Thursday, September 28, 2023
Home Blog Page 7234

'एका मंत्र्यानं 'एक तरफ घरवाली, एक तरफ बाहरवाली' असा संदेश देणं चुकीचं'

0

अहमदनगर: ‘राज्यातील मंत्री यांनी जी सोशल मीडियावर माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती. जनतेमध्ये लोकप्रिय असणारा नेता ‘एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली’ असा संदेश देतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ अशी टीका करतानाच, भूमाता ब्रिगेडच्या यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करण्याची मागणी केली आहे. (Trupti Desai of demands Dhananjay Munde’s Resignation)

वाचा:

‘धनंजय मुंडे हे राज्यातील जबाबदार नेते आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यावर जेव्हा एका महिलेने आरोप केले व त्यानंतर त्यांनी जी सोशल मीडियावर माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती. जनतेमध्ये लोकप्रिय असणारा नेता “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” अशा पद्धतीचा संदेश देतो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे,’ अशी मागणी देसाई यांनी केली आहे. तसेच, रेणू शर्मा या महिलेने जी तक्रार केली, त्या आधारे गुन्हा दाखल व्हावा. संबंधित महिलेने कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

वाचा:

‘ हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीही तातडीने मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. महिला सबलीकरण म्हणून राष्ट्रवादी पक्ष काम करतो. त्यामुळे व सुप्रिया सुळे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ऑस्ट्रेलियाला १९८५ नंतर ब्रिस्बेनवर प्रथमच बसला झटका; सिराजने केली कमाल

0

ब्रिस्बेन: 4th test ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघ अनुभवहीन गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या गैरहजेरीत शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वाचा-

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघातील चार सामन्यांची मालिका १-१ अशा स्थितीत आहे. त्यामुळेच ब्रिस्बेन येथे सुरू असलेली कसोटी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

ब्रिस्बेन मैदानावर आजपर्यंत कोणत्याही आशिया संघाला कसोटी मालिका जिंकता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये भारताचा जलद गोलंदाज ( ) ने धमाकेदार सुरूवात करून दिली. सिराज भारताच्या जलद गोलंदाजांचे नेतृत्व करत आहे. त्याने पहिल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. रोहित शर्माने त्याचा शानदार कॅच घेतला.

वाचा-

सिडनी कसोटीनंतर पुन्हा एकदा सिरजाने वॉर्नरची विकेट घेतली. सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेऊन कमाल केली. ब्रिस्बेन मैदानावर १९८५ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमवावी लागली. याआधी न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली यांनी एड्यू हेलडिजची विकेट घेत अशी कामगिरी केली होती. न्यूझीलंड संघानंतर भारतीय संघ हा पहिला असा संघ ठरला आहे ज्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या ओव्हरमध्ये झटका दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सायबर गुन्हेगारीः गृह मंत्रालयाकडून बँकिंग यूजर्संना 'हा' अलर्ट

0

नवी दिल्लीः भारतीय युजर्संना ऑनलाइन बँकिंगची बऱ्यापैकी सवय झाल्याचे दिसत आहे. करोना काळात याचा वापर वाढला आहे. परंतु, बँकिंग फ्रॉडच्या घटनेत सुद्धा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिजिटल युग सुरू झाले असले तरी त्याचा धोका सुद्धा कैक पटीने वाढल्याचे चित्र देशात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे. रोखण्यासाठी लोकांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारी करण्यासाठी गुन्हेगारी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने एक अलर्ट जारी करून लोकांना महत्त्वाची सूचना केली आहे.

वाचाः

गेल्या काही वर्षापासून बँकिंग गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लोकांना जागृत करण्यासाठी सायबर गुन्हेगारांसंदर्भात माहिती देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, अद्याप गुन्हेगारी बंद झालेली नाही. सायबर क्रिमनल वेगवेगळे फंडे अवलंबत आहेत. यातील एक नवीन ब्रँड पद्धत म्हणजेच सायबर क्रिमिनल्स लोकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने एक नवीन माहिती शेयर केली आहे.

वाचाः

सरकारचे एक ट्विटर हँडल ज्याचे वनाव सायबर दोस्त आहे. याद्वारे लोकांना सूचित करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक नवीन सूचना केली आहे. कोणीही कोणतीही चूक करू नये. तसेच मेसेजमध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नये, असे गृह मंत्रालयाने सूचित केले आहे.

या अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्स तुमची सर्व माहिती चोरू शकतात. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी हजारदा विचार करावा, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. सायबर दोस्त ने एक ट्विट केले असून त्यात ही माहिती दिली आहे. जर तुम्हाला कोणताही मेसेज मिळाला तर त्यावर लगेच क्लिक करू नका.

वाचाः

हॅकर्स युजर्संना अनेक पद्धतीचे मेसेज पाठवत असतात. यात युजर्संना वॉर्निंग देऊन भटकावण्यचा प्रयत्न करीत असतात. या मेसेजेसमध्ये लिंक दिलेली असते. ज्यवर चुकूनही क्लिक केले तर तुमची माहिती हॅकर्स पर्यंत पोहोचत असते. त्यामुळे लक्षात ठेवावे की, कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज कुणी पाठवला, कशासाठी पाठवला, त्याचा उद्देश काय आहे, याची सर्व पडताळणी केल्यानंतर ती लिंक ओपन करावी, असे गृह मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'…तर मोदींना रोज राजीनामा द्यावा लागेल'

0

मुंबई: ‘राजीनामा मागणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे. पण नुसते आरोप झाले म्हणून राजीनामा द्यायचा असं झालं तर पंतप्रधान यांना रोज राजीनामा द्यावा लागेल,’ असा टोला शिवसेनेचे खासदार यांनी आज हाणला. ( taunts opposition for demanding Resignation)

सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटकेनंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच आज संजय राऊत यांनी सहकुटुंब ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्या अनुषंगानं ही भेट झाली असावी, अशी चर्चा होती. मात्र, राऊत यांनी मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतल्याचं समोर येत आहे.

वाचा:

शरद पवारांशी झालेल्या भेटीनंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेबाबत विचारलं गेलं. त्यावेळी त्यांनी थेट मोदींकडे मोर्चा वळवला. ‘आरोप झाले म्हणून राजीनामा द्यायचा तर मोदींना रोज राजीनामा द्यावा लागेल. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मोदींवर अनेक आरोप होत आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

‘विरोधी पक्ष आरोप करत असतो. पण प्रत्येक आरोपाचं उत्तर दिलंच पाहिजे असं घटनेत लिहिलेलं नाही. विरोधकांना कितीही आरोप करू द्या. महाविकास आघाडी भक्कम आहे. या आरोपांमुळं सरकारचा एकही खिळा ढिला होणार नाही,’ असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ट्र्म्प यांचा चीनला आणखी एक दणका; 'या' कंपनीवर घातली बंदी

0

वॉशिंग्टन: आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अखेरच्या दिवसातही डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला जोरदार झटका दिला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने चीन सरकारची तेल कंपनी CNOOC ला काळ्या यादीत टाकले आहे. इतकंच नव्हे तर या चिनी कंपनीला शेअर बाजारातील स्टॉक सूचकांकातूनन वगळले आहे. आता ही कंपनी कोणत्याही प्रकारे अमेरिकेत व्यापार करू शकत नाही.

अमेरिकेने CNOOC वर केले हे आरोप

अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सांगितले की, दक्षिण चीन समुद्रात चीनकडून बेजबाबदार आणि उकसवणारी कृत्ये सुरू आहेत. चीनकडून या भागाचे संपूर्णपणे सैनिकीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. CNOOC ही चिनी सैन्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बंदीमुळे इतर देशांची संवेदनशील बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठीच्या अभियानाला मोठा झटका लागणार आहे.

वाचा:

याआधीही चिनी कंपन्यांवर बंदी

डिसेंबर महिन्यातच अमेरिकेने चीनची सर्वात मोठी चिप निर्मिती करणारी सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशन आणि ड्रोन निर्मिती करणारी एसझेड डीजेआय टेक्नोलॉजीसह जवळपास १२ चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. या कंपन्या अमेरिकेत व्यापार करू शकत नाही. त्याशिवाय काही कंपन्या आपली संपत्ती आणि बँकेतील रक्कमेचाही वापर करू शकत नाही.

वाचा:

वाचा:

चीनला धक्का देण्याची ट्रम्प यांची इच्छा

मागील महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये चिनी लष्करासोबत व्यापार करणाऱ्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ट्रम्प यांनी मागील वर्षभरात आधी व्यापार करार आणि त्यानंतर करोनाच्या मुद्यावरून सातत्याने लक्ष्य केले. चीनविरोधात आर्थिक आणि राजकीय आघाडी उघडली होती. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने सांगितले की, चीन आमच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सैन्याला अत्याधुनिक करत आहे. चीन अमेरिकाविरोधी पावले उचलत असताना आम्ही शांत बसू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:
चिनी कंपन्या राष्ट्रीय धोका

अमेरिकेने बंदी घातलेल्या चिनी कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षितेसाठी धोका असल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसात चीनविरोधात मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे चीन आणि अमेरिकेत तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच तणाव सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सराफा बाजार ; घसरण सुरूच, हा आहे आजचा सोने-चांदीचा भाव

0

मुंबई : सोने आणि चांदीमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव सध्या ४९००० रुपयांच्या आसपास आहे. त्यात सध्या ४६ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीवर देखील दबाव असून चांदीच्या दरात ५२० रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली होती. अमेरिकेतील हिंसाचार निवळला आहे. तर काही देशांमध्ये करोना लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक कमी केली. यामुळे दोन्ही धातूंचे भाव गडगडले होते. सध्या सराफा बाजारात सोने ४९००० ते ५०००० हजारांच्या दरम्यान आहे. त्यावर आयात शुल्क, घडणावळ आणि जीएसटी कर आकारला जातो.

आज सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४९०७७ रुपयांपर्यंत खाली आला होता. सध्या तो ४९१६० रुपये आहे. चांदीचा एक किलोचा भाव ६५९७८ रुपये झाला होता. सध्या तो ६६०९० रुपये असून त्यात ५९३ रुपयांची घसरण झाली आहे. good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४२० रुपये झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४२० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२७५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६५९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०८७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१११० रुपये आहे.

गुरुवारी जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा दर ०.७ टक्क्यांनी कमी झाला आणि १८४३.४० डॉलर प्रती औंसवर स्थिरावला. अतिरिक्त प्रोत्साहन मदत मिळवण्यावर बेट्स लागल्याने अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढले. त्यामुळे अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढले. तथापि, अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याची मागणी इतर चलनधारकांमध्ये वाढली.

राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाकडून अमेरिकी अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्याकरिता महत्त्वपूर्ण मदतीची अपेक्षा केली जात आहे. याउलट, अतिरिक्त मदतीमुळे चलनवाढीचे संकट येऊन मौल्यवान धातूच्या किंमतीत घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. बहुतांश गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले. चलन दरवाढ आणि महागाईच्या काळात सोने हेच प्रभावी ठरू शकते, असे मानले जाते. यासोबतच, बिकट जागतिक आर्थिक स्थिती आणि नव्या विषाणूच्या स्ट्रेनमुळे वाढलेली चिंता यामुळे सोन्याची मागणी वाढली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

BSNL ३६५ रुपयात देतेय एक वर्ष अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज २ जीबी डेटा

0

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL कडे अनेक स्वस्त प्लान उपलब्ध आहेत. बीएसएनएलच्या ३६५ रुपयांच्या प्रीपेड मोबाइल प्लानमध्ये ३६५ दिवस म्हणजेच वर्षभराची वैधते सोबत येते. परंतु, या सोबत ऑफर मध्ये येणारी मोफत सेवा केवळ ६० दिवसांसाठी वैध असतात. प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांशी तुलना केल्यास ३६५ रुपयांत १ वर्षाची वैधता असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे. रिलायन्स जिओ १२९९ रुपये, एअरटेल १४९८ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत वार्षिक प्लान ऑफर केला जातो. बीएसएनएलच्या ३६५ रुपयांच्या प्लानसंबंधी जाणून घ्या.

वाचाः

३६५ रुपयांचा वार्षिक प्लान
बीएसएनएलच्या ३६५ रुपयांचा वार्षीक प्रीपेड प्लान देशभरात सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे. या प्लानमध्ये प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर दिली जाते. यासोबतच रोज २ जीबी डेटा मिळतो. २ जीबी डेटाची संपल्यानंतर युजर्संना 40Kbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येवू शकतो. या शिवाय, ग्राहकांना रोज १०० फ्री एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये बीएसएनएल ट्यून्स सब्सक्रिप्शन फ्री ऑफर केले जाते. या फ्री सेवा केवळ ६० दिवसांसाठी आहेत. या प्लानची वैधता मात्र ३६५ दिवसांची आहे.

वाचाः

१० जानेवारीपर्यंत बीएसएनएलने व्हाइस कॉलिंग लिमिटला २५० मिनिटवर सिमित करण्यात आले होते. आता लिमिटला हटवले आहे. म्हणजेच बीएसएनएल प्लान मध्ये देशात विना एफयूपी लिमिटच्या अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते.

वाचाः

बीएसएनएलकडे सर्वात स्वस्त वार्षिक प्रीपेड प्लान
वार्षिक वैधता सर्व प्लान पाहिल्यास सरकारी टेलिकॉम कंपनी सर्वात कमी किंमतीत ३६५ दिवसांची वैधता असलेला प्लान ऑफर करीत आहे. रिलायन्स जिओकडे १२९९ रुपयांत ३३६ दिवस, तर एअरटेलकडे ३६५ दिवसांच्या वैधतेसाठी १४९८ रुपयांचा प्लान आहे. परंतु, या प्लानमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट पूर्ण वैधतेपर्यंत आहे. तर बीएसएनएलमध्ये मिळणारी फ्री ऑफर्स केवळ ६० दिवसांसाठी आहे.

वाचाः

३६५ रुपयांच्या प्लानमध्ये बीएसएनएलकडे १४९८ रुपायंचा प्रीपेड रिचार्ज आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस फ्री मिळते. ३६५ आणि १४९८ रुपयांचे दोन्ही प्लान देशभरातील सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

BREAKING : यूपी-उत्तराखंडात स्वबळावर लढणार, मायावतींची घोषणा

0

लखनऊ : प्रमुख यांनी आपल्या वाढदिवसालाच एक महत्त्वाची घोषणा केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा कुणाशीही आघाडी करणार नाही. आणि विधानसभा निवडणुका बसपा स्वत:च्या बळावर लढवणार असल्याचं मायावतींनी जाहीर केलंय.

कोणत्याही पक्षाशी आघाडी केल्यानं त्याचं नुकसान बहुजन समाज पक्षालाच सहन करावं लागतं, असंही मायावतींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत बहुजन समाज पक्षाचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंडे प्रकरणावर पवारांची पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा?; भाजप भडकला!

0

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे. त्यातच, मुंडे प्रकरणात माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केल्याच्या वृत्तामुळं भारतीय जनता पक्ष भडकला आहे.

नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं ‘क्लीन चिट’ दिली असली तरी मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस सावध पावलं टाकत आहे. भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं दबाव वाढला आहे. शरद पवारांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्ष तातडीनं निर्णय घेईल, असं काल स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे सहपोलीस आयुक्त यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त झळकलं. मुंडे प्रकरणावर त्यांच्यात चर्चा झाल्याचंही सांगितलं जात होतं.

वाचा:

पवार-नांगरे पाटील यांच्यातील या कथित भेटीवरून भाजपनं शरद पवारांवर टीका केली आहे. ‘पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री?,’ असा सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ‘राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘पाठीमागून सूत्रं हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावीत,’ असा खोचक सल्लाही भातखळकर यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Samsung Galaxy S21 सीरीजचे मोबाइल लाँच, पाहा किंमत-फीचर्स

0

नवी दिल्लीः खूप वाट पाहिल्यानंतर सॅमसंगने अखेर आपले फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. यासोबतच सॅमसंगने सेकंड जनरेशन Galaxy Buds Pro सुद्धा लाँच केली आहे. सॅमसंगने नावाचा इवेंट मध्ये Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21+ आणि सोबत सह आपल्या लेटेस्ट प्रोडक्ट्सच्या किंमतीवरून पडदा हटवला आहे.

वाचाः

सॅमसंगने आपल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीजमध्ये Samsung Galaxy S21 ला ८४९ यूरो म्हणजेच ७५ हजार ६०० रुपये, Samsung Galaxy S21+ ला १०४९ यूरो म्हणजेच ९३ हजार ४०० रुपये आणि Samsung Galaxy S21 Ultra ला १३९९ यूरो म्हणजेच १ लाख २४ हजार ६०० रुपयांत लाँच केले आहे. यासोबतच सॅमसंगने Second Gen Samsung Galaxy Buds Pro ला १९९ डॉलर म्हणजेच १४,५५१ रुपयांत लाँच केले आहे. सॅमसंगने Galaxy SmartTag Bluetooth tracker ला २१९३ रुपयांत लाँच केले आहे. दोन स्मार्टटॅग खरेदी केल्यास आपल्या केवळ ४९.९९ डॉलर म्हणजेच ३६५५ रुपये मोजावे लागतील.

वाचाः

Second Gen Samsung Galaxy Buds Pro ला कंपनीने जबरदस्त कलर, जबरदस्त साउंड क्वॉलिटी आणि जबरदस्त फीचर्स सोबत लाँच केले आहे. ईयरबड्सचे नाइज कॅन्सलेशन फीचर जबरदस्त आहे. तसेच यात खास माइक फीचर्स दिले आहे.

वाचाः

Samsung Galaxy S21 Ultra चे खास फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा मध्ये ६.८ इंचाचा AMOLED Quad HD+ डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन रिझॉल्यूशन 1440×3200 पिक्सल आहे. या फोनचे डिस्प्ले रिफ्रेशन रेट 10Hz पासून 120Hz पर्यंत आहे. Samsung Galaxy S21 Ultra ला कंपनीने १२ जीबी आणि १६ जीबी रॅम ऑप्शन सोबत १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. या फोनला अडवांस octa-core Exynos 2100 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. या जबरदस्त फोनमध्ये S Pen सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, १० मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि १० मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. यात ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. सॅमसंगचा हा मोस्ट अडवॉन्स स्मार्टफोन 100X Space Zoom सपोर्ट सोबत येतो. या फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh बॅटरी दिली आहे. वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग फीचर्स सोबत येते.

वाचाः

Samsung Galaxy S21 चे खास फीचर्स
या फोनममध्ये ६.२ इंचाचा फुल HD+ Dynamic AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. याचे डिस्प्ले रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. या फोनला सॅमसंगने octa-core Exynos 2100 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. या फोनला ४ कलर ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचे प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. तसेच १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, १२ मेगापिक्सलचा ड्यूल पिक्सल सेन्सर आहे. या फोनमध्ये १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत लाँच केला आहे. तर फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,000mAh बॅटरी दिली आहे. वायरलेस चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये मिळतो.

वाचाः

Samsung Galaxy S21+ ची खास वैशिष्ट्ये
Samsung Galaxy S21+ मध्ये ६.७ इंचाचा full-HD+ Dynamic AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. या फोनचे डिस्प्ले रेट 120Hz आहे. कंपनीने या फोनला Exynos 2100 SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सोबत लाँच केले आहे. यात प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सल आहे. १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कंपनीने या फोनला १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत लाँच केले आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 4,800mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Latest posts