Wednesday, September 27, 2023
Home Blog Page 7191

Vi चे ५जीबी पर्यंत फ्री डेटा, डबल डेटाचे जबरदस्त प्लान, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी (Vi) युजर्संसाठी अनेक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. कंपनीकडे असे अनेक प्लान आहेत ज्यात ५ जीबी पर्यंत एक्स्ट्रा डेटा सोबत डबल डेटा आणि विकली डेटा रोलओवर बेनिफिट ऑफर केले जात आहे. जाणून घ्या वोडाफोन आयडियाच्या या प्लानविषयी.

वाचाः

या प्लानमध्ये मिळणार ५ जीबी पर्यंत एक्स्ट्रा डेटा
युजर्संना सध्या जास्त डेटा देणारे प्लान पसंत पडतात. त्यामुळे वोडाफोन आयडिया कंपनीने बेस्ट डेटा बेनिफिट प्लान देत आहे. कंपनी आपल्या १४९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये, ३९९ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये फ्री अतिरिक्त डेटा ऑफर करीत आहे. १४९ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी, २१९ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. तर तुम्हाला ५ जीबी एक्स्ट्रा हवा असेल तर २४९ रुपये, ३९९ रुपये, ५९९ रुपयांचे प्लान रिचार्ज करावे लागतील.

वाचाः

या प्लानमध्ये मिळणार डबल डेटाचा फायदा
वोडाफोन आयडिया युजर्संना काही डबल डेटा बेनिफिट प्लान ऑफर केले जातात. कंपनीने आपला डबल डेटा ऑफरला जून २०२० मध्ये लाँच केले होते. डबल डेटा ऑफर प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा सोबत २ जीबी एक्स्ट्रा डेटा देत आहे. ही ऑफर कंपनीच्या २९९ रुपये, ४४९ रुपये, आणि ६९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर उपलब्ध आहे. २८, ५६, आणि ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएसचा फायदा मिळतो.

वाचाः

विकेंड डेटा रोलओवरचे प्लान
कंपनीने विकेंड डेटा रोलओवर बेनिफिटची सुरुवात ऑक्टोबर २०२० मध्ये केली होती. ज्या प्लानमध्ये विकेंड डेटा रोल ओवर बेनिफिट दिले जात आहे. त्यात २४९ रुपये, २९७ रुपये, २९९ रुपये, ३९८ रुपये, ३९९ रुपये, ४४९ रुपये, ४९७ रुपये, ४९९ रुपये, ५५५ रुपये, ५५८ रुपये, ५९९ रुपये, ६४७ रुपये, ६९९ रुपये, ७९५ रुपये, ८१९ रुपये, ११९७ रुपये, २३९९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

कृषी कायदे : शेतकरी आंदोलकांसमोर समितीचे २० प्रश्न

0

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. सरकार आणि आंदोलकांमध्ये अनेक चर्चाही झाल्या परंतु, या चर्चेत काही तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देतानाच पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीत कृषी कायद्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेली शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. समितीनं कृषी कायद्यांसंदर्भात काही प्रश्न विचारत फिडबॅक फॉर्म तयार केले आहेत. समितीच्या वेबपेजवर दिसणाऱ्या या फिडबॅक फॉर्ममध्ये २० प्रश्न विचारण्यात आले आहे. हे प्रश्न पाच वेगवेगळ्या खंडांमध्ये विभागण्यात आले आहेत. यातील सेक्शन ए, बी आणि सी तीन्ही कृषी कायद्यांशी संबंधित आहेत तर सेक्शन ‘डी’मध्ये किमान हमीभावासंबंधी प्रश्न विचारण्यात आले आहेत. शेवटचा सेक्शन ‘ई’मध्ये समितीकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सेक्शन ‘ए’मध्ये शेतकऱ्यांना आणि हितधारकांना आठ प्रश्न विचारण्यात आले आहेत. यातील काही प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.

– तुम्हाला शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२० बद्दल माहिती आहे का? (या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये द्यायचं आहे)

– तुम्ही तुमची उत्पादनं कुठे विकता? फार्म गेट, बाजार, एपीएमसी बाजार, कलेक्शन, सेंटर, कंपनी किंवा शेतकरी उत्पन्न संघटनांद्वारे बनवण्यात आलेले कलेक्शन सेंटर?

– कृषी कायद्यांमुळे आपली उत्पादनं विकण्यासाठी एपीएसी बाजारांशिवाय इतर अधिक पर्याय उपलब्ध होतात का? (या प्रश्नाचंही उत्तर हो किंवा नाही मध्ये विस्तृतपणे देता येईल)

– खरेदीदार आणि विक्रेत्यांमधला वाद कसा सोडवला जाऊ शकतो?

– एसडीएमच्या माध्यमातून सद्य तरतूद उद्देश्य पूर्ण करू शकेल का?

सेक्शन ‘बी’मध्ये आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक, २०२० संदर्भात पाच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

– कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अर्थात कंत्राटी शेतीबद्दल माहिती आहे का?

– अधिनियम (क) उत्पादनासंबंधीचा करार आहे, भूमीसाठी नाही… हे तुम्हाला माहीत आहे का?

– कॉर्पोरेट सेक्टर किंवा कंत्राटदाराकडून जमीन अधिग्रहण करण्याचा धोका उद्भवू शकतो? असं तुम्हाला वाटतं का?

– एसडीएमच्या माध्यमातून वाद सोडवण्यासाठी तुमची सहमती आहे का?

– कायद्यातील तरतुदी आणखीन सुधारण्यासाठी तुमच्याकडे काही सूचना आहेत का?

सेक्शन ‘सी’मध्ये अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० संबंधी तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत.

– या कायद्यातील तरतुदींबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

– या कायद्यातील तरतुदींचा कसा परिणाम होऊ शकतो?

– कायद्यातील तरतुदींत तुम्हाला काय बदल अपेक्षित आहेत?

सेक्शन ‘डी’मध्ये किमान हमीभावासंबंधी चार प्रश्न विचारण्यात आले आहेत.

– तुम्ही कोणते तीन मुख्य उत्पन्न विकता?

– तुम्ही किमान हमीभावावर तुमचं उत्पन्न विकता का? किंवा हे उत्पन्न तुम्ही कुणाला विकता?

– किमान हमीभाव वैध बनवण्यातील अडचणींसंदर्भात तुम्हाला माहिती आहे? या अडचणी काय असू शकतात?

शेवटच्या सेक्शन ‘ई’मध्ये उत्तरदाते १०० शब्दांत आपल्या इतर सूचना देऊ शकतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

संभ्रम वाढला! बच्च्चन यांच्या कॉलर ट्यून संबंधी दूरसंचार मंत्रालयाचे मोठे विधान

0

Prasad.Panse@timesgroup.com

Tweet : @prasadpanseMT

पुणे : ‘कोव्हिड १९ अभी खत्म नहीं हुआ है… इसलिए जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं’, महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सर्वांना ही चिरपरिचित आपल्यापैकी जणू पाठ झाली आहे. या संदर्भात बच्चन यांच्याशी केलेला करार किंवा यापोटी मोजलेली रक्कम याबाबत काहीही माहिती नसल्याची धक्कादायक माहिती दूरसंचार मंत्रालयानेच दिली आहे. करोनासंदर्भातील आरोग्य सेतू अॅपनंतर आता या कॉलर ट्यूनबद्दलही माहिती उपलब्ध नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्रालयाने केल्याने या संदर्भातील संभ्रम वाढला आहे.

वाचाः

अॅड. प्रणय अजमेरा यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाला उत्तर देताना दूरसंचार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. बच्चन यांच्या आवाजातील या कॉलर ट्यूनसाठी बच्चन यांच्यासोबत करण्यात आलेल्या कराराचा तपशील अजमेरा यांनी मागितला होता. त्याचबरोबर या कॉलर ट्यूनच्या रेकॉर्डिंगसाठी बच्चन यांना किती मानधन देण्यात आली, याचीही विचारणा अजमेरा यांनी केली होती. मात्र, याबाबत कोणताही तपशील उपलब्ध नसल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयाने दिली.

वाचाः

सुमारे तीस सेकंदांची ही कॉलर ट्यून प्रत्येक कॉलच्या आधी ऐकवली जात होती. अनलॉकनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतरही ही कॉलर ट्यून ऐकवली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या कॉलर ट्यूनमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असल्याची टीकाही केली जात होती. त्यामुळेच ही कॉलरट्यून बंद करावी, यासाठी सोशल मीडियावरून मोहिमदेखील चालवली गेली. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. ही कॉलर ट्यून बंद करावी, या मागणीसाठी एकाने जनहित याचिकादेखील दाखल केली होती. मात्र, ती फेटाळली गेली.

वाचाः

करोना लसीकरण सुरू झाल्याबरोबरच बच्चन यांच्या आवाजातील ही ट्यून आता बंद करण्यात आली आहे. त्या जागी जसलीन भल्ला यांच्या आवाजातील लसीकरणासंदर्भात माहिती देणारी आणि करोनाचे संकट कायम असल्याने या संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन करणारी ट्यून ऐकवली जात आहे.

करोनाच्या मुकाबल्यासाठी लॉकडाउन लागू करतानाच सरकारने आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे सक्तीचे केले होते. मात्र, या अॅपद्वारे व्यक्तिगत माहितीला धोका पोहोचत असल्याची टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सौरव दास यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाच्या उत्तरात हे अॅप कोणी विकसित केले, याची माहिती नसल्याचे एनआयसी आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले होते. त्यापाठोपाठ आता करोना संदर्भातील सक्तीने ऐकवल्या जाणाऱ्या या कॉलर ट्यूनची माहितीही उपलब्ध नसल्याचे मंत्रालयानेच स्पष्ट केल्याने संभ्रमात भरच पडली आहे.

वाचाः

प्रत्येक कॉलपूर्वी ही कॉलर ट्यून ऐकावी लागत होती. त्यात भरपूर वेळ वाया जायचा. म्हणून मी या संदर्भातील तपशील माहिती अधिकारात मागवला. देशभर सर्वांना ही कॉलर ट्यून सक्तीने ऐकवल्यानंतरही दूरसंचार मंत्रालयाकडे याची माहिती नसणे धक्कादायक आहे.

अॅड. प्रणय अजमेरा,
अर्जदार

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: 'एनसीबी'चे पुण्यातही छापे

0

म. टा. प्रतिनिधी,

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर ”च्या (एनसीबी) पथकाने मुंबईपाठोपाठ शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले. बॉलिवूडमधील अनेकांना अमली पदार्थ पुरविणाऱ्या व आरीफ भोजवाल यांच्या पुण्यातील सहकाऱ्याच्या घरासह गोडाउनवर छापे टाकल्याचे समोर आले आहे.

सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण व त्याचा साथीदार आरीफ भोजवाल यांची नावे समोर आली होती. ‘एनसीबी’च्या पथकाने दोघांनाही अटक करून अमली पदार्थ तस्कराच्या मुसक्‍या आवळण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये राजू सोनावणे हा त्यांचा साथीदार असून त्याची अमली पदार्थ तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. सोनावणे याचे खडकवासला येथील घर आणि हडपसरमधील गोडाउनवर ‘एनसीबी’ने छापे टाकले. पठाण व भोजवाल या दोघांना अटक झाल्यानंतर सोनावणे पळून गेला आहे. त्याच्या घरात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. तो कर्नाटकमधून फळे, धान्याची वाहतूक करताना अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई ‘एनसीबी’च्या पथकाने ही कारवाई केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LG K42 क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत भारतात लाँच, किंमत १० हजार ९९० रुपये

0

नवी दिल्लीः ला भारतात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि ४००० एमएएच क्षमतेच्या बॅटरी सोबत लाँच केले आहे. तसेच नवीन एलजी फोन मिलिट्री-ग्रेड MIL-STD-810G सर्टिफाइड बिल्ड सोबत येतो. या फोनमध्ये ९ वेगवेगळ्या कॅटेगरीत यूएस मिलिट्री टेस्टिंग पास केली आहे. यात हाय लो टेम्परेचर, शॉक, व्हायब्रेशन, टेम्परेचर शॉक आणि ह्यूमिडिटी याचा समावेश आहे.

वाचाः

LG K42 ची किंमत भारतात ३ जीबी प्लस ६३ जीबी व्हेरियंटसाठी १० हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना यात एक्सक्लूसिव्ह म्हणून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकते. हा फोन ग्रे आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. तसेच ग्राहकांना या फोनसोबत दोन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी आणि एक वर्षासाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट मिळणार आहे.

वाचाः

या फोनमध्ये ड्यूल सिम (नॅनो) सपोर्ट मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० बेस्ड एलजी यूएक्सवर काम करतो. या फोनमध्ये ६.६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅमसोबत ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये आणखी काही जबरदस्त फंक्शन दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

भारत-चीन संघर्ष : १५ तासांची चर्चा, रात्री अडीच वाजता संपली बैठक

0

नवी दिल्ली : भागात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत आणि चीन दरम्यान कमांडर स्तरावरची नववी (India China 9th round Talk) रविवारी पार पडली. तब्बल १५ तास चाललेली ही बैठक रविवार-सोमवारच्या रात्री जवळपास २.३० वाजता संपली.

भागात रविवारी सकाळी जवळपास ९.३० वाजता ही बैठक सुरू झाली होती. या बैठकीत भारताकडून सेनेच्या १४ कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन आणि चीनकडून दक्षिण शिनजियांग मिलिट्री रीजन कमांडर मेजर जनरल लियू लीन यांनी सहभाग घेतला.

यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या आठव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांनी संवेदनशील ठिकाणांहून सैनिकांच्या मागे हटवण्यावर व्यापक चर्चा पार पडली होती. डोंगराळ भागात वाद उद्भवणाऱ्या ठिकाणांवरून आपले सैनिक माघारी बोलावण्याची प्रक्रिया पुढे सरकावणं आणि तणाव कमी कमी करणं ही चीनची जबाबदारी आहे, असं भारताचं म्हणणं आहे.

उल्लेखनीय म्हणजे पूर्व लडाखमध्ये वेगवेगळ्या उंचीवरच्या भागांत भारतीय सेनेचे कमीत कमी ५० हजार जवान युद्धाच्या तयारीसोबत तैनात आहेत. वादग्रस्त मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान अनेक टप्प्यांत चर्चा पार पडलीय परंतु, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चीनकडूनही एवढीच मोठी फौज सीमेवर तैनात आहे.

गेल्या महिन्यात भारत आणि चीनकडून आपापल्या सीमांवर WMCC (Working Mechanism for Consultation and Coordination) अंतर्गत आणखीन एक राजनायिक स्तरावर चर्चा पार पडली होती, परंतु यामध्येही कोणताही तोडगा निघाला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पॉर्न पाहणाऱ्यांची आता खैर नाही, 'या' प्रसिद्ध वेबसाइटचा डेटा लीक

0

नवी दिल्लीः एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटच्या युजर्संचा डेटा लीक झाला आहे. या डेटात युजर्संचे नाव आणि ईमेल यासारखी खासगी माहितीचा समावेश आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हॅकर्स या डेटाचा वापर सायबर अटॅक किंवा त्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो.

वाचाः

Cyber News च्या एका रिपोर्टनुसार, MyFreeCams नावाची एक पॉर्न वेबसाइटचा डेटा लीक झाला आहे. लीक डेटात जवळपास २० लाख युजर्संच्या माहितीचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, लीक झालेल्या डेटात युजर्सचा ईमेला आयडी, अॅड्रेस, युजरनेम आणि पासवर्ड यासारख्या गोष्टी लीक झाल्या आहेत. तसेच ही माहिती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जात आहे.

वाचाः

डेटाच्या बदल्यात बिटकॉइन
रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की, युजर डेटाबेसला एका हॅकर्सच्या प्रसिद्ध फोरमवर विकले जात आहे. तसेच डेटाच्या बदल्यात बिटकॉइनची डिमांड केली जात आहे. १० हजार युजर्सच्या डेटाच्या बदल्यात १५०० डॉलर बिटकाइन म्हणून घेतले जात आहे. दावा करण्यात येत आहे की, १० हजार युजर्सचा डेटाला खरेदी करून कमीत कमी १० हजार डॉलर कमाई केली जाऊ शकते.

वाचाः

डेटा लीकच्या नंतर पॉर्न वेबसाइटने स्वतः याला दुजोरा दिला आहे. तसचे त्यांनी युजर्संना सूचना केल्यानंतर पासवर्ड रिसेट करण्यात आला आहे. चोरी करण्यात आलेला डेटाचे एक नमुना पाहिल्यानंतर उघड झाले आहे की, यात युजरनेम, ईमेल, अॅड्रेस, MyFreeCams टोकन बॅलन्स आणि पासवर्ड इन्फर्मेशन प्लेन टेक्स्ट म्हणून लिहिले आहे. MyFreeCams एक पॉप्युलर पॉर्न वेबसाइट असून याचे जवळपास ७० लाख (७ कोटी) मंथली विजिटर आहेत. प्रसिद्ध एडल्ट साइटमध्ये ही साइट २७ व्या स्थानावर आहे. MyFreeCams यूजरचे अनेक जण आता पासवर्ड बदलत आहेत.

वाचाः

हॅकर्स चोरी करण्यात आलेल्या माहितीचा अनेक पद्धतीने वापर करू शकतात. हॅकर्स यूजर्सचे MyFreeCams टोकन बॅलन्स संपवू शकतात. तसेच युजर्संना ब्लॅकमेल करण्याची शक्यता आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

करोनामुळं आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर आली 'ही' वेळ

0

मुंबई: काळात आरोग्य व्यवस्थेवर झालेला अवाढव्य खर्च आणि घटलेल्या महसुलामुळं आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेला () आर्थिक चणचण जावणते आहे. त्यावर उपाय म्हणून बाजारातून निधी उभारण्याचा निर्णय बीएमसीनं घेतला आहे. त्यासाठी ” (रोखे) काढण्यात येणार असून या माध्यमातून ३ ते ४ हजार कोटी उभे राहतील, अशी आशा महापालिकेला आहे.

मुंबई महापालिकेचे हे बाँड अन्य सार्वजनिक बाँडप्रणाणेच सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)च्या अखत्यारीत असतील. बीएमसीची आर्थिक पत बाजारात चांगली आहे. त्यामुळं आता हे बाँड काढल्यास त्यावर ६ ते ६.५ टक्के व्याज मिळेल, अशी अपेक्षा आहे. या बाँडचा कर्जरोख्यांचा कालावधी १० ते १५ वर्षांचा असेल. मुंबईतील मोठ्या व खर्चिक प्रकल्पांसाठी हा निधी असेल.

वाचा:

मुंबई कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड अशा सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मुंबई महापालिकेकडं सध्या पुरेसा निधी आहे. मात्र, २०२३ नंतर आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. सांडपाणी प्रक्रिया व मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी महापालिकेला पैशांची गरज लागेल. या प्रकल्पांचा खर्च ३०० ते १००० कोटीपर्यंत आहे. त्यामुळं आतापासूनच तजवीज करण्याचा विचार सुरू आहे, असं महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. महापालिकेच्या अर्थसंकल्पात बाँडची संपूर्ण तपशील जाहीर केला जाईल. या सगळ्या प्रक्रियेसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.

वाचा:

अहमदाबाद महापालिकेनं २०१९ मध्ये कर्जरोख्यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपये उभारले होते. शहरातील पायाभूत विकासावर हे पैसे खर्च करण्यात येत आहेत. पाच वर्षांची कालमर्यादा असलेल्या या रोख्यांवर ८.७ टक्के व्याज दिलं जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राज्यात करोनाचा धोका टळलेला नाही; 'हे' आकडे काळजीत भर घालणारे

0

मुंबई: राज्यात आज ४५ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, करोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधित रुग्णांचा आकडा आज पुन्हा एकदा वाढल्याने चिंतेत मात्र भर पडली आहे. ( )

वाचा:

राज्यात गेल्या दहा महिन्यांपासून करोना संसर्गाने थैमान घातले आहे. आता करोनावरील लस आल्याने व प्रत्यक्ष लसीकरणही सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज्यात अजूनही करोनाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी काही हजार रुग्णांची भर दररोज पडताना दिसत आहे. त्याचवेळी करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कधी कमी होतोय तर कधी वाढतोय, असे चित्र आहे. त्यामुळे अजूनही करोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

वाचा:

राज्याच्या आरोग्य विभागाने आजची करोनाची आकडेवारी जारी केली असून मृतांचा आकडा आज कमी झाल्याचे दिसत आहे. राज्यात आज ४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडलेल्या ५० हजार ७८५ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील २.५३% एवढा आहे. आज राज्यात २ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख १२ हजार २६४ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४२ लाख ७ हजार ५९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ९ हजार १०६ (१४.१४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८ हजार ९९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार ३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या करोनाचे ४४ हजार ८३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात सर्वाधिक १२ हजार २ रुग्ण जिल्ह्यात आहेत तर जिल्ह्यात ७ हजार ७४१ रुग्ण आणि पालिका हद्दीत ६ हजार ३२८रुग्ण सध्या उपचार घेतल आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

IND vs AUS : अश्विनला या भारताच्या खास चाहत्याला आहे भेटायची इच्छा, पाहा नेमकं काय घडलं होतं…

0

नवी दिल्ली, : भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भारताच्या विजयानंतर आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. अश्विनला या भारताच्या खास चाहत्याला भेटायचे आहे आणि त्याला कसे भेटता येईल, असेही अश्विनने यावेळी सोशल मीडियावर म्हटले आहे. पण अश्विनला याच भारताच्या चाहत्याला का भेटायचे आहे, पाहा…

नेमकं काय घडलं होतं, पाहा…ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्याला थेट आपल्या देशात निघून जा आणि तिथे आपल्या देशाची बाजू घे, असा दम भारतीय चाहत्याला मैदानातील सुरक्षा रक्षकांनी दिला होता. भारताचे चाहते कृष्णा कुमार यांनी याबाबतचा धक्कादायक खुलास त्यावेळी केला होता.
त्यानंतर आता कुमार यांना भेटण्याची इच्छा अश्विनने व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.

या सर्व प्रकरणाबाबत कृष्णन म्हणाले होते की, ” सिडनी कसोटी सामन्याचा पाचवा दिवस हा महत्वाचा होता. हा सामना पाहण्यासाठी मी काही बॅनर घेऊन गेलो होतो. या बॅनरवर भारतीय संघाबाबतची भावना लिहीली होती. माझ्या लहान मुलांनी हे बनर बनवले होते. हे बॅनर जास्त मोठेही नव्हते जेणेकरून काही समस्या होईल. पण मी जेव्हा स्टेडियममध्ये शिरलो तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी मला रोखले. मला स्टेडियममधील सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, तुला जर भारताची एवढीच बाजू घ्यायची असेल तर तिथेच परत जा. तुला जे काही करायचे आहे ते भारतामध्येच जाऊन कर. पण त्याचबरोबर भारतीय संघाबरोबर जे काही मैदानात झाले तेदेखील अन्यायकारकच होते. त्याबाबत बोलण्याचा अधिकार भारतीयांना नाही का, असा सवालही यावेळी उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणात मला न्याय मिळावा, एवढीच माझी अपेक्षा आहे.”

सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा यांना शिवीगाळ केली होती. त्याचबरोबर चाहत्यांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी टीकाही केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास आयसीसी करत आहे. त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानेही दिले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts