Friday, September 29, 2023
Home Blog Page 6410

रत्नागिरी मुसळधार पावसाने हाहाकार, 'या' तारखेपर्यंत हवामान खात्याकडून अलर्ट जारी

0

रत्नागिरी – सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात तब्बल २०४२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते २० जूलै या कालावधीमध्ये २०४२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर मागील २४ तासात जिल्ह्यात १०२ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आहेत. या नऊ तालुक्यांमध्ये १ जून ते २० जुलै या कालावधीमध्ये चांगलाच पाऊस झाला आहे. मंडणगडमध्ये २१४८, दापोलीमध्ये १७९१, खेडमध्ये २३१२, गुहागरमध्ये २२६४, चिपळूणमध्ये १७९५, संगमेश्वरमध्ये १९५९ , रत्नागिरी तालुक्यामध्ये २३३४, लांजामध्ये १९५० आणि राजापूर तालुक्यामध्ये १८२५ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

अद्याप जुलै महिन्याचे १० दिवस देखील बाकी आहेत. शिवाय, मुसळधार पाऊस देखील कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. दुपारानंतर पावसाचा दोर आणखी वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

खेड येथील जगबुडी नदीने व राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे नद्यांशेजारील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगबुडी नदीची इशारा पातळी ६ इतकी असून सध्याची पातळी ६.५० इतकी आहे. तर कोदवली नदीची इशारा पातळी ४.९० इतकी असून सध्याची पातली ६.०० इतकी आहे. अशात जर पाऊस आणखी वाढला तर परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

फ्लोरल क्रॉप टॉपमध्ये हवाय वेगळा लुक? 'अशी' करा स्टाईल

0

फ्लोरल क्रॉप टॉपची सध्या तरुणांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. या टॉपमुळे तुमचा लुक अधिक मोहक आणि आकर्षक दिसतो. इतकेच नाही तर हे आऊटफिट्स तुम्ही कॅज्युअलपासून आऊटिंगपर्यंत, ऑफिसमधून पार्टीपर्यंत सहज वेअर करू शकता. तुम्हाला फक्त त्याला योग्यप्रकारे स्टाईल करणे आवश्यक आहे. फ्लोरल क्रॉप टॉप एक असे आऊटफिट आहे, जे तुम्ही जीन्ससह स्कर्टसोबत वेअर करू शकता. तुमच्या वॉर्डरोबमध्ये जर फुलांचा फ्लोरल क्रॉप टॉप असेल आणि आता तुम्ही त्याला नव्या पद्धतीने घालण्याचा विचार करीत आहात. तर मग आज आम्ही तुम्हाला विविध मार्गांनी हा टॉप कसा स्टाईल करावा याबद्दल काही आयडीया देत आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. (style-with-floral-crop-top-in-different-ways-jpd93)

डेनिम स्कर्टसह

फ्लोरल क्रॉप टॉप तुम्ही घरी असताना किंवा बाहेर जाताना डेनिम स्कर्टसह वेअर करू शकता. हे आपल्याला एक छान लुक देते. आपण कॅज्युअलमध्येही कॅरी करू शकता, बाहेर जाताना किंवा लंच डेटला जाताना, आपण नेकपीस घालू शकता किंवा सनग्लासेस देखील घेऊ शकता. हाय हिल्स घाला आणि स्पोर्टी टचसाठी स्नीकर्स ठेवा.

पॅन्ट सूट लुक

तुम्हाला जर एखाद्या लेडी बॉसचे लुक पाहिजे असेल फ्लोरल क्रॉप टॉप पॅन्ट आणि ब्लेझर स्टाईल करू शकता. यात आपणास हवे असल्यास, आपण फुलांच्या फ्लोरल क्रॉप टॉपसह ब्लेझर लुक आणि मोनोक्रोमॅटिक लुक किंवा प्लेन पँट ट्राय करू शकता. या लूकमध्ये कमीतकमी अ‍ॅक्सेसरीज आणि हलक्या दागिन्यांच्या मदतीने आपला लूक हायलाइट करा.

हाय वेस्ट पॅन्ट

फ्लोरल क्रॉप टॉपसह तुम्ही हाय वेस्ट पॅन्टची जोडी बनवू शकता.त्यात तुमचा लुक वाढविण्यासाठी क्रॉप टॉपच्या शैलीसह देखील प्रयोग करू शकता. जसे आपण शोल्डर स्टाईल ट्राय करू शकता. यासह लांब कानातले चांगले दिसतील. त्याच वेळी, आपण ऑफ शोल्डर फुलांच्या क्रॉप टॉपसह हेअरस्टाऊल करू शकता,

रिप्ड जिन्ससह

कॅज्युअलमध्ये फ्लोरल क्रॉप टॉप परिधान करताना तुम्हाला एखादा बोल्ड आणि कडक लुक घ्यायचा असेल, तर तो रिप्ड जीन्सने घालता येतो. डेनिम रिप्ड जीन्स मुलींची आवडती आहे आणि जर तुम्ही त्यास फ्लोरल क्रॉप टॉपबरोबर वेअर केले तर ते तुमचे लुक आणखी वाढवते. आपल्या सोप्या लुकमध्ये एक्स फॅक्टर जोडण्यासाठी, आपण टॉप कट आणि स्लीव्हसह प्रयोग करू शकता.

Also Read: त्वचा व सौंदर्य चिरतरुण ठेवायचे असेल ‘हे’ कराच!

स्कर्ट स्टाईलिश दिसेल

फ्लोरल क्रॉप टॉप स्टाईल करण्याचा आणखी एक मार्ग देखील आहे. आपण स्कर्टसोबतही वेअर करू शकता. आपण आपल्या आवडीनुसार शॉर्ट किंवा लाँग स्कर्ट घालू शकता. स्कर्ट लुकसह फुलांच्या क्रॉप टॉपमध्ये को-ऑर्डर लूक अधिक चांगला दिसतो. इतकेच नाही तर, आपण लांब स्कर्ट घातल्यास, आपल्या लूकमध्ये एक्स फॅक्टर जोडण्यासाठी आपण फ्रंट स्लिट किंवा साइड स्लिट लुकची निवड करू शकता.

Also Read: केस पांढरे झाले? अशा पद्धतीने केमिकलविना केस करा काळे

Esakal

‘मी वसंतराव’ पाहिल्यानंतर नाना पाटेकर म्हणाले, 'तू संगीत चांगलं करशील याची खात्री होतीच; पण…'

0

‘गायक म्हणून आपण स्वतःचा जितका विविध अंगानं शोध घेऊ, तितकं आपण समृद्ध होतो,’ असं म्हणणं आहे यांचं. ‘गेली दीड-दोन वर्षं कार्यक्रम बंद असले, तरी गाण्याशी नातं तुटलं नाही. यू-ट्यूबच्या माध्यमातून काम सुरू राहिलं. शास्त्रीय संगीताकडे मी पाठ फिरवलेली नाही. या काळात व्यक्ती म्हणून मी वृद्धींगत झालो. लोकांना वाटतं शास्त्रीय गायकानं केवळ तेच गाणं गावं. आपण असे कप्पे करून टाकले आहेत,’ असंही ते म्हणतात.

आनंद, प्रतीक्षा आणि ओटीटी‘’ चित्रपट ‘कान’ महोत्सवासाठी निवडला गेला. या विषयी राहुल म्हणतात, ‘हा अवर्णनीय आनंद आहे. आजोबा, त्यांची गायकी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ही कलाकृती म्हणजे त्यांच्या जीवनकार्याला आदरांजली आहे. पहिला आणि जीव ओतून केलेला हा प्रयत्न आहे. गेलं वर्षभर काही झालं नाही; पण चित्रपट राज्य सरकारकडून ‘कान’साठी जात आहे, हे ऐकून फार आनंद वाटला. हुरूप आला. प्रदर्शनाबद्दल बोलायचं, तर पूर्ण क्षमतेनं चित्रपटगृहं सुरू झाल्यास, अगदी उद्याही तो प्रदर्शित करायला आवडेल. ही कलाकृती चित्रपटगृहासाठी तयार झालेली आहे.’ ओटीटीवर प्रदर्शित न करण्याबाबत ते म्हणाले, ‘निर्मात्यांचीही काही गणितं असतात. सुदैवानं प्रायोजक, प्रस्तुतकर्ता आणि निर्माते यांनाही तो चित्रपटगृहांतच प्रदर्शित व्हावा असं वाटतंय. भाईकाका (पु. ल. देशपांडे) म्हणायचे, ‘मोठी माणसं जात नसतात, ती संगीतरूपानं चिरंतन राहतात.’ मला वाटतं, ही त्याचीच पावती आहे. हा चित्रपट यांनीही पाहिला. ‘तू संगीत चांगलं करशील याची खात्री होती; पण नट म्हणूनही चांगला वावरला आहेस,’ ही त्यांची प्रतिक्रिया हुरूप वाढविणारी आहे.’

आजोबांचा गेटअप आणि मीमोठ्या पडद्यावर आजोबांची भूमिका तुम्हीच साकारायचं ठरलं होतं का, असं विचारताच ते म्हणाले, ‘सुरुवातीलाच दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीला मी हा चित्रपट करावा का, हे विचारलं होतं. निपुणसोबत मी ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशयकल्लोळ’ आणि ‘संगीत सौभद्र’ ही नाटकं केली. चित्रपटाचं काम सुरू झाल्यावर मी निपुणला ही भूमिका करण्याबाबत स्पष्टपणे विचारलं होतं. मी करू शकणार नसेल, तर तसं सांग, असंही त्याला म्हणालो होतो. ही भूमिका तूच केली पाहिजेस आणि करू शकतोस, असं त्यानं सांगितल्यावर मला हायसं वाटलं. ‘बालगंधर्व’ चित्रपटात जेव्हा रवी जाधव यांनी मला केशवराव भोसलेंच्या भूमिकेसाठी विचारणा केली, तेव्हाही मी हा प्रश्न त्यांना विचारला होता. गायक म्हणून एखादी गोष्ट आपण चांगली मांडू शकतो, हे माहीत आहे. हे क्षेत्र मात्र पूर्णपणे नवं आहे. नाटक आणि चित्रपट ही वेगळी माध्यमं आहेत. प्रामाणिक प्रयत्न करणं माझ्या हाती होतं, मी तेच केलं. मी आतापर्यंत हा चित्रपट जितक्या वेळा पाहिला, तेव्हा मला पडद्यावर आजोबाच दिसले.

संगीत आणि दिग्दर्शनचित्रपटाचं संगीत आणि दिग्दर्शन याबाबत राहुल म्हणाले, ‘आजोबांचं गाणं मी एवढं ऐकलंय, की ९९ टक्के रेकॉर्डिंग मला पाठ आहेत. मी जेव्हा गाणं सुरू केलं, तेव्हा भाईकाका म्हणाले होते, ‘आता वसंता नाही, कुमार नाही, तेव्हा तू कॅसेटला गुरू मान, त्यांचं गाणं ऐक, त्यातून तुला वाट मिळेल. मी उदंड ऐकलं. वडिलांनी विविध ठिकाणी फिरून खूप रेकॉर्डिंग गोळा केल्या होत्या. आजोबांचं पूर्ण आकलन होणं अवघड आहे; त्यामुळे कोणत्या पद्धतीनं एखादी गोष्ट ते गातील, सादर करतील याचा अंदाज आणि अनुभूती घेत, ‘बहुधा असं करतील’, अशा बैठकीनं मी गाणी केली. नागपूरला चित्रीकरण करत असताना एक गाणं तिथंच, एका दिवसात आम्ही तयार केलं. त्याची चाल निपुणला आवडली नाही. मी मेकअप करताना दुसरी चाल बांधली, ती त्याला आवडली. एका गझलेसाठी सात चाली बांधल्या, त्यातली त्याला एक आवडली. निपुणचं काम अतिशय शांत-संयमी आहे. चित्रीकरणाच्या ६२ दिवसांत एक-दोनदाच त्यानं उत्तम झालंय असं म्हणत दाद दिली. हा चित्रपट निपुणच करू शकतो, असंच मी म्हणेन.’

दडपण नव्हे; शोधवसंतरावांचा नातू म्हणून त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेण्याचं आणि स्वतंत्र गायक म्हणून दडपण येतं का, असं विचारताच राहुल म्हणतात, ‘सुरुवातीला मी कुमारजी एके कुमारजी असा होतो. भाईकाका माझं गाणं ऐकायला घरी यायचे. आधी मी पिंपळखरे बुवांकडे शिकायचो आणि पुढे कुमारजींची गाणी गायला लागलो. एकदा आई भाईकाकांना म्हणाली, ‘हा सगळं कुमारजींचं गातो यात आनंद आहे; पण वसंतरावांचा नातू आहे, त्यांचंही काही तरी गावं.’ त्यावर भाईकाका म्हणाले होते, ‘त्याचा आवाज फुटू दे, आपोआप तो वसंताकडे घसरेल.’ ती किती द्रष्टे होते हे यावरून कळतं. वयानुसार पुढे माझा आवाज आजोबांच्या खूप जवळ गेला, त्यात फिरत यायला लागली. त्यांचं गाणं थोडं पेलायला लागलं. त्यांच्यातल्या उत्तुंग सादरकर्त्याचं दर्शन घडलं. त्यांच्या गायकीत भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी असा प्रत्येक विषय किती मोठा होऊ शकतो हे कळतं. त्यांचा साहित्याचा खूप अभ्यास होता. म्हणूनच पुलं आणि ते मित्र होते. अनेक माणसं त्यांच्या या चौफेर असण्याचे किस्से सांगतात, तेव्हा हे सगळं आजोबांना केव्हा केलं हा संशोधनाचा विषय वाटतो. आजोबांच्या या पैलूंपैकी गाणं, अभिनय, नाटक यावर लक्ष केंद्रित करू आणि इतर गोष्टी कानावर आहेत त्या तशाच राहू देऊ, असं मी ठरवलं. आजोबांचं जे दर्शन मला घडलं त्याचा मी मागोवा घेत आहे.’

रिअॅलिटी शो आणि संघर्षरिअॅलिटी शो, नवोदितांना मिळणारं व्यासपीठ याबाबत राहुल म्हणतात, ‘शास्त्रीय संगीतावर रिअॅलिटी शो का होत नाही, असा माझा प्रश्न आहे. यापूर्वी प्रयत्न झाला; पण तो चालला नाही. मनोरंजन म्हणून जेव्हा तुम्ही या सगळ्याकडे पाहता, तेव्हा टीआरपी वगैरेचा विचार करावा लागतो. मी परीक्षक म्हणून खूप रोखठोक बोलायचो. तेव्हा मला सांगण्यात आलं, की एखाद्या गायकाचं सादरीकरण पाहणारी खूप मंडळी असतात. राहुल देशपांडेंनी यांना नाही म्हटलं, म्हणजे याला काहीच येत नाही, असा समज होऊ शकतो. नकारात्मक गोष्टही सकारात्मक पद्धतीनं सांगा. मला ते पटलं; मात्र या कार्यक्रमात ज्या ‘स्टोरी’ बनवल्या जातात, ते गायक म्हणून मला पटत नाही. एखाद्याची परिस्थिती हा त्याच्या गाण्याचा निकष ठरत नाही. आयुष्यात खूप मोठा संघर्ष किंवा परिस्थिती चांगला नाही, तरच चांगला गायक वा गायिका होते, अशी काही प्रतिमा जाऊ नये. गाण्याचाही एक स्ट्रगल असतो. रियाझ सुरू करतो तिथून हा स्ट्रगल सुरू होतो. हे करणारी मुलंही खूप कमी आहेत. मला क्लास काढून गायकीचा शिक्षक व्हायचं नाही. शिकवावं वाटतं त्यांना मी शिकवतो. अनेक पालक माझ्याकडे यायचे. मुला-मुलीला अमुक शोमध्ये जायचंय म्हणून शिकवा, तुम्ही नाव सुचवलंत, तर तिथं संधी मिळेल, असं म्हणायचे. त्यावर मला हे जमणार नाही, असं मी सांगतो. आज शिकवलं आणि उद्या गाणं आलं असं होत नाही. रिअॅलिटी शोमुळं अनेकांना काम मिळतंय. याच व्यासपीठानं अवधूत, बेला, स्वप्नील, श्रेया अशी प्रतिभावान माणसं दिली. त्यांनी या व्यासपीठाचं सोनं केलं. तुम्ही त्याचा योग्य उपयोग केला, तर घडू शकता.’

म्हणून थांबलो…पुढं काय करणार आहात, असं विचारताच राहुल म्हणतात, ‘सध्या चित्रपट प्रदर्शित करण्याची वाट पाहत आहे. मधल्या काळात काही सुचेल. मी संगीत नाटक करणं थांबवलं. गायक आहे, हे मी विसरू शकत नाही. संगीत नाटकाचे मी चारशे-साडेचारशे प्रयोग केले. आजच्या पिढीला ते कळावं हा हेतू होता. नाट्यगीतं मैफलीत गायची नसतात; कारण त्यामागे संदर्भ, प्रसंग असतात. ‘कट्यार…’, ‘बालगंधर्व’ हे चित्रपट आल्यावर नव्या पिढीला ते कळलं. मग मी नाटक करणं बंद केलं. नवं संगीत नाटक करायला आवडेल. गाण्याचं, अभिनयाचं असतं, तसं रंगभूमीचं एक वेड असतं.’

प्रेझेंटेबल असणं कधीही चांगलं; पण प्रेझेंटेबल होण्यासाठी गाण्याचं सत्त्व किंवा मूल्य कमी होणं किंवा गायकीवरून लक्ष वळणं योग्य नाही. स्क्रीनवर कसा वा कशी दिसेन, याचा अधिक विचार केला, तर गाणं बाजूला राहतं. म्युझिक व्हिडिओ करत असाल, तर तिथं अभिनय ठीक. गायक म्हणून गाताना तुम्ही अंतर्बाह्य त्या गाण्यातच असायला हवं.

– राहुल देशपांडे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राज कुंद्राबद्दल आदित्य ठाकरेंचे जुनं ट्वीट चर्चेत; पाहा स्क्रीनशॉट

0

राणेंनी पोस्ट केला स्क्रीनशॉट; राज कुंद्रा सध्या पॉर्न व्हिडीओ, वेब सिरीज बनवल्याबद्दल अटकेत

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. याचदरम्यान, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Tweet) यांचे जुनं ट्विट सध्या चर्चेत आले आहे. काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते विविध अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आली. राज कुंद्रा सध्या पोलिस कोठडीत (Police Custody) आहे. अशा वेळी आदित्य ठाकरेंच्या एका जुन्या ट्विटचा फोटो पोस्ट चर्चेत आला आहे.

Also Read: ठाणे: “लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?”

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी राज कुंद्राच्या एका ट्वीटला उत्तर दिलं होतं. राज कुंद्रा यांनी आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया या दोघांना ट्विटमध्ये टॅग करून जेवणाचा वेळ उत्तम गेला असं लिहिलं होतं. तसेच, यापुढे आपण वरचेवर भेटूया असंही लिहिलं होतं. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही राज कुंद्राच्या ट्वीटला रिप्लाय देत ‘नक्कीच, आपण जेवणासाठी भेटूया’ असं लिहिलं होतं. तोच फोटो ट्विट करत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Also Read: Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता ‘प्लान बी’

दरम्यान, राज कुंद्राला अटक झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर शिल्पा शेट्टीच्या नावाने भरपूर मीम्स व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये शिल्पा अश्रू पुसताना दिसत आहे, तर काही मीम्समध्ये विविध चित्रपटांमधील लोकप्रिय डायलॉग्सचा संदर्भ राज कुंद्राच्या अटकेशी जोडलेला पाहायला मिळतोय. इन्स्टाग्रामशिवाय ट्विटरवरही युझर्स शिल्पा शेट्टीला ट्रोल करत आहेत. ‘बिचारी शिल्पा शेट्टी योगामध्ये व्यस्त होती आणि तिचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत राहिला…’ अशा प्रकारच्या कमेंट्स आणि मीम्स सध्या ट्विटरवर व्हायरल होताना दिसत आहेत.Esakal

'राजच्या प्रत्येक कंपनीत शिल्पा डायरेक्टर, तिला सगळं माहितीए'

0

मुंबई : अश्लिल व्हिडीओ बनवणे आणि ते साईटवर अपलोड केल्याप्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेहशी दिले आहेत. राजच्या अटकेनंतर याप्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीची काय भूमिका होती याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आतपर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शिल्पाचे नाव अद्याप आलेले नाही. परंतु मॉडेल हिने मात्र, या सर्व गोष्टींची शिल्पाला पूर्ण कल्पना होती, असा खळबळजनक आरोप केला आहे.बायकोला नवऱ्याच्या गोष्टी माहिती असतात

पॉर्नोग्राफी प्रकरणाविरोधात पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणामध्ये चा सहभाग असल्याचा संशय सर्वप्रथम मॉडेल सागरिका शोनाने केला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामध्ये राजच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले आणि त्याला अटक करण्यात आली. राजला अटक झाल्यानंतर सागरिका शोनाने एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘या प्रकरणाची संपूर्ण माहिती राजची बायको ला होती. कारण राजच्या प्रत्येक कंपनीमध्ये ती डायरेक्टर आहे. कंपनीमध्ये काय चालले आहे हे त्या कंपनीच्या डायरेक्टरला माहिती नाही असे कसे होऊ शकते? त्यामुळे पोलिसांनी शिल्पाची देखील सखोल चौकशी करायला हवी. तिला या पॉर्न रॅकेटबद्दल सर्व माहिती असणारच आहे, याची मला खात्री आहे.’

पोलिसांना नक्कीच मदत करीन

सागरिकाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘ याप्रकरणी जर मला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले तर मी नक्की जाईन आणि त्यांना सर्वतोपरी मदत करीन. मला ऑडिशनवेळी जो कॉल आला होता तो व्हॉट्सअप कॉल होता. त्यामुळे मला तो रेकॉर्ड करता आला नाही. अन्यथा तो पुरावा म्हणून मी पोलिसांना देऊ शकले असते.’

व्हॉट्सअपवर न्यूड व्हिडीओ पाठवण्याची मागणी

सागरिकाने याआधी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने सांगितले की, एका वेब सीरिजसाठी तिने व्हिडीओ कॉलद्वारे ऑडिशन दिली होती. ही ऑडिशन राज कुंद्रा, त्याचा साथीदार उमेश कामथ आणि आणखी एका व्यक्तीने घेतली होती. या व्यक्तीने मास्क लावला होता. ही ऑडिशन सुरू असताना राज कुंद्राने तिला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले. परंतु तिने ही गोष्ट करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पुणे : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?

0

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील… विशेषतः उपनगरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत. नुकतेच डांबरीकरण केलेले रस्तेही उखडले असून उपनगरांमध्ये चिखल, पाणी आणि खड्ड्यांमधून वाहनचालकांना वाट शोधवी लागत आहे. येरवडा, नगर रस्ता, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी, आंबेगाव, सिंहगड रस्ता, सहकारनगर, स्वारगेट, बाजीराव रस्ता, चांदणी चौक आदी परिसरात खड्डे पडले असून, पावसाळा सुरू असतानाही खोदाईची कामे सुरु असल्याने खड्ड्यांमध्ये भर पडली आहे.

आंबेगावः-रस्तावरी खड्ड्यामुळे पाण्याचे तळे नागरिकाना चालण्यास त्रास सहनकरवा लागत आहे…
सहकार नगरः तारंग सोसायटी समोरील रस्त्यावर मोठा खड्डा असून, त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे.
येरवडा–जेलरस्त्यावर नुकतेच डांबरीकरण केले होते पण पावसामुळे खडी निघुन पुन्हा खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.
आंबेगाव पठारः-रस्ताची कामे रखडली सुन चिखल झाला आहे.खड्डे कधी भरनार नागरिकाची जाता येता त्रास सहन करावा लागेल.
कात्रज कोढवा रोडवरील रस्तावर खड्डे पडुन मध्ये नागरिकानी दगड व बॉरीकेट ठेवले आसुन त्या कडे शासनाचे लक्ष गेले नाही .मोठा पघात होऊ शकतो विश्वजीत पवार
संगमवाडी–संगमवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्डे पडले असुन वाहनचालकांना त्रास होत आहे.

Esakal

ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही; केंद्राच्या उत्तरावर शिवसेना भडकली

0

मुंबई: ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या लोकांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार () यांनी दिली आहे. ( on Deaths due to Oxygen Shortage)

करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल राज्यसभेत दिली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालाचा आधार या माहितीला असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं. काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारच्या या दाव्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. ऑक्सिजनअभावी केवळ दिल्लीतच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आरोग्य राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव आणण्याचा इशारा काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिला होता. त्यानंतर आता इतर पक्षांनीही केंद्रावर टीकेची तोफ डागली आहे.

वाचा:

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘ऑक्सिजन अभावी ज्यांचे नातेवाईक गेले, जे सिलिंडरसाठी इकडे तिकडे धावत होते का? त्यांचा सरकारच्या या दाव्यावर विश्वास बसतो का हे पाहावं लागेल. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांत मृत्यू झाले आहेत. अशा मृतांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटला दाखल केला पाहिजे,’ असं राऊत म्हणाले. ‘उत्तर लेखी असेल किंवा तोंडी असेल. सरकार सत्यापासून दूर पळतंय. हा कदाचित ‘पेगॅसस’चा परिणाम असेल, असा टोलाही राऊत यांनी हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ठाणे: “लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?”

0

‘खंडणी सरकारने खुलासा द्यावा’; भाजपच्या अतुल भातखळकरांची मागणी

मुंबई: कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर बंधने घालण्यात आली आहेत. रेस्टॉरंट्स आणि बार्सवरदेखील बंधने आहेत. असे असताना ठाणे महापालिका हद्दीत मात्र सर्रास लेडीज बार सुरू होते. याबद्दलची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर ठाणे महापालिकेने कारवाई करत १५ लेडीज बार (Thane Ladies Bar) सील केले. महापालिकेच्या या कारवाईमुळे बार चालक आणि मालकांची चांगलीच धांदल उडाली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कारवाई सुरूच ठेवा असे आदेश दिले. या साऱ्या प्रकारानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र महाविकास आघाडीवर सरकारवर हल्ला चढवला. (Thane Ladies Bar Seal BJP Atul Bhatkhalkar questions Mahavikas Aghadi Govt about Extortion)

Also Read: सहा महिन्यात किती टक्के मुंबईकर झाले ‘बाहुबली’? वाचा सविस्तर

ठाण्यातील लेडीज बार तुडुंब भरून दणक्यात सुरू आहेत हे माध्यमात उघड झाल्यावर आपली अब्रु झाकण्यासाठी आता १५ लेडीज बार सील करण्यात आल्याची नौटंकी केली जात आहे, अशी जहरी शब्दांत त्यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. तसेच, एकीकडे कोरोनामुळे माणसांचा जीव जात असताना कोणाच्या आशीर्वादाने हे किळसवाणे प्रकार सुरू होते याचा खुलासा खंडणी सरकारने करावा, असा जळजळीत सवालही त्यांनी केला.

अतुल भातखळकर यांचे ट्वीट

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, मास्क वापरावे, नियमांचे पालन करावे अशी नियमावली देण्यात आली आहे. सर्व बार आणि रेस्टॉरंट व इतर आस्थापने सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे नियम लागू केले आहेत. तसेच, सायंकाळी ४ वाजल्यानंतर आणि शनिवार, रविवारी फक्त पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याविषयीचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही लेडीज बार सुरू कसे आणि कोणाच्या पाठिंब्याने? असे संतप्त सवाल नागरिकही विचारू लागले आहेत.

Esakal

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सूट? अजित पवारांचे संकेत

0

पुणे: करोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं आता संपूर्ण लॉकडाउन कधी उठणार याकडं राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तडकाफडकी कुठलीही मोकळीक देण्यास तयार नाही. त्यामुळं लॉकडाउन उठवण्याचे वेगवेगळे पर्याय पुढं येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री यांनी आज याच संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ( on )

पिंपरी-चिंचवड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाउनला आता जनता पुरती कंटाळली आहे. अनेक ठिकाणी मुक्तपणे वावरता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी लोकल बंद असल्यानं हजारो लोकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. छोट्या उद्योगधंदेही ठप्प आहेत. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर लॉकडाउन हळूहळू उठेल, अशी आशा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं सरकारनं पूर्ण लॉकडाउन उठवणं टाळलं आहे.

वाचा:

या पार्श्वभूमीवर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. काही जणांना वाटतं पुढचे १०० ते १२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या दिवसांत करोना नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं. अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसतात. अशी बेफिकिरी योग्य नाही,’ असं ते म्हणाले.

वाचा:

‘केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या प्रमाणात कोविड लस मिळायला हवी. मात्र, तसं होताना दिसत नाही. लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ‘पूर्वी लोक लस घ्यायला घाबरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे. ही सकारात्मक बाब आहे, असंही ते म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

साई पल्लवी ते समंथा; मेकअपशिवायही सुंदर दिसतात या दाक्षिणात्य अभिनेत्री

0

दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहता वर्ग मोठा आहे. बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटांमधील अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनातं विशेष स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांमधील कलाकार मेक-अपशिवाय कसे दिसतात? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमी पडतो. साऊथ इंडियन चित्रपटांमधील अभिनेत्रींनी त्यांचे ‘नो- मेक अप’ लूकमधील फोटो सोशल मीडिटयावर शेअर केले आहेत. या फोटोमधील त्यांच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. पाहूयात या अभिनेत्रींचा ‘नो- मेक अप’ लूक..

अभिनेत्री साई पल्लवीने ‘सनकिसड्’ असे लिहून तिचा नो मेकअप लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
‘फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजमधील अभिनयामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री समांथा अक्किनेने तिच्या नो मेक अप लूकचा फोटो शेअर केला होता. समंथा मेक- अप शिवाय देखील सुंदर दिसते अशी कमेंट तिच्या चाहत्यांनी या फोटोवर केली.
अभिनेत्री काजल अग्रवाल ‘दोज डेज’ पुस्तक वाचतानाचा नो मेक- अप लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
रश्मिका मंदानाने तिची नॅचरल स्किन फ्लॉन्ट करत नो मेक-अप मधील फोटो शेअर केला. तिच्या हेल्दी स्किनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
अभिनेत्री राशी खन्नाच्या या नो मेक-अप लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिली.

Esakal

Latest posts