Monday, December 11, 2023
Home Blog Page 7151

'केंद्राच्या 'त्या' प्रस्तावामुळे गरिबांसाठी वीज चैनीची बाब ठरेल'

0

मुंबई: क्षेत्रातील एकाधिकारशाही मोडून काढण्याच्या गोंडस नावाखाली क्षेत्र खासगी क्षेत्रांत घुसवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे आणि हा प्रस्ताव पुढे रेटला गेल्यास सामान्य जनता व गोरगरिबांसाठी वीज ही चैनीची बाब ठरेल, अशी भीती ऊर्जामंत्री डॉ. यांनी व्यक्त केली आहे. ( )

वाचा:

‘ करणाऱ्या खासगी कंपन्या विजेची मागणी जास्त असेल त्या काळात सुनियोजित पद्धतीने वीज निर्मितीचे उत्पादन घटवून विजेची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्याला ऊर्जा क्षेत्रात गेमिंग ऑफ जनरेशन असंही म्हटलं जातं. मागणी इतका पुरवठा नसल्याचे कारण पुढे करून मग विजेचा दर वाढवला जातो, असा जागतिक पातळीवरील अनुभव आहे. भारतात असे झाले तर वीज ही अत्यावश्यक गरजेची गोष्ट असूनही ती महागल्याने गरिबांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी चैनीची बाब बनून त्यांच्या आवाक्याबाहेर जाईल,’ असेही डॉ. राऊत यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

अर्थमंत्री यांनी राज्य शासनाच्या मालकीच्या वितरण कंपन्या कार्यरत असतानाही वीज वितरण क्षेत्रात खासगी कंपन्यांनाही प्रवेश देण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. त्यावर डॉ. राऊत यांनी टीका केली. केंद्राचा प्रस्ताव पारित झाल्यास वीज वितरण क्षेत्रात मूठभर बड्या लोकांची मक्तेदारी निर्माण होऊन या कंपन्या सर्वसामान्यांची लूट करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

वाचा:

ऊर्जा क्षेत्रातील वीज (कंटेंट) आणि विजेचे वहन (कॅरेज) हे दोन घटक वेगवेगळे करण्याचा केंद्राचा डाव आहे. असे झाल्यास शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटातील वीज ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच यामुळे वीज पुरवठा करण्याचे परवाने अनेकांना उपलब्ध होतील आणि ते ‘गेमिंग ऑफ जनरेशन’ च्या खेळीद्वारे ग्राहकांना महागड्या दरात वीज खरेदी करण्यास भाग पाडतील, अशी भीतीही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन, फिलिपाइन्स आणि अमेरिकेतील काही राज्यांमध्ये जेथे वीज वितरणाचे खासगीकरण झाले आहे, तेथे खासगी वीज वितरण परवाना धारकांनी एकाधिकारशाही निर्माण करून ग्राहकांची बेफाम लूट चालवलेली आहे. तेथील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या क्रयशक्तीपेक्षा वीज खूपच महाग झाल्याने तेथे वीज ही चैनीची वस्तू झाल्याचेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

वाचा:

भाजप सरकारने वीज बिलात सुधारणा करून किरकोळ वीज व्यवसायाचे नियमन रद्द करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. अशाने शेतकरी, घरगुती ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्याची यंत्रणाच नष्ट होईल, असे निरीक्षणही राऊत यांनी नोंदविले. ग्राहकांना खुल्या बाजारपेठेतील विजेचे दर आणि उपलब्ध पर्याय याविषयी माहिती नसते. त्यामुळे ग्राहक हे खासगी पुरवठादारांनी दिलेल्या दरांवर अवलंबून राहतील. त्याच वेळी त्यांचे वीज नियामकाद्वारे संरक्षण होणार नसल्याने बड्या उद्योगजकांची वीज वितरण क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण होऊन ते चढ्या दराने वीज विकून ग्राहकांची लूट करतील. भविष्यात क्रॉस सबसिडी काढून टाकली जाईल. त्यामुळे शेतकरी व लघुउद्योगांना महागडी वीज खरेदी करावी लागेल आणि यामुळे त्यांचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले चार विश्वविक्रम; ट्विटरद्वारे दिली माहिती

0

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या काम करताना सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. ही माहिती स्वत: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या कामाद्वारे विश्वविक्रमाचीच नोंद केली गेल्याचेही गडकरी यांनी जाहीर केले आहे. ( sets world records)

तयार करतांना २४ तासांच्या कालावधीत हे काम करण्यात आले. या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत, असे गडकरी यांनी माहिती देताना सांगितले. देशासाठी पायाभूत सुविधा आता आधीपेक्षाही अधिक वेगाने तयार करण्यात येत आहे असे सांगत आम्ही केवळ नवीन मापदंड घालून दिले नाहीत, तर जागतिक विक्रमही प्रस्थापित केला असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

हा महामार्ग निर्माण करण्यासाठी २४ तासांमध्ये PQCचा सर्वाधिक वापर केला गेला. २४ तासांत PQCचे सर्वाधिक उत्पादन केले गेले. तसेच PQC ने २४ तासांपर्यंत सलग १८.७५ मीटर रुंद रस्त्याची निर्मिती केली गेली, असे नमूद करतानाच २४ तासांमध्ये एक्स्प्रेस वेवर PQC च्या वापराने जेवढा रस्ता तयार केला गेला, तो देखील एक आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे हे ४ जागतिक विक्रम झाल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि पाहा-

देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या जागतिक कामगिरीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचे अभिनंदन केले आहे. आपला देश व मुंबईसाठी ही मोठी कामगिरी आहे. रस्ते विकास प्रकल्पांच्या या आश्चर्यकारक गतीबद्दल नितीन गडकरीजी तुमचे खूप अभिनिंदन, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

खाऊसाठी रडणाऱ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पित्याने दारावर आपटले आणि…

0

गोंदिया: आईवडिलांसाठी पोटची मुलं जीव की प्राण असतात. मात्र, या प्रेमळ नात्याला धक्का देणारी घटना जिल्ह्यातील तालुक्यात घडली आहे. जन्मदात्या वडिलांनीच किरकोळ कारणावरून आपल्या दीड वर्षे वयाच्या मुलीचा खून केला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ( Latest Update )

वाचा:

तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. मुलीला खाऊ खाण्यासाठी ५ रुपये न दिल्याने ती रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला ‘जा मर’ असे म्हणून जोरात दारावर आपटले. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीचा नंतर मृत्यू झाला. (वय २८) रा. लोणारा असे आरोपी पित्याचे नाव असून वैष्णवी विवेक उइके (वय १ वर्ष ८ महीने) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलीची आई वर्षा विवेक उके (२२) हिने तिरोडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी पिता विवेक विश्वनाथ उइके याला अटक केली आहे. याप्रकरणी तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुवते करीत आहेत.

वाचा:

पत्नीने दिली तक्रार

पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, वर्षा व आरोपी विवेक यांचे लग्न २०१८ मध्ये झाले. या दाम्पत्याला वैष्णवी ही मुलगी झाली. मात्र, पती दारू पिऊन सतत भांडण करत असल्याने व मारहाण करत असल्याने कंटाळून लग्नानंतर वर्षभरानंतर वर्षा ही माहेरी खडकी (पालोरा, ता. मोहाडी, जि. ) येथे वडील घनश्याम कंगाले यांच्याकडे राहायला गेली. दरम्यान, एके दिवशी विवेकने मेव्हणा राकेश घनश्याम कंगाले याला फोन करून पत्नी वर्षा व मुलीला लोणारा येथे आणून सोडण्यास सांगितले. त्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये वर्षा व आपल्या भाचीला राकेशने विवेककडे आणून सोडले. तेव्हापासून मुलीसह ती पतीकडेच राहत होती. वर्षाची सासू ताराबाई विश्वनाथ उइके (वय ५५) व दीर शुभम विश्वनाथ उइके (वय २५) हे दोघे वेगळे राहतात तर सासरे विश्वनाथ उइके (६०) हे कामानिमित्त बाहेरगावी असतात. वर्षा वनमजुरी करून आपले व चिमुकल्या मुलीचा उदरनिर्वाह सांभाळत होती. असे असतानाच मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.

वाचा:

नेमकं काय घडलं?

मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी विवेक सकाळी ८ वाजता कोडेलोहारा येथे लग्नासाठी गेला होता. लग्न समारंभ आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता तो घरी परतला. सायंकाळी ७ वाजता मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी वर्षाने पती विवेककडे ५ रुपये मागितले. तेव्हा पतीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे मुलगी जोरजोरात रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पती विवेकने मुलगी वैष्णवीला पत्नी वर्षाकडून आपल्याकडे खेचून घेतले व विनाकारण का रडते असे म्हणत मुलीला जोरात दारावर आपटले. तिथे पत्नी वर्षा व चिमुकलीची आजी ताराबाई उपस्थित होत्या. वर्षाने पतीला अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिलासुद्धा ढकलल्याने ती बाजूला पडली. मुलगी वैष्णवी पायरीजवळ पडली होती. तिच्या डाव्या गालावर व डोक्यावर इजा झाल्या होता. बेशुद्धावस्थेत पडलेल्या वैष्णवीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत असताना पती विवेकने पुन्हा पत्नी वर्षाला मारहाण केली. त्यानंतर विवेक व सासूने मुलीला दवाखान्यात नेतो म्हणून सांगितले व ते तिथून निघून गेले. दरम्यान, काही वेळाने मुलीला घेऊन परत आले असता मुलगी मरण पावली होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबई: मोठा अनर्थ टळला; बसला भीषण आग, ४० प्रवासी सुखरूप

0

म. टा. प्रतिनिधी,

जवळ कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका बसला बुधवारी सायंकाळी ७.४० च्या सुमारास अचानक आग लागली (a bus caught fire). आगीची घटना समजताच अग्निशमन दलाचे पथक पोहोचले. यावेळी बसमधील सुमारे ४० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसला लागलेली आग सायंकाळी ८.०६ च्या सुमारास विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ( near , reported)

आगीत जळून खाक झालेल्या या बसमध्ये कोस्टल रोडसाठी काम करणारे एल ॲन्ड टी चे कामगार होते. ड्युटी संपल्यानंतर हाजीअली येथून या कामगारांना ही बस घेऊन निघाली होती. ही बस महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली आणि रेल्वे स्थानकाचा पूल चढत असताना इंजिनमधून धूर आणि वास येऊ लागला. हे लक्षात येताच चालकाने पूलावर रस्त्याच्या कडेला बस थांबवली. सर्व कामगारांना तत्काळ खाली उतरविण्यात आले. सर्व खाली उतरल्यानंतर बसने पेट घेतला. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याचे ताडदेव पोलिसांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

बसच्या चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवून बस रिकामी केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'हा निव्वळ बदनामीचा हेतू, काही तथ्य नाही'; धनंजय मुंडेंनी 'ते' आरोप फेटाळले

0

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री (Dhananjay Munde) यांच्या दुसऱ्या पत्नी यांनी मुंडे यांच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्याने मुंडे अडचणीत आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. करुणा शर्मा यांच्याबाबत मी पूर्वीच खुलासा केला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या विवादावर सहमतीने तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेण्याची विनंतीही केली, त्यानंतर न्यायालयाने मेडिएटरची नियुक्ती देखील केलेली आहे. असे असतानाही अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे असल्याचे मुंडे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे. हा आरोप निव्वळ बदमानी करण्याच्या हेतूने करण्यात येत असून यात काहीच तथ्य नसल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. (this is and there is no fact in the allegation against me says )

करुणा शर्मा यांच्या सोबत असलेल्या विवादासंदर्भात मी स्वतः उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणून नियुक्ती सुद्धा केली असल्याचे मुंडे यांनी खुलाशात म्हटले आहे.

या मेडिएशनच्या आतापर्यंत दोन बैठका झालेल्या असून येत्या १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय येणार आहे, अशी माहिती देतानाच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे यामागील हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे, असे मुंडे यांनी पुढे म्हटले आहे.

मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू यात दिसून येत असल्याची टिप्पणीही मुंडे यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नसल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Nagpur: बांधकाम कंत्राटदाराच्या घरात चोरी; हिऱ्याचे दागिने केले लंपास

0

नागपूर: बांधकाम कंत्राटदाराकडे करून चोरट्याने हिऱ्याच्या अंगठीसह तब्बल सहा लाख १४ हजार रूपये किमतीचे दागिने लंपास केले. राहुल विजयराव तारेकर (वय ४४ ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

राहुल हे असून गायत्रीनगमरध्ये त्यांचे प्रशस्त घर आहे. त्यांच्या पत्नीने आलमारीत हिऱ्याचे व सोन्याचे दागिने ठेवले होते. ३० जानेवारी राहुल यांच्या पत्नीने आलमारी बघितली असता दागिने गायब होते. त्यांनी राहुल यांना सांगितले. राहुल यांनी नोकरांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी दागिन्यांबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल यांनी प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.

क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ताज हॉटेल नंतर आता टाटा कंपनीच्या नावाने फेक मेसेज, वाचा आणि सावध व्हा

0

नवी दिल्लीः व्हेलेंटाइन डे निमित्त ताज हॉटेलकडून तुम्हाला खास बक्षीस देण्यात येणार असून ताज हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आल्याचा सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मुंबई पोलिस आणि ताज हॉटेलकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले असून अशा फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेला काही तास उलटत नाही तोच आता टाटा कंपनीच्या नावाने एक फेक मेसेज सोशल मीडीयावर फिरत आहे.

वाचाः

आमच्या सर्वेक्षणासाठी तुमची निवड करण्यात आली आहे. केवळ एक मिनिटाचा वेळ लागेल. आणि तुम्हाला एक जबरदस्त भेट वस्तू शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन फ्री मिळेल. बुधवारी आम्ही ५० जणांची निवड केली आहे. या सर्वांना बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. यात ५० लकी विजेते ठरणार आहेत. हा सर्वे आमची गुणवत्ता तपासण्यासाठी केला जात आहे. तसेच यात १०० टक्के बक्षीस देण्यात येणार आहे. तुम्हाला केवळ ४ मिनिट २४ सेकंदात या सर्वेतील प्रश्नाची उत्तर द्यायची असून बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्वरा करा, बक्षिसांची संख्या ही मर्यादीत आहेत, असा इंग्रजीमधील मेसेज तुम्हाला आल्यास त्यावर क्लिक करू नका अथवा त्या प्रश्नांची उत्तरे देत बसू नका, असे आवाहन मुंबई पोलीस आणि टाटा कंपनीने केले आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हेलेंटाइन डे निमित्त एक लिंक फिरवली जात आहे. ही लिंक ओपन करणे अनेकांना महागात पडू शकते. या मेसेजमध्ये म्हटले की, ताज हॉटेलकडून व्हेलेंटाइन डे निमित्त कूपन अथवा गिफ्ट कार्ड भेट देण्यात येत आहे. यात प्रेमीयुगुल ताज हॉटेल्समध्ये मुक्काम करू शकतात. परंतु, हे साफ खोटे आहे. असे कोणतेही कूपन किंवा गिफ्ट कार्ड हॉटेलकडून देण्यात येत नाही. असा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. मेसेजमध्ये जी लिंक दिली आहे. ती ओपन करू नका. या लिंकला क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या लिंकविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अशी लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका असे आवाहन सायबर पोलिस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई यांनी केले आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

ठाणे: भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड, हल्लेखोरांचा शोध सुरू

0

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते () यांच्या नौपाड्यातील दादापाटील वाडी येथील करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (bjp corporator’s in )

सायंकाळी ५.३० वाजता दोघांनी वाघुले यांच्या कार्यालयाची काच फोडली असून हा प्रकार घडला त्यावेळी कार्यालयात कोणी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. कोणत्या कारणासाठी ही तोडफोड झाली हे आरोपी पकडल्यानंतरच कळेल असेही पोलिसांनी सांगितले.

फोटो: गणेश जाधव

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शिवसेनेकडून मुंबईकरांचा विश्वासघात; बीएमसी बजेटवरुन भाजपचा टोला

0

मुंबईः मुंबई महापालिकेचा २०२१ -२२ या आर्थिक वर्षासाठी ३९,०३८,८३ कोटी रुपयांचा आणि ११.५१ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. पालिकेच्या अर्थसंकल्पावरुन भाजपनं शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तसंच, शिवसेनेनं मुंबईकरांचा विश्वासघात केला असल्याचा, आरोपही भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेनं यंदा ३९, ३८ ,८३ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काही महत्त्वाच्या घोषण्या केल्या आहेत. पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता घरातील सर्वसाधारण करातून सूट देण्यात आलेली आहे मात्र, संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात आलेला नाही. हाच धागा पकडत भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वाचाः

‘५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सूट दिलीच नाही. हे महापालिका आयुक्तांनीच उघड केलं आहे, असं म्हणत शिवसेनेनं मुंबईकरांना वाऱ्यावर सोडलं आहे,’ अशी बोचरी टीका दरेकर यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पांच्या तरतुदींवरही टीका केली आहे. ‘शिवसेनेनं मुंबईकरांच्या खिशावर दरोडा घातला आहे. सेवा शुल्कात मोठी वाढ होणार. शिवसेनेनं सामान्य, गरीब मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नांच्या केला चक्काचुर, नवीन इमारत परवानगी छाननी शुल्कात वाढ केली आहे,’ असं दरेकरांनी म्हटलं आहे.


वाचाः

‘छाननी शुल्क एफएसआयवर न आकारता इमारतीच्या बाजारभावानुसार असलेल्या किंमतीवर आकारले जाणार, नवीन इमारतींच्या बांधकामानंतर अग्नी आणि जीव संरक्षण उपाययोजनांची पाहणी आणि परवानगीच्या शुल्कात वाढ, घरांच्या किमती भरमसाठ वाढणार,’ या मुद्द्यांवरही दरेकरांनी लक्ष वेधलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

corona latest updates: करोनाविरोधातील लढाईला मोठे यश; आज ७,०३० रुग्ण बरे होऊन गेले घरी

0

मुंबईः (coronavirus) संसर्गाबाबत आज राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त असून आज राज्यात तब्बल ७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात एकूण २ हजार ९९२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. म्हणजेच नवे रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तिपटीहून अधिक आहे. तसेच आज राज्यात एकूण ३० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल देखील ही संख्या ३० इतकीच होती. (maharashtra registered 2,992 new cases in a day)

आज बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ४३ हजार ३३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्याचा मृत्यूदर २.५२ इतका आहे.

याबरोबरत आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,६४,७४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३३,२६६ (१३.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात १,८२,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच २,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts