Thursday, September 28, 2023
Home Blog Page 7230

मुंबईकरांना दिलासा! बीएमसीतून 'माहिती' मिळणार ऑनलाइन

2

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्याचा अर्ज देण्यासाठी किंवा लिखित उत्तरे घेण्यासाठी यापुढे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे घालण्याची गरज नाही. पालिका लवकरच ही सेवा ऑनलाइन सुरू करणार आहे. त्यामुळे घरबसल्या ही माहिती मिळू शकणार आहे. ऑनलाइन माहितीमुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एखाद्या विषयासंबंधी माहिती मिळवण्यासाठी संबंधित सरकारी कार्यालयात लेखी अर्ज करावा लागतो. त्यावरील उत्तरवजा माहिती वैयक्तिक किंवा टपालाद्वारे संबंधित अर्जदाराला पाठवली जाते. नुसार संबंधित माहिती एक महिन्यात देण्याचा कायदा असला, तरी अनेकदा दिलेल्या मुदतीत माहिती मिळतेच असे नाही. काही वेळा माहिती मिळण्यात तांत्रिक अडथळे, तर काही वेळा माहिती दडवण्याचे प्रकार घडत असतात. यामध्ये अर्जदाराला सरकारी कार्यालयातील चकरा आणि नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

नागरिकांना जलद वेळेत माहिती मिळण्यासाठी ही यंत्रणा ऑनलाइन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते करत आहेत. राज्य सरकार वगळता अद्याप अन्य सरकारी यंत्रणेत ऑनलाइन माहिती देण्यात येत नाही. मुंबई महपालिका ऑनलाइन सेवा कधी सुरू करणार, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी माहिती मागितली होती. याबाबत पालिकेने दिलेल्या उत्तरात ‘ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची पूर्तता माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पूर्ण केली असून, प्रमुख कर्मचारी अधिकारी विभागाने ही यंत्रणा कधी सुरू करायची याबाबत सूचित केलेले नाही,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिकेला तांत्रिक अडथळे
याबाबत पालिकेच्या कर्मचारी अधिकारी विभागाच्या प्रमुख संध्या व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काही तांत्रिक बाबींमुळे अद्याप ऑनलाइन सुरू करता आले नसल्याचे सांगितले. या यंत्रणेसाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर काही वाॅर्डात प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जाईल. त्यानंतर मुंबईतील सर्वच वाॅर्डात ही सेवा सुरू करण्यात येईल. लवकरच ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे व्हटकर यांनी स्पष्ट केले.

पालिकेचा वेळकाढूपणा

माहितीचा अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी पालिकेचा हा दावा म्हणजे मूळ मुद्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. पालिकेकडे स्कॅनर, प्रशिक्षित मनुष्यबळ सर्व काही आहे. ऑनलाइनमुळे पालिका कर्मचाऱ्यांचे काम वाढणार असल्याने, होता होईल तेवढा वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. ऑनलाइन झाल्यास महिला आणि ज्येष्ठ नागरिक, तसेच दूरवरून येणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी होणार आहे, असे यादव म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये'

0

अहमदनगर: ‘आपण सकारविरोधात उपोषण करतो म्हणून आपल्याशी सूडबुद्धीनं वागते की काय, असा संशय निर्माण होत आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये,’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक यांनी सरकारला पुन्हा एकदा सुनावलं आहे. उपोषणासाठी जागा दिली नाही, तर मागीलप्रमाणे जागा मिळेल तिथं उपोषण करीन असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. त्याची माहिती देण्यासाठी सरकारला आणि जागेची परवानगी मिळावी यासाठी संबंधित प्रशासनाला पत्रं पाठविली आहेत. त्यांचे उत्तर न मिळाल्यानं हजारे भडकले आहेत. काल त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहून आपण माझ्याशी सूड बुद्धीनं वागत आहात काय, असा प्रश्न केला आहे. हाच मुद्दा घेऊन हजारे यांनी आज पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे.

हजारे यांनी म्हटलं आहे, ’हे सरकार माझ्याशी सूडबुद्धीनं वागलं तरीही मी ठरविलं आहे की, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत उपोषण करायचंच. जिथं जागा मिळेल तिथं बसणार आहे. २०११ च्या आंदोलनाच्यावेळी तत्कालीन केंद्र सरकारनं जागा दिली नाही. म्हणून मी जेपी गार्डनमध्ये करायचं ठरवलं. तर सरकारनं मला सकाळी सहा वाजताच उचललं. दोनशे ते अडीचशे पोलिस पाठवून मला तिहार तुरुंगात नेऊन टाकलं. आंदोलनाला बसून दिलं नाही, सूड बुद्धीनं वागलं. मात्र, पुढं काय झाले? त्यावेळी मला तरुंगात टाकणं गरजचं होतं का? तरीही ते सूडबुद्धीनं वागले आणि शेवटी सरकार गेलं. म्हणून या सरकारनं यातून धडा घ्यावा.

क्लिक करा आणि वाचा-
हे खरे आहे की या सरकारचे देशभर वर्चस्व वाढलेलं आहे. त्यावेळच्या सरकारप्रमाणे होणे थोडंसं अवघड आहे. या सरकारलाही तेच वाटत असेल की आमचं कोण काय करू शकतं. मात्र, मतदार हा राजा आहे. त्यांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, एका फकीर माणसाचा अंत पाहू नये. शांतता आणि असंहिसेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी या महिन्याच्या अखेरीस आपण आंदोलन करणार आहोत,’ असंही हजारे यांनी ठामपणे सांगितलं.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोना: राज्यात गेल्या २४ तासांत वाढले ३,१४५ नवे रुग्ण, ४५ मृत्युमुखी

0

मुंबई: राज्यात आता करोनाची (Coronavirus) घसरणीला लागल्याचे, तसेच ही साथ आता नियंत्रणात येत असल्याचे दररोज प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीच्या आधारे स्पष्ट होत आहे. राज्यभरात गेल्या २४ तासांमध्ये ३ हजार १४५ इतक्या नव्या करोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच, गेल्या २४ तासांत एकूण ३ हजार ५०० रुग्ण बरे झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे नवे रुग्ण वाढण्याच्या तुलनेत आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मृत्यूची संख्या पाहता राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. (maharashtra registered 3145 new covid 19 cases and 45 deaths)

राज्यात आतापर्यंत एकूण ५० हजार ३३६ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण १८ लाख, ८१ हजार, ८८ रुग्ण बरे झाले. तर राज्यात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे एकूण ५२ हजार १५२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

अशी आहे पुण्यात करोनाची ताजी स्थिती!

शहराचा विचार केल्यास गेल्या २४ तासांमध्ये शहरात एकूण २६१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एकूण तीन रुग्ण करोनामुळे मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुण्यातील एकूण १ लाख ८२ हजार ७०९ जणांना करोनाची लागण झाली आहे.

या बरोबरच गेल्या २४ तासांत २४० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत पुण्यातील एकूण १ लाख ७५ हजार ३९४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी –

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मोदी की ठाकरे?; पाहा, जनता कोणाच्या कामगिरीने अधिक समाधानी!

0

मुंबई: केंद्र सरकारबरोबरच देशातील राज्यांमधील सरकारांची करोना संकटकाळात तसेच त्यांची एकंदरीत कामगिरी कशी होती याबाबत जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी () आणि राज्याचे मुख्यमंत्री (CM ) यांचे जनतेने केलेले मूल्यमापन पाहण्यासारखे आहे.

एबीपी न्यूज आणि सीव्होटरने ही पाहणी केली. या पाहणीनुसार राज्यातील सरासरी ५८ टक्के लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याच बरोबर राज्यातील सरासरी ४७ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. देशाचा विचार करायचा झाल्यास देशातील सरासरी ६६ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.

आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर किती समाधानी आहात असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. त्यावर ४६ टक्के लोकांनी आपण अतिशय समाधानी असल्याचे म्हटले आहे. तसेच ३२ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे, तर २० टक्के लोकांन असमाधानी असल्याचे सांगितले आहे. हे पाहता सरासरी ५८ टक्के लोक राज्यातील सरकारच्या कामगिरीवर खुश दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर ४८ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर २५ टक्के लोक समाधानी, तसेच २६ टक्के लोक असमाधानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पाहता सरासरी ४७ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

देशात उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी
या पाहणीच्या आधारे देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाचवा क्रमांक देण्यात आला आहे. या यादीमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या स्थानी आहेत. त्यांच्या कामगिरीवर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. या यादीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांना ७८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
तर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्या कामगिरीवर एकूण ६७ टक्के लोक समाधानी दिसले. उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५८ टक्के लोक समाधानी आहेत. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही मुख्यमंत्री नाही हे विशेष.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

बिबट्याचे कातडे, नखांची तस्करी; तिघांना भांडूपमधून अटक

0

मुंबई: बिबटे, अस्वल तसेच अन्य वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे कातडे, नखे यांची विक्री करणाऱ्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने भांडुप येथून अटक केली. त्यांच्याकडून आणि अस्वलाची आठ नखे हस्तगत करण्यात आली. हे कातडे आणि नखे त्यांनी राजस्थान येथून आणल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

भांडुप पंपिंग बस तांब्याजवळ काही जण वन्य प्राण्यांची कातडे आणि नखे विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. श्रीधनकर यांनी सहायक निरीक्षक महेंद्र दोरकर यांच्यासह पथकाला सोबत घेतले आणि या परिसरात सापळा रचला. संक्रातीच्या दिवशी या ठिकाणी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

क्लिक करा आणि वाचा-
झडतीमध्ये त्यांच्याकडून सुमारे १४ लाखांचे बिबट्याचे कातडे आणि अस्वलाची आठ नखे हस्तगत करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

उद्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात २८५ केंद्रांवर तयारी पूर्ण

0

मुंबई: राज्यात उद्या १६ जानेवारी पासून कोरोना सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २८५ केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना आज सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचे काम सुरू होते. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला किती वाजता, कोणत्या केंद्रावर, कुठल्या कंपनीची लस दिली जाणार याची माहिती देण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी ५ जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान दूरचित्रवाणीद्वारे माहिती घेतील. यादोन्ही ठिकाणी दूरचित्रवाणी संवादाची यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.

कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) व २ जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी योग्य नियोजन करा- डॉ. नितीन राऊत
कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीमेंतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्या शनिवार, दिनांक १६ जानेवारी, रोजी नागपूरमधील पाचपावली येथील महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सीन डोस देऊन आरंभ होणार आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी उपस्थित रहावे अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
नागपूरमधील पाचपावली येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीमेचा आरंभ होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Video: पंतने अपील केली, अंपायर तर सोडाच भारतीय खेळाडूंनी भाव दिला नाही

0

ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ५ बाद २७४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने शतकी खेळी केली. तर भारताकडून पदार्पण करणाऱ्या टी नटराजन याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

वाचा-

टीम पेनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडे अनुभवी युवा गोलंदाजांची कमतरता असतान देखील त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला १७ धावांवर माघारी पाठवले. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरची तर शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसची विकेट घेतली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने स्टीव्ह स्मिथला माघारी पाठवले. टी नटराजनने पदार्पणातच मॅथ्यू वेड आणि लाबुशेनची विकेट घेत शानदार कामगिरी केली.

वाचा-

पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटके शिल्लक असताना टी नटराजनच्या एक चेंडू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो थेट ()च्या हातात गेला. त्यावर पंतने जोरदार अपील केली. भारतीय संघातील अन्य कोणत्याही खेळाडूने अपील केली नाही. चेंडू पेनच्या बॅटला स्पर्श करून आला असे पंतला वाटले. पण गोलंदाज नटराजन आणि स्लिपमध्ये उभे असलेले कर्णधार अजिंक्य रहाणे आणि उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना कोणालाच तसे वाटले नाही.

वाचा-

पंतने कर्णधाराला बाद असल्याचे पटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे बोलणे रहाणेने हसण्यावारी नेले. रोहित शर्मा देखील त्याने केलेल्या अपीलवर हसू लागला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आयसीसीने देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला.

वाचा-

पाहा व्हिडिओ-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांना आवरा…चौथ्या सामन्यातही सिराज आणि सुंदरला शिवीगाळ

0

ब्रिस्बेन, : ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांना आता आवरण्याची गरज आहे. कारण सिडनीनंतर पुन्हा एकदा ब्रिस्बेनमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शिवीगाळ करण्यात आली आहे. त्याचबरोबर या सामन्यात पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरबाबतही स्टेडियममधील प्रेक्षकांनी यावेळी अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या प्रेक्षकांवर काय कारवाई केली जाते, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले आहे.

सिराजने चौथ्या कसोटी सामन्यातही भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला आपले शिकार केले. त्यानंतर स्टेडियममधील ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी सिराजला डिवचायला सुरुवात केली. ब्रिस्बेनच्या क्रिकेट मैदानात सेक्शन २१५ आणि २१६ येथील प्रेक्षक सिराजबाबत अपशब्द वापरत होते. त्याचबरोबर सिराजला यावेळी शिवीगाळ आणि वर्णद्वेषी टीकाही सहन करावी लागली सिराजला काही चाहत्यांनी ‘ग्रब’ असेही म्हटले, याचा अर्थ तु अजून बच्चा आहे, असे त्यांना म्हणायचे होते. त्याचबरोबर के सेरा-सेरा या गाण्याऐवजी प्रेक्षक के सिराज-सिराज… असेही यावेळी म्हणत होते.

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सुंदरलाही यावेळी चाहत्यांनी अपशब्द वापरल्याचे पाहाला मिळाले. सुंदरने यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथला बाद केले. त्यानंत सुंदर जेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा सुंदरबाबत प्रेक्षकांनी शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत भारतीय संघाने याबाबतची अधिकृत तक्रार केली नसल्याचे समजते आहे. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या चाहत्यांना आता काय शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातही सिराज आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना शिविगाळ करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात वर्णद्वेषी टीकाही करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद करत असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने दिले आहे. पण अजूनपर्यंत या व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर आता ब्रिस्बेनमधील हे प्रकरण आता समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रेक्षकांवर कधी कारवाई करणार, असा सवाल चाहते विचारु लागले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

२७ जानेवारीपासून सुरु होणार पाचवी ते आठवीच्या शाळा

0

Update: महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता २७ जानेवारीपासून सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा शाळा उघडण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. करोनासंदर्भातली खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणून, सर्व नियम पाळूनच शाळा सुरू करा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

गायकवाड म्हणाल्या, ‘आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य करुन येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत असताना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती पूर्वतयारी करणे, स्थानिक प्रशासनाने तयारीची जबाबदारी घेणे, पालकांची संमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विविध SOP येत्या काळात आम्ही निर्गमित करू.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भिवंडी: महिलेवर गोळीबार प्रकरण; मध्य प्रदेशमधून दोघांना अटक

0

ठाणे: भिवंडीमध्ये घरात घुसून जयश्री देडे या महिलेवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेने मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातून मुख्य आरोपी सुरेंद्र भाटी याच्यासह मानसिंग उर्फ बंटी चौहान या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महिलेच्या पतीशी सुरेंद्रची ओळख असून आर्थिक चणचणीमुळे त्याने साथीदाराला सोबत घेऊन महिलेला ब्लॅकमेल करत ५० हजार उकळण्यासाठी हा प्रकार केल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. दोघाही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल.

भिवंडीतील काल्हेर भागात राहणाऱ्या जयश्री देडे यांच्यावर १२ जानेवारी रोजी सकाळी घरातच गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. दोघेजण घरात आल्यानंतर वाद झाला. त्यानंतर आरोपींनी जयश्री यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी डोक्यात लागल्याने त्या गंभीर झाल्या असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता. तपासामध्ये आरोपी मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक मध्यप्रदेशला रवाना झाले. धार शहरातून सुरेंद्र भाटी (२४) आणि मानसिंग चौहाण (२०) यांना ताब्यात घेत भिवंडीमध्ये आणले. चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मुख्य आरोपी सुरेंद्र भिवंडीमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये काम करत असताना जयश्री यांचे पती शिवराम देडे यांच्याशी त्याची ओळख झाली. सुरेंद्रला पैशाची गरज होती. त्यामुळे मानसिंग सोबत संगनमत करत या महिलेला ब्लॅकमेल करत ५० हजार रुपये उकळण्यासाठी दोघेही महिलेच्या घरी गेले आणि पैशाची मागणी केली. महिलेने विरोध करत आरडाओरडा केल्यानंतर घराबाहेर असलेला तिचा मुलगा आणि अन्य एकजण यांनी घरी धाव घेतली असता सुरेंद्रने महिलेच्या डोक्यामध्ये गोळी झाडली. यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर मानसिंग याने महिलेसह इतरांना मारहाण करत दोघेही आरोपी पळून गेले, अशी माहिती चौकशीनंतर समोर आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

सुरेंद्र याच्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींवर आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts