Wednesday, September 27, 2023
Home Blog Page 7150

BSNL ची जिओला टक्कर, 'या' प्लानमध्ये २५ जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग

0

नवी दिल्लीः BSNL युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने १९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानवर अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देणे सुरू केले आहे. या प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला आता मुंबई, आणि दिल्लीच्या MTNL नेटवर्क सोबत देशात कुठेही ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. बीएसएनएलचा हा प्लान रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानला जोरदार टक्कर देत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

वाचाः

BSNL चा १९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान
BSNL च्या या प्लानमध्ये आता देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय कंपनी प्लानमध्ये युजर्संना १०० फ्री एसएमएस देत आहे. या प्लानमध्ये २५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ७५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर बेनिफिट सोबत येते. बीएसएनएलचा रिवाइज्ड प्लान १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला आहे.

वाचाः

जिओचा १९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान
स्वस्त पोस्टपेड प्लानमध्ये जिओचा हा प्लान खूप प्रसिद्ध आहे. यात कंपनी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि फ्री एसएमएस ऑफर करते. प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा दिला जातो. युजर्स या प्लानमध्ये रोलओवर डेटा बेनिफिट कमी भासू शकते. प्लानच्या सब्सक्राईबर्सला कंपनी नवीन कॉम्प्लिमेंट्री बेनिफिट देत आहे. ज्यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि सावन सोबत अनलिमिटेड कॉलरट्यून्स बेनिफिटचा समावेश आहे.

वाचाः

दोन्ही प्लानमध्ये कोणता बेस्ट
बीएसएनएल आपल्या प्लानमध्ये ७५ जीबी पर्यंत रोलओवर डेटा ऑफर करते. तर जिओ आपल्या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस आणि अनलिमिटेड कॉलरट्यून्स यासारखे बेनिफिट्स ऑफर करते. दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. जर तुम्हाल जास्त डेटाची गरज असेल तर बीएसएनएलचा १९९ रुपयांचा प्लान जास्त चांगला आहे. परंतु, २५ जीबी डेटा असल्याने रिलायन्स जिओचा प्लान सुद्धा चांगला आहे. यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'त्यासाठी फडणवीसांनी आदळआपट करायची गरज नाही'

0

मुंबई: ‘ हिंदुत्वाविरोधात जे बरळला ते गंभीरच आहे. त्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणून त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण भाजप व यांनी इतकी आदळआपट करायची गरज नाही. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. ( Reaction after writes to CM Thackeray on )

पुण्यात ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी नामक तरुणानं हिंदू समाजाविरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यावरून संताप व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षानं शर्जिलविरोधात आघाडीच उघडली असून फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा सवाल करत, फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेलाही घेरलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं शर्जिल उस्मानीचा समाचार घेतानाच फडणवीसांनाही टोले हाणले आहेत.

म्हणते…

>> शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये.

>> हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा फडणवीसांचा प्रश्न योग्यच आहे. पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी ९० दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा. हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळ्यांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय? भाजप पुढाऱ्यांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल.

वाचा:

>> शर्जिलसारख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगमाचे धागेदोरे शेवटी योगी राज्यातच जातात. हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत आहे व तेथून तयार झालेला माल देशभरात जात असतो. हा शर्जिलही आता पळून उत्तर प्रदेशातील अलिगढला लपला आहे. महाराष्ट्राचे पोलीस अलिगढला जाऊन या शर्जिलच्या मुसक्या आवळतीलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे.

>> यूपीमध्ये लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी योगी सरकारचीही आहे. याकामी कोणी हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना, ही शंका म्हणूनच आहे.

वाचा:

>> शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीच्या बोकडांनी शिंतोडे उडवले म्हणून हिंदुत्वाचे तेज कमी होणार नाही, पण म्हातारी मेल्याचे दुःख नसून काळ सोकावत जातो. महाराष्ट्रात शिवसेना आहेच. सरकारचे सूत्रधार ठाकरे आहेत. त्यामुळे कायदा आहे तसा हाती दंडुकाही आहेच. म्हणूनच हिंदुत्वावर वाकडेतिकडे हल्ले कोणीच सहन करणार नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'तो' बिल्डर उद्धव ठाकरेंचा परममित्र आहे म्हणूनच…

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुलुंड येथे पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याच्या १२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मुलुंड येथील श्वास बिल्डर्स या विकासकाला २१०० कोटी रुपये देऊन जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारला पाठवला होता. याप्रकरणी भाजपचे माजी खासदार यांनी मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महापालिका आयुक्त चहल यांची हकालपट्टी करण्याची मागणीही सोमय्या यांनी यावेळी केली.

वाचा:

सोमय्या म्हणाले, ‘हा प्रकल्प मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रॉजेक्ट’ आहे, असेही या प्रस्तावात आयुक्तांनी म्हटले होते. श्वास बिल्डर्स हा विकासक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परममित्र असून त्याच्याकडून ही जागा खरेदी करण्याचा घाट होता. परंतु आम्ही राज्यपालांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी लोकायुक्तांना या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त चहल यांनी मागे घेत असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले. ही जागा खरेदी करून आपल्या विकासक भागीदाराला तसेच स्वतःला फायदा करून घेण्याचे हे कारस्थान होते.’ याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर द्यावे, तसेच मुंबई महापालिका आयुक्त चहल यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी केली.

वाचा:

ही जागा रुग्णालयासाठी संपादन करायची असून याला फास्ट ट्रॅकवर मंजुरी मिळावी, असेही महापालिका आयुक्तांनी प्रस्तावात म्हटले होते. मात्र याची चौकशी करण्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली असता, राज्यपालांनी लोकायुक्तांना या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर यावर्षी ११ जानेवारी रोजी मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठवले. या पत्रात, महापालिका स्तरावर रुग्णालयासाठी जागा निश्चित करण्याची कार्यवाही होणार नाही. याबाबतचे सगळे प्रस्ताव रद्द करण्यात येत आहेत. तसेच संबंधित विकासकाचे डिपॉझिट परत देण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्तांनी नमुद केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त हे मुंबईतील जनतेला मूर्ख समजत आहेत का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Poco Anniversary Sale सुरू, 'हे' स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा

0

नवी दिल्लीः Poco Anniversary Sale: जर तुम्हाला एक नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आजपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ग्राहकांसाठी पोको अॅनिव्हर्सरी सेल सुरू झाला आहे. ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. चार दिवसांत तुम्हाला पोकोचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये कोणकोणत्या पोकोच्या फोनवर डिस्काउंट मिळणार आहे. जाणून घ्या.

वाचाः

पोकोच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला १६ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत विकले जात आहे. परंतु, या सेलमध्ये हा फोन १४ हजार ४४९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. म्हणजेच या फोनवर २५०० रुपयांची बचत करता येऊ शकते. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर, स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी स्नॅपड्रॅगन ७३२ जी चिपसेट आणि फोनला पॉवर देण्यासाठी 6000 mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

या सेलमध्ये पोकोचा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये या फोनला ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. म्हणजेच या फोनवर १ हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, स्पीड आणि मल्टिटास्कींग साठी स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

Poco M2
जर तुमचे बजेट १० हजारांपेक्षा कमी असेल तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन तुम्हाला ९ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. सध्या या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर या सेलमध्ये ५०० रुपयांची सूट देण्यात येत आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, स्पीड आणि मल्टिटास्कींग साठी मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर आणि फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

एका महिन्यात चित्र पालटले; मुंबईतील घरांच्या विक्रीत मोठी घट

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई शहर व उपनगरातील घरविक्रीत जानेवारी महिन्यात ४८ टक्के घट झाली आहे. डिसेंबरच्या तुलनेत दस्तनोंद ९ हजारांहून अधिक कमी झाली आहे. मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.

करोना संकटामुळे राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात केली होती. ही कपात ३१ डिसेंबरपर्यंत लागू होती. त्याचवेळी रिअल इस्टेट क्षेत्राला उभारी देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी विविध सवलती देऊ केल्या होत्या. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन डिसेंबर महिन्यात मुंबई शहर व उपनगरात विक्रमी १९ हजार ५८० दस्तनोंद झाली होती. आता जानेवारी महिन्यात मात्र यामध्ये चांगलीच घट झाली.१ जानेवारीपासून मुद्रांक शुल्कात १ टक्का वाढ झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवरील तीन टक्के कपात २ टक्क्यांवर आली. त्यामुळे जानेवारी महिन्यात फक्त १० हजार ४१२ दस्तनोंदी, अर्थात तेवढ्या घरांचीच विक्री झाल्याचे येथील अतिरिक्त महानिरीक्षक कार्यालयाच्या माहितीतून समोर आले आहे.

६८० कोटींवरुन ३०५ वर

डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीतील घरांची खरेदी-विक्री ९१६८ ने कमी झाली. मुद्रांक शुल्काचा विचार केल्यास डिसेंबरमधील विक्रमी दस्त नोंदणीद्वारे ६८० कोटी रुपये शुल्क गोळा झाले होते. जानेवारी महिन्यात हा आकडा ३०५ कोटी रुपयांवर आला. अर्थात त्यात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली. हाच आकडा मागील वर्षी जानेवारी महिन्यात ४५४ कोटी रुपये होता.

महिना… दस्त नोंद…. मुद्रांक शुल्क (कोटी रुपयांत)

जानेवारी २०२०… ६१५०…. ४५४ कोटी ०५ लाख

डिसेंबर २०२०… १९,५८०…. ६८० कोटी ५० लाख

जानेवारी २०२१… १०,४१२…. ३०५ कोटी ११ लाख

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

CM ठाकरे-सुधीर मुनगंटीवार भेटीवर अनेक तर्क; राष्ट्रवादीने काढला 'हा' अर्थ

0

वर्धा: भाजपकडून मुख्यमंत्री यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत असताना नेते यांनी मंगळवारी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली व भाजपवर जोरदार शब्दांत निशाणा साधला. ( )

वाचा:

सुधीर मुनगंटीवार हे मतदारसंघातील प्रश्न घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले होते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेसोबतच्या मैत्रीबाबत मुनगंटीवार यांनी महत्त्वाचे विधान केले होते. ‘शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत. भाजप व शिवसेनेचे काय होते ते पुढे बघू पण हिंदुत्वाचा आणि जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षांना ऐकावा लागेल’, असे मुनगंटीवार म्हणाले होते. शिवसेनेबाबत जी माझी भूमिका आहे तीच देवेंद्र फडणवीस यांचीही असणार, असे विधानही त्यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्क लावले जात आहेत. या घडामोडीनंतर आणि भाजपमधील तणाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. यावर जयंत पाटील यांनी आज नेमक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

वाचा:

भाजपला सध्या राज्यात शिवसेनेशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच भविष्यात शिवसेना आपल्यासोबत येईल, या आशेवर भाजपचे नेते आहेत. त्यातूनच हे सगळं चाललं आहे, असा टोला पाटील यांनी लगावला. भाजपच्या राज्यातील नेत्यांना सध्या निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेच्या जवळ जाण्याची त्यांची धडपड चालली आहे. म्हणूनच मतदारसंघातील कामांचे निमित्त करून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. अशा भेटीतून वातावरण निर्मिती करायची आणि त्याचा फायदा उठवायचा, असाच भाजपचा डाव दिसतोय, अशी टोलेबाजीही पाटील यांनी केली. दुसरीकडे महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या भेटीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सचिनने रिहाना आणि कंपनीला सुनावले, भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच…

0

नवी दिल्ली: भारतात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार ()ने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू ( )ने देखील रिहानाला सुनावले आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला अनेकांनी विरोध केला आहे. यात पर्यावरण आणि जल यासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाचीचा यांचा देखील समावेश आहे.

वाचा-

रिहानाने भारतातील गोष्टीत लक्ष घालू नये याबद्दल माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि अन्य बॉलिवडूमधील स्टार देखील सोशल मीडियावर बोलले आहेत. आता गॉड ऑफ क्रिकेट सचिनने यासंदर्भात ट्वीट केले.

भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले आहे.

वाचा-

वाचा-

कृषी कायद्यावर परेदशातील अनेक लोकांनी विरोध केलाय. यावरून भारतीय लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना सत्य जाणून न घेता प्रतिक्रिया देऊ नये असा सल्ला दिला आहे.

वाचा-

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता.

वाचा-

रिहानाच्या या पोस्टवर भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा (pragyan ojha )ने उत्तर दिले आहे. आमचा देश शेतकऱ्यांवर गर्व करतो आणि आम्हाला माहिती आहे की तो किती महत्त्वाचा आहे. २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ओझाने रिहानाला उत्तर देताना म्हटले आहे की, मला विश्वास आहे की हा प्रश्न लवकरच मिटेल. आमच्या अंतर्गत प्रश्नात बाहेरच्या व्यक्तीने लक्ष घालण्याची गरज नाही.

वाचा-

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा राडा झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

धनंजय मुंडे हे पराक्रमी योद्धे आहेत का?; तृप्ती देसाईंचा तीरकस सवाल

0

नगर: सामाजिक न्यायमंत्री यांच्यापुढे नवी अडचण उभी राहिल्यानंतर या संघटनेच्या यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता त्यांचे सत्कार करणाऱ्यांसोबतच काँग्रेसवरही देसाई यांनी टीका केली आहे. ‘मुंडेचे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का,’ असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच ‘परिवार संवाद कार्यक्रम घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का तेही पहावे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ( Latest Update )

वाचा:

काही दिवसांपूर्वी एका महिलेने मुंडे यांच्याविरूद्ध तक्रार केली होती. त्यावरून राज्यभर रान पेटले होते. त्यावेळी तृप्ती देसाई यांनीही मुंडेंवर टीका केली होती. मात्र, काही काळानंतर सदर महिलेने तक्रार मागे घेतली. त्यामुळे मुंडे यांचे जल्लोषात स्वागत आणि सत्कार होऊ लागले. आता दुसऱ्या महिलेने मुंडे यांच्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. हा धागा पकडून देसाई यांनी पुन्हा मुंडे यांच्यावर आणि सोबत मुंडे यांचा सत्कार करणाऱ्यांवर टीका केली आहे.

वाचा:

‘मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत. मुंडे हे पराक्रमी योद्धा आहेत, अशा पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु, त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली स्वतःच दिलेली होती. त्यानंतरही तक्रार करणाऱ्या महिलेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकरवी झाला होता. आता पुन्हा दुसऱ्या महिलेने तक्रार अर्ज दिला आहे. त्यामुळे मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. असेच चालू राहिले तर भविष्यात एखादा नेता वा मंत्र्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर वा तो आरोपी ठरल्यानंतरही त्याचं स्वागत केलं जाईल’, अशा शब्दांत देसाई यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी परिवार संवाद साधताना, राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का, हे पण पाहिले पाहिजे आणि त्याविरोधात राष्ट्रवादीतील सर्व महिला नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अजिंक्य म्हणाला, विराट नव्हता म्हणून नेतृत्व केले; पुन्हा गरज…

0

चेन्नई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता घरच्या मैदानावर टीम इंडिया इंग्लंडचा मुकाबला करणार आहे. ()ने ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून भारताला विजय मिळून दिला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने भारताचा कर्णधार ()ला मदत करण्याचे ठरवले आहे.

वाचा-

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत ५ फेब्रुवारीपासून चेन्नईत होणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतूनच जूनमध्ये लॉडर्सवर होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमधील न्यूझीलंडविरुद्ध लढणाऱ्या संघाचा निर्णय होणार आहे.

वाचा-

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी अजिंक्य रहाणे म्हणाला, माझे काम आहे विराटची मदत करणे. माझे काम आता सोपे झाले आहे. जेव्हा विराट काही विचारेल तेव्हा मी त्याला सांगेन. विराट कोहली कर्णधार होता आणि कौटुंबीक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतात परतला होता. त्यामुळेच मी ऑस्ट्रेलियात कर्णधाराच्या भूमिकेत होतो.

वाचा-

ऑस्ट्रेलियात मिळवलेला विजय हा आता भूतकाळ आहे. आम्ही आता इंग्लंड संघाचा सम्मान करतोय. ज्यांनी श्रीलंकाचा पराभव केला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अद्याप पाच महिन्यांचा कालावधी आहे. न्यूझीलंडचा संघ फार चांगला खेळला आहे.

वाचा-

चेन्नईत होणाऱ्या पहिल्या कसोटीत फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघात अक्षर पटलेला संधी मिळेल का या प्रश्नावर अजिंक्य म्हणाला, आम्ही संघा निवडीबाबत उद्या (गुरुवार) सराव झाल्यानंतर निर्णय घेऊ.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

गोकुळमध्ये निवडणुकीआधी 'राडा'; वार्षिक सभेत काय घडलं पाहा

0

कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्यावरुन गोंधळ झाला. विरोधकांनी सभेच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत या मुद्यावर आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभा आटोपती घेण्याची वेळ सत्ताधारी संचालकांवर आली. जवळपास पाऊण तास चाललेल्या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले. ( )

वाचा:

सत्तारुढ गटाने अगदी सुरुवातीलाच विरोधकांनी कोणताही प्रश्न विचारावा, उत्तर द्यायची आमची तयारी असल्याचे स्पष्ट केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यास सुरुवात झाल्यानंतर सभेत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. मागील वर्षी सभा झालीच नाही, सभा गुंडाळली होती, मग कसले इतिवृत्त वाचता असे म्हणत हा गोंधळ वाढत गेला. मागील वर्षी सभा झाली असून त्याला सरकारने मान्यता दिली असल्याचे संचालकांनी सांगितले. पण, विरोधकांचे समाधान न झाल्याने अखेर सभा आटोपती घ्यावी लागली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरूण नरके होते.

वाचा:

दरम्यान,गेल्यावर्षी महापुराची स्थिती, यंदा संसर्गाचं संकट अशा आपत्तीच्या कालावधीतही या दूध संघाची वार्षिक उलाढाल २३८३ कोटींवर पोहोचली. यामुळे गोकुळच्या यशाची कमान उंचावल्याचे अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक यांनी सांगितले. दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. सभेत कोणताही गोंधळ होवू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना स्थळी सभा झाली.

वाचा:

नरके यांनी सभासदांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या परवानगीने कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सभेपुढील विषयांचे वाचन करण्यास सुरुवात केली. मागील सभा झालीच नाही, मग इतिवृत्तांत मंजूर कसा? सभा झाली नसताना विषयांना मंजुरी कशी मिळाली? जी सभा झाली नाही, त्याचे प्रोसेडिंग काय लिहिले ते वाचा अशी मागणी कृती समितीतील , किरणसिंह चव्हाण, सदाशिव चरापले आदींनी केली. त्यांनी काही मंडळीसह व्यासपीठासमोर येऊन विरोध सुरू केला. त्यावर सभाध्यक्ष नरके यांनी मागील सभा झाली आहे, त्या विषयाला मंजुरी आहे. सरकारने इतिवृत्त मंजूर केले आहे, अशा शब्दांत समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक मागील इतिवृत्तांत वाचा, त्या सभेची चित्रफित दाखवा, अशी मागणी करु लागले. यामुळे सभेत काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts