Wednesday, May 31, 2023
Home Blog Page 5835

प्रवाशांसाठी मध्य रेल्वे सुरू करणार 'डिजीलॉकर'

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ यानुसार या डिजीलॉकरचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.

सामान ठेवण्यासाठी किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी सर्वप्रथम लॉकर निवडणे आवश्यक आहे. सामान ठेवल्यानंतर संबंधित प्रवाशांना एक बारकोड असलेली पावती देण्यात येईल. सामान पुन्हा मिळवण्यासाठी डिजीलॉकरवरील स्कॅनरवर ही पावती स्कॅन केल्यास योग्य लॉकर खुले होईल.

वाचा:

ऑनलाइन शुल्क भरण्यासह पावतीही ऑनलाइन उपलब्ध करण्यात येईल. यामुळे प्रवाशांची पावती गहाळ होण्याची चिंता दूर होणार आहे. ही सेवा सशुल्क असणार आहे. मॉडेलनुसार ही सुविधा रेल्वे स्थानकात सुरू करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

स्वस्त किंमतीत 'पॉवरफुल' बॅटरीचा पोकोचा नवा स्मार्टफोन Poco M3 लाँच

253

नवी दिल्लीः प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड पोकोने बजेट सेगमेंट स्मार्टफोनचा विस्तार करताना नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. यात जास्त पॉवरफुल प्रोसेसर, जास्त पॉवर बॅटरीचा तसेच ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन लाँच करण्यात आला आहे. Poco M3 ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. याची सुरुवातीचा व्हेरियंट 4GB RAM + 64GB स्टोरेजच्या फोनची किंमत १३६ डॉलर म्हणजेच ९ हजार ९२६ रुपये तर 6GB RAM + 128GB स्टोरेज ची किंमत ११ हजार ९७० रुपये आहे.

वाचाः

पोकोने या फोनला गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच केले होते. आता या फोनला इंडोनेशियात लाँच केले आहे. पुढील महिन्यात या फोनला भारतात लाँच करण्यात येणार आहे. जर तुम्हला पोकोचा स्मार्टफोन्स खरेदी करायचा असेल तर सध्या Flipkart Big Saving Days Sale 2021 सुरू आहे. या सेलमध्ये Poco X3, Poco M2 Pro, Poco C3 आणि Poco M2 स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.

वाचाः

Poco M3 चे खास वैशिष्ट्ये
पोकोच्या बजेट स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनचा स्क्रीन रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉ स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले आहे. पोकोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच २-२ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स दिला आहे. पोकोच्या या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पोको एम २ चा हा फोन सक्सेसर मानला जात आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात 6,000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'सीरम'च्या आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू; शेवटचा मजला जळून खाक

0

पुणे: पुण्यातील येथे असलेल्या इन्स्टिट्युटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आग नियंत्रणात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये पाच मृतदेह आढळून आले आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी अधिकृत माहिती दिली आहे. ( )

वाचा:

मांजरी येथे सीरम कंपनीमध्ये बीसीजी प्लांटच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच पुणे पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जात आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या चारही कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. याबाबत सीरमचे सीईओ यांनीही एक ट्वीट केलं होतं. ‘आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. आगीत कुणीही जखमी झालेलं नाही व कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही मजल्यांचे मात्र नुकसान झाले आहे’, असे अदर पुनावाला यांनी नमूद केले होते.

वाचा:

पुनावाला यांच्या ट्वीटनंतर काही वेळातच या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आग आटोक्यात आल्यानंतर इमारतीत तपासणी केली असता पाच मृतदेह आढळून आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

शेवटच्या मजल्यावर आढळले मृतदेह

मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत तपशीलवार माहिती दिली. सहा मजली इमारतीत ही आग लागली. ही निर्माणाधीन इमारत आहे. सुरुवातीला आतमध्ये चार जण अडकले अशी माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करून या चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आग आटोक्यात आल्यानंतर शेवटच्या मजल्यावर जवान पोहचले असता तो मजला जळून खाक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिथेच पाच मृतदेह आढळले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते सीरमचे कर्मचारी आहेत की बांधकाम कर्मचारी ते आताच सांगता येणार नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पुढे पाठवण्यात आले आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले. इमारतीचं बांधकाम चालू होतं. वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून आग लागल्याचे सांगितले जात आहे मात्र, अद्याप नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, असेही मोहोळ म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनची सेवा

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा सुरू करण्याचा निर्णय ने घेतला आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही या सुविधेचा वापर करता येणार आहे.

रेल्वे स्थानकातील मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी करण्याकरिता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकातील प्रवासी वर्दळीला अडचण ठरणार नाही, अशा ठिकाणी हे सलून उभारण्यात येणार आहेत, असे पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा:

अंधेरी रेल्वे स्थानकात दोन आणि मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि सुरत या रेल्वे स्थानकांत प्रत्येकी एक अशी सलून उभारण्यात येणार आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सलूनचा लाभ प्रवाशांना घेता येईल. शुल्क भरण्यासाठी डिजिटल पर्यायही प्रवाशांना येथे उपलब्ध होईल.

वातानुकूलित सलूनमध्ये डोक्याची मालिश, चेहऱ्याची मालिश यांसह सामान्य केशकर्तनालयातील सर्व सुविधा प्रवाशांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येतील. सलूनसाठी निवडक रेल्वे स्थानकांतील प्रत्येकी २५६ चौरस फूट इतकी जागा भाडेतत्त्वाने देण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी हा करार असणार आहे. या जागेचा देखभाल खर्च हा संबंधितालाच करणे बंधनकारक राहणार आहे.

नियमभंग केल्यास दंड

कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केल्यास किंबहूना प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास कंत्राटदारांला १० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील प्रत्येक सलूनमध्ये तक्रारवही असणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

पश्चिम रेल्वेरील सहा स्थानकांवरील एकूण सात ठिकाणी वातानुकूलित सलून उभारण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) मागवण्यात आली आहे.

-सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'सीरम'चे पुनावाला यांची मोठी घोषणा; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख

0

पुणे: पुण्यातील मांजरी येथील मधील निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच कंत्राटी मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी एक महत्त्वाचं निवेदन जारी केलं आहे. दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर ज्या मजल्यावर सर्वप्रथम आग लागली होती तिथेच एका खोलीत पुन्हा आग लागली असून ती काही वेळातच आटोक्यात आणली गेली आहे. ( Cyrus Poonawalla on )

वाचा:

सीरम इन्स्टिट्युटमध्ये सहा मजली नवीन इमारतीचे काम सुरू असून याच इमारतीत आज दुपारी आगीचा भडका उडाला. या आगीवर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुरुवातीला या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगण्यात येत होते. मात्र आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन जवानांनी केलेल्या पाहणीत शेवटच्या मजल्यावर पाच मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांची ओळख पटली असून हे सर्व जण कंत्राटी मजूर होते. साइटवर इलेक्ट्रिकल काम ते करत होते, असे स्पष्ट झाले आहे. रामाशंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघेही उत्तर प्रदेशातील), सुशीलकुमार पांडे (बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाष्टे (दोघेही पुण्यातील) अशी मृतांची नावे आहेत.

वाचा:

सीरमचे सायरस एस. पुनावाला यांनी एक निवेदन जारी करून या संपूर्ण घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. सीरमसाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या नवीन निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शोकभावना व्यक्त करत पुनावाला यांनी या पाचही कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. नियमानुसार या कुटुंबांना जी रक्कम मिळायची आहे ती मिळेलच मात्र, आम्ही प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत या पाचही मृतांच्या कुटुंबीयांना देत आहोत, असे पुनावाला यांनी जाहीर केले.

दरम्यान, सीरममधील आग दुर्घटनेचा संपूर्ण तपशील मुख्यमंत्री यांनी घेतला आहे व आवश्यकत्या सर्व सूचना दिल्या आहेत. सीरमचे सीईओ यांच्याशीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली असून उद्या शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग; PM मोदींकडून दुःख व्यक्त, म्हणाले…

0

नवी दिल्लीः पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ( serum institute ) आग लागली. या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची दखल महाराष्ट्र सरकारसह पंतप्रधान मोदींनी घेतली ( ) आहे. अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही अनपेक्षित घटना आहे. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करतो. तसंच या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, आगीच्या या घटनेमागे घातपात तर नाही ना? असा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. आग लागलेल्या इमारतीत बांधकाम सुरू होतं. त्यातूनच इलेक्ट्रिक बिघाडामुळं आग लागली, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

देशात सध्या करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूची कोविशिल्ड लसचे डोस लाभार्थ्यांना दिले जात आहेत. भारताच्या या कोविशिल्ड लसला अनेक देशांतून मागणी आहे. भारताची ही कोविशिल्ड लस प्रभावी आहे आणि तिचे साइड इफेक्टही फारसे नाहीत. यामुळे अनेक देशांनी या लसीची मागणी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शेतकऱ्यांनी सरकाराचा प्रस्ताव फेटाळला, आज पुन्हा होणार बैठक

0

नवी दिल्लीः केंद्र सरकारने दीड वर्षासाठी नवीन तिन्ही कृषी कायद्यांची ( ) अंमलबजावणी रोखण्याचा प्रस्तावर शेतकरी संघटनांना ( ) दिला होता. पण शेतकरी संघटनांनी गुरुवारी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. संयुक्त किसान मोर्चातील शेतकरी नेत्यांनी सिंघू सीमेवरील मॅरेथॉन बैठकीत सरकारच्या प्रस्तावावर हा निर्णय घेतला. आता सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आज पुन्हा बैठक होतेय. शेतकरी संघटनांनी अद्याप असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं एका शेतकरी नेत्याने सांगितलं.

संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारने ठेवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. बैठकीत तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची आणि सर्व पिकांवर किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) कायदा करण्याच्या मुख्य मागण्यांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला, असं शेतकरी नेते दर्शन पाल यांनी निवेदनात म्हटलं आहे.

सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत त्यांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. आमची एकच मागणी आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपीला कायद्याचं स्वरुप द्यावं. यावर निर्णय घेण्यात आला आहे, असं या बैठकीनंतर शेतकरी नेते जेगींदर एस. उग्रहान म्हणाले.

तर बैठक सुरू आहे. सरकारचा प्रस्ताव फेटाळल्याचा कुठलाही निर्णय झाला झालेला नाही, असं सरकारचा प्रस्ताव फेटाळण्याच्या वृत्तावर भारतीय शेतकरी संघटनेतील नेते जगजीत सिंग डलेवाल म्हणाले. शेतकरी आंदोलनात आतापर्यंत १४७ शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. शेतकरी संघटनांच्या बैठकीत त्यांना आदरांजली वाहिली गेली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

नागपूर पोलिस आयुक्तांचेच बनावट एफबी अकाऊंट? फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या अन्

0

नागपूर: नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार ( amitesh kumar ) यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे उशिरारात्री उघडकीस आल्याने शहर पोलिस दलात ( ) खळबळ उडाली. सायबर सेलने या प्रकाराची गंभीर दखल घेत बनावट अकाऊंट उघडणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी अमितेशकुमार यांच्या नावाचे बनावट एफबी अकाऊंट उघडण्यात आले. त्याद्वारे अमितेशकुमार यांच्या ओळखीच्या ३२ जणांना ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आली. काहींनी ती ‘अॅक्सेप्ट’ केली. दरम्यान आधीच ‘फेसबुक फ्रेण्ड’ असताना पुन्हा ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आल्याने त्यांच्या काही मित्रांनी अमितेशकुमार यांच्याशी थेट संपर्क साधला.आपण कोणत्याही प्रकारची ’फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविली नसल्याचे अमितेशकुमार यांनी त्यांना सांगितले. हा बनावटपणा उघडकीस येताच अमितेशकुमार यांनी लगेच सायबर सेलला याबाबत कळविले. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. उशिरारात्रीपर्यंत या बनावट फेसवुक अकाऊंटबाबत पोलिस दलात मात्र चर्चा सुरू होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पुण्याला नेमके किती पाणी मिळणार? आज होणार फैसला

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुण्यासाठी १८.५८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची मागणी पुणे महापालिकेकडून करण्यात आली असताना, पुण्याला नेमके किती पाणी मिळणार, याबाबतचा फैसला शुक्रवारी होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ( ) यांच्या उपस्थितीत होणार असून, त्यामध्ये याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

कालवा सल्लागार समितीची बैठक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येत असते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती. शुक्रवारी ही बैठक होणार असून, त्यामध्ये पुण्याला किती पाणी द्यायचे, याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी १८.५८ टीएमसी पाणी देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी वाढत्या लोकसंख्येबाबतची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे सादर केले असून, पुण्याची लोकसंख्या ही सुमारे ५३ लाख असल्याने या वर्षात पुण्यासाठी १८.५८ टीएमसी पाण्याची देण्याची भूमिका घेतली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

धक्कादायक! नागपूर कारागृहातील कैद्यांना चरसचा पुरवठा, प्रशासन गोत्यात

0

नागपूरः कारागृहातील बंदीवानांना चरस पुरवठा करणाऱ्या कारागृह रक्षकास रंगेहात पकडण्यात आले. रक्षकच कैद्यांना अमलीपदार्थाचा पुरवठा करीत असल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धंतोली पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून रक्षकाला अटक केली. मंगेश मधुकर सोळंकी (वय २८, रा. सहकारनगर), असे रक्षकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी मंगेश व अन्य चार रक्षक कारागृहात कर्तव्यावर हजर होण्यासाठी आले. कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमारे व अन्य अधिकारी कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी कर्मचारी व रक्षकांची झडती घेत होते. झडती घेताना मंगेश घाबरला. कुमरे यांचा संशय बळावला. अधिकाऱ्यांनी त्याचे मोजे तपासले. त्यात दोन ‘पुड्या’ दिसल्या. त्या उघडून बघितल्या असता २८ ग्रॅम चरस आढळली. कुमरे यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच धंतोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी मंगेश याला अटक केली. गुरूवारी पोलिसांनी मंगेश याला न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts