Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5860

श्रीशांत रात्रभर मुलींबरोबर पार्टी करायचा, क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

5

भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतबाबत काही धक्कादायक खुलासे एका क्रिकेटपटूने केले असल्याचे आता समोर आले आहे. आयपीएल खेळत असताना श्रीशांत हा रात्रभर मुलींबरोबर पार्टी करत असायचा, असेदेखील या क्रिकेटपटूने म्हटले आहे. त्याचबरोबर श्रीशांतचे कोणाबरोबर संबंध होते, हेदेखील या क्रिकेटपटूने यावेळी सांगितले आहे. त्याचबरोबर श्रीशांतच्या पार्ट्यांचं बील २-३ लाख एवढं यायचं, असंही या क्रिकेटपटूने सांगितले आहे.

श्रीशांत हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळायचा. राजस्थानकडून खेळत असताना श्रीशांतवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळेच त्याच्यावर बंदीही घालण्यात आली होती. आता ही बंदी काही दिवसांनी उठवणार आहे. पण स्पॉट फिक्सिंग करताना श्रीशांतला जेव्हा पकडले होते. तेव्हा त्याच्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात आले होते. त्यावेळी श्रीशांतच्या रुममध्ये काही मुली जात असल्याचेही पाहायला मिळाले होते.

वाचा-

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून हरमीत सिंग हा फिरकीपटू खेळत होता. हरमीतने श्रीशांतबाबत खुलासा करताना सांगितले की, ” श्रीशांत आणि माझी रुम शेजारीच असायची. कारण त्यावेळी राहुल द्रविड आणि एस श्रीशांत हे दोघे भारताकडून कसोटी क्रिकेट खेळत होते. त्यामुळे मला मार्गदर्शन मिळण्यासाठी मला श्रीशांतच्या बाजूची रुम दिली जायची. मी जेव्हा जेव्हा पाहायचो तेव्हा श्रीशांतच्या रुममध्ये मुली असायच्या. श्रीशांत या मुलींबरोबर रात्रभर पार्ट्या करत असायचा. जेव्हा मी सकाळी ६ वाजता उठून जिमला जायचो तेव्हाही श्रीशांतच्या रुममध्ये मुली असायच्या आणि त्यांची पार्टी सुरुच असायची. मला त्याच्या रुममध्ये नेमकं काय व्हायचं, हे जाणून घ्यायचा मी कधीही प्रयत्न केला नाही, कारण ते त्याचं आयुष्य होतं.”

वाचा-

श्रीशांतबाबत मोठा खुलासा…हरमीतने अजून एक मोठा खुलासा श्रीशांतबाबत केला आहे. हरमीत म्हणाला की, ” श्रीशांतच्या रुममध्ये हरमीत नावाचा एक व्यक्ती सतत असायचा. श्रीशांतने हा माझा भाऊ असल्याचे सांगितले होते. पण या जनार्दनला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी मला समजले की जनार्दन हा श्रीशांतचा भाऊ नव्हता.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

पुणे: दारूनं घात केला; गळा आवळून मित्राची केली हत्या

4

म. टा. प्रतिनिधी, : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २मधील पथकाने आरोपीला अटक केली आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार मे महिन्यात दाखल करण्यात आली होती. या झाल्याचे उघडकीस आले आहे. दारू पिताना वाद झाल्यानंतर मित्रानेच तरुणाचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशाल उर्फ विक्की राजु पिल्ले (वय २४, रा. हिंगणेमळा, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विकी अशोक रणदिवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० मे रोजी हडपसर परिसरातून विशाल बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ चेतन याने दिली होती. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ मे रोजी कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह वाहून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी चेतन याला बोलाविले असता, हा मृतदेह आपला भाऊ विशालचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

विशालचा खून दारू पिताना झालेल्या वादातून रणदिवे याने केल्याची माहिती पोलीस नाईक मोहसीन शेख यांना मिळाली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानेच विशालचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. त्यानुसार पोलिसांनी रणदिवेला ताब्यात घेतले. दारू पिण्याच्या वादातून विशालचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक प्रताप शेळके, किशोर वग्गु, मोहसीन शेख यांच्या पथकाने या हत्येचा छडा लावला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अरेरे! करोनाची बाधा झालेल्या पहिल्या श्वानाचा मृत्यू

6

न्यूयॉर्क: अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही करोनाची बाधा होत आहे. अमेरिकेत कोविड-१९ ची बाधा झालेल्या एका ‘जर्मन शेपर्ड’ श्वानाचा मृत्यू झाला आहे. करोनाची बाधा झालेल्या श्वानाचा हा पहिला मृत्यू आहे. या श्वानाला एप्रिल महिन्यात श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर काही आठवडे या श्वान करोनाबाधित होता.

स्टेम आयलँड येथील रॉबर्ट आणि एलिसन माहनी यांनी ‘नॅशनल जिओग्राफी’ वाहिनीला सांगितले की, एप्रिल महिन्यात श्वान ‘बडी’ हा आजारी पडला. त्यानंतर सातत्याने तो आजारीच होता. एका प्राण्यांच्या डॉक्टराने बडीची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्याला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. अमेरिकेच्या कृषी विभागाने जून महिन्यात एका ‘जर्मन शेपर्ड’ श्वानाला करोनाची बाधा झाली असल्याची माहिती दिली. हा पहिलाच करोनाबाधित रुग्ण होता. बडीची प्रकृती आणखी ढासळल्यानंतर अखेर त्याचा ११ जुलै रोजी मृत्यू झाला. बडीच्या रक्त चाचणीत लिम्फोमा (रोग प्रतिकारक शक्तींचा कर्करोग) झाला असल्याचेही आढळले. त्यामुळे त्याचा मृत्यू करोनामुळेच झाला की अन्य काही वैद्यकीय कारणांमुळे झाला, याची माहिती समोर आली नाही.

वाचा: वाचा:

अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत अनेक प्राण्यांना करोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत १२ श्वान, १० मांजरी, एक वाघ आणि एका सिंहाला करोनाची बाधा झाली आहे. प्राण्यांपासून करोनाचा संसर्ग फैलावण्याचा पुरावा अद्याप सापडला नाही. मात्र, काही परिस्थितींमध्ये माणसांमधून प्राण्यांमध्ये करोनाचा संसर्ग होत असावा अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

वाचा:

दरम्यान, जगभरातील २०० देशांमध्ये
संसर्गाचे थैमान सुरू आहे. करोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला असून करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाच्या आजारामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांची संख्या एक लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेत ४५ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एक लाख ५३ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, २२ लाखांहून अधिकजणांनी करोनावर मात केली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक करोनाबाधित ब्राझीलमध्ये आढळले आहेत. ब्राझीलमध्ये २५ लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ९० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. भारतात १६ लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ३५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भारतात २,२२५ कोटी रुपयांचे स्मार्टफोन आयात, या कंपन्या आघाडीवर

5

नवी दिल्लीः २०२० मध्ये स्मार्टफोन मार्केटने खूप चढ उतार पाहिला आहे. करोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम मार्केटवर पडला आहे. जून महिन्यात ३ वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड आयात भारतात केले आहे. भारतात जवळपास संपूर्ण स्मार्टफोन मार्केट विदेशी कंपन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वात जास्त फोन हे विदेशातून येतात. लोकल उत्पादनावर लॉकडाऊनचा परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. आता हळूहळू मार्केट सुरू झाले आहे.

वाचाः

मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सकडून शेयर करण्यात आलेल्या डेटा नुसार, फेब्रुवारी महिन्यात ५.६ कोटी रुपयांच्या किंमतीचे फोन आयात करण्यात आले होते. तर जून महिन्यात भारतात आयात केलेल्या फोन्सची किंमत २२२५ कोटी रुपये आहे. हे मे महिन्यात करण्यात आलेल्या आयात (इंपोर्ट) पेक्षा सहा पट अधिक आहे. मार्केट एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात ही आयात १० पट अधिक वाढू शकते. इंपोर्ट करणाऱ्या कंपन्यात चीनची कंपनी शाओमी, विवो, ओप्पो आणि रियलमी सर्वात जास्त वर आहे.

वाचाः

लॉकडाऊनची मजबूरी
काउंटरपॉइंट रिसर्चचे असोसिएट डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितले की, स्मार्टफोन ब्रँड्सला या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. जून मध्ये वेगाने आयात करणे कारण बनले होते. करोना व्हायरसच्या आधी भारतात विकल्या गेलेल्या जवळपास ९५ टक्के फोन भारतात लोकल प्लांट्समध्ये असेंबल करण्यात आले होते. त्यावेळी आयात करण्यात आल्याची व्हॅल्यू जवळपास ५.६ कोटी रुपये होती.

वाचाः

फोन आयात करावे लागले
सर्वात जास्त स्मार्टफोन ब्रँड्स विवो, ओप्पो, रियलमी, वनप्लस आणि सॅमसंगचे भारतात आपले प्रोडक्शन प्लांट आहेत. नोएडा आणि नॉर्थ इंडिया आणि साऊथ मध्ये बनवण्यात आलेल्या या प्लांट्समध्ये डिव्हाईसेजचे प्रोडक्शन लॉकडाऊन मुळे सुरू होण्यात उशीर झाला त्यामुळे कंपन्यांना फोन आयात करावे लागले. या प्लांट्समध्ये विदेशातून पार्ट्स मागवले जातात. त्यानंतर फोन भारतात बनवले जातात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Sushantsingh Suicide: सुशांतसिंह प्रकरणात भाजपचा मुंबईतील युवा मंत्र्यावर गंभीर आरोप; अमित शहांना पत्र

4

मुंबई: ‘सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या चौकशीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री अडथळे आणत आहेत. त्यांच्या दबावामुळं मुंबई पोलीस या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करू शकत नाहीत,’ असा गंभीर आरोप भाजपचे आमदार व राज्याचे प्रवक्ते यांनी केला आहे. सीबीआयनं तातडीनं हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

वाचा:

सुशांतसिंह याच्या आत्महत्येला महिना उलटून गेला असला तरी या प्रकरणात रोजच्या रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासतील, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, सीबीआय चौकशीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहेत. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला फसवल्याचा आरोप झाला आहे. सुशांतच्या खात्यातून तब्बल १५ कोटींची रक्कम गायब आहे, असंही तपासात पुढं आलं आहे. हे सगळ्या घडामोडींमुळं या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. राजकीय पातळीवरही याची दखल घेतली गेली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनी गृहमंत्र्यांना पत्र देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपनंही या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

फडणवीस यांनी ईडीनं या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली असतानाच आता आमदार भातखळकर यांनी थेट केंद्र सरकारलाच साकडं घातलं आहे. भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ‘राज्यातील पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास नीट करू शकत नाहीत, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. राज्य सरकारमधील मुंबईस्थित एक युवा मंत्री या चौकशीत हस्तक्षेप करत आहे. सुशांतच्या बहिणीनंही असाच आरोप केला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

भातखळकर यांनी उल्लेख केलेला युवा मंत्री कोण आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. त्याला उत्तर देताना ‘माझा रोख कोणाकडे आहे हे उघड गुपित आहे,’ असं ट्वीट भातखळकर यांनी केलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सॅमसंग आणतेय स्वस्तातील 5G फोन, जाणून घ्या डिटेल्स

5

नवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन कंपन्या स्वस्त किंमतीच्या ५जी स्मार्टफोवर काम करीत आहेत. दक्षिण कोरियाची कंपनी सुद्धा यात मागे नाही. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग लवकरच गॅलेक्सी स्मार्टफोन घेऊन येण्याची शक्यता आहे. हा फोन एक ५जी स्मार्टफोन असणार आहे. जो कंपनीचा सॅमसंग गॅलेक्सी A31 चे अपग्रेड मॉडल असणार आहे. यासंबंधीची माहिती पहिल्यांदा समोर आली आहे. कंपनीने नुकताच गॅलेक्सी M31s स्मार्टफोन लाँच केला आहे. २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा फोन लाँच केला आहे.

वाचाः

४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार
GalaxyClub च्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात येणार आहे. हा कॅमेरा गॅलेक्सी ए३१ मध्ये दिला होता. प्रायमरी कॅमेऱ्यासोबत नवीन फोनमध्ये २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. जुन्या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर दिला होता. सुरूवातीला सॅमसंगने ९ नवीन स्मार्टफोनसाठी ट्रेडमार्क फाईल केले होते. यात गैलेक्सी A12,गॅलेक्सी A22, गॅलेक्सी A32, गॅलेक्सी A42, गॅलेक्सी A52, गॅलेक्सी A62, गॅलेक्सी A72, गॅलेक्सी A82 आणि गॅलेक्सी A92 यासारख्या स्मार्टफोनचा समावेश होता.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सीए३१ चे फीचर
या फोनची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.४० इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूसन 1080×2400 पिक्सल आहे. फोन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियो पी६५ प्रोसेसर सोबत येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि ५-५ मेगापिक्सलचे सेन्सर दिले आहेत. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

धक्कादायक… विराट कोहलीला अटक करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

0

भारताचा कर्णधार विराट कोहलीला अटक करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. क्रिकेट विश्वासाठी ही धक्कादायक गोष्ट आहे. विराटच्याविरोधातील याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते पाहा…

करोनामुळे विराट सध्या आपल्या घरीच आहे. पत्नी अनुष्का शर्माबरोबर तो राहत आहे. त्यामुळे विराट घराबाहेर पडला नसतानाही त्याच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. एक प्रकरण आता कोहलीला चांगलेच भोवणार असल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात कोहलीविरोधात याचिका दाखल केलेली आहे. कोहली हा जनतेची दिशाभूल करत असून त्यामुळे बऱ्याच लोकांना व्यसन लागले आहे, असे या याचिकेच म्हटले गेले आहे.

नेमके प्रकरण आहे तरी काय..विराटने ऑनलाईन जुगाराच्या अॅपची जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये कोहलीने लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अॅपमध्ये जुगार खेळण्यासाठी एका मुलाने उसणे पैसे घेतले होते. या पैशांची परतफेड करता न आल्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली, ही गोष्टही या याचिकेमध्ये दाखल करण्यात आली आहे.

लोकांमध्ये ऑनलाईन जुगाराचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या अॅपवर बंदी आणायला हवी, असेही या याचिकेत म्हटले आहे. कोहली आणि सेलिब्रेटी तमन्ना हे दोघे या अॅपची जाहिरात करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे विराट आणि तमन्ना या दोघांनाही अटक करावी आणि ऑनलाईन जुगारावर बंदी आणावी, असे या याचिकेमध्ये म्हटले गेले आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंगळवारी या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात नेमकी काय सुनावणी होते, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले आहे.

ऑनलाईन जुगारामध्ये आतापर्यंत बरेच युवक दिवाळखोर झालेले पाहायला मिळालेले आहे. युवकांना या ऑनलाईन जुगाराचे व्यसन लागलेले आहे. हे ऑनलाईन जुगाराचे व्यसन सोडवायचे असेल तर त्यावर बंदी आणणे हा सर्वात चांगला पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मंगळवारी उच्च न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

रिलायन्स जिओची कमाल, ३ महिन्यात १ कोटी नवीन ग्राहक

5

नवी दिल्लीः Platforms ने ३० जून २०२० रोजी झालेल्या तिमाहीत जवळपास १ कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत. या सोबतच कंपनीचे एकूण सब्सक्रायबर्सची संख्या आता ३९.८ कोटीवर पोहोचली आहे. जिओने आपल्या तिमाहीचा डेटा रिलीज केला आहे. ज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत १८२.८ टक्के नेट प्रॉफिटची वाढ झाली आहे. करोना व्हायरस असूनही कंपनीने सर्विस प्रोव्हाईडर मोठ्या संख्येत नवीन युजर्स आणि इयर ऑन इयर वाढ करण्यात कंपनी यशस्वी राहिली आहे. कंपनीने Jio POS-Lite अॅप याच दरम्यान लाँच केला आहे.

वाचाः

2020-2021 च्या पहिल्या तिमाहीचा परफॉर्मन्स रिपोर्टमद्ये रिलायन्स जिओने आकडा वाढवला आहे. ने या तिमाहीत ९९ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. जानेवारी – मार्च २०२० च्या तिमाहित च्या तुलनेत हे ग्राहक कमी आहेत. कारण, जानेवारी – मार्च तिमाहित कंपनीने १.७५ कोटी नवीन ग्राहक बनवले होते.

वाचाः

जिओने Jio POS-Lite अॅप लाँच केला असून आपला युजर बेस वाढवला आहे. हे अॅप एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले होते. या अॅपवरून युजर्स दुसऱ्या नंबरवर रिचार्ज केल्यास ४.१६ टक्के कमिशन मिळवू शकतात. या शिवाय कंपनीने लॉकडाऊनमध्ये आपल्या सर्व युजर्संना इनकमिंग कॉल वैधता वाढवली होती. जिओने नुकतेच मेड इन इंडिया ५जी सोल्यूशन घेऊन येण्याची घोषणा केली आहे. ५ जी स्पेक्ट्रमला भारतात उपलब्ध करण्यात आल्यानंतर याची चाचणी सुरू केली जाणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

सुशांतसिंह प्रकरणात ईडीने हस्तक्षेप करावा- फडणवीस

5

नागपूर: ‘ याच्या आत्महत्येच्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचाही एक अँगल समोर आलाय. सुशांतच्या बँक खात्यातील कोट्यवधी रुपये वळवण्यात आल्याचं उघड झालंय. अशा परिस्थितीत सक्तवसुली संचालनालय (ईडी) हस्तक्षेप करू शकते. ईडीनं या प्रकरणी ईसीआयआर दाखल करावा,’ अशी मागणी विरोधी पक्षनेते यांनी केली आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येला महिना उलटून गेला असला तरी या प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सर्व बाजू तपासल्या जातील, असं गृहमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, चौकशीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहेत. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला फसवल्याचा आरोप झाला आहे. सुशांतच्या खात्यातून तब्बल १५ कोटींची रक्कम गायब आहे, असंही तपासात पुढं आलं आहे. हे सगळ्या घडामोडींमुळं या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. राजकीय पातळीवरही याची दखल घेतली गेली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनी गृहमंत्र्यांना पत्र देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपनंही या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी ईडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ‘सुशांतच्या मृत्यूच्या बाबतीत एक मोठा जनआक्रोश आहे. काहीतरी लपवलं जातंय असं लोकांना वाटतंय. वेगवेगळे खुलासे येताहेत. सातत्यानं मागणी होऊनही सरकार सीबीआय चौकशीला नकार देत आहे. मात्र, आता यात आर्थिक बाजू समोर आली आहे. ही बाब ईडीच्या कार्यकक्षेत येते. त्यामुळं ईडीने ईसीआयआर (Enforcement Case Investigation Report) दाखल करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

सुशांतसिंह यानं १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. हिंदी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतनं हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसला होता. सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं आहे, असे आरोप पहिल्या दिवसापासून सुरू आहेत. सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही व कंपूशाहीला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्या अनुषंगानं पोलिसांनी अनेक निर्माते, दिग्दर्शकांची चौकशीही केली आहे. मात्र, आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्या पत्रांना उत्तरंही देत नाहीत; फडणवीसांची नाराजी

5

मुंबई: करोनाचं संकट आल्यापासून मी मुख्यमंत्री यांना अनेक पत्र लिहिली. पण माझ्या एकाही पत्राला त्यांनी उत्तरं दिलं नाहीत, अशी नाराजी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही सल्ला देता का? असा सवाल फडणवीस यांना विचारला असता, मी कुणालाही फुकटचा सल्ला देत नाही. सल्ला मागितला तर जरूर देईल. सल्ला देण्याऐवढा मी काही मोठा नाही. माझा जो काही अनुभव आहे तो मी पत्ररुपाने त्यांना सांगत असतो. त्यांना काही सांगायचं असेल तर पत्रं लिहितो. त्यावर निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण जिथे कमतरता दिसते ते त्यांच्या लक्षात आणून देतो. राज्याच्या हिताचं जे काही असेल ते सांगत असतो, असं सांगतानाच मी मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं लिहिली पण त्यावर त्यांनी मला अद्याप एकदाही उत्तर दिलं नाही. नाही म्हणायला नायरमधील रुग्णसंख्या दडवल्याचा प्रकार मी उघडकीस केला होता. मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तसे लक्षात आणून दिलं होतं. त्यावर त्यांनी मला फोन करून या प्रश्नात लक्ष घालणार असल्याचं सांगितलं होतं. हा अपवाद वगळता त्यांनी कधीच माझ्या पत्रांना उत्तर दिलं नाही, असं फडणवीस म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रांना उत्तरं दिली नसली तरी माझ्या पत्रांची दखल घेऊन त्यांनी काही निर्णय घेतले आहेत. सर्वच पत्रांची दखल घेऊन निर्णय घेतलेले नसले तरी काही निर्णय घेतल्याचं मलाही दिसून आलं आहे. असं सांगतानाच मी कधीही विरोधाला विरोध करत नाही. हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे समन्वय साधण्यावर माझा भर असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात स्वयंघोषित मुख्यमंत्रीही आहेत

सरकारचं स्टिअरिंग कुणाच्या हाती आहे, हे मला माहीत नाही. स्टिअरिंग कुणाच्या हातात असावं हे उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवावं. हे सरकार तीन इंजिनच्या ट्रेनसारखं आहे. खरं तर ट्रेनला दोनच इंजिन असतात, पण यांच्या ट्रेनला मध्येही एक इंजिन आहे. त्यामुळे यांची गाडी नक्की चाललीय कुठे? हेच कळत नाही, असा चिमटा त्यांनी काढला. राज्यात अनेक मुख्यमंत्री आहेत. काही सुप्रिम मुख्यमंत्री आहेत तर काही स्वयंघोषित मुख्यमंत्रीही आहेत. आता ही स्वयंघोषित मुख्यमंत्री कोण? हे तुम्हीच ओळखा. मी कशाला सांगू, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री प्रशासन भरोसे
राज्यात मंत्र्यामंत्र्यांमध्ये आणि मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही. सर्व गोंधळ आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा आहे. विचार वेगळा आहे. एकजण निर्णय घेतो तर दुसरा निर्णय रद्द करतो. मुख्यमंत्र्यांना कोणी विश्वासात घेत नाही, अशी सर्व स्थिती आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री पूर्णत: प्रशासनावर अवलंबून आहे. प्रशासनावर अवलंबून असणं गैर नाही. पण किती असावं याला मर्यादा आहेत. घोडा कितीही चांगला असला तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्याच्यावर कमांड हवीच, असा टोलाही त्यांनी लगावला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts