Monday, December 11, 2023
Home Blog Page 7281

FAU-G गेम 'या' दिवशी होणार लाँच, अक्षय कुमारने शेयर केला जबरदस्त व्हिडिओ

0

नवी दिल्लीः भारतात PUBG वर बंदी घातल्यानंतर भारतीय गेमिंग कंपनी nCORE गेमिंग ने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत मिळून () नावाच्या गेमची घोषणा केली होती. आता या मल्टीप्लेयर गेमची लाँचिंग तारीख समोर आली आहे.

वाचाः

FAUG च्या टीजर्सला आधीही पाहिले गेले आहे. परंतु, आता याचा आणखी एक व्हिडिओ टीजर जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओत भारत आणि चीन यांच्यातील लडाखमध्ये झालेल्या तणावाला दाखवण्यात आले आहे. FAUG गेम येत्या २६ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी डाउलनोड करण्यासाठी उपलब्ध केला जाणार आहे. याआधी जारी करण्यात आलेल्या टीजर मध्ये चिनी सैनिकांसोबत हाणामारी दाखवण्यात आली होती. परंतु, यावेळी असॉल्ट रायफल्सने बेकायदा गोळीबार करताना दोन्ही सैनिकांना दाखवण्यात आले आहे. गेममधील काही संवाद इंग्रजी आणि पंजाबी भाषेत आहेत.

वाचाः

३ मिनिटाच्या या व्हिडिओत गेमचा थीम साँग सुद्धा ऐकायला येतो. तसेच हे साँग बॅकग्राउंडला सुरू असते. या गेमचे डिसेंबर २०२० मध्ये प्री रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले होते. कंपनीचा दावा आहे की, २४ तासांत १० लाख लोकांनी याचे प्री रजिस्ट्रेशन केले आहे. या गेमला केवळ मोबाइल पर्यंत सिमित ठेवण्यात येणार आहे की, याचे पीसी आणि प्ले स्टेशन व्हर्जन सुद्धा लाँच करण्यात येणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या गेमचा ट्रेलर शेयर केला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

…तर महाराष्ट्राचंच नाव बदला; 'या' नेत्याचं उद्धव ठाकरेंना सांगणं

0

मुंबई: ‘औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. त्यामुळं विकास होणार नाही. बदलायचंच असेल तर आधी महाराष्ट्राचं नाव बदला,’ असं आवाहन समाजवादी पक्षाचे नेते यांनी मुख्यमंत्री यांना केलं आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या भलताच गाजत आहे. या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षानं नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे. तर, एनडीएतील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानंही तीच भूमिका घेतली आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही नामांतर योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

वाचा:

सपाचे नेते अबू आझमी यांनी एका व्हिडिओद्वारे उद्धव ठाकरे यांना एक विनंती केली आहे. ‘शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल नवं शहर वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर योग्य नाही. नामांतर करायचंच असेल तर आधी महाराष्ट्र राज्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘महाराष्ट्रात देशभरातून, जगभरातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Samsung Galaxy S21 सीरीजची लाँचिंग डेट कन्फर्म, 'या' तारखेला होणार लाँच

0

नवी दिल्लीः सीरीज या महिन्यात लाँच होण्यासाठी तयार आहे. कंपनीने कन्फर्म केले आहे की, सॅमसंगची नवीन सीरीजला १४ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. लाँच इव्हेंट व्हर्च्युअल असणार आहे. याची लाँचिंग भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठच्या सुमारास सुरू होणार आहे. कंपनीने या इव्हेंटचे अधिकृत इन्वाइट सुद्धा रिलीज केले आहे. यात गॅलेक्सी अनपॅक्डची टॅगलाइन ‘Welcome to the Everyday Epic’आहे.

वाचाः

S Pen सपोर्ट मिळणार
या सीरीज अंतर्गत कंपनी तीन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी S21, गॅलेक्सी S21 प्लस आणि गॅलेक्सी S21 अल्ट्रा लाँच करू शकते. नवीन सीरीज मध्ये कंपनी गॅलेक्सी एस २० सीरीजहून जास्त चांगला कॅमेरा, वैशिष्ट्ये आणि डिझाइन देवू शकते. गॅलेक्सी एस २१ सीरीजचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात एस पेन सपोर्ट मिळणार आहे. आता पर्यंत कंपनी केवळ आपल्या गॅलेक्सी नोट सीरीजमध्ये एस पेन ऑफर करीत होती.

वाचाः

120Hz रिफ्रेश रेट आणि HDR 10+ सपोर्ट
लीक रिपोर्टच्या माहितीनुसार, गॅलेक्सी एस २१ मध्ये ६.२ इंचाचा डायनामिक अमोलेड २ एक्स डिस्प्ले मिळणार आहे. एस २१ प्लस मॉडलमध्ये कंपनी यात ६.७ इंचाचा डिस्प्ले देवू शकते. या दोन्ही डिव्हाइसमध्ये कंपनी 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सोबत फुल एचडी प्लस पॅनल देवू शकते. तसेच कंपनी यात HDR 10+ सपोर्ट सुद्धा ऑफर करू शकते.

वाचाः

लेटेस्ट Exynos प्रोसेसर असणार फोनमध्ये
प्रीमियम फ्लॅगशीप डिव्हाइसमुळे कॉर्निग गोरिला ग्लास विक्टस प्रोटेक्शन सोबत अंडर स्क्रीन अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. लीकच्या माहितीनुसार, डिव्हाइसमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत सॅमसंगचा लेटेस्ट Exynos प्रोसेसर मिळू शकतो. स्मार्टफोन्समध्ये मायक्रोएसडी कार्ड्सचा सपोर्ट मिळणार की नाही, हे आताच सांगू शकत नाही.

वाचाः

वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंग फीचर
ओएस म्हणून फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड One UI 3.1 मिळू शकतो. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की गॅलेक्सी S21 4,000mAh आणि गॅलेक्सी S21+ 4,800mAh ची बॅटरी मिळू शकते. फोनमध्ये २५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. याशिवाय, या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट फीचर मिळू शकते.

वाचाः

S21 आणि S21+ मध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर सोबत एक १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर दिला जावू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

वाचाः

गॅलेक्सी S21 अल्ट्रा मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा या सीरीजचा टॉप अँड स्मार्टफोन असणार आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत दोन १० मेगापिक्सलचा आणि एक १२ मेगापिक्सलचा (अल्ट्रा-वाइड अँगल) सेन्सर मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ४० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट Exynos चा लेटेस्ट चिपसेट मिळू शकतो. याशिवाय, फोनमध्ये ६.८ इंचाचा WQHD+ डिस्प्ले दिला जावू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

सत्तेच्या भुकेपायी राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीला, अमरिंदर सिंह यांची आगपाखड

0

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab Chief Minister Amarinder Singh) यांनी भाजपवर आणि मोदी सरकारवर आगपाखड केलीय. मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा ढासळत असल्याची टीका केलीय. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार अस्थिर करण्याचा खालच्या दर्जाचा प्रयत्न करण्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केलाय. भाजपला ” असल्याची टीकाही अमरिंदर सिंह यांनी केलीय.

भाजपकडून लोकशाही संस्थांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप अमरिंदर सिंह यांनी केलाय. भारतीय संविधानाची अक्षरओळख करून घेण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांनी आमंत्रण दिलंय.

‘मुख्यमंत्री आणि राज्याचा गृहमंत्री म्हणून माझ्या राज्यात कायदे-व्यवस्था राखण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे भाजप नेत्यांना ठावूक नाही का? केंद्रात सत्तेवर असण्यासोबतच लोकशाही संस्थांचं संरक्षक असणाऱ्या पक्षासाठी ही कार्यप्रणाली योग्य नाही’ असं अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय.

सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. हे बंगालमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे तसंच पंजाबमध्येही त्यांचा हाच प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

पंजाब भाजपकडून करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी भाजपवर हा प्रहार केलाय. ‘पंजाब दुसरा पश्चिम बंगाल बनतोय’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडून राज्याच्या मुख्यमंत्री यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करण्यात आलाय.

‘भाजपचा कुत्सित अजेंडा’

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये काही रिलायन्स मोबाईल टॉवरची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून योग्य कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंजाबचे राज्यपाल यांच्यावरही अमरिंदर सिंह यांनी टीका केली होती. तसंच आपल्या कुत्सित एजेंड्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा वापर करण्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला होता.

छोट्या-छोट्या घटनांना मोठं रुप देऊन भाजपकडून शेतकऱ्यांच्या शांतिपूर्ण आंदोलनाला कमकुवत बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अमरिंदर सिंह यांनी केलाय.

जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंद सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी मोहाली पोलीस यांनी एफआयआर दाखल केलीय. ३१ डिसेंबर रोजी मार्गसूचक नकाशांवर धमकी देणारे पोस्टर चिटकवण्यात आल्याचं समोर आलं होतं. यामध्ये अमरिंदर सिंह यांना ठार मारण्यासाठी दहा लाख अमेरिकन डॉलर बक्षीस म्हणून देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; शेजारच्या घरांच्याही काचा फुटल्या

0

नाशिक: नाशिकच्या खुटवडनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या असून मोठं नुकसान झालं आहे.

वाचा:

परिसरातील धनदायी कॉलनी येथे प्लॉट नंबर १२६ येथे सकाळी सातच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलेंडरला आग लागून भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटात घरमालक बळीराम पगार, त्यांची पत्नी पुष्पा पगार, आणि नातू रुहान हे जखमी झाले. स्फोट झाल्या झाल्या आजूबाजूच्या नागरिकांनी तिथं धाव घेतली. तसंच, अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनास्थळी अंबड पोलीस पंचनामा करीत आहेत. स्फोटामध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

WhatsApp युजर्संसाठी जबरदस्त ट्रिक, मित्र-मैत्रिणींचे स्टेट्स व्हिडिओ 'असे' सेव्ह करा

0

नवी दिल्लीः आपल्या युजर्संचा अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी नवीन नवीन फीचर्स आणत आहे. या यादीत कंपनीने काही वर्षाआधी स्टेट्स फीचरची सुरुवात केली होती. या फीचरच्या आगमनाने युजर्संना इंस्टाग्राम प्रमाणे व्हॉट्सअॅपवर आपली पसंतीचे फोटो आणि व्हिडिओ स्टेट्सवर अपलोड करण्याचा ऑप्शन मिळाला होता.

वाचाः

अनकेदा असे होते की, आपल्या एखाद्या कॉन्टॅक्टचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पसंत पडतात. त्याला सेव्ह करण्याचा मोह होतो. फोटो स्टेट्स अपडेट सोबत हे शक्य आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअॅप मध्ये डाउनलोडचा ऑप्शन मिळत नाही. युजर्सची प्रायव्हसी डोळ्यासमोर ठेवून कंपनी प्रोफाइल फोटो, स्टेट्स व्हिडिओ किंवा फोटो डाउनलोड करण्याचा ऑप्शन देत नाही. परंतु, जर तुम्हाला कोणाचे स्टेट्स व्हिडिओ आवडला तर त्याला तुम्ही सेव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपचा वापर करावा लागेल. या ठिकाणी आम्ही तुम्हाला स्टेट्स डाउनलोड करण्याची परवानगी घेण्याआधी एकदा विचार करा.

वाचाः

असे सेव्ह करा व्हॉट्सअॅप स्टेट्स
व्हॉट्सअॅप स्टेट्सला सेव्ह करण्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो करा.

१] सर्वात आधी प्ले स्टोरवरून थर्ड पार्टी अॅप ‘Status Saver- Downloader for WhatsApp’ला इंस्टॉल करा.

२] अॅपला ओपन करा. त्यानंतर त्या फोनच्या स्टोरेजला अॅक्सेस करण्याची परवागनी द्या.

३] आपल्या फ्रेंडच्या स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी मेसेजिंग अॅपमध्ये स्टेट्सला पूर्ण पाहा.

४] स्टेट्सला पूर्ण पाहिल्यानंतर आता स्टेट्स सर्वर अॅपल ओपन करा.

५] अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व पाहिलेले स्टेट्स या ठिकाणी मिळतील.

६] यानंतर तुम्हाला व्हिडिओ किंवा इमेज डाउनलोड करण्यासाठी त्याच्यासमोर देण्यात आलेल्या डाउनलोड आयकॉनवर टॅप करा. हे बटन खालच्या बाजुला असेल.

७] उजव्या बाजुला शेयर करण्याचा एक आयकॉन मिळेल. याच्या मदतीने तुम्ही डाउनलोड करण्यात आलेले स्टेट्सला आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्स म्हणून अपलोड करू शकते. यासोबत तुम्ही ट्विटर, फेसबुक किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर शेयर करू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

कंगनाच्या 'त्या' ट्वीटवरून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडले

0

मुंबई: अभिनेत्री यांच्यावर टीका करताना हिनं केलेल्या एका ट्वीटवरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे. ‘मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा सूत्रधार भारतीय जनता पक्षच होता हे कंगनाच्या ट्वीटवरून सिद्ध झालं आहे,’ असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. अर्थात, या कार्यालयाच्या खरेदीचा राजकारणाशी किंवा शिवसेना प्रवेशाशी अजिबात संबंध नाही, असं खुद्द त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यावरून कंगनानं काल त्यांना टोमणा मारला होता. ‘मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भाजपला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,’ असं ट्वीट तिनं केलं होतं. उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाला उत्तर दिलं होतं. ‘वेळ आणि जागा तू सांग. माझ्या खरेदीच्या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन तुला भेटायला येते. माझ्या व्यवहाराचा राजकारणाशी संबंध नाही हेही तुला दाखवेन, असं उर्मिला यांनी म्हटलं होतं.

वाचा:

उर्मिला व कंगनामध्ये सुरू असलेल्या या वादात काँग्रेसनं उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यांनी कंगनाचं ट्वीट रीट्वीट करत भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘भाजपला खूष करण्यासाठी कंगनाला महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी केली, असं तिनं म्हटलं आहे. हा एक प्रकारचा कबुलीजबाब आहे आणि महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा सूत्रधार भाजप आहे हे यातून स्पष्ट झालंय,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे. ‘भाजपनं नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही. जाहीर निषेध!,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसनं माझं घर तोडून टाकल्याच्या कंगनाच्या आरोपाचाही सावंत यांनी समाचार घेतला आहे. ‘कंगनाचं घर तुटण्याशी काँग्रेसचा अजिबात संबंध नाही. मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात आहे,’ याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

माजी मंत्री व काँग्रेस नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

20

कराड: राज्याचे माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर तालुक्यातील उंडाळे या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Senior Congress Leader and former Minister Passes Away)

वाचा:

विलासकाकांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केलं. पुरोगामी विचारांचे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. तब्बल १२ वर्षे मंत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली होती. सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांचे काम त्यांनी पाहिले होते. सहकार क्षेत्रातही त्यांच्या नावाचा दबदबा होता. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली होती.

वाचा:

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसनं कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं नाराज झालेल्या विलासकाकांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, पराभवानंतरही साताऱ्याच्या राजकारणातील त्यांचं महत्त्व कायम होतं. कालांतरानं त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन पक्षहितासाठी चव्हाण यांच्याशी जुळवून घेतलं होतं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

महापालिका सज्ज! दररोज १२ हजार जणांना देणार लस

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनावरील हाती येण्याची शुभचिन्हे असण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने लसीकरणासाठी पूर्ण तयारी केली आहे. पालिकेने प्रत्येक दिवशी सुमारे १२ हजार मुंबईकरांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ दिवसांत पूर्ण करण्यावरही पालिकेचा भर असेल.

मुंबईत पालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या लसीकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी होणार याविषयीही समस्त मुंबईकरांमध्ये चर्चा आहे. अशा परिस्थितीत पालिकेची लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, मुंबईतील आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्याठिकाणीही आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याची लगबग सुरू आहे.

मुख्य म्हणजे, करोनावरील लस पालिकेस उपलब्ध होताच, त्यानंतर केवळ २४ तासांतच प्रत्यक्ष हाती घेतले जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्पा हाती घेतला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यांत पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर घटकांतील कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. तर, तिसऱ्या टप्प्यांत सुमारे ५० लाख मुंबईकरांना लस दिली जाणार आहे. त्यात ५० वर्षे वयोगटातील ३० लाख नागरिकांचा समावेश असेल. याच टप्प्यात अल्पवयीन मुलांनादेखील लस दिली जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आठ केंद्रांत तयारी
मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी आठ केंद्रे सज्ज केली असून त्यापैकी केईएम, नायर, कूपर, सायन रुग्णालयात दररोज सुमारे दोन हजार व्यक्तींना लस दिली जाणार आहे. वांद्रेतील भाभा रुग्णालय, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील चार केंद्रात दररोज प्रत्येकी एक हजार व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

केंद्रांची संख्या ५०पर्यंत वाढणार

मुंबईत सध्या आठ लसीकरण केंद्रे असून, प्रत्येक विभागात किमान दोन लसीकरण केंद्रे असावेत, असे पालिकेचे धोरण आहे. या केंद्रांची संख्या हळूहळू ५०पर्यंत वाढवण्यात येणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

जिओला टक्कर देण्यासाठी BSNL ने 'या' दोन प्लानला केले रिवाइज

0

नवी दिल्लीः बीएसएनलने नवीन वर्षात युजर्संना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लान आणण्यासोबतच जुन्या प्लानला रिवाइज करण्यास सुरुवात केली आहे. या यादीत आता कंपनीने आपला ३९९ रुपये आणि ५२५ रुपयांचे पोस्टपेड प्लानला रिवाइज केले आहे. या प्लान्समध्ये दर महिन्याला ८५जीबी पर्यंत डेटा ऑफर केला जात आहे. तसचे या प्लानमध्ये कंपनी युजर्संना २५५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर ऑफर करीत आहे.

वाचाः

BSNLचा ३९९ रुपये आणि ५२५ रुपयांचा प्लान
प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी दर महिन्याला ७० जीबी डेटा देत आहे. हा प्लान २१० जीबीच्या रोलओवर डेटा बेनिफिट सोबत येतो. प्लानच्या सब्सक्रायबर्सला देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग करता येवू शकते. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात १०० फ्री एसएमएस दिले जातात. प्लानमध्ये कंपनी कोणतीही अतिरिक्त बेनिफिट देत नाही.

वाचाः

५२५ रुपयाचा मंथली रेंटल प्लानमध्ये कंपनी आता महिन्याला ८५ जीबी डेटा देत आहे. प्लानमध्ये २५५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर बेनिफिट मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस मिळते.

वाचाः

जिओचा ३९९ रुपयांचा प्लान
जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना दर महिन्याला ७५ जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस सोबत येतो. प्लानमध्ये कंपनी १९९ रुपयांचा नेटफ्लिक्स मोबाइल प्लान, ९९९ रुपयांचे अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन आणि ३९९ रुपयांचे डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन देत आहे. प्लानमध्ये २०० जीबी पर्यंत रोलओवर डेटा बेनिफिट मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Latest posts