Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5857

IND vs AUS : फक्त चार बोटांनी बॅट पकडून का केली फलंदाजी, पुजाराने केला मोठा खुलासा

0

नवी दिल्ली, : ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयात भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजाराचाही मोलाचा वाटा आहे. पण या दौऱ्यातील फलंदाजीबाबत पुजाराने आज एक मोठा खुलासा केला आहे. आपण फक्त चार बोटांनी बॅट पकडून का फलंदाजी करत होतो, यावर पुजाराने प्रकाशझोत टाकला आहे.

पुजारा यावेळी म्हणाला की, ” संघाला माझ्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहे, हे मला चांगलेच माहिती असते. त्यामुळे मी त्यानुसारच फलंदाजी करत असतो. तुम्हाला फक्त तुमच्या तंत्रावर विश्वास असायला हवा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आमच्यासाठीही खडतर असाच होता. या दौऱ्यात माझ्यावर चार बोटांनी फलंदाजी करायचीही वेळ आली होती. ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती, पण ते करणे माझ्यासाठी भाग होते.”

पुजारा पुढे म्हणाला की, ” मेलबर्न येथे सराव करत असताना मला दुखापत झाली होती. त्यामुळे सिडनी आणि ब्रिस्बेन येथे फलंदाजी करणे माझ्यासाठी सोपेन नव्हते. कारण माझ्या हाताला वेदनाही होत होत्या. त्यावेळी बॅट पकडणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये मला पुन्हा एकदा दुखापत झाली. त्यामुळे माझ्या वेदनाही वाढल्या होत्या. त्यावेळी मला फक्त चार बोटांनीच बॅट पकडावी लागत होते, ही गोष्ट नक्कीच फार अवघड होती. पण ही गोष्ट मला करावी लागली, कारण त्यावाचून कोणताही पर्याय नव्हता.”

ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी पुजाराने ५६ धावांची दमदार खेळी साकारली आणि भारताचा पराभव होणार नाही, याची काळजी घेतली. यावेळी फलंदाजी करत असताना ११ चेंडू पुजाराच्या अंगावर आदळले. पण पुजाराने यावेळी हार मानली नाही. दुखापत गंभीर असली आणि वेदना जास्त होत असल्या तरी पुजाराने मैदान सोडले नाही. त्यावेळी जर पुजाराने मैदान सोडले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक आक्रमक झाला असता. पण पुजाराने मैदान न सोडता खेळपट्टीवर उभा राहण्याचा निर्णय घेतला. पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मस्तच! एअरटेलची 'या' शहरात 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी

0

मुंबई: भारती एअरटेलने भारताचा प्रमुख संप्रेषण समाधान प्रदाताने, हैदराबाद शहरातील व्यावसायिक नेटवर्कवर लाइव्ह 5 जी सेवा यशस्वीरित्या प्रदर्शन आणि आयोजित करणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे

वाचाः

एअरटेल १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे आपल्या विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमचे प्रसारण करते. डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरींगचा वापर करून, एअरटेलने एकाच स्पेक्ट्रम ब्लॉकमध्ये एकाच वेळी 5G आणि 4G ऑपरेट केले. या कामगिरीने एअरटेलच्या नेटवर्कच्या सर्व डोमेन रेडिओ, कोर आणि ट्रान्सपोर्टच्या नेटवर्कच्या 5G सशक्त रूपने मान्य केले आहे.

वाचाः

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत एअरटेल 5 जी 10x स्पीड,10x लेटन्सी आणि 100 एक्स कॉन्कुरन्सी वितरीत करण्यास सक्षम आहे. उल्लेखनीय म्हणजे, हैदराबादमध्ये, वापरकर्त्यांना 5 जी फोनवर काही सेकंदात एक संपूर्ण चित्रपट डाउनलोड करण्यास सक्षम केले. या कामगिरीने कंपनीच्या तांत्रिक क्षमता अधोरेखित केल्या. तथापि, 5 जी अनुभवाचा संपूर्ण परिणाम आमच्या ग्राहकांना तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा पुरेसे स्पेक्ट्रम उपलब्ध असेल आणि सरकारची मंजूरी मिळेल.

वाचाः

भारती एअरटेलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल म्हणाले की, “आज हैदराबादच्या टेक सिटीमध्ये ही अतुलनीय क्षमता दर्शविण्यासाठी अथक परिश्रम केलेल्या आमच्या अभियंत्यांचा मला अभिमान आहे. भविष्यातील आमच्या प्रत्येक गुंतवणूकीचे प्रमाणित केले जाईल.” हैदराबाद मधील हा गेम चेंजिंग टेस्ट ठरला आहे.
एअरटेल ही क्षमता दर्शविणारे पहिले ऑपरेटर बनले आहे. आणि याद्वारे आम्ही हे पुन्हा दर्शविले आहे की भारतातील सर्वत्र भारतीयांना सक्षम बनवण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्ही नवीन तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर आहोत.

वाचाः

गोपाळ विठ्ठल असेही म्हणाले की, “आमचा विश्वास आहे की 5 जी इनोव्हेशनसाठी भारतामध्ये जागतिक केंद्र बनण्याची क्षमता आहे. हे करण्यासाठी आम्हाला एप्लिकेशन, डिवाइस आणि नेटवर्क इनोव्हेशन एकत्र आणण्यासाठी इकोसिस्टमची आवश्यकता आहे. आम्ही आता बाजूने योगदान देण्यास तयार आहोत

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'भेंडीबाजार म्हटले की 'सिल्व्हर ओक'ला, बेहरामपाडा म्हटले की 'मातोश्रीला' त्रास होतो'

0

मुंबई: शेतकरी आंदोलनावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असून भारतीय जनता पक्षाचे नेते (Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Sharad Pawar) आणि (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो, अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशीष शेलार यांनी निशाणा साधला आहे. सिल्व्हर ओकहे शरद पवार यांचे मंबईतील निवासस्थान असून मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. ( crtiticizes and )

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या लेखाजोखा या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी भाजपचे आमदार आशीष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील महिला कशा असा सवाल करत आंदोलनाला संबोधित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला होता. त्यावर दरेकर यांच्या वक्तव्याची आपल्याला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. याचा उल्लेख दरेकर यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केला.


शरद पवारांना भेंडीबाजार झोंबले’
दरेकर आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राचे जाणते नेते असे म्हटले की मला वाईट वाटते म्हणे… मीही आधी विरोधी पक्षनेता होतो म्हणे… मी शरद पवार यांना पत्रं पाठवलं. आता लेखाजोखा पाठवतोय. आता ते तरी बघून माझी लाज वाटणार नाही. हे पाहून तरी त्यांनी असंच खुल्या दिलाने कौतुक करावे. शरद पवार यांना फक्त भेंडीबाजार झोंबले.

क्लिक करा आणि वाचा-

‘दरेकरांनी काढला लेखाजोखा, पण त्यांचे माझ्या लेकाला जपा’
दरेकर यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून आशीष शेलार यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शेलार आपल्या भाषणात म्हणाले, ‘जनतेसाठी काम करणाराच जनतेसमोर त्या कामांची मांडणी अगदी ठासून करू शकतो. प्रविण दरेकरांनी आता अधिक वेळ विरोधी पक्षनेते राहू नये इतकीच इच्छा. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कृष्ण आहेत. आता सुदर्शन चक्र काढावेच लागेल. ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातून काढा असे म्हणत पुढे शेलारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो. ‘दरेकरांनी काढला लेखाजोखा, पण त्यांचे आपले अजूनही तेच माझ्या लेकाला जपा’, अशा शब्दांत शेलार यांनी ठाकरे कुटुंबावरही जोरदार निशाणा साधला.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

IPL 2021: मुंबई इंडियन्सचे नागालँड कनेक्शन; या खेळाडूला ट्रायलसाठी बोलवले

0

मुंबई: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ()ने आता २०२१च्या म्हणजेच १४व्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या १३ पैकी सर्वाधिक ५ हंगामाचे मुंबईने विजेतेपद मिळवले आहे. मुंबई संघाच्या या यशा मागे संघातील खेळाडू ही घरी ताकद आहे. नव्या युवा खेळाडूंना मुंबई संघ नेहमीच प्रोत्साहन देत असते.

वाचा-

आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबई इंडियन्सने अशाच एका नव्या खेळाडूला संधी देण्याचे ठरवले आहे. नागालँडच्या याला मुंबई संघाने ट्रायलसाठी निवडले आहे. या शिवाय अन्य खेळाडूंचे मुंबई संघ ट्रायल घेणार आहे.

वाचा-

केंस हा राज्यातील पहिला खेळाडू आहे ज्याने आयपीएलच्या एखाद्या संघाला आकर्षित केले आहे. १६ वर्षीय फिरकीपटू असलेल्या केंसने सैय्यन मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केंसने मुश्ताक अली स्पर्धेतून पदार्पण केले. त्याने चार सामन्यात सात विकेट घेतल्या. पण त्याच्या कामगिरीचा संघाला फायदा झाला नाही. नागालँडने चारही लढती गमावल्या.

वाचा-

केंसने १२च्या सरासरीने गोलंदाजी केली. मिझोराम विरुद्ध त्याने १६ धावा ३ विकेट घेतल्या होत्या. यात त्याची सरासरी ५.४७ होती. मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्यांनी या युवा खेळाडूशी संपर्क केला.

वाचा-

नागालँडच्या एका छोट्या गावातून येणाऱ्या केंससाठी ही मोठी गोष्ट आहे. मुश्ताक अली स्पर्धेत खेळल्यामुळे तो आयपीएलच्या लिलावासाठी देखील उपलब्ध झाला आहे. मुंबई इंडियन्स या युवा खेळाडूवर बोली लावू शकते.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राज्यातील सूतगिरण्यांना घरघर; बड्या राजकीय नेत्यांना दणका

0

कोल्हापूर: मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या राज्यातील बहुतांशी सूतगिरण्यांना (Spinning Mills) सध्या कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मोजक्या वगळता इतर सर्वच तोट्यात गेल्याने आणि त्याला मंदीचा () आणखी फटका बसत असल्याने हा उद्योग मोठ्या प्रमाणात संकटात आला आहे. त्याला पुन्हा उर्जितावस्था येण्यासाठी हा उदयोग केंद्र सरकारकडून अनुदान मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. (the in the state is in crisis)

पाच वर्षापूर्वी राज्यात १९० सूतगिरण्या होत्या. पण दरवर्षी काही गिरण्या बंद पडत असल्याने ही संख्या सध्या दीडशेपर्यंत पोहोचली आहे. सध्या तर केवळ ६४ गिरण्या सुरू असून त्यातीलही काही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. रोज १५ लाख चात्यांच्या माध्यमातून तीन हजार कोटी रूपयांची सूत तयार होत असून तेथे राज्यात चाळीस हजार कामगार थेट काम करत आहेत.

इतर राज्याच्या तुलनेत वाढलेले वीजेचे दर, काही गिरण्यांना उभारणीसाठी लागलेला वेळ, त्यातून वाढलेला खर्च, सलग चार ते पाच वर्षे आलेली , भाग भांडवलची कमतरता यामुळे या गिरण्यांना आर्थिक घरघर लागली आहे. या उद्योगात सध्या अनेक राजकीय नेते आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सुनिल केदार, विजयसिंह मोहिते, जयवंतराव आवळे, रोहिदास पाटील, अमित देशमुख,गणपतराव देशमुख, आमदार पी.एन. पाटील, विनय कोरे, प्रकाश आवाडे असे अनेक दिग्गज या क्षेत्रात आहेत. तरीही राज्य सरकार मदत करत नसल्याची तक्रार आहे.

ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस, कोरोना आणि इतर काही कारणाने दोन वर्षे या गिरण्यांना फार मोठा आर्थिक फटका बसला. कापूस चांगला नसल्याने निर्यातीवर परिणाम झाला. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांशी सूतगिरण्यांना फार मोठा फटका बसला. सहकारी साखर कारखान्यांच्या पाठोपाठ राजकीय नेत्यांची मोठी गुंतवणूक या उद्योगात आहे. त्यामुळे खासगी आणि सहकारी या दोन्ही सूतगिरण्या सुरू राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याला राज्य व केंद्र सरकारकडून मदतीचा हात मिळत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात एकूण ११४ सूतगिरण्या असून त्यांपैकी ४६ सूतगिरण्या खासगी आहेत. यांपैकी एकूण ६४ सूतगिरण्या सुरू आहेत. तसेच राज्यातील यंत्रमागांची संख्या १४ लाख इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज ठाकरेंवरील वॉरंट रद्द; पण 'या' कारणासाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

0

नवी मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना ६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायाधीश बडे यांच्या दालनात झालेल्या सुनावणीनंतर या आदेश देण्यात आले आहेत.

कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २०१४मध्ये वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यावेळी राज ठाकरेंसह अन्य सहा कार्यकर्त्यांवर ३० जानेवारी २०१४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी राज ठाकरेंना २०१८ व २०२०मध्ये समन्स आणि वॉरंट जारी करण्यात आलं होतं. आज न्यायालयानं ते वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. मात्र, ६ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१४मध्ये राज ठाकरेंनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत टोलनाक्यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. २६ जानेवारी २०१४ रोजी राज ठाकरेंनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रेक्षोभक भाषण केलं होतं. राज ठाकरेंच्या याच भाषणाबाबत गजानन काळे आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचाः

दरम्यान, राज ठाकरेंवरील वॉरंट वाशी न्यायालयानं रद्द केले आहेत. मात्र, ६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. जामीन न घेतल्यानं कोर्टानं तसे आदेश दिल्याचं सांगण्यात येतं आहे.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

एकनाथ खडसेंना ३ फेब्रुवारीपर्यंत दिलासा, ईडीची कोर्टात हमी

0

मुंबई: भोसरी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Eknath Khadse) यांना ३ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम संरक्षण कायम राहिल्याने पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आज मुंबई हायकोर्टाने () खडसेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. तोपर्यंत ईडीने () कठोर कारवाई करणार नसल्याची आपली हमी कायम ठेवली आहे. (senior ncp leader has been given interim protection till february 3)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जानेवारीला होत असून तो पर्यंत खडसे यांना अटक करणार नाही, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वकिलांनी मुंबई हायकोर्टात दिली होती. यामुळे एकनाथ खडसे यांना २८ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला होता. मात्र, आजही या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने खडसेंना ३ फेब्रुवारीपर्यंच दिलासा मिळाला आहे.

ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी खडसे यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होत आहे.

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांना समन धाडले होते. समन धाडतानाच ईडीने खडसेंना काही प्रश्न देखील विचारले होते. आपल्याला समन मिळाले नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. समन मिळाल्यानंतरच आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, असे खडसेंनी सांगितले होते.

क्लिक करा आणि वाचा-
ऑक्टोबर २०२० मध्ये एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. जर आपल्यामागे कोणी ईडी लावली तर मी सीडी लावेन असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यानंतर मात्र अजूनही खडसे यांनी सीडीचा उल्लेख केलेला नाही.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अल्पवयीन मुलीसमोर पँटची झीप उघडणे लैंगिक गुन्हा नाही: हायकोर्ट

0

नागपूरः अल्पवयीन मुलीचा हात पकडणे व आरोपीने त्याच्या पँटची झीप अघडणे पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार ठरु शकत नाही, असा निकाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.

यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या छातीला थेट स्पर्श (स्कीन टू स्कीन) न झाल्याने संबंधित आरोपीला ‘पॉक्सो’ कायद्यातून मुक्त करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूर खंडपीठानं वादग्रस्त निर्णय दिला आहे.

मुंबई हायकोर्टाच्या नागपुर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीचा हात पकडणे व आरोपीने त्याच्या पँटची झीप उघडणे पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार होत नाही, त्यामुळे आरोपीला केवळ विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते, असं महत्त्वाच निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.

वाचाः

सत्र न्यायालयाने या प्रकरणात ५० वर्षीय आरोपीला दोषी ठरवत सहा महिन्यांची शिक्षा व २५ हजारांचा दंड ठोठावला होता. या निर्णयाला आरोपीनं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर न्यायमूर्ती गनेडीवाला यांनी सत्र न्यायालयाचा निर्णय बदलून या प्रकरणात भारतीय दंडविधान ३५२ अ अंतर्गंत लैंगिक छळाची शिक्षा होऊ शकते असं म्हटलं आहे. तसंच, लैंगिक छळ कायद्यांतर्गत जास्तीत जास्त तीन वर्षाची शिक्षा देता येऊ शकते असं नमूद करत आरोपीनं आधीच पाच महिन्यांची शिक्षा भोगली आहे आणि ती या गुन्ह्यासाठी पुरेशी आहे, असं म्हटलं आहे.

वाचाः वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे निधन

0

पुणे: प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले (Shankar sarda passes away). ते ८३ वर्षांचे होते. पार्किन्सन या आजाराने त्यांना गेल्या काही वर्षांपासून ग्रासले होते. सारडा यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्र दान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ( and shankar sarda passes away)

चार सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वरमध्ये जन्मलेले सारडा हे पत्रकार, समीक्षक आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध होते. किशोरवयापासूनच त्यांचं लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती.

महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साधना, दैनिक देशदूत, लोकमित्र पुरवणी, लोकमत रविवार पुरवणी, ग्रंथजगत अशा विविध वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. विशेषतः महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीतून सारडा यांनी ‘चक्र,’ ‘माहीमची खाडी,’ ‘वासुनाका’ अशा पुस्तकांवर लिहिलेला विस्तृत लेख आणि इतरही महत्त्वाच्या कविता-कादंबऱ्यांची केलेली परीक्षणं गाजली होती. ‘मटा’ सुरू झाल्यानंतर त्याचं रूप घडवण्यात संपादक द्वा. भ. कर्णिकांना सारडा यांची चांगलीच साथ लाभली होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात सदानंद रेगे, वसंत बापट, वा. ल. कुलकर्णी यांच्यासारख्यांना ‘मटा’शी जोडण्याचं महत्त्वाचं काम केलं होतं.

त्यांनी ६०हून अधिक पुस्तकं लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांचं समीक्षण केलं आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. त्यांनी १९५०पासून सातत्यानं बालसाहित्य लिहिलं आहे.

क्लिक करा आणि वाचा-
झिपऱ्या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्टसेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Narayan Rane vs Vinayak Raut: नारायण राणे आणि विनायक राऊत भिडले!; सिंधुदुर्गात भर बैठकीत 'धुमशान'

0

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे नेते आणि राणे कुटुंबीयांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. या लढाईत हा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भाजपचे राज्यसभा सदस्य आणि खासदार यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली. ( )

वाचा:

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला स्थानिक खासदार विनायक राऊत, नारायण राणे, आमदार , वैभव नाईक व अन्य प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत भाजपचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्यावरून आपली भूमिका मांडली. त्यावर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. यात मग विनायक राऊत आणि नारायण राणे या दोघांनीही उडी घेतल्याने वादाची ठिणगी पडली.

वाचा:

नारायण राणे आपल्या जागेवरून उठले. पाठोपाठ नितेश राणेही उभे राहिले आणि विनायक राऊत यांच्याशी त्यांनी जोरदार वाद घातला. राणे बोटाने इशारा करत राऊत यांना सुनावत होते. कालवा फुटल्यानंतर तिथे अधिकारी वेळेत पोहचले नाहीत, असा मूळ आक्षेप होता. त्यात राणे यांनी काही जिल्हा परिषद सदस्यांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद अधिक चिघळला. विनायक राऊत हेसुद्धा जागेवरून उभे राहिले व त्यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोघांच्या समर्थकांनीही सभागृहात गदारोळ सुरू केला. तणाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन मग पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप केला व सर्वांना शांतता बाळगण्याची विनंती केली. तिलारी धरणाचा जो कालवा फुटला आहे त्याबाबत संबंधित विभागाची बैठक घेतली जाईल व प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. त्यानंतर वातावरण निवळले.

वाचा:

दरम्यान, नारायण राणे व त्यांचे दोन पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि राणे कुटुंबातील सदस्यांमध्ये गेले काही दिवस सातत्याने खटके उडत आहेत. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणांतून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. ही लढाई आज भर बैठकीत पाहायला मिळाली असून या राड्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

Latest posts