Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5861

तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती!; पवार पुन्हा मोदी सरकारवर बरसले

0

मुंबई: ‘आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती व शेतकऱ्यांशी निगडित होती. आजचे राज्यकर्ते त्यातून काही शिकतील अशा प्रकारची अपेक्षा अण्णासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी करतो’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पुन्हा एकदा केंद्रातील यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. ( )

वाचा:

देशाच्या कृषी क्षेत्रात प्रचंड योगदान देणाऱ्या व सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने सबंध वर्षांत विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या संकल्पनेची शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. ‘केंद्रात अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा व दृष्टीचा ठसा उमटवला. संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं व या क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यात सहभागी करून घेतलं. देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं’, असे शरद पवार म्हणाले.

वाचा:

आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती. त्यांनी अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली व विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली, असेही पवार यांनी नमूद केले. अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबईच्या तापमानात घट; उपनगरांत किमान तापमान १५.३ अंशांवर

0

मुंबई: मुंबईकर गेल्या चार दिवसांपासून गुलाबी थंडीचा अनुभव घेत असून सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट () झाल्याची नोंद झाली आहे. तुलनेने उपनगरातील पारा अधिक घसरला असून उपनगरातील किमान १५.३ अंश इतके नोंदविण्यात आले. ( in the suburbs was 15 3 degrees)

गेल्या आठवडयात मुंबईत कमाल तापमान ३० अंशाच्या आसपास आणि किमान तापमान २० अंशांपेक्षा अधिक नोंदले जात होते. मात्र सोमवारपासून त्यामध्ये घट व्हायला सुरुवात झाली. मुंबईकर गेल्या ४ दिवसांपासून ही घट अनुभवच आहे. उपनगरातील सांताक्रुझ केंद्रावर बुधवारी १५.३ अंश इतके तापमान नोंदवले गेले. तर, मुंबईतील कुलाबा केंद्रावर १८ अंश किमान तापमान होते. उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट नोंदवली गेली. येत्या काही दिवस तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पुढील ३-४ दिवस जाणवणार गारवा

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. असे असले तरी राज्यात अजूनही कडाक्याची थंडी पडलेली नाही. पुढील तीन ते चार दिवस राज्यात काही प्रमाणात गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अजूनही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. याला जळगाव अपवाद आहे. असे असले मध्य महाराष्ट्रात रात्री काहीसा गारवा जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाडयातील तापमान मात्र सरासरीच्या आसपास जाणवत आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईच्या प्रदूषणात वाढ

मुंबई शहर आणि उपनगरांत दोन्ही ठिकाणी प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत सर्वाधिक प्रदूषण कुलाबा येथे आढळल्याची नोंद सफरने (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च) केली आहे. कुलाब्यात प्रदूषक घटकाचे (पीएम २.५) प्रमाण ३४८ इतके होते. मुंबईत एकीकडे थंडी पडत असताना, दुसरीकडे कोरडी हवा आणि आर्द्रता आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि वाढत्या वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा स्तर घसरत चालला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

vaccination: राज्यात उद्दिष्टाच्या ७७ टक्के लसीकरण, गडचिरोली राज्यात अव्वल

0

मुंबई: राज्यात बुधवारी ठेवण्यात आलेल्या लक्ष्याच्या ७७ टक्के लसीकरणाची नोंद झाली. या मध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच तब्बल १२६ टक्के इतके झाले. त्या खालोखाल सातारा, धुळे, जालना, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील १०० टक्क्यांहून अदिक लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात काल बुधवारी ५३८ केंद्रांवर ४१ हजार ४७० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. मुंबईत मात्र पुन्हा लसीकरणाच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी ठेवण्यात आलेल्या लक्ष्याच्या ६८ टक्के इतके लसीकरण झाले. मुंबईत आत्तापर्यंत २३ हजार ३९९ इतके लसीकरण झाले आहे. तर, राज्यात १ लाख ७८ हजार ३७१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

२१९ जणांना दिली गेली कोव्हॅक्सिन लस

भारत बायोटेकने तयार केलेली ‘कोव्हॅक्सिन’ ही लस राज्यातील एकूण सहा ठिकाणी देण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. काल बुधवारी अमरावती जिल्ह्यात एकूण १०० जणांना ही लस देण्यात आली. तर पुणे येथे १७ जणांना, मुंबईत १८ जणांना, नागपूरमध्ये ४० जणाना, सोलापुरात ७ आणि औरंगाबादमध्ये ३७ जणांना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली. म्हणजे बुधवारी राज्यात एकूण २१९ जणांना ही लस देण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

बाळासाहेब ठाकरे वाहन विमा योजना सुरू करा; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

नवी मुंबई: राज्य सरकारने वाहन विमा काढणे हे काम खासगी कंपन्यांकडे न सोपवता सरकारनेच पुढाकार घेऊन राज्यात (Vehicle Insurance Scheme) सुरू करावी आणि या शासकीय वाहन विमा योजनेला (Balasaneb Thackeray) हे नाव देण्यात यावे अशी मागणी नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यासअशी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरेल असेही मागणी करताना मनसेने म्हटले आहे. (launch balasaheb thackeray demands )

दिवसेंदिवस गाड्या वापरण्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्या प्रमाणात रस्ते अपघाताचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. अपघातांमुळे वाहनाचे नुकसान आणि अपघातग्रस्त व्यक्तीचा उपचाराचा खर्च मिळून मोठा आर्थिक फटका व्यक्तीला बसतो. यावर वाहन विमा हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरतो. मोटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम १४६ आणि कलम १४७ अन्वये मोटार वाहन विमा असणे आवश्यक आहे. या अधिनियमांतर्गत योग्य विमा संरक्षण नसलेले वाहन चालवणे बेजबाबदार कृत्य आहे. शिवाय शासकीय वाहन विमा सुरू केल्यास सर्वसामान्य नागरिकांना त्याचा चांगला फायदा तर होईलच, परंतु शासनाला देखील या योजनेचा फायदा मिळेल, असे मनसेचे नवी मुंबईतील शाखाप्रमुख यशवंत खिलारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
अशी योजना सुरू झाल्यास महाराष्ट्र हे स्वत:ची वाहन विमा सुरू करणारे पहिले राज्य ठरेल. शिवाय वाहन विमा सर्वसामान्यांना योग्य दरात उपलब्ध होईल. शिवाय विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूकही टळेल. त्याच प्रमाणे या योजनेतून महाराष्ट्र शासनाला आर्थिक पाठबळही मिळू शकेल, असे खिलारी यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भाजपच्या 'या' नेत्याचं शरद पवारांना पत्र; 'ती' टीका लागली जिव्हारी

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांबाबत तसेच या पदाबाबत काही भावना व्यक्त केल्या होत्या. या संदर्भात विरोधी पक्षनेते यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहिले आहे, तसेच या पत्रासोबत दरेकर यांनी त्यांच्या गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाची प्रतसुद्धा शरद पवार यांना पाठवलेली आहे. हे पुस्तक नजरेखालून घातल्यानंतर, आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतो, याबद्दल आपणास कधीही वाईट वाटणार नाही किंवा या पदाचं अवमूल्यन झाल्याचं शल्यही आपल्याला राहणार नाही. या बद्दल मला विश्वास आहे, असे दरेकर यांनी नमूद केले आहे. आपल्या सूचना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच नवऊर्जा ठरतात, असेही दरेकर यांनी आज शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ( )

वाचा:

प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आपण देशाचे, राज्याचे एक आदरणीय नेते आहात परंतु, मी यासाठी व्यथित झालो की, त्या प्रकरणाची एकच बाजू आपल्यासमोर आल्यामुळे आपल्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाला वाईट वाटलं आणि पदाचं अवमूल्यन झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली. परंतु, मी महिला शेतकऱ्यांबाबत मांडलेला मुद्दा हा प्रत्यक्षदर्शी त्या महिलांशी बोलल्यानंतर व्यक्त केला होता. त्यात कोणताही राजकीय अभिनिवेश नव्हता, उलटपक्षी पदाच्या कर्तव्य भावनेने या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा केलेला एक विनम्र प्रयत्न होता. असेही दरेकर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

वाचा:

दरेकर यांनी पवार यांना पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, “वर्षपूर्तीचा लेखाजोखा” या पुस्तकाच्या निमित्ताने हा संवाद मी पत्ररूपाने आपल्याशी अत्यंत विनम्रतेने साधत आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर माझ्या पक्षाने १६ डिसेंबर २०१९ रोजी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली. विरोधी पक्षनेता म्हणून गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा “लेखाजोखा” सादर करणं, हे मी माझं कर्तव्य समजतो आणि याच कर्तव्य भावनेने मी हा लेखाजोखा तयार केलेला आहे. ज्यावेळी मी या पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी सन १९६० पासून विधान परिषदेला विरोधी पक्ष नेत्यांची थोर परंपरा आहे, याची मला जाणीव होती आणि ही जाणीव सतत जागरुक ठेऊनच मी वर्षभरात विरोधी पक्ष नेता म्हणून कामकाज सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे.

वाचा:

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण देश आणि करोना महामारीशी झुंज देत होता. विरोधी पक्षात असलो, विरोधी पक्ष नेता असलो तरी करोना महामारीशी महाराष्ट्र लढत असताना सरकारच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण सहकार्य करण्याचं अभिवचन आम्ही सरकारला दिलं. एक जबाबदार विरोधी पक्ष नेता या नात्यानं करोना काळात सर्व काळजी घेऊन घराच्या बाहेर पडलो आणि अनेक क्वारंटाइन सेंटर्स, कोविड सेंटर्स, जम्बो कोविड सेंटर्स, विविध रुग्णालयं यांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांतील त्रुटी, रुग्णांच्या व्यथा आणि करावयाचे बदल, याविषयी जाणून घेतलं, त्या त्या महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली आणि उपाययोजनातील त्रृटी मंत्री महोदयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मांडल्या, शिवाय ११० पत्रं लिहून त्यामाध्यमातून सरकारच्या कानावर समस्या घातल्या, असे दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याचवेळी राज्यातील कोणकोणत्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले याचा तपशीलही दरेकर यांनी पत्रात दिला आहे.

वाचा:

मी एक लहान कार्यकर्ता आहे. राज्यातील एक आदरणीय व जेष्ठ नेते म्हणून आपल्याकडे पक्षनिरपेक्षपणे पाहिले जाते आणि माझ्याही आपल्याबद्दल याच भावना आहेत. हा लेखाजोखा सादर करण्यामागे किंवा या पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधण्यामागे स्वस्तुतीचा भाग गौण आहे, त्यापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून मी बजावलेले माझे निहित कर्तव्य आणि या पदाचा सन्मान वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही दरेकर यांनी पुढे म्हटले आहे.

पत्र लिहिण्याचे ‘हे’ आहे कारण

आझाद मैदानातील आंदोलनात भेंडी बाजारातील भगिनी होत्या, असे प्रवीण दरेकर म्हणाले होते. दिल्ली हिंसाचारानंतही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. दिल्लीत जे आंदोलन पेटले आहे तसे वर्तन शेतकरी करूच शकत नाही, असे दरेकर म्हणाले होते. या दोन्ही विधानांचा शरद पवार यांनी समाचार घेतला होता.
शेतकरी आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जे वक्तव्य केले आहे ते ऐकून मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीसुद्धा विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, असे पवार म्हणाले होते. या शाब्दिक चकमकीतूनच दरेकर यांनी पवारांना पत्र लिहिलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख?; 'ही' आहे वस्तुस्थिती

0

मुंबई: भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर भाजपच्या महाराष्ट्रातील खासदार यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने राज्याचे गृहमंत्री यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मात्र, गुगल ट्रान्स्लेटमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसत आहे. ( Anil Deshmukh On Update )

वाचा:

खासदार व एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा स्क्रीनशॉट जोडत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केलं आहे. भाजपची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं? त्यात महाराष्ट्रातील खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच गे समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे, असे चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना या ट्वीटमध्ये टॅग केले आहे. याच ट्वीटच्या आधारे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्वीट करून हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे.

वाचा:

‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल’, असे अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून बजावले आहे.

वाचा:

गुगल भाषांतरामुळे गोंधळ!

प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे. भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व खासदारांची यादी आहे. वेबसाइटवर इंग्रजी आणि हिंदी असे पर्याय आहेत. हिंदीचा पर्याय निवडल्यानंतर खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्यच असल्याचे दिसत आहे. श्रीमती रक्षा खडसे, (महाराष्ट्र) असे कॅप्शन रक्षा यांच्या फोटोला देण्यात आले आहे. तर Raver या इंग्रजी शब्दाचे गुगल ट्रान्स्लेटमध्ये जाऊन भाषांतर केले असता होमोसेक्सुअल असा अर्थ सांगितला जात आहे. त्यामुळे या भाषांतरातूनच हा सारा गोंधळ झाल्याचे दिसत आहे.

वाचा:

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्य असल्याचे आढळते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबई मेट्रो-३: दिल्ली मेट्रोत बसून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला चिमटा

0

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते () यांनी आज दिल्ली मेट्रोतून (Delhi Metro) प्रवास केला आणि कमी वेळेत प्रवास झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र हे सांगत असताना त्यांनी मेट्रो-३ प्रकल्पाच्या () रखडलेल्या कामावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडेले आहे.

‘विमानतळावर जाण्यासाठी मी आज दिल्ली मेट्रोने प्रवास केला. रस्तेमार्गाच्या तुलनेत मी अतिशय कमी वेळेत मेट्रोने विमानतळावर पोहोचलो. महाविकास आघाडीने कारशेडच्या विषयावर घातलेला गोंधळ पाहता मी असाच मुंबईत मेट्रो-३ ने मी विमानतळावर कधी जाऊ शकेल माहीत नाही.’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सत्यजीत तांबे यांनी दिले उत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलेले पाहून काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी फडणवीस यांना लगेचच उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘ प्रिय देवेंद्रभाऊ, तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्या दिल्ली मेट्रोतून आपण दिल्लीत प्रवास केलात तो प्रकल्प दिल्लीतील काँग्रेसच्या सरकारने पूर्ण केला. त्याच प्रमाणे मुंबई मेट्रो प्रकल्प देखील काँग्रेसच्याच कार्यकाळात सुरू करण्यात आला. कृपया सकारात्मक राहा. आम्ही मुंबई मेट्रोचे सर्व टप्पे मार्गी लावू.’

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मेट्रो-३ मार्गिकेच्या आरे कारशेडचा मुद्दा गाजला होता. ही कारशेडसाठी उभारण्यासाठी आरेतील झाडांची रातोरात कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या विरोधात आवाज उठवून आंदोलन छेडले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

क्लिक करा आणि वाचा-
मात्र, कांजूरमार्ग येथील जागा मिठागाराची असल्याचे केंद्र सरकारने सांगितल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता. त्यानंतर हायकोर्टाने कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्यात यावे असे आदेश दिले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेत आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

हिंसाचार प्रकरणी सर्व शेतकरी नेत्यांवर कारवाई होणार; दिल्ली पोलिस आयुक्त म्हणाले…

0

नवी दिल्लीः दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावर ( ) दिल्ली पोलिसांनी आज माहिती दिली. दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव ( ) यांनी आज माध्यमांना माहिती दिली आणि दिल्लीतील हिंसाचाराला शेतकरी नेत्यांना जबाबदार धरले. ( ) शेतकरी नेत्यांनी दिलेली आश्वासनं मोडली, चिथावणीखोर भाषणे दिली आणि यामुळे हिंसाचार सुरू झाला. आमच्याकडे व्हिडीओ फुटेज, गुप्त माहिती असून सर्वांची चौकशी सुरू असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. जो कोणी या हिंसाचारासाठी जबाबदार असेल त्याला सोडणार नाही, असा इशारा आयुक्त श्रीवास्तव यांनी दिला.

‘नियम आणि अटींचे उल्लंघन केले’

‘२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी काही नियम आणि अटी दिल्या होत्या. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली दुपारी १२ वाजता सुरू व्हावी आणि संध्याकाळी ५ वाजता संपली पाहिजे. शेतकरी नेत्यांनी ट्रॅक्टर मोर्चचे नेतृत्व करावं आणि पुढे रहावं, जेणेकरून ते नियंत्रण ठेवू शकतील. ५ हजारांपेक्षा जास्त ट्रॅक्टर असू नयेत आणि शस्त्रे, भाला, तलवार असे काहीही असू नये. रॅलीत शिस्त राखली गेली पाहिजे राहिली. या सर्व अटींना शेतकरी नेत्यांनी ५ फेऱ्यांच्या बैठकीनंतर मंजुरी दिली, असं श्रीवास्तव म्हणाले.

‘हिंसक आंदोलनाची कुणकुण लागली होती’

शेतकऱ्यांनी आपल्या आश्वासनांवरून घुमजाव केल्याचं आम्हाला २५ जानेवारीलाच कळलं होतं. उग्र आंदोलकांना त्यांनी पुढे केलं आणि त्यांनी चिथावणीखोर भाषणं केली. यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट झाला. या लोकांनी २६ जानेवारीला सकाळी ६.३० वाजताच सिंघू सीमेवरून मोर्चाला सुरवात केली. नियोजित मार्गावरून न जाता ते दुसऱ्याच मार्गाने घुसले. त्यांचे नेते सतनाम पन्नू यांनी प्रक्षोभक भाषण केले. यामुळे शेतकरी बॅरीकेड्स तोडू लागले. दर्शन पाल यांनीही नियोजित मार्गावर जाण्यास नकार दिला, असं आयुक्त म्हणाले.

‘शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केला’

ट्रॅक्टर रॅली १२ वाजात सुरू करायचं ठरलं होतं. पण टिकरी आणि गाझीपूर इथून सकाळी ८.३० वाजताच रॅलीला सुरवात केली. ते बॅरिकेडस तोडून पुढे निघाले. त्यांचे नेते सतनामसिंग पन्नू यांनी चिथावणीखोर भाषण दिले. यानंतर हिंसाचार सुरू झाला. टिकरीमधून बाहेर पडलेल्या शेतकर्‍यांनी नांगलोई येथे धरणे आंदोलन केले. त्यांनी बॅरिकेड्स फोडून हिंसाचार देखील केला. एका कंटेनरद्वारे त्यांनी रस्तावरील बॅरिकेड्स हटवली आणि लाल किल्ल्यावर पोहोचले. गाझीपूरहून बाहेर पडलेल्या शेतकर्‍यांनी अक्षरधाम येथे बॅरीकेड्स तोडले. हे शेतकरीही लाल किल्ल्यावर पोहोचले, असं आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितलं.

‘आमच्याकडे पर्याय होते, पण संयम राखला’

‘हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी संयम राखला. आमच्याकडे सर्व पर्याय होते. पण आम्ही संयम ठेवला. कुठलीही जीवित आणि वित्त हानी होऊ नये, म्हणून आम्ही शांत राहिलो. अटी व शर्ती मान्य न केल्यामुळे हिंसाचार झाला असून सर्व शेतकरी नेते यात सामील आहेत, असा दावा पोलिस आयुक्तांनी केला.

‘पोलिसांमुळे एकाचाही बळी गेला नाही’

शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनात ३९४ पोलिस जखमी झाले आहेत. काही पोलिस आयसीयूमध्ये दाखल आहेत. ८२८ पोलिस बॅरिकेड्स, ८ टायर किलर्स, ४ स्टील गेट्स, ३० पोलिस वाहने, ६ कंटेनर आणि डंपरचे नुकसान झाले. इतक्या मोठ्या हिंसाचारानंतरही पोलिसांच्या हातून एकाही व्यक्तीचा जीव गेला नाही. पोलिसांनी संयमाने या सर्व परिस्थिती हाताळली. आम्ही फक्त अश्रुधुराचा वापर केला, असं आयुक्त म्हणाले.

‘लाल किल्ल्यातील घटना गंभीरतेने घेतली’

दिल्लीक बेकायदशीरपणे केले आंदोलन आणि त्यादरम्यान केलेला हिसांचार आणि लाल किल्ल्यात पुरातत्व विभागाच्या मालमत्तेचे झालेले नुकसान आणि झेंडा फडकवण्याची घटना आम्ही गंभीरतेने घेतली आहे. या घटनांच्या दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी २५ हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

‘शेतकरी संघटना चौकशी होणार आणि कारवाई कणार’

हिंसाचार प्रकरणी २५ गुन्हे दाखल झाले आहेत. १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ५० संशयितांची चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि चेहऱ्याच्या ओळखीवरून हिंसा करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. एकाही आरोपीला सोडणार नाही. हिंसाचारात शेतकरी नेते आढळून आले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली पोलीस शेतकरी संघटनांची चौकशी करेल आणि कारवाई करेल, असं दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

इंग्लंविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराट कोहलीला मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पाठवली कायदेशीर नोटीस

0

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. पण त्यापूर्वीच कोहलीला एक मोठा धक्का बसला आहे. कोहलीला केरळच्या उच्च न्यायालयाने एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. आता कोहलीला या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार आहे.

कोहलीचे बरेच चाहते आहेत. पण कोहली एका ऑनलाइन रमी गेमचा सदिच्छादूत आहे. या गेमचे व्यसन तरुण पिढीला लागलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी बरेच पैसे गमावले आहेत. त्यामुळे या गेमविरोधात आणि त्याचे प्रमोशन करणाऱ्या व्यक्तींविरोधात केरळ उच्च न्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती. केरळ उच्च न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली असून आता विराट कोहलीसह अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अभिनेता अजू वर्गीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

युवा पिढी ही भारतातील सेलिब्रेटींची चाहती असते. ते ज्या गोष्टी सार्वजनिकपणे दाखवतात, त्या गोष्टी युवा पिढी करण्याचा प्रयत्न करत असते. या गेमममध्ये युवा पिढीतील बऱ्याच जणांनी पैसे गमावले आहेत, तर काही जणांवर जीव गमावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे हा गेम थांबवण्यात यावा, याबाबत केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या पाऊली वडक्कन यांनी याबाबत केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की,” या ऑनलाईन गेमममध्ये देशातील बऱ्याच लोकांनी पैसे गमावले आहेत, त्याचबरोबर काही जणांचा यामुळे जीवही गेला आहे. २७ वर्षीय विनित या युवकाने या गेमममध्ये तब्बल २१ लाख रुपये गमावले, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्यामुळे हा गेम बंद करण्यात यावा, अशी याचिका मी उच्च न्यायालयात केली होती.”

या ऑनलाइन गेममध्ये ३२ वर्षीय सजेश यानेही मोठी रक्कम गमावली आहे. याबाबत सजेश म्हणाला की, ” याप्रकरणी उच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेत योग्य आहे आणि मी या निर्णयाचे स्वागत करतो. कारण मी अशा बऱ्याच व्यक्तींना ओळखतो की, ज्यांनी या गेममध्ये मोठी रक्कम गमावली आहे. मी स्वत: या ऑनलाइन गेममध्ये सहा लाख रुपये हरलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची घेतलेली दखल योग्यच आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Teera Kamat: लहानग्या तीराला वाचवण्यासाठी उभे केले १६ कोटी; आता सरकारने उचलावे 'हे' पाऊल

0

मुंबई: घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं की आपल्या दारी स्वर्गच अवतरल्यासारखं वाटतं… गोंडस बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर जीवनात सर्वकाही प्राप्त झाल्याचं समाधान कुटुंबात असतं… मुंबईतील कामत कुटुंबातही हेच वातावरण होतं. कुटुंबीयांनी नवजात बालिकेचं नाव ठेवलं तीरा. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. कामत कुटुंबीयाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या ५ महिन्यात तीराला () हा दुर्धर आजार झाल्याचं निष्पन्न झालं. या आजारावर भारतात उपचार उपलब्ध नाहीत. अमेरिकेत मात्र यावर उपचार आहे. मात्र तो उपचार कोणत्याही सामान्य व्यक्तीला परवडणारा नाही. याचे कारण म्हणजे या आजारावरील इंजेक्शनची किंमत आहे तब्बल १६ कोटी रुपये इतकी.

तीराच्या आई-बाबांना काही दिवसांतच उभारले १६ कोटी रुपये

तीराच्या आईबाबांनी हार मानली नाही. त्यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी क्राउड फंडिंगद्वारे ही रक्कम उभी करण्याचे ठरवले. त्यातून १६ कोटी रुपये ही प्रचंड मोठी रक्कम उभी देखील राहिली. मात्र कामत कुटुंबापुढील समस्या संपलेल्या नव्हत्या. त्यांच्यापुढे आणखी एक समस्या उभी ठाकली.

कामत कुटुंबासमोर उभी ठाकली आणखी नवी समस्या
इतक्या मोठ्या समस्येवर अथक परिश्रमाने मात केल्यानंतर आणखी मोठी समस्या आपल्या वाटेत उभी राहील याची कामत कुटुंबाला कल्पना नव्हती. ती म्हणजे हे दुर्मिळ औषध भारतात आणण्यासाठी भरावी लागणारे सीमा शुल्क (कस्टम ड्युटी). सीमा शुल्काची ही रक्कम सुमारे २ ते ५ कोटी इतकी असू शकते. हे कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचेच काम आहे. हे लक्षात घेत हे सीमा शुल्क माफ करावे अशी विनंती कामत कुटुंबाने केंद्र सरकारकडे केली आहे.

चिमुकल्या तीरावर हाजीअली येथे सुरू आहेत उपचार
हाजीअली येथील एमआरसीसी या लहान मुलांच्या रुग्णालयात चिमुकल्या तीरावर उपचार सुरू आहेत. तीराची तब्येत नाजूक आहे. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तीरावर तत्काळ उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी रुग्णालयाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही केंद्र सरकारला केली विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी केंद्र सरकारला विनंती केली आहे. या बालिकेला पंतप्रधान कार्यालयाने मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी असे आवाहन त्यांनी ट्विट करत केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- काय आहे स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी आजार?

स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी अर्थात SMA हा आजार जनुकीय बदलांमुळे (Genetic desese) होणारा आजार आहे. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. सुरुवातीला हात, पाय आणि पुढे फुफ्फुसांच्या स्नायुंची शक्ती कमी होते. त्याचबरोबर चेहरा आणि मानेच्या स्नायुंची शक्ती कमी होते. यामुळे रुग्णाला गिळताना अडचण निर्माण होऊ लागते. या आजारामुळे रुग्णाला हालचाल करणेही कठीण होऊन बसते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts