Sunday, June 4, 2023
Home Blog Page 6382

शरद पवारांनी टोचून घेतली करोनावरील लस?; नेमकं काय घडलं जाणून घ्या

0

पुणे: राज्यात आणि देशात संसर्गाने थैमान घातले असताना करोनावरील लशीसाठी सगळेच पुण्यातील इन्स्टिट्युकडे डोळे लावून बसले आहेत. याच इन्स्टिट्युटला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी आज भेट दिली. या भेटीत पवार यांनी स्वत: करोनाची लस टोचून घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याबाबत नेमकी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता ताणली गेली. ( Visits Covid-19 Vaccine Maker )

सीरम इन्स्टिट्युटने करोना संसर्गावर लस तयार करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सध्या युद्धपातळीवर या लशीवर काम सुरू आहे. त्याबाबत शरद पवार सातत्याने अपडेट्स जाणून घेत आहेत. १ ऑगस्ट रोजी शरद पवार यांनी सीरममध्ये जाऊन लस बनवण्याचे काम कुठवर आलंय याची माहिती घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पवार सीरममध्ये पोहचले.

शरद पवार यांनी सीरमभेटीत टोचून घेतल्याची माहिती काही वेळातच बाहेर पसरली. त्यामुळे सीरम भेटीनंतर पवारांना पत्रकारांनी पहिला प्रश्न हाच विचारला. मग पवारांनी याबाबतची सत्यता सर्वांना सांगितली. पवारांच्या स्पष्टीकरणाने चर्चांनाही पूर्णविराम मिळाला.

मी करोनावरील लस घेतली, असे सांगितले जात असले तरी त्यात कोणतेही तथ्य नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मी सीरममध्ये लस टोचून घेतली हे खरे आहे मात्र ती लस रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे, असे पवार यांनी नमूद केले. सीरममध्ये प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या लशीची निर्मिती होते. मी व माझ्या स्टाफने आज हीच लस घेतली आहे, असेही पवार म्हणाले. सीरमचे प्रमुख पूनावाला हे शरद पवार यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे पवारांसाठी त्यांनी करोना लशीची व्यवस्था केली असेल, असे तुम्हाला वाटत असेल पण तसं काहीही नाही, असे मिश्कीलपणे पवार म्हणाले. करोनावर सीरमची लस यायला नव्या वर्षाचा जानेवारी महिना उजाडेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राज्यावर करोनाचं संकट आलं असताना शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक म्हणून सुरुवातीपासूनच मैदानात उतरलेले आहेत. वय आणि प्रकृतीची पर्वा न करता पवार सातत्याने विविध भागांत जाऊन करोना स्थितीचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही ते या स्थितीवर वारंवार चर्चा करत आहेत. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्यातही पवार यांच्या सल्ल्याने अनेक निर्णय घेतले जात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

CSK vs SRH: सामन्यापूर्वीच धोनीला मिळाली खूष खबर, 'या' दोन खेळाडूंची होणार एंट्री

0

दुबई, : आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वात महत्वाचा असणार आहे. पण या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एक खूष खबर मिळाली आहे. चेन्नईच्या संघात दोन खेळाडूंची एंट्री होणार असल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे.

चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला होता. या विजयात चेन्नईचा फलंदाज अंबाती रायुडूने धडाकेबाज खेळी साकारली होती. रायुडूच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने मुंबईला पराभूत केले होते. पण त्यानंतच्या दोन सामन्यांमध्ये रायुडू आपल्याला चेन्नईच्या संघात दिसला नाही. रायुडूला पहिल्या सामन्यानंतर दुखापत झाली होती. त्यामुळे तो दोन सामने खेळू शकला नव्हता. पण आता रायुडू पूर्णपणे फिट झाला असून तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला असल्याचे म्हटले जात आहे.

आतापर्यंत दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्होदेखील चेन्नईच्या तिन्ही सामन्यांना मुकलेला होता. पण आता ब्राव्हो हा फिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघात रायुडूबरोबर ब्राव्होचीही एंट्री होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ब्राव्हो आणि रायुडू जर चेन्नईच्या संघात आले, तर नक्कीच त्यांना बळकटी मिळेल. त्याचबरोबर आजच्या महत्वाच्या सामन्यात या दोघांचीही कामगिरी निर्णायक ठरू शकते.

सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्ससारखा बलाढ्य संघ हा आयपीएलच्या गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चांगलाच कस लागणार आहे. चेन्नईचा आजचा सामान हैदराबादबरोबर होणार आहे. त्यामुळे हैदराबादला पराभूत करून चेन्नईचा संघ तळाचे स्थान सोडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चेन्नईच्या संघाने या आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना सलग दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांचा संघ आठव्या स्थानावर आहे. आतापर्यंत धोनीला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्याचबरोबर चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना आतापर्यंत सूर गवसल्याचे पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे चेन्नईचा संघ या सामन्यात सलामीच्या जोडीत बदल करण्याची शक्यता आहे. हा सामना जर चेन्नईला जिंकायचा असेल तर त्यांना संघात नक्कीच काही बदल करावे लागतील. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईच्या संघात कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

१०० वर्षे जुने कडुलिंबाचे झाड तोडले; दिली 'ही' शिक्षा

0

म. टा. प्रतिनिधी, नगर: तालुक्यातील पठारवाडी येथील घोडोबा देवस्थान मंदिराजवळील शंभर वर्षांहून अधिक जुने कडुलिंबाचे झाड तोडणाऱ्याला एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय पावसाळ्यात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करून ती मोठी होईपर्यंत त्यांची देखभाल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पारनेरचे वृक्ष अधिकारी तथा वन अधिकारी एस. व्ही. गोरे यांनी हा आदेश दिला.

शहरी भागात महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६४ ची बऱ्यापैकी अमंलबजावणी होते. ग्रामीण भागात मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, पाठपुरावा केला तर शिक्षा होऊ शकते, हे या घटनेतून दिसून आले आहे. पठारवाडी येथील घोडाबा मंदिरासमोर मोठे कडुलिंबाचे झाड होते. ते तेथील काही लोकांनी कापले. याची तक्रार परिसरात राहणारे रामदास घावटे यांनी वन अधिकारी व पारनेरच्या तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांच्या आदेशानंतर वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या संतोष बबन काळे यांनी झाड तोडल्याची कबुली दिली.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना अडचण होते व फांद्या तुटून पडण्याचा धोका असल्याने झाड तोडल्याची कबुली काळे यांनी दिली होती. मात्र, यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे काळे यांच्याविरोधात वृक्षतोड बेकायदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर वन अधिकारी गोरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये काळे यांना दोषी ठरवून एक हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच पावसाळ्यात वृक्ष लागवड करून जतन करण्याबाबत शपथपत्र सादर करण्याचा आदेश देण्यात आला. या प्रकरणी लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे यांनी पाठपुरावा केला होता.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

प्रामाणिकपणा! 'त्यांनी' रुग्णाचा १.२० लाखाचा मुद्देमाल केला परत

0

सुरतः ‘१०८’ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला कर्मचारी रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी देवासमान ठरले. या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंच. यासोबत १.२० लाखाचा मुद्देमालही त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला.

ही घटना रंदेर भागातील पालनपूर पटिया येथील आहे. या भागातील विजय डेअरी वरून ‘१०८’ आपत्कालीन सेवा देणाऱ्यांना एक फोन आला. यानंतर तिथे रुग्णवाहिका पाठवण्यात आली, अशी माहिती १०८ सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.

आम्हाल फोन येताच रंदेर भागात असलेली १०८ आपत्कालीन सेवेलीत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. इमर्जन्सी मेडिलकल टीमचे ( EMT) सब्बीर खान बेलीम आणि रुग्णवाहिका चालक नीरज गमीत हे घटनास्थळी दाखल झाले. तिथे एक रुग्ण बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. सुरेंद्र सिंह बारड (वय ४७ ) असं या रुग्णांचं नाव आहे. तो ओलपड इथला राहणार आहे आणि विजय डेअर येथे तो मिठाई घेण्यासाठी आला होता. डेअरीच्या ठिकाणी तो अचानक कोसळला आणि बेशुद्ध पडला, अशी माहिती GVK-EMRI चे प्रोग्रॅम मॅनेजर आणि समन्वयक फयाज पठाण यांनी दिली.

EMT सब्बीर खान बेली हे घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी रुग्णाला तपासले. रुग्णाला छातीत कळा येत होत्या. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षणं त्यांना दिसून आली. त्याने रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. यावेळी रुग्णाकडे काही रोख रक्कम आणि दागिनेही होते. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सब्बीर खान आणि नीरज गमीत यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतलं. रुग्णाकडे आढळून आलेली रोख रक्कम आणि दागिने त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे सोपवले, अशी माहिती फयाज पठाण यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

IPL 2020, CSK vs SRH: धोनीच्या नेतृत्वाचा लागणार कस, आज हैदराबादशी भिडणार

0

दुबई, : सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्ससारखा बलाढ्य संघ हा आयपीएलच्या गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चांगलाच कस लागणार आहे. चेन्नईचा आजचा सामान हैदराबादबरोबर होणार आहे. त्यामुळे हैदराबादला पराभूत करून चेन्नईचा संघ तळाचे स्थान सोडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर हैदराबादच्या संघाला विजयची लय सापडली आहे. त्यामुळे ते आज चेन्नईला धक्का देणार का, हे पाहावे लागेल.

गेल्या सामन्यात हैदराबादने या हंगामातील पहिला विजय मिळवला होता. त्यामुळे हैदराबादच्या संघाने मनोबल चांगलेच उंचावलेले असेल. गेल्या सामन्यात हैदराबादच्या संघात केन विल्यम्सन आला होता. त्यामुळे हैदराबादची फलंदाजी अधिक भक्कम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो संघाला कशी सलामी करून देतात, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

चेन्नईच्या संघाने या आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना सलग दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांचा संघ आठव्या स्थानावर आहे. आतापर्यंत धोनीला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्याचबरोबर चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना आतापर्यंत सूर गवसल्याचे पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे चेन्नईचा संघ या सामन्यात सलामीच्या जोडीत बदल करण्याची शक्यता आहे. हा सामना जर चेन्नईला जिंकायचा असेल तर त्यांना संघात नक्कीच काही बदल करावे लागतील. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईच्या संघात कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

हैदराबादचा संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात त्यांना जर पराभव पत्करावा लागला तर त्यांची आठव्या स्थानावर घसरण होऊ शकते. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फलंदाजीबरोबर हैदराबादची गोलंदाजी नेमकी कशी होते, हे पाहावे लागेल. गेल्या सामन्यात फिरकीपटू रशिद खानने चमक दाखवली होती. त्यामुळेच हैदराबादला विजय मिळवता आला होता. त्यामुळे या सामन्यात रशिदकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. त्याचबरोबर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघात कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

मुंबईत खळबळ; महिलेवर तिघांनी २ वर्षे केला बलात्कार, ब्लॅकमेल करून धमकावले

0

मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरून देशभरात संताप व्यक्त केला जात असतानाच, महाराष्ट्रातील मुंबईतही एका २२ वर्षीय केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्काराचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करून दोन वर्षे या महिलेवर तिघा जणांनी बलात्कार केला. दिंडोशी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील दोन आरोपींना अटक केली आहे.

मुंबईतील परिसरात ही घटना घडली. फयाज शेख (वय ३१) आणि सादिक पटेल (वय २७) या दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. तर नदीम हा तिसरा आरोपी फरार आहे. पीडित महिला मालाडच्या पूर्वेला राहते. आरोपींनी ब्लॅकमेल करून तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. पीडित महिला पती आणि अडीच वर्षांच्या मुलासोबत राहते. शेख आणि महिला एकाच परिसरात राहत असून, तो तिला आणि पतीला ओळखत होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये शेखने तिला कॉल केला. काही कामानिमित्त तिला घरी बोलावून घेतले. चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ त्याने शूट केला. याबाबत वाच्यता केली तर अॅसिड टाकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

वर्षभरानंतर शेख याने बलात्काराचा व्हिडिओ आणि तिचा फोन नंबर पटेल याला दिला. त्यानेही महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. याबाबत नदीमला माहीत झाले. त्यानेही महिलेला कॉल करून धमकावण्यास सुरुवात केली. याबाबत पतीला सांगेन अशी धमकी दिल्यानंतर ती घाबरली. आपला संसार वाचवण्यासाठी ती नदीमला भेटण्यास तयार झाली. त्यानंतर नदीमनेही तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत. त्यांनी आणखी एका मित्राला तिचा फोन नंबर दिला. त्यानेही तिला फोन करून धमकावण्यास सुरुवात केली.

सोडली तर आपल्याला होणारा हा त्रास किमान थांबेल असं तिला वाटलं. ती आपल्या मूळगावी गेली. सहा महिने ती तिथे होती. मात्र, आरोपी तिला ब्लॅकमेल करत होते. अखेर या त्रासाला कंटाळून तिने ही बाब आपल्या पतीला सांगितली. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. २९ सप्टेंबरला पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दिंडोशी पोलिसांनी दोघांना अटक केली. तर तिसरा आरोपी नदीम हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

हाथरस गँगरेप : मुख्यमंत्री योगी म्हणतात, 'समूळ नाश सुनिश्चित…'

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात महिलांविरुद्ध वाढत्या अत्याचारांनी कळस गाठल्याचं गेल्या काही महिन्यांतून घडलेल्या घटनांतून स्पष्टपणे दिसून येतंय. यानंतर देशभरातून योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली जातेय. हाथरस, बलराममपूर आणि भदोही या जिल्ह्यांसोबतच आणखी काही ठिकाणी मुलींवर बलात्कार आणि क्रूर हत्येची प्रकरणं समोर आल्यानंतर जनतेतही आक्रोश दिसून येतोय. यामुळे दोषींवर कारवाई करण्यासाठी योगी सरकारवर दवाब वाढलाय. याच दरम्यान यांनी ‘माता-भगिनींवर अत्याचार करण्याचा विचारही करणाऱ्यांचा असल्याचं’ सोशल मीडियावर म्हटलंय. त्यामुळे अनेकांचं लक्ष आता योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश प्रशासनाच्या कारवाईकडे लागलंय.

‘उत्तर प्रदेशात माता – भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला इजा पोहचवण्याचा विचारदेखील करणाऱ्यांचा समूळ नाश सुनिश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एका उदाहरण प्रस्तुत करेल. तुमचं उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता – भगिनीच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी संकल्पबद्ध आहे. हाच आमचा संकल्प आहे. वचन आहे’ असं योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

उल्लेखनीय म्हणजे, उत्तर प्रदेशातल्या गँगस्टर विकास दुबे प्रकरणानंतरही राज्यातील कायदे व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगलेली दिसली. या प्रकरणातील अनेक आरोपींचा मृत्यू फिल्मी स्टाईल पोलीस एन्काऊन्टरमध्ये झाल्यानंतर यावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली होती. त्यामुळेच योगींच्या ‘समूळ नाश सुनिश्चित…’ असल्याचं वक्तव्य काय इशारा करतंय? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

वाचा :

वाचा :

एसआयटीचा तपास

दरम्यान, हाथरस बलात्कार प्रकरणात प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलीस अधिक्षकांविरुद्ध कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. हे प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळण्यात आलं, त्यावर योगी आदित्यनाथ भलतेच नाराज झाल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष तपासणी पथकही (एसआयटी) गठीत केलंय.

कुटुंबीयांना प्रशासनाकडून धमक्या

उल्लेखनीय म्हणजे, जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मृत मुलीच्या कुटुंबीयांना धमकावण्याचे आणि दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण मिटवण्याचं सांगतानाच मीडिया निघून जाईल पण प्रशासन मात्र इथंच राहील, असं पीडित कुटुंबीयांसमोर म्हणत असल्याचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

वाचा :

वाचा :

‘बलात्कार झालाच नाही’

उत्तर प्रदेश पोलिसांकडून मृत पीडितेवर कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध अर्ध्यारात्रीच अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचाही आरोप पीडित कुटुंबीकडून करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ‘पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात यायला हवं होतं’ असं म्हणत या आरोपावर शिक्कामोर्तबच केलंय. या आरोपांमुळे प्रशासनाच्या वर्तवणुकीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. इतकंच नाही तर, फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या रिपोर्टमध्येही पीडितेवर बलात्कार झाल्याचे पुरावे आपल्याला मिळालेच नसल्याचंही अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (कायदा व सुव्यवस्था) म्हटलंय.

१४ सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये पीडित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, बलात्कारानंतर तरुणीची जीभ छाटण्यात आली होती तसंच तिच्या पाठीच्या मणकाही तोडण्यात आला होता. गेल्या सोमवारी प्रकृती बिघडल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी तिनं अखेरचा श्वास घेतला.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

IPL 2020: गरीबीमुळे कुटुंबाचा गाडा हाकणारा टी. नटराजन झाला यॉर्कर किंग

0

चेन्नई : रस्त्यावर कोंबडीचे मांस विकणारी आई… आपल्या लहान भावंडाचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास… आपल्या कुटुंबासाठी घर बांधण्याचा आटापीटा… तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात आपली एक क्रिकेट अकादमी…असे आव्हानात्मक जीवन जगता जगता टी. नटराजन आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल लढतीत नटराजनने आपल्या प्रभावी यॉर्कर अस्त्रासह प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले. ४ षटकांत २१ धावा देत त्याने एक बळी घेतला आणि ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉइनिसला बाद करण्याची करामतही केली. त्यानंतर त्याचा हा खडतर जीवनप्रवास समोर आला. फलंदाजांच्या बुंध्यात आपला भेदक यॉर्कर टाकून त्यांना गदागदा हलविणारा नटराजन आपल्या कुटुंबाचा पाया भक्कम करण्यासाठी मात्र दिवसरात्र एक करतो.

अखेरच्या षटकांत आपल्या यॉर्करने प्रतिस्पर्ध्यांना उद्ध्वस्त करण्याचे तंत्र नटराजनने विकसित केले. त्याचे मार्गदर्शक जयप्रकाश म्हणतात, की त्याने जी मेहनत घेतली आहे, त्यामुळे मला त्याच्या आताच्या वाटचालीबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्याने इथवर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.

२०१७मध्ये त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळण्याची संधी मिळाली, पण आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी त्याला तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. २०१८मध्ये तो हैदराबाद संघात आला. पण त्याला पहिला सामना खेळायला मिळाला तो यंदा. त्यात त्याने १४ आणि १८व्या षटकांत यॉर्करचा मारा करत प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडले.
तामिळनाडू संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अविनाश खंडेलवाल म्हणतात की, नटराजनकडे यॉर्कर टाकण्याची एक वेगळी खुबी आहे. विशेषतः दडपणाखाली असताना हे अस्त्र वापरणे कठीणही असते. पण त्याने हे अस्त्र अवगत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्याने हे अस्त्र अनेकवेळा वापरले आहे. आयपीएलमध्ये आता त्याची प्रचीती येत आहे.

रोजंदारीवर काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा असलेला नटराजन आपल्या कुटुंबाबद्दल खूप हळवा आहे. आपल्या कुटुंबाला स्थिरस्थावर करण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या बहिणींचे शिक्षण, नव्या घराचे बांधकाम याकडे तो लक्ष देत आहे. एवढेच नाही तर आपल्या गावात त्याने अकादमीही उघडली आहे. तिथे उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. ज्यांच्यासह तो टेनिस बॉल क्रिकेट खेळला त्यांना मदतीचा हात देण्याचे त्याचे उद्दीष्ट आहे. जी. पेरियास्वामी हा त्यातलाच एक खेळाडू. त्याने क्रिकेटमध्ये काही होईल अशी आशाच सोडली होती पण नटराजनने त्याच्या कुटुंबियांचे मन वळविले आणि तो क्रिकेटकडे परतला. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये पेरियास्वामीने छाप पाडली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

मला पुन्हा मालिकेत घ्या; नेहा मेहताने निर्मात्यांकडे व्यक्त केली होती इच्छा

0

मुंबई: ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतली अंजली मेहता म्हणजे, अभिनेत्री नेहा मेहता पुन्हा एकदा मालिकेत येण्यास इच्छुक आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं मालिकेतून एक्झिट घेतली होती. तिचं असं अचानक मालिकेतून बाहेर पडणं चर्चेत होतं. त्यानंतर नेहानं मालिकेत पुन्हा यायची इच्छा निर्मिती संस्थेकडे व्यक्त केली होती. पण, तोवर अंजलीच्या या व्यक्तिरेखेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. नंतर ते आपला निर्णय बदलण्यास तयार नव्हते, असं नेहा म्हणते.

मालिकेच्या सेटवर गटबाजी होत असल्याचं नेहानं अप्रत्यक्षरित्या सांगितलं होतं. पण, त्याबाबत विचारलं असता ती म्हणाली, की ‘गटबाजीबद्दल मला काहीही बोलायचं नाही. कधी कधी शांत राहणं हेच पुरेसं असतं.’ तिनं सेटवरील या विषयाला वाचा फोडल्यानं मालिकेविषयी नवीन चर्चा सुरू झाली आहे.

नेहानं मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर निर्माते असित कुमार मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही नेहाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिलाच यापुढं या मालितेचा भाग होण्यात सर नव्हा. तसंच तिनं पुन्हा परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिच्या जागी घेतेल्या नवीन अभिनेत्रीनं देखील चांगलं काम केलंय. त्यामुळं आता तिला काढणं अशक्य,असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान,’तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची सध्या चर्चा सुरू आहे. मालिकेनं ३००० भागांचा टप्पा पूर्ण केलाय. काही कलाकारांनी मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कलाकारांची एन्ट्री होत आहे. नेहा मेहता यांनी गेल्या बारा वर्षांपासून अंजली भाभीची भूमिका साकारली होती. मात्र त्यांनी अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या जागी अभिनेत्री सुनैना फौजदार हिची निवड करण्यात आली आहे. आता अंजली भाभीच्या भूमिकेत सुनैना दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पुणे: युवा सेना नेत्याची राजकीय वादातून हत्या; तिघांना घेतले ताब्यात

0

म. टा. प्रतिनिधी, : पुण्यातील युवा सेनेचा पदाधिकारी (वय ३६) यांची हत्या राजकीय वादातून झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मारटकर यांची मध्यरात्री पाच ते सहा जणांनी हत्या केली होती.

या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून, राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीनंतर स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. दीपक मारटकर हे रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडले होते. मध्यरात्री साधारण एकच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. यात जखमी झालेल्या मारटकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तासाभरानंतर त्यांचा मृत्यू झाला. फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची भेट घेतली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क, दुचाकीवर नंबर प्लेटही नव्हती

मारटकर जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडले होते. पाच ते सहा जण दबा धरून बसले होते. मारटकर येताच त्यांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. मारटकर यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ते धावत सुटले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना पकडले आणि पुन्हा त्यांच्यावर वार केले. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. तर ते ज्या दुचाकीवरून आले होते, त्या दुचाकींना नंबर प्लेटही नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. फरासखाना पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय होता. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts