Monday, December 11, 2023
Home Blog Page 7237

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या वॉर्डमध्ये झुरळांचा संचार

0

नाशिकः भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रसुती वॉर्डमध्ये नवजात बाळांच्या भोवती झुरळांचा संचार असल्याचं समोर आलं आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेमुळं अवघा महाराष्ट्राला हादरा बसला होता. त्यानंतर पुन्हा एका रुग्णालयात नवजात बालकांचं आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवजात बालकांच्या कानात आणि नाकात झुरळ गेल्यास बालक कर्णबधीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बेडपासून फरशीपर्यंत सगळीकडे धुरळं सापडत असल्याचं समोर आलं आहे. बेडशेजारी असलेल्या कपाटातही मोठ्या प्रमाणात झुरळांचा संचार आहे. प्रसुती विभागातील झुरळांच्या संचारामुळं व रुग्णालयातील अस्वच्छतेमुळं रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रसुती वॉर्डात प्रचंड झुरळं असल्याचं समोर आलंय. या वॉर्डात नवजात बालकं असून कपाट, भितींवर, कॉटवर सगळीकडेच झुरळांचा संचार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून पेस्ट कंट्रोलच्या कामाचा ठेका जातो तरी इतके झुरळे कसे, असा प्रश्न निर्माण होतो, या विषयाकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असं भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे.

नवजात बालकांचं स्वागत आज झुरळांपासून होतंय, हे दुर्दैवी आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची चौकशी करुन तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने याकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'सावधान! फुटीरतावाद्यांचा लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर मार्च काढण्याचा डाव'

0

नवी दिल्ली: नवीन कृषी कायद्यांवरून ( ) सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांमध्ये ( ) कुठलाही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ५० वा दिवस आहे. दरम्यान, किसान युनियनने २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत ( tractor march ) एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला ( ) लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर रॅली काढणार नाहीत. आता शेतकरी दिल्ली सीमेवरच काढतील. भारतीय किसान युनियनचे (राजेवाल ग्रुप) नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केलं आहे. ट्रॅक्टर मार्च फक्त हरयाणा-नवी दिल्ली सीमेवर असेल. लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर मार्च काढण्याचा आपला कोणताही हेतू नाही. पुटीरतावादी तत्व लाल किल्ल्याबाहेर ट्रॅक्टर मार्च काढण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यापासून दूर रहावं, असं आवाहन बलबीर सिंह राजेवाला यांनी केलं आहे.

५० ते ६० हजार ट्रॅक्टर दिल्लीच्या सीमांवर दाखल

ट्रॅक्टर परेडसाठी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ५०-६० ट्रॅक्टर दाखल झाले आहेत. ट्रॅक्टर मार्च शांततेत काढला जाईल, असं शेतकरी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्णयावरही शेतकरी संघटना समाधानी नाहीत. शेतकऱ्यांनी बुधवारी लोहरीनिमित्त कृषी कायद्यांच्या प्रति जाळल्या आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचं आवाहन केलं.

गुराढोरांसह दिल्लीत घुसणार

मकदुली येथील टोल नाक्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेळ्या, मेंढ्या आणि गायी, म्हशींसह २६ जानेवारीला दिल्लीत घुसू. प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेडही करणार असल्याचं येथील शेतकऱ्यांनी सांगितलं. २६ जानेवारीच्या दिल्ली कूचसाठी गावोगावी जनसंपर्क मोहीम राबवली जात आहे, असं अंबावटाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नंदल म्हणाले.

‘जगात चुकीचा संदेश जाईल’

प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सोहळा आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येत असेल तर संपूर्ण जगात चुकीचा संदेश जाईल, असं कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले. यामुळे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी हे समजून घ्यावं आणि आपला निर्णय मागे घ्यावा, असं आवाहन त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना केलं आहे.

दिल्ली पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर-ट्रॉली / वाहन मोर्च किंवा कोणत्याही प्रकारच्या आंदोलनावर बंदी घालावी, यासाठी केंद्राने दिल्ली पोलिसांमार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. “सोहळ्यात कोणचाही अडथळा केवळ कायदा-सुव्यवस्था आणि जनहिताच्या विरोधातच नाही तर देशासाठीही लाजीरवाणीबाब असेल, असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

शेतकर्‍यांच्या भावना समजून घेण्याची गरज: शिवसेना

परिस्थिती अधिक चिघळू नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. आतापर्यंत या आंदोलनात ६० ते ६५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. देशात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत असं शिस्तबद्ध आंदोलन बघण्यात आलं नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राज्यात करोनाचा जोर ओसरतोय; पण 'ही' चिंता कायम

0

मुंबईः राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ५७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार ३०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, करोनाचे रुग्ण कमी होत असले तरी राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मात्र, ५२ हजार २९१ इतकी झाली आहे.

राज्यात रुग्णवाढीला गेल्या काही दिवसांपासून मोठा ब्रेक लागला आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कमी जास्त होत आहे. बुधवारच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचा आकडा स्थिर आहे. त्यामुळं रिकव्हरी रेट किंचित वाढला आहे. राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा ५० हजार २९१ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा आहे.

राज्यात आज ३,५७९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ८१ हजार ६२३ इतकी झाली आहे. तर, आज राज्यात ३ हजार ३०९ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७७,५८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके झाले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,२३,२९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८१,६२३ (१४.५५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९६,८२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

काळजी घ्या…करोनावर मात केलेल्या रुग्णांपासून होऊ शकतो संसर्ग!

0

लंडन: करोनाच्या संसर्गावर मात केलेल्या रुग्ण फैलावू शकतात असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे. एका संशोधनातून बाब समोर आली आहे. करोनातून बरे झाल्यानंतर किमान पाच महिन्यांसाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढते. या दरम्यान संबंधित रुग्णाला करोनाची बाधा होऊ शकत नाही. मात्र, इतरांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

पाच महिन्यांसाठी रोगप्रतिकारक क्षमता
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या विश्लेषणानुसार, संसर्गानंतर स्वाभाविकपणे विकसित होणारी अॅण्टीबॉडी इतरांच्या तुलनेत ८३ टक्के अधिक सुरक्षा देते. संशोधनानुसार पहिल्यांदा संसर्गबाधित झाल्यानंतर कमीत कमी पाच महिन्यांपर्यंत प्रतिकारक क्षमता असते.

करोनातून बरे झालेलेही फैलावू शकतात

संशोधकांनी इशारा दिला की, शरीरात अॅण्टीबॉडीजची रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली आहे अशा व्यक्तीदेखील नाक अथवा गळ्याद्वारे विषाणूचे वाहक असू शकतात. या व्यक्तिंमुळे इतरांनाही करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार प्रा. सुसैन हॉपकिन्स यांनी सांगितले की, या संशोधनामुळे आपल्याला करोनाविरोधातील अॅण्टीबॉडीबाबत आतापर्यंत स्पष्ट चित्र समोर आले आहे.

वाचा:

वाचा:

ज्यांना संसर्ग झाला, त्या व्यक्तिंमध्ये अॅण्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यातील बहुतांशजणांना पुन्हा एकदा संसर्गापासून संरक्षण मिळते. मात्र, हे संरक्षण किती काळ असेल याबाबत काहीही माहिती नसते. लोकांनी करोनावर मात केली तरी ते करोनाचा संसर्ग फैलावू शकतात असेही त्यांनी म्हटले.

वाचा:
दरम्यान, ब्रिटनमध्ये
संसर्गाचे थैमान थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत. बुधवारी करोनाच्या संसर्गाने १५६४ जणांचा मृ्त्यू झाला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर २८ दिवसांतच त्यांचा मृ्त्यू झाला आहे. करोना महासाथीच्या आजारामुळे आतापर्यंत ८४ हजार ७६७ जणांना प्राण गमवावे लागले आहे. वेगाने फैलावणाऱ्या करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशभरात लॉकडाउनची लागू करण्यात आला आहे. करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. फायजर-बायोएनटेक आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची लस देण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मनसेच्या मनीष धुरींनाही 'त्या' महिलेचा फोन; धनंजय मुंडे प्रकरणी मोठा गौप्यस्फोट

0

मुंबईः बलात्काराच्या आरोपांमुळं अडचणीत आलेल्या यांच्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. मुंडे यांच्यावर आरोप करत पोलीस तक्रार करणाऱ्या विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता मनसेचे नेते मनिष धुरी यांनीही रेणु शर्मावर धक्कादायक आरोप केले आहे.

रेणु शर्मा या महिलेनं मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या रेणु शर्मानं केलेल्या आरोपांमुळं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. असं असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हे आरोप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनीही रेणु शर्माविरोधात मोठा खुलासा केल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळणं लागण्याची शक्यता आहे.

‘धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनं माझा नंबर कुठूनतरी मिळवला आणि ती मला फॉलो करत होती. तिने माझ्याशी अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी अधिक चौकशी केली तेव्हा ती मोठ्या- मोठ्या लोकांना हेरायचा प्रयत्न करत असल्याचं मला कळालं होतं म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. २०१८- १९ मध्ये ही महिला पैसे उकळण्यासाठी पुन्हा माझ्या संपर्कात आली. मीही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. मी देखील या महिलेविरोधात तक्रार दाखल करणार आहे,’ अशी माहिती धुरी यांनी दिली आहे.

कृष्णा हेगडेंचं पोलिसांना पत्र
‘रेणू शर्मा ही महिला २०१० पासून मला फोन आणि मेसेज करत होती. तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी माझ्या मागे लागली होती. माझा पाठलाग करण्यापर्यंत तिची मजल गेली होती. तब्बल पाच वर्षे ती मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या सूत्रांकडून तिच्याबद्दल माहिती काढली असता ती एक लबाड व्यक्ती असल्याचं मला समजलं. त्यानंतर मी तिला भेटण्याचं पूर्णपणे टाळलं. तिला तसं स्पष्ट बजावलंही होतं. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर तिनं केलेल्या आरोपांनंतर मला धक्काच बसला. तेव्हाच मी तिच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कर्ज घेताय; या सरकारी बँकेने केली कर्जदरात कपात

0

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित असलेल्या कर्जदरात (एमसीएलआर) ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे विविध मुदतीचा कर्ज दर कमी झाला आहे.

बँकेने ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या एमसीएलआरला अनुक्रमे १५ आणि ५ बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. यामुळे आता एक दिवसाचा एमसीएलआर ६.७५ टक्क्यांच्या जागी ६.६० टक्के होणार आहे. तोच एका महीन्याचा कर्जदर ६.७० टक्क्यांपर्यंत जाईल, जो आधी ६.७५ टक्के इतका होता. ३ आणि ६ महिने तसेच १ वर्षाचा एमसीएलआर अनुक्रमे ६.९० टक्के, ७.०५ टक्के व ७.२० टक्के राहील. एमसीएलआरचा नवा दर ११ जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने देखील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या कर्जावर ६.८ टक्के व्याजदर आहे. ३० लाखांवरील कर्जावर ६.९५ टक्के व्याज लागू केले जाईल. ज्या ग्राहकांचे सिबिल स्कोअर चांगला असेल तर त्या ग्राहकांना व्याजदर सवलत आणि प्रक्रिया शुल्कात सवलत दिली जाईल, असे एसबीआयने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शेअर बाजाराच यू-टर्न ; पडझडीतून सावरत सेन्सेक्सची शतकी झेप

0

मुंबई : नफेखोरीचा दबाव झुगारून आज गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा तेजीची वाट धरली आहे. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला असून ५० हजारांचे शिखर त्याला खुणावत आहे. दरम्यान, सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये १५० अंकांची घसरण झाली होती.

सेन्सेक्स मंचावरील १६ शेअर आज तेजीसह बंद झाले. ज्यात इंडसइंड बँक, टीसीएस, एल अँड टी, आयटीसी, एचयूएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, कोटक बँक, डॉ. रेड्डी लॅब, नेस्ले , एसबीआय, भारती एअरटेल आदी शेअर वधारले. तर ओएनजीसी, पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, टायटन, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एशियन पेंट्स, ऍक्सिस बँक, एचसीएल टेक आदी शेअर घसरले.

भांडवली वस्तू उत्पादक कंपन्या, आयटी सेवा पुरवठादार आणि बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाली. तर काही स्थावर मालमत्ता क्षेत्रातील शेअरला मागणी दिसून आली. ज्यात ब्रिगेड एन्टरप्राइसेस, नेस्को, सनटेक रियल्टी आदी शेअर वधारले. टुरिझम क्षेत्रात जुबिलंट फूडवर्क, लेमन ट्री हॉटेल्स, डेल्टा कॉर्प हे शेअर घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स ९१ अंकांच्या वाढीसह ४९५८४ अंकावर स्थिरावला. निफ्टी ३० अंकांच्या वाढीसह १४५९५ अंकावर बंद झाला.

गेल्या काही सत्रात शेअर निर्देशकांनी मोठी दौड मारली आहे. आयटी सेवा कंपन्यांची आर्थिक कामगिरी चांगली ठरली आहे. १० दिवसात आयटी निर्देशांक ११ टक्क्यांनी वाढलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात नफेखोरी होण्याची शक्यता जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्लेषक व्ही. के विजयकुमार यांनी व्यक्त केली.

फिच या संस्थेने २०२१-२२ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ११ टक्क्यांनी उभारी घेईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आज हिंदुस्थान एरॉनॉटिकल्सचा शेअर १४ टक्क्यांनी वधारला. कंपनीला तेजस विमानांची १४ हजार कोटींचे कंत्राट मिळाले आहे. त्यानंतर आज कंपनीच्या शेअरला मागणी दिसून आली. अमेरिकेतील भांडवली बाजारात बुधवारी तेजी होती. आशियात मात्र आज संमिश्र वातावरण दिसून आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे थोर व्यक्तींच्या सरकारी यादीत

0

म. टा. प्रतिनिधी, नगर: राज्य सरकारतर्फे जयंती, पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याच्या राष्ट्र पुरूष, थोर व्यक्तींच्या यादीत प्रबोधकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख यांचाही आता समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने या यादीत बदल केल्याने आता अशा दिवसांची यादी ३७ वरून ४१ झाली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर २०२१ वर्षासाठीची ही यादी १५ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये ३७ दिवसांचा समावेश होता. या यादीतील व्यक्तींच्या जयंती, पुण्यातिथी निमित्त त्यांना अभिवादन करणे, इतर दिवस त्या सूचनाप्रमाणे साजरे करणे, अशा सूचना सर्व सरकारी कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. आता १४ जानेवारी २०२१ रोजी यासंबंधीची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये चार नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, १६ फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, १७ सप्टेंबरला केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि २७ डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम समाविष्ठ करण्यात आला आहे. बाकीचे दिवस पूर्वीच्या यादीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.

मंत्रालय, सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांत या दिवशी संबंधित थोर व्यक्तींना अभिवादन करायचे आहे. त्यासाठी त्यांची प्रतिमा उपलब्ध करून सरकारी नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवसेनेकडून ठाकरे यांची जयंती यापूर्वीही साजरी करण्यात येत होती. त्यानिमित्त पक्षीय पातळीवर विविध उपक्रम घेतले जात होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर यावर्षापासून त्यांचे वडील आणि आजोबा यांचा समावेश सरकारी यादीत करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अमेरिकेचा मोठा निर्णय; 'या' प्रवाशांनाच मिळणार अमेरिकेत प्रवेश

0

न्यूयॉर्क: करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत दाखल होणाऱ्या प्रवाशांना यापुढे करोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अमेरिकेच्या ‘द सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन’चे (सीडीसी) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी हे निर्देश दिले आहेत. २६ जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

ब्रिटनमध्ये गेल्या महिन्यात ‘कोव्हिड २१’ हा नवा विषाणू आढळला होता. यानंतर ब्रिटनमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम आखण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव या नियमाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, आता सर्व देशांतील प्रवाशांना २६ जानेवारीपासून करोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

‘अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाच्या तीन दिवस आधी कोव्हिड १९ची चाचणी करून घ्यावी व त्यात निगेटिव्ह असणाऱ्यांनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतर त्याविषयीचे प्रमाणपत्र सादर करावे,’ असे रेडफिल्ड यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘एखादा प्रवासी करोनातून बरा झाला असल्यास त्याने त्यासंबंधी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. करोना निगेटिव्ह वा करोनातून बरे झाल्याचे प्रमाणपत्र न बाळगणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवेश देऊ नये,’ अशा सूचना विमान कंपन्यांना करण्यात आल्या आहेत.

प्रवासी करोनामुक्त असतील तर विमानप्रवासात, विमानतळांवर व ते जात असणाऱ्या ठिकाणी करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यल्प ठरेल, असे रेडफिल्ड म्हणाले. अमेरिकेत आतापर्यंत २.२ कोटी नागरिकांना करोनाची लागण झाली असून, पावणेचार लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:

अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्या वाढत असताना दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. अमेरिकेत मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून मंगळवारी एकाच दिवसात चार हजारजणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

वाचा: वाचा:

अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्या वाढत असताना दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. अमेरिकेत मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून मंगळवारी एकाच दिवसात चार हजारजणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. करोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ९ दशलक्षजणांना करोना लशीचा पहिला डोस देण्यात आला असून २७ दशलक्ष करोना लशीचे डोस वितरीत करण्यात आले असल्याचे ‘सीएनएन’ने म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंडे प्रकरणाला नवे वळण; 'त्या' महिलेविरुद्ध भाजप नेत्याची तक्रार

12

मुंबई: बलात्काराच्या आरोपांमुळं अडचणीत आलेले सामाजिक न्यायमंत्री यांच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत पोलीस तक्रार करणाऱ्या हिच्याविरोधात माजी आमदार व सध्याचे भाजप नेते यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. ‘रेणू शर्मा ही ‘हनी ट्रॅप’ लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी महिला आहे,’ असं हेगडे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. ( files complain against )

वाचा:

रेणू शर्मा ही करुणा शर्मा यांची बहीण आहे. करुणा यांना धनंजय मुंडे यांच्यापासून दोन मुलं असून मुंडे यांनी ते मान्यही केलं आहे. मात्र, रेणू शर्मा हिनं केलेले इतर आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळले आहेत. मात्र, तिनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळं मुंडे अडचणीत आले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेतली असतानाच कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा हिच्याविरुद्ध तक्रार केल्याचं समोर आलं आहे. हेगडे यांनी अंधेरी पश्चिमेकडील आंबोली पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या महिलेविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून तिची सखोल चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे.

आपल्या तक्रारीत कृष्णा हेगडे म्हणतात…

रेणू शर्मा ही महिला २०१० पासून मला फोन आणि मेसेज करत होती. तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी माझ्या मागे लागली होती. माझा पाठलाग करण्यापर्यंत तिची मजल गेली होती. तब्बल पाच वर्षे ती मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. ९९८११११११२, ९८९२८१४७८, ०२२६६९३४४४४, ८४५४८ ०२२०८ या क्रमांकावरून तिनं मला कॉल केले. मी तिच्याबद्दल माहिती ती एक लबाड व्यक्ती असल्याचं मला समजलं. त्यानंतर मी तिला भेटण्याचं पूर्णपणे टाळलं. तिला तसं स्पष्ट बजावलंही होतं. तिनं काही पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचंही मला समजलं. याच महिन्यात ६ आणि ७ तारखेलाही तिनं मला व्हॉट्सअॅप मेसेज केले आहेत. ८८२८२६५२८९ या क्रमांकावरून हे मेसेज आले होते. मी ‘थम्ब’ इमोजी पाठवण्यापलीकडं तिला काही प्रतिसाद दिला नाही. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर तिनं केलेल्या आरोपांनंतर मला धक्काच बसला. तेव्हाच मी तिच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला. आज तिनं मुंडे यांना लक्ष्य केलं. कदाचित दोन वर्षांपूर्वी हीच वेळ माझ्यावर आली असती. उद्या कदाचित दुसरा कोणी त्याजागी असेल.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts