Sunday, June 4, 2023
Home Blog Page 6469

जय जिजाऊ, जय शिवराय!; योगींच्या 'या' निर्णयानंतर फडणवीसांचं ट्विट

0

मुंबई: येथे होत असलेल्या संग्रहालयाला मुघलांचे नाही तर यांचे नाव दिले जाणार आहे, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांनी लगेचच त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस यांनी योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे. ( welcomes Uttar Pradesh CM ‘s decision )

वाचा:

आग्रा येथे ‘ ‘च्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ भव्य असं मुघल संग्रहालय () उभारण्यात येत आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संग्रहायलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या संग्रहालयाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा आणि शिवरायांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतला. हे संग्रहायल मुघलांच्या नावाने नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ‘उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या इतिहासाला कोणतंही स्थान नाही. आमचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत’, असं ट्विट करत योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयामागची सरकारची भूमिका स्पष्ट केली.

वाचा:

योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच या निर्णयाचे स्वागत केले. फडणवीस यांनी योगींचं ट्विट रीट्विट करत शिवरायांचा जयजयकार केला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, असं ट्विट करत फडणवीस यांनी योगी सरकारचं कौतुक केलं.

वाचा:

दरम्यान, आग्रा येथे उभारण्यात येत असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा मानस आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाची महत्त्वाची पाने आग्र्याशी जोडली गेलेली आहेत. त्याला या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा जगभर पोहचावी हा योगी सरकारचा उद्देश आहे. शिवरायांशी संबंधित अमूल्य ठेवा या संग्रहालयात ठेवला जाणार असून तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या इतिहासप्रेमी व पर्यटकांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'हॅपिएस्ट माइंड्स'IPO; 'शेअर अलॉटमेंट'बाबत अशी मिळवा माहिती

0

मुंबई : करोना संकट आणि भांडवली बाजारातील अनिश्चितता असून देखील () ची समभाग विक्रीला प्रचंड यश मिळाले आहे. ७०२ कोटींच्या शेअर्ससाठी तब्बल १५१ पट म्हणजेच ५४२९४ कोटींची बोलली लागली आहे. त्यामुळे शेअर अलॉटमेंटमध्ये डिमॅट खात्यात शेअर जमा झाल्यास गुंतवणूकदारांसाठी जणू लॉटरीच लागणार आहे.

हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज शेअर वाटपाकडे () किरकोळ गुंतवणूकदार आणि उच्च मालमत्ता असलेले गुंतवणूकदार (HNI’s) यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी शेअरचे वाटप होण्याची शक्यता आहे. गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी हा शेअर भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे.

याआधीच विशेष म्हणजे ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर १४२ ते १४६ रुपये जादा दराने मिळत आहेत. आयपीओसाठी प्रती शेअर १६५ ते १६६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता. एकूण ७०२ कोटींच्या आयपीओसाठी ५८२९४ कोटींची बोली लागली आहे. १५१ पट हा आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. बऱ्याच कालावधीनंतर बाजारात चांगला आयपीओ आल्याने गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला असल्याचे शेअर विश्लेषकांचे म्हणणे आहे.

वाचा : उच्च मालमत्ता असलेले गुंतवणूकदारांसाठी (HNI’s) शेअरची कमाल मर्यादा १६६ रुपये असून यात ३५१.४६ पट सबस्क्रिप्शन ७ दिवस फायदा, ७ दिवसांचे व्याज असे ७८.३२ रुपये प्रती शेअर वाढतात.ग्रे मार्केटमध्ये या शेअरचा भाव २४४ रुपये चालला आहे. त्यामुळे त्यातही HNI’s ६३.६८ रुपये ते ६७.६८ रुपये प्रती शेअर नफा कमवू शकतात.

वाचा : देशात डिजिटल सेवांची मागणी वाढत आहे. त्यामुळे हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिजने मागील तीन वर्षात सरासरी २१ टक्के वृद्धी नोंदवली.७०२ कोटींच्या शेअर्ससाठी तब्बल ५८२९४ कोटींचे खरेदीचे प्रस्ताव कंपनीला प्राप्त झाले आहेत. करोनाच्या आर्थिक संकटात अशा प्रकारची कामगिरी कंपनीचे संस्थापक ७७ वर्षीय अशोक सूता (ashok soota) यांनी करून दाखवली आहे.

इथं कळेल तुम्हाला शेअर वाटप झालेत की नाही
ज्या गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीसाठी बोली लावली आहे, अशा गुंतवणूकदारांना kfintech.com या ऑनलाइन पोर्टलवर माहिती मिळेल. या आयपीओसाठी KFin Technologies Private Limited ही रजिस्ट्रार आहे. गुंतवणूकदारांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर वाटप करणे , ज्यांना शेअर वाटप झाले नाही त्यांना परतावा देणे तसेच आयपीओशी संबंधित गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी आयपीओसाठी नियुक्त केलेल्या रजिस्ट्रारवर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

OLXवरून बाइक घ्यायची होती; मित्राची हत्या करून सोनसाखळी चोरली

0

ठाणे: मैत्री ही जीवाला जीव देणारी असते. मात्र, मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यानंतर आता भिवंडीत समोर आला आहे. मोटारसायकल घेण्यासाठी मित्राच्या गळ्यातील सोनसाखळीवर डोळा असलेल्या तरुणाने सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने क्रिकेटच्या बॅटने हल्ला करून मित्राची हत्या केली असून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ( Thane Latest News )

वाचा:

येथील करंजोटी गावात राहणारे (२०) आणि (३०) हे दोघे मित्र होते. त्यांची घरेही एकमेकांच्या घराजवळच आहेत. घरात एकुलता एक असलेला आकाश याची ११ सप्टेंबर रोजी हत्या झाल्याने गावात खळबळ उडाली. याबाबत ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वाशिंद युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, पोलीस उप निरीक्षक गणपत सुळे यांच्या टीमने समांतर तपास सुरु केला. ही हत्या करंजोटी, वडवली गावामध्ये झाली होती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाची अत्यंत बारकाईने पाहणी केली. आसपासचा परिसर पिंजून काढला. तरीही काहीच धागादोरा सापडला नाही. तपास चालू असताना आकाशचा मित्र मयूरला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, आकाशच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या उद्देशाने त्याची हत्या केल्याची कबुली नंतर मयूरने दिली. गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात नंतर आणखीनच धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वाचा:

ओएलएक्सवर मयूरने एक मोटारसायकल बघितली होती. या मोटारसायकलची किंमत २५ हजार असून त्याला ही मोटारसायकल घ्यायची होती. मात्र, त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. आकाश याच्या गळ्यातील सोनसाखळी मिळाल्यास मोटारसायकल घेता येईल, हा विचार मयूरच्या डोक्यात आला आणि मग त्याने थेट आकाशच्या हत्येचीच योजना बनवली. मयूरने आकाशला गावाच्या बाहेर शेतामध्ये बोलावून घेत क्रिकेटची बॅट आकाशच्या डोक्यात आणि तोंडावर मारली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आकाश पळाला. मयूरने पाठलाग करत पुन्हा आकाशला गाठले आणि पुन्हा बॅटने मारत त्याची हत्या केली. त्यानंतर सोनसाखळी, मोबाइल घेऊन तो पसार झाला, असे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिस उप निरीक्षक गणपत सुळे यांनी सांगितले. आरोपीला पुढील चौकशीसाठी पडघा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयूरचे नववीपर्यंतच शिक्षण झाले असून तो काहीच कामधंदा करत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पडघा पोलीस करत आहेत.

वाचा:

दरम्यान, ठाण्यातही नुकतीच सोनसाखळी चोरीसाठी अक्षय डाकी या तरुणाची त्याच्याच मित्राने अन्य साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची घटना घडली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोनाविरुद्धचा लढा नक्की जिंकू; मुख्यमंत्र्यांनी सांगितला 'हा' महत्त्वाचा मंत्र

0

मुंबई: विरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘ ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री यांनी आज सांगितले. ( CM On Fight Against )

वाचा:

वर्षा निवासस्थान येथून आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी करोना विरुद्धच्या नव्या मोहिमेबाबत महत्त्वाचे आवाहन केले. ‘राज्यातील जिल्ह्यांत सकारात्मकतेचे प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत. गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता करोनासोबत कसे जगायचे, ते आता आपल्याला सगळ्यांनाच शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ मध्ये मी शिवआरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखविले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तरच करोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू.

वाचा:

टँकर्सवर सायरन

सध्या राज्यात १००० मेट्रिक टन ऑक्सिजन उतपादन होते. मात्र गरज ५०० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढील काळात गरज पडू शकते असे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरिय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका किती उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील . या टँकसची वाहतुक रोखू नये तसेच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील असे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी माहिती दिली.

वाचा:

मोहिमेसाठी मोबाइल अॅप

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेसाठी खास मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून ते आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यातून योग्य रीतीने व जलदरीत्या विश्लेषण शक्य होईल, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामास्वामी यांनी दिली. या मोहिमेसाठी सर्व पथकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची तसेच सर्व आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे त्याची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री , मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

विराट कोहलीनंतर 'हा' क्रिकेटपटू होऊ शकतो भारताचा कर्णधार

0

भारताचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. पण येत्या काळात क्रिकेटचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे विराट कोहलीऐवजी भारताचे कर्णधारपद या युवा क्रिकेटपटूला दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सध्या सुरु आहे.

महेंद्रसिंग धोनी हा यशस्वी कर्णधार होता. पण त्यालाही कर्णधारपद सोडावे लागले आणि त्यानंतर विराट कोहलीने भारताचे नेतृत्व सांभाळले. गेल्या काही मालिकांमध्ये विराटला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कर्णधारपदचे जास्त दडपण आता कोहलीवर येत असल्याचे काही जणांना वाटत आहे. कारण त्याला काही मालिकांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता भारताच्या नवीन कर्णधारासाठी चाचपणी सुरु झाली आहे, असे म्हटले जात आहे.

एका चाहत्याने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राला एक प्रश्न विचारला होता. कोहलीनंतर भारताचा कर्णधार कोण असेल, हा तो प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देताना आकाश म्हणाला की, ” सध्याच्या घडीला विराटकडे भारताचे नेतृत्व आहे. विराट आणि रोहित यांचं वय जवळपास सारखे आहे. त्यामुळे जर भारताला विराटनंतर कर्णधार शोधायचा असेल तर तो युवा क्रिकेटपटू असायला हवा. त्यामुळे माझ्यामते विराटनंतर भारताचे कर्णधारपद हे लोकेश राहुलकडे जाऊ शकते. राहुल हा कर्णधार म्हणून कसा आहे, हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्याला आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाचे कर्णधारपद दिले आहे. त्यामुळे तो काय रणनिती आखतो आणि खेळाडूंचे व्यवस्थापन कसे करतो, ते लवकरच सर्वांना समजू शकते.”

आकाश पुढे म्हणाला की, ” प्रत्येक कर्णधाराच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, त्याला संघाचे नेतृत्व कोणाला तरी सोपवावे लागते. महेंद्रसिंग धोनीने कोहलीकडे नेतृत्व सोपवले होते. त्यामुळे विराटलाही आपल्या कर्णधारपदाचा भार कोणाला तरी नक्कीच द्यावा लागेल. जर कोहली असे करेल तेव्हा यादीमध्ये सर्वात पहिले नाव हे लोकेश राहुलचे असेल. यंदाच्या आयपीएलमध्येच तो एक कर्णधार म्हणून कसा आहे, हे आपल्याला समजू शकेल.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मनसेचे पुन्हा 'खळ्ळखट्याक'; आता 'हे' ठरले कारण

0

अहमदनगर : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे व या महामार्गाची व्यवस्थित दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विभागाच्या पाथर्डी कार्यालयात गेले. मात्र निवेदन घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. मनसेच्या या ‘खळ्ळखट्याक’ने वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ( Protest against )

वाचा:

पाथर्डी येथून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाबाबत मागणीचे निवेदन देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात गेले होते. मात्र, तिथे कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे तोडफोड केली गेली. तसेच अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे खड्डे बुजविण्याची वेळोवेळी मागणी करूनही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आता तर या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील डबक्यामध्ये बेरोजगार तरुणांना मासेमारी करून पर्यटन व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन घेऊन कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय गाठले होते. मात्र कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने पुढचं हिंसक आंदोलन झालं.

वाचा:

गेल्या तीन वर्षापासून महामार्गाचे काम बंद आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. अधिकारी मात्र कार्यालयाकडे फिरकत नाहीत, असा आरोपही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर मनसे कार्यकर्ते पाथर्डी नगरपालिका कार्यालयात गेले, व तेथे शहरातील खड्डे बुजविण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे त्यांनी केली. खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर शहरातील खड्डे तत्काळ बुजवण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

खरंच पाकिस्तानचे करोनावर नियंत्रण की झोलझाल?

0

इस्लामाबाद: करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेनेही जगाला पाकिस्तानकडून शिकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अनेकांच्या नजरा पाकिस्तानकडे वळल्या आहेत. करोनाला अटकाव केल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता शाळा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे.

पाकिस्तानमध्ये बाधितांची संख्या कशी कमी झाली?

पाकिस्तान आधीपासून बिकट आरोग्य व्यवस्था, आर्थिक संकटाचा सामना करत होता. अशातच एप्रिल-मे-जून या महिन्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. त्यानंतर अचानक नवीन करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे समोर आले. अचानकपणे कमी झालेल्या संख्येमुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. अनेक पाकिस्तानी माध्यमांनी आपल्या वृत्तांमध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील आयसीयू पूर्ण भरले असल्याचे म्हटले होते. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची भटकत असल्याचेही समोर आले होते. अशा स्थितीत करोनाचा कहर कमी होणे हे एखाद्या चमत्कारासारखेच आहे.

वाचा:

वाचा: पाकिस्तान सरकारचे वाकडे पाऊल

करोनाच्या संसर्गामुळे देशात असंतोष वाढत होता. या असंतोषाला रोखण्यासाठी इम्रान खान यांच्या सरकारने चाचणी कमी केली. भारतासह इतर अनेक देशांमध्ये करोना चाचणीचे प्रमाण वाढत आहे. तर, पाकिस्तानमध्ये चाचणीचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळेच करोनाबाधितांची संख्या कमी आढळली जात असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानमध्ये एका दिवसात ३० हजार करोना चाचणी केली. ही संख्या आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे.

वाचा:

करोनावर नियंत्रण की झोल?

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या तुलनेत पाकिस्तानची लोकसंख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील १० लाख नागरिकांमध्ये १४०० इतके करोना चाचणीचे प्रमाण आहे. तर, भारतात हेच प्रमाण ३७०० च्यावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०जणांची करोना चाचणी केल्यास एक करोनाबाधित आढळत असल्यास करोना नियंत्रणात असल्याचे म्हटले जाते. मात्र, पाकिस्तानमध्ये करोना चाचणीच्या दरम्यान, प्रत्येक आठवी व्यक्ती ही करोनाबाधित आढळते. भारतात दर ११ वी व्यक्ती बाधित आढळते.

वाचा:

वाचा:

सोमवारी ५३९ नवीन करोनाबाधित

पाकिस्तानमध्ये सोमवारी करोना संसर्गाचे नवीन ५३९ रुग्ण आढळले. पाकिस्तानमध्ये तीन लाख दोन हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आणखी चारजणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ६३८३ इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, दोन लाख ८९ हजारजणांनी करोनावर मात केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'करोडपती'झाल्यानंतर संसाराला लागली उतरती कळा; सुशील कुमारने सांगितला अनुभव

0

मुंबई: महानायक लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा लोकप्रिय ”चा खेळ रंगवताना दिसणार आहे. केबीसीच्या नव्या सीझनच काही फोटो बच्चन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करायला सुरुवात केली आहे. केबीसीच्या नव्या पर्व सुरू होत असतानात जुन्या पर्वाच्या विजेत्यांच्या चर्चाही होऊ लागल्या आहे.

सामन्य व्यक्ती जेव्हाकोट्यधीशहोतो तेव्हा त्याची चर्चा तर होणारचं. त्याचं आयुष्यही बदलून जातं. २०११मध्ये ५ कोटींचं बक्षिस जिंकलेल्या याचंही आयुष्यचं बदललं. पण त्यानं सांगितेला त्याचा अनुभव डोळ्यात पाणी आणणारा असाच आहे. पैसा आज आहे तर उद्या नाही, हे त्याच्या बाबतीत अत्यंत खरं ठरलं. ५ कोटी जिंकल्यानंतर संसाराला, आयुष्यालाच उतरती कळा लागल्याचं तो म्हणतोय.

केबीसी जिंकल्यानंतर सुशीलला सिगारेट आणि दारुचं व्यसन लागलं. केबीसी जिंकल्यानंतर स्थानिक पातळीवर तो सेलिब्रिटी झाला होता. महिन्यातीस दहा पंधरा दिवस बिहारमध्ये इकड्या तिकडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याला खास आमंत्रणं दिली जात होती. अभ्यासातून लक्ष विचलीत झालं होतं. मीडिया प्रसिद्धीचा एकप्रकारे त्याला चस्काच लागला होता. लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नवीन नवीन उद्योग,व्यवसाय करायला सुरुवात केली. पंरतु यात मोठं नुकसान झालं. यात खूप पैसा खर्च झाला.

सुशील सांगतो की, याच दरम्यान गुप्तदान करण्याचं मला वेड लागलं होतं. महिन्याला हजारो रुपये तो दान करायचा. अनेकांनी त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीनं सुशीलला या लोकांबद्दल आणि त्यांच्या हेतूबद्दल वारंवार सांगूनही त्यानं तिचं ऐकलं नाही. त्यामुळं सुशील आणि त्याच्या पत्नीमध्येही वाद होऊ लागले.

याच सोबत काही चांगल्या गोष्टी झाल्यातंही सुशील सागंतो. त्यानं दिल्लीत काही गाड्या खरेदी केल्या होत्या. एका मित्राच्या साहाय्यानं तो गाड्या चालवण्यासाठी देत होता. त्यासाठी दिल्लीच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. याच दरम्यान सुशीलची मैत्री जामिया मिलियात मीडियाचा अभ्यास करणाऱ्या काही मुलांसोबत झाली. तसंच जेएनयूमधील काही विद्यार्थी त्याचे मित्र झाले. रंगभूमीवर काम करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशीही त्यानं ओळख वाढवली. जेव्हा हे विद्यार्थी गप्पा मारायचे तेव्हा आपण या तलावातलं बेडूक असल्याचं सुशीलला वाटायचं.अनेक गोष्टींचं त्याला ज्ञान नव्हतं. याच दरम्यानं दारु आणि सिगारेटचं व्यसन लागल्याचं सुशील सांगतो.

‘एकदा रागाच्या भरात घरातून बाहेर पडलो तेव्हा एका पत्रकाराचा फोन आला. काही वेळ मी त्याच्यासोबत व्यवस्थित बोललो. परंतु त्याच्या एका प्रश्नावर मी चिडलो आणि माझ्याकडचे सर्व पैसे संपले असून दोन गायी खरेदी केल्या होत्या.त्यांचं दूध विकून उदनिर्वाह करत असल्याचं त्याला सांगितलं. त्या दिवसापासू चित्र पालटलं. जे लोक आजुबाजुला असायचे ते दूर झाले. लोकांनी कार्यक्रमाला बोलवणं बंद केलं’, असं सुशील सांगतो.

त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न घेऊन मी मुंबईला आलो. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काही काळ काम केलं. पण तितंथही मन रमलं नाही. त्यानंतर एका गीतकार मित्रासोबत त्याच्या घरी राहू लागलो. दिवसभर एकटा असायचो. याच काळात स्वत:ला ओळखण्यासाठी वेळ मिळाला, स्वत:ला जाणून घेता आलं. खरा आनंद हा आवडीचं काम करण्यातचं असल्याचं मला उमगलं. त्यानंतर मी पुन्हा घरी परतलो. शिक्षक होण्यासाठी परिक्षा दिल्या. पास झालो. आता खूप बरं वाटतं. कोणतही काम उत्साहानं करतो. पर्यावरणासंबंधीत अनेक कामांमध्ये सहभाग घेतो, असं सुशील सांगतो.

शेवटी सुशील म्हणतो की, ‘आयुष्यात गरजा जितक्या कमी असतील तितकं चांगलं. तेवढंच कमायचं जेवढ्या आपल्या गरजा असतील’.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

टेक्नो स्पार्क पॉवर २ एअर भारतात लाँच, ४ दिवसांपर्यंत बॅटरी चालणार

0

नवी दिल्लीः ला अखेर सोमवारी भारतात लाँच करण्यात आले आहे. टेक्नो बजेट फोनचे टीझर गेल्या काही दिवसांपासून जारी केले जात होते. मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आमि 6000mAh बॅटरी यासारखे फीचर्स आहेत. २० सप्टेंबर रोजी फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता सेलला सुरूवात होणार आहे.

वाचाः

Tecno Spark Power 2 Air: ची किंमत
टेक्नोच्या या बजेट हँडसेटला देशात ८ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोनला कॉस्मिक शाईन आणि आईस झेडाइट कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. फ्लिपकार्टवरून अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. तर अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डसोबत ५ टक्के सूट मिळणार आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा घेता येवू शकते.

वाचाः

Tecno Spark Power 2 Air: ची वैशिष्ट्ये
टेक्नो च्या या फोनमध्ये ७ इंचाचा एचडी प्लस इनसेल आयपीएस (1640 x 720 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए २२ क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. इनबिल्ट स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोन अँड्रॉयड १० वर चालतो.

वाचाः

टेक्नो स्पार्क पॉवर २ एअरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा, २ मेगापिक्सलचा सोबत एआय लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी ड्यूल फ्रंट फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा मायक्र शॉट्स, एआय स्टीकर्स, बोकेह आणि एआय एचडीआर मोड सपोर्ट करते. फोनमध्ये स्टिरियो साउंडसाट ड्यूल स्पीकर्स दिले आहेत.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी टेक्नोच्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये बॅटरी चार दिवसांपर्यंत चालणार आहे. हँडसेट मध्ये रिर वर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच फेस अनलॉक फीचर सुद्धा या फोनमध्ये दिले आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, जीपीएस, जीपीआरएस, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 802.11 बी/जी/एन/एसी, 3.5 एमएम ऑडियो जॅक यासाऱके फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

रोहित पवारांच्या मतदारसंघात रस्त्याची झालीय 'अशी' अवस्था

0

अहमदनगर: राज्य आणि देशाच्या राजकारणात तसेच मतदारसंघातील कामांच्या बाबतीतही संवेदनशील असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांचे महामार्गाकडे मात्र दुर्लक्ष आहे. त्यांच्या मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याची चाळण झाली आहे. ८० किलोमीटरच्या प्रवासासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागत असल्याने गंभीर करोना बाधित रुग्णांना तातडीची मदत मिळण्यातही अडचणी येत आहेत.

पवार यांच्यासोबतच श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, नगरचे आमदार संग्राम जगताप आणि या भागाचे खासदार डॉ. सुजय विखे यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. नगरमधून जाणारे सर्व महामार्ग चौपदरी झाले आहेत. हा एकच महामार्ग दुहेरी राहिला आहे. मुख्य म्हणजे दिल्लीपासून बंगळुरूपर्यंतची वाहतूक या महामार्गावरून होते. चौपदरीकरण होईल तेव्हा होइल, दुरूस्ती करून तात्पुरता दिलासा देण्याकडेही लक्ष दिले जात नाही, ही नागरिकांची खंत आहे.

वाचा:

अवजड व मोठे ट्रेलर या रस्त्याने जातात. ८० किलोमीटरच्या टप्प्यात मिरजगाव, घोगरगाव, रुईछत्तिशी गावापासून ते थेट नगर शहरापर्यंत या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. चालकांना वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावे लागते. करोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसतो. या भागातून नगर शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे रुग्णांनाही याच महामार्गाने आणावे लागते.

वाचा:

पवार यांनी या मतदासंघात विजय मिळविल्यानंतर अनेक कामे हाती घेतली असली तरी या महामार्गाच्या दुरूस्तीच्या कामात त्यांनी लक्ष घातले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. हा महामार्ग उत्तर जिल्ह्यातून आणि दक्षिणेतही नगर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर चौपदरी आणि चांगल्या परिस्थितीत आहे. असे असतना केवळ कर्जत, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातच या महामार्गाकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत होऊन गेलेल्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये फारसे लक्ष घातले नाही. आता पवार यांच्याकडून मतदारांना अपेक्षा आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts