Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5845

कमाल आहे! या रेस्टॉरंटमध्ये मिळते 'कोविड करी' आणि 'मास्क नान'

5

जोधपूर: देशभरात करोनाचा कहर सुरूच असून आजही दिवसेंदिवस करोनाची लागण झालेले रुग्ण वाढतानाच दिसत आहेत. देशभरातील परिस्थितीवर केंद्र सरकारसह राज्यांची सरकारेही चिंतीत असून लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन सतत करण्यात येत आहे. यामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अनेकदा अतिशय क्रिएटीव्ह असे मार्गही अवलंबले जात असल्याचे दिसत आहे. असाच एक मार्ग राजस्थानमधील एका रेस्टॉरंटमध्ये अवलंबला जात आहे. या रेस्टॉरंटमध्ये लोकांना ” आणि ” वाढला जात आहे.

जोधपूरमधील या रेस्टॉरंटच्या मालकाने यामागील कल्पना स्पष्ट केली. कोविड करी हा एक मलाई कोफ्ताचाच प्रकार आहे. यात विविध प्रकारच्या मसाल्यांचा वापर करत कोफ्ता तयार करण्यात आला आहे. तसेच बटर नान मास्कच्या आकारात तयार करण्यात आला आहे, अशी माहिती या रेस्टॉरंटच्या मालकाने दिली.

राजस्थानात या रेस्टॉरंटची चर्चा सगळीकडे होत असून रेस्टॉरंटच्या कल्पनेला दाद दिली जात आहे. मात्र, या रेस्टॉरंटमध्ये किती लोक न्याहरी किंवा जेवणासाठी येतात याची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच कोविड करी आणि मास्क नानला किती मागणी आहे, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. कोविड करीला करोनाच्या विषाणूप्रमाणे चक्राकार आकार देण्यात आला असून नानला आयताकार बनवण्यात येत आहे. तसेच या नानला दोन्ही बाजूंना मास्कला असतात तसे कानाला अडकवण्याचे पट्टे देखील तयार करण्यात आल्याने हा नान मास्क सारखा दिसत आहे.

वाचा:

राजस्थानात करोनाचे एकूण रुग्ण ४४,४१०
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे एकूण १,१६७ नवे रुग्ण आढळले आहेत. या नंतर राजस्थानमधील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ४४,४१० वर. या व्यतिरिक्त राजस्थानात एकूण १२,४८८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

ही बातमी वाचा:

ही देखील बातमी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन

5

मुंबई: शिवसेनेचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष यांच्या पत्नी यांचं रविवारी रात्री निधन झालं. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

अनघा जोशी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. काल रात्री ११ वाजता दादर शिवाजी पार्क येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. अनघा जोशी यांचा जन्म २ जानेवारी १९४५ रोजी झाला होता. अनघा जोशी यांचं माहेरचं नाव मंगल हिगवे होतं. १४ मे १९६४ रोजी त्यांचा मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. मनोहर जोशी यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील यशात अनघा जोशी यांनी त्यांना मोलाची साथ दिली.

लग्नानंतर मनोहर जोशी राजकारणात सक्रिय झाले. शिवसेने सारख्या जहाल संघटनेत जोशी यांनी काम सुरू केल्यानंतरही अनघा जोशी या मनोहर जोशी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यातील चढ-उतार आणि यश-अपयशाच्या काळातही त्यांनी जोशी यांना खंबीर साथ दिली. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य या मनोहर जोशी यांच्या राजकीय प्रवासात अनघा यांनी त्यांना मोलाची साथ दिली.

अनघा जोशी यांच्या मागे पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सुशांतसिंह प्रकरण: मुंबईत येताच बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला पालिकेने केलं क्वॉरंटाइन

5

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधीक्षक यांना मुंबई पालिकेने केलं आहे. त्यामुळे तिवारी यांना १४ दिवस क्वॉरंटाइन राहावं लागणार असून बाहेर जाऊन तपास करता येणार नाही. पालिकेने तिवारी यांना जबरदस्तीने क्वॉरंटाइन केल्याचा आरोप होत आहे.

बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे काल रविवारी पटना येथून मुंबईत तपासासाठी आले होते. ही माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी काल रात्री ११ वाजता तिवारी यांना गोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच तिवारी यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्काही मारण्यात आला आहे. दरम्यान, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई आणि बिहार पोलिसांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं ट्विट पांडेय यांनी केलं होतं. त्यानंतर मीडियाने तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता मला क्वॉरंटाइन करण्यात आलं असून माझ्या टीमशी मी फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच संपर्क साधू शकलो आहे. महाराष्ट्र सरकारची ऑर्डर दाखवल्यानंतर मला क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. मात्र, मी मुंबई विमानतळावर आल्यावर माझी कोणीही करोनाची चाचणी केली नाही किंवा त्यासंदर्भात माझी चौकशीही केली नाही. माझा करोना स्वॅबही घेण्यात आलेला नाही. मी ड्युटीवर आहे. त्यामुळे मला यातून सूट द्यायला हवी. मी १४ दिवस क्वॉरंटाइन राहिल्यास या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होईल, असं तिवारी यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबई महापालिकेने तिवारी यांना क्वॉरंटाइन केल्याने बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी आज दुपारी २ वाजता बिहार पोलिसांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

विनय तिवारी काल मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आमची टीम चांगला तपास करत असल्याचं मीडियाशी बोलताना सांगितलं होतं. गेल्या आठवड्याभरापासून आम्ही अनेकांचे जबाब नोंदवले असून त्याचं विश्लेषण केल्यानंतर आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू. मात्र आम्हाला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल मिळाला नाही, असंही तिवारी यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत आली आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर तातडीने बिहारची टीम मुंबईत पोहोचली. साधारणपणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आलेल्या पोलिसांना स्थानिक पोलिसांकडून मदत केली जाते. मात्र, बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याचं दिसून आलं आहे. बिहार पोलिसांना सुशांतसिंह प्रकरणातील संबंधितांचे जबाब घेण्यासाठी गाडीही देण्यात आली नाही. त्यामुळे या पोलिसांना रिक्षा किंवा टॅक्सीने फिरावं लागत आहे. अंकिता लोखंडेच्या घरी जाण्यासाठी तर बिहार पोलिसांना ३ किलोमीटरची पायपीट करावी लागली. ही माहिती मिळाल्यानंतर जबाब नोंदवून झाल्यावर अंकिताने पोलिसांना स्वत:ची जॅग्वार कार दिली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सत्ता गेल्याने विरोधकांची डोकी कामातून गेली; शिवसेनेचा हल्ला

5

मुंबई: दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. शेतकर्‍यांना दूध भाव मिळावा, पण त्यासाठी केंदाने तत्काळ महाराष्ट्राला निधी द्यावा. दूध भुकटी आयातीचा निर्णय रोखावा. महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यांच्या ताकदीवरच केंद्राचे दुकान चालले आहे. त्यामुळे पेटलेल्या दुधाचा भडका थांबवा व दुधात पेट्रोल ओतणार्‍या विरोधी नेत्यांना आवरा. सत्ता गेल्याने त्यांची डोकी कामातून गेली आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

दूध भुकटीची आयात थांबवा ही शेतकर्‍यांची पहिली मागणी आहे व ती केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. महाराष्ट्रातील पुढारी त्यावर का बोलत नाहीत? दूध भुकटीचा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो इतरही राज्यांत तितकाच महत्त्वाचा आहे, पण भाजपशासित राज्यांत दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न वार्‍यावर सोडले आहेत, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून ही टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेची टीका

>> महाराष्ट्रात दुधाचे आंदोलन भडकले आहे. सध्याचा काळ हा संयम व सामोपचाराने घेण्याचा आहे, शेतकर्‍यांची माथी भडकवून त्यावर राजकीय भाकर्‍या शेकण्याचा नाही. शेतमालाला भाव मिळावा, नव्हे मिळायलाच पाहिजे याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. भाव वाढवून तर सगळ्यांनाच हवे आहेत, पण करायचे काय? उसाला, कापसाला, साखरेला, गुळाला, भाज्यांना, ज्वारीला, मक्याला, डाळी – कडधान्यांना असो, सगळ्यांनाच भाव वाढवून हवा आहे, पण सरकार व जनजीवन ठप्प असल्याने सरकारी तिजोरीत दमडय़ांची आवक नाही व जे आहे ते सर्व आरोग्यविषयक सुविधांवर म्हणजे कोरोनाशी लढण्यात खर्च होत आहे.

>> लहान व मोठी हॉटेल्स चार महिन्यांपासून बंद आहेत. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली असणार्‍या चहाच्या टपर्‍या बंद पडल्या आहेत. त्यामुळे दूध-साखरेच्या व्यवहारात ८० टक्के घट झाली आहे. दुधाची आवक जावक, दुधापासून बनणारे लोणी, चीज, चॉकलेटस्, मिठायांचे उत्पादन, विक्री यात मोठी घट झाल्याने दुधाची खरेदी-विक्री संकटात आहे. ‘अमूल’सारख्या श्रीमंत दूधवाल्या संस्थाही अडचणीत सापडल्यात. ज्यांची चूल फक्त ‘दुधा’च्या विक्रीवर अवलंबून आहे, अशांचे हाल आहेत व त्यावर उपाय काय ते एकत्र बसून ठरवावे लागेल. महाराष्ट्रात गोकुळ, वारणा वगैरे महाउद्योगी डेअर्‍यांचे एक स्वतंत्र संस्थान आणि राजकारण आहे. साखर कारखानदारांची एक लॉबी आहे, तशी दूध डेअरीवाल्यांची आहे. त्यांच्या हातात दुधाचे अर्थकारण आहे.

>> राज्याचे विरोधी पक्षनेते एक मायाळू व कनवाळू पुढारी आहेत. त्यांचे मन लोकांच्या दुःखाने लगेच द्रवते. महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचा प्रश्न निर्माण होताच फडणवीस हे पलटीमार काँग्रेजी साखर कारखानदारांना घेऊन दिल्लीस गेले, अमित शहांच्या कानी साखर कारखानदारांचे प्रश्न घातले. तसेच त्यांनी आता दूध उत्पादकांच्या बाबतीत केले पाहिजे. राज्याचे अर्थमंत्री, कृषी-दूध उत्पादक मंत्र्यांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांनी बेशक दिल्लीस जावे व दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी पाच-पंधरा हजार कोटींची तरतूद करून आणावी. महाराष्ट्राचे दिल्लीकडून येणे आहेच व फडणवीसांनी हस्तक्षेप केल्याशिवाय ते देणार नाहीत, असा करार झालेला दिसतो.

>> सदा खोत वगैरे मंडळी सहा महिन्यांपूर्वी सरकारमध्ये होती व तेव्हा त्यांनी याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. आज ते रस्त्यावर उतरले आहेत, दुधाचे टँकर फोडत आहेत, दुधाची नासाडी करीत आहेत.

>> किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांचा आदर करायला हवा, पण पैसे केंद्रानेच द्यायला हवेत. आंदोलन फक्त अनुदानाचे नाही, तर सरकारी धोरणास विरोध करण्याचेसुद्धा आहे हे समजून घेतले पाहिजे.

>> दूध भुकटीची आयात थांबवा ही शेतकर्‍यांची पहिली मागणी आहे व ती केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी त्यावर का बोलत नाहीत? राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत हे एकवेळ मान्य करू, पण केंद्र सरकारने दूध भुकटीच्या आयातीस दिलेल्या परवानगीला विरोध न करणे हा तर राजकीय लफंगेगिरीचा कळस आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Marathi Joke: शेवटी कोकणचा कॅलिफोर्निया झालाच

5

आजकाल कोकणात जाणं म्हणजे परदेशात जाण्यासारखं झालंय…..!

-स्पेशल गाड्या काय??

-ई पास काय??

-मेडिकल सर्टिफिकेट काय??

.
.
.
.
.
.

शेवटी कोकणचो कॅलिफोर्निया झालो….!

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कोल्हापूरकरांना दिलासा; कोविड सेंटर साकारले, ५३८ खाटांची व्यवस्था

5

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः बांधकाम व्यावसायिकांची क्रीडाई संस्था आणि रोटरी संस्थेने पुढाकार घेऊन कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे १२५ खाटांचे कोविड सेंटर तयार केले. या सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही संस्थांकडून एकूण ५३८ खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोविड उपचार केंद्रांच्या निर्मितीसाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यानुसार बांधकाम व्यावसायिकांची क्रीडाई संस्था आणि रोटरी संस्थेने खाटांची सुविधा देण्याची तयारी दर्शवली. यासाठी रोटरीच्या बारा क्लबनी एकत्र येऊन ६२ लाख रुपयांची निधी जमा केला. क्रीडाईनेही यात भर घालून जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात दिला. यातून ५३८ खाटांच्या रुग्णालयांची व्यवस्था केली जाणार आहे. सर्व खाटांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा देण्याचीही तयारी क्रीडाईने दर्शवली आहे. यापैकी १२५ खाटांचे कोविड सेंटर महासैनिक दरबार हॉलमध्ये तयार केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी क्रीडाई आणि रोटरीच्या कामाचे कौतुक करीत यापुढे ग्रामीण भागातही आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन केले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रीडाईचे राज्याचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिव ऋषिकेश केसकर, रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर आदी उपस्थित होते.

रुग्णांना तात्काळ उपचार मिळणार

करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. उपचारासाठी खासगी रुग्णालयेही आरक्षित केली आहेत. मात्र, रुग्णांच्या वाढणा-या संख्येच्या तुलनेत खाटांची व्यवस्था करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. खासगी संस्थांच्या मदतीने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. याशिवाय रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यातही मदत झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भारतीयांनी केली ४ हजार कोटींची 'रक्षा', चीनशी व्यापाराचे 'बंधन' तोडले!

5

नवी दिल्ली: यंदाच्या रक्षाबंधनला भारतीयांनी चीनला जबर झटका दिला आहे. रक्षाबंधनाला होणारा ४ हजार कोटींचा राखीच्या व्यापार भारतीयांनी तोडला आहे. यामुळे भारतीय चिनी मालावर बहिष्कार घालू शकत नाही, हा चीनचा दावा निकाली निघाला आहे. आता चिनी वस्तूंवरील बहिष्कार मोहीम आता देशभरात अधिक वेगाने जोमाने राबवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम गेल्या १० जूनपासून अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) सुरू केलीय. यंदा राखीचा सण ‘हिंदुस्थानी राखी’ च्या स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठे यश आले आहे.

यंदा चीनमधून राखी किंवा राखी बनवण्यासाठी लागणारे साहित्य चीनमधून अजिबात आयात करण्यात आलेले नाही. या मोहिमेचा मोठा फायदा झाला आहे. भारतीय वस्तूंद्वारे सुमारे १ कोटी राख्या या घरातून काम करणारे आणि अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांसह इतर कष्टकरी हातांनी बनवल्या आहेत. वेगवेगळ्या आणि अतिशय आकर्षक राख्या त्यांनी बनवल्या आहेत. त्याचवेळी भारतीय राखी उत्पादकांनी भारतीय वस्तूंमधूनही राखी बनविली आणि देशभरात या राख्यांना चांगलीच मागणी आहे.

दरवर्षी ५० कोटी राख्यांच्या व्यापार

देशात दरवर्षी सुमारे ५० कोटी राख्यांचा व्यापार होतो. ज्याची किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधून राखी किंवा राखीसाठी लागणारे साहित्य आयत होते. हा राखीचा माल सुमारे ४ हजार कोटींचा होता. हा माल यंदा भारतात आयात झालेला नाही, अशी माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.

कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गेलेच नाहीत. तर काहींनी ऑनलाइन राख्या खरेदी केल्या आहेत. मौली किंवा कलावापासून घरच्या घरी तयार केलेली राखी आपल्या भावाच्या हातावर बांधावी. ही राखी वैदिक बनेल. त्याला रक्षा सूत्र असेही म्हणतात. ही राखी सर्वात शुद्ध आणि पवित्र आहे. पूर्वीच्या काळी अशाच प्रकारे राखी तयार केली जात होती, असं कॅटने म्हटलं आहे.

चीन भारत छोडोचा शंखनाद

येत्या ९ ऑगस्टपासून देशभरातील व्यापारी “चीन भारत छोडो” ही मोहीम सुरू करतील आणि या दिवशी देशभर ८०० हून अधिक ठिकाणी व्यापारी संघटना शहरातील प्रमुख ठिकाणी जमतील आणि चीनला भारत सोडण्यासाठी सांगतील, असं चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याच्या पुढील कार्यक्रमाबाबत भारतीया आणि खंडेलवाल म्हणाले.

दुसरीकडे, ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ५ ऑगस्टला श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी होणाऱ्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर ४ ऑगस्टला देशभरातील व्यापारी आपली घरे आणि बाजारपेठेत सुंदरकांडच्या पाठाचे आयोजन करतील. तसंच दुकानं आणि घरांमध्ये दिवे लावतील आणि शंखनाद, घंटानाद करतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

दूध दरवाढ आंदोलन; आमदार खोत यांच्या मुलासह आंदोलकांवर गुन्हे दाखल

5

म. टा. प्रतिनिधी, सांगली: भाजपसह मित्र पक्षांनी शनिवारी केलेल्या दूध दरवाढ आंदोलनात दूध रस्त्यावर ओतल्याबद्दल यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला. बंदी आदेशाचा भंग करून दुधाचे नुकसान केल्याबद्दल इस्लामपूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

इस्लामपूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी सागर खोत यांनी शनिवारी सकाळी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर ते पेठ नाका या मार्गावर वाघवाडी फाट्याजवळ केले होते. बंदी आदेश धुडकावून जमाव करणे आणि वारणा दूध संघाचे वाहन अडवून दोन कॅनमधील दूध रस्त्यावर ओतून नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सागर सदाभाऊ खोत (वय ३०, रा. मरळनाथपूर), बजरंग शंकर भोसले (४०, रा. पेठ) मोहसीन मज्जीद पटवेकर (३१, रा. इस्लामपूर), लालासो तुकाराम धुमाळ (३७, रा. येवलेवाडी), बबन भगवान वाघमोडे (२७), राहुल महादेव पाटील (३२, दोघे रा. सुरूल), स्वप्नील देवानंद लोहार (३०, रा. साखराळे), नंदकुमार शंकर पाटोळे (३२, रा. बिचूद) आणि धनाजी शिवाजी मोरे (४०, रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांची नावे आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच अनोळखी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आंदोलन झाले असून, इस्लामपुरात मात्र राजकीय आकसापोटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अमरावतीः शिवसेना नेते सोमेश्वर पुसतकर यांचे उपचारादरम्यान निधन

5

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावतीसोबतच पश्चिम विदर्भात शिवसेनेचा पाया भक्कम करणारे (वय ५१) यांचे रविवारी सायंकाळी झाले. त्यांना फुफ्फुसात वेदना होत असल्याने शहरातील डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

पुसतकर हे होते. यादरम्यान त्यांनी विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनांमुळे अधिकाऱ्यांना धडकी भरायची. संपूर्ण कार्यकाळ आंदोलनाचा राहिला असतानाही कुठल्याही कार्यक्रमाचे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. केवळ अमरावतीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांचा परिणामही दिसून आला. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरून विदर्भात काढलेल्या दिंडीत पुसतकर अग्रेसर होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणातून अलिप्त होते. विदर्भ अनुषेशाचे गाढे अभ्यासक बी. टी. देशमुख यांच्या सिंचन अनुशेषाच्या लढ्यात पुसतकर यांनी स्वत:ला झोकून दिले होते. सामाजिक कार्यातही त्यांची सक्रियता दिसून आली.

मागील दोन वर्षांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मुंबईतील एका रुग्णालयात ते उपचार घेत होते. मधल्या काळात उपचारानंतर सुधारणा झाली होती. करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मुंबईला जाणे धोक्याचे असल्याने त्यांनी नागपुरात उपचार घेण्यास सुरुवात केली. रविवारी सायंकाळी साडेआठ वाजतादरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने शहरातीलच डॉ. कडू यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. पण, काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा करोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

5

बेंगळुरूः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पाही करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झालेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी ट्विट केले. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करावं, असं येडियुरप्पा यांनी ट्विटध्ये म्हटलंय.

उत्तर प्रदेशातील भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंहही रविवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यासर्वांना क्वारंटाइन होण्यासह करोना चाचणी करण्याची सूचना केली आहे. त्यापूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहितही यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येडियुरप्पा यांच्या आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.

दरम्यान, कर्नाटकमधील करोना रुग्णांची एकूण संख्या १, ३४, ८१९ इतकी झालीय. यापैकी ७४, ५९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ५७, ७२५ जण करोनामुक्त झाले आहेत. तर एकूण २,४९६ जण करोनामुक्त झाले आहेत.

देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या रविवारी १७ लाखांवर गेली आहे. रविवारी ५४, ७३६ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ८५३ जणांचा करोनाने मृत्यू झाला. यानुसार देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७, ५०, ७२४ इतकी झाली आहे. यापैकी ५, ६७, ७३० जणांवार सध्या देशात उपचार सुरू आहेत. तर ११, ४५, ६३० जण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ३७, ३६४ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts