Wednesday, September 27, 2023
Home Blog Page 7284

उर्मिला मातोंडकर यांनी खरेदी केलं नवं कार्यालय

0

मुंबई: अभिनेत्री यांनी येथे कार्यालय खरेदी केलं आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटी असल्याचं सूत्रांकडून समजतं. मात्र, या व्यवहाराचा राजकारण प्रवेशाशी कुठलाही संबंध नाही, असं खुद्द उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे. ( buys new office for Rs 3.75 crore in Mumbai’s area)

खार पश्चिमेकडील ‘दुर्गा चेंबर्स’ इमारतीत उर्मिला यांनी हे कार्यालय घेतलं आहे. दुर्गा चेंबर्स ही सात मजल्याची इमारत आहे. इमारतीचा दर्शनी भाग काचेचा आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील कार्यालयांचे भाडे महिन्याला ५ ते ८ लाखाच्या मध्ये आहे. इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरासाठी आहे.

वाचा:

उर्मिला यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय खरेदी केलं असून ते सुमारे १०४० चौरस फुटांचं आहे. या जागेचा दर ३६ हजार प्रति चौरस फूट असल्याचं समजतं. राजेश कुमार शर्मा या उद्योजकाकडून उर्मिला यांनी हे कार्यालय खरेदी केलं असून २८ डिसेंबरला हा व्यवहार झाला. याविषयी उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यालयाचा रेडी रेकनरचा दर ४ कोटींहून अधिक आहे. या व्यवहारापोटी उर्मिला यांनी ८०,३०० रुपये मुद्रांक शुल्क भरले असून नोंदणीसाठी ३० हजार रुपये मोजले आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढलेल्या उर्मिला यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. त्यानंतर पक्षांतर्गत मतभेदातून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १२ उमेदवारांमध्ये उर्मिला यांच्या नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

उर्मिला मातोंडकर यांनी खरेदी केलं नवं कार्यालय

0

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री यांनी येथे कार्यालय खरेदी केलं आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटी असल्याचं सूत्रांकडून समजतं. ( buys new office for Rs 3.75 crore in Mumbai’s area)

‘मुंबई मिरर’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, खार पश्चिमेकडील आलिशान ‘दुर्गा चेंबर्स’मध्ये उर्मिला यांनी हे कार्यालय घेतलं आहे. दुर्गा चेंबर्स ही सात मजल्याची इमारत आहे. इमारतीचा दर्शनी भाग काचेचा आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील कार्यालयांचे भाडे महिन्याला ५ ते ८ लाखाच्या मध्ये आहे. इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरासाठी आहे.

वाचा:

उर्मिला यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय खरेदी केलं असून ते सुमारे १०४० चौरस फुटांचं आहे. या जागेचा दर ३६ हजार प्रति चौरस फूट असल्याचं समजतं. राजेश कुमार शर्मा या उद्योजकाकडून उर्मिला यांनी हे कार्यालय खरेदी केलं असून २८ डिसेंबरला हा व्यवहार झाला. याविषयी उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यालयाचा रेडी रेकनरचा दर ४ कोटींहून अधिक आहे. या व्यवहारापोटी उर्मिला यांनी ८०,३०० रुपये मुद्रांक शुल्क भरले असून नोंदणीसाठी ३० हजार रुपये मोजले आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढलेल्या उर्मिला यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. त्यानंतर पक्षांतर्गत मतभेदातून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १२ उमेदवारांमध्ये उर्मिला यांच्या नावाचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

खुशखबर; कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिनला अंतिम मंजुरी, मोदी म्हणाले…

0

नवी दिल्ली: नवे वर्ष सुरू होताच करोना लशीबाबत एकामागोमाग एक खुशखबर मिळताना दिसत आहे. आज भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (DCGI) कोव्हीशील्ड आणि या दोन लशींना अतिंम मंजुरी दिली. या व्यतिरिक्त झायडस कॅडिलाची लस झायकोव्ह-डी च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. ( approves emergency use of and in india)

पंतप्रधान म्हणाले, ‘भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस’

दोन्ही लशींना मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. डीसीजीआयने सीरम इन्स्टीट्यूटच्या आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. भारताचे अभिनंदन. आमच्या सर्व परिश्रमी वैज्ञानिक आणि इनोव्हेटर्सना शुभेच्छा, अशा शब्दांत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केला आत्मनिर्भर भारताचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लशीचा मुद्दा आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी जोडला. ते म्हणाले, ‘ज्या दोन करोनाविरोधी लशींना अंतिम मंजुरी मिळाली आहे, त्या दोन्ही लशी भारतात तयार झालेल्या आहेत आणि हा देशाच्या नागरिकांसाठी अभिमानाचा विषय आहे. यावरून आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आमचे वैज्ञानिक किती परिश्रम घेत आहेत हे दिसून येते.’

जागतिक आरोग्य संघटनेने केले स्वागत

भारतात करोना लसीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्वागत केले आहे. जागतिक आरोग्य संघटना कोविड-१९ च्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत करत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आशिया क्षेत्राच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा- अदार पूनावाला

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे पुण्याचे सीईओ अदार पूनावाला यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. कोव्हिशील्ड, भारताच्या पहिल्या कोविड-१९ लशीला मंजुरी मिळाली आहे. सुरक्षित आणि प्रभावी असलेली ही लस येणाऱ्या आठवड्यांमध्ये रोल-आउटसाठी तयार आहे.’

क्लिक करा आणि वाचा-

‘जराही संशय असता, तर मंजुरी दिली नसती’

जर सुरक्षेशी संबंधित थोडा जरी संशय असता करी कोणत्याही गोष्टीला मंजुरी दिली नसती, असे डीसीजीआयचे संचालक व्ही. जी. सोमानी यांनी म्हटले आहे. ही लस १०० टक्के सुरक्षित आहे. हलका ताप, वेदना आणि अॅलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लशीसाठी एक सर्वसामान्य बाब आहे. लशीमुळे लोक नपुंसक होतील हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही सोमानी यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'अशी' आहे देशातील करोना संसर्गाची ताजी स्थिती, २४ तासांत २१७ मृत्यू

0

नवी दिल्ली: देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे () एकूण १८ हजार १७७ नवे रुग्ण आढळले आहेत. या बरोबरच देशभरात आतापर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या पाहता गेल्या सात महिन्यांनंतर एका दिवसात झालेले सर्वात कमी मृत्यू आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ४९ हजार ४३५ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. ८ जूनला एका दिवसाला २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांनंतर आता दिवसाला २१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (india reports 18177 fresh corona cases and 217 deaths in last 24 hours)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या एकूण २ लाख ४७ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अर्थात हे सक्रिय रुग्ण आहेत. देशात एकूण २.३९ रुग्ण सक्रिय आहेत. तर रिकव्हरी रेट वाढून तो ९६.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ९९ लाख २७ हजार ३१० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या करोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दर १.४४ टक्के इतका आहे. तर, पॉझिटीव्हीटीचा दर आहे १.८९ टक्के. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये एकूण २० हजार ९२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये फक्त १८ हजार १७७ नवे रुग्ण वाढलेले आहेत.

क्लिक करा आणि वाचा बातमी-
देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९९ लाख २७ हजार ३१० इतकी आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये एकूण ९ लाख ५८ हजार १२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत देशात एकूण १७ कोटी ४८ लाख ९९ हजार ७८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

…तेव्हा मोर्चा का काढला नाही?; भाजप आमदाराचा शिवसेनेला सवाल

0

मुंबई: ‘प्रताप सरनाईक यांच्या नंतर आता सक्तवसुली संचालनालयानं () शिवसेनेचे खासदार यांच्या पत्नीला नोटीस पाठवल्यामुळं आक्रमक झाली आहे. ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार यांनी सडकून टीका केली आहे.

नीतेश राणे यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. ‘शिवसेना मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची आणखी मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण आता घरातली उणीदुणी बाहेर निघताहेत म्हणून मोर्चा काढला जात आहे. हाच का महाराष्ट्र धर्म आहे,’ असा सवाल नीतेश राणे यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून ईडीनं शिवसेना नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. टॉप्स सेक्युरिटीशी संबंधित हे प्रकरण होते. या प्रकरणी सरनाईक कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. हे सुरू असतानाच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात समन्स बजावण्यात आलं आहे. केंद्रातील भाजपचे सरकार सूड भावनेतून शिवसेनेचे नेते व आमदारांवर ही कारवाई करत असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. त्या विरोधात शिवसैनिक ५ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक ईडीच्या कार्यालयाबाहेर जमणार असल्याचं सांगितलं जातं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कोल्हापूर महापालिका निवडणूक: प्रत्येक पक्षाने नेमले कारभारी

0

महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्याने सध्या विविध पक्षाचे सूत्रधार कारभारी फारच सक्रिय झाले आहेत. नेत्यांनी निवडणुकीची सूत्रे या कारभारी मंडळींच्या हातात दिल्याने या निवडणुकीत कोण कारभारी लई भारी ठरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तगडा उमेदवार शोधण्यापासून ते विविध प्रभागात तडजोडीचे गणित घालण्यापर्यंतच्या नियोजनात या कारभाऱ्यांची सध्या चांगलीच कसोटी लागत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी भागाभागात नवर्षाच्या शुभेच्छा देत आपली उमेदवारीच जाहीर केली आहे. प्रशासक नियुक्तीपूर्वी या महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. गतवेळीप्रमाणेच यावेळी आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी तशी घोषणाही केली आहे. निवडणुकीनंतर पुन्हा , राष्ट्रवादी व शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे.

वाचा:

आरक्षण जाहीर झाल्याने प्रत्येक पक्ष सध्या प्रभागात तगडा उमेदवार शोधत आहे. हे काम नेत्यांनी कारभारी मंडळींच्यावर सोपवले आहे. काँग्रेसचे सर्व सूत्रे पालकमंत्री पाटील , आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील यांच्या हातात असली तरी त्यांना सध्या सहा कारभारी मदत करत आहेत. राष्ट्रवादीचा मुख्य भार हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. राज्याचा भार सांभाळत या निवडणुकीत पूर्ण वेळ देणे शक्य नसल्याने त्यांनीदेखील काही कारभाऱ्यांना कामाला गुंतवले आहे. आणि ताराराणी आघाडीला बहूमत मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अनेक इच्छुकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी या निवडणुकीची मुख्य सूत्रे माजी खासदार धनंजय महाडिक व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे सोपवली आहेत. त्यांच्यासह अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कारभारी मंडळीची टिम कार्यरत झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावरही शिवसेनेतील धूसफूस कायम आहे. नेते चार आणि त्यांची तोंडे चार दिशेला अशी सध्या या पक्षाची अवस्था आहे. यामुळे सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याबाबत काहीच नियोजन सध्या तरी दिसत नाही. खासदार प्रा. संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले हे शिवसेनेची सूत्रे हलवत आहेत. सध्या तरी नेते आपल्या आपल्या सोयीच्या प्रभागात लक्ष घालत आहेत.

महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्र लढणार असले तरी अनेक प्रभागात छुपी युती करण्यात येणार आहे. काहीही करून भाजप व ताराराणी आघाडीला जादा जागा मिळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्न करणार आहे. सध्या कारभारी मंडळी याचेच नियोजन करत आहेत. त्यादृष्टीने कोणत्या प्रभागात कोणी तगडा उमेदवार द्यायचा आणि कुणी डमी उमेदवार द्यायचा याचीच सध्या चर्चा सुरू आहे. दिवसभर हे कारभारी प्रभागानुसार माहिती गोळा करत आहेत. याच माहितीवर आधारित नेत्यांची पुढे पावले पढत आहेत.

वाचा:

या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असली तरी खरी कसोटी लागणार आहे ती या कारभारी मंडळीची. त्यांना निवडणुकीतील यशावरच पुढील बक्षीस मिळणार आहे. यामुळे लई भारी ठरण्यासाठी या कारभारी मंडळीची धावपळ सुरू आहे.

कारभारी सूत्रधार

काँग्रेस… शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मोहन सालपे, सुभाष बुचडे, तौफिक मुलाणी, राजू साबळे

राष्ट्रवादी… आर. के. पोवार, राजेश लाटकर, अदिल फरास, उत्तम कोराणे, विनायक फाळके

भाजप, ताराराणी, जनसुराज्य आघाडी… सुहास लटोरे, प्रा. जयंत पाटील, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, सुनिल कदम

शिवसेना… रविकिरण इंगवले, शिवाजी जाधव

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'एखादी गोष्ट जमत नसली की शिवसेना पळवाट काढते'

0

मुंबई: औरंगाबादचं ” असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण सध्या तापलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसनं नामांतराला विरोध केल्यानं त्यात भर पडली असून शिवसेना व भाजपमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेला प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगितली आहे. ‘एखादी गोष्ट जमत नसली की शिवसेना पळवाट काढते,’ असा सणसणीत टोलाही त्यांनी हाणला आहे. (Shivena, BJP on as )

वाचा:

महापालिका निवडणूक तोंडावर येताच शहराच्या नामांतराच्या मागणीनं उचल खाल्ली आहे. शिवसेनेनं नामांतराची जोरदार मागणी केली आहे. तर, राज्य सरकारमधील शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेसनं कडाडून विरोध केला आहे. त्यावरून भाजपनं शिवसेनेला घेरलं आहे. शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, असं भाजपनं म्हटलं आहे. त्यास ‘सामना’च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देताना शिवसेनेनं भाजपवरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या आणि औरंगजेब रोडचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड असं नामकरण करताना भाजपनं संभाजीनगरचं नामांतर का शिल्लक ठेवलं? राज्यात व केंद्रात भाजपचं सरकार असतानाही हे का झालं नाही?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला होता.

प्रवीण दरेकर यांनी त्यास उत्तर देताना शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ‘प्रत्येक गोष्टीची एक प्रशासकीय प्रक्रिया असते. एखाद्या शहराचे नामांतर करायचे असल्यास तेथील महापालिकेत प्रस्ताव मंजूर होणं गरजेचं आहे. त्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जातो व नंतर केंद्राकडे जातो. ही प्रक्रिया समजून न घेता प्रत्येक गोष्ट भाजपवर ढकलून मोकळं व्हायचं ही सवय शिवसेनेला लागली आहे. औरंगाबाद महापालिका शिवसेनेकडं आहे. तिथं ठरा करा. राज्य मंत्रिमंडळाकडं प्रस्ताव पाठवा आणि मग तिथून केंद्राकडं पाठवा. तिथं काही मदत लागल्यास भाजप नक्कीच करेल. मात्र, काँग्रेसनं नामांतराला विरोध केलाय. त्यामुळं शिवसेनेची अडचण झालीय. त्यापासून पळवाट म्हणून भाजपला दोष देताहेत,’ असं दरेकर म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

काय घडले 'त्या' पार्टीत? जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणाचे गूढ वाढले

0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीत या तरुणीची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या आणि दिया पडळकर यांची ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, पार्टीत सहभागी झालेल्यांच्या जबाबातून वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने नेमके त्या पार्टीत काय घडले, याचा शोध पोलिस घेत आहेत. ही हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली आहे का, याबाबतही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खार येथील ‘भगवती हाइट्स’ या इमारतीच्या गच्चीवर ३१ डिसेंबरला पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये जान्हवी, श्री, दिया यांच्यासह इमारतीमध्ये राहणारे; तसेच त्यांची मित्र मंडळी उपस्थित होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे, अशी माहिती मिळाल्यावर खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीमध्ये श्री आणि दिया यांनी केलेल्या मारहाणीत जान्हवी हिचा मृत्यू झाल्याचे समोर येताच हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली. शनिवारी न्यायालयाने दोघांना सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जान्हवीला इतक्या क्रूरपणे का मारण्यात आले, याचा तपास पोलिस करीत आहेत. जान्हवी आणि श्री यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते, अशी माहिती पुढे येत आहेत. मात्र श्री याला दियासोबत पाहून तिचा राग अनावर झाला आणि त्यातूनच तिघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात आहे. गच्चीवरील पार्टीतून श्री आणि दिया बाहेर पडताच जान्हवी त्यांच्या मागोमाग आली. शिड्यांवरून खाली उतरत असताना तिघांमध्ये जोरदार झटपट झाली. या वेळी केस धरून डोके आपटल्याने जान्हवीचा मृत्यू झाला. यामध्ये श्री आणि दिया हेदेखील जखमी झाले. श्री याला सायन, तर दिया हिला हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी गेले, अशी माहिती पार्टीतील काहींनी दिली. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती देत असल्याने नेमके काय घडले, याचा शोध पोलिसही घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कोल्हापूर: शिक्षण संस्थेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना कोंडले

0

म. टा. प्रतिनिधी,

संस्थाचालकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनाच कोंडून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. नूतन आमदार प्रा. यांनी या शिक्षकांची सुटका केली. शिक्षकांना कोंडलेल्या या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू होती.

कोल्हापुरातील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव व संस्थेतील शिक्षक यांच्यात गेले काही दिवस वाद सुरू आहे. जाधव यांच्यावर अरेरावीचा आरोप करत हे शिक्षक रस्त्यावर उतरले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनाही संस्थेत गेल्या. त्यावेळी संस्थाचालक व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीमध्ये जोरदार वाद झाला. याच दरम्यान, शिक्षकांनी संघटनांना काहीही माहिती देऊ नये म्हणून शिक्षकांना एका वर्गात कोंडून घातल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे गोंधळात आणखीन भर पडली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शाळेत जाऊन शिक्षकांची सुटका केली. तसेच याप्रकरणी संस्थाचालकांना खडेबोल सुनावले. दोन तासहून अधिक वेळ गोंधळ सुरू होता.

वाचा:

याप्रश्नी सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीचे पदाधिकारी शनिवारी सकाळी संस्थेच्या कार्यालयावर मूकमोर्चा काढला. शाळेसमोर मोर्चा येताच माध्यमिक शाळेतील काही शिक्षकांना संस्थाचालकांनी ते शिक्षक आंदोलनात सहभागी होऊ नयेत म्हणून कोंडून ठेवल्याचे कृती समितीला समजले.

दरम्यान, संस्थेच्या उपाध्यक्ष व माजी मुख्याध्यापिका सुमित्रा जाधव यांनी सांगितले की, ‘माध्यमिक शिक्षकांना शाळेत कोंडले नव्हते. पोलिसांच्या सुचनेनुसार त्यांना शाळेच्या आवारातच थांबायला सांगितले होते. सगळेजण गेटच्या आतील बाजूला होते. शिवाय शाळेतील शिक्षकांकडून संस्थाचालकावर जे आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नाही.’

शिक्षक उभे राहिले शिक्षकांच्या पाठिशी

श्रीधर सावंत विद्यामंदिरमधील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. कोल्हापूर जिल्हा शैक्षणक व्यासपीठाचे एस. डी. लाड, संस्थाचालक संघटनेचे वसंतराव देशमुख, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, राजेश वरक, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, विलास पिंगळे, सी. एम. गायकवाड, सुनील गणबावले, मनोहर सरगर, दिलीप माने, कृती समितीचे पदाधिकारी अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, संभाजी जगदाळे, लहू शिंदे, अंजूम देसाई, शिक्षक संघटनेचे आनंदा हिरुगडे, अजित पाटील, गजानन काटकर, सुधाकर निर्मळे, कुमार पाटील, द्रोणाचार्य पाटील, अनिल सरक, टी. आर. पाटील, महादेव डावरे यांच्यासह शहरातील विविध शाळेतील शिक्षकांचा आंदोलनात सहभाग होता.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शेतकऱ्यांवर दया करा!; पंतप्रधान मोदींना 'या' मंत्र्याचे आर्जव

0

कोल्हापूर: हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतही दिल्लीत आंदोलक ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची मागणी मान्य करुन त्यांच्यावर दया करावी आणि आंदोलन संपवावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री यांनी केले आहे. ( Latest News )

वाचा:

गडहिंग्लजमध्ये सलोखा परिषदेच्यावतीने आयोजित सर्वपक्षीय शेतकरी आंदोलनाला मंत्री मुश्रीफ यांनी भेटून पाठींबा दिला. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘पिकांना हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करार शेतीची भीती वाटत आहे. त्यामुळेच, शेतकरी काळ्या कायद्याच्या विरोधात गेले महिनाभर थंडी वाऱ्याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत.’

‘एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हरताळ फासत शेतकरी विरोधी निर्णय घेणारे व आंदोलनाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारे पंतप्रधान दुसरीकडे मात्र मधून मुक्त चिंतन करताना दिसत आहेत. एकदा गुजरातमधून, एकदा आंध्रातून मन की बात मधून बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांशी बोलायला मात्र अपमान वाटत आहे’, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी टीका केली. कुठलाही कायदा तयार करत असताना त्याच्यावर समर्पक चर्चा व्हायला हवी कारण अशा कायद्यामुळे संबंधित घटकावर दूरगामी परिणाम होत असतात, असेही ते म्हणाले.

वाचा:

यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रा. किसनराव कुराडे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाळेश नाईक, रफिक पटेल, रमजान आत्तार, अरविंद बारदेस्कर, साताप्पा कांबळे, मनोहर दावणे, जे. वाय. बारदेस्कर, संपत देसाई, दळवी वहिनी, सिद्धार्थ बन्ने, सुरेश ठरकार, महेश सलवादे, गुंडेराव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदींच्या किसान सन्मानपेक्षा ‘ही’ योजना लाभदायी!
मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान योजनेत शेतकऱ्याला महिन्याला पाचशे प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. केडीसीसी बँकेकडून तीन लाखापर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी देणार असून शेतकऱ्यांनी ही रक्कम बँकेत ठेवली तर त्याची व्याजाची रक्कम पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या किसान सन्मान योजनेतील रकमेपेक्षा चौपट होते. एक लाखाला आठ हजार व्याज, दोन लाखाला सोळा हजार व तीन लाखाला २४ हजार असा व्याजाचा चौपट लाभ शेतकऱ्यांना होईल, असेही ते पुढे म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts