Sunday, June 4, 2023
Home Blog Page 6454

विराटचे पहिल्या जेतेपदाचे स्वप्न भंगणार? IPL सुरू होण्याआधी झाला पराभव

0

दुबई: () विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू (Royal Challengers Bangalore) संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी जोरदार तयारी करत आहे. आयपीएलच्या १२ हंगामात विराटची कामगरी शानदार आहे. पण त्याला कधी विजेतेपद मिळवता आले नाही. या वर्षी विराट आणि कंपनी जेतेपदासाठी मैदानात अधिक ताकदीने उतरणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धाव करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याचा सोबत आफ्रिकेचा एबी डिव्हीलियर्स देखील आहे. या दोघांनी अनेक सामन्यात शानदार विजय मिळवून दिला आहे. पण RCBला कधी विजेतेपद मिळवता आला नाही. या वर्षी आयपीएल सुरू होण्याआधी विराट आणि कंपनी जोरदार तयारी करत आहे.

वाचा-

बेंगळूरूला पहिले विजेतेपद मिळून देण्याच्या तयारीत असलेल्या विराटला IPL 2020 सुरू होण्याआधी मोठा धक्का बसला आहे. RCBच्या खेळाडूंमध्ये झालेल्या सराव सामन्यात विराट कोहलीच्या संघाचा पराभव झाला. १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत बेंगळूरू संघाचा पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. त्याआधी आरसीबीच्या खेळाडूंचा सराव सामना झाला. या सामन्यात विराट विरुद्ध चहल असे दोन गटात सामने झाले. यात विराटच्या संघाचा पराभव झाला.

वाचा-

संघाचे डायरेक्टर माइक हेसन यांनी दोन गट केले. चहलच्या संघात डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, उमेश यादव, नवदीप सैनी आदी खेळाडू होते. तर कोहलीच्या संघात पार्थिव पटेल, ख्रिस मार्टिन, इसुरू उडाना, मोहम्मद सिराज हे खेळाडू हेते.

या सामन्यात विराटच्या संघाला विजय मिळवता आला नाही. चहलच्या संघाकडून एबीने ३३ चेंडूत ४४ धावा केल्या. तर वॉशिंगटन सुंदरने ११ धावात २ विकेट घेतल्या. विजयाचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या विराट संघाला यश आले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Galaxy A02 येतोय, बेंचमार्किंग वेबसाइटवर दिसला

0

नवी दिल्लीः सॅमसंग लवकरच आपला आणखी एक स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए०२ आणू शकते. कंपनीच्या मागील वर्षी आलेल्या गॅलेक्सी ए०१ चे अपग्रेड मॉडल असणार आहे. नुकतेच या फोनला गीकबेंच वर पाहिले गेले आहे. यात फोनची काही वैशिष्ट्ये बाहेर आली आहेत. सॅमसंगच्या या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ऑक्टा-कोर क्वॉलकॉम प्रोसेसर मिळू शकतो. हा फोन कंपनीचा नवा बजेट स्मार्टफोन असणार आहे.

वाचाः

गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोनमध्ये कंपनी अँड्रॉयड १० वर आधारीत सॅमसंग एवयूआय देवू शकते. यात आधी आलेल्या एका रिपोर्टनुसार, म्हटले होते की, सिंगल कोर टेस्टमध्ये ७४६ स्कोर आणि मल्टिकोर टेस्टमध्ये ३८ १० स्कोर मिळवले होते. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर मिळू शकतो.

वाचाः

काय आहेत फोनची वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी ए०१ स्मार्टफोमध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले मिळू शकतो. यात २ जीबी रॅम प्लस १६ जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. गॅलेक्सी ए०१ अँड्रॉयड ९ पाय आधारित सॅमसंग वन यूआय वर काम करतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा आणि सिंगल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात फोनला पॉवर देण्यासाठी 3,000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

कोल्हापूर: कोविड सेंटरमधील करोनाबाधित महिलेचे दागिने चोरले

0

म. टा. प्रतिनिधी, : करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेच्या अंगावरील सात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. शहरातील महाराणा प्रताप चौकातील एका कोविड सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या महिन्यात घडलेली ही दुसरी घटना आहे.

कदमवाडी येथे राहत असलेल्या एका महिलेचा तपासणी अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला उपचारासाठी नातेवाईकांनी महाराणा प्रताप चौकातील केपीसी या कोविड सेंटरमध्ये दाखल केले. दोन-तीन दिवसांनंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला तेथील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा तिच्या अंगावरील दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. त्यामध्ये चार तोळ्याच्या पाटल्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, आठ ग्रॅमची कानातील फुले व दोन ग्रॅमच्या बुगड्या असे सात तोळ्यांचे हे दागिने होते. या प्रकरणी अडीच लाखांचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

काही दिवसांपूर्वी करोनाचे उपचार घेताना एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावरील दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणाचा अजूनही तपास लागला नाही. काही व रूग्णालयात मोबाइलसह किंमती साहित्य चोरीस जात आहे. यामुळे उपचारास दाखल होणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

धक्कादायक… करोना व्हायरसमुळे मुंबईच्या क्रिकेटपटूचे निधन

0

करोना व्हायरसमुळे महाराष्ट्राच्या एका क्रिकेटपटूचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये सचिन देशमुख या मुंबई आणि महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटूचे निधन झाले आहे, ते ५२ वर्षांचे होते. देशमुख यांच्या पश्चात पत्नी स्मिता, मुलगा हर्षल आणि मुलगी शिवानी असा परीवार आहे.

वाचा-

देशमुख यांना काही दिवसांपूर्वी ताप आला होता. पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ९ दिवसांनी देशमुख यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांची करोना चाचणी ही पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वेदांत हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वाचा-

देशमुख यांनी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुण्याच्या संघाकडून खेळताना सलग सात शतके झळकावली होती. मुंबईमध्ये महिंद्रा क्लब आणि दादर पारसी झोरास्ट्रीयन क्लबमधून ते स्थानिक क्रिकेट खेळत होते. एक धडाकेबाज क्रिकेटपटू म्हणून त्यांचा लौकिक होता. पण त्यांना झालेल्या दुखापतींमुळे ते जास्त काळ क्रिकेट खेळू शकले नाहीत. पण युवा क्रिकेटपटूंसाठी मात्र ते गॉडफादर होते. कारण होतकरू क्रिकेटपटूंना ते नेहमीच मदत करत असायचे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगले क्रिकेटपटू घडावेत, असा त्यांचा मानस होता. त्यामुळे युवा क्रिकेटपटूंना सर्वतोपरी मदत ते करत असायचे.

वाचा-

“माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालली कुच बिहार करंडकामध्ये खेळताना देशमुख यांनी दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत देशमुख यांनी फक्त पाच डावांमध्ये तीन शतकेही झळकावली होती. देशमुख हे एक धडाकेबाज फलंदाज होते. त्यांच्या फलंदाजीत चांगलीच आक्रमकता भरलेली होती. आम्ही दोघे एकत्र खेळतच मोठे झालो,” असे महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू अभिजित देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

हा मराठा समाजाच्या विरोधातील कुटील डाव तर नाही ना?; संभाजीराजेंचा सवाल

0

कोल्हापूर: मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती केली जाऊ नये अशी मागणी असतानाही भरती आदेश निघाल्यामुळं मराठा समाजात तीव्र संताप आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘विरोध होणार हे माहीत असताना पोलीस भरतीचे आदेश काढणे पूर्णपणे चुकीचं आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना,’ अशी शंका संभाजीराजे यांनी उपस्थित केली आहे.

वाचा:

संभाजीराजेंनी मुख्यमंत्री यांना या संदर्भात पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. ‘ प्रकरण अंतिम निर्णयासाठी मोठ्या खंडपीठाकडे सोपवताना सध्याच्या आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभरात उमटत आहेत. सरकारनं त्या भावनेचा आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करणे हा मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार आहे. या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया उमटणार हे माहीत असूनही सरकारनं पोलीस भरतीचे आदेश काढले, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहेत, असं संभाजीराजे यांनी पत्रात म्हटलं आहे.

‘मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे आणि या लढ्यात सर्व जातीसमूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार,’ असंही संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘सरकारच्या आधीच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये. सध्याच्या परिस्थितीत नोकरभरती केल्यास त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल,’ अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मला विखेंच्या सल्ल्याची गरज आहे, पण… हसन मुश्रीफ यांची तुफान टोलेबाजी

0

म. टा. प्रतिनिधी ।

राधाकृष्ण विखे पाटील यांना मी १४ ऑगस्टला झालेल्या बैठकीला बोलावले होते. पण ते आले नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत व मी ज्युनियर आहे, म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे वक्तव्य करताना पालकमंत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ‘मी आधीच सांगितलं होतं की महिन्यातून किमान एकदा नगरला जिंदा किंवा मुडदा येईनच. गेल्या आठ महिन्यात मी १४ वेळा नगरला आलोय, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र १५ ऑगस्टनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नव्हते. त्यावरून त्यांच्यावर माजी मंत्री राधाकृष्ण यांनी नगरला बोलताना टीका केली होती. सरकारमध्ये काम करणारे सत्ताधारी पक्षातील लोकांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तर नेमकी कशाची काळजीय ? त्यांचा तर सगळा वेळ ग्रामपंचायतवर मागच्या दाराने प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याचा प्रयत्नात गेला,’ अशी टीका विखे यांनी केली होती. या टीकेचा आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात करोना अनुषंगाने आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आशुतोष काळे, महापौर बाबासाहेब वाकळेआदी उपस्थित होते.

‘जिल्ह्यात होणाऱ्या सगळ्या मीटिंगला सर्व मंत्र्यांना बोलावले जात नाही. ज्या मिटींगला त्यांना बोलावले जाते, त्याला ते येतातच,’ असे सांगत मुश्रीफ म्हणाले, ‘१४ ऑगस्टला मी जी बैठक घेतली त्याला सर्व लोकप्रतिनिधींना बोलवले होते. त्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आले, पण राधाकृष्ण विखे आले नाहीत. कदाचित ते ज्येष्ठ नेते व मी ज्युनियर म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे सांगतानाच पालकमंत्र्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात किती वेळा दौरा केला याची माहिती दिली.

ते म्हणाले, ‘२० जानेवारीला पालकमंत्री म्हणून माझी निवड झाली. खरंतर माझी निवड सहा जानेवारीला झाली होती. पण बाळासाहेब थोरात कोल्हापूरला व मी येथे अशी पालकमंत्री म्हणून आमची निवड करण्यात आली. मात्र थोरात कोल्हापूरचा चार्ज घेत नव्हते, म्हणून मी इकडचा चार्ज घेत नव्हतो. अखेर २० तारखेला मी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर आजपर्यंत तब्बल चौदा वेळा माझी नगरला भेट झाली आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी आपण चांगल्या निधीची तरतूद केली होती. पण दुर्दैवाने करोना आला. नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नगर मला सुंदर करायचे आहे. ते माझं स्वप्न करोनाच्या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर नक्की पूर्ण करू,’ असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अरेरे! पाळीव श्वानाने १२ दिवसाच्या बालकाचे घेतले प्राण

0

लंडन: अनेकांना मांजर, पाळायला आवडते. प्राणी पाळण्याचा अनुभव अनेकांचा चांगला असतो. हे प्राणी माणसांसोबत प्रामाणिक आणि अगदी सहजपणे वावरत असतात. काही प्रसंगी श्वानांनी माणसांना मदतही केली असल्याचे किस्से ऐकण्यात आलेले असतात. मात्र, एका कुटुंबासाठी त्यांचा पाळीव श्वान हा धोकादायक ठरला. या पाळीव श्वानाने अवघ्या १२ दिवसांच्या बाळाचे प्राण घेतले.

उत्तर इंग्लंडमधील यॉर्कशायर शहरातील डॉनकास्टर येथे राहणाऱ्या कुटुंबावर हे संकट कोसळले. स्टीफन जोयनेस (३५) आणि अबिगाइल अॅलिस (२७) हे मागील काही दिवसांपासून प्रचंड आनंदात होते. अॅलिसने १२ दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्यांचा आनंद हा फारकाळ टिकला नाही. त्यांनी मागील काही वर्षांपासून पाळलेल्या टॅडी या श्वानाने त्यांच्या १२ दिवसाच्या मुलाचे प्राण घेतले.

वाचा:

रविवारी, अॅलिस आणि जोयनेस यांचा १२ दिवसाचा मुलगा झोपला होता. त्याच दरम्यान दोघांचेही लक्ष त्याच्यावरून हटले. त्यावेळी घरासमोरील बागेत खेळणाऱ्या टॅडीने अचानक घरात उडी मारली आणि लहान बाळावर हल्ला केला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून अॅलिस आणि जोयनेस त्याच्याकडे पोहचेपर्यंत बाळ रक्तबंबाळ झाले होते. उपचारासाठी बाळाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वाचा: वाचा:
घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कसेबसे श्वानावर नियंत्रण मिळवले आणि व्हॅनमधून त्याला घेऊन गेले. त्यानंतर या बाळाच्या आई वडिलांना निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल अटक करण्यात आली. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अॅलिसच्या वडिलांचे निधन झाले होते. टॅडी श्वान हा साधारणपणे शांत असायचा.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

वनडे क्रिकेटमधील तुफानी सामना; मॅक्सवेल-कॅरीने अशक्य गोष्ट करून दाखवली

0

मॅनचेस्टर: ( 3rd odi) करोना व्हायरस काळात इंग्लंडने सर्व प्रथम क्रिकेटला सुरूवात केली. प्रथम वेस्ट इंडिज नंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश इंग्लंडमध्ये खेळून गेले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडने प्रत्येकी ३ सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिका खेळली. यातील अखेरचा वनडे काल बुधवारी खेळला गेला.

मालिकेत १-१ अशी बरोबर झाल्याने अखेरचा सामना निर्णायक होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ बाद ३०२ धावा केल्या. इंग्लंडची सुरूवात खराब झाली. मिशेल स्टार्कने सामन्यातील पहिल्या दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या. पण त्यानंतर जॉनी बेयरस्टोने १२६ चेंडूत १२ चौकरा आणि दोन षटकारांसह ११२ धावा केल्या. सॅम बिलिंग्स यांनी ५८ चेंडूत ५६ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११४ धावा केल्या. ही भागिदारी तेव्हा झाली जेव्हा इंग्लंडची अवस्था चार बाद ९० अशी होती. त्यानंतर ख्रिस वोक्सने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा ठोकल्या.

वाचा-

मिशेल स्टार्कचा दणका
इंग्लंडच्या डावात स्टार्कने पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. त्याने पहिल्या चेंडूवर जेसन रॉयला तर दुसऱ्या चेंडूवर जो रुटला LBW बाद केले. यामुळे इंग्लंडची अवस्था शून्यवर दोन बाद अशी होती. वनडे क्रिकेटमध्ये २००५ नंतर दुसऱ्यांदा असे झाले आहे की पहिल्या ओव्हरच्या दोन चेंडूवर दोन विकेट पडल्या. २०१३ साली दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम असे झाले होते.

बेयरस्टोचा विक्रम

इंग्लंडकडून शतक करणाऱ्या बेयरस्टोने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १० शतक करणारा तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या बाबत त्याने भारताच्या शिखर धवनला मागे टाकले. शिखरने ७७ डावात १० शतक केली होती. तर बेयरस्टॉने ७६ डावात ही खेळी केली. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक पहिल्या स्थानावर आहे त्याने ५५ डावात १० शतक केली आहेत.

वाचा-

इंग्लंडने निम्मा विजय मिळवला, पण…
प्रथम फलंदाजी करत ३०३ धावा केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ७३ अशी केली. ३०३ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताा ऑस्ट्रेलियाने सामना जवळपास हरला होता. पण तेव्हा अॅलेक्स केरी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सामना फिरवला. या दोघांनी शतकी खेळी केली. कॅरीने १०६ तर मॅक्सवेलने १०८ धावा केल्या.

वाचा-

जोफ्रा आर्चरची एक चूक इंग्लंडला महागात पडली
इंग्लंडचा संघ विजयाच्या दिशेने जात असातना आर्चरकडून चूक झाली. एलेक्स कॅरी १७ चेंडूत ९ धावा करून खेळत होता. तेव्हा आर्चरने त्याला बाद केले. पण तिसऱ्या अंपायरने आर्चरचा पया क्रीज बाहेर असल्याचे सांगितले आणि नो बॉल दिला. या जीवनदानाचा कॅरीने भरपूर फायदा घेतला आणि १४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या. कॅरीने दमदार खेळीसह पराभव होत असेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. कॅरी आणि मॅक्सवेल यांनी सहाव्या विकेटसाठी २१२ धावांची विजयी भागिदारी केली.

कॅरीने या सामन्यात आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिले शतक झळखावले. याआधी वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३७ होती. ऑस्ट्रेलियाकडून एका दशकात शतक करणारा तो दुसरा विकेटकीपर ठरला आहे.

वाचा-

मॅक्सवेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
या सामन्यात मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधील ३ हजार धावाचा टप्पा पार केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने इतकी धावसंख्या करण्याचा विक्रम मॅक्सवेलने स्वत:च्या नावावर केला. त्याने फक्त २ हजार ४४० चेंडूत ३ हजार धावा केल्या. हा विक्रम जेस बटरलच्या नावावर होता. त्याने २ हजार ५३२ चेंडूत ३ हजार धावा केल्या होत्या.

पाच वर्षात प्रथम वनडे मालिका गमावली…
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ३ विकेटनी विजय मिळवला आणि मालिका २-१ने जिंकली. यासह इंग्लंड संघाने तिसऱ्या वनडेसह मालिका देखील गमावली. त्यांनी पाच वर्षानंतर घरच्या मैदानावर वनडे मालिका गमावली. याआधी इंग्लंडने घरच्या मैदानावर आयर्लंड, पाकिस्तान, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचा पराभव केला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

आणखी एक देश चीनच्या कर्ज सापळ्यात अडकला; भारतासाठीही धोका!

0

माले: जगभरातील गरीब आणि लहान देशांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटणाऱ्या चीनचा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे. कर्जाच्या मोठ्या रक्कमेखाली अनेक देशांचे हात अडकत चालले आहे. भारतासाठी महत्त्वाचा असणारा मालदीवही चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. मालदीववर चीनचे ३.१ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. तर, मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था पाच अब्ज डॉलरची आहे. करोनाच्या संकटात मालदीवची अर्थव्यववस्था संकटात सापडली आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटन उद्योगावर आधारीत आहे. करोनाच्या संकटामुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मालदीवला पर्यटनापासून दरवर्षी सुमारे दोन अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळते. परंतु करोनामुळे उत्पन्नात एक तृतीयांश घट होण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट कायम राहिल्यास मालदीवला ७० कोटी डॉलरचे नुकसान सहन करावे लागू शकते.

वाचा:

मालदीवचे माजी पंतप्रधान आणि संसदेचे विद्यमान अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी सांगितले की, देशावर चीनचे एकूण ३.१ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. यामध्ये सरकार दरम्यानचे कर्ज, सरकारी उद्योगांना दिलेल्या कर्ज, खासगी उद्योगांच्या कर्जाचा समावेश आहे. या कर्जासाठी मालदीव सरकार हमी दिली आहे. मालदीव सरकार चीनच्या या जाळ्यात अडकू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

नशीद यांनी ज्या प्रकल्पांसाठी चीनकडून कर्ज घेतले गेले त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या प्रकल्पातून सरकारला किती महसूल मिळणार, त्यातून कर्जाची रक्कम कशी फेडली जाणार, आदीबाबत विचार करण्यात आला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. चीनच्या मदतीने सुरू असलेल्या अनेक प्रकल्पातील खर्चही वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष २०१३ मध्ये मालदीवमध्ये चीन समर्थक असलेल्या अब्दुला यामीन यांच्या सरकारने ॉमोठ्या प्रकल्पांच्या नावावर चीनकडून कर्ज घेतले होते. हेच कर्ज आता सध्याच्या सरकारसमोरील मोठे संकट ठरले आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

वाचा:

मालदीव जर चीनचे कर्ज फेडण्यास अपयशी ठरला तर त्याची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, अशी भीती नशीद यांनी व्यक्त केली. श्रीलंकेलाही चीनचे कर्ज फेडता न आल्यामुळे त्यांना आपले महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनला ९९ वर्षांच्या भाडेकरारावर द्यावे लागले आहे. मालदीवमधील एखादे बंदर, प्रकल्प चीन सरकार आपल्या कंपनीच्या मार्फत ताब्यात घेण्याचा विचार करू शकतो. लाओस देशातील पॉवर ग्रीडमध्ये चीनच्या सरकारी कंपनीने अशाच प्रकारे शिरकाव केला आहे.

भारतासाठी धोका ?
मालदीवही कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यास भारतासाठी ही धोका निर्माण होऊ शकतो. ९० हजार चौकिमी क्षेत्रफळावर पसरलेला मालदीव देश भारतासाठी खुपच महत्त्वाचा आहे. मालदीवच्या समुद्र सीमेलगत भारतीय बेट मिनिकॉयचे अंतर फक्त १०० किमी आहे. तर, केरळच्या दक्षिण भागापासून मालदीवच्या बेटांचे अंतर फक्त ६०० किमी आहे. चीनकडून भारताची हिंदी महासागरात कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालदीवचे सामरिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन चीनने या देशाला कर्जाच्या विळख्यात अडकवण्याचाही प्रयत्न केला आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन या देशावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मालदीवमध्ये २०१८ मध्ये नवीन सरकार आल्यानंतर चीनसोबत कोणताही मोठा करार करण्यात आला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राहुल गांधींकडून पंतप्रधानांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा; मग कोपरखळी!

0

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार यांनी यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सकाळीच सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. सकाळी ७.१५ च्या सुमारास राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असं ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच बेरोजगारीच्या मुद्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस (#NationalUnemploymentDay) ट्रेन्डमध्ये सहभागी होत त्यांनी मोदी सरकारला कोपरखळी मारलीय.

वाचा :

वाचा :

‘मोठ्या प्रमाणात बेरोजगारीमुळे तरुणांना आज साजरा करावा लागतोय. रोजगार हा सन्मान आहे. सरकार केव्हापर्यंत हा सन्मान देण्यापासून मागे हटत राहणार?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारलाय.

७० व्या वाढदिवसानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज देश – विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’च्या रुपात साजरा केला जातोय. बेरोजगारीच्या मुद्यावर सोशल मीडियावर सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याचमुळे ट्विटवरवर #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस आणि #NationalUnemploymentDay असे दोन ट्रेन्डही सध्या पाहायला मिळत आहेत.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts