Monday, December 11, 2023
Home Blog Page 7233

रोहित शर्माने केली टीकाकारांची बोलती बंद, पाहा व्हिडिओ

0

ब्रिस्बेन, : रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला खरा, पण त्यानंतर रोहितवर काही जणांनी टीका केली होती. रोहित अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे काही टीकाकारांनी म्हटले होते. पण रोहितने या टीकाकारांची बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितचा एक भन्नाट व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.

रोहित शर्मा पूर्णपणे फिट नाही आणि त्यामुळे तो चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसत नाही, अशी टीका रोहितवर करण्यात आली होती. पण आजच्या पाचव्या सामन्यात मात्र रोहितने या टीकाकारांची तोंडं बंद केली. रोहितने आजच्या सामन्यात एक अफलातून झेल पकडला आणि आपल्या कामगिरीतूनच रोहितने टीकाकारांना उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वेगवान मारा करत होता. त्यावेळी सिराजच्या पहिल्याच षटकातील अखेरचा चेंडू वॉर्नर खेळत होता. सिराजचा चेंडू खेळत असताना वार्नर चकला आणि त्याचा झेल स्लीपमध्ये उडाल्याचे पाहायला मिळाले. हा चेंडू एवढा वेगवान होता की, त्याचे झेलमध्ये रुपांतर करणे सोपे नव्हते. पण रोहितने यावेळी हवेत झेप घेतली आणि हा झेल पकडत भारताला पहिले यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठवला.

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने डेव्हीड वॉर्नरची विकेट घेत यजमानांना धक्का दिला. त्यानंतर आठव्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला ५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी १७ धावांवर बाद करत भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण त्यानंतर मार्नस लाबुशेनने शतक झळकावले आणि संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बिग 'ऑफर'! १४९९ रुपयांचा इयरबड्स खरेदी करा फक्त १ रुपयात

0

नवी दिल्लीः बजेट स्मार्टफोन बनवणारी कंपनी Infinix ने भारतात ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. ज्यात लोकांना प्रसिद्ध स्मार्टफोन सोबत ईयरबड्स Snokor iRocker TWS केवळ एक रुपयात खरेदी करता येवू शकते. दरम्यान केवळ एका रुपयात आपली मनपसंत ईयरबड्स खरेदी करता येवू शकते. परंतु, यासाठी तुम्हाला या ऑफरची सर्व माहिती जाणून घ्यायला हवी.

वाचाः

मर्यादित वेळेसाठी ऑफर
१४ ते १६ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या Infinix Days sale मध्ये Snokor iRocker TWS ईयरबड्स केवळ एक रुपयांत खरेदी करता येवू शकते. या सेलमध्ये Infinix Hot 9, आणि स्मार्टफोन पैकी एक स्मार्टफोन जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवरून खऱेदी केला तर तुम्हाला फोनच्या डिलिव्हरीनंतर फ्लिपकार्टवर Infinix Snokor iRocker ची किंमत केवळ एक रुपये दिसेल. हे केवळ त्याच लोकांना दिसेल ज्यांनी १४ ते १६ जानेवारी दरम्यान इनफिनिक्सच्या या तीन फोनपैकी एक फोन खरेदी केला आहे. सध्या भारतात Snokor iRocker ची किंमत १४९९ रुपये आहे.

वाचाः

या स्मार्टफोन्सची किंमत
भारतात इनिफिनिक्स बजेट स्मार्टफोन ची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. Infinix Hot 9 Pro ची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. तर Infinix Hot 9 मध्ये ६.६ इंचाचा पंच होल डिस्प्ले दिला आहे. Infinix Note 7 मध्ये ६.९५ इंचाचा HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. इनफिनिक्स नोट 7 मध्ये octa-core MediaTek Helio G70 SoC प्रोसेसर दिला आहे. जो 4GB RAM सोबत 64GB स्टोरेज ऑप्शन मध्ये येतो. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. Infinix Note 7 मध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'सीरम'च्या पुनावाला यांचं 'हे' बॉलिवूड कनेक्शन माहित्येय का?

0

मुंबई: जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ सध्या चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी ४० वाढदिवस साजरा केला. अदर यांनी पत्नी आणि कुटुंबियांसोबत बर्थडे सेलिब्रेट केला. नताशानं या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. नताशा पूनावाला हे बॉलिवूडमधील एक चर्चेत असणार ग्लॅमरस वलय असलेलं नाव.

अभिनेत्री करिना कपूर, मलायका आणि अमृता अरोरा यांच्यासोबत नताशा पूनावाला यांचे चांगले संबंध आहे. या सर्वजणी अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. शिवाय, नताशा स्वत: फॅशनिस्ता असल्याने बॉलिवूड जगतात तिच्या अनेक ओळखी आहेत. तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हारल होत असतात.

रणबीरची बेस्टफ्रेंडकरिनामुळं आणि नताशा यांची ओळख झाली असून आता रणबीर-नताशा बेस्ट फ्रेन्ड्स बनले आहेत. अनेकदा रणबीर आणि नताशा बॉलिवूडच्या कलाकारांनी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या पार्टींमध्ये एकत्र जाताना दिसतात. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीची चांगलीच चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

AUS vs IND पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ; लाबुशेन, नटराजन यांची शानदार कामगिरी

0

ब्रिस्बेन: भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठवला.

वाचा-

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने डेव्हीड वॉर्नरची विकेट घेत यजमानांना धक्का दिला. त्यानंतर आठव्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला ५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी १७ धावांवर बाद करत भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली.

वाचा-

वॉर्नर-हॅरीस बाद झाल्यानंतर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी भारताकडून पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने फोडली. त्याने स्मिथला ३६ धावांवर बाद केले. स्मिथनंतर आलेल्या मॅथ्यू वेडने लाबुशेनसह चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने वेडला बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान लाबुशेनने कसोटीमधील पाचवे शतक पूर्ण केले. वेडला बाद केल्यानंतर नटराजनने लाबुशेनची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला.

वाचा-

दिवस संपण्याआधी भारताला नव्या चेंडूवर विकेट घेता आली नाही. खेळ संपला तेव्हा कॅमरून ग्रीन २८ तर कर्णधार टीम पेन ३८ धावांवर नाबाद होते. भारताकडून नटराजनने सर्वाधिक दोन तर सिराज, ठाकूर आणि सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीनंतर सिग्नल, टेलिग्रामचे युजर वाढले

0

‌वृत्तसंस्था, ओकलँड

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी केलेल्या प्रायव्हसी बदलांमुळे अनेक वापरकर्ते आता इतर पर्यायांकडे वळू लागल्याचे दिसून येत आहेत. व्हॉट्सअॅपसारखेच एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप असणारी ‘सिग्नल’आणि ‘टेलिग्राम’ ही अॅप मात्र, अॅपल आणि गुगलच्या अॅप स्टोरवरून मोठ्याप्रणात डाऊनलोड झाल्याचे दिसून येत आहे. याउलट फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपच्या वाढीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

वाचाः

मोबाइल अ‍ॅप ‘अॅनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवर’ने बुधवारी सांगितले की, ५ ते १२ जानेवारी या आठवडाभरात ‘सिग्नल’ने अॅपल आणि गुगलवर १७.८ दशलक्ष अॅप डाउनलोडची नोंद केली. गेल्या आठवड्यात याची केवळ २ लाख ८५ हजारांनी ६१ पट वाढ झाली. टेलिग्राम मेसेजिंग अॅप हे जगभरातील वापरकर्त्यांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय असून, ५ ते १२ जानेवारी या कालावधीत या अॅपने १५.७ दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा गाठला आहे. मागील आठवड्यातील ७.६ दशलक्ष डाऊनलोड्सच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. याउलट व्हॉट्सअ‍ॅपचे डाऊनलोड या काळात घटले असून, ते १०.६ दशलक्ष इतके राहिले आहे. त्या आधीच्या आठवड्यात मात्र ते १२.७ दशलक्ष होते.

वाचाः

आशियात टेलिग्राम ५० कोटींच्या पुढे

व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरण्याच्या पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांनी आपला मोर्चा टेलिग्रामकडे वळवला आहे. यामुळे आशियामध्ये टेलिग्रामच्या सब्सक्राइबरची संख्या ५० कोटींच्या पुढे गेली आहे. ‘गेल्या ७२ तासांमध्ये आपले अडीच कोटी वापरकर्ते वाढले आहेत,’अशी माहिती टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

लता मंगेशकर यांच्या विरोधात बोलणाऱ्याला अदनान सामीचं सडेतोड उत्तर

0

मुंबई- यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि नूरजहां यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, हा फोटो किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. त्याच्या या फोटोवर एका यूझरने यांच्या विरोधात भाष्य केलं. पण हीच गोष्ट अदनानला आवडली नाही त्याने यूझरला प्रत्युत्तर दिलं.

अदनानने लिहिले की, गप्प बसून मुर्ख दिसणं केव्हाही चांगलं
अदनान सामीच्या पोस्टवर यूझरने लिहिले की, ‘लता मंगेशकरांचा आवाज चांगला आहे असा विचार करण्यासाठी भारतीयांचं ब्रेन वॉश करण्यात आलं आहे.’ यावर अदनान याने उत्तर देताना लिहिले की, ‘माकडाला गुळाची चव काय.. आपल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा गप्प बसून मुर्ख दिसणं केव्हाही चांगलं.’

विवेक अग्निहोत्री यांनीही केलं अदनानचं समर्थन

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही लता मंगेशकर यांचं समर्थन केलं आहे. त्यांनी यासंबंधी अनेक ट्वीट केली. विवेक यांनी लिहिले की, ‘मी देवाला प्रार्थना करतो की लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे पुढच्या जन्मी आमच्यासारखे मनुष्य होवोत ज्यांना सुंदरता नक्की काय असते ते कळेल आणि देवत्व नक्की कसं असेल ते त्यांना कळेल. दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, माझा सरस्वती आणि दिव्यतेवर विश्वास आहे. याचं एक मुख्य कारण म्हणजे लता मंगेशकर. माझा सैतानावरही विश्वास आहे, याचं कारण म्हणजे लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे लोक.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

IND vs AUS : अजिंक्य रहाणेची ही मोठी चुक भारताला पडली सर्वात महाग, पाहा नेमकं काय घडलं…

0

ब्रिस्बेन, : चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेकडून एक मोठी चुक घडली. अजिंक्यची ही चुक भारताला पहिल्या दिवशी सर्वात जास्त महागात पडल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नश लाबुशेनने शतक झळकावले. पण यावेळी लाबुशेनला लवकर बाद करण्याची संधी अजिंक्यकडे चालून आली होती. पण अजिंक्यकडून यावेळी एक मोठी चुक घडली आणि याचा फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. त्यावेळी लाबुशेन हा ३७ धावांवर होता. त्यावेळी सैनीच्या गोलंदाजीवर फटका मारताना लाबुशेनचा अंदाच चुकला आणि अजिंक्यकडे एक सोपा झेल आला. पण अजिंक्यला यावेळी हा झेल टिपता आला नाही. त्यामुळे लाबुशेनला पहिले जीवदान मिळाले. त्यानंतर लाबुशेनने शतक झळकावत या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलल्याचे पाहायला मिळाले.

लाबुशेनला यावेळी दोन जीवदानं मिळाली. अजिंक्यने पहिल्यांदा ३७ धावांवर असताना त्याला झेल सोडला. त्यानंतर लाबुशेन ४८ धावांवर असताना त्याचा झेल भारताच्या चेतेश्वर पुजाराने स्लीपमध्ये असताना सोडला. या दोन जीवदानानंतर लाबुशेनने चांगली फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. जर लाबुशेनला या दोनपैकी एकदा तरी भारतीय संघाने बाद केले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ पिछाडीवर ढकलला गेला असता, पण ते यावेळी पाहायला मिळाले नाही. त्याचबरोबर भारतीय संघाला पहिल्या दिवसावर आपचा वरचष्मा राखता आला नाही. त्यामुळे आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडतं, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

लाबुशेनने या सामन्यात १०८ धावा केल्या. टी. नटराजनने यावेळी लाबुशेनला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत लाबुशेनचे हे पाचवे शतक ठरले आहे. नटराजनने यावेळी लाबुशेनबरोबर मॅथ्यू वेडलाही बाद करत भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Reliance Jio च्या 'या' प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉल आणि डेटा

0

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे असे अनेक रिचार्ज प्लान आहेत. ज्यात एक वर्षाची वेधता मिळते. परंतु, जिओकडे असेही रिचार्ज प्लान आहेत ज्याची वैधता ३३६ दिवस आहे. जिओ ग्राहकांना कंपनी २५९९ रुपये, २३९९ रुपये आणि ४९९९ रुपयांशिवाय १२९९ रुपयांचा प्लान ऑफर करते. या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता मिळते. हा प्लान कंपनीचा ऑदर्स कॅटेगरीत लिस्ट करण्यात आला आहे. जाणून घ्या प्लानसंबंधी सर्वकाही.

वाचाः

१२९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान
जिओच्या १२९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. या प्रीपेड पॅकमध्ये एकूण २४जीबी डेटा ऑफर केला जातो. कंपनीकडून या प्लानमध्ये हाय स्पीड २४ जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते.

वाचाः

IUC चार्ज संपल्यानंतर जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. जियोच्या या रिचार्ज पॅकमध्ये एकूण ३६०० एसएमएस मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जिओच्या या कॅटेगरीत ऑदर्स कॅटेगरीत दोन आणखी स्वस्त प्लान ३२९ रुपये १२८ रुपयांचे प्लान मिळते. या दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल ऑफर दिली जाते. याची वैधता ८४ दिवस आणि २८ दिवस आहे. ४९९९ रुपयांचा लाँग टर्म प्रीपेड प्लानमध्ये ३५० जीबी हाय स्पीड डेटा ग्राहकांना मिळतो. याची वैधता ३६५ दिवस आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

चीनमध्ये करोनाचे पुन्हा थैमान? आठ महिन्यानंतर पहिला मृत्यू

0

बीजिंग: चीनमध्ये पुन्हा एकदा फैलावत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास एक हजारांहून अधिक करोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या उत्तर भागात बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी चीनमध्ये आठ महिन्यानंतर करोनाच्या संसर्गामुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी सांगितले की, करोनाबाधित एक हजारजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील २६ जणांची प्रकृती गंभीर आहे. मागील २४ तासांत एकूण १४४ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. बीजिंगजवळील हेबेई प्रांतात सर्वाधिक संसर्ग फैलावत असल्याचे समोर आले आहे. हेबेईमध्ये ९० जणांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तर, हेलोंगजिआंग प्रांतात ४८ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

वाचा:

देशाबाहेरून आलेल्या नऊजणांना संसर्गाची लागण झाली आहे. त्याशिवाय, क्वारंटाइन धोरणाचे पालन करणे, प्रवासासाठी असलेले निर्बंध आणि इतर उपाययोजना आखूनही दक्षिणेतील गुआंक्सी क्षेत्र आणि उत्तर प्रांतातील शांक्सीमधील स्थानिक स्तरावर संसर्गाची काही प्रकरणे आढळली आहेत.

वाचा:

चीनमध्ये करोनाची आतापर्यंत ८७ हजार ९८८ प्रकरणे आढळली आहेत. त्याशिवाय ४६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक करोनाच्या उगम स्रोताची माहिती घेण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले आहे.

वाचा:

चीनच्या हुबेई प्रातांची राजधानी वुहान शहरात पहिल्यांदा डिसेंबर २०१९ मध्ये करोनाचा संसर्ग आढळला होता. त्यानंतर आणि संपूर्ण जगात करोनाचा फैलाव झाला.

हेबेईतून बीजिंगला जाण्यास बंदी

चीनमध्ये करोनाची लक्षणे न दिसलेल्या बाधितांची संख्या मोजली जात नाही. हेबेई प्रातांत करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे राजधानी बीजिंगमध्ये करोनाचा संसर्ग फैलावू नये याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच आता हेबेई प्रांतातून बीजिंगमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. हेबेईतून बीजिंगमध्ये जात असलेल्या नागरिकांना आपण कामानिमित्त बीजिंगला जात असल्याचा पुरावा अधिकाऱ्यांना द्यावा लागत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पीएमसी बँक घोटाळा: संजय राऊतांच्या पत्नीने 'ते' ५५ लाख केले परत

0

मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार यांच्या पत्नी यांनी परत केलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं () चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पाऊल उचललं आहे.

ईडीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार, वर्षा राऊत यांनी एका नातलगाच्या माध्यमातून ईडीला काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले कर्ज परत केल्याचीही कागदपत्रे आहेत. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी हे पैसे परत केले आहेत. वर्षा राऊत या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

वाचा:

पीएमसी बँक व एचडीआयएल कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीच्या पथकानं नोव्हेंबर महिन्यात वर्षा राऊत यांना चार वेळा समन्स बजावले होते. मात्र, त्या ईडीपुढं हजर झाल्या नाहीत. २९ डिसेंबर रोजी त्यांनी ईडीकडून वेळ मागितली होती. त्यानुसार त्या ५ जानेवारी रोजी हजर राहणार होत्या. मात्र, एक दिवस आधीच त्या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. आता वर्षा राऊत यांनी पाठवलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी सुरू असून आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

वाचा:

पीएमसी बँकेला ठगवून एचडीआयलनं मिळवलेले ९५ कोटी प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत हा एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यानं ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील ५५ लाख पुढं वर्षा राऊत यांना देण्यात आले होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts