Thursday, September 28, 2023
Home Blog Page 7193

आता तरी 'बॅक टू पॅव्हेलियन' म्हणा!; 'या' केंद्रीय मंत्र्याची उद्धव ठाकरेंना साद

0

पुणे: राज्यात कधीही एकत्र येऊ न शकणारे तीन पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नसून मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांनी वेळीच ‘बॅक टू पॅव्हेलियन’ म्हणत महायुतीत यावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना केलं. ( Union Minister )

वाचा:

शिवसेना आणि या दोन पक्षांनी एकत्र असावं, यासाठी रामदास आठवले नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. आज पुण्यात बोलताना आठवले यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना हाच आग्रह केला. राज्यातील तीन पक्षांची महाविकास आघाडी फार काळ राहणार नसल्याने उद्धव ठाकरे यांनी आता महायुतीत परतायला हवं. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यानंतर आणखी एक वर्ष त्यांनी मुख्यमंत्री राहावं आणि त्यापुढची तीन वर्षे भाजपला मुख्यमंत्रिपद द्यावं. ही तीन वर्षे राज्याचे नेतृत्व करतील, असा आमचा प्रस्ताव आहे आणि आग्रहही आहे, असे आठवले यांनी नमूद केले. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्रितपणे लढवणार, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले.

वाचा:

शेतकरी आंदोलनावरही आठवले यावेळी बोलले. शेतकऱ्यांचे आंदोलन चुकीचे आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याला समर्थन द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली. एल्गार परिषदेला परवानगी देण्यास विरोध नाही. मात्र, या परिषदेच्या व्यासपीठावर नक्षलवादी विचारांच्या व्यक्ती असू नयेत, अशी अपेक्षा यावेळी आठवले यांनी व्यक्त केली. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आपला विरोध नसल्याचेही एका प्रश्नावर बोलतांना त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

सीरम इन्स्टिट्युट मध्ये आग लागली की करोनावरील लसला विरोध करणाऱ्यांनी ही आग लावली, याची चौकशी करण्याची गरज आहे तसेच या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांच्या कुटुंबीयांना नोकरी दिली गेली पाहिजे, असे आठवले यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य मंत्री करोनावरील लस घेणार आहेत. तेव्हा मी सुद्धा ही लस घेईन, असे आठवले यांनी स्पष्ट केले. सीरम या जगभरात नावलौकिक असलेल्या कंपनीने ही लस बनवली आहे. त्यामुळे लसला विरोध करणे चुकीचे आहे. लस घ्यायची की नाही ही ऐच्छिक बाब आहे. लस घेतलीच पाहिजे असा काही कायदा नाही. त्यासाठी कुणाची बळजबरीही नाही. ही लस आपल्या आरोग्यासाठी आहे, हे प्रत्येकाने ध्यानात घेण्याची गरज आहे, असेही आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी लस घेतली नाही तर त्यांच्यावर कुणी सक्ती करणार नाही, असा टोलाही आठवले यांनी लगावला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

म्हणून आताच लस घेणार नाही; पवारांनी सांगितले 'हे' कारण

0

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

करोनावरील लसीसंबंधी (Corona Vaccine) सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात ही लस करोनायोद्धयांना देण्यात येत आहे. तरीही ती घेणे न घेणे यावरून चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (Sharad Pawar) यांनीही आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. करोनाच्या स्थितीचा आढावा घेताना एक किस्सा सांगत त्यांनी लोकांना मात्र काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नगरमधील खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी पवार आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी करोनासंबंधी भाष्य केले. पूर्वीची स्थिती सांगताना आता परिस्थिती सुधारत असल्याची नगर जिल्ह्याची आकडेवारीही त्यांनी भाषणात सांगितले. ( tells the reason why he is not willing to have now)

लशीबद्दल ते म्हणाले, ‘करोनावरील लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टय्युटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी तेथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकार शक्ती वाढविणारी लस घे, असे म्हणत मला बीसीजीची लस दिली होती. नुकतीच या कंपनीच्या दुसऱ्या एका युनिटला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा पुनावाला यांनी मला टोचून घेण्याचा अग्रह केला. मात्र, मी म्हणलो आता मी नगरला निघालो आहे. तेथे दोन खासगी हॉस्पिटलची उद्घाटने आहेत. तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतो. परिस्थिती गंभीर वाटली तर मुंबईला न जाता पुण्यात येऊन लस टोचून घेतो. मात्र, आज येथे आपण आढावा घेतला तर बरे होण्याचे प्रमाण खूपच चांगले आहे. परिस्थिती सुधारत असल्याचे एकूण चित्र दिसत आहे. त्यामुळे आता मी पुण्याला लस घेण्यासाठी न जाता सरळ मुंबईला जातो.’

क्लिक करा आणि वाचा-
लॉकडाऊन आणि पूर्वीच्या परिस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केले, ते म्हणाले.’ करोनासाठी लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पंतप्रधान सांगतात दो गज की दुरी ठेवा. मात्र, प्रत्यक्षात ते होत नाही. करोनाच्या काळात सर्वांत प्रथम मी बाहेर पडलो. लोक अडचणीत असताना घरात बसणे मला पटले नाही. त्यामुळे राज्यभर फिरून लोकांना दिलासा दिला. आता करोनाची स्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. तरीही लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. थोडी परिस्थिती बदलली की आपण आपल्या कामाला लागतो. मात्र, हे संकट भयाण आहे. जगाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. काही देशांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागत आहे. भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आपल्या कमी त्रास होतो. मात्र, तेवढ्यावर समाधान मानले तर मोठे संकट येऊ शकते.’

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नाशिक: १५ हजार शेतकऱ्यांचा भव्य वाहन मार्च; आज मुंबईत धडकणार

0

नाशिक: केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या आणि अशा इतर मागण्यांसाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज नाशिक ते मुंबई असा १५,००० शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी शेतकऱ्यांचा मार्च काढण्यात आला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे हा देखील या मोर्चाचा उद्देश आहे. राज्यभरातील १०० हून अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे.

विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च आज इगतपुरीजवळ घाटनदेवी येथे रात्री मुक्कामाला होता. त्यानंतर आज सकाळी ९ वाजता घाटनदेवी येथून निघून हे हजारो शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत.

आझाद मैदानात महामुक्काम आंदोलन

दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे महामुक्काम सत्याग्रह करण्यात येत आहे. यात किसान सभेचा हा वाहन मोर्चा सामील होईल.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आयोजित केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
२५ जानेवारीला आझाद मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीतील नेते आणि डावे, लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

खळबळ! महिलेसह लहान मुलाचा मृतदेह आढळला, महिलेचे शिर गायब

0

म. टा. प्रतिनिधी, नगर: शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वर्षीय महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. तेथेच एका १० ते १५ वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला आहे. या दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. कोणी तरी अज्ञात कारणासाठी या दोघांचा खून करून मृतदेह तेथे फेकून दिल्याचा संशय आहे.

शेवगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे याची माहिती देण्यात आली. पाथर्डी रोडवर असलेल्या आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एक महिला पडलेली दिसून आल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याची नोंद घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

एक साठ वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली. तिचे शिर धारदार शस्त्राने कापल्याचे दिसून आले. तेथेच एका दहा ते पंधरा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह पडलेला होता. या मृतदेहांजवळच घरगुती वापराची भांडी, साहित्य ठेवण्याची लोखंडी पेटी, गोणपाट, झोपडीसाठी लागाऱ्या काठ्या असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. महिलेचे शिर नसल्याने ओळख पटवणे अवघड झाले आहे. पोलिसांनी आसपास शोध घेतला. मात्र, शिर आढळून आले नाही. नगरहून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्याच्यामार्फत तपास सुरू आहे. शेवगावचे सहायक निरीक्षक विश्वास पावरा, सुजीत ठाकरे, पोलीस नाईक रवी शेळके, सुधाकर दराडे, अच्युत चव्हाण यांचे पथक या घटनेचा तपास करत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अजित पवार-शिवेंद्रसिंहराजेंच्या भेटीमागे दडलंय काय?; चर्चा रंगली

0

बारामती: साताऱ्याचे आमदार ( Bhosle) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांची बारामतीत भेट घेतली. या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसून ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. या भेटीचा तपशील सांगण्यास मात्र शिवेंद्रसिंहराजे यांनी नकार दिला. असे असले तरी देखील पवार-शिवेंद्रसिंहराजे यांच्या भेटीनंतर बारामतीतून बेरजेचं राजकारण सुरु झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (shivendra singh raje bhosale meets deputy chief minister )

शिवेंद्रसिंहराजे यांनी आज सकाळी अजित पवार यांची बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये भेट घेतली. तेथे बंद खोलीमध्ये शिवेंद्रसिहराजेंनी अजित पवार यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजे बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठून भेटीबाबत प्रश्न विचारले. मात्र आपण केवळ मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे काहीही नव्हते असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

अजित पवार यांची भेट घेण्याची शिवेंद्रसिंहराजे यांची ही पहिलीच वेळ नाही. मागील भेटीत देखील त्यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अजित पवार यांची त्यांनी भेट घेतल्याने या भेटीमागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे की केवळ मतदारसंघातील कामाबाबतच ही भेट झाली याबाबत कार्यकर्त्यांमध्येही चर्चा सुरु झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वी पुणे आणि मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. शिवेंद्रसिंहराजेंची आजची गेल्या काही दिवसांमधील तिसरी भेट आहे. साताऱ्यातील विकासकामांच्या अनुषंगाने त्यांची वाढती जवळीक हा मुद्दा राजकीय वर्तुळात अधोरेखित होत आहे. पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची आजची भेट सातारा जिल्हा बँक आणि सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात देखील असू शकते अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मटा इम्पॅक्ट: पुण्यात 'त्या' तृतीयपंथीयांविरोधात पोलिसांची धडक कारवाई

0

म. टा. प्रतिनिधी, : शहरातील वेगवेगळ्या भागांत गर्दीच्या ठिकाणी चौकात सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १३ तृतीयपंथीयांच्या विरोधात भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

शहरात चौकातील सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांकडून पैसे उकळून त्रास देत असल्याचे वृत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने नुकतेच दिले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी समाजिक सुरक्षा विभागाला चौकात वाहनचालकांकडे पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच, काही वाहनचालकांनी तृतीयपंथींच्या त्रासाबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.

पुणे-सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई-पुणे रस्ता तसेच शहरातील महत्वाच्या चौकात थांबलेल्या तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांची अडवणूक करण्यात येत असल्याचे आढळून आले होते. उपनगरातील चौकात असे प्रकार वाढल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सिंग यांनी सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येरवड्यातील सादलबाबा चौक, हडपसर येथील लोणी टोलनाका, बंडगार्डन परिसरातील घड्याळ चौक, सारसबागेसमोरील चौक, पौड रस्त्यावरील करिश्मा सोसायटी चौक येथे कारवाई केली. नागरिकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या १३ तृतीयपंथीयांविरोधात महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम ४ (१) नुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. या कारवाईनंतर चौकातून तृतीयपंथी गायब झाल्याचे दिसून आले. दमदाटी करून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच, सामाजिक सुरक्षा विभागाकडून ही कारवाई सुरूच राहणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Umarkhed : नायब तहसीलदार, तलाठ्यावर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला

0

उमरखेड: वाळूच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी गेलेले उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर काल रात्री अकराच्या सुमारास ते ढाणकी रस्त्यावर वाळू माफियांनी केला. वैभव पवार यांच्या पोटात चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

पवार यांच्यावर तात्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपी अविनाश चव्हाण व त्याच्या इतर साथीदारांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती ठीक असून, त्यांना जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सिद्धार्थ आणि मिताली अडकले विवाहबंधनात; थाटामाटात पार पडला लग्नसोहळा

0

पुणे: गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा सुरू होती, तो अभिनेता आणि अभिनेत्री यांचा विवाहसोहळा नुकताच पुण्यात थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी सिद्धार्थ आणि मितालीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणून सिद्धार्थ आणि मिताली ओळख आहे. त्यांच्या या विवाहसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर आज दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात सिद्धार्थ आणि मिताली विवाहबद्ध झाले. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पतीसोबत या विवाबसोहळ्यात सहभागी झाली होती. तर पूजा सावंत, भूषण प्रधान हे देखील सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला आले होते.

पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीनं सिद्धार्थ-मितालीचा विवाह पार पडला. मितालीनं हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती, तर सिद्धार्थनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंन्टाइन्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा पार पडला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबई: मालकाशी वाद; ड्रायव्हरनं ३ कोटींच्या ५ बस दिल्या पेटवून

0

मुंबई: ट्रॅव्हल एजन्सीत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील व्यक्तीने जवळपास ३ कोटी रुपये किंमतीच्या पाच बस पेटवून दिल्या. मालकाने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समजते. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अजय सारस्वत असे २४ वर्षीय ड्रायव्हरचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या पाच बस एका महिन्याच्या कालावधीत पेटवून दिल्या. पहिली घटना २४ डिसेंबर २०२० रोजी झाली होती. त्यावेळी तीन बस पेटवून दिल्या होत्या. त्यानंतर २१ जानेवारी २०२१ रोजी आणखी दोन बस पेटवून दिल्या. त्यामुळे केवळ आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या बस का पेटवल्या जात आहेत, असा संशय पोलिसांना आला.

बसमध्ये बॅटरींच्या दुरुस्तीचे काम निघाले होते. त्यामुळे आगी लागल्याचे कारण सांगितले जात होते. मात्र, महिनाभराच्या कालावधीत पाच बस पेटल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याचवेळी एजन्सीच्या मालकाने आपल्या एका कर्मचाऱ्यावर संशय घेतला. मालक आणि ड्रायव्हर यांच्यात पगारावरून वाद झाला होता. करोना काळात एजन्सीला ड्रायव्हरची गरज होती. गोव्यात अजय बस चालवत होता. त्यावेळी अपघात झाला होता. यात मोठे नुकसान झाले होते. ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाने अजयचे काही पैसे दिले नव्हते. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.

पोलिसांनी अजयला पोलीस ठाण्यात बोलावले आणि त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सुरुवातीला बसचे पडदे पेटवत होतो. त्यामुळे संपूर्ण बस पेट घ्यायची, असे अजयने पोलिसांना सांगितले. एजन्सीच्या मालकाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे अजयने सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'नॉर्थ ब्लॉक'मध्ये हलवा शिजला ; 'बजेट'मध्ये सामान्यांचे तोंड गोड होणार का?

0

नवी दिल्ली : यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची छपाई होणार नसली तरी त्यापूर्वी होणाऱ्या हलवा बनवण्याचा () सोहळा शनिवारी दिल्लीतील अर्थ खात्याचे मुख्यालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये पार पडला. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्व उपस्थितांनी यावेळी हलव्याचा आस्वाद घेतला. दरम्यान, बजेटमध्ये कर सवलती देऊन सरकार सामान्यांचे तोंड गोड करणार का याची उत्सुकता लागली आहे.

दरवर्षी अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक इमारतीतील तळघरात अर्थसंकल्पाच्या छपाईची प्रक्रिया पार पडली जाते. छपाईच्या कामाचा शुभारंभ अर्थ खात्यातील कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करून केला जातो. छपाई आरंभी मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो. अर्थमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी या सोहळ्याला उपस्थित असतात. तो हलवा नंतर सर्वाना वाटून तोंड गोड केले जाते. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई केली जाते. यंदा मात्र बजेटची मोजकी छपाई केली जाणार आहे. काटकरस म्हणून सरसकट बजेटच्या हजारो प्रती न छापण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे होणार की नाही याबाबत साशंकता होती. याच धर्तीवर कर सवलती मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दरवर्षी प्रथेनुसार हा हलवा सोहळा पार पाडतो. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांच्या उपस्थितीत २०२१-२२ च्या केंद्रीय तयार करण्याच्या अंतिम टप्प्याचा चिन्हांकित हलवा सोहळा शनिवारी दुपारी नॉर्थ ब्लॉकमध्ये पार पडला. यावेळी अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी संसद सदस्यांना आणि सर्वसामान्यांना बजेटशी संबंधित कागदपत्रे सहज व वेगवान मिळवून देण्यासाठी “केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप” सुरू केले.

वाचा :

हलवा समारंभास, केंद्रिय अर्थमंत्र्यांसमवेत केद्रिय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी अर्थ मंत्रालयातील विविध सचिव उपस्थित होते. अर्थसंकल्पीय तयारी आणि संकलन प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्ये इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅपमधून मिळणार ‘बजेट’चे अपडेट
– अर्थसंकल्प यंदा प्रथमच पेपरलेस स्वरूपात देण्यात येणार आहे.
– अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व १४ दस्त मोबाइल अ‍ॅपमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. याअंतर्गत, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यत: अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदान मागणी (डीजी), वित्त विधेयक इत्यादी दस्त उपलब्ध असतील जी घटनेनुसार निश्चित केली गेली आहेत.
– अॅप्लिकेशनमध्ये डाऊनलोड, मुद्रण, सर्चिंग, झूम इन आणि आऊट, स्क्रोलिंग, सारणीचे विषय यादी, आणि एक्स्टर्नल लिंक आदी वैशिष्ट्यांसह वापरकर्त्यासाठी अतिशय अनुकूल आहे.
-हे दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि अंड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
-हे अप्लिकेशन केंद्रिय अर्थसंकल्पाच्या पोर्टलवरून देखील (www.indiabudget.gov.in) डाऊललोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
-१ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेमध्ये अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल अप्लिकेशनवर उपलब्ध असतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts