुलाचा ७६ मीटर लांबीचा रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा एकसंध गर्डर बसविण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाने वेग घेतला होता. मात्र तेव्हाच अधिकाऱ्यांनी उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर ठेकेदाराने ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करत २२ जानेवारी रोजी पूल रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला असून वाहनचालकांना पत्रीपुलावरील वाहतूक कोंडी आणखी दोन दिवस सोसावी लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ऑफर्स!, iPhone 12, iPhone 11 सीरीजसह 'या' आयफोन्सवर १७ हजारांपर्यंत सूट

0

नवी दिल्लीः भारतात सध्या ऑफर्स आणि डिस्काउंट देण्यात येत आहे. हजारो रुपयांच्या सूटसोबत ग्राहक मोबाइल आणि अन्य गॅझेट्स खरेदी करीत आहेत. सध्या ई-कॉमर्स वेबसाइटसह वर , , सह अन्य आयफोन्स मॉडलवर १७ हजारांपर्यंत डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे.

वाचाः

खरेदीचा बेस्ट चान्स
जर तुम्हाला अॅपलचा लेटेस्ट आयफोन १२ सीरीजमधील मोबाइल्स खरेदी करायचा असेल तर तुम्ही मॅपलच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोर्सवर किती सूट मिळत आहे. कोणत्या फोनवर बेस्ट डील आहे. जाणून घ्या.

वाचाः

iPhone 12 Pro Max वर बंपर सूट
Maple Online आणि ऑफलाइन स्टोर्स वर अॅपलचा नुकताच लाँच झालेला फ्लॅगशीप स्मार्टफोन iPhone 12 Pro Max च्या १२८ जीबी स्टोरेज मॉडलवर १३ हजार रुपयांची सूट मिळत आहे. ज्यात ८ हजार रुपयांचा डिस्काउंट, आणि ५ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. यासाठी अट म्हणजेच HDFC Bank cards वरून फोन खरेदी करायला हवा. आयफोन १२ प्रो मॅक्सची किंमत १ लाख २७ हजार ९०० रुपये आहे. परंतु, १३ हजार रुपयांच्या सूटनंतर हा फोन १ लाख १४ हजार ९०० रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

वाचाः

iPhone 12 वर ९ हजार रुपयांचा फायदा
आयफोन १२ वर ३ हजार ५०० रुपयांचा डिस्काउंट आणि एचडीएफसी कार्ड खरेदीवरून ५००० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. यानंतर याची किंमत १ लाख १७ हजार ९०० रुपयांपेक्षा कमी होऊन १ लाख ९ हजार १०० रुपये झाली आहे. आयफोन १२ वर ३ हजार रुपये डिस्काउंट सोबत ६ हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळत आहे. यानंतर याची किंमत ७६ हजार ९०० रुपयांहून कमी होऊन ती ६७ हजार ९०० रुपये झाली आहे. आयफोन १२ मिनीवर १२ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. आयफोन १२ मिनी एक्सचेंज ऑफर सुद्धा सुरू आहे. या ऑफरमध्ये हा फोन केवळ ४८ हजार ९०० रुपयात खरेदी करता येऊ शकतो.

वाचाः

iPhone 11 सीरीज स्मार्टफोन्सवर बंपर सूट
iPhone 11 Pro Max वर १२ हजार रुपयांचा डिस्काउंट सोबत एचडीएफसी कार्डवरून खरेदी केल्यास २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. यानंतर या फोनची किंमत ९९ हजार ९०० रुपयांहून कमी होऊन ८५ हजार ९९० रुपये झाली आहे. तर आयफोन ११ प्रो वर केवळ २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. याची किंमत ७९ हजार ९९९ रुपयांहून कमी होऊन ७७ हजार ९९९ रुपये झाली आहे. आयफोन ११ वर डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळून ७५०० रुपयांची सूट मिळत आहे. याची किंमत ४८ हजार ९९९ रुपयांहून कमी होऊन ४२ हजार ४९९ रुपये झाली आहे.

वाचाः

Maple स्टोर वर सुरू असलेल्या या ऑफरमध्ये iPhone XR चे 64GB वेरियंट केव ३८ हजार ९०० रुपये, आणि iPhone SE 2020 मॉडल चे 64GB वेरियंट ३० हजार ९०० रुपयांत खरेदी करू शकता.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

अमित ठाकरेंनी वर्षभरात काय केलं? मनसेनं प्रसिद्ध केलं रिपोर्ट कार्ड

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री म्हणून नव्या गोष्टी, उपक्रम हाती घेत असताना आता अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र यांचेही गेल्या वर्षभरातील कामांचे रिपोर्टकार्ड मनसेने तयार केले आहे. अमित यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत असल्याचे निमित्त साधत व्हिडीओ ट्रेलरच्या माध्यमातून हे रिपोर्टकार्ड काढण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर पर्यावरण विभागाच्या माध्यमातून त्यांनी अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. याशिवाय मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी उपक्रम हाती घेतले. या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी मनसेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अमित यांनीही पक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले असून त्यावर प्रकाश टाकण्यासाठी पक्षानेच पुढाकार घेतला आहे.

वाचा:

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमित यांनी आरे कॉलनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यातील बंधपत्रित डॉक्टर्स नर्सेस यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी लावून धरली. करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या-आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी अमित यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले, याकडे लक्ष वेधण्यात आले.

वाचा:

राज्यातील आशा स्वयंसेविकांना मिळणारा मोबदला वाढायला हवा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांनी ही मागणी मान्य करत आशा स्वयंसेवकांच्या वेतनात दुप्पट वाढ केली. एमपीएससी-युपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी, विशेषत पुण्यात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी एसटी उपलब्ध करून देण्याची विनंती अमित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या सगळ्या कामांचा उल्लेख यात करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

हे तर शरद पवारांचे स्वत:विरुद्ध आंदोलन; भाजपची बोचरी टीका

0

म. ट. विशेष प्रतिनिधी, मुंबई
कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या यांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी शुक्रवारी केली.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री २५ जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. मात्र, हे आंदोलन करण्यापूर्वी पवार यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी अपेक्षा आहे. ज्यावेळी पवार हे कृषिमंत्री होते, तेव्हा स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका का घेतली नाही? पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना सर्व राज्य सरकारांना कृषी कायद्यातील सुधारणाविषयक पत्र पाठवली होती. तेच पवार आता या सुधारणांविरोधात आंदोलन करीत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा?

वाचा:

केंद्र सरकारकडून कायदा संमत झाल्यानंतर राज्याच्या विधीमंडळात कायद्याला मंजुरी दिल्यानंतर केवळ काँग्रेसच्या दबावाखाली येऊन कायद्याला राज्यात स्थगिती देणे म्हणजे राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते. पवार आणि ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे महत्त्वाचे आहेत की केवळ राजकारण करण्यासाठी आंदोलनात उतरणे महत्त्वाचे आहे, असा सवालही त्यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सावधान! लोन अॅप्सच्या माध्यमातून डेटा चोरून नागरिकांची बदनामी

0

पुणे: ‘लोन अॅप्स’ च्या माध्यमातून कर्ज दिल्यानंतर परतफेड करण्यास उशीर करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलमधील डेटा चोरून त्यांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. अॅपच्या माध्यमातून मोबाईलमधील चोरलेल्या डेटाचा वापर करून त्यांचे मित्र, नातेवाईक यांना फोन केले जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तीन स्वंतत्र गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत घोरपडी परिसरातील एका तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात अॅप्समधून फोन करणारे व चालविणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार तरुणी एका कंपनीत नोकरी करते. लॉकडाऊनमध्ये वडिलांच्या आजारासाठी पैशाची आवश्यकता होती. तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यामध्ये अपच्या माध्यमातून तत्काळ कर्ज मिळेल, असे म्हटले. त्यामुळे महिलेने त्या लिंकवर क्लिक केले. त्या ठिकाणी असणारी सर्व माहिती भरली. ते अप मोबाईलमध्ये इन्स्टॉल होत असताना त्याने मोबाईलचा सर्व डेटा अक्सेस मागितला. त्याला त्यांनी ओके केले. त्यानंतर त्यांना तीन हजार रुपये कर्ज मिळेल, असे दाखविले. त्याला मान्यता दिल्यानंतर सर्व शुल्क कमी होऊन तक्रारदार यांना १७०० रुपये कर्ज मिळाले. ही रक्कम त्यांना सात दिवसांमध्ये भरायची होती. त्यानंतर तक्रारदार यांनी ही कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळ्यी लोन अॅप्स घेतली. त्याच्या मार्फत त्यांनी कर्ज घेऊन पहिले घेतलेले कर्ज फेडत राहिल्या. डिसेंबर २०२० पर्यंत त्यांना सहा ते सात अॅप्सचे कर्ज परत द्यायचे राहिले होते. त्यावेळी त्या अॅप्समधून बोलत असल्याचे सांगून कर्ज भरण्यासाठी धमकावत होते. त्यांनी कर्ज भरण्यास मदत मागितली. त्यावेळी त्या व्यक्तीने शिवीगाळ करून तुमच्या मोबाईलमधील डेटा आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमधील क्रमांकाची यादीच त्यांना पाठविली. तसेच, गॅलरीमध्ये असलेला त्यांचा फोटा घेऊन त्यावर फ्रॉड असे लिहून त्यांना व त्यांच्या मित्र, नातेवाईकांना पाठविला. तसेच, मित्रांना फोन करून तक्रारदार कर्ज फेडत नसून तुमच्या ओळखीची आहे. त्यामुळे तुम्ही कर्ज भरा, असे धमकावू लागले. या सर्व प्रकारामुळे तक्रारदार यांना खूपच मनस्ताप झाला. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक महादेव कुंभार हे अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

खाते बदलल्याने बंगलामधील मंत्र्याचा राजीनामा, कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

0

कोलकाता: पश्चिम बंगालचे वनमंत्री ( ) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जानेवारी २०२१ मध्ये तृणमूल कॉंग्रेसचे सरकार सोडणारे ते तिसरे मंत्री आहेत. राजीनामा देण्याचं कारण राजीव यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितलं. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. ते ढसाढसा रडू लागले. आपल्याला कोणतीही औपचारिक सूचना खातं बदलण्यात आलं. यामुळेच कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देत आहोत, असं राजीव यांनी सांगितलं. टीएमसीचे अनेक नेते नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राजीव यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजभवन येथे राज्यपाल धनखड यांची भेट घेतल्यानंतर राजीव बाहेर आले. सिंचन खातं बदलून वन खाते दिल्याची माहिती टीव्ही वाहिनीद्वारे आपल्याला कळली. खातं बदलल्याने आपल्याला कुठलीही समस्या नाही. पण ज्या पद्धतीने हे खाते बदल केले गेले त्यामुळे आपल्या खूप त्रास झाला. गेली अनेक वर्षे ममता बॅनर्जींनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचा आभारी आहे. यापुढे आपण बंगालच्या जनतेसाठी काम करत राहू, असं राजीव यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत आणि नोकरी'

0

चंदीगडः पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलनात ( ) मृत्यू झालेल्या ७६ जणांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. या शेतकर्‍यांच्या ( ) कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई ( ) आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ( ) यांनी केली आहे.

फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकारने राज्यांचा सल्ला घेतल्याशिवाय हे कायदे बनवले आहेत. तर शेती हा राज्यांचा विषय आहे आणि त्यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. यामुळे थंडी, ऊन, पाऊस याची पर्वा न करता शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून आपल्या जमिनी वाचवण्यासाठी लढा देत आहेत, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

हे तीन लागू करून केंद्र सरकारला बाजार समित्या फोडायच्या आहेत, एमएसपी यंत्रणा बंद करायची आहे. आधीच दोन पिकांना एमएसपी मिळतो. जर ते देखील खुल्या बाजाराच्या हवाली करण्यात आले तर मक्यासह इतर पिकांची जी अवस्था आहे, तशी स्थिती होईल, असा आरोप त्यांनी केला.

‘पंतप्रधानांच्या समितीत पंजाबचा समावेश नव्हता’

पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे बनवण्यासाठी समिती स्थापन केली. पण त्यात पंजाबचा एकही सदस्य नव्हता. पहिल्या बैठकीत आम्हाला बोलवले नाही. ४० टक्के खाद्यान्य देणाऱ्या पंजाबचा समावेश समितीत का केला नाही? असे पत्र आपण पंतप्रधानांना लिहिले. त्यानंतर पंजाबला सदस्य केले गेले. दुसर्‍या बैठकीत आर्थिक मुद्दे होते ज्यात अर्थमंत्री मनप्रीत बादल हजेरी लावण्यासाठी उपस्थित होते, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील चर्चेवरही कॅप्टन अमरिंदर बोलले. केंद्र सरकार किती वेळा शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार? हे कायदे रद्द करण्यात काय अडचण आहे? घटनेत १३० ते १४० वेळा बदल केले गेले नाहीत का? सरकारला सुधारणांसाठी कायदा बनवायचा असेल तर हे तीन कायदे रद्द करावेत आणि एक समिती तयार करावी. ज्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश असावा. त्यांच्या संमतीने कायदा तयार करून तो लागू केला जावा, असं सांगत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रावर निशाणा साधला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट, पकडलेल्या शूटरचा दावा

0

नवी दिल्लीः दिल्ली – हरयाणा सिंगू सीमेवर शुक्रवारी रात्री शेतकऱ्यांनी खळबळजनक दावा केला आहे. एका आहे, असा दावा आंदोलन करणाऱ्या सिंघूच्या सीमेवरील शेतकरी नेत्यांनी ( ) केला आहे. कथित शूटरच्या चेहरा झाकून या शूटरला माध्यमांसमोर ( alleges a plot to shoot four ) आणण्यात आलं होतं. हा शूटर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. पकडलेल्या शूटरने माध्यमांसमोर दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.

शेतकऱ्यांच्या २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चात गोळीबार करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता, असा दावा पकडण्यात आलेल्या शूटरने केला आहे. २३ ते २६ जानेवारी दरम्यान शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यात येणार होत्या आणि नागरिकांना भडकवण्याचं काम महिलांकडे होतं. जाट आंदोलनावेळीही परिस्थिती चिघळवण्यासाठी काम केल्याची कबुली शूटरने दिली.

येत्या २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनात व्यासपीठावरील चार जणांना गोळ्या घालून ठार करण्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं. यासाठी चार जणांचे फोटो देण्यात आले होते. या मागे राय पोलिस स्टेशनचा एसएचओ प्रदीप सिंह हे असून ते नेहमीच आपला चेहरा झाकून आमच्या बोलत असतात, असा दावा शूटरने केला. चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कथित कट उघड करणाऱ्या त्या शूटरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts