Thursday, September 28, 2023
Home Blog Page 7238

धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जातं होतं: जयंत पाटील

0

मुंबईः यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस जो निष्कर्ष काढतील त्यानंतर अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी स्पष्ट केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे. पक्ष धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार याविषयी तर्क वितर्क लढवले जात असतानाच जयंत पाटील यांनी मात्र मुंडेंच्या कारवाईबाबत काहीशी सावध भूमिका घेतली आहे.

धनंजय मुंडे यांना एक महिला ब्लॅकमेल करतेय याबाबत आधीच त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यामुळं पोलिसांनी याबाबत योग्य ती पावलं उचलावीत एवढ अपेक्षा होती. पण ती उचलली गेली नाहीत. म्हणून शेवटी ते हायकोर्टात गेले, अशी माहिती देतानाच. याबाबतची प्राथमिक चौकशी व्हावी. एखादी महिला राजकीय व्यक्तिमत्वाला बदनाम करत असेल, तर त्याचीही दखल घ्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत याबाबत चर्चा होत आहे. पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, पोलीस त्यांचं काम करतील. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, सध्यातरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. याबाबत पक्षातील इतर सहकाऱ्यांशी चर्चा करु आणि पक्ष म्हणून निर्णय घेऊ. याला जास्त वेळ लागेल, असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अदिती जलतरे म्हणतेय, अहिल्याबाई होळकरांचे चरित्र पडद्यावर साकारणं म्हणजे…

0

मुंबई: नव्या वर्षात टीव्हीवर दाखल झालेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेबद्दल उत्सुकता आहे. या मालिकेत होळकर यांचे जीवनकार्य उलगडणार आहे. अहिल्याबाईंनी तत्त्कालीन रूढींना आव्हान देत महिला सशक्तीकरणाचा मार्ग कसा खुला केला, हे त्यात दाखवलं जाणार आहे.

या मालिकेत ही बालकलाकार अहिल्याबाई होळकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या अनेक अर्थानं एक महान व्यक्ती होत्या. त्या खूप मोठ्या योद्धा आणि दूरद्रष्ट्या होत्या. त्या दयाळू आणि प्रेमळही होत्या. अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे, अहिल्याबाई होळकरांना प्राणी खूप आवडत असत. त्या त्यांची खूप काळजी घेत. अहिल्याबाईंच्या स्वभावातील ज्या गोष्टी आतापर्यंत सामान्यांना माहिती नाहीत, त्यावर प्रकाश टाकण्याचा या मालिकेचा उद्देश आहे.

विशेष म्हणजे, अहिल्याबाई होळकरांचे पात्र साकारणारी अदिती जलतरे ही देखील प्राणीप्रेमी आहे. चित्रीकरणादरम्यानदेखील, अदिती सेटवरील प्राण्यांसोबत खेळत अशते. घरून आणलेले अन्न प्राण्यांना खाऊ घालत असते.

प्राण्यांवरील प्रेमाबद्दल बोलताना अदिती जलतरे म्हणाली, ‘अहिल्याबाईंना प्राण्यांची खूप आवड होती, हे कळाल्यावर मला खूप आनंद झाला. त्यामुळं त्यांचं व माझं खूप घट्ट नातं असल्यासारखं वाटलं. त्यांच्या या आवडीसोबत माझी आवड खूप मिळतीजुळती आहे. माझ्या आईने तर अहिल्याबाई आणि माझ्यामधील समान असलेल्या आणखी काही गोष्टी दाखवल्या. मी त्यांच्याबद्दल खूप प्रश्न विचारत असते, त्यांच्यासारखंच शिकण्याची माझी इच्छा आहे. त्या सर्वार्थानं असामान्य व्यक्ती होत्या. ऐतिहासिक अशा पडद्यावर साकारणे हा खरोखरच माझ्यासाठी सन्मान आहे. ‘

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ट्रम्प यांचे आता काय होणार? जाणून घ्या महाभियोगावरील काही महत्त्वाचे मुद्दे

0

वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील आठवड्यात अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांची गच्छंती करण्याची मागणी करण्यात येत होती. विशेष म्हणजे ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची मुदत संपण्यास अवघे पाच दिवसच आहे. आपल्या वादग्रस्त कारकीर्दीची अखेरही वादग्रस्तच करणारे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायम स्वरुपी बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात ट्रम्प कोणत्याही पदावर येणार नाहीत. जाणून घेऊयात काही महत्त्वाचे मु्द्दे:

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायम स्वरुपी बंदी?

अमेरिकेच्या संविधानानुसार, एखाद्या व्यक्तीवर महाभियोगाची कारवाई केल्यास तर त्याला दोन पद्धतीने शिक्षा केली जाते. एक म्हणजे त्याच्याकडे असणारा पदभार काढून गच्छंती करणे, आणि दुसरी शिक्षा म्हणजे त्या व्यक्तीला कायमस्वरुपी कोणत्याही पदापासून दूर ठेवणे.

वाचा:

महाभियोगातून कारवाई करून पदावरून हटवण्यासाठी सिनेटमध्ये दोन तृतीयांश बहुमताने या प्रस्तावाला मंजूर करावे लागते. जर असे झाले तर त्यानंतर सिनेटमध्ये आणखी एक मतदान होईल. त्यानुसार या व्यक्तिला भविष्यात कोणतेही पद भूषवण्यापासून रोखले जाईल. अमेरिकेत अशा प्रकारची कारवाई आतापर्यंत तिघांवर झाली आहे. हे तिघेहीजण फेडरल कोर्टाचे न्यायाधीश होते.

सिनेटमध्ये बहुमत मिळाले नाही तर काय?

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेटमध्ये महाभियोगावर मतदान होऊ शकते आणि त्यातून सध्या असलेल्या पदावरून हटवण्यात येऊ शकते. मात्र, सार्वजनिक पदावरून कायमस्वरूपी बंदी घालायची असेल तर त्याआधी एक सुनावणी होईल. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. त्यात ते दोषी आढळल्यास पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होईल.

वाचा: डोनाल्ड ट्रम्प कोर्टात जाऊ शकतात का?

अमेरिकन संसदेने डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही पदासाठी अयोग्य सिद्ध केल्यास ट्रम्प कोर्टात दाद मागू शकतात. सुप्रीम कोर्ट अमेरिकन संसदेला या कारवाईबाबत स्पष्टीकरण मागू शकते. सध्याच्या परिस्थितीनुसार, सुप्रीम कोर्टातील नऊ न्यायाधीशांपैकी रिपब्लिकन न्यायाधीशांची संख्या अधिक आहे.

प्रतिनिधी सभेत प्रस्ताव मंजूर झाला, आता काय होणार?

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव सिनेटमध्ये पाठवण्यात येणार असून तिथे सुनावणी होईल.

वाचा:
सिनेटमध्ये काय होणार?

सध्याच्या कार्यक्रमानुसार, सिनेटचे पुढील सत्र १९ जानेवारी रोजी आहे. तर, २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच त्यांच्याविरोधातील महाभियोगाचा खटला सुरू होईल.

सिनेटमध्ये कोणाचे पारडं जड?
सिनेटमध्ये दोन तृतीयांश मतदानाची आवश्यकता भासणार आहे. सिनेटमध्ये मॅककॉनल हे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले तर अनेकजण त्यांच्यासारखाच निर्णय घेऊ शकतात. सध्या तरी रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांना पद सोडण्याचा सल्ला दिला आहे. याआधीही ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला होता. मात्र, त्यावेळी ट्रम्प यांच्या बाजूने मतदान झाले.

ट्रम्प यांचे भवितव्य काय?

सिनेटमध्ये चालवण्यात येणाऱ्या खटल्यात ट्रम्प दोषी आढळल्यास त्यांना अयोग्य ठरवण्याबाबत मतदान करण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीनुसार, ट्रम्प यांना पदावरून हटवण्यात यावे अशी अनेकांची भूमिका आहे. मात्र, भविष्यात कायमस्वरूपी बंदी घालावी याला अनेकांनी असहमती दर्शवली आहे.

ट्रम्प यांच्यावर आरोप काय?

ट्रम्प यांच्यावर याआधी युक्रेनच्या मुद्यावर महाभियोग चालवण्याता आला होता. तर, आता अमेरिकेत दंगल भडकवणे, संसदेवर हल्ला करण्यास चिथावणी देणे आदी आरोप लावण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कंगना दिसणार आणखी एका राणीच्या रुपात; 'या' चित्रपटाची घोषणा

0

मुंबई: वादग्रस्त ट्विट्स आणि वक्तव्यांमुळं चर्चेत असलेली अभिनेत्री हिनं तिच्या आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’या चित्रपटात झांसीच्या राणीचा इतिहास प्रेक्षकांना दाखवल्यानंतर आता आणखी एका राणीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगनानं ट्विट करत तिच्या ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कंगना काश्मीरच्या राणीचा इतिहास शौर्यगाथा प्रेक्षकांना दाखवणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत कंगनानं या चित्रपटाची घोषणा केलीए. ‘झासीच्या राणीसारख्याच अनेक वीरांगना या भारत भूमित होऊन गेल्या. अशाच आणखी एका वीरांगनाची शौर्यगाथा घेऊन येतेय. काश्मीरची राणी जिनं एकदा नव्हे तर दोनदा महमुद गजनवीला पराभूत केलं.’, असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंगनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिनं‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग संपवलं आहे हा सिनेमा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक असणार आहे. यानंतर कंगना लवकरच तिच्या ‘तेजस’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून यात ती भारतीय वायुसेनेच्या लढाऊ पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ची ‘धाकड’ चित्रपटातही दिसणार असून यात ती अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शेतकरी हिताशी तडजोड नाही, भूपिंदर सिंह मान यांची समितीतून माघार

0

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज (गुरुवारी) तब्बल ५० दिवस पूर्ण होत आहेत. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी एका चार सदस्यीय समितीचं गठन केलं होतं. याच समितीत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचाही एक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, आज भूपिंदर सिंह मान यांनी या समितीतून काढता पाय घेतलाय.

समितीमध्ये भूपिंदर सिंह मान यांच्या नावाच्या असलेल्या समावेशावरून अगोदरपासूनच मोठी टीका केली जातेय. तसंच समितीतील चारही सदस्यांनी कृषी कायद्याचं समर्थन केलं होतं. त्यामुळे या समितीवरही विश्वास दर्शवण्यास शेतकऱ्यांनी नकार दिलाय. शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, भूपिंदर सिंह मान यांनीही अगोदरच कृषी कायद्यांचं समर्थन केलं होतं.

यानंतर, भूपिंदर सिंह मान यांनी एक पत्र लिहून समितीतून बाहेर पडत असल्याची माहिती दिलीय. समितीत आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसंच आपण नेहमीच पंजाब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

एक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा नेता असल्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या भावना समजू शकतो. आपण शेतकऱ्यांप्रती आणि पंजाबप्रती नेहमीच निष्ठावंत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. यासाठी आपण कोणत्याही मोठ्या पदावर पाणी सोडायला तयार आहोत, असंही या पत्रात मान यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली जबाबदारी आपण निभावू शकणार नाही. त्यामुळे या समितीतून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं मान यांनी स्पष्ट केलंय.

सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीत भूपिंदर सिंह मान यांच्यासोबतच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष , कृषी अर्थशास्त्रज्ञ तसंच आंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्थेचे यांचा समावेश करण्यात आला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बर्ड फ्लूची धास्ती! बीएमसीनं दिली तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

0

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कावळे, पोपट व कबुतरं मृत्युमुखी पडत असल्यानं मुंबईत ‘बर्ड फ्लू’ची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनं माहितीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात या रोगाबद्दल सर्व प्रकारची माहिती असून सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरं देण्यात आली आहेत.

देशातील काही राज्यांत सध्या बर्ड फ्लूनं शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबई, ठाण्यात अनेक कावळे व अन्य पक्षांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुंबईकरांमधील ही भीती लक्षात महापालिकेनं पत्रक काढलं आहे. त्याद्वारे जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बर्ड फ्लूपासून काळजी कशी घ्यायची, याचीही माहिती देण्यात आली आहे.

  1. बर्ड फ्लू म्हणजे काय?बर्ड फ्लू हा पक्ष्यांमधील विषाणूजन्य रोग असून तो ऑर्थोमिक्झो विरीडे (H5N1) या विषाणू कुटुंबातील ‘अ’ गटामुळे होतो.
  2. हा रोग कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये व प्राण्यांमध्ये आढळतो?हा विषाणू कावळे, बदके, कबुतरे, टर्की, कोंबड्या यांमध्ये प्रामुख्याने आढळतो.
  3. ह्या रोगाचा प्रसार कसा होतो?बाधित पक्ष्याच्या नाकातील स्त्राव किंवा विष्ठा यांच्याशी निरोगी पक्ष्यांचा थेट संबंध आल्यास हा रोग होऊ शकतो. दूषित खाद्य, पाणी, उपकरणे यांमुळं सुद्धा हा रोग पसरू शकतो. पक्षी एकमेकांच्या सान्निध्यात आल्यामुळं सुद्धा हा रोग होऊ शकतो.
  4. बर्ड फ्लू हा माणसांमध्ये आढळतो का?बर्ड फ्लू या रोगाच्या विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये व डुकरांमध्ये आढळतो. या व्यतिरिक्त इतर प्राणी वा माणसांमध्ये हा विषाणू सहसा आढळत नाही.
  5. कोंबडीचे मांस खाल्ल्यामुळे या रोगाचा प्रसार माणसांमध्ये होतो का?नाही. कारण, भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये चिकन, मटण, अंडी व इतर मांस उकडवून, शिजवून खाल्ले जाते. त्यामुळं या तापमानाला हा विषाणू जिवंत राहू शकत नाही.
  6. कोंबडीची अंडी खाल्ल्यामुळे हा रोग होऊ शकतो का?अंडी उकडून खाल्ली जातात. त्या तापमानाला हे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे उकडलेली अंडी खाल्ल्यामुळे हा रोग होऊ शकत नाही.
  7. परिसरात मृत पक्षी आढळल्यास काय करावे?आपल्या परिसरात मृत पक्षी आढळल्यास त्वरीत याची माहिती १९१६ या संपर्क क्रमांकावर महापालिकेला द्यावी.
  8. चिकन व अंडी विक्रेते यांनी काय काळजी घ्यावी?चिकन व अंडी विक्रेत्यांनी आपल्या दुकानांची जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी.दुकानात दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.जिवंत पक्ष्यांना हाताळताना मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा.खुराड्यांची संपूर्ण स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.निर्जंतुकीकरणासाठी एक लिटर पाण्यामध्ये ७ ग्रॅम धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) किंवा सोडियम हायपोक्लोराइड/चुनकळीचा वापर करावा.चिकनच्या दुकानांमधील कोंबड्यांचे टाकाऊ पदार्थ गोळा करून कावळे व इतर पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाहीत अशा पद्धतीनं गोळा करून ठेवावेत.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राजीनामा देणार का?; धनंजय मुंडेंनी दिलं 'हे' उत्तर

0

मुंबईः बलात्काराच्या आरोपांनतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी या आरोपांवर सविस्तर भाष्य केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचं सूचक वक्तव्य यांनी केलं होतं. तसंच, पक्षातील इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करुन तातडीने योग्य तो निर्णय घेतला जाईल. असं म्हटलं होतं. त्यामुळं धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची शक्यता निर्माण होत आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमासोबत संवाद साधत भाष्य केलं आहे.

मी स्वतः शरद पावरांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांची वेळ घेतली आणि भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि माझं व्यक्तीगत जे म्हणणं आहे ते मी प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना दिलं आहे, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. शिवाय, राजीनाम्याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील आणि त्याबाबत निर्णय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. याबाबत पक्षातील इतर सहकाऱ्यांशी चर्चा करु आणि पक्ष म्हणून निर्णय घेऊ. याला जास्त वेळ लागेल, असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

0

मुंबईः यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेला खुलासा यामुळं राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरुप गंभीर असून पक्ष म्हणून विचार करावा लागेल, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांनंतर राज्यात राजकारण रंगलं आहे. भारतीय जनता पक्षानं याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसला घेरलं आहे. तर, मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरु लागली आहे. या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा असतानाच शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘धनंजय मुंडे काल मला भेटले. मला भेटून त्यांनी आरोपांची सविस्तर माहिती दिली. प्रकरणात त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले होतील यांचा अंदाज त्यांना होताच म्हणून ते याविरोधात हायकोर्टात गेले. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही,’ असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

‘माझ्या मते आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल,’ असं नमूद करतानाच ‘धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. याबाबत पक्षातील इतर सहकाऱ्यांशी चर्चा करु आणि पक्ष म्हणून निर्णय घेऊ. याला जास्त वेळ लागेल, असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, असं पवार म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली का?, या प्रश्नावर शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्याआधी पक्षातील इतर सहकाऱ्याशी चर्चा करुन निर्णय होऊदेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाट बघण्याची गरज नाही,’ असं पवार म्हणाले आहेत.

नवाब मलिकांवर व्यक्तिगत आरोप नाहीः पवार
यांच्यावर व्यक्तिगत आरोप नाही, आरोप त्यांच्या जावयांवर आहे. अटकही झाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करणं आणि वस्तुस्थिती समोर आणणं गरजेचं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना संबंधितांकडून सहकार्य होईल याची खात्री आहे. गेली अनेक वर्ष नवाब मलिक राजकारणात आहेत. पण त्यांच्यावर कधीच आरोप झालेला नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ब्रिस्बेन कसोटीमध्ये कशी असेल खेळपट्टी, वातावरण आणि कुठे पाहाल लाइव्ह अपडेट, पाहा एकाच क्लिकवर

0

ब्रिस्बेन, : ब्रिस्बेनमध्ये होणारा चौथा कसोटी सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या कसोटीमध्ये खेळपट्टी कशी असेल, पाऊस पडणार की नाही आणि या सामन्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही कुठे पाहू शकता, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एकाच क्लिवर पाहायला मिळतील.

ब्रिस्बेन कसोटी जो जिंकेल त्यांना मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे हा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. या कसोटी सामन्याच्या पाचही दिवशी पाऊ पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या सामन्यात पाचही दिवशी पावसाचा व्यत्यय येणार आहे. पण पावसामुळे या सामन्यातील किती षटके कमी होतील, हे पाहावे लागेल. कारण पाऊस जर जास्त काळ पडला तर सामना अनिर्णीतही राहू शकतो. त्यामुळे या कसोटी सामन्यात किती षटकांचा खेळ होतो आणि त्यामध्ये कोण बाजी मारतं, हे पाहणे सर्वांसाठीच उत्सुकतेचे असणार आहे.

ब्रिस्बेन कसोटीसाठी खेळपट्टीही सर्वात महत्वाची ठरणार आहे. या खेळपट्टीवर चेंडूला जास्त उसळी मिळेल, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर फिरकीपटूंना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळेल, असेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघातील फिरकीपटू नॅथन लायनने हे मैदान चांगलेच गाजवलेले आहे. नॅथनने या मैदानात एकट्याने ३५ विकेट्स मिळवले आहेत. त्याचबरोबर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणइ जोश हेझलवूड या तिघांनी मिळू ७४ बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर १९८८ सालापासून ऑस्ट्रेलियाने या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही जमेची बाजू आहे, असे म्हटले जात आहे.

कुठे पाहाला लाइव्ह अपडेट…जर तुम्हाला या सामन्याचे लाइव्ह अपडेट पाहायचे असतील तर तुम्ही https://maharashtratimes.com/ ला भेट देऊ शकता. तुम्हाला लाइव्ह अपडेटबरोबरच अन्य क्रिकेटच्या महत्वाच्या बातम्याही तुम्हाला पाहता येऊ शकतात. त्यामुळे सामना सुरु झाल्यावर या वेबसाईटला अवश्य भेट द्या…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; निलेश राणेंचं ट्विट चर्चेत

0

मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राज्यातील राजकारण तापले आहे. मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते यांनीही धनंजय मुंडेंबाबत भूमिका मांडली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंयज मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,’ अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून खुलासा केला आहे. त्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करु, असा इशाराच दिला आहे. त्यामुळं यासगळ्या प्रकरणावर अधिक राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts