Monday, December 11, 2023
Home Blog Page 7248

'सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सरकारच बोलत आहे'

0

कोल्हापूर: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला सुप्रीम कोर्टाने जी अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार यांनी ‘सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सरकारच बोलत आहे की काय असे वाटत आहे. कारण या समितीमधील चारही नावे जे आहेत त्या चौघांनी यापूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याचे खुलेपणाने समर्थन केले आहे. ज्यांनी कायद्याचे समर्थन केले आहे, ते नव्याने कोर्टाला व सरकारला काय सुचविणार आहेत.’असा सवाल उपस्थित केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचा निर्णय देणार याचा अंदाज कालच आला होता. परंतु हा एक व्यापक कटाचा भाग आहे का काय याचा संशय आता येत आहे. कारण मुळात शेतकऱ्यांची मागणी हे तीन कृषी कायदे पूर्णपणे मागे घेण्याची त्याचबरोबर हमीभावाचा कायदा नवा करण्याची होती. सुप्रीम कोर्ट नवा कायदा करण्याबद्दल काहींच बोलायला तयार नाही. या तीन कायद्याच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली आणि जी समिती नेमली आहे. या समितीमधील नावे पाहिल्यावर आमच्या मनामध्ये जो संशय येतो, त्या संशयाला पुष्टी मिळते, असंही ते म्हणाले.

‘समितीमधील चारही नावे जे आहेत त्या चौघांनी यापूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याचे खुलेपणाने समर्थन केले आहे. ज्यांनी कायद्याचे समर्थन केले आहे, ते नव्याने कोर्टाला व सरकारला काय सुचविणार आहेत. असा सवाल करत शेट्टी म्हणाले, ‘ म्हणजे एक प्रकारे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलनाला बसणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विश्वासघात आहे. गेल्या दीड महिन्यात आंदोलन करताना सात शेतकऱ्यांनी जीव गमावला. त्या मृतात्म्यांचा हा अपमान आहे. आता स्थगिती दिली आहे, तुम्ही आता उठून घरी जा. महिना दोन महिन्यांनी पुन्हा रिपोर्ट येई तो आम्ही तुमच्या बोकांडयावर हेच कायदे बसवितो असे सरकार म्हणत असेल तर ते शेतकरी ऐकतील असे वाटत नाही. तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा आम्ही देशभरातील सगळे शेतकरी नेते एकत्र येऊन विचार करू आणि पुढचा निर्णय घेऊ.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पंतगाच्या मांजाने गळा चिरल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू

0

नागपूर: नायलॉन मांजाने गळा चिरल्याने २० वर्षीय युवकाचा तडफडून मृत्यू झाला. हृदयाचा थरकाप व अंगावर शहारे आणणारी ही घटना जाटतरोडी भागात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारा घडली.

प्रणय प्रकाश ठाकरे रा. ज्ञानेश्वरनगर,असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी प्रणय व प्रकाश वेगवेगळ्या मोपेडने तहसीलमध्ये जात होते. जाटतरोडी भागात नायलॉन प्रणय याच्या गळ्याला अडकला. प्रणयचा गळा चिरला. गळा चिरताच रक्ताची धार बाहेर निघाली. प्रणय मोपेडवरून खाली कोसळला. त्याच्या वडिलांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेत प्रणय याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून प्रणय याला मृत घोषित केले. इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान मानेवाडा भागात मांजाने २२ वर्षीय युवकाचा हात कापल्या गेल्याची माहिती आहे. सौरभ,असे जखमीचे नाव आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

धनंजय मुंडेंवर आरोप; भाजपनं साधला निशाणा

0

मुंबईः कॅबिनेट मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर महिलेनं केलेले आरोप आणि त्यानंतर मुंडेंनी केलेल्या गौप्यस्फोटामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणात भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. भाजपचे नेते यांनीही सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं अत्याचार केल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व आरोप खोटे असून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच, या महिलेसोबत परस्पर संमतीने संबंध होते. व आम्हाला दोन मुलं असल्याचाही धक्कादायक खुलासा केला होता. धनंजय मुंडे यांच्या या खुलाश्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार टीका केली आहे.

किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ३ महिलांसोबत संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मत्रिमंडळातून बाहेर राहावे, अशी मागणी केली आहे. तसंच, महाराष्ट्राच्या संस्कृती, इथली अस्मितेला धक्का पोहोचला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मिशन व्हॅक्सीन! राज्यात करोना लसीकरणाची तयारी पूर्ण; असा आहे संपूर्ण प्लान

0

मुंबई: राज्यात करोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार असून ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून आज मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्यात ३ हजार १३५ शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली. केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट (NEGVAC)स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार करोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.

लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इ.चा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.

७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

कोवीन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी १७ हजार ७४९ व्हॅक्सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. ७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे १२ जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे.

३ हजार १३५ शितसाखळी केंद्र

राज्यात शितगृहाची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर ३४, महानगरपालिकास्तरावर २७, असे शितगृह तयार असून ३ हजार १३५ शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. वॉक इन कुलर – २१, वॉक इन फ्रिजर -४, आय एल.आर. ४१५३, डिप फ्रीजर- ३९३७ आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १२०० व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे. वरील वॉक इन कुलर, वॉक इन फिजर हे कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, पुणे व नाशिक या विभागीयस्तरावर स्थापित करण्यात आले आहेत.

एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण

आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या

अहमदनगर-२१, अकोला-५, अमरावती-९, औरंगाबाद-१८, बीड-९, भंडारा-५, बुलडाणा-१०, चंद्रपूर-११, धुळे-७, गडचिरोली-७, गोंदिया-६, हिंगोली-४, जळगाव-१३, जालना-८, कोल्हापूर-२०, लातूर-११, मुंबई-७२, नागपूर-२२, नांदेड-९, नंदूरबार-७, नाशिक-२३, उस्मानाबाद-५, पालघर-८, परभणी-५, पुणे-५५, रायगड-७, रत्नागिरी-9, सांगली-१७, सातारा-१६, सिंधूदुर्ग-६, सोलापूर-१९, ठाणे-४२, वर्धा-११, वाशिम-५, यवतमाळ-९ असे एकूण ५११ केंद्र आहेत.

हे ५११ केंद्र राज्यातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महापालिका रुग्णालय याठिकाणी होणार असून त्यामध्ये ११९ ग्रामीण रुग्णालय, ८३ उपजिल्हा रुग्णालय, ६९ वैद्यकीय महाविद्यालय, ५९ नागरी आरोग्य केंद्र, ४३ महापालिका रुग्णालय, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ खासगी रुग्णालय, २२ जिल्हा रुग्णालय, २२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ सामान्य रुग्णालय, ७ महापालिका रुग्णालय, ४ महिला रुग्णालय अशाप्रकारे ५११ लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज्यात करोनामुक्तांचे प्रमाण वाढले; मृत्यूदरही आटोक्यात

0

मुंबईः आज दिवसभरात ३ हजार २८२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट आता ९४. ७७ टक्के इतका झाला आहे. ()

राज्यात पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त रुग्णांचा आकडा अधिक आहे. तर, रिकव्हरी रेटही वाढलेला आहे. त्यामुळं करोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्राला काही अंशी दिलासा मिळाला आहे. आज राज्यात ५० रुग्ण करोनामुळं दगावले आहेत. करोनामुळं प्राण गमावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ५० हजार १५१ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २.५४% टक्के इतका आहे.

आज राज्यात २ हजार ९३६ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ७४ हजार ४८८ इतकी झाली आहे. याउलट आज राज्यात ३ हजार २८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १८ लाख ७१ हजार २७० रुग्णांना डिस्चार्ज मिळाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ७७ टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या ५१ हजार ८९२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३५,००,७३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७४,४८८ (१४.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२७,८७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

लोकल ट्रेन सुरू करा; मुंबईकरांसाठी रोहित पवार मैदानात

0

मुंबई: गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून बंद असलेली केव्हा सुरू होतेय याकडं लाखो मुंबईकर डोळे लावून बसले आहेत. प्रवासी संघटना, नागरी संघटना व राजकीय पक्षही आपापल्या परीनं राज्य सरकारला सूचना करत असून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे देखील आता मुंबईकरांसाठी मैदानात उतरले आहेत. लोकल ट्रेनअभावी होत असलेले मुंबईकरांचे हाल पाहून रोहित पवार यांनीही सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे. ()

रोहित पवार हे काही दिवसांपूर्वी भल्या सकाळी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गेले होते. तिथं त्यांनी माथाडी कामगार व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविषयी अनेकांची मतंही त्यांनी जाणून घेतली. त्यावेळी त्यांना लोकल ट्रेनअभावी माथाडी कामगारांना होणाऱ्या त्रासाचीही जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी लगेचच राज्याचे परिवहनमंत्री यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

वाचा:

रोहित यांनी स्वत: त्या संदर्भातील ट्वीट केलं आहे. ‘लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत #APMC मार्केटमध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती अनिल परब यांना केली आहे,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘चेन्नई पॅटर्न’च्या धर्तीवर मुंबईतही सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार होत आहे. चेन्नई रेल्वेच्या धर्तीवरच मुंबई लोकलमध्ये सर्वप्रथम अत्यावश्यक व त्यानंतर विनागर्दीच्या वेळेत महिलांना प्रवासमुभा देण्यात आली. तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेत प्रवासमुभा देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

माझ्यावरचे बलात्काराचे आरोप खोटे; धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा

0

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केल्यानं एकच खळबळ उडाली होती. अखेर धनंजय मुंडेंनी या आरोपांवर प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुंडे यांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहत या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.

‘एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, २०१९ पासून सदर महिला व त्यांची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मे २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

‘कालपासून तक्रारदार महिलेनं माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत. मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘सदर महिलेनं मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएस रुपी पुरावे आहेत. तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये सदर महिलेच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये,’ अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नव्या प्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp कडून अखेर स्पष्टीकरण, म्हणाले…

0

नवी दिल्लीः च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरून मोठा वाद उभा राहिला आहे. इंस्टेंट मेसेजिंग अॅप गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ चर्चेत आहे. ८ फेब्रुवारी पासून व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. व्हॉट्सअॅपची नवीन अटी शर्थी स्पष्ट असून त्यात म्हटले की, युजर्सचा डेटा फेसबुक सोबत शेयर केला जाणार आहे. यावरून जगभरात अनेक जण व्हॉट्सअॅपला सोडत आहेत. तसेच अनेक जण नवीन मेसेजिंग अॅपच्या शोधात आहेत. परंतु, आता व्हॉट्सअॅपने या वादावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. युजर्सचे मेसेज आणि कॉल सर्व सुरक्षित असल्याचा विश्वास व्हॉट्सअॅपने दिला आहे.

वाचाः

व्हॉट्सअॅपने आपल्या ट्विटमध्ये खासगी मेसेज, ग्रुप चॅट, कॉन्टॅक्ट, कॉल आणि डेटा यासारख्या पॉइंट्सवर जोर दिला आहे. ट्विट मध्ये सांगितले आहे की, फेसबुक आपले प्रायव्हेट मेसेज अॅक्सेस करू शकत नाही किंवा कॉल ऐकू शकत नाही. व्हॉट्सअॅपने हेही शेयर केले आहे की, कंपनी युजर्सच्या कॉलला ट्रॅक ठेवत नाही. तसेच फेसबुक सोबत कॉन्टॅक्ट शेयर करीत नाही. ट्विटमध्ये व्हॉट्सअॅपने हेही सांगितले की, युजरकडून शेयर करण्यात आलेले लोकेशन सुद्धा हाईड केलेले आहे. ग्रुप चॅट सोबत सुद्धा असेच आहे.

वाचाः

व्हॉट्सअॅपने ट्विट मध्ये हेही म्हटले की, युजर मेसेज डिसअपीयरिंग फीचर सेट करू शकते. यासाठी डेटा सुद्धा डाउनलोड करु शकतो. व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी ही फीचर जारी केले होते. ज्यात ७ दिवसांनंतर मेसेज आपोआप डिलीत होतात. व्हॉट्सअॅपने युजर्संना डेटा डाउनलोड करण्याचा ऑप्शन सुद्धा दिला आहे.

वाचाः

ट्विटमध्ये व्हॉट्सअॅपने सांगितले की, कंपनी प्रायव्हेसी पॉलिसी अपडेट केल्यानंतर मित्र आणि फॅमिलीसोबत तुमच्या मेसेजच्या प्रायव्हेसीवर काहीच फरक पडत नाही. व्हॉट्सअॅपने गेल्या आठवड्यात नवीन प्रॉयव्हेसी पॉलिसीवर आपले स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, नवीन पॉलिसी याच्यासाठी आहे की, युजर्स कोणत्या बिझनेस अकाउंटसोबत कम्यूनिकेट करीत आहेत. तसेच पर्सनल चर्चेवर याचा काहीही परिणाम होणार नाही.

वाचाः

व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट ट्विटच्या उत्तरावरून असे दिसतेय की, व्हॉट्सअॅपच्या स्पष्टीकरणावर युजर्स खूष नाहीत. जगभरात अनेक जण व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल आणि टेलिग्रामवर जात आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

भिवंडीत थरकाप उडवणारी घटना; घरात घुसून महिलेवर गोळीबार

0

ठाणे: भिवंडीतील परिसरात एका महिलेवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. (३८) असे या महिलेचे नाव असून तिच्या डोक्यात एक गोळी लागली असून सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाचा:

आज सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान गोळीबाराचा प्रकार घडला असून त्यावेळी ही महिला घरी एकटीच होती. मुलगा बाहेर गेला होता. सकाळी दोघे जण घरी आले. बाचाबाची झाल्यानंतर आरोपींनी महिलेवर गोळीबार केला. एकूण दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी महिलेला लागली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त पी. बी. ढोले यांनी दिली.

वाचा:

महिला बेशुद्ध असून गोळीबार केल्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर स्पष्ट होईल,असे पोलिसांचे म्हणणे आहे. जयश्री या मूळच्या उस्मानाबादच्या आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Vivo Y12s स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

0

नवी दिल्लीः विवोने भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन Vivo Y12s स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर, एचडी प्लस डिस्प्ले यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. स्मार्टफोनला बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या रियलमी सी १५ , रेडमी ९ प्राईम आणि पोको एम २ यासारख्या स्मार्टफोनशी टक्कर मिळणार आहे. जाणून घ्या या फोनसंबंधी.

वाचाः

Vivo Y12s ची किंमत
विवोच्या या फोनला ९ हजार ९९० रुपपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. स्मार्टफोनला ग्लेशियर ब्लू आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध केले आहे. लाँच ऑफर अंतर्गत विवोने बजाज फिनजर्व, होम क्रेडिट, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीबी आणि पाइन लॅब्स सोबत झीरो डाउन पेमेंट ऑप्शन दिला आहे. याशिवाय रिलायन्स जिओ ग्राहक विवा वाय १२ एस खरेदीवर ७ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट देवू शकते.

वाचाः

Vivo Y12s चे खास फीचर्स
विवोच्या या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर, ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज यासारखे फीचर्स दिले आहेत. हँडसेट स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी व २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोन अँड्रॉयड १० बेस्ड फनटच ओएस ११ वर काम करतो.

वाचाः

फोनमध्ये AI Albums आणि iManager सारखे फीचर्स येतात. फोनमध्ये Eye Protection मोड सुद्धा दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4G, VoLTE, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, ग्लोनास, ड्यूल-सिम आणि मायक्रोयूएसबी पोर्ट दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Latest posts