Wednesday, May 31, 2023
Home Blog Page 5854

PM मोदी म्हणाले, 'इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडत असेल'

0

नवी दिल्ली: सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ( ) पाहण्यासाठी आता गुजरातमधील केवडिया गावी जाणं सोपं होणार आहे. दिल्लीहून केवडियाला आता थेट ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया ( kevadia ) यांना देशाच्या विविध भागात जोडणार्‍या ८ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. तसेच पंतप्रधानांनी गुजरातमधील विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटनही केलं.

देशाच्या कानाकोपऱ्यातून एकाच ठिकाणासाठी अनेक रेल्वे गाड्यांना एकावेळी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असं घडतंय. केवडियाचे स्थान आहेही तेवढे मोठे आहे. कारण त्याची ओळख सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याने झाली. आहे. ज्यांनी एक भारत, श्रेष्ठ भारत हा मंत्र दिला. केवडिया रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे आदिवासी बांधवांचेही जीवन बदलणार आहे, असं म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी दाभोई-चांचोड गेज रूपांतरण, चांचोड-केवडिया गेज रूपांतरण नवनिर्मित प्रतापनगर-केवडिया विभाग विद्युतीकरणाच्या माध्यमातून तसेच दाभोई, चंचोड आणि केवडिया स्थानकांच्या नवीन इमारतींचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं.

एमजी रामचंद्रन यांची आठवण

पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करत श्रद्धांजली वाहिली. आम्ही एमजीआरचे आदर्श पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज केवडियाकडे जाणाऱ्या गाड्यांपैकी एक गाडी पुरैच्ची तलैवर डॉ. एम.जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानकातूनही रवाना होत आहे. योगायोगाने आज भारतरत्न एम.जी. रामचंद्रन यांची जयंती आहे, असं मोदी म्हणाले.

अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

गुजरातमधील रेल्वे संबंधित प्रकल्पांच्या उद्घाटनास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही उपस्थिती लावली. या रेल्वे स्थानकांमध्ये स्थानिक वैशिष्ट्ये आणि आधुनिक प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. केवडियाला हे देशातील पहिले स्टेशन आहे ज्याला हरित इमारतीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

या ठिकाणांहून गाड्या सुटणार

या आठ गाड्या केवडियाला वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरला जोडतील. या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात मोठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला स्थान मिळेल. तसेच केवडिया हे रेल्वे मार्गाने जोडले गेल्याने पर्यटक कोणत्याही अडचणीशिवाय देशभरातून इथं पोहोचू शकतील.

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहणे सोपं होईल

रेल्वे गाड्यांमुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अन्य शहरांतील नागरिक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणं सोपं होईल. केवडियाला आतापर्यंत एकही थेट ट्रेन नव्हती. पर्यटकांना बडोद्याला उतरून रस्त्याने जावं लागायचं. प्रवाशांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवरून यासाठी तिकिट बुक करता येईल.

या स्थानकांवरून ट्रेन सुटेल

वाराणसी, दादर, दिल्ली, अहमदाबाद, रीवा आणि चेन्नई स्थानकांवरून केवडियासाठी एक्सप्रेस गाड्या रवाना होतील. अहमदाबाद-केवडिया जन शताब्दी ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच देखील असेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ट्रेनचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवण्याचा या मागचा उद्देश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बर्ड फ्लूची धास्ती! सावजी भोजनालयांतून चिकन गायब

0

नागपूरः गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या बर्ड फ्लूच्या बातम्यांचा परिणाम शहरातील सावजी भोजनालयांवर झाला असून, काहींनी चिकन ठेवणेच बंद केले आहे, तर काही दुकानात एखाद – दुसरा ग्राहकच चिकनची मागणी करीत आहे.

करोनाची दहशत अजून पुरती सरलेली नसतानाच आता बर्ड फ्लूचे आगमन होत आहे. विदर्भात काही ठिकाणी मोर, कोंबड्या, कावळे असे पक्षी मोठ्या प्रमाणात मृत पावले आहेत. यवतमाळ व गडचिरोली येथे तर पक्ष्यांना फ्लूची लागण झाल्याचे अहवाल प्रयोगशाळेतून आले आहेत. या बातम्यांचा परिणाम शहरातील सावजी भोजनालयांमध्ये तसेच विविध विविध हॉटेल्समधील चिकन करीच्या व्यवसायावर झाला आहे.

नागपूर शहर सावजी भोजनालयासाठी प्रसिद्ध आहे. या भोजनालयांमध्ये ब्रॉयरलसहच गावराणी आणि कातीचा कोंबडाही मिळतो. गावराणी, कातीचा कोंबडा यांच्या चिकनचे दरही जास्त असतात. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने सावजी भोजनालयांकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जुनी मंगळवारी येथील प्रभू सावजी भोजनालयाचे प्रभू कुंभारे म्हणाले की, आमच्याकडे फक्त गावराणी कोंबडीचे चिकन मिळते. बर्ड फ्लूची लागण ब्रॉयलर कोबंड्यांना होण्याची भीती असते. त्यामुळे काही ग्राहक येतात, पण मागणी अगदीच कमी आहे. इतरवेळी दररोज १० ते १२ किलो चिकन भोजनालयात लागायचे मात्र आता आता दिवसभरात २ किलोही चिकन संपत नाही, अशी स्थिती आहे. चिकनची मागणी कमी झाल्याने मटनची मागणी वाढेल असे वाटले होते पण बऱ्याच ग्राहकांनी सध्या मांसाहारच वर्ज्य केला आहे. त्यामुळे सध्या ‘श्रावण’ महिन्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहर करीत नाहीत. त्यामुळे ग्राहकी कमी असते, सध्या तोच अनुभव येत आहे.

चिकनसहच अंड्यांनाही मागणी उरलेली नाही. वास्तविक चिकन ज्या तापमानावर शिजविले जाते, त्या तापमानावर कोणताही विषाणू जिवंत राहू शकत नाही. मात्र लोकांमध्ये भीती असल्याने लोक सावजी भोजनालयांमध्ये यायला तयार नाही व आमचा व्यवसाय ५० टक्क्यांवर आला असल्याचे कुंभारे यांनी सांगितले.

बेसा येथील पवनीकर सावजी भोजनालयाचे अजय पवनीकर म्हणाले की, लोकांमध्ये असलेली फ्लूची भीती पाहता आम्ही चिकन ठेवणेच बंद केले आहे. कारण आणलेला माल तसाच पडून राहतो. मात्र अंडाकरी विकणे सुरू आहे. नेहमी चिकन खाणाऱ्यांना चिकनच पाहिजे असते. मटनाला त्यांची फार पसंती नसते. त्यामुळे धंद्यावर निश्चित परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व परिस्थीतमुळे सावजी भोजनालये, रस्त्यावरील चिकन बिर्याणीची दुकाने यांच्या व्यवसायातून कोंबडी पळाल्याचा अनुभव शहरात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे शांत होताच थोरातांपुढे नवे संकट!

0

नगर: प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे शांत होतात न होतात तोच प्रदेशाध्यक्ष यांच्याविरोधात त्यांच्याच नगर जिल्ह्यातील नाराज कार्यकर्त्यांनी बंड पुकारले आहे. पक्षाच्या नगर शहराध्यक्षपदाच्या वादातून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थोरात यांच्यासह त्यांचे भाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार डॉ. यांच्याविरोधात थेट दिल्ली दरबारी तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे. जुन्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ( Update )

वाचा:

काँग्रेसचे नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी मनोज गुंदेचा यांची नियुक्ती केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रदेशाध्यक्ष थोरातांच्या मान्यतेने ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. त्यावरून वाद पेटला आहे. भुजबळ यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, निखिल वारे, चिटणीस मुकुंद लखापती, रजनी ताठे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे, सुभाष रणदिवे, अज्जू शेख, अभिजित कांबळे, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, बाळासाहेब पवार बैठकीला उपस्थित होते.

वाचा:

भुजबळ यांना हटविण्यामागे तांबे यांचे व्यक्तीद्वेषाचे राजकारण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सत्यजीत तांबे पूर्वी नगर शहर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून व्यक्तीद्वेषाचे राजकारण करीत आहेत. त्यांच्या विरोधात निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा ते द्वेष करीत आहेत. त्यातूनच पक्षातील लोकांनाही याचा फटका बसत आहे. शिवसेनेशी जवळीक असलेल्यांनाही पदे मिळत आहेत. मात्र, पूर्वीपासून निष्ठेने काम केलेल्यांना दूर केले जात आहे. तांबे पित्रा-पुत्र स्वत: गटबाजी करीत असून त्याचा इतरांवर ठपका ठेवला जात आहे. ही गोष्ट निष्ठापूर्वक काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना रुचलेली नाही, त्यामुळे यासंबंधी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घ्यायची. वेळ पडल्यास दिल्लीतील पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करायची, असे या बैठकीत ठरविण्यात आले. नव्याने करण्यात आलेले बदल आणि यामागील वृत्तीला विरोध कायम ठेवत शहरात पक्षासाठी काम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मला मरणाची भीती नाही!; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान

0

नगर: ‘करोनावर लस आली ही खूप चांगली गोष्ट आहे. मला मरणाची भीती नाही, तरीही लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी मी स्वत: लस टोचून घेणार आहे,’ अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक यांनी दिली. ‘समाजातील मुख्य माणसांनी पहिला डोस घेतला पाहिजे, त्यामुळे लोकांच्या मनातील भीती जाईल. इतरांची टोचून झाल्यावर काय होते ते पाहून आपण लस घेऊ, असे चालणार नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांचा हा निशाणा कोणाकडे आहे, याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. ( )

वाचा:

मोठ्या प्रतीक्षेनंतर करोनावरील लस आली आहे. पहिल्या टप्प्यातील सुरू झाले आहे. त्याबद्दल अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले. आता आमच्या देशातील करोनाचा नायनाट व्हावा, अशी इश्वराकडे प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले. लोकांना लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी तुम्ही लस घेणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता हजारे म्हणाले, ‘होय घेणार. का नाही घ्यावी? वैयक्तिक मला मरणाची भीती वाटत नाही. मात्र, समाजाचे मुख्य म्हणून पुढे चालणारी जी माणसे आहेत, त्यांनी पहिला डोस घेतला पाहिजे. आधी वाट पहात बसायचे आणि लस आल्यावर ती इतरांना घेऊ द्यायची आणि यशस्वी झाल्यावर आपण घ्यायची याला काही अर्थ नाही.’

वाचा:

‘गेल्या आठ-नऊ महिन्यांत करोनाने आपल्या देशात धुमाकूळ घातला. अनेकांना प्राण गमवावे लागले. आज जे सुरू झाले ते महत्त्वाचे आहे. लसीमुळे लोकांच्या मनात संसर्गाची भीती राहणार नाही. जगातील अनेक देशांत करोनामुळे जास्त बळी गेले. त्या मानाने भारतात बळींची संख्या कमी आहे. ही ईश्वराचीच कृपा म्हणावी लागेल. आता लसीकरण सुरू झाले. टप्प्याटप्प्याने ती सर्वांना मिळेल. लसीकरणाचे परिणाम दोन महिन्यांत दिसतील. या लसीमुळे आपल्याला करोनाचा नायनाट करता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारे लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यांच्यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होईल. सरकारचा हा विचार महत्त्वाचा आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की या लसीला यश मिळावे व आमच्या देशातील करोना नाहीसा व्हावा’, असेही अण्णांनी पुढे नमूद केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

नामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले

0

मुंबईः औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना व काँग्रेस नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एक खरमरीत पत्र लिहीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालविकास मंत्री यांनीही एक ट्विट करत शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

सामनातील एका लेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. संजय राऊतांच्या या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात शिवसेनेला ठणकावलं आहे.

वाचाः

यशोमत ठाकूर यांनी एक ट्विट केलं आहे. तसंच, या ट्विटमध्ये संजय राऊत आणि शिवसेनेला टॅग केलं आहे. ‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहोत. काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही. आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यावर बोलता येईल,’ असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी पत्रात काय म्हटलंय?

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल थोरातांनी उपस्थित केला आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'तांडव'च्या निर्मात्याविरोधात राम कदमांची पोलिसात तक्रार; केली 'ही' मागणी

0

मुंबईः अभिनेता सैफ अली खानची अलीकडेच प्रदर्शित झालेली ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान करण्यात आल्याचे सांगत भाजप आमदार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तांडव वेबसिरीजची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळं हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच, निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे. यानंतर भाजपनंही या वेबसिरीजचा तीव्र विरोध केला असून राम कदम यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात तांडव वेबसिरीजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं असून या वेबसिरीजचा निर्माता, दिग्दर्शक आणि यात काम करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

दरम्यान, राम कदम यांनी एक ट्विटही केलं आहे. त्यात त्यांनी अभिनेता सैफ अलीखानवर देखील निशाणा साधला आहे. चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून कायमच हिंदू देवी देवतांचा अपमान केला जातो. अलिकडेचं उदाहरण घ्यायचं झालं तर नवीन वेबसिरीज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सिरीजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ते दृश्य हटवले पाहिजे, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

चर्चेत आलेल्या रेणू शर्माचं 'हे'आहे बॉलिवूड कनेक्शन

0

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार असून तिच्या घरी लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मानसीच्या घरी ग्रहमख पूजाही केली गेली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता.सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. मानसीच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले आहे.

सोशल मीडियावर प्रेमाची कबुलीकाही महिन्यांपूर्वी मानसीनं आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मानसीचा होणारा पती प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. त्यानं अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढंच नाही तर मध्ये मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ चा तो विजेता आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि पद्म पुरस्कार विजेते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन

0

मुंबई: प्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद यांचं आज निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. गुलाम मुस्तफा यांची सून नम्रता हिनं सोशल मीडियावर ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

‘जड अंत:करणानं हे सांगावं लागत आहे की, काही मिनिटांपूर्वीच माझे सासरे, आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आणि देशातील ज्येष्ठ, पद्मविभूषण यांनी अखेरचा श्वास घेतला’, असं नम्रता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च, १९३२ साली उत्तर प्रदेशाती बदायूं इथं झाला होता. उस्ताद गुलाम मुस्तफा शिष्यांच्या यादीत सोनू निगमसोबतच हरिहरन, शान, आशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, एआर रहमान आणि लता मंगेशकर यांच्या नावांचा समावेश आहे. सोनू निगमनं नुकताच उस्ताद गुलाम खान यांच्यासारखं गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजलीभारतीय शास्त्रीय संगीतातील रामपुर सहसवान घराण्याशी संबंध असलेले उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनावर लता मंगेशकर, एआर रहमान यांच्यासारख्या दिग्गजांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना १९९१ मध्ये पद्मश्री, २००६मध्ये पद्मभूषण आणि २०१८मध्ये पद्मविभूषणसारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Sindhudurg Airport: बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

0

सिंधुदुर्ग: पर्यटन जिल्हा म्हणून स्थान मिळवणाऱ्या जिल्ह्याचे विमानतळाचे स्वप्न अखेर पूर्णत्वास येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही ना काही कारणाने रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा येत्या २३ जानेवारी रोजी समारंभपूर्वक होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबतच भाजप नेते व माजी मुख्यमंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा सोहळा लक्षवेधी ठरणार आहे. ( Update )

वाचा:

चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी होईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, त्यात बदल करून हा सोहळा शिवसेनाप्रमुख दिवंगत यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर कोणते वाक्बाण सोडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर राणे आणि शिवसेना यांच्यात विस्तवही जात नाही. त्यात राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र सातत्याने ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे यांचा अनेकदा तोलही गेला आहे. उद्धव यांच्याकडूनही या टीकेला वेळोवेळी जशास तसे प्रत्युत्तर मिळालेले आहे. विशेष म्हणजे ज्या चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाला ठाकरे-राणे एका व्यासपीठावर येत आहेत त्यावरूनही बरंच वादंग उठलेलं आहे.

वाचा:

बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी

नारायण राणे यांचे पुत्र आमदार यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच केली होती. नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” असे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे ट्वीट नितेश यांनी केले होते. तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी त्यावर जोरदार शब्दांत तोफ डागली होती. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले त्याचवेळी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलेली आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही’, असे वैभव नाईक म्हणाले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

काँग्रेससाठी सामनाची भाषा का बदलली?, भाजपचा सवाल

0

मुंबईः औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा राज्यात गाजतोय. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे तर एकीकडे आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. यावरुनच भाजपनं सत्ताधारी पक्षाला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

सामनातील एका लेखात शिवसेना खासदार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. हाच धागा पकडत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी?, असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व्हावे यासाठी जनभावना स्पष्ट असतानाच सामनाची भाषा बदललेली दिसतेय. स्वतःच्या नेत्याचा अहंकार असेल तर भाषा असते उखाड दिया. पण राज्याच्या अस्मितेचा विषय असेल तेव्हा भाषा बदलते ती कोपऱ्यापासून दंडवत घालतो. आज कोपऱ्यापासून दंडवत घालतो म्हणणारे उखाड दियाची भाषा का करत नाहीत?, असा सवाल शेलार यांनी केला आहे. शिवाय, का केवळ सत्तेसाठी इतकी लाचारी? कुठे फेडाल ही पापं?, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी लेखात काय म्हटलंय?

‘औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात नव्हता. बाबरानं जे अयोध्येत केलं तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts