Wednesday, September 27, 2023
Home Blog Page 7264

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' चित्रपटात झळकणार

0

मुंबई: ‘घाडगे अँड सून’ या मालिकेतू घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटातून भाग्यश्रीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. अभिनेता याची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. मिलाप झवेरी दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात भाग्यश्रीची देखील महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे.

‘श्रावणक्वीन’
भाग्यश्रीच्या या प्रवासाला सुरुवात झाली ती २०१४ची मटा श्रावणक्वीन झाल्यापासून. ‘घाडगे अँड सून’मध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली आणि या क्षेत्रातली वाटचाल सुरू झाली.

जॉन तिहेरी भूमिकेत
पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला .जॉन अब्राहम या चित्रपटात दुहेरी नाही, तर चक्क तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. जॉननं यावर सांगितलं, की ‘सिनेमाचे अद्याप काही पात्रांवर काम करत आहेत. मी इतरही भूमिकेमध्ये दिसू शकतो. मात्र, ती कोणती असेल यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'संभाजीनगर' हा उल्लेख CMO साठी नवा नाही! हा घ्या पुरावा

0

अहमदनगर: मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असला तरी हा उल्लेख पूर्वीपासूनच सुरू असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर डिसेंबरमधील मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती देताना काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या नावाने करण्यात आलेल्या ट्वीटमध्येही असा उल्लेख झालेला दिसून येतो.

वाचा:

मुख्यमंत्री बदलल्यानंतर हे ट्विटर हँडल हस्तांरित करण्यात आले. सुरुवातीला त्याच्या प्रोफाइल फोटोवरून चर्चा झाली होती. सुरुवातीला विधानभवन आणि नंतर ठाकरेंचा फोटो त्यावर होता. नंतर माझे कुटंब माझी जबाबदारी मोहीम सुरू झाल्यापासून या मोहिमेचा लोगोच प्रोफाइलवर ठेवण्यात आला आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंतचे ट्वीटस त्यावर उपलब्ध आहेत. तेव्हापासूनच ज्या ज्या वेळी औरंगाबादचा उल्लेख आला आहे, त्यावेळी संभाजीनगर म्हटले आहे. काही वेळा कंसात म्हटले असले तरी अनेकदा केवळ संभाजीनगर असाच उल्लेख आहे.

करोना काळात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधत असत. त्याचे लाइव्ह प्रसारणही याच हँडलवरून केले जाते. त्यातही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख केल्याचे आढळून येते. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकांतूनही मुख्यमंत्र्यांच्या तोंडी संभाजीनगर असाच उल्लेख असल्याचे आढळून येते. एका दौऱ्याची माहिती देणाऱ्या ट्वीटमध्ये उस्मानाबादचा उल्लेखही ‘धाराशीव’ असा केल्याचे दिसून येते.

वाचा:

औरंगाबाद महापालिकेच्या निमित्ताने नामांतराचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. मात्र, हा वाद पेटण्यापूर्वीही सीएमओकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करण्यात आल्याचे आढळून येत आहे. आता याला काँग्रेसचा आक्षेप आहे. मात्र, २ डिसेंबरला मंत्रिमंडळातील एका निर्णयाची माहिती देताना काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या नावाने करण्यात आलेल्या ट्वीटमध्येही संभाजीनगर असाच उल्लेख आलेला आहे. त्यावेळी काँग्रेससह सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

वाचा:

अलीकडे मात्र हा मुद्दा पेटल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना न बोलता माहिती व जनसंपर्क विभागाला जबाबदार धरले आहे. ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये,’ असे थोरातांनी बजावले आहे. त्यानंतरही पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Samsung Galaxy S21 ची प्री-बुकिंग सुरू, ३८४९ रुपयांचा फोन कव्हर फ्री

0

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी १४ जानेवारी रोजी इवेंट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस२१ सीरीजला लाँच करणार आहे. कंपनी नवीन गॅलेक्सी एस२१ सीरीज अंतर्गत Galaxy S21, आणि Ultra स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने गॅलेक्सी एस २१ डिव्हाइसेजसाठी प्री-बुकिंग घेणे सुरू केले आहे. प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी ३ हजार ८४९ रुपयांचा कव्हर फ्री देणार आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा कंपनीची एस सीरीज अंतर्गत लाँच होणारा पहिला फोन आहे जो एस पेन सोबत येणार आहे. आतापर्यंत S-Pen केवळ Galaxy Note आणि Tab सीरीज सोबत येत होता.

वाचाः

Galaxy S21 series च्या फोनला प्री ऑर्डर करण्याची पद्धत.

>> इच्छूकांनी सॅमसंग इंडियाच्या ई-स्टोर www.samsung.com किंवा Samsung Shop App वर जावू शकता.

>> या ठिकाणी युजर्संना बेसिक डिटेल्स जसे, नाव, मोबाइल नंबर, ईमेल आणि पिनकोड भरावे लागणार आहे.

>> आवश्यक डिटेल्स भरल्यानंतर सॅमसंग इंडिया युजर्सला डिव्हाइसला प्री रिजर्व करण्याचा ऑप्शन देणार आहे.

>> Pre-Reserve Now बटनावर क्लिक केल्यानंतर कार्टमध्ये Next Galaxy VIP Pass दिसेल.

>> ग्राहकांना एक वेलकम ई-मेल मिळेल. ज्यात व्हीआयपी पास रिसिव करण्यासाठी स्टेप्स असतील.

>> रिजर्वेशन प्रोसेर पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना २ हजार रुपये द्यावे लागतील.

>> हे २ हजार रुपये फोनच्या किंमतीतून वजा केले जातील.

वाचाः

ग्राहक व्हीआयपी पासला कधीही रद्द करून पूर्ण रिफंड मिळवू शकतात. ग्राहकांना प्री बुकिंग वर ३ हजार ८४९ रुपयांच्या किंमतीचा एक फोन फ्री मिळणार आहे. गॅलेक्सी एस २१ सीरीजला प्री बुक करण्याचा हा ऑप्शन १४ जानेवारी पर्यंत उपलब्ध असणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस २१ आणि गॅलेक्सी एस २१ प्लस प्री ऑर्डर केल्यास ग्राहकांना SmartTag आणि Galaxy Buds Live फ्री मिळणार, असा नुकताच एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. गॅलेक्सी एस २१ सीरीजला १४ जानेवारी रोजी अनपॅक्ड २०२१ इवेंट मध्ये लाँच केले जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठच्या सुमारास या कार्यक्रमाची लाइव्हस्ट्रिमिंग Samsung.com वर सुरू होणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ ठरले!

0

औरंगाबाद: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस येथे हे संमेलन होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष यांनी औरंगाबादमध्ये आज ही घोषणा केली. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकमधून दोन, सेलू येथून एक, पुण्यातून (दिल्लीसाठी)) एक आणि अंमळनेरमधून एक अशी पाच आमंत्रणे आली होती. पुण्याच्या ‘सरहद्द’ संस्थेनं फेर निमंत्रण पाठवलं होतं. त्यात मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. मात्र, महामंडळाने नाशिकमधील लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले होते.

वाचा:

साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं नुकतीच या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला दिला होता. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर आज स्थळ निश्चितीची घोषणा करण्यात आली.

दिल्लीसाठी होता ‘विशेष’ संमेलनाचा प्रस्ताव, पण…

दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद्द संस्थेचे निमंत्रक संजय नहार यांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी एक ‘विशेष’ साहित्य संमेलन घेण्याचा विचार महामंडळ करील, असं नहार यांना सुचवण्यात आलं होतं. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही तसा प्रस्ताव दिला होता. मात्र, संजय नहार यांनी महामंडळाचा हा प्रस्ताव नाकारला, अशी माहिती ठाले-पाटील यांनी दिली.

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ओप्पोच्या सेलला आजपासून सुरूवात, स्वस्तात खरेदी करा 'हे' स्मार्टफोन

0

नवी दिल्लीः नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ई-कॉमर्स वेबसाइट वर आकर्षक डिस्काउंट आणि डिल्स ऑफर केले जात आहेत. अॅमेझॉनवर स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ८ जानेवारी पासून ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Amazon सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

वाचाः

ओप्पोच्या सेलमध्ये HDFC बँक, ICICI बँक आणि SBI बँकेच्या कार्ड्ससोबत शॉपिंग केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि प्रीपेड ऑफर सुद्धा मिळणार आहे. ओप्पोच्या कोणत्या फोनवर किती सूट मिळत आहे. जाणून घ्या.

वाचाः

ला या सेलमध्ये ९ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याची संधी आहे. २० हजार ९९० रुपयांच्या ऐवजी १६ हजार ९९० रुपयांत हा फोन खरेदी करता येवू शकतो. याचप्रमाणे ओप्पो एफ १७ प्रो स्पेशल एडिशनला २६ हजार ९९० रुपयांऐवजी २१ हजार ४९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे.

वाचाः

>> ओप्पो ए५३ हँडसेटला या सेलमध्ये १५ हजार ९९० रुपयांच्या ऐवजी १२ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते.

>> ओप्पो फाइंड एक्स २ ला ६४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनवर अतिरिक्त १३ हजार रुपयांचा प्रीपेड ऑफर दिला जात आहे.

>> AI ड्यूल रियर कॅमेऱ्याचा ओप्पो ए १२ ला ११ हजार ४९० रुपयांत खरेदी करण्याची संधी या सेलमध्ये मिळत आहे. या फोनवर अतिरिक्त २ हजार रुपयांची सूट मिळत आहे.

>> ओप्पो ए १५ स्मार्टफोनला या सेलमध्ये ९ हजार ४९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. हँडसेटला ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय दिला आहे.

>> ओप्पो एफ १७ प्रो ला २१ हजार ४९० रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. याशिवाय ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय आहे.

>> ओप्पो ए ११ च्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनला ८ हजार ४९० रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे.

>> याशिवाय, 4000mAh बॅटरीचा ओप्पो ए१के स्मार्टफोनला ७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. ए१५ एसच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेच्या फोनला ११ हजार ४९० रुपयांत तर ओप्पो एस५ एस ला ८ हजार ९९० रुपयात आणि ओप्पो रेनो ४ प्रोला ३४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते.

>> स्मार्टफोनशिवाय, ओप्पो वॉच सीरीजला सुद्धा या सेलमध्ये १९ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. ओप्पो वॉच २१ दिवसांची बॅटरी लाइफ ऑफर करीत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

>> ओप्पो Enco W11 इयरबड्स ला १९९९ रुपये, Enco W31 ला २९९९ रुपये, Enco W51 ला ४९९९ रुपये, आणि Enco M31 ला १७९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

US Violence LIVE: ट्रम्प समर्थकांचा हिंसाचार; जखमी झालेल्या पोलिसाचा मृत्यू

0

वॉशिंग्टन: अमेरिकन संसद इमारत असलेल्या कॅपिटल हिलमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या हिसांचारा प्रकरणी ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. अमेरिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून ट्रम्प यांच्या गच्छंतीची मागणी होत आहे. जाणून घ्या अपडेट्स:

>> लाइव्ह अपडेट्स:
>> अमेरिकेतील संसदेमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संसद सदस्यांनी पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी

>> ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसाचा मृत्यू

>> वाचा:

>> ट्रम्प यांना पदावरून हटवा, अन्यथा महाभियोग आणणार

> ट्रम्प यांची गच्छंती करा; २००हून अधिक खासदारांची मागणी>

>> वाचा:

> कायद्याने झालेल्या निवडणुकांच्या निकालाबाबत विद्यमान अध्यक्ष बेछूट आणि धादांत खोटे आरोप करीत आहेत. ही घटना देशासाठी अपमानास्पद आणि लाजिरवाणी आहे. ही घटना अचानक घडली, असे आपण मानत असू, तर ती स्वत:चीच केलेली फसवणूक असेल: बराक ओबामा

> संसदेवरील हल्ला आणि जनमताचा आदर करण्याचा प्रयत्न तेच करू शकतात, जे खोट्यावर आधारित आशा बाळगून आहेत. याचा देशाच्या नावलौकिकाला फटका बसून शकतो. : जॉर्ज डब्लू बुश, अमेरिकेचे माजी अध्यक्ष

> ही घटना अत्यंत वेदनादायी आहेत. ही राष्ट्रीय हानी असून ती आपल्या मूळ स्वभावाला धरून नाही. तरीही, आपण पुन्हा एकत्र येऊन शांततेने देशासाठी कायद्याच्या मार्गावर चालू शकतो आणि आपण ते करायलाच हवे. : जिमी कार्टर, अमेरिकेचे माजी अध्यक्ष

>

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

आयपीएलमध्ये १५० कोटींचे मानधन घेणारा महेंद्रसिंग धोनी पहिला खेळाडू, विराट, रोहितला मागे टाकले…

0

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी ठरला होता. पण त्याचा कोणताच परिणाम धोनीच्या मानधनावर झालेला नाही. कारण आयपीएलमध्ये तब्बल १५० कोटी रुपयांचे माधन घेणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरणार आहे.

धोनी हा या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळेच धोनी आयपीएलमध्ये १५० कोटी रुपयांचे मानधन पटकावणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत एवढे मानधन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

धोनीला जेव्हा पहिल्यांदा चेन्नईच्या संघाने संधी दिली तेव्हा त्याचे मानधन सहा कोटी रुपये होते. त्यामुळे तीन वर्षांमध्ये धोनीने १८ कोटी रुपये कमावले होते. तीन वर्षांनंतर धोनीचे मानधन वाढवण्यात आले आणि ते ६ वरुन ८.२८ कोटी रुपये करण्यात आहे. हे मानधन त्याचे तीन वर्षे पुढे कायम राहिले. त्यानंतर धोनीचे मानधन २०१४ आणि २०१५ या वर्षांमध्ये १० कोटी रुपये एवढे होते, त्यामुळे या दोन वर्षांत धोनीने २० कोटी रुपये कमावले. त्यानंतर धोनी जेव्हा पुण्याच्या संघात आला तेव्हा त्याचे मानधन १२.५० कोटी एवढे होते, त्यामुळे दोन वर्षांमध्ये धोनीने २५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

आयपीएलमध्ये २०१८ साली मोठा लिलाव करण्यात आला तेव्हा धोनीचे मानधन प्रत्येक वर्षासाठी १५ कोटी रुपये एवढे होते. चेन्नईच्या संघाबरोबर तो तीन वर्षे खेळला त्यामुळे या कालावधीमध्ये धोनीने ४५ कोटी रुपये कमावले. आतापर्यंत धोनीच्या आयपीएलमधील कराराच्या मानधनाचा विचार केला तर त्याने १३७ कोटी रुपये कमावले आहेत. आता या वर्षीही धोनी खेळणार असून त्याला १५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या वर्षी धोनी आयपीएलमधील १५० कोटी रुपयांचे मानधन पूर्ण करणार आहे. हे फक्त धोनीच्या कराराच्या रक्कमेबाबत आहे. आतापर्यंत धोनीला जे आयपीएलमध्ये बक्षिसं मिळाली त्याचा विचार केला तर नक्कीच धोनीने आयपीएलमध्ये २०० कोटी रुपयांची मिळकत कमावली आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त मानधन हे धोनीच्या नावावर आहे. या यादीमध्ये दुसरा क्रमांक मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा येतो. रोहितने सर्वाधिक जेतेपदे मुंबईच्या संघाला जिंकवून दिली आहेत. आतापर्यंत रोहितने आयपीएलमधील करारामधून १३१ कोटी रुपये कमावले आहेत. आयपीएलमधील आरसीबीचा कर्णधार विराट कोहली या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमधील करारानुसार १२६ कोटी रुपये कमावले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

औरंगाबादचं संभाजीनगर! राऊतांनी सांगितली काँग्रेसची 'मन की बात'

0

मुंबई: औरंगाबादचं ” असं नामांतर करण्याचा वाद सध्या गाजत आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचा नामांतरास विरोध आहे. काँग्रेसच्या या भूमिकेबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार यांनी मात्र वेगळीच माहिती दिली आहे. मनातून काँग्रेस ‘संभाजीनगर’ नावाला सकारात्मक आहे, असा दावा त्यांनी केला आहे. (Sanjay Raut said on )

नाशिकचे माजी आमदार वसंत गिते व भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. औरंगाबादचा मुद्द्यावर त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. त्यात काँग्रेसच्या विरोधाचाही मुद्दा होता. मात्र, काँग्रेस मनातून सकारात्मक आहे, असं ते म्हणाले. नामांतर हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसला तरी लोकभावनेचा आदर करून एखादा निर्णय घ्यायचा नाही असं नाही,’ असंही राऊत म्हणाले.

वाचा:

औरंगाबादच्या नामांतरावर आक्रमक झालेल्या भाजपला राऊत यांनी खडे बोल सुनावले. ‘बिहारमध्येही नावाचा जिल्हा आहे. त्याचंही नामांतर करावं अशी मागणी आहे. भाजपनं यावर भूमिका स्पष्ट करावी, असंही त्यांनी सांगितलं.

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘माझ्यावर कोणताही घाव, वार वा हल्ल्याचा परिणाम होत नाही. नोटिसा म्हणजे सरकारी कागद असतो. त्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल हे ईडी आणि सीबीआय आमच्या मागे लावणाऱ्यांनी लक्षात ठेवावं.’

वाचा:

विधान परिषदेत राज्यपाल कोट्यातील निवडून द्यावयाच्या १२ जागा रिक्त आहेत. त्या जागांसाठी राज्यातील महाविकास आघाडीनं सरकारनं उमेदवारांची शिफारस केली आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचारलं असता, ‘मंत्रिमंडळानं शिफारस केल्यानंतरही सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे. राज्यपालांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नववर्ष भेट! सॅमसंगच्या 'या' दोन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात

0

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत भारतात कपात केली आहे. आणि Galaxy A51 या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने २ हजार रुपयांची कपात केली आहे. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर आता या स्मार्टफोनच्या किंमती नव्याने अपडेट करण्यात आल्या आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए ७१ मध्ये 4500mAh बॅटरी, क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सारखे खास फीचर आहेत. तर गॅलेक्सी ए ५१ मध्ये 4000mAh बॅटरी, क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सारखे खास फीचर देण्यात आले आहेत.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी ए ५१ च्या किंमतीत सुद्धा २ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या फोनला आता २२ हजार ९९९ रुपयांच्या ऐवजी २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची ही किंमत आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला आता २२ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या हँडसेटची किंमत सुद्धा अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए ५१ प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश व्हाइट, हेज क्रश सिल्वर आणि प्रिज्म क्रश ब्लू कलरमध्ये येतो.

वाचाः

Samsung Galaxy A71 चे फीचर्स
हा स्मार्टफोन एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. यात ६.७ इंचाचा (1080×2400 पिक्सल) सुपर एमोलेड प्लस इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. हँडसेटचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सरचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यसाठी यात २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

चे फीचर्स
सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर अॅक्सिनॉस ९६११ प्रोसेसर, ८ जीबी रॅम व १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये १५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 4000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

शिवसेना आज भाजपला देणार मोठा धक्का! 'हे' बडे नेते स्वगृही परतणार

0

मुंबई: पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते व आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Big Jolt to BJP in , Vasant Gite, Sunil bagul to join )

वाचा:

गिते आणि बागूल हे सध्या भाजपमध्ये विजनवासात आहेत. मागील कार्यकारिणीत दोघांकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरून हटवण्यात येऊन पक्षात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे राजकीय वजन वाढविण्यात आले. त्यामुळे ते नाराज होते. अलीकडेच गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना ‘मिसळ पार्टी’ देऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाच ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

वाचा:

गिते व बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये नेते, खासदार यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेऊन गिते व बागुल यांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करणार आहेत. त्यांनतर सायंकाळी ६ वाजता वर्षा बंगल्यावर ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन हाती बांधणार आहेत.

वाचा:

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे. गिते व बागुल यांच्या पक्षांतरानंतर नाशिकमधील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

भाजपला तिसरा धक्का

दोघांच्या शिवसेना प्रवेशामुळं नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपला तिसरा धक्का बसला आहे. भाजपचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळं भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील हे देखील आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts