Friday, June 2, 2023
Home Blog Page 5859

हा ढोंगीपणा का?; फडणवीसांचा काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा

0

मुंबईः ‘महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके महिने झालेत पण तेव्हा कोणतही आंदोलन झालं नाही. आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करताहेत,’ असा आरोप विरोधीपक्ष नेते यांनी केला आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आज मुंबईतील आझाद मैदानात एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही उपस्थिती लावली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

‘आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. आता जी लोकं या ठिकाणी मोर्चाच्या निमित्त मंचावर जात आहेत किंवा जी लोकं या मोर्चाला मदत करत आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे. काँग्रेसनं आपल्या २०१९च्या जाहीरनाम्यात बाजार समिती रद्द करा आणि आम्ही निवडून आलो तर बाजार समिती रद्द करु, असं का म्हटलं होतं, याचं उत्तर दिलं पाहिजे,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘२००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला. २००६ पासून २०२० पर्यंत तो महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रातला कायदा चालतो आणि देशातला कायदा का चालत नाही? हा ढोंगीपणा का?,’ असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'गुड न्यूज', आता मोबाइलमध्ये डाउनलोड करा 'मतदान कार्ड'

0

नवी दिल्लीः how to download : डिजिटल इंडियात आता एक एक पाऊल पुढे टाकले जात आहे. मतदान ओळख पत्र (वोटर कार्ड) ला आता मोबाइल फोन किंवा कम्प्यूटरवर डाउनलोड करू शकता येते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई-इलेक्ट्रिक फोटोचे आता डिजिटल लॉकर सारख्या माध्यमाप्रमाणे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच याला पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेटमध्ये (पीडीएफ) मुद्रित केले जाऊ शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स डिजिटल मोडमध्ये उपलब्ध आहेत. आता सुद्धा डिजिटल मोड मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

वाचाः

मोबाइलमध्ये वोटर कार्ड डाउनलोड करण्याची ही सुविधा दोन टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान केवळ नवीन मतदारांनी ही डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड करता येऊ शकणार आहे. परंतु, यासाठी त्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगासोबत नोंदणीकृत असायला हवा. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १ फेब्रुवारी पासून सर्व वोटर्स आपल्या वोटर आयडी कार्डला डिजिटल रुपात डाउनलोड करू शकतात. यासाठी सुद्धा मोबाइल नंबर निवडणूक आयोगाच्या वेबसाइट सोबत रजिस्टर असायला हवा. हे काम तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन करू शकतात.

वाचाः

वोटर कार्डची डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल अॅप (Voter Helpline) आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाइटवरून करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये अॅप नसेल तर तो अॅप डाउनलोड करावा लागेल किंवा आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाइल नंबर ई-मेल आयडीवरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Download e-EPIC हा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा वोटर कार्ड नंबर टाकून तुम्ही पीडीएफ मध्ये आपले मतदान ओळखपत्र (वोटर कार्ड) डाउनलोड करू शकता. पीडीएफ फाइलमध्ये एक क्यूआर कोड दिसेल. त्याला स्कॅन केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

भारताला नडणाऱ्या ओलींना दणका'; पक्षातूनच हकालपट्टी, पण…

0

काठमांडू: नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील शाखेने पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओली यांची यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली आहे. माधव नेपाळ यांची पक्षाचे दुसरे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे नेपाळच्या निवडणूक आयोगाने ओली यांनी मोठा दिलासा आहे. त्यामुळे नेपाळमधील राजकीय नाट्याला वेगळेच वळण मिळाले आहे.

प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील शाखेने पंधरा जानेवारी रोजी ओली यांच्याकडून पक्षाच्या धोरणाविरुद्ध पावले उचलल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. त्यांच्याकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. पक्षातील सूत्रांनी ही माहिती दिली. संसद बरखास्त करणे घटनाबाह्य असल्याचा आरोप करून कम्युनिस्ट पक्षाच्या या शाखेने सरकारविरुद्ध मोठी रॅली काढली होती. देशाच्या संघराज्य प्रजासत्ताकाला त्यामुळे धोका पोहोचत असल्याचा आरोप करण्यात आला. संसद बरखास्त करून ओली यांनी घटनेलाच धक्का लावल्याचा आरोप प्रचंड यांनी केला होता. माधव नेपाळ यांनीही घटनेने पंतप्रधानांना संसद बरखास्त करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असे म्हटले आहे.

वाचा:
वाचा: निवडणूक आयोगाचा ओलींना दिलासा

नेपाळच्या निवडणूक आयोगाने पंतप्रधान ओली यांना दिलासा देताना प्रचंड यांना धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना अधिकृत मान्यता देण्यास नकार दिला असून एकसंध कम्युनिस्ट पक्षाची मान्यता कायम ठेवली आहे. त्याशिवाय ओली यांच्यावरील कारवाईदेखील अमान्य केली आहे.

प्रचंड आणि ओली या दोघांच्या गटाने आपल्या नेतृत्वातील गट खऱा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचे दावे फेटाळून लावले. त्याशिवाय, ओली यांच्यावर हकालपट्टीची झालेली कारवाईही चुकीची असल्याचे आयोगाने म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

BSNLचा 'हा' प्लान आता देशभरात, जाणून घ्या फायदे

0

नवी दिल्लीः BSNL ने आपल्या ६९९ रुपयांचा वाउचरला आता देशभरात उपलब्ध केले आहे. हे एक नवीन वाउचर आहे. बीएसएनएलने केरळ सर्कल सोडून बाकीच्या सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध केले होते. परंतु, आता KeralaTeecom च्या एका रिपोर्टनुसार, हे वाउचर आता केरळमध्ये सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. ६९९ रुपयांच्या या वाउचरमध्ये सर्व बेनिफिट्स आधीचेच राहणार आहेत.

वाचाः

बीएसएनएलच्या ६९९ रुपयांच्या वाउचरमध्ये मिळणारे बेनिफिट्स
६९९ रुपयांच्या वाउचरमध्ये युजर्संना रोज ०.५ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 80Kbps होते. याशिवाय, या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस आणि विना कोणत्याही FUP लिमिट शिवाय अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. या प्लानची वैधता १६० दिवसांची आहे.

वाचाः

या प्लानला रिचार्ज करण्यासाठी युजर्स बीएसएनएलच्या वेबसाइटवर जाऊ शखते. किंवा USSD कोड ‘*444*699#’ चा वापर करू शकता. याशिवाय PLAN BSNL699 लिहून १२३ वर एसएमएस करू शकता. युजर्संना हे निश्चित करायला हवे की मेसेज पाठवण्याआधी त्यांच्याकडे बॅलन्स शिल्लक असायला हवे.

वाचाः

बीएसएनएलने केरळमध्ये फ्री ४ जी सिम कार्ड देण्याची घोषणा केली होती. कंपनी ३१ जानेवारी पर्यंत प्रमोशन ऑफर अंतर्गत फ्री ४ जी सिम कार्ड ऑफर करीत आहे. ४ जी सिम कार्ड मिळवण्यासाठी युजर्सला १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त फर्स्ट रिचार्ज कूपन रिचार्ज करावे लागणार आहे. यानंतर सर्व आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर त्यांना फ्री ४ जी सिम कार्ड मिळेल.

वाचाः

याशिवाय, रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत कंपनी ३९८ रुपयांचा नवीन वाउचर सुद्धा ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग व १०० एसएमएस मिळते. तसेच या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

रोहित पवारांना 'नकली' म्हणत निलेश राणेंची टीका; दिला 'हा' पुरावा

0

मुंबईः केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्दे करावे, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील सहभागी झाले आहेत. तसंच, आझाद मैदानात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील पोहोचले आहेत. या प्रकरणावर भाजप नेते यांनी रोहित पवारांचं उदाहरण देत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार हे सातत्याने सरकारची बाजू मांडताना दिसत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबतही त्यांनी अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचाच आधार घेत निलेश राणे यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल चढवला आहे.

‘नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत,’ असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. त्याचबरोबर, रोहित पवारांच्या कंपनीच्या पोस्टरचा एक फोटोही शेअर केला आहे.

पोस्टरमध्ये काय लिहलंय?
करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे
वर्षभर हमी भावाने खरेदी
शेतकऱ्याला क्रेडीटवर बेबीकॉर्न बियाणे व मिरची रोपे याचा पुरवठा
शुन्य टक्के वाहतूक
विविध पिकांसाठी तज्ञांद्वारे प्लॉट व्हिजीट व मार्गदर्शन

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Redmi K40 च्या रिटेल बॉक्सचा फोटो लीक, फोनसोबत आता 'हे' नाही मिळणार

0

नवी दिल्लीः स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. रेडमीचा हा अपकमिंग फोन गेल्या काही आठवड्यापासून खूप चर्चेत आहे. या दरम्यान, लाँचआधीच फोनच्या रिटेल बॉक्सचा फोटो ऑनलाइन लीक झाला आहे. रिटेल बॉक्सच्या लीक फोटोमुळे रेडमी चाहत्यांची उत्सूकता आणखी वाढवली आहे.

वाचाः

फोटोत दिसले दोन रिटेल बॉक्स
लीक फोटोत दोन वेगवेगळे रिटेल बॉक्स दिसत आहेत. दोन्ही मध्ये केवळ साइज मध्ये फरक आहे. एक बॉक्स थोडा दिसायला मोठा आहे. तर दुसरा थोडा स्लिम आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, या बॉक्समध्ये स्मार्टफोन सोबत चार्जर मिळणार नाही.

वाचाः

फोनमध्ये पंच होल डिझाइनचा डिस्प्ले
अपकमिंग रेडमी के ४० सीरीज अंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन के ४० आणि के ४० प्रो लाँच करू शकते. फोनमध्ये पंचहोल डिझाइन सोबत अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोनचे पंच होल कटआउट डिस्प्ले मध्ये टॉप सेंटर असणार आहे. ज्यात फ्रंट कॅमेरा असणार आहे. अफवांच्या माहितीनुसार, रेडमी के ४० सीरीजमध्ये कंपनी इंडस्ट्रीचा सर्वत महाग स्क्रीन ऑफर करणार आहे.

वाचाः

स्नॅपड्रॅगन ८८८ SoC प्रोसेसर मिळणार
या अपकमिंग स्मार्टफोनच्या प्रो व्हेरियंटमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८८८ SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर याच्या स्टँडर्ड व्हर्जन मध्ये स्नॅपड्रॅगन 775G चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. रेडमी K40 प्रो ला २९९८ युआन म्हणजेच ३३ हजार ८०० रुपयांत लाँच केले जाऊ शकते. या सीरीजला कंपनी पुढील महिन्यात स्प्रिंग फेस्टिव्हल नंतर लाँच करू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

ओबीसी मुख्यमंत्री? पंकजा मुंडे यांनी दिलं 'हे' उत्तर

0

औरंगाबाद: ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी जालना येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या निमित्तानं ” या नव्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ( on )

वाचा:

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, अशी एक मागणी पुढं आली आहे. त्यामुळं ओबीसी नेते सतर्क झाले आहेत. जालन्यात काल निघालेल्या मोर्चातही या मुद्द्यावरून सरकारला इशारा देण्यात आला. राज्यातील अनेक ओबीसी नेते या मोर्चात सहभागी झाले होते. पंकजा मुंडे मात्र मोर्चाला अनुपस्थित होत्या. त्याबद्दल आज त्यांना विचारलं असता, ‘कार्यक्रमात असणं हेच महत्त्वाचं नाही. त्या चळवळीचा भाग आम्ही अनेक वर्षे आहोत,’ असं पंकजा म्हणाल्या.

वाचा:

जालन्यातील ओबीसी मोर्चात ‘ओबीसी मुख्यमंत्री व्हावा’ असे बॅनर झळकवण्यात आले होते. तशा घोषणाही दिल्या जात होत्या. याबाबत विचारलं असता पंकजा यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘मला यापासून थोडं मुक्त ठेवा. ही चळवळ कुठल्याही पदावर नसताना मला पुढं न्यायची आहे. माझं ते महत्त्वाचं ध्ये आहे. मुंडे साहेबांचं ते एक अपूर्ण ध्येय आहे, ते मला पूर्ण करायचं आहे,’ असं पंकजा यांनी सांगितलं.

ओबीसी जनगणना व्हावी!

‘ओबीसी जनगणना व्हावी ही आमची जुनी मागणी आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी ही भूमिका वेळोवेळी मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही याबाबत संसदेत आवाज उठवला आहे. आता नव्यानं जनगणना होणार आहे. त्यावेळी त्याबाबत सकारात्मक पावलं उचलली गेली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाल्यास सर्व गोष्टी रडारवर येतील. त्यामुळं संबंधित समूहांना न्याय देण्यास मदत होईल,’ असंही त्यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

शेतकरी आंदोलनात मुख्यमंत्री सहभागी होणार का?; पवारांनी दिलं 'हे' उत्तर

0

मुंबईः केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरु आहे. आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आझाद मैदानात येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री यांनीही मोर्च्याला पाठिंबा दिला असून तेदेखील मोर्चात सहभागी होणार का?, अशा चर्चा सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे. त्यामुळं त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली असल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्याचबरोबर, अद्यापही मुंबईत करोनाचं संकट आहे असं असताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असंही पवारांचं मत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं मुख्यमंत्री मोर्च्यात सहभागी होणार असल्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आझाद मैदानातील मोर्चात सहभागी होणार आहे. तसंच, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही शेतकरी मोर्च्याला पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारनं स्थगित केलेली महात्मा फुले कर्ज माफी योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Live: दिल्लीतील शेतकऱ्यांना मुंबईतून ताकद; आझाद मैदानात एल्गार

0

कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. विविध शेतकरी संघटनांसह महाविकास आघाडीतील अनेक पक्षही आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाविषयीचे सर्व अपडेट्स:

आंदोलनाचे Live Updates:

>> आझाद मैदानातील आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या रामदास आठवले यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

>> राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संध्याकाी ५ वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार

>> शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनावर धडकणार. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार

>> दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू. सांगली ते कोल्हापूर निघणार ट्रॅक्टर मोर्चा

>> मोर्चाच्या निमित्तानं आझाद मैदाना बुक स्टॉल. कृषी कायदे, संविधान व इतर पुस्तकांची मेजवानी

>> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी होणार

>> दादर येथील गुरुद्वाराच्या वतीने अन्न व खाद्य पदार्थाचे वाट

>> आझाद मैदानात आंदोलकांसाठी महापालिकेच्या वतीनं वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे.

>>
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारनं स्थगित केलेली महात्मा फुले कर्ज माफी योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी

>> राज्यातील विविध शेतकरी संघटनांचा सहभाग. महाविकास आघाडीतील पक्षांचाही मोर्चाला पाठिंबा

>> दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई: क्राइम शो पाहून त्यांनी केलं १३ वर्षीय मुलाचं अपहरण, ३ तासांनी…

0

मुंबई: टीव्हीवरील क्राइम शो पाहून दोघांनी एका १३ वर्षीय मुलाचे केले. मुंबईतील मालाडमध्ये ही घटना घडली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या पालकांकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी तपास करत अवघ्या तीन तासांत अपहृत मुलाची सुटका केली.

परिसरातील आदर्श नगरमध्ये घरासमोर खेळत असलेल्या १३ वर्षांच्या मुलाचे दोघा जणांनी अपहरण केले. टीव्हीवर क्राइम शो बघून त्यांनी हे कृत्य केले. त्याला रिक्षातून पळवून नेले. त्यानंतर पालकांना फोन करून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी तपास करून अवघ्या तीन तासांत अपहरणकर्त्यांना अटक केली आणि मुलाची सुखरूप सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर विश्वकर्मा (वय ३५) आणि दिव्यांशू विश्वकर्मा (वय २१) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. मुलाचे अपहरण केले असून, त्याच्या सुटकेसाठी १० लाख रुपये द्या, असे अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोनद्वारे सांगितले. पालकांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास सुरू केला. अपहरणकर्त्यांच्या मोबाइल फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी मालाड पश्चिम परिसरातून त्यांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts