Sunday, June 4, 2023
Home Blog Page 6338

'३० हजार कोटींचा टीआरपी घोटाळा; आता पोलिसांचे पाय कोणी मागे खेचू नये'

0

मुंबईः ‘महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट्स समाज माध्यमांवर निर्माण केली. त्यात भर पडली ती एका कर्कश वृत्तवाहिनीच्या टीआरपी घोटाळ्याची. मुंबई पोलिसांनी हे सर्व समोर आणले. पोलिसांचे पाय आता कोणी खेचू नयेत,’ असा खरमरीत टीका यांनी केली आहे.

‘सामना’तील रोखठोक सदरात मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्याविषयी लिहलेल्या लेखात राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं आहे. ‘सुशांतसिंह प्रकरण हे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी कसं वापरण्यात आलं याचा स्पष्ट खुलासा आता झाला आहे. याबाबत स्वतःला नैतिकतेचे पुतळे समजणारे लोक दुसऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी स्वतः पांढरपेशी दरोडेखोर होतात व समाजातला एक वर्ग या दरोडेखोरीचं समर्थन करतो हे भयंकर आहे. कर्कश चॅनेलनं सुशांत प्रकरणात ज्या आरोळ्या ठोकल्या त्या त्यांच्याच घशात मुंबई पोलिसांनी घातल्या. हा एक आर्थिक घोटाळा आहे व टीआरपी वाढावा यासाठी घरोघरी पैसे वाटले गेले हा खुलासा पोलिसांनी केला आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री देशमुख व संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करुन चिखलफेक करण्यासाठी पैशाचा वापर झाला. हे पैसै नक्की कुठून आले, त्यांच्या बोलवता धनी आणि पैसे पुरवणारा धनी कोण हे स्पष्टपणे समोर आलं पाहिजे, पण चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. त्या चोरांना आता महाराष्ट्रानं सोडू नये,’ असं आवाहनचं संजय राऊत यांनी केलं आहे.

‘पोलीस आणि प्रशासन हे राष्ट्राच्या चार प्रमुख स्तंभांपैकीच एक आहेत. राजकीय फायद्यासाठी त्या स्तंभावरच घाव घालायचे ही मानसिकता धोकादायक आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेवर आणि इमानदारीवर या काळात मोठा हल्ला चढवला गेला. सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाउंट्स उघडून ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुकेत खाती बाहेरच्या देशांतून चालवली गेली हे समोर आलं. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यानं चालले होते त्याचा गौप्यस्फोट करण्याची गरज नाही,’ असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

‘सीबीआचे माजी संचालक अश्निनीकुमार यांनी आत्महत्या केली यावर हे महाशय मुके झाले व टीआरपीसाठी त्यांनी या आत्महत्येचा विषय घेतला नाही. पाचशे रुपये वाटून फक्त आपले चॅनेल बघण्यासाठी जो घृणास्पद प्रकार झाला तो संपूर्ण देशाला काळिमा फासणारा आहे. ८० हजार फेक अकाउंट आणि ३० हजार कोटींचा याविरोधात सगळ्यांनी एकवटले पाहिजे. मुंबई पोलिसांनी ही कीड चिरडण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याचे पाय खेचणाऱ्यांनी देशहिताशी गद्दारी करु नये,’ असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बिहारमध्ये 'धनुष्यबाणा'ला आक्षेप; शिवसेनेला निवडणूक आयोगानं 'बिस्किट' दिलं

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.

बिहारमध्ये यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष सत्तेत असून ‘बाण’ हे जदयूचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेचेही नेमके ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ऐन निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो आणि आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे केला होता. शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी देऊ नये, अशी मागणीही जदयूने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणावर निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध निवडणूक चिन्हापैकी एक चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली. बिहारमध्ये किमान ५० जागा लढविण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा

त्यानुसार शिवसेनेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एक निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण यापैकी कोणतेच चिन्ह त्यांना मिळाले नाही. त्याऐवजी त्यांना बिस्किट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. शिवसेनेने बिस्किट हे निवडणूक चिन्ह देण्यावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिले असून निवडणूक आयोगाच्या उत्तराची शिवसेनेला प्रतीक्षा आहे.

दरम्यान २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुक शिवसेनेने एकूण २४३ जागांपैकी ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेला एकूण २ लाख ११ हजार १३१ मते मिळाली होती. एकूण ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. तर यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

TRP Scam: 'रिपब्लिक'च्या आणखी चौघांना समन्स; 'या' दोघांची ८ तास चौकशी

0

मुंबई: टेलीव्हिजन क्षेत्रातील उघडकीस आणल्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. दोन जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींची शनिवारी आठ तास चौकशी केल्यानंतर आता नेटवर्कच्या चौघांना नव्याने समन्स जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, रिपब्लिकचे मुख्य वित्त अधिकारी (CFO) शिवा सुब्रमण्यम सुंदरम सध्या दिल्लीत असल्याने आज चौकशीसाठी येऊ शकले नाही. पोलिसांनी आज ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आणखी दोन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ( Latest Updates )

वाचा:

पैसे देऊन टीआरपी वाढविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ‘फक्त मराठी’, ” या दोन चॅनेल्सचे मालक शिरीष सतीश पट्टानशेट्टी आणि नारायण नंदकिशोर शर्मा, हंसा कंपनीचा माजी कर्मचारी विशाल भंडारी याच्यासह बॉम्बपल्ल्याराव नारायण मिस्त्री याला अटक केली. सहायक आयुक्त शशांक सांडभोर, सी. आय. यु चे यांचे पथक या आरोपींची कसून चौकशी करीत असून चौकशीत ज्यांची नावे समोर येत आहेत त्यांना समन्स बजावण्यात येत आहेत. शनिवारी लिंटास आणि मेडिसन या जाहिरात एजन्सीचे शशी सिन्हा आणि मेडिसनचे सॅम बलसारा यांची आठ तास चौकशी करण्यात आली. आपल्या एजन्सीकडून किती चॅनेल्सना गेल्या दोन वर्षात जाहिराती देण्यात आल्या. कोणत्या आधारावर जाहिरात दिल्या आणि किती दर आकारण्यात आले याची माहिती या प्रतिनीधींकडून घेण्यात आली. तसेच या प्रतिनींधीच्या संपर्कात चॅनेल्समार्फत नेमके कोण होते? याबाबतची माहीतीही घेण्यात आली. याशिवाय विशाल भंडारी याच्याकडे असलेल्या ८३ बॅरोमीटर्स पैकी ३८ कुटुंबांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.

वाचा:

जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींची चौकशी करतानाच मुंबई पोलिसांनी आज आणखी सहा जणांना समन्स जारी केले. रिपब्लिक नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी, मुख्य ऑपरेटर अधिकारी हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी, वितरण विभागप्रमुख घनःश्याम सिंग यांच्यासह हंसा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात आमच्या अर्जावर आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रिपब्लिकचे सीएफओ शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

लग्नसोहळ्यासाठी मावशीसोबत आली होती; नदीपात्रात वाहून गेली!

0

जळगाव: तालुक्यातील बहाळ येथे काठालगत असलेल्या दत्त मंदिराजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींपैकी एक मुलगी पाण्यात पडून वाहून गेली. शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. (वय १३) असे वाहून गेलेल्या मुलीचे नाव आहे.

वाचा:

बहाळ येथे शुक्रवारी दि. १० रोजी राजेंद्र मरसाळे यांच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नासाठी ह्या मुली आलेल्या होत्या. पूनम ही आपल्या मावशीसोबत लग्नासाठी आली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजता ती लग्नासाठी आलेल्या अन्य दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी घराच्या समोरच असलेल्या गिरणा नदीवर आली. कपडे धुऊन झाल्यावर त्या आंघोळीसाठी नदीपात्रात उतरल्या.

वाचा:

दोघी बहिणींना वाचवण्यात यश

नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पूनम ही वाहून गेली. तर तिच्या सोबत खुशी चंदू सौदागर (वय १३) व मनीषा चंदू सौदागर (वय ११ रा. भोकरभारी ता. पारोळा) या मात्र थोडक्यात बचावल्या. या दोघी पाण्यात बुडत असतानाच काही अंतरावर असलेल्या गणेश अशोक भोई याच्या लक्षात आले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता नदीपात्रात उडी मारत दोन्ही मुलींना पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर पूनमचा शोध घेण्यात आला. सावदा पर्यंत गिरणा नदी पात्रात शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागला नाही. शोधकार्य दिवसभर सुरू होते. मात्र पूनम आढळली नाही. नदीकिनारी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, पूनम ही दुपारी गावी येथे वडिलांकडे जाणार होती. वडील उखा किशन खैरनार यांची परिस्थती गरिबीची असल्याने पूनम ही गेल्या सात, आठ महिन्यापासून मावशीकडे पनवेल येथे वास्तव्यास होती. उखा खैरनार यांना दोन मुलगे आणि तीन मुली आहेत. त्यापैकी पूनम ही धाकटी होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोनाला रोखणे सहज शक्य!; CM ठाकरेंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

0

वाशिम: करोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. करोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले. ( On )

वाचा:

बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. करोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र मेहनत करीत आहे, याचा सार्थ अभिमानच आहे. मात्र त्यासोबत नागरिकांनीही करोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत काही प्रमाणात बदल केल्यास करोनाला रोखणे सहज शक्य आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

वाचा:

वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून करोनाशी लढा देण्यासाठी कशी वेगाने यंत्रणा उभारण्यात आली त्याचा धावता आढावाही घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, करोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा राज्यात केवळ एक-दोनच विषाणू चाचणी प्रयोगशाळा होत्या. आता राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार वाशिम येथे विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी आज पूर्ण झाली. या प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून चाचण्यांची संख्या वाढवावी. करोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचणीची सुविधा, उपचार केंद्रांची संख्या वाढविली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून लोकांची आरोग्य तपासणी करतो आहोत. त्यामुळे करोना संसर्गाचा आलेख कमी होण्यास मदत होईल.’

वाचा:

आरोग्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात ४०० पेक्षा अधिक विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ह्या प्रयोगशाळा होत आहे. पालकमंत्री यांनी या प्रयोगशाळेसाठी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रयोगशाळेमुळे चाचण्यांची गती आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढेल. जिल्ह्याचा करोना मृत्युदर हा केवळ १ टक्का आहे, ही चांगली बाब आहे. जिल्ह्यात करोना बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सच्या प्रमाणात फक्त ७ टक्के रुग्ण भरती आहेत, तर ९३ टक्के बेड्स रिकामे आहेत, हीसुद्धा समाधानाची बाब आहे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

CSK vs RCB: धोनीवर कोहलीच ठरला भारली, आरसीबीची विजयी भरारी

0

दुबई,
vs
: कर्णधार विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद ९० धावा आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे आरसीबीने चेन्नईवर विजय मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारताचे आजी-माजी कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण या सामन्यात कोहली धोनीवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्याचे पाहायला मिळाले. भेदक गोलंदाजीमुळेच आरसीबीला चेन्नईवर ३७ धावांनी विजय मिळवता आला.

आरसीबीच्या १७० धावांच्या पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात आश्वासक झाली नाही. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी यावेळी सावध सुरुवात केली. पण स्थिरस्थावर झाल्यावर या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. आरसीबीच्या वॉशिंग्टन सुंदरला मोठा फटका मारण्याच्या नादात या दोघांनीही आपल्या विकेट्स गमावल्या. फॅफला यावेळी आठ धावा करता आल्या, तर वॉटसनला यावेळी १४ धावांवरच समाधान मानावे लागले.

वॉटसन बाद झाल्यानंतर फलंदाजीला चेन्नईकडून पदार्पण करणारा एन. जगदीशन आला. जगदीशननेही सावध सुरुवात केली. काही मोठे फटके त्याने लगावले खरे, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. जगदीशनने यावेळी २८ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर ३३ धावा केल्या. धोनीला देखील यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले, तर सॅम करन भोपळाही न फोडता आऊट झाला. स्थिरस्थावर झालेला अंबाती रायुडू यावेळी मोक्याच्या क्षणी बाद झाला. रायुडूने ४० चेंडूंत ४२ धावा करता आल्या. आज ड्वेन ब्राव्होला पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाली खरी, पण तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातामधून निसटलेला होता.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकिकडे आरसीबीचे फलंदाज अपयशी ठरत असताना कोहलीने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. कोहलीच्या या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीला चेन्नईच्या संघापुढे विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवता आले. विराट कोहलीने यावेळी ९० धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

कारचालकाचे भररस्त्यात अश्लील चाळे; तरुणीने दाखवले धाडस

0

मुंबई: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणीला जवळ बोलावून कारचालकाने तिच्यासमोरच अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार घाटकोपरमध्ये घडला. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत तत्काळ या विकृत कारचालकाला अटक केली आहे. ( Latest Updates )

वाचा:

पूर्वेकडील रोडवरून शनिवारी सायंकाळी बिठू हा कार घेऊन जात होता. याचवेळी या ठिकाणी उभ्या असलेल्या २१ वर्षीय तरुणीवर त्याची नजर पडली. त्याने कार रस्त्याच्या कडेला घेतली आणि पत्ता विचारण्याचा बहाणा करून या तरूणीला जवळ बोलावले. ही तरुणी जवळ येताच बिठू याने तिच्यासमोर अश्लील चाळे केले. त्याच्या या कृत्यामुळे सदर तरुणी हादरलीच. मात्र लगेचच स्वत:ला सावरत तिने धाडसाने बिठूला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिथून पळून गेला.

वाचा:

दरम्यान, तरुणीने लगेचच गाठून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला व तपास सुरू केला. कारच्या क्रमांकावरून टिळकनगर पोलिसांनी पुढच्या काही तासांतच बिठू पालसिंग पारचा या आरोपीला शोधून काढले व बेड्या ठोकल्या.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

IPL 2020: चेन्नईवर विजय मिळवल्यावर आरसीबीने गुणतालिकेत कोणते स्थान पटकावले, पाहा…

0

दुबई, : आरसीबीने आजच्या सामन्याच चेन्नई सुपर किंग्स संघावर ३७ धावांनी साकारला. या सामन्यातील विजयानंतर आरसीबीने गुणतालिकेत झेप घेतल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यानंतर विराट कोहलीचा आरसीबी संघ गुणतालिकेत कितव्या स्थानावर पोहोचला आहे, पाहा…

या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ पाच सामने खेळला होता. या पाच सामन्यांमध्ये आरसीबीने तीन विजय मिळवले होते आणि त्यांना दोन पराभव पत्करावे लागले होते. पण शनिवारच्या सामन्यात त्यांनी चेन्नईच्या संघावर ३७ धावांनी दमदार विजय मिळवला. हा आरसीबीचा आतापर्यंतचा चौथा विजय ठरला आहे. त्यामुळे या विजयासह आरसीबीचे आठ गुण झाले आहेत. त्यामुळे आठ गुणांसह आरसीबीने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.

या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर होता. कारण चेन्नईचा संघ सहा सामने खेळला होता आणि त्यांना चार पराभव पत्करावे लागले होते. या सहा सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर फक्त दोन विजय होते. आजच्या सातव्या सामन्यातही चेन्नईच्या संघाला आरसीबीकडून ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता सात सामन्यांमध्ये चेन्नईचे पाच पराभव झाले आहेत. या पराभवानंतरही गुणतालिकेत चेन्नईच्या संघाबाबत कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. कारण या पराभवानंतही चेन्नईचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

गुणतालिकेत पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे, तर दुसरे स्थान मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावले आहे. तिसऱ्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे, तर आज आरसीबीने चौथे स्थान पटकावले आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे, तर सहाव्या स्थानावर चेन्नईचा संघ आहे. गुणतालिकेत सातव्या आणि आठव्या स्थानावर अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब हे संघ आहेत.

कर्णधार विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद ९० धावा आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे आरसीबीने चेन्नईवर विजय मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारताचे आजी-माजी कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण या सामन्यात कोहली धोनीवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्याचे पाहायला मिळाले. भेदक गोलंदाजीमुळेच आरसीबीला चेन्नईवर ३७ धावांनी विजय मिळवता आला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

खडसेंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी सज्ज!; आता 'या' नेत्याने दिले मोठे संकेत

0

जळगाव: काँग्रेसचे नेते व माजी मंत्री यांनी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत आज जळगावात पत्रकारांशी बोलताना दिले. ‘एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्ही एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागतच करू’, अशी प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. ( Leader On )

वाचा:

‘भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. वरिष्ठ नेत्यांनी खडसेंबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्याला पाठिंबा असेल. खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाला फायदा होणार असेल, पक्षसंघटन मजबूत होत असेल तर चांगलेच आहे. आम्ही खडसेंचे पक्षात स्वागतच करू’, असे गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

वाचा:

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक पक्ष संघटनेत फेरबदल होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी गुलाबराव देवकर यांना विचारणा केली असता, त्याबाबत मात्र त्यांनी कानावर हात ठेवले. पक्ष संघटनेत फेरबदल होणार, याबाबत काहीही हालचाली सुरू नाहीत. अशी बातमी माध्यमांमधूनच मला समजली. पण तसे काहीही नाही. सध्या जिल्ह्यातील पक्षसंघटनेचे उत्तम काम सुरू आहे. त्यामुळे फेरबदलाचा विषयच नाही, असे गुलाबराव देवकर म्हणाले.

वाचा:

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते यांनीही एकनाथ खडसे यांच्याबाबत नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना सकारात्मक विधान केले होते. राष्ट्रवादीमध्ये योग्य लोकांचे नेहमीच स्वागत केले जाते. आमचा पक्ष कर्तव्यवान माणसाला स्वीकारत असतो. त्यादृष्टीकोनातून पक्षात कोणी येऊ इच्छित असतील तर राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी अशा चांगल्या लोकांना वाट करून द्यावी असे मला वाटते, असे राजेश टोपे म्हणाले होते. टोपे यांच्यानंतर आता गुलाबराव देवकर यांनीही खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशास पाठिंबा दिल्याने चर्चेत आणखी रंग भरला गेला आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे किंवा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मात्र यावर तूर्त सस्पेन्स राखण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

TRP घोटाळा प्रकरणी काँग्रेसचा 'हा' आरोप भाजपला झोंबला

0

मुंबई: प्रेक्षकसंख्या वाढविण्यासाठी गैरप्रकार करणाऱ्या वाहिन्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र या वाहिन्यांच्या आडून भाजपवर टीका करणारे प्रवक्ते आपल्या भविष्यकाळातील पराभवासाठीच्या सबबी शोधत असावेत. सरकारला सर्व स्तरांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात आहे, अशा शब्दांत भाजपने घोटाळ्याच्या निमित्ताने होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ( Attacks Over )

वाचा:

काँग्रेसने गेल्या पाच सहा वर्षांत ईव्हीएम, निवडणूक आयोग यांच्यावर आपल्या पराभवाचे खापर फोडले आहे. जनतेने आपल्याला नाकारले हे खुल्या दिलाने मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेतृत्वाने मतदान यंत्रे, निवडणूक आयोग यांच्यावर दोषारोप केले आहेत. पूर्वी पराभवानंतर मतदान यंत्रे, निवडणूक आयोग वगैरेंवर खापर फोडले जायचे. आता निवडणुकांपूर्वीच निमित्त शोधण्याचा प्रकार चालू आहे. आता काही माध्यमांवर झालेल्या कारवाईच्या निमित्ताने भाजपाला लक्ष्य करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न म्हणजे ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ असाच प्रकार आहे. मतदार मोदी सरकार विरुद्धच्या अशा अपप्रचाराला थारा देत नाहीत, हे २०१९ च्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. राफेल विमानांच्या खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक केली होती. मात्र मतदारांनी २०१४ पेक्षाही अधिक जागा भाजपला देऊन काँग्रेसला सणसणीत चपराक लगावली होती, याचा काँग्रेसला विसर पडलेला दिसतो आहे. देशात घडलेल्या कोणत्याही घटनेला भाजपाला जबाबदार धरण्याऐवजी मतदार आपल्याला वारंवार का नाकारतात याचे आत्मपरिक्षण काँग्रेसने करावे, असा खरमरीत सल्ला महाराष्ट्र भाजपने दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वेगवेगळया आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात असावा, अशी शंका घेण्यास जागा आहे. अन्यथा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन आपली कार्यक्षमता जगजाहीर करण्यास सांगण्याचे काहीच कारण नव्हते, असेही भाजपने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. एखादी वाहिनी गैरप्रकार करून आपली प्रेक्षकसंख्या फुगवून दाखवत असेल तर त्या वाहिनीवर कारवाई करणे समर्थनीयच आहे. भाजपा अशा गैरप्रकारांना कदापी पाठीशी घालणार नाही. मात्र राजकीय सूडबुद्धीने एखाद्या वाहिनीला लक्ष्य केले जात असेल तर त्याला भाजपा जोरदार विरोध करेल. महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्षांना अडचणीच्या ठरतील अशा बातम्या प्रसारित केल्या म्हणून दूरचित्रवाणी वाहिन्यांना काही ना काही निमित्ताने कोंडीत पकडले जात असेल तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरेल, असेही भाजपच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी हे पत्रक प्रसिद्धीसाठी जारी केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts