Thursday, November 30, 2023
Home Blog Page 7221

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती

0

म. टा. प्रतिनिधी, पुणेः राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची ( co operative society elections ) तयारी सुरू झाली असतानाच, राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या ४५ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याने स्पष्ट झाले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक आराखडे तयार करण्यात आले होते. १८ जानेवारीपासून या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने पुन्हा स्थगिती दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने वेळोवेळी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी ही मुदत संपली होती.

दरम्यान, सहकारी संस्थांनी मासिक सभा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य डिजिटल पर्यायांचा वापर करून घेण्याचा; तसेच निवडणुका होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांकडून संबंधित सहकारी संस्थांचे कामकाज सुरू राहणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले…

0

नवी दिल्लीः कृषी कायद्यांविरोधात ( ) आंदोलन ( ) करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनी ( republic day ) दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर राष्ट्रध्वजासह ट्रॅक्टर परेड काढतील. यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही. शेतकरी संघटनांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत आपल्या आंदोलनासंबंधी माहिती दिली. स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा रविवारी ५३ वा दिवस होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शेतकरी चळवळीत भाग घेणाऱ्या किंवा ज्यांनी पाठिंबा दर्शविला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. सर्व शेतकरी संघटनांनी याचा निषेध केला. त्याच वेळी भारतीय किसान युनियन लोकशक्तीने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी मागितली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे प्रमुख दर्शन पाल यांनी दिली.

‘सरकारने कायदे मागे घ्यावेत’

आतापर्यंत शेतकऱ्यांसोबत सरकारने अनेक बैठका घेतल्या आहे. पुढील बैठक मंगळवारी होणार आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत तरीही सरकार कायदे मागे घेत नाही. आंदोलन दीर्घकाळ चालेल असं दिसतंय, असं भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैट म्हणाले.

शेतकरी कायद्यातील कलमांवर एक-एक करून चर्चा करतील आणि कायदे मागे घेण्याशिवाय दुसरे काही पर्याय काय आहेत हेही सांगतिल, अशी अपेक्षा असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

‘सरकारचा थकवण्याचा प्रयत्न’

जवळजवळ २ महिन्यांपासून आम्ही थंडीत आंदोलन करत आहोत. सरकार आम्हाला तारीखवर तारीख देत आणि मुद्दा लांबणीवर नेत आहे. जेणेकरून आम्ही थकून माघार घेऊ. हे सरकारचे षडयंत्र आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोला यांनी केला.

एनआयएने शेतकरी आंदोलनाशी संबंधित ५० हून अधिक नेते आणि व्यावसायिकांना समन्स बजावले आहे. यापैकी काही जाणांची शनिवारी चौकशीही करण्यात आली. पतियाळा येथील अनिवासी भारतीय दर्शनसिंग धालीवाल यांची विमानतळावर अडीच तासांहून अधिक काळ चौकशी केली गेली. पतियाळातील बब्बर खालसाचा दहशतवादी जगतरसिंग हवारा याचे वडील गुरचरण सिंग आणि शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा यांनाही एनआयएने समन्स बजावले आहे.

एनआयएची नजर लुधियानामधील १७ व्यावसायिकांवर नजर आहे, ज्यांनी दिल्लीत येऊन आंदोलनात वस्तूंचे वाटप केले. लुधियाना, पतियाळा, तरण तारण आणि अमृतसर येथील वाहतूकदारांच्या जबाबांचे व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर सर्वांना २१ जानेवारीला निधी आणि विनामूल्य सेवा देण्याचे रेकॉर्ड सादर करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'

0

लखनऊः अयोध्येत ३९ महिन्यांत प्रभू श्रीरामचे भव्य मंदिर बांधून पूर्ण होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे आतापर्यंत अयोध्येतील मंदिर बांधण्यासाठी १०० कोटी रुपयांची देणगी जमा करण्या आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्रस्टला ५ लाख १०० रुपयांची देणगी दिली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी १५ जानेवारीवा स्वत:ला राष्ट्रपतींची भेट घेतली होती.

राम मंदिर निर्मणासाठी राष्ट्रपतींकडून देणगी घेतल्यावरून माध्यमांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रपतींच्या देणगीवरून टीका करणाऱ्यांना ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी उत्तर दिलं. आक्षेप आणि टीका करणाऱ्यांनी आधी इतिहास वाचावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

‘विरोधानंतरही राजेंद्र प्रसाद यांची सोमनाथ मंदिराला भेट’
जे लोक राष्ट्रपतींनी दिलेल्या देणगीवर आक्षेप घेत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की देशाच्या पंतप्रधानांचा विरोध असूनही राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गेले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारतीय आहेत आणि भारताच्या आत्म्यात राम आहे. जे कोणी सक्षम असतील ते या उदात्त कार्यात मदत करू शकतील. यात काहीही चुकीचं नाही, असं ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले.

‘३९ महिन्यांत राम मंदिर बांधलं जाणार’

देशातील पाच मोठ्या अभियांत्रिकी संस्था, इमारतींचे बांधकाम आणि भू-गर्भ संबंधित संस्थांच्या शास्त्रज्ञांनी मंदिराच्या पाया आणि जमिनीखाली स्थितीचा अभ्यास केला आहे. यामुळे पायाभरणीचे काम सुरू झाले. ३९ महिन्यांत मंदिर बांधले जाईल, असा पुनरुच्चार चंपत राय यांनी केला.

‘आतापर्यंत १०० कोटींची देणगी’

राम मंदिर निर्माणासाठी किती देणगी मिळाली? याची अद्यापपर्यंत अचूक माहिती मिळालेली नाही. पण कार्यकर्त्यांनी अंदाजानुसार आतापर्यंत १०० कोटी रुपयांचे दान मिळाल्याचं बोललं जात आहे. यासाठी १५ जानेवारीपासून विश्व हिंदू परिषद जनसंपर्क अभियान राबवत आहे. ही मोहीम २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, असं चंपत राय यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय!'

0

मुंबई: सरकारने प्रकरणी चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ( Update )

वाचा:

टीआरपी घोटाळा प्रकरणी तपासात वाहिनीचे संपादक आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. या संभाषणातील तपशील अत्यंत धक्कादायक असून त्यावर बोट ठेवतच जयंत पाटील यांनी मतप्रदर्शन केले आहे. पाटील यांनी अर्णब गोस्वामी यांचा नामोल्लेख टाळला आहे. ‘एक तथाकथित पत्रकाराचे संभाषण’ असा उल्लेख करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर ट्वीट केलं आहे. ‘प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र, प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते’, असे जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

वाचा:

‘संबंधित व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत, हे जनतेला कळेल. सदर इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे. हा न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे’, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रिमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या, ही बाब गंभीर असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

वाचा:

दरम्यान, जयंत पाटील यांच्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या व्हॉट्सअॅप चॅटवरून भाजपला लक्ष्य केले होते. ‘कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरून दिसतंय. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लीक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे’, अशी भीती रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केली होती. त्याशिवाय काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या संभाषणावर सडेतोड मत मांडले होते. ‘हे संभाषण अत्यंत धक्कादायक असून त्यामधून टीआरपी घोटाळ्यात भाजपा आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘AS’ कोण आहे याचे भाजपाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीच सावंत यांनी केली होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

धक्कादायक: मुंबईत सहायक पोलीस निरीक्षकाचा मांजाने चिरला गळा

0

मुंबई: ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांचा जीव शनिवारी थोडक्यात बचावला. दुचाकीवरून न्यायालयात जात असताना नायलॉन मांजाने त्यांचा गळा चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने राकेश गवळी बचावले.

राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर अचानक पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला. दुचाकीवर नियंत्रण मिळवताना कधी मांजाने गळा चिरला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. पोलिसाच्या गळ्यातून रक्त येताना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस मदतीला धावून आले. त्यांनी गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. याबाबत समजताच तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी पोलीस उपायुक्त यांनी त्यांना रुग्णालयात हलविले. त्यांच्या गळ्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करून १० टाके टाकण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने गवळी यांचा जीव बचावला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे: जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींपैकी ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी (दि.१८) रोजी जाहीर होणार आहे. तहसीलदार कार्यालय स्तरावर या निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे.

या निवडणुकांसाठी मतदारांनी उत्साह दाखविल्याने सरासरी मतदान ८०.५४ टक्के झाले आहे. ७४६ ग्रामपंचायतींपैकी ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध, तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकला असल्याने ६४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले.

चार हजार ९०४ जागांसाठी ११ हजार सात उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभे होते. त्यासाठी १३ लाख ८८ हजार ३१४ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार १०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. सर्वाधिक मतदान हे वेल्हे तालुक्यामध्ये ८६.६९ टक्के झाले असून, सर्वांत कमी हवेली तालुक्यामध्ये ७३.९८ टक्के झाले आहे.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये वेल्हे तालुक्यातील २०, भोरमधील ६३, दौंड येथे ४९, पुरंदर तालुक्यात ५५, इंदापूर येथे ५७, बारामतीत ४९, जुन्नरमध्ये ५९, आंबेगाव २५, खेड ८०, शिरुर ६२, मावळ ४९, मुळशीत ३६ आणि हवेली तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी तीन गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची केवळ औपचारिकता राहिली आहे. वडाची वाडी आणि औताडे-हांडेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, शेवाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये एका जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Uday Samant: 'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं?'

0

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी-परुळे विमानतळाचे उद्घाटन दि. २३ जानेवारी रोजी होणार नसून येत्या आठ ते दहा दिवसांत हा कार्यक्रम होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली. सुरक्षिततेच्या दुष्टिने आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करूनच विमान सेवा सुरू केली जाईल. या प्रकल्पासाठी केंद्राने कुठेही आडकाठीचे धोरण अवलंबिले नाही उलट सहकार्यच केले असल्याचेही उदय सामंत यांनी नमूद केले. दरम्यान, चिपी विमानतळाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख दिवंगत यांच्या जयंतीला २३ जानेवारी रोजी होईल, अशा बातम्या आधी आल्या होत्या. त्यामुळेच सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. ( News Latest Update )

वाचा:

प्रकल्पाची पालकमंत्री सामंत यांनी रविवारी पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांच्याकडून आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार , आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, आज सिंधुदुर्ग विमानतळाची पाहणी केली असून अद्याप तारीख निश्चित झाली नसली तरी येत्या आठ ते दहा दिवसात मुंबईहून विमान सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर उतरेल आणि सिंधुदुर्ग वरून मुंबईला जाईल. आता ज्या तारखा दिल्या जात आहेत त्या तारखा निश्चित नाहीत. तांत्रिक बाबी पूर्ण करूनच विमानसेवा सुरू होईल. विमानतळाकडे येणारे रस्ते, परिसर सुशोभीकरण, केंद्राची सिक्युरिटी नसल्याने पोलीस अधिकारी किती लागतील? कॉन्स्टेबल किती लागतील?, सशस्त्र पोलीस किती?, सुरक्षा बोर्डाचे सुरक्षा रक्षक किती पाहिजेत? याच्यावर आजच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. विमान उड्डाण आणि लँडिंगसाठी जी यंत्रणा लागेल ती सर्व यंत्रणा सज्ज आहे. केंद्राकडून आवश्यक ती परवानगी मिळाली की विमान सेवा सुरू होईल. चिपी विमानतळ उद्घाटनासाठी २३ तारीख ठरल्याचा जो कागद दाखवला जात आहे, तो कागद पालकमंत्री म्हणून मी, खासदार विनायक राऊत, किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंतिम झालेला नाही.

वाचा:

केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने चिपी विमानतळाबाबत चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. दिल्लीच्या पथकाने चिपी विमानतळाची पाहणी केल्याचा अहवाल सोमवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला जाईल आणि काही सूचना असतील तर त्या पूर्ण करून दिल्या जातील. या प्रकल्पाला केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य आहे. चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करणे हा सांघिक विषय असल्यामुळे यात कुठलेही राजकारण नाही असेही सामंत यांनी पुढे स्पष्ट केले.

यावेळी खासदार राऊत म्हणाले की, केंद्राच्या उडान योजनेत हा प्रकल्प असल्याने केवळ २ हजार ५०० रुपयांत प्रवाशांना मुबंईचा प्रवास करता येईल. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी आणि मुख्यमंत्री यांचा या विमानसेवेबाबत संपर्क सुरू आहे. केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळत आहे. पायाभूत सुविधांमध्ये वीज, रस्ता, पाणी, टेलिफोन आदिंची पूर्तता करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज झाल्यानंतरच विमान सेवा सुरू होईल. पाट ते पिंगुळी रस्त्याचे बजेट तयार करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी बैठकीत दिले आहेत. विमानतळाच्या प्रवेशद्वारातून खालच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे त्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पायाभूत सुविधा संपूर्णत: राज्य सरकारने पुरविल्या आहेत. ७ कोटी रुपये किमतीच्या दोन फायर ब्रिग्रेडच्या गाड्याही आल्या आहेत.

निमंत्रण पत्रिका आली कुठून?

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही, तरीही ३० जानेवारीपूर्वी विमानसेवा सुरू होणार आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेली निमंत्रण पत्रिका नेमकी कोणाकडून आली, याबाबत आपल्यालाच कल्पना नाही. तारीख अजून ठरायची आहे. आपण व खासदार या निमंत्रण पत्रिका आणि तारखेबद्दल अनभिज्ञ आहोत, असा दावाही पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

बसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी

100

अमरावती: एसटीची ट्रॅक्टरला धडक लागून बस पुलाखाली कोसळल्याची घटना नागपूर-वरूड मार्गावरील ढगा येथे घडली आहे. अपघातामध्ये जखमी होणाऱ्यांची संख्या अंदाजे २० च्या जवळपास असल्याची प्राथमिक महिती आहे.

नागपूरवरुन वरुडकडे येणाऱ्या कटोल बस आणि समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती ही बस थेट पुलाखाली कोसळली. या अपघातात जवळपास २० प्रवाशी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना दवाखान्यात हलविण्यात आले आहे. ही घटना संध्याकाळी ७. ३०च्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात येतंय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक

0

मुंबईः सोशल मीडियावरुन होणारे गुन्हे, ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणूक या गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आलं आहे. मुंबईतील एका ३२ वर्षीय तरुणानं ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून तब्बल २२ हजार लोकांना गंडा घातल्याची घटना घडली आहे.

बनावट शॉपिंग साइटच्या माध्यमातून या तरुणानं २२ हजार जणांकडून ७० लाख रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये सर्वाधिक समावेश हा महिलांचा होता. बनावट शॉपिंग साइटच्या माध्यमातून महिलांचे कपडे, खोटे दागिने, घरगुती वस्तूंची विक्री करण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याने आणखी किती जणांना फसवलं आहे याचा सखोल तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त असल्याच्या दिसून आले. यंदा ऑनलाइन बँकिंग फ्रॉडमध्ये खूप मोठी वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले….

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना ( ) प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये बाजार समित्या, व्यापाऱ्यांची नोंदणी आणि इतर समस्यांबाबतच्या त्यांच्या शंकांचे निरसन करण्यास आम्ही सहमती दर्शवली. शेतातील पेंढा आणि वीज पुरवठा कायद्यांवर चर्चा करण्याचंही सरकारने मान्य केलं होतं. पण शेतकरी संघटना फक्त कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर ( ) यांनी म्हटलं आहे.

सरकार कायद्यात सुधारणा करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. केंद्र सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांशी एकदा नव्हे तर ९ वेळा अनेक तास चर्चा केली. आम्ही शेतकरी संघटनांना कायद्याच्या कलमांबद्दल चर्चा करण्यास आणि आक्षेप नोंदवण्यास आग्रह केला. सरकार त्यावर विचार करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास तयार आहे, असं तोमर म्हणाले.

शेतकरी संघटना ठाम आहेत. कायदेच रद्द करावे यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. भारत सरकार कायद्याची अंमलबजावणी करते तेव्हा हे संपूर्ण देशासाठी असते. शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, कृषी क्षेत्रात काम करणारे जाणकार या कायद्यांशी सहमत आहेत, असं तोमर यांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने कायदे रद्द करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला काहीच अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी आडमुठेपणा सोडला पाहिजे. अपेक्षा आहे १९ जानेवारीला शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कायद्यांमधील प्रत्येक कलमांवर चर्चा करावी. कायदे रद्द करण्याशिवाय त्यांनी सरकारसमोर इतर पर्याय ठेवावे, असं आवाहन तोमर यांनी केलं.

सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत सुरूच राहणार. कायद्यांमध्ये ज्यांना सुधारणा हवी त्यांनी त्यातील कलमांबाबत कलमांबाबत चर्चा करावी, हा आमचा प्रश्न नाही. सरकारला हे तिन्ही कायदे रद्द करावेच लागतील, असं भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नवीन तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर १२ जानेवारीला स्थगिती दिली. यासह कोर्टाने ४ सदस्यांची समितीदेखील स्थापन केली. ही समिती दोन महिन्यांत कायद्यांबाबत आपला अहवाल सादर करेल. शेतकर्‍यांशी संवाद साधून कृषी कायद्याशी संबंधित त्यांच्या शिफारसी दोन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत. पण या समितीतून एक सदस्य बाहेर पडला आहे. आता समितीत फक्त तीन जण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts