Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5836

रेडमी ९ प्राईम भारतात लाँच, पाहा फोनची किंमत-वैशिष्ट्ये

5

नवी दिल्लीः शाओमीचा सब ब्रँड रेडमीने आपला नवीन हँडसेट भारतात लाँच केला आहे. या फोनला कंपनीने ‘प्राइम टाइम ऑलराउंडर’ टॅगलाईनचा वापर केला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आणि ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

वाचाः

Redmi 9 Prime ची किंमत व उपलब्धता
रेडमी ९ प्राईमच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. फोनची विक्री ई कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर प्राईम डे सेलमध्ये आणि मी डॉट कॉम वर सुरू होणार आहे. त्यानंतर हा फोन मी होम, मी स्टूडिओ आणि अन्य दुसऱ्या मोठ्या रिटेल पार्टनर्सवर उपलब्ध करण्यात येणार आहे. कंपनीने रेडमी ९ प्राईमसोबत एक कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर फ्री दिला जाणार आहे. रेडमी ९ प्राईमला कंपनीने स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, सनराईज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे.

वाचाः

Redmi 9 Prime ची फीचर्स
मध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. कंपनीने सांगितले की, डिस्प्ले सोबत युजर्संना कॉन्टेंट पाहताना जबरदस्त अनुभव मिळणार आहे. अँड्रॉयड १० बेस्ड डार्क मोड फीचर असल्याने डोळ्यावर कमी दबाव पडेल. सुरक्षासाठी या फोनमध्ये कॉर्गिंग गोरीला ग्लास दिला आहे. फोन ऑरा ३६० डिझाईनसोबत येतो.

वाचाः

रेडमीच्या या फोनमध्ये २.० गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, प्रोसेसरमुळे फोनचा गेमिंग आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स दमदार आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये ड्यूल सिम आणि एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे.

वाचाः

रेडमी ९ प्राईम मध्ये १३ मेगापिक्सलचा एआय प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेटअप दिला आहे. कॅमेरा एआय सीन डिटेक्शन फीचर सोबत येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरा दिला आहे. रेडमी ९ प्राईम ला पॉवर देण्यासाठी यात 5020mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. परंतु, फोनसोबत बॉक्समध्ये १० वॉट फास्ट चार्जर मिळतो. कंपनीने सांगितले की, प्राईम सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. फोनला २६ तासांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळेल. फोनममध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, वायरलेस एफएम रेडियो, आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ 5.0 यासारख्या कनेक्टिविटी फीचर्स मिळतात. शाओमीच्या या फोनमध्ये रियरमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच फेस अनलॉक फीचर सुद्धा मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

एसटीच्या हजारो कामगारांना दिलासा! रखडलेला पगार मिळणार

5

मुंबई: राज्य परिवहन मंडळाच्या () सेवेतील लाखो कामगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेल्या कामगारांच्या पगारासाठी ५५० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं कामगारांची मोठी चिंता दूर होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यात आज या संदर्भात बैठक झाली. चर्चेअंती साडे पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यामुळं कामगारांचा रखडलेला पगार काही अंशी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाचा:

करोना संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली. त्या दिवसापासून एसटी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील अठरा हजारावर बसेस डेपोमध्येच अडकून पडल्या आहेत. यातून महामंडळाला रोज सुमारे २३ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. चार महिन्यात हा तोटा सुमारे अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. जिल्हांतर्गत बसवाहतूक सुरू झाली असली तरी त्यातून डिझेलचा खर्चही निघत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार थांबवण्यात आला. मार्च महिन्याचा २५ टक्के, मे महिन्याचा पन्नास टक्के पगार दिला नाही. जून महिन्याचा पगार जुलै महिना संपला तरी झाला नाही. त्यामुळं कामगारांपुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला होता. याच विवंचनेतून सांगली जिल्ह्यात एका कामागाराने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. महाराष्ट्र टाइम्सनं या संदर्भातील वृत्त दिलं होतं.

वाचा:

कामगारांचा पगार रखडला असताना तो देण्याचं नियोजन करण्याऐवजी महामंडळाने स्वेच्छा निवृत्तीची योजना पुढे आणली होती. कामगार संघटनांनी महामंडळाच्या या भूमिकेवर टीकेची झोड उठवली होती. महामंडळ जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला होता. चहूबाजूंनी ओरड झाल्यानंतर अखेर सरकारनं बैठक घेऊन अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

भूमिपूजनासाठी 'गैर हिंदू' नको, हिंदू महासभेनं गृहमंत्र्यांना धाडलं रक्तानं लिहिलेलं पत्र!

5

नवी दिल्ली : उद्या बुधवारी ५ ऑगस्ट रोजी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यासाठी अयोध्यानगरीतील १७५ मान्यवरांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. यात पहिलं आमंत्रण अयोध्या खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना धाडण्यात आलंय. तसंच जवळपास १० हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. मात्र, हिंदू महासभेनं या सोहळ्यात ‘विधर्मी’ अर्थात ‘गैर हिंदूं’ना प्रवेश न देण्याची मागणी करत थेट गृहमंत्र्यांना रक्तानं लिहिलेलं पत्र धाडलंय.

भूमिपूजन सोहळ्यासाठीच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व महंत नृत्य गोपाल दास हे पाच जण विराजमान असणार आहेत.

रक्तानं लिहिलं पत्र!

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव यांनी गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र धाडलंय. जीटी रोड स्थित कार्यालयात कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांनी हे पत्र चक्क रक्तानं लिहिलंय. भूमिपूजनात सहभागी होणाऱ्या गैर हिंदू व्यक्तींना अशा शुभप्रसंगी प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी हिंदू महासभेनं केलीय. रक्तानं पत्र लिहून हिंदू महासभेनं गृहमंत्र्यांकडे ‘विधर्मी’ फैज खानला प्रवेश न देण्याची मागणी केलीय. राम जन्मभूमी हे एक धार्मिक स्थल आहे. कोणतंही ‘धर्मनिरपेक्ष’ कार्यालय नाही, असंही हिंदू महासभेनं म्हटलंय.

कोण आहेत पूजा शकून पांडेय?

या अगोदर हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय महात्मा गांधींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून चर्चेत आल्या होत्या. यावेळी, पुतळ्यावर पेट्रोल टाकून मिठाई वाटप करताना हिंदू महासभेच्या सदस्यांनी ‘गोडसे झिंदाबाद’चे नारेही दिले होते.

वाचा :

वाचा :

कोण आहे फैज खान?

राम जन्मभूमी भूमिपूजनासाठी छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या चंद्रखुरी स्थित कौशल्या माता मंदिरातून माती घेऊन नावाचा व्यक्ती अयोध्येत दाखळ होणार आहे. भगवान श्रीरामांच्या आजोळीची मातीही अयोध्येत मंदिराच्या पायाभरणीत टाकली जावी अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी, रायपूर ते अयोध्या असा ७९६ किलोमीटरचा प्रवास ते पायी चालत पूर्ण करणार आहेत. दररोज ६० किलोमीटर चालून फैज खान ५ ऑगस्टला अयोध्येत दाखल होणार आहेत.

वाचा :

वाचा :

हिंदू महासभेच्या वकिलांचंही ‘ट्रस्ट’ला पत्र

तसंच हिंदू महासभेचे वकील हरी शंकर जैन आणि इतर वकील भक्तांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी जन्मस्थळावर कोणत्याही मुस्लीम किंवा गैर हिंदू व्यक्तीला बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी केलीय. जर बोलावण्यात आलं तर कायदेशीर कारवाई करण्याचीही धमकी या पत्रात देण्यात आलीय. ‘मक्का मदिन्यात हिंदुंना प्रवेश निषेध आहे मग राम मंदिरात मुस्लिमांना कसा प्रवेश दिला जाऊ शकतो?’ असं त्यांचं म्हणणं आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मोठी बातमी! सुशांतसिंह प्रकरणात बिहार सरकारची CBI चौकशीची शिफारस

5

पाटणा: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. या नंतर राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

सुशांतसिंह प्रकरणाची
जनता दलाचे (संयुक्त) नेते संजय सिंह यांनी बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिस सक्षम होते, मात्र महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना काम करू दिले नाही, असेही संजय सिंह म्हणाले. आता सीबीआय चौकशी झाल्यानंत या प्रकरणात दूध का दूध, पानी का पानी होईल, आणि सत्य पुढे येईल असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत होण्यासाठी त्यासंबंधीची कारवाई लवकर सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांना यापूर्वीच दिले आहेत. दरम्यानच्या काळात सुशांतसिंह राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांनी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याशी चर्चा केली. या सर्व प्रक्रियेनंतर बिहार सरकारकडून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती सीबीआयला करण्यात आली.

वाचा:

सुशांतच्या वडिलांनी केली मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा
सुशांतसिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी सिंह यांनी नीतीश कुमार यांच्याकडे केली. यानंतरच बिहार सरकारने या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचा निर्णय घेतला.

वाचा:

विरोधी पक्षांनीही केली सीबीआय चौकशीची मागणी
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी बिहारचे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकाच मंचावर आलेले दिसले. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीही मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भूमिपूजन: मोदी उद्या अयोध्येत ३ तास थांबणार, पाहा पूर्ण वेळापत्रक

5

अयोध्या: अयोध्येत राम जन्मभूमी (Ram Janma Bhoomi) येथे मंदिराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी उद्या बुधवारी भव्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वत: (PM Narendra Modi) हे अयोध्येत येत आहेत. पंतप्रधान मोदी हेच राम मंदिराच्या निर्मितीचा पाया घालणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत काही तास घालवणार आहेत. या पूर्वी पंतप्रधान अयोध्येतील हनुमानगडी मंदिरात पूजा करतील असे हनुमानगडीच्या पुजाऱ्याने माहिती दिली आहे. हनुमानाच्या आशीर्वादाशिवाय रामाचे कोणतेही काम सुरू करता येत नाहीत, अशी मान्यता आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी प्रथम हनुमानाची पूजा करतील आणि त्यानंतर ते भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला रवाना होतील. ( will spend 3 hours in ayodhya)

अयोध्येतील पंतप्रधान मोदींचा असा असेल कार्यक्रम
> ५ ऑगस्टच्या सकाळी दिल्लीहून प्रस्थान

> ९.३५ वाजता दिल्लीहून होणार विशेष विमानाचे उड्डाण

> १०.३५ वाजता लखनऊ एअरपोर्टवर विशेष विमान उतरणार

> १०.४० वाजता हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येसाठी प्रस्थान

> ११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरणार

> ११.४० वाजता हनुमानगडीवर पोहोचून १० मिनिटासाठई दर्शन-पूजन

> १२ वाजता राम जन्मभूमी परिसरात पोहोचणार

> १० मिनिटांमध्ये रामलल्ला विराजमानाचे दर्शन-पूजन

> १२.१५ वाजता रामलल्ला परिसरात पारिजाताच्या रोपट्याचे रोपण

> १२.३० वाजता भूमिपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ

> १२.४० वाजता राम मंदिराच्या कोनशिलेची स्थापना

> २.०५ वाजता साकेत हेलिपॅडसाठी प्रस्थान

> २.२० वाजता लखनऊसाठी हेलिकॉप्टर करणार उड्डाण

वाचा:

भूमिपूजनासाठी एकूण १७५ लोकांना आमंत्रणे

उद्याच्या राम जन्मभूमीवरील मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी एकूण १७५ लोकांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती सोमवारी मंदिराची जबाबदारी सांभळणाऱ्या जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने दिली. या लोकांमध्ये विविध अत्यात्मिक परंपरा मानणारे १३५ साधू आहेत. तर, मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त केवळ ५ लोकच असणार आहेत.

वाचा:

पंतप्रधान मोदी भूमिपूजन कार्यक्रमात मंदिर निर्मितीसाठी ४० किलो चांदीच्या विट कोनशिलेच्या रुपात ठेवतील. पूजनासाठी सोमवार पासूनच धार्मिक विधी सुरू करण्यात आले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पावसामुळे मुंबई जलमय; गुडघाभर पाण्यात उभे राहून महापौरांची पाहणी

0

मुंबई: मध्यरात्रीपासून मुंबईत पाऊस कोसळत असल्याने मुंबईच्या महापौर यांनी मुंबईतील विविध भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. महापौर पेडणेकर यांनी दादर हिंदमाता येथील गुडघाभर पाण्यात उभं राहून परिस्थितीची पाहणी करत तात्काळ पाण्याचा निचरा करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

काल रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले असून घराघरांमध्ये पाणी साचले आहे. त्याची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळीच अधिकऱ्यांना बोलावून मुंबईतील विविध भागांची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कांदिवलीतील पश्चिम द्रुतगती मार्गावर जाऊन डोंगराचा ढिगारा दूर करण्याच्या कामाची पाहणी पाहणी केली. तसेच दादर हिंदमाता येथे गुडघाभर पाण्यात उभं राहून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. बीकेसी येथील मिनी पंपिंग स्टेशनलाही किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन पाणी उपसा करणाऱ्या पंपाची पाहणी केली. कलानगर तसेच इंदिरानगर या परिसरात भरणाऱ्या पाण्याचा उपसा या पंम्पिंग स्टेशनद्वारे केला जातो. गतवर्षी या परिसरात भरलेल्या पाण्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे.

तर, मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी आज मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त चहल यांनी थेट अंधेरीच्या मिलन सबवेवर जाऊन पाहणी केली. तसेच मिलन सबवेच्या ठिकाणी अधिकचे पंप लावून पाणी उपसण्याचे संबंधितांना आदेशही दिले. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. आजच्या पाहणी दौऱ्यादरम्यान वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील भागाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली.

रस्त्यांवरील खड्ड्यांतून मुंबईकरांची सुटका कधी?: भाजप

मुंबईत आज पावसाचा जोर असल्याने भाजपा नेते, आमदार यांनी तातडीने महापालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत आज अनेक भागात पाणी साचले असून दरडही कोसळली आहे. त्यात दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शेलार पालिकेत आले होते. करोनामुळे आपत्कालीन कक्षात प्रवेश निषेध करण्यात आला असून आपत्कालीन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांची पालिकेतील भाजप कार्यालयात भेट घेऊन शेलार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी? असा सवाल त्यांनी पालिका आयुक्त आणि शिवसेनेला केला आहे.

रम्यान, मुंबई आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील दौलत नगर भागातील दहिसर नदीला पूर आला असून नदीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'ई भूमिपूजनाचा सल्ला देणारे चाकरमान्यांना ई पास देऊ शकले नाहीत'

4

मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला एक दिवस उरला असतानाही त्यावरून राजकीय टीकाटिप्पणी सुरूच आहे. राम मंदिराचे ऑनलाइन भूमिपूजन करण्याचा सल्ला देणारे मुख्यमंत्री यांना भाजपचे नेते अॅड. यांनी ऑनलाइन प्रवासी पासच्या मुद्द्यावरून बोचरा टोला हाणला आहे.

गणपतीसाठी मुंबई, पुण्याहून आपापल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अडथळे येत आहेत. ई पास हा त्यातील सगळ्यात मोठा अडथळा ठरला आहे. ई पाससाठी अर्ज केल्यानंतरही तो मिळणं दुरापास्त झालं आहे. दलालांच्या मार्फत मात्र सहज पास मिळत आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. गणपतीपर्यंत घरात जायचे असल्यास कोणत्याही परिस्थितीत सहा तारखेच्या आधी गावात पोहोचणे आवश्यक आहे. दुसरीकडे एसटीच्या गाड्या सोडण्याचा निर्णय अद्याप सरकारनं घेतलेला नाही. त्यामुळं चाकरमान्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

वाचा:

या पार्श्वभूमीवर शेलार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राम मंदिराचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करा, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचा संदर्भ देत शेलार यांनी ठाकरेंना टोला हाणला आहे. ‘ई- भूमीजन” करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप “ई पास” देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा! चाकरमान्यांच्या प्रवासाबाबत मुख्यमंत्री घोषणा करणार होते. एसटीच्या गाड्या सोडणार होते. हे सगळं कधी करणार,’ असा सवाल शेलार यांनी केला आहे. ‘कोकणी माणसाच्या संयमाचा अंत पाहू नका,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

चाकरमान्यांच्या अँटीबॉडी टेस्ट मोफत करा!

‘आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे २५० रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा. त्यांना सुरक्षित सन्मानाने कोकणात जाण्यासाठी परवानगी द्या. बघ्याची भूमिका न घेता तातडीने निर्णयाची घोषणा करा,’ अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ₹ ७५००

5

नवी दिल्लीः नोकियाचा स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD Global ने आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. नोकिया सी ३ ला गेल्या महिन्यात चीनच्या सर्टीफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आले होते. नोकियाच्या या नवीन हँडसेटमध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन आणि अँड्रॉयड १० यासारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः

Nokia C3 ची किंमत
नोकिया सी ३ ला ६९९ चीनी युआन (जवळपास ७ हजार ५०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या फोनला नॉर्डिक ब्लू आणि गोल्ड सँड कलरमध्ये खरेदी करता येवू शकते. या स्मार्टफोनची विक्री १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. नोकियाच्या या फोनला खरेदी करण्यासाठी इच्छूक असणारे लोक चीनमध्ये फोनला प्री बुक करू शकतात.

वाचाः

नोकिया सी ३ ची खास वैशिष्ट्ये
नोकियाच्या या फोनमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये साईडला एक एक्सप्रेस बटन दिले आहे. ज्यावरून गुगल असिस्टेंट अॅक्टिव केले जावू शकते. किंवा डबल क्लिक केल्यानंतर लॉग इन करुन दुसरे अॅप्स उघडता येवू शकते. नोकिया सी ३ मध्ये ५.९९ इंचाचा (1440 × 720 पिक्सल) एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी IMG8322 जीपीयू दिला आहे. हँडसेटमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला ४०० जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते.

वाचाः

नोकियाचा हा फोन अँड्रॉयड १० वर काम करतो. फोन ड्यूल सिम सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, ग्लोनास, मायक्रो-यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये ३.५ एमएम ऑडियो जॅक आणि एफएफ रेडिओ सुद्धा दिला आहे. नोकिया सी ३ मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 3040mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

‘सुशांतचे ५० कोटी रुपये कुठे गेले, मुंबई पोलीस गप्प का?’

5

मुंबई- केसदरम्यान मुंबई आणि बिहार पोलिसांमधला वाद वाढत जाताना दिसत आहे. सुशांतच्या पैशांची चैकशी का करण्यात आली नाही असा प्रश्न बिहारचे डीजीपी यांनी मुंबई पोलिसांना विचारला. पांडेय यांची ओळख निर्भीड आणि स्पष्टव्यक्ता अधिकारी अशी आहे.

डीजीपी यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘गेल्या चार वर्षात सुशांतच्या अकाउंटमध्ये जवळपास ५० कोटी रुपये आले आणि आश्चर्य म्हणजे हे पैसे काढण्यातही आले. एका वर्षात त्याच्या अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये आले आणि त्यातून १५ कोटी रुपये काढण्यातही आले. यावर चौकशी होणं गरजेचं नव्हतं का? आम्ही शांत बसणार नाही. अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांना दाबण्यात का आलं हा प्रश्न आम्ही मुंबई पोलिसांना विचारणार आहोत.’

रविवारी बिहार पोलिसांच्या टीमला लीड करण्यासाठी सिटी एसपी विनय तिवारी मुंबईत पोहोचले. मात्र त्यांना बीएमसीकडून क्वारन्टीन करण्यात आलं. यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते म्हणाले की, ‘या केसशी निगडीत पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आम्हाला देण्याऐवजी त्यांनी तिवारी यांना हाउस अरेस्टच केलं. अशाप्रकारचा असहयोग यापूर्वी आम्ही कोणत्याही राज्यात पाहिला नाही. जर या प्रकरणात प्रामाणिक असती तर त्यांनी आमच्यासोबत सगळे रिपोर्ट शेअर केले असते.’

यासोबतच सुशांत केसशी निगडीत अनेक प्रश्न बिहार पोलिसांनी उपस्थित केले. यानंतर मुंबई कमिश्नर परमबीर सिंग यांनी मीडियाशी संवाद साधताना या प्रकरणाची चौकशी योग्यप्रकारे आणि अगदी प्रोफेशनल पद्धतीने सुरू असल्याचं सांगितलं.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह अन्य चारजणांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपासह एफआयआर दाखल केली. यानंतर बिहार पोलिसांची चारजणांची टीम मुंबईत दाखल झाली. याच टीमचं नेतृत्व करण्यासाठी सिटी एसपी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. बिहार पोलिसांनी विनय तिवारी यांना जबरदस्तीने क्वारन्टीन केल्याचा आरोप केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

इंडियन नव्हे तर चीनी प्रिमियर लीग; BCCIवर भडकले लोक!

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ()ने आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी कंपन्या न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक चीनमधील मोबाइल कंपनी व्हिवो असून त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असे आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिरच्या बैठकीत ठरवण्यात आले. आता या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार विरोध होत आहे.

वाचा-
भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे लोकांच्यात चीनबद्दल प्रचंड राग आहे. सीमेवरील संघर्षात भारतीय जवान शहीद झाल्यापासून देशातील नागरिकांनी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्यास सुरूवात केली. आता लोकांनी बीसीसीआयच्या निर्णयावर हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर इंडियन प्रिमियर लीगच्या ऐवजी चीनी प्रिमियर लीग म्हणून ट्रेंड सुरू झाला आहे.

वाचा- …

काहींनी सीमेवर शहिद झालेल्या जवानांचे फोटो शेअर केले आहेत. फक्त पैशासाठी तुम्ही (IPL) कोणत्याही थराला जाऊ शकता असे अनेकांनी म्हटले आहे.

RSSचा विरोध

आयपीएलच्या प्रायोजकावरून विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने लोकांना या टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

वाचा-
आयपीएलने चीनी कंपनीचे प्रायोजकत्व कायम ठेवून शहिद झालेल्या जवानांचा अपमान केल्याचे स्वदेशी जागरण मंचने म्हटलय. सध्याच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था बाजारातील चीनी वस्तूंपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनी गुंतवणूकदारांना आणि कंपन्यांना प्रवेश रोखला जात असताा आयपीएलने केलेले हे कृत्य देशाच्या सुरक्षेचा अपमान करणारे आहे, असे त्यांनी म्हटले. आयपीएलच्या आयोजकांनी चीनी कंपनीचे प्रायोजकत्व काढून घ्यावे नाही तर आम्हाला आयपीएलच्या बहिष्काराचे आवाहन करावे लागेल असे मंचने सांगितले.

वाचा-
येत्या १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये आयपीएलचा १३वा हंगाम सुरू होणार आहे. तर फायनल मॅच १० नोव्हेंबर रोजी खेळवली जाईल. या वर्षी एका दिवशी दोन सामने असलेले १० दिवस असतील. संध्याकाळी सुरू होणारे सामने भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता सुरू होतील.

या स्पर्धासाठी जैव वातावरण तयार करून देण्याची तयारी टाटा ग्रुपच्या टाटा मेडिकर अॅण्ड डायग्नोस्टिकने दाखवली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Latest posts