Monday, December 11, 2023
Home Blog Page 7198

गोरेवाडा नामकरण: बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही, पण…

0

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

उपराजधानीतील बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबत पक्षाने कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, राजे बक्त बुलंद शहा यांच्या शहरातील उद्यानाला गोंडवाना नाव देण्यावर पक्ष ठाम असल्याचे समजते.

वाचा:

शिवसेनाप्रमुख यांचे नाव देताच आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, ‘ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही पण, गोंडवाना नाव देण्याचा निर्णय झालेला आहे’, असे स्पष्ट केले. माजी महापौर माया इवनाते यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी मोर्चा व अन्य संघटनांनी नाव बदलण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. नामकरणाच्या वादावरून तापलेल्या राजकीय वातावरणात बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी होणार आहे. या नामकरणावर काँग्रेसचे काही नेते खूश नसल्याची चर्चा आहे. पण, याबाबत कुणीही उघडपणे बोललेले नाही.

वाचा:

गोरेवाडा येथे सिंगापूरहून चांगले प्राणिसंग्रहालय करण्याची मूळ योजना होती. तब्बल दोन दशकांपासून या प्रकल्पाची चर्चा चालली आहे. पहिल्या युतीच्या काळात तत्कालीन वन राज्यमंत्री विनोद गुडधे यांनी हा प्रकल्प जाहीर केला व विदर्भ वैधानिक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अरुण अडसड यांच्याकडून दहा लाख रुपये खेचून आणले. निधी परत जाऊ नये, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला देण्यात आले. यानंतर पश्चिम नागपूरचे प्रतिनिधित्व करताना देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला, हे विशेष. नागपूर त्रिशताब्दीदरम्यान या प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न झाले. आघाडीच्या काळातील वनमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, पण विशेष प्रगती झाली नाही. फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्पाला गती आली. निवडणुकीपूर्वी उद्घाटनाची तयारी करण्यात आली होती. मात्र, मुहूर्त निघाला नाही. सामाजिक समीकरण व शहरातील राजकीय स्थिती लक्षात घेऊन गोंडवाना नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भाजपचे स्थानिक आमदार वा अन्य लोकप्रतिनिधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे समजते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अण्णा सावध रहा! समर्थकांनी करून दिली 'या' प्रकरणाची आठवण

0

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक यांचे आंदोलन जवळ आलेले असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात का, यावरून समर्थकांमध्ये मतभेद आहेत. अण्णांनी या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असा एक मतप्रवाह आहे तर काही मंडळींनी भेटीचे समर्थन केले असले तरी सावध रहावे असा सल्लाही दिला आहे. गंगा शुद्धीकरण आंदोलनासाठी प्राणत्याग केलेले यांच्या उपोषणाची आणि त्यात त्यांचा बळी गेल्याची आठवणही करून देण्यात आली आहे. ( to go on Fast)

वाचा:

शुक्रवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थात ती निष्पळ ठरली आणि हजारे आंदोलनावर ठाम राहिले. या भेटींवर हजारे यांच्या समर्थकांमध्ये मात्र चर्चा सुरू झाली आहे. दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या कामाच्या निमित्ताने हजारे यांच्याशी जोडले गेलेल्या हेरंब कुलकर्णी यांनी चर्चेला तोंड फोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘भाजपाचे नेते अण्णांची भेट घेत आहेत. अण्णांनी त्यांना भेट देता कामा नये. एक तर अण्णांच्या सर्व मागण्या या केंद्राशी संबंधित आहेत त्यामुळे राज्यातील नेत्यांचा संबंध काय? दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांनी भेटायला यावे. याच मागण्यांवर पूर्वी हजारे यांनी उपोषण केले तेव्हा मिटवायला हेच महाराष्ट्रातील नेते होते. त्या अश्वासनांची अंमलबजावणी का झाली नाही? असे अण्णांनी त्यांना विचारून दूर करायला हवे. अण्णांना सतत भेटून अण्णा आमचे ऐकतात, असा संदेश देत अण्णा हजारे हे भाजपाचे आहेत, हा विकृत प्रचार करत आंदोलनाची धार कमी करायचा यामागे सुप्त हेतू असतो. अण्णांना हे कळत का नाही? जे पंतप्रधान पत्राला उत्तर न देता सतत अवमानित करतात. समजावूनच सांगायचे तर तुमच्या दिल्लीतील नेत्यांना सांगा, असे अण्णांनी त्यांना खडसावले पाहिजे’.

वाचा:

हजारे यांच्या कायदेशीर सल्लागारांपैकी एक अॅड. श्याम आसावा यांनी मात्र, वेगळे मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘अण्णांना कोणीही सहज भेटू शकते कारण त्यांचे दार सर्वांसाठी खुले आहे. पूर्वी अण्णांचे गुणगाण गात सत्तेवर आलेली मंडळी आता अण्णांची प्रतारणा करत आहे, हे तितकेच खरे आहे. तरीही जनहितासाठी असे अपमान आण्णांनी अनेकदा पचविले आहेत. चर्चेतून मार्ग निघतात हा हजारे यांचा अनुभव आहे. सरकार विरुद्ध जनहितार्थ आंदोलन करायचे, चर्चा करून लेखी आश्वासन घ्यायचे व नंतर त्या आधारे सरकारला खिंडीत पकडायचे, अशी अण्णांची कार्यपध्दती अनुभवातून झालेली आहे, असे माझे व्यतीगत मत आहे. आजपर्यंतचे कायदे व जनहितार्थ निर्णय या पध्दतीनेच झाले आहेत. सामान्य लोकांचे सरकार बहुमताने सत्तेत जाऊन जनहिताचे प्रश्न सुटु शकतील अथवा निर्णय होतील अशी शक्यता सध्या तरी नाही. विरोधी पक्ष सत्ताधारींवर दबाब ठेऊ शकतात असेही नाही. त्यामुळे अशी आंदोलने आवश्यक आहेत. मात्र, अण्णांना आता अधिकच सावध सजग राहावे लागणार आहे. कारण हे सत्ताधारी फार बेरकी व धूर्त आहेत. पंतप्रधान गंगामाईला साफ करण्याचे आश्वासन देवून सत्तेत आले. मात्र, याच मागणीसाठी आंदोलन करणारे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते जे. डी. अग्रवाल यांचे १०८ दिवस उपोषण झाले. त्यातच त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. परंतु उपोषण काळात पंतप्रधानांनी अजिबात लक्ष दिले नाही. निधन झाल्यावर ट्विटरवर निर्लज्जपणे श्रध्दांजली वाहुन मोकळे झाले. असा सत्तेचा माज व मस्ती असलेल्या ठकांशी तुम्ही चर्चा करत आहात. फूट पाडणे, भ्रमीत करणे, भावनिक करणे, परिस्थिती निर्माण करून त्याचा पद्धतशीरपणे फायदा उचलणे यातच हे ठकसेन सराईत आहेत.’

वाचा:

विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘अण्णा त्यांना भेटले आणि परत एकदा सोबत हजारेंची साठगाठ आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरावे अशी पार्श्वभूमी तयार झाली. अण्णांना असे राजकीय लोकांनी त्यांना भेटणे, पाया पडणे आवडते त्याला कोण काय करणार? कधी अशा राजकारण्यांना एखादी भेट नाकारणे किती ताकदवान ठरू शकते, याची अण्णांना जाणीव देणाऱ्यांचे तरी अण्णा कुठे ऐकतात?’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला

0

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे आता स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांपूर्वी राळेगणसिद्धीमध्ये झालेल्या आंदोलनाचे नियोजन ग्रामस्थांनीच केले होते. तशीच तयारी आता हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे चर्चेच्या फेऱ्या वाढत असल्याने आंदोलन स्थगित होते की काय, याचीही प्रतीक्षा आहे.

वाचा:

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३० जानेवारीपासून हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दिल्लीत जागा न मिळाल्याने त्यांनी राळेगणसिद्धी येथेच उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हजारे यांच्या आंदोलनासाठी टीम असायची. दरवेळी नवीन का होईना मात्र कार्यकर्त्यांची एक फळी हजारे यांच्यासोबत असायची. त्यातील काही मंडळी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होत तर काही सरकारसोबत चर्चेसाठी मध्यस्थी, प्रसिद्धी आणि अन्य कामे सांभाळत असत. मात्र, आंदोलनाचा फायदा उठवत अनेकांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर हजारे सावध झाले. गेल्या वेळी त्यांनी कोणत्याही टीम शिवाय आंदोलन केले होते. यावेळीही आंदोलनासाठी टीम अण्णा तयार करण्यात आलेली नाही.

वाचा:

मुळात आता हजारे यांनी उपोषण करूच नये, असे त्यांच्या अनेक समर्थकांना वाटते. उपोषणाऐवजी मौन व्रत करावे, अशा सूचनाही त्यांना करण्यात आल्या आहेत. मात्र, उपोषणाशिवाय सरकारवर दबाव येत नसल्याचे सांगत हजारे उपोषण करण्यावर ठाम आहेत. दोन वर्षांपूर्वी ३० जानेवारीलाच हजारे यांनी राज्यात लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर यादवबाबा मंदिरात आंदोलन केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनीही एक दिवसाचे उपोषण, गावबंद, ठिकठिकाणी धरणे अशी आंदोलने केली होती. यावेळीही टीम अण्णा नसल्याने ग्रामस्थांकडूनच आंदोलन चालविले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हजारे समर्थकांचीच गावात सत्ता आली आहे. त्यामुळे हजारे यांच्यासोबत पूर्वीप्रमाणे टीम नसली तरी ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बजेट स्मार्टफोन Realme C20 लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

0

नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी रियलमीने आपला लेटेस्ट एन्ट्री लेवल स्मार्टफोन ला लाँच केले आहे. बजेट स्मार्टफोनला कमी किंमतीत लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 5000 mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.

वाचाः

Realme C20 ची वैशिष्ट्ये
रियलमी सी स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित रियलमी यूआय वर काम करतो. रियलमी फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (720×1,600 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०.९ इतका आहे.

वाचाः

रॅम स्टोरेज आणि प्रोसेसर
स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर सोबत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

वाचाः

डिझाइन आणि कॅमेरा
रियलमीच्या या फोनमध्ये फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉच दिला आहे. खालील बाजुस बॉर्डरला पाहायला मिळू शकतो. रियलमी सी २० स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि फ्लॅश दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

बॅटरी क्षमता आणि कनेक्टिविटी
या फोनला पॉवर देण्यासाठी यात ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. याशिवाय या फोनमध्ये ३.५ मिलीमीटर हेडफोन जॅक, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, ड्यूल बँड वाय फाय, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. फोनच्या मागच्या बाजुला सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

फोनची किंमत
रियलमीच्या या फोनला दोन कलर व्हेरियंटमध्ये उतरवले आहे. सध्या या फोनला व्हिएतनाममध्ये लाँच केले आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ८०० रुपये आहे. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनला लाँच करणार की नाही, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

फडणवीसांची बाळासाहेबांना आदरांजली; शिवसेनेला चिमटे

0

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. या निमित्तानं विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी एक खास व्हिडिओ शेअर करून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे व विचारांचे कौतुक करताना फडणवीस यांनी या माध्यमातून शिवसेनेला टोले हाणले आहेत. ( Pays Tribute to )

वाचा:

चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचं वर्णन केलं आहे. बाळासाहेबांच्या काही भाषणांसह स्वत:च्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत. ‘अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मनं छोटी-छोटी होतात. ते आपल्यापलीकडं पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होतं. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशासाठी? पैशाचे लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नयेत. तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. तुमच्याकडं आदरानं लोक पाहताहेत तो आदर तसाच ठेवा…’ बाळासाहेबांच्या भाषणातील ही निवडक व सूचक वाक्य फडणवीस यांनी शेअर केली आहेत.

‘आम्ही कुठेही असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेला टोले हाणले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी! पत्री पुलाचे काम पूर्ण

0

म. टा. वृत्तसेवा,

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अखेर २६ महिन्यानंतर पूर्ण झाले असून सोमवारी, २५ जानेवारीला सकाळी १२.३० वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नियोजनानुसार शुक्रवारी ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांना देताच अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. यामुळे अखेर वाहतूककोंडीतून सुटका होण्याचा मुहूर्त निश्चित झाल्याचे समाधान नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

वाचा:

ब्रिटिशकालीन पत्रीपुलावर १८ नोव्हेबर २०१८ला रेल्वेकडून हातोडा मारण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून ३६ कोटी रुपयांच्या निधीतून नवा ११० मीटर लांबीचा पत्रीपूल तयार करण्यात आला असून कमीत कमी वेळेत हा पूल पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांतून ठेकेदारावर दबाव येत असल्याने दिवसरात्र काम करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, सुरुवातीला रेल्वेकडून पुलाची लांबी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेली दिरंगाई, करोना लॉकडाउनमुळे ठप्प असलेली वाहतूकसुविधा यामुळे पहिल्या लॉकडाउनचा तीन महिन्यांचा कालावधी वाया गेला. मे महिन्यापासून पुन्हा एकदा शासनाच्या परवानगीने पुलाचे काम सुरू करण्यात आले.

वाचा:

नोव्हेंबर महिन्यात पुलाचा ७६ मीटर लांबीचा रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा एकसंध गर्डर बसविण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाने वेग घेतला होता. मात्र तेव्हाच अधिकाऱ्यांनी उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर ठेकेदाराने ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करत २२ जानेवारी रोजी पूल रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला असून वाहनचालकांना पत्रीपुलावरील वाहतूक कोंडी आणखी दोन दिवस सोसावी लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ऑफर्स!, iPhone 12, iPhone 11 सीरीजसह 'या' आयफोन्सवर १७ हजारांपर्यंत सूट

0

नवी दिल्लीः भारतात सध्या ऑफर्स आणि डिस्काउंट देण्यात येत आहे. हजारो रुपयांच्या सूटसोबत ग्राहक मोबाइल आणि अन्य गॅझेट्स खरेदी करीत आहेत. सध्या ई-कॉमर्स वेबसाइटसह वर , , सह अन्य आयफोन्स मॉडलवर १७ हजारांपर्यंत डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे.

वाचाः

खरेदीचा बेस्ट चान्स
जर तुम्हाला अॅपलचा लेटेस्ट आयफोन १२ सीरीजमधील मोबाइल्स खरेदी करायचा असेल तर तुम्ही मॅपलच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोर्सवर किती सूट मिळत आहे. कोणत्या फोनवर बेस्ट डील आहे. जाणून घ्या.

वाचाः

iPhone 12 Pro Max वर बंपर सूट
Maple Online आणि ऑफलाइन स्टोर्स वर अॅपलचा नुकताच लाँच झालेला फ्लॅगशीप स्मार्टफोन iPhone 12 Pro Max च्या १२८ जीबी स्टोरेज मॉडलवर १३ हजार रुपयांची सूट मिळत आहे. ज्यात ८ हजार रुपयांचा डिस्काउंट, आणि ५ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. यासाठी अट म्हणजेच HDFC Bank cards वरून फोन खरेदी करायला हवा. आयफोन १२ प्रो मॅक्सची किंमत १ लाख २७ हजार ९०० रुपये आहे. परंतु, १३ हजार रुपयांच्या सूटनंतर हा फोन १ लाख १४ हजार ९०० रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

वाचाः

iPhone 12 वर ९ हजार रुपयांचा फायदा
आयफोन १२ वर ३ हजार ५०० रुपयांचा डिस्काउंट आणि एचडीएफसी कार्ड खरेदीवरून ५००० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. यानंतर याची किंमत १ लाख १७ हजार ९०० रुपयांपेक्षा कमी होऊन १ लाख ९ हजार १०० रुपये झाली आहे. आयफोन १२ वर ३ हजार रुपये डिस्काउंट सोबत ६ हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळत आहे. यानंतर याची किंमत ७६ हजार ९०० रुपयांहून कमी होऊन ती ६७ हजार ९०० रुपये झाली आहे. आयफोन १२ मिनीवर १२ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. आयफोन १२ मिनी एक्सचेंज ऑफर सुद्धा सुरू आहे. या ऑफरमध्ये हा फोन केवळ ४८ हजार ९०० रुपयात खरेदी करता येऊ शकतो.

वाचाः

iPhone 11 सीरीज स्मार्टफोन्सवर बंपर सूट
iPhone 11 Pro Max वर १२ हजार रुपयांचा डिस्काउंट सोबत एचडीएफसी कार्डवरून खरेदी केल्यास २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. यानंतर या फोनची किंमत ९९ हजार ९०० रुपयांहून कमी होऊन ८५ हजार ९९० रुपये झाली आहे. तर आयफोन ११ प्रो वर केवळ २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. याची किंमत ७९ हजार ९९९ रुपयांहून कमी होऊन ७७ हजार ९९९ रुपये झाली आहे. आयफोन ११ वर डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळून ७५०० रुपयांची सूट मिळत आहे. याची किंमत ४८ हजार ९९९ रुपयांहून कमी होऊन ४२ हजार ४९९ रुपये झाली आहे.

वाचाः

Maple स्टोर वर सुरू असलेल्या या ऑफरमध्ये iPhone XR चे 64GB वेरियंट केव ३८ हजार ९०० रुपये, आणि iPhone SE 2020 मॉडल चे 64GB वेरियंट ३० हजार ९०० रुपयांत खरेदी करू शकता.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

अमित ठाकरेंनी वर्षभरात काय केलं? मनसेनं प्रसिद्ध केलं रिपोर्ट कार्ड

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री म्हणून नव्या गोष्टी, उपक्रम हाती घेत असताना आता अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र यांचेही गेल्या वर्षभरातील कामांचे रिपोर्टकार्ड मनसेने तयार केले आहे. अमित यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत असल्याचे निमित्त साधत व्हिडीओ ट्रेलरच्या माध्यमातून हे रिपोर्टकार्ड काढण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर पर्यावरण विभागाच्या माध्यमातून त्यांनी अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. याशिवाय मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी उपक्रम हाती घेतले. या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी मनसेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अमित यांनीही पक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले असून त्यावर प्रकाश टाकण्यासाठी पक्षानेच पुढाकार घेतला आहे.

वाचा:

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमित यांनी आरे कॉलनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यातील बंधपत्रित डॉक्टर्स नर्सेस यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी लावून धरली. करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या-आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी अमित यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले, याकडे लक्ष वेधण्यात आले.

वाचा:

राज्यातील आशा स्वयंसेविकांना मिळणारा मोबदला वाढायला हवा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांनी ही मागणी मान्य करत आशा स्वयंसेवकांच्या वेतनात दुप्पट वाढ केली. एमपीएससी-युपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी, विशेषत पुण्यात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी एसटी उपलब्ध करून देण्याची विनंती अमित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या सगळ्या कामांचा उल्लेख यात करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

हे तर शरद पवारांचे स्वत:विरुद्ध आंदोलन; भाजपची बोचरी टीका

0

म. ट. विशेष प्रतिनिधी, मुंबई
कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या यांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी शुक्रवारी केली.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री २५ जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. मात्र, हे आंदोलन करण्यापूर्वी पवार यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी अपेक्षा आहे. ज्यावेळी पवार हे कृषिमंत्री होते, तेव्हा स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका का घेतली नाही? पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना सर्व राज्य सरकारांना कृषी कायद्यातील सुधारणाविषयक पत्र पाठवली होती. तेच पवार आता या सुधारणांविरोधात आंदोलन करीत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा?

वाचा:

केंद्र सरकारकडून कायदा संमत झाल्यानंतर राज्याच्या विधीमंडळात कायद्याला मंजुरी दिल्यानंतर केवळ काँग्रेसच्या दबावाखाली येऊन कायद्याला राज्यात स्थगिती देणे म्हणजे राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते. पवार आणि ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे महत्त्वाचे आहेत की केवळ राजकारण करण्यासाठी आंदोलनात उतरणे महत्त्वाचे आहे, असा सवालही त्यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सावधान! लोन अॅप्सच्या माध्यमातून डेटा चोरून नागरिकांची बदनामी

0

पुणे: ‘लोन अॅप्स’ च्या माध्यमातून कर्ज दिल्यानंतर परतफेड करण्यास उशीर करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलमधील डेटा चोरून त्यांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. अॅपच्या माध्यमातून मोबाईलमधील चोरलेल्या डेटाचा वापर करून त्यांचे मित्र, नातेवाईक यांना फोन केले जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तीन स्वंतत्र गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत घोरपडी परिसरातील एका तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात अॅप्समधून फोन करणारे व चालविणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार तरुणी एका कंपनीत नोकरी करते. लॉकडाऊनमध्ये वडिलांच्या आजारासाठी पैशाची आवश्यकता होती. तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यामध्ये अपच्या माध्यमातून तत्काळ कर्ज मिळेल, असे म्हटले. त्यामुळे महिलेने त्या लिंकवर क्लिक केले. त्या ठिकाणी असणारी सर्व माहिती भरली. ते अप मोबाईलमध्ये इन्स्टॉल होत असताना त्याने मोबाईलचा सर्व डेटा अक्सेस मागितला. त्याला त्यांनी ओके केले. त्यानंतर त्यांना तीन हजार रुपये कर्ज मिळेल, असे दाखविले. त्याला मान्यता दिल्यानंतर सर्व शुल्क कमी होऊन तक्रारदार यांना १७०० रुपये कर्ज मिळाले. ही रक्कम त्यांना सात दिवसांमध्ये भरायची होती. त्यानंतर तक्रारदार यांनी ही कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळ्यी लोन अॅप्स घेतली. त्याच्या मार्फत त्यांनी कर्ज घेऊन पहिले घेतलेले कर्ज फेडत राहिल्या. डिसेंबर २०२० पर्यंत त्यांना सहा ते सात अॅप्सचे कर्ज परत द्यायचे राहिले होते. त्यावेळी त्या अॅप्समधून बोलत असल्याचे सांगून कर्ज भरण्यासाठी धमकावत होते. त्यांनी कर्ज भरण्यास मदत मागितली. त्यावेळी त्या व्यक्तीने शिवीगाळ करून तुमच्या मोबाईलमधील डेटा आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमधील क्रमांकाची यादीच त्यांना पाठविली. तसेच, गॅलरीमध्ये असलेला त्यांचा फोटा घेऊन त्यावर फ्रॉड असे लिहून त्यांना व त्यांच्या मित्र, नातेवाईकांना पाठविला. तसेच, मित्रांना फोन करून तक्रारदार कर्ज फेडत नसून तुमच्या ओळखीची आहे. त्यामुळे तुम्ही कर्ज भरा, असे धमकावू लागले. या सर्व प्रकारामुळे तक्रारदार यांना खूपच मनस्ताप झाला. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक महादेव कुंभार हे अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts