Wednesday, September 27, 2023
Home Blog Page 7280

सॅमसंग बिग टीव्‍ही ऑफर्सची घोषणा, 'या' टीव्हीवर गॅलेक्‍सी A31 स्‍मार्टफोन 'फ्री'

0

मुंबईः सॅमसंग या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने देशभरातील सर्व ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेलर्समध्‍ये ५५ इंच व त्‍यावरील आकाराच्‍या टेलिव्हिजनच्‍या प्रिमिअम रेंजवर आकर्षक सॅमसंग बिग टीव्‍ही ऑफर्सची घोषणा केली आहे. सॅमसंग बिग टीव्‍ही डेजदरम्‍यान ऑफर्स ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध असतील.

वाचाः

ग्राहक मोठ्या आकाराच्‍या – ५५ इंच, ६५ इंच, ७५ इंच, ८२ इंच आणि ८५ इंच क्‍यूएलईडी टीव्‍ही, क्रिस्‍टल ४के यूएचडी, क्‍यूएलईडी ८के टीव्‍हींच्‍या खरेदीवर खात्रीदायी लाभांसह अद्वितीय ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. तसेच, ग्राहक जवळपास २० टक्‍के कॅशबॅक आणि विस्‍तारित वॉरण्‍टी ऑफर्ससह १,९९० रूपये इतक्‍या कमी ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात.

वाचाः

या कालावधीदरम्‍यान ग्राहकांना ६५ इंच क्‍यूएलईडी टीव्‍ही आणि ७५ इंच क्रिस्‍टल ४के यूएचडी टीव्‍हींवर २२,९९९ रूपये किंमत असलेला सॅमसंगचा गॅलॅक्‍सी A51 स्‍मार्टफोन मिळेल. तसेच ग्राहकांना ५५ इंच क्‍यूएलईडी टीव्‍ही आणि ६५ इंच क्रिस्‍टल ४के यूएचडी टीव्‍हींवर १८,९९९ रूपये किंमत असलेला गॅलेक्‍सी A31 स्‍मार्टफोन मिळेल.

वाचाः

७५ इंच, ८२ इंच व ८५ इंच आकाराच्‍या क्‍यूएलईडी टीव्‍ही खरेदी करणा-या ग्राहकांना निवडक टीव्‍ही मॉडेल्‍सवर ४८,९९० रूपये किंमत असलेला साऊंडबार एचडब्‍ल्‍यू-क्‍यू८००टी किंवा ९९,९९० रूपये किंमत असलेला साऊंडबार एचडब्‍ल्‍यू-क्‍यू९००टी मिळेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'एमआयएम, वंचित'च्या मागे ईडी का लागत नाही?; 'या' नेत्याचा सवाल

0

मुंबई: ‘भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरुद्ध धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, मागे लावली जाते. पण मग एमआयएम, यांच्या मागे का लागत नाही?,’ असा खडा सवाल माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केला आहे. (Eknath Gaikwad on and Action)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून काँग्रेस नेते शिवकुमार लाड यांच्या वडाळा येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते रविवारी झालं. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून होणाऱ्या ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) राजकीय वापरावरही त्यांनी कडाडून टीका केली. ‘एमआयएम आणि वंचितच्या मागे ईडी, सीबीआय का लागत नाही, असा नेमका प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘या पक्षांमुळं भाजपाला फायदा होतो. हे पक्ष काँग्रेसची मतं खातात आणि भाजपला निवडून देतात. निवडून आल्यानंतर भाजप द्वेष आणि जातीयवाद पसरवितो, असा आरोपही त्यांनी केला.

वाचा:

गायकवाड यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. ‘संविधानामुळेच मी पंतप्रधान झालो असं मोदी सांगतात. भाषणात डॉ. आंबेडकरांचं नाव घेतात आणि काम मात्र संविधानाच्या विरुद्ध करतात. त्याविरुद्ध आज कोणताही पक्ष, कोणताही नेता लढताना दिसत नाही. फक्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकटे लढत आहेत. म्हणून राहुल गांधी यांच्या बाजूनं उभे राहा. सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष फक्त काँग्रेसच आहे हे जगाला दाखवून द्या,’ असं आवाहनही त्यांनी केलं.

वाचा:

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. बेस्ट समिती सदस्य राजेश ठक्कर, कार्यालयीन प्रभारी कुतुबुद्दीन सय्यद, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेचे प्रश्न सोडविणार

‘वडाळा येथील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील,’ अशी माहिती यावेळी शिवकुमार लाड यांनी दिली. ‘या कार्यालयात पक्षाचे मंत्री आणि पदाधिकारी जनतेला प्रत्यक्ष भेटतील. त्यामुळं विभागातील समस्या तातडीनं मार्गी लागतील. अशाच प्रकारे मुंबईत प्रत्येक वार्डमध्ये संपर्क कार्यालय सुरू करून जनतेशी संपर्क साधला जाणार आहे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला जात आहे, असंही शिवकुमार लाड यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नागपूरवाले मला 'म्यूट' का करताहेत?; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

0

मुंबई: येथील विधान भवनात विधिमंडळ सचिवालयाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांचं भाषण सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळं इतर सदस्यांना आवाज ऐकू येत नव्हता. हे लक्षात येताच नागपूरवाले मला ‘म्यूट’ का करताहेत,’ असा मिश्किल सवाल त्यांनी केला. त्यांच्या या टिप्पणीवर उपस्थितांमध्ये हंशा पिकला. (CM inaugurates State Legislature Secretariat)

वाचा:

‘सध्याच्या केंद्रीकरणाच्या काळात महाराष्ट्रात विधिमंडळ सचिवालयाच्या कक्षाच्या माध्यमातून विकेंद्रीकरण केले जात आहे. विधिमंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन हा त्याचाच एक भाग आहे,’ असं म्हणत, मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच टोला हाणला. ‘हे कार्यालय सुरू होणं ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. या कार्यालयाच्या निमित्तानं आणि नागपूर जवळं आलं आहे. मागील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नागपूरमध्ये होतो. त्या काळात विधान भवनाच्या वास्तूमध्ये विधिमंडळाचं कार्यालय सुरू असायचं. मात्र, केवळ अधिवेशनापुरतं हे कार्यालय सुरू राहणं हे योग्य नव्हतं. आता बाराही महिने हे कार्यालय सुरू राहील,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा:

‘नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे ही अभिमानाची बाब आहे. हे महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. त्यामुळं विदर्भावर अन्याय होणार नाही, कुणी करत असेल तर आम्ही ढाल बनून उभे राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Realme V15 स्मार्टफोन याच आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्लीः डिसेंबर २०१९ मध्ये रियलमी ने Realme Koi सीरीज येण्याचा दावा केला होता. या सीरीज आधी काही टीजर्सवरून ही माहिती उघड झाली होती की, Realme Koi सीरीजचा अपकमिंग फोन कंपनीचा पहिला फ्लॅगशीप फोन असू शकतो. ज्यात स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर असणार आहे. त्यामुळे रियलमी कोई सीरीजचा पहिला फोन असणार आहे. आता रियलमी चायनाचे प्रसिडेंट शू की यांनी विबोवर यासंबंधीचा खुलासा केला आहे की, रियलमी व्ही १५ स्मार्टफोन ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता लाँच करण्यात येणार आहे.

वाचाः

शू की यांनी रियलमी व्ही १५ चे जे पोस्टर शेयर केले आहे. त्यावरून हे स्पष्ट होत आहे की, फोनमध्ये रियरवर एक जबरदस्त डिझाइन दिली आहे. जी जपानमध्ये मिळणारी Koi ओरनामेंटल फिश वरून इंस्पायर्ड आहे. फोनच्या रियरवर रेक्टांगल शेपच्या कॅमेरा सेटअप मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एलईडी फ्लॅश सोबत दोन लेन्स दिला आहे.

वाचाः

चीनमध्ये मल्टीपल रिटेलर्सकडे प्री बुकिंगसाठी उपलब्ध आहे. एका लिस्टिंगवरून फोनची फ्रंट डिझाइन उघड झाली आहे. फोनच्या पुढच्या बाजुला एक पंच होल डिस्प्ले पाहिला जावू शकतो. शू की यांनी रियलमी Realme V15 च्या फीचर्स संबंधी कोणतीही माहिती शेयर केली नाही. फोनची डिझाइन गेल्या महिन्याभरात लीक झालेल्या फोटोच्या रियरशी मिळतीजुळती आहे. Realme V15 या फोनमध्ये 800U चिपसेट दिला आहे. हँडसेटला ५० वॉट रॅपिड चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत लाँच केले जावू शकते.

वाचाः

याशिवाय, आणखी एका दुसऱ्या रिपोर्टमधून खुलासा करण्यात आला आहे की, नवीन रियलमी फोन्सला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर पाहिले गेले आहे. याचे मॉडल नंबर क्रमशः RMX3092 आणि RMX3093 आहे. लिस्टिंगवरून हेही उघड होत आहे की, या दोन्ही मॉडल्समध्ये डायमेंसिटी ७२० चिपसेट, ८ जीबी रॅम व अँड्रॉयड ११ ओएस दिला जाणार आहे. RMX3092 आणि RMX3093 मॉडल नंबर एकाच फोनचे आहेत, असेही समोर येत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Chhota Rajan : कुख्यात गँगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणात २ वर्षांची शिक्षा

0

मुंबई: मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टानं कुख्यात गुंड याला प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी कोर्टानं दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राजनसह सुमित म्हात्रे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या आणि सुरेश शिंदे यांनाही शिक्षा सुनावली आहे.

हे प्रकरण २०१५ सालचं आहे. नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जमीन खरेदी केली होती. त्या मोबदल्यात एजंट परमानंद ठक्करला २ कोटी रुपये कमिशन देण्याचे ठरले होते. ठक्कर याला आणखी पैसे हवे होते. मात्र, वाजेकर यांनी ते देण्यास नकार दिला होता. ठक्कर याने त्यानंतर छोटा राजन याच्याशी संपर्क साधला. ठक्कर सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे.

छोटा राजनने आपली काही माणसं कार्यालयात पाठवली. तसेच धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी वाजेकरकडे २ कोटींऐवजी २६ कोटी रुपयांची मागणी केली. तसेच वाजेकरला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बांधकाम व्यावसायिकाला छोटा राजननेही दोन वेळा फोन केला होता. मुंबईतील हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला शिक्षा झाली आहे. याशिवाय, दिल्लीत बोगस पासपोर्ट प्रकरणातही राजनला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सॅमसंगचा ४ जीबी रॅमचा स्वस्त स्मार्टफोन ७ जानेवारीला भारतात लाँच होणार

0

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंग आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. सॅमसंगचा स्मार्टफोनला ७ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. या फोनला दुपारी १ वाजता लाँच करण्यात येणार आहे. हँडसेटला अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडिया स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः

सॅमसंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, गॅलेक्सी एम०२ प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीजचा ऑल राउंडर हँडसेट आहे. सॅमसंगच्या या फोनची किंमत स्वस्त असणार आहे. तसेच यात मॅक्स डिस्प्ले आणि मॅक्स परफॉर्मन्स मिळणार आहे. Samsung Galaxy M02s सोबत कंपनी १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक फीचर्स घेवून येत आहे. सॅमसंगच्या Samsung Galaxy M02s या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले असणार आहे. जो जबरदस्त एक्सपीरियंस ऑफर करणार आहे.

वाचाः

Samsung Galaxy M02s मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम दिला जाणार आहे. सॅमसंग १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा ४ जीबी रॅम फोन पहिल्यांदा घेवून येत आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. फोनमध्ये मीडिया स्ट्रिमिंग, गेमिंग, फोटोग्राफी आणि जबरदस्त एक्सपीरियन्स ऑफर करणार आहे.

वाचाः

सॅमसंगच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाणार आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. हँडसेटला १५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh बॅटरी दिली जाणार आहे अशी माहिती आधीच लीक झाली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

'…तर पहिल्याच दिवशी औरंगाबादच्या नामांतराचा ठराव करू'

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औरंगाबादचे नामांतर करण्याचा विषय महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा नसून, आमच्या अस्मितेचा आहे. देशावर आक्रमण केले, सत्ता गाजवली, जुलूम केले, अशा आक्रमकांचे नाव मिरवायचे का, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी सोमवारी राज्य सरकारला केला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी महापालिकेला ठराव करावा लागेल. तिथे आमची सत्ता आल्यास पहिल्या दिवशी आम्ही औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव करू, असेही ते म्हणाले. ( as SambhajiNagar)

वाचा:

पुणे महापालिकेत कोथरूड मतदारसंघ आणि शहरातील नागरी प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून भाजप महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यावर हा फूट पाडण्याचा विषय नसून, आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्याला राजकीय विषय करू नका, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

वाचा:

विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या ठराव करण्यात आला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या वेळी तत्कालीन राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून हा ठराव मागे घेतला. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिकेत नव्याने नामांतराचा ठराव करावा लागेल, त्यानंतर तो राज्य सरकारमार्फत केंद्राच्या नगर विकास विभागाकडे पाठवावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी वाद कशाला घातलाय, अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली.

वाचा:

केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना नामांतर का केले नाही असा प्रश्न विचारला असता, ‘आमच्या वेळेस झाले नाही म्हणून आताही ते होऊ नये असं नाही, असं म्हणत पाटील यांनी वेळ मारून नेली. तर, एनडीएचा घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा नामांतरास विरोध आहे, याकडं लक्ष वेधलं असता, ‘आपल्या देशात प्रगल्भ लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. भाजपच्या कोणाचाही नामांतराला विरोध नाही आणि असू शकत नाही,’ असं ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नवी मुंबई: उघड्यावर लघुशंका करण्यापासून रोखले, तरुणाची हत्या

0

नवी मुंबई: येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यापासून रोखणाऱ्या तरुणाची चौघांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सचिन पाटील (वय ३५) हा शुक्रवारी जखमी अवस्थेत रस्त्यालगत पडलेला होता. जवळच्या रुग्णालयात काही जणांनी त्याला दाखल केले. मात्र, तिथे त्याला तपासणीनंतर मृत घोषित केले, अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिली.

आकाश गायकवाड (वय २०) याचे पाटीलसोबत भांडण झाले होते. पाटीलने आकाशला उघड्यावर लघुशंका करण्यापासून रोखले होते. साठे नगरमध्ये ही घटना घडली. गायकवाड आणि अन्य तिघा मित्रांनी पाटीलला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत तिथेच सोडून पसार झाले, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता, ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ही तर टाटा, बिर्लांची सेना; भाजपचा हल्लाबोल

0

मुंबई: ताज हॉटेलला तब्बल ९ कोटी रुपये दंड माफ करणाऱ्या महापालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षानं सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ‘ही तर टाटा, बिर्लांची सेना आहे,’ असा खोचक टोला भाजपचे आमदार यांनी हाणला आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुलाबा येथील ताज आणि नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी बंद केले होते. गेल्या काही वर्षांत ताज हॉटेलनं बंद केलेल्या पदपथांवर झाडाच्या कुंड्या, तसंच अन्य साहित्य ठेवून अतिक्रमण केलं. त्यामुळं महापालिकेनं हॉटेलला ८ कोटी ८५ लाख रुपये दंड ठोठावला होता. यापैकी ‘ताज’नं ६६ लाख रुपये भरले आहेत. मात्र, आता महापालिकेनं दंडमाफी करत या वादावर पडदा टाकला आहे.

वाचा:

‘ताज’प्रमाणेच ट्रायडंट हॉटेल व मुंबई स्टॉक एक्स्चेंजलाही दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बीएसईला दरमहा भाड्यापोटी दोन लाख १२ हजार याप्रमाणे चार कोटी रुपये दंड, तसेच १५ टक्के व्याजापोटी ६० लाखांहून अधिक रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. नंतर हिशेबात गोंधळ झाल्याचे स्पष्ट करून, दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला. ‘ताज’ला दंडमाफी देताना ट्रायडंट व बीएसईला सूट देण्यात आली नाही. या प्रकरणी महापालिका सभागृहात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षानं प्रशासनाला धारेवर धरलं होतं. हा दुजाभाव का, असा सवाल करण्यात आला होता. तोच धागा पकडून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर कडवट शब्दांत टीका केली आहे.

वाचा:

‘टाटांच्या हॉटेल ताजला ९ कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेनं बीएसईवर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला देता आणि टाटा, बिर्लांना करात सवलती देता. वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!,’ अशी टीका शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

ते समंजस नेते; आझमींच्या त्या भूमिकेवर राऊतांची प्रतिक्रिया

0

मुंबईः औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत दोन गट पडले असतानाच समाजवादी पक्षाचे नेते यांनीही नामांतराला विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानं ही भूमिका घेतल्यानंतर शिवसेना नेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे समजूतदार नेते आहेत. त्यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं ही जनतेच्या मनातली इच्छा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ३० वर्षांपूर्वीच औरंगाबादच नामांतरण केलं आहे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे पाठवला आहे. त्यावर केंद्र अजूनही निर्णय घेत नाही. भाजप नेते यावर का बोलत नाही, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्वांना माहिती आहे. जे नामांतराला विरोध करत आहेत, त्या पक्षांना का भाजप का प्रश्न विचारत नाही? ते शिवसेनेला प्रश्न का करतात?, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts