Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5858

ठाणेनंतर 'या' शहरात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत वाढ

5

नवी मुंबईः राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी अजूनही करोनाचा प्रसार थांबलेला नाहीये. मुंबईतील करोना रुग्णसंख्या अटोक्यात आली असली तरी मुंबईलगतच्या क्षेत्रात रुग्णवाढ कायम आहे. ठाणे महापालिकेनं लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता नवी मुंबई महापालिका प्रशासनानं लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या ४४ हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रांत लॉकडाउन कायम राहणार आहे.

कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी नियमित व्यवहार सुरु राहणार आहेत. असा आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जारी केला आहे. राज्य शासनाने जाहीर करण्यात आल्याप्रमाणे मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्समधील दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळीपर्यंत समविषम पद्धतीनं दुकानं सुरू राहणार आहेत. मात्र, मॉलमधील उपहारगृह व चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत ३९८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५,३८५ इतकी झाली आहे. तर त्याचबरोबर शहरात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत शहरात एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ४१८ इतकी झाली आहे. तर २४९ रुग्णांनी करोनावर मात केली असून एकूण बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या १०,३६५ इतकी झाली आहे. अजून २८२ व्यक्तींचा करोना अहवाल येणे प्रलंबित आहे. आज एकूण २३४७ इतक्या अँटीजेन चाचणी करण्यात आल्या असून आत्तापर्यंत एकूण १६,३२० इतक्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर वाशी येथील प्रदर्शन केंद्रातील करोना केंद्रात ६८५ रुग्ण उपचार घेत असून पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १२४ इतकी आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज्यात सरकारचे स्टेअरिंग कुणाकडे?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

5

मुंबई: ‘कार आणि सरकार दोन्ही चांगल्याप्रकारे सुरू आहेत. मी कारही चालवतोय आणि सरकारही चालवतो आहे’, असे नेमके विधान करत मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांनी तीन पक्षांच्या सरकारचं स्टेअरिंग कुणाकडे, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ( CM On Government )

महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती आहे?, ड्रायव्हर सीटवर कोण बसलं आहे? सरकारला दिशा कोण दाखवतो आहे, असे अनेक प्रश्न गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. त्यात विरोधी पक्षनेते यांनी आजच या सरकारला ‘लीव्ह इन रिलेशनशीप’चंही लेबल लावलं. हे सरकार चालतच नाहीय. हे सरकार अंतर्विरोधातूनच कोसळेल आणि त्यानंतर आम्ही सक्षम पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले. या अनुशंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारले असता त्यांनी विरोधकांच्या दाव्यांची खिल्ली उडवली.

वाचा:

‘ठाकरे-पवार पॅटर्न तर राज्यात तुम्ही पाहतच आहात. तो अस्तित्वात आलाच आहे. महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे व समान किमान कार्यक्रमावर हे सरकार चाललं आहे. आम्ही तिन्ही पक्ष भीन्न विचारांचे आहोत, याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्याबाबत गोंधळ असण्याचं कारणच नाही. त्या सगळ्याचा विचार करूनच आम्ही एकत्र आलो आहोत आणि राज्याच्या हितासाठी यापुढेही एकत्र राहणार आहोत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढणार का, याचा विचार आता करण्याची गरज नाही. राज्यात निवडणुकीला अजून खूप वेळ आहे. कुणी काहीही म्हटलं तरी इतक्यात निवडणुका होणार नाहीत, असं सांगत सरकारला कोणताही धोका नसल्याचेच उद्धव यांनी स्पष्ट केले.

वाचा:

केवळ जनतेच्या काळजीपोटी लॉकडाऊन

करोनाचा प्रादुर्भाव किती आहे, त्यावर लॉकडाऊनचा निर्णय अवलंबून आहे. या टप्प्यात आपण खेळ ओपन केले आहेत. सगळं काही लवकरच सर्व पूर्ववत व्हावं, असं आम्हालाही वाटतं मात्र, येथे फक्त लॉकडाऊनचा नाही तर आयुष्याचा प्रश्न आहे. अर्ध वर्ष असंच निघून गेलं आहे. एकप्रकारे २०२० हे वर्ष डीलिट झाल्यासारखीच स्थिती आहे. तूर्त तरी या साथीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. गाफिलपणा, बेपर्वाई दाखवली तर हा विषाणू घात करेल. या साथीवर आजतरी कुणाकडेही उत्तर नाही. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. लॉकाडाऊन वाढवायला, तुम्हाला डांबून ठेवायला मला अजिबात आनंद होत नाही. केवळ तुमच्या काळजीपोटी मनाविरुद्ध जाऊन मला या गोष्टी कराव्या लागत आहेत. तेव्हा कृपा करा आणि सहकार्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राजस्थानचा गेम पलटला; गहलोत गटाचे ११ आमदार बेपत्ता

5

जयपूर: राजस्थानमधील राजकीय संकटनाट्याला () दररोज नवे वळत मिळत आहे. आज शुक्रवारी मुख्यमंत्री यांनी आपल्या गटातील आमदारांना जयपूरहून जैसलमेरला हलवले. मात्र, या प्रवासादरम्यान गहलोत गटातील ११ आमदार बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गहलोत सरकारमधील ६ मंत्री आणि ५ आमदार आतापर्यंत जैसलमेरला पोहोचलेले नाहीत. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ( and five mlas of camp did not reach )

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरहून जैसलमेरला न पोहोचणाऱ्या मंत्री आणि आमदारांमध्ये परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावाल, आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा, क्रीडा मंत्री चांदना, कृषी मंत्री लालचन्द कटारिया, आरोग्य राज्यमंत्री सुभाष गर्ग, सहकार मंत्री उदयलाल आंजना, आमदार जगदीश जांगिड, आमदार अमित चाचाण, आमदार परसराम मोरदिया, आमदार बाबूलाल बैरवा आणि आमदार बलवान पूनिया यांचा समावेश आहे. हे मंत्री आणि आमदार अजूनही जैसलमेरला पोहोचलेले नाहीत.

वाचा:

आमदारांवर बाहेरून दबाव टाकला जात होता- गहलोत

गेल्या अनेक दिवसांपासून जयपूरमध्ये असलेल्या आमच्या आमदारांना मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात होता, असे मुख्यमंत्री गहलोत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. इतकेच नाही, तर आमदारांच्या कुटुबीयांवर देखील दबाव टाकला जात होता, असेही गहलोत म्हणाले. हा बाहेरून येत असलेला दबाव दूर व्हावा म्हणूनच आपण आमदारांना जयपूरहून जैसलमेरला हलवण्याचा विचार केला आणि हलवले सुद्धा असे सांगतानाच लोकशाही वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे गहलोत पुढे म्हणाले.

वाचा:

गहलोत यांचा भाजपवर निशाणा
या आमदारांना जैसलमेरला हलवण्यापूर्वी बहुजन समाज पक्षाच्या ६ आमदारांचे काँग्रेसपक्षात प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षाने तेलुगु देसम पक्षाच्या ४ खासदारांना राज्यसभेत रातोरात भाजपत घेतले. ते कृत्य चांगले आणि राजस्थानात जर ६ आमदार पक्षात आले असतील तर ते चुकीचे आहे, तर मग भाजपचे चरित्र कुठे गेले?, असा प्रश्न गहलोत यांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचायला हवी अशी बातमी:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भयंकर! बेपत्ता करोनारुग्णाचा मृतदेह आढळला विहिरीत

5

वाशिमः रुग्णालयातून पळालेल्या करोनाबाधित रुग्णांचा मृतदेह विहरीत सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे. वाशिममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून रुग्णालयातून करोनाबाधित रुग्ण गायब झालाच कसा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

२९ जुलैला रुग्णालयातून करोनाबाधित रुग्णानं पळ काढला. बऱ्याच ठिकाणी शोधा शोध करूनही रुग्णांचा काहीच तसाप लागत नव्हता. अखेर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबर ट्रेस केला. मोबाईल वरून रुग्णाचा ठावठिकाणा शोधून काढल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एका विहिरीच्या बाजूला त्याचा फोन व त्याचे सामान सापडले.

वाचाः

पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून विहिरीलगत सापडलेल्या वस्तूंची ओळख पटवून घेतली. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अधिक शोधाशोध केल्यानंतर विहरीत मृतदेह असल्याचं आढळून आलं. या रुग्णानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वाचाः

याआधीही कोव्हिड केअर सेंटरमधून अनेक रुग्ण बेपत्ता झाल्याचं उदाहरण समोर आली होती. तर, करोनाला घाबरुन अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडत आहे. करोनाबद्दल लोकांच्या मनात असलेल्या भीतीमुळं हे प्रकार घडत असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, करोनावर योग्य उपचार घेतल्यास बराही होऊ शकतो, असं वेळोवेळी प्रशासनाकडून सांगण्यातही येत आहे. तरी सुद्धा अजूनही काही भागांत करोनाबद्दलची भिती मनात बाळगली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

लॉकडाऊन सातत्याने वाढवणं योग्य नाही: नितीन गडकरी

0

मुंबईः करोनाचे संकट जरी असले तरी सतत ठेवणं बंद केलं पाहजे. आज लॉकडाऊनमुळं अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. असं परखड मत केंद्रीय मंत्री यांनी मांडलं आहे.

करोनाचे संकट आज भारतासह संपूर्ण जगावर ओढावलं आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. करोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टनसिंग, हात धुणे, मास्क लावणे हे उपाय योजून वावरावं लागेल. करोनासोबत आता जगावं शिकावं लागणार आहे. मात्र, सततचा लॉकडाऊन हा काही प्रभावी उपाय नाही. जास्त काळ लॉकडाऊन ठेवल्यानंतर लोकांच्या नोकऱ्या जातील, रोजगार सुटतील, मग अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. असंही ते म्हणाले. लॉकडाऊन सातत्याने वाढवणं योग्य नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

वाचाः

परिस्थीती भयंकर आहे, पहिल्यांदाच आपण अशा परिस्थितीचा सामना करतोय. करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी नियम पाळून आपण जगणं सुरळीत केलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाताना सरकारचे नियम व गाइडलाइनचं पालन करावेच लागेल. हे संकट कधी संपेल हे आपण सांगू शकत नाही. करोनाची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीचं लागणार आहे. लॉकडाऊन असाच सातत्याने वाढवला तर करोनापेक्षाही त्यानंतर येणारं आर्थिक संकट सावरण्याचं सरकारसमोर मोठं आव्हान असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

कोणतंही राजकारण न करता या गंभीर समस्येतून वाट काढावी लागणार आहे. भारत सरकारचा महसूलही कमी झाला आहे. तरीही सरकारनं जनधन योजनेत ३८ कोटी खाती उघडली आहेत. सरकार म्हणून आम्ही जनतेच्या मागे आहोतच. केंद्राची जबाबदारी संपलेली नाहीये आत्मविश्वासानं आम्ही सगळ्यांच्या मागे उभं आहोत, असंही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

फडणवीसांना झालंय तरी काय, प्रत्येकवेळी चुकीचा मुहूर्त काढताहेत: मुश्रीफ

5

कोल्हापूर: ‘शनिवारी, एक ऑगस्ट रोजी सरकारी सुट्टी व असताना भाजपने दूध दरासाठी आंदोलन पुकारले आहे. पण या दिवशी त्यांच्या आंदोलनाकडे कोण लक्ष देणार ?’, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री यांनी भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडविली. माजी मुख्यमंत्री यांना नेमकं झालंय तरी काय, प्रत्येकवेळी ते चुकीचा मुहूर्त काढत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. ( Slams )

वाचा:

भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी, दूध दराच्या मागण्यासाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आणि मित्र पक्षांचे सगळे नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रासपचे महादेव जानकर यांचाही आंदोलनात सहभाग असणार आहे.

वाचा:

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘भाजप नेत्यांनी आंदोलनासाठी एक ऑगस्ट रोजी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. कारण यादिवशी बकरी ईद आहे, शिवाय सरकारी सुट्टी आहे. यादिवशी त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष कोण देणार, असा सवाल करून मुश्रीफ यांनी दूध दरासाठी आंदोलन योग्य आहे. दूधाला दर मिळालाच पाहिजे’अशी पुस्तीही जोडली. फडणवीस यांचे मुहूर्त नेहमीच चुकीचे ठरतात, असे सांगताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपची कार्यकारिणी बैठक घेऊन त्यांच्यावर टीका केली. वाढदिवसादिवशी तरी चांगल्या माणसाचे कौतुक करायचे असते. पण त्या दिवशी देखील फडणवीस यांचा मुहूर्त चुकलाच. वाढदिवसाला टीका करून त्यांनी अपशकुन केला असा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला.

वाचा:

गावागावात होणार आंदोलन

दुधाला प्रतिलिटर दहा रुपये आणि दूध पावडर निर्यातीला किलोला पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षासह किसान संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी राज्यव्यापी दूध संकलन बंद एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात दूध रस्त्यावर न ओतता ते गरीबांना वाटण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. सकाळी हे आंदोलक गावागावातील सर्व दूध संकलन केंद्रावर निदर्शने करणार आहेत. शेतकऱ्यांनी संस्थेला दूध देऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत दूध संकलन बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

आयपीएलमध्ये खेळाडूंची संख्या कमी करणार, पाहा किती खेळाडू असणार…

6

मुंबई : यंदाचे आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयने चांगलीच कंबर कसलेली आहे. आयपीएलचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आता बीसीसीआयने काही गोष्टी करायचे ठरवले आहे. करोनाच्या काळात जास्त लोकांबरोबर प्रवास करणे आणि त्यांची व्यवस्था करणे सोपे नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंची संख्या कमी करण्यात येणार असल्याचे समजते.

आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. आयपीएलच्या प्रत्येक संघात ३०-३५ खेळाडू असल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर १०-१५ जणांचा सपोर्ट स्टाफ असतो. त्यामुळे ही संख्या ५० पर्यंत जाते. यावेळी आपल्या बायकांनादेखील युएईतील आयपीएलसाठी न्यावे, अशी विनंतीही बीसीसीआयला करण्यात आली आहे. जर प्रत्येक संघातून जवळपास १०० व्यक्ती युएईला जाणार असतील, तर सर्व काही कठीण होऊन बसेल. त्यामुळे बीसीसीआयने सर्वच संघांच्या मालकांना खेळाडूंची संख्या कमी करण्यासाठी विनंती केली आहे.

ही स्पर्धा भारतात असली असती तर खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा आली नसती. पण ही स्पर्धा युएईमध्ये होणार असून त्यासाठी जास्त खर्च होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी खर्च आणि जोखीम कमी करण्यासाठी बीसीसीआयने प्रत्येक संघ मालकांना आपल्या संघात २० खेळाडूच ठेवावेत, अशी विनंती केली असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता याचा आयपीएलमधील सामन्यावर किती परीणाम होईल, हे स्पर्धा सुरु झाल्यावर पाहायला मिळेल.

आयपीएलच्या वेळपत्रकात आता बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आयपीएल हे १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्यात येणार होते. आयपीएलचा अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार होता. पण आता आयपीएलच्या वेळापत्रकात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे.

काही कारणास्तव आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षीचे आयपीएल हे १९ सप्टेंबरलाच सुरु होणार आहे. पण आयपीएलचा अंतिम सामना पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता आयपीएलचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला होणार असल्याचे समजते आहे. पण आयपीएलच्या मार्गातील एक समस्या अजूनही सुटलेली दिसत नाही.

बीसीसीआयसाठी आयपीएलचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. पण तरीही आयपीएलच्या आयोजनात एक महत्वाची अडचण आहे. ही अडचण म्हणजे जोपर्यंत बीसीसीआयला भारत सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही. कारण भारत सरकारने जर आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबई इंडियन्स मैदानात उतरण्यापूर्वीच अर्धा सामना कसा जिंकते, पाहा…

5

मुंबई : आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात यशस्वी ठरलेला संघ आहे मुंबई इंडियन्स. कारण आतापर्यंत मुंबईने आयपीएलची सर्वात जास्त जेतेपदे पटकावली आहे. पण मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरण्यापूर्वीच अर्धा सामना जिंकलेला असतो, असे वक्तव्य भारताच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे. काय आहे मुंबई इंडियन्सच्या विजयाचे रहस्य, जाणून घ्या…

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकलेले आहे. धोनीनंतर रोहित हा यशस्वी कर्णधार असल्याचे म्हटले जात आहे. पण मुंबई इंडियन्स मैदानाबाहेरच कसा अर्धा सामना जिंकते, याचे रहस्य आज उलगडलेले पाहायला मिळाले आहे.

मुंबई इंडियन्स हा संघ रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांची पत्नी नीता यांचा मालकीचा आहे. नीता या स्वत: संघाच्या गोष्टींमध्ये लक्ष घालत असतात. त्याबरोबर त्यांचा मुलगा आकाशही संघातील बऱ्याच गोष्टी पाहत असतो. मुंबई इंडियन्स लिलवाच्या टेबलवरच अर्धा सामना जिंकतो, असे मत भारताच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. लिलावाच्या वेळी मुंबई इंडियन्स असे काही खेळाडू निवडते की, पुढे जाऊन त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते, असे म्हटले जाते.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने यावेळी सांगितले की, ” लिलाव जेव्हा होतो तेव्हाच मुंबई इंडियन्सचा संघ अर्धा सामना जिंकलेला असतो. कारण लिलावाच्या टेबलवर मुंबई इंडियन्सची रणनिती सर्वात चांगली असते, असे पाहायला मिळाले आहे. कारण ते ज्या प्रकारे खेळाडू निवडतात, ते पाहून त्यांचा अभ्यासही असल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू आणि संघातील स्थानासाठी त्यांच्याकडे पर्यायी खेळाडू उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते.”

आकाश पुढे म्हणाला की, ” युवा खेळाडूंना निवडण्यातही मुंबई इंडियन्सचा हातखंडा आहे. कारण मुंबई इंडियन्स युवा गुणवत्ता कुठून शोधून आणते, हेदेखील पाहायला हवे. कारण चांगले युवा खेळाडू हे मुंबई इंडियन्सच्या संघात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्यावर चांगले संस्कारही संघात असताना केले जातात.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Breaking: मुंबईतील रिकव्हरी रेट ७६ टक्क्यांवर; 'हे' आकडे शुभसंकेत देणारे

5

मुंबई: देशातील सर्वाधिक बाधित रुग्ण असल्याचं लेबल लागलेलं शहर या महासंकटातून सावरताना दिसत आहे. आजवर अनेक संकटे झेलणाऱ्या मुंबई शहराने करोना विरुद्धची अशक्यप्राय लढाईही जिंकण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांतील मुंबईतील करोनाची आकडेवारी पाहिल्यास तसे स्पष्टच संकेत मिळत आहेत. मुंबईतील नवीन करोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने खाली येत आहे. ( )

वाचा:

मुंबई महापालिकेने आज सायंकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर तुलनेत ११०० करोना बाधित रुग्णांनी करोनाला मात देत डिस्चार्ज मिळवला आहे. मुंबईतील करोना बाधितांची एकूण संख्या १ लाख १२ हजार २८७ इतकी झाली असून त्यातील ८७ हजार ७४ रुग्णांनी आतापर्यंत करोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह म्हणजेच प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २० हजार ५६९ इतकी आहे. मुंबईत आज करोना सदृष्य लक्षणे असलेले ७८७ रुग्ण आढळले असून अशा रुग्णांची संख्या आता ८० हजार ७२६ इतकी झाली आहे.

वाचा:

२४ तासांत ५३ जण दगावले

मुंबईतील मृत्यूदर अजूनही मोठा आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे ५३ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा ६ हजार ३५० इतका झाला आहे. आज मृत पावलेल्या ५३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण अन्य व्याधींनी ग्रस्त होते. मृतांमध्ये ३६ पुरुष व १७ महिलांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ४० जणांचा मृत्यू झाला असून ३ जण ४० वर्षांखालील व १० जण ४० ते ६० वर्षे वयोगटातील होते.

वाचा:

७६ टक्क्यांवर

मुबंईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate ) वाढत चालले आहे. सध्याचा रिकव्हरी रेट ७६ टक्के इतका असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७६ दिवसांवर गेला आहे. २४ ते ३० जुलै या कालावधीत रुग्णवाढीचा सरासरी वेग ०.९२ टक्के इतका राहिला. मुंबईत आतापर्यंत ५ लाख २६ हजार ९८२ इतक्या चाचण्या करण्यात आला आहेत. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाणही खाली येत आहे. आरोग्य यंत्रणेकडून नियोजनबद्धरित्या चाललेल्या उपाययोजनामुळेच हे शुभसंकेत दिसू लागले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भाजपसह मित्र पक्षांचा उद्या एल्गार; गरिबांना दूध वाटून आंदोलन करणार

5

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: दुधाला प्रतिलिटर दहा रूपये आणि दूध पावडर निर्यातीला किलोला पन्नास रूपये अनुदान मिळावे या मागण्यासाठी आणि त्यांच्या मित्रपक्षासह किसान संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी राज्यव्यापी दूध संकलन बंद एल्गार पुकारण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात दूध रस्त्यावर न ओतता ते गरीबांना वाटण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.

वाचाः

दूध उत्पादकांना सध्या लिटरला केवळ १८ ते २० रूपये दर मिळत आहे. हा दर न परवडणारा आहे. यातून उत्पादन खर्च देखील भागत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठ दिवसापूर्वी दूध संकलन बंद आंदोलन केले. त्याच वेळी भाजप व मित्रपक्षानी देखील आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये किसान संघर्ष समिती, राज्यातील दूध उत्पादक संघटना देखील सहभागी होणार आहेत.

शनिवारी सकाळी हे आंदोलक गावागावातील सर्व दूध संकलन केंद्रावर निदर्शने करणार आहेत. शेतकऱ्यांनी संस्थेला दूध देऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे. तरीही काही ठिकाणी असा प्रयत्न झाल्यास ते रस्त्यावर ओतण्याऐवजी गरीबांना वाटण्यात येणार आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत दूध संकलन बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपने हे आंदोलन प्रतिष्ठेचे केले असून अधिक आक्रमकपणे करण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रमुख लोकप्रतिनिधी, नेतेही यात सहभागी होणार आहेत. रस्त्यावर दूध ओतण्यावर टीका होत असल्याने दोघांनीही आंदोलनात बदल केल्याचे दिसून येते. तरीही आंदोलनामुळे उद्या दूध पुरवठा मात्र विस्कळीत होणार आहे. शेतकरी संघटनांतर्फे गावोगावी चावडीवर आंदोलन होणार आहे. रस्त्यावर दूध ओतण्याच्या आंदोलनावर सर्वस्तरातून जोरदार टीका केली जाते. त्यामुळे यामध्ये बदल करून चावडीवर प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करून गरजूंना दूध वाटप करण्याचे आंदोलन शेतकरी संघटना करणार आहेत. तर भाजपतर्फे निदर्शने आणि सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts