Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5837

शिवप्रेमी भडकले, रायगडाच्या पायरीमार्गाजवळील तिकीटघर उलथवून टाकले

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुर्गदुर्गेश्वर () येथे कुठल्याही सुविधा न देता गडप्रवेशासाठी तिकीट आकारणे निषेधार्थ असल्याचे सांगत पुरातत्त्व खात्याचे (Archaeological Department) (Ticket house) काही शिवप्रेमींनी उलथवून टाकले.

तिकीटाच्या नावाखाली शिवप्रेमींकडून पैसे घेतले जातात, मात्र गडावर कुठल्याही सुविधा नाहीत. पुरातत्त्व खात्याकडून माणशी २५ रुपये तिकीटाची रक्कम म्हणून आकारली जाते. गडावर महादरवाजाजवळ पूर्वी हे तिकीटघर होते. गडाचे संवर्धन कार्य सुरू असले, तरी गडावर कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने शिवप्रेमींतर्फे हे पाऊल उचलण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

रायगडवाडीकडे उतरणाऱ्या खिंडीत चित दरवाजाचा पायरी मार्ग आहे. या पायरी मार्गाची नुकतीच दुरूस्ती करण्यात आली आहे. तिथेच नव्याने हे तिकीटघर उभारण्यात आले होते. शिवभक्तांनी ते उलथवून टाकले. महाडचे आमदार भरत गोगावलेही यावेळी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

चुकीची ट्रेन पकडली तरीही नुकसान भरपाई; हायकोर्टाचा 'त्या' मातेला न्याय

0

नागपूर: चुकीची ट्रेन पकडल्यानंतर घडलेल्या अपघाताची जबाबदारी आमची नाही, त्यामुळे आम्ही नुकसान भरपाई देणार नाही, असे सांगणाऱ्या प्रशासनाला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. अशा मृत्यूवर केवळ दिलगिरी व्यक्त करून रेल्वेला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यस्थापकांना मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ( Nagpur Bench on )

वाचा:

(वय ५४, रा. तुमसर) असे या प्रकरणातील याचिकाकर्त्या महिलेचे नाव आहे. मुन्नीबाई यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती यांनी हे आदेश दिले. ही घटना १२ डिसेंबरला घडली होती. मुन्नीबाई यांचा मुलगा विक्की हा -हावडा या गाडीने नागपूरहून तुमसरला येत होता. यावेळी मुंडीकोटा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुन्नीबाई यांनी रेल्वे न्यायाधिकरणाने अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळला गेला. त्यानंतर त्यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

वाचा:

सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने मुन्नीबाई यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. ‘विक्की याच्याकडे सापडलेले तिकीट लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे नव्हते. तरीही मुळात त्याच्याकडे तिकीट होते. त्यामुळे तो विनातिकीट प्रवास करीत नव्हता, हे स्पष्ट होते. तसेच त्याने तिकीट काढल्यानंतर चुकीची ट्रेन पकडली असेलही. मात्र, प्रवाशांनी चुकीची ट्रेन पकडू नये, यासाठी रेल्वेने स्थानकावर पुरेशा प्रमाणात माहितीचे फलक लावायला हवेत. तिकीट तपासणाऱ्यांच्या अनुपस्थितीत आपली गाडी चुकेल या भीतीने तो धावत्या रेल्वेगाडीतून पडला व यात त्याचा मृत्यू झाला असावा. त्याचा मृत्यू दुदैवी होता, एवढी दिलगिरी व्यक्त करून रेल्वे आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे रेल्वेने त्याच्या आईला ८ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी’, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. हा आदेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा असून रेल्वेला यामुळे हिसका मिळाला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राज्याला दिलासा; आज ३० मृत्यू, तर ४,०११ करोना बाधित रुग्ण झाले बरे

0

मुंबईः (coronavirus) संसर्गाबाबत आज काहीसे दिलासादायक वृत्त असून आज राज्यात एकूण ४ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात एकूण १ हजार ९२७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. म्हणजेच नवे रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. तसेच आज राज्यात एकूण ३० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २७ इतकी होती. (maharashtra registered 1927 new cases in a day)

राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ३६ हजार ३०५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३७ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्याचा मृत्यूदर २.५२ इतका आहे.

राज्यात अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा खाली आला

दरम्यान, राज्यात आजच्या घडीला ४१ हजार ५८६ इतके अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. काल हीच संख्या ४३ हजार ७०१ इतकी होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढत होता. मात्र कालपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. या बरोबरच, राज्यातील अॅक्टीव्ह रुग्ण संख्येचा आकडाही खाली येत आहे.

राज्यात आज १ हजार ९२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २० लाख ३० हजार २७४ इतकी झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ हजार १३९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कारणांमुळे एकूण १ हजार २४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात १ लाख ८९ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २ हजार १२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात एकूण ३० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण करोनामृतांची संख्या ५१ हजार १३९ इतका झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४७ लाख ६ हजार ९९२ चाचण्यांपैकी २० लाख ३० हजार २७४ (१३.८० टक्के) इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईत सध्या ५ हजार ५३० रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ठाण्यात ही संख्या ६ हजार ५५२, पुण्यात सर्वाधिक १३ हजार ४८७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण गडचिरोलीत आहे. तेथे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ७६ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'महाराष्ट्राची प्रगती होऊ नये हा मोदी सरकारचा उद्देश आहे का?'

0

मुंबईः केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही मिळालेले नाही. नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राच्या मत्स्यव्यावसायिकांवरही प्रचंड अन्याय केला आहे. बजेटमध्ये ५ राज्यांत आधुनिक मच्छीमार बंदरे व मासळी उतरवण्याचे स्थानक उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. महाराष्ट्र हे ५ व्या क्रमांकाचे मत्स्य उत्पादक राज्य असून सागरी मासेमारीचे उत्पादन ४.६७ लक्ष टन इतके आहे. असे असतानाही यात महाराष्ट्राचा समावेश नाही हे दुर्दैवी असून नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रव्देष पुन्हा एकदा स्पष्ट झाला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी म्हटले आहे.

सावंत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला आहे. मत्सव्यवसाय हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. इतर राज्यांच्या मच्छीमारांना अर्थसंकल्पातील या निर्णयामुळे लाभ मिळणार असताना कोकणातील आमच्या कोळी बांधव व मत्स्य व्यावसायिकांवर हा अन्याय आहे. महाराष्ट्राची प्रगती होऊ नये हा मोदी सरकारचा उद्देश आहे का? असा प्रश्न उपस्थित करून सावंत यांनी याचा जाहीर निषेधही केला आहे.

वाचाः

मासेमारी बंदरामुळे मच्छिमारांना मासळी उतरवणे सोयीचे होते. बर्फ कारखाना, शीतगृह, मत्सप्रत्किया, जाळी बांधणीकरिता शेड, मत्स लिलावासाठी केंद्र, नौका दुरुस्ती या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मच्छिमारांना विशेष फायदा होतो. मासेमारीवरील खर्चही कमी होऊन माशांचा दर्जा चांगला राहून भावही चांगला मिळण्यास मदत होते परंतु या सर्व लाभांपासून मोदी सरकारने महाराष्ट्रातील मच्छिमारांना वंचित ठेवले आहे, असेही सावंत म्हणाले.


वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कोल्हापुरात शिवसेनेचा 'हा' नारा, महाविकास आघाडीत धुसफूस

0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे ४१ हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय आहे. निवडणुकीनंतर कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर असेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी व्यक्त केला. दोन्ही काँग्रेसच्या हातात हात घालून पाच वर्षे महापालिकेत कारभार करणाऱ्या सेनेने स्वबळाचा नारा देतानाच महापौर पदावरही दावा केल्याने महाविकास आघाडीत धूसफूस सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. क्षीरसागर म्हणाले, हीच ती वेळ आहे,शिवसेनेचा महापौर करण्याची ! या घोषवाक्याद्वारे महापालिका निवडणुकीस सामोरे जाण्यास शिवसेना सज्ज आहे. निवडणुकीसाठी आघाडी झाली तर ठीक, अन्यथा स्वतंत्रपणे लढू. अन्य पक्षातील नगरसेवक, माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य देऊन शिवसेनेचे नगरसेवक मोठया संख्येने निवडून आणू.

शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ईच्छा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत. ही दोन्ही महत्वाची पदे शिवसेनेकडे असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेतही शिवसेनेची एकहाती सत्ता असावी. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली भूमिका पटवून देऊ.’निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या महापौर, स्थायी समिती सभापतिपदासह अन्य महत्वाची पदे शिवसेनेकडे असतील.

पायाभूत सुविधासाठी मुख्यमंत्र्यांकडून आणखी २५ कोटी

गेल्या महिनाभरात मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना पूर्ण ताकतीने आणि शिवसेनेचा महापौर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे, नगरविकासमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. शहरातील पायाभूत सुविधासाठी आणखी २५ कोटी रुपये मुख्यमंत्री देणार आहेत. येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री ठाकरे यांची पुन्हा भेट घेणार आहे. याशिवाय सरकारने कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी महापालिकेला फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहर आणि परिसरात अगोदर विकासकामे करणार मग निवडणूक असे सूत्र निश्चित केले आहे.’

क्लिक करा आणि वाचा-

पत्रकार परिषदेला शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर सरिता मोरे, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, शिवसेनेचे नगरसेवक राहुल चव्हाण, नियाज खान, तेजस्विनी इंगवले, प्रतिज्ञा निल्ले, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

संजय राऊतांना ढोंगी म्हणत राणेंचा शिवसेनेवर निशाणा

0

मुंबईः शिवसेनेचे खासदार यांनी आज दिल्लीतील आंदोलकांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या या भेटीचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. भाजपनं संजय राऊतांवर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार संजय राऊत यांनी आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. तसंच, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचीही राऊतांनी भेट घेतली आहे. राऊतांच्या या भेटीवरुन भाजप नेते यांनी एक ट्विट केलं आहे.

वाचाः

निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत जितक्या झटपट दिल्ली येथे आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसेच कधी मराठा आंदोलकांना भेटली नाहीत. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आंदोलनाला राऊत कधी गेले नाहीत, महाराष्ट्रातले आंदोलनकर्ते नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला, अशा शब्दांत राऊतांवर हल्ला चढवला आहे. तसंच, एक नंबर ढोंगी, अशी खोचक टीकाही केली आहे.

वाचाः
वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई: गोरेगावमधील एका स्टुडिओला भीषण आग, जीवितहानीचे वृत्त नाही

0

मुंबई : गोरेगाव पश्चिम भागात असलेल्या एका स्टुडिओला लागली भीषण आग लागून () स्टुडिओतील सामान जळून खाक झाले आहे. बांगुल नगर येथील मोकळ्या जागेत हा स्टुडिओ उभारण्यात आलेला आहे. आज दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमाराला ही भीषण आग लागली. या आगीमध्ये जीवितहानी झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या आगीमध्ये स्टुडिओतील सर्व सामान जळून खाक झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ८ बंब पोहोचले असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. ( in a studio in )

ही आग लागली त्यावेळी स्टुडिओतील सामानाचे विलीनीकरण करण्यात येत होते. या आगीत हे सर्व सामान जळून गेले आहे. आगीच्यावेळी अनेक व्हॅनिटी व्हॅन तेथे उपस्थित होत्या. मात्र अद्याप जीवितहानी झाली की नाही? याबाबत माहिती मिळाली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई: अभिनेत्री हॉटेलमधील वॉशरूममध्ये गेली, घडली धक्कादायक घटना

0

मुंबई: मुंबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला. हॉटेलमधील हाउसकिपिंगमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाने वेबसीरीजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा विनयभंग केला. रविवारी ही घटना घडली असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेबसीरीजमध्ये काम करणारी अभिनेत्री दिवसभरातील चित्रीकरण संपवून राहत असलेल्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचली. ती आपल्या खोलीत गेली. ती वॉशरूममध्ये गेली असता, दिलेश्वर याने तिला घट्ट पकडले आणि तिच्यासोबत गैरवर्तन करू लागला. तिने आरडाओरडा केला. अभिनेत्रीने कशीबशी त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.

या प्रकरणी अभिनेत्रीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'अंबानी, अदानींना काय काय विकायचं हे सांगणारा अर्थसंकल्प'

0

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. शिवसेनेनं या अर्थसंकल्पाचं ‘स्वप्नांची सैर’ अशा शब्दांत वर्णन केल्यानंतर आता काँग्रेसनंही तोफ डागली आहे. ‘अंबानी व अदानी यांना काय काय विकायचं याचं सुतोवाच करणारा हा अर्थसंकल्प होता,’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे खासदार यांनी केली आहे. (Congress MP on )

वाचा:

‘मागील वर्षी निर्मला सीतारामन यांनी दोन तासांहून अधिक काळ बजेटचं वाचन केलं होतं. यावेळी त्यांनी आपलं भाषण लवकर संपवलं त्याबद्दल आभार,’ असा चिमटा काढत, राजीव सातव यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. ‘हा अर्थसंकल्प पेपरलेस तर आहेच पण ‘सेन्सलेस’ही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी व सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. करोनानंतर ढासळलेल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुकण्यासाठी देखील कुठलीही तजवीज नाही. तीन वर्षांत होईल, पाच वर्षांत होईल असे वायदे अर्थमंत्र्यांनी केले आहेत. पण येत्या आर्थिक वर्षात काय करणार याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. केवळ पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तेथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे बजेट तयार करण्यात आलं आहे,’ असा आरोप सातव यांनी केला.

वाचा:

‘काँग्रेसनं ६० वर्षांत काय केलं असं भाजपवाले नेहमी विचारायचे. ते भाजपवाले आज काँग्रेसनं उभी केलेली बीपीसीएल, एलआयसी आणि मोठमोठ्या बंदरांचं बंदरांचं खासगीकरण करण्याचा अजेंडा राबवत आहेत. अंबानी, अदानीला काय काय विकायचं आणि त्यांचं कसं भलं करायचं हाच या बजेटचा अजेंडा आणि अर्थ आहे,’ असं सातव म्हणाले. ‘महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार हे २०२४ ला कळेल. कारण त्या वर्षी आपल्याकडं निवडणुका आहेत,’ असा टोलाही सातव यांनी हाणला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अमृता फडणवीस पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर; कारण ठरलं 'ते' ट्विट

0

मुंबईः माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते यांच्या पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमुळं त्या ट्रोल होत आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वागत करताना भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनीही एक ट्विट करत अर्थसंकल्पाचे व मोदी सरकारचे कौतुक केलं आहे. ‘मागील १०० वर्षांत कधी पाहण्यात आला नाही अशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे सर्व दे आपल्याकडून शिकतील,’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

वाचाः

अमृता फडणवीस यांनी हे ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाली आहेत आणि गेल्या १०० वर्षाच्या बजेटबद्दल बोलतोय, अशीआठवण त्यांना नेटकऱ्यांनी करुन दिली आहे. तर, एकानं भारत स्वातंत्र्य होऊन १०० वर्ष झाली का?, असा प्रश्न केला आहे. तर, एका युझरनं भारताला स्वातंत्र्य मिळूनच ७४ वर्षे झाली मग तुम्ही १०० वर्षातील चांगला अर्थसंकल्प असे कसे म्हणू शकता? यापूर्वी देशात इंग्रजांनीच चांगला बजेट सादर केला होता, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असं म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts