Monday, December 11, 2023
Home Blog Page 7285

सुजय विखे पाटील भडकले! म्हणाले, आता राजीनामाच देतो!

0

नगर: लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. यांचा विजय सुकर करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या राहुरीतील सहकारी साखर कारखान्यापुढील अडचणी संपायला तयार नाहीत. कर्जपुरठा आणि अन्य प्रश्न सोडवून गाळप हंगाम सुरू केला खरा पण त्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. कारखाना वारंवार बंद का पडतो, याची पाहणी करण्यासाठी विखे गेले असता बॉयलरमध्ये चक्क साखरेची पोती आढळून आली. हा खोडसाळपणा पाहून विखे संतापले आणि ७२ तासांत कारभार सुधारला नाही तर आपण संचालक मंडळासह राजीनामा देऊ अशी घोषणाच त्यांनी केली. ( )

वाचा:

येथील हा कारखाना विविध कारणांमुळे बंद पडला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. विखे यांनी त्यामध्ये लक्ष घातले. कामगारांचे प्रश्न सोडविले, जिल्हा सहकारी बँकेत विरोधकांशी जुळवून घेत कर्ज मिळवून दिले. निवडणुकीत लक्ष घालून आपले मंडळ निवडून आणले. बंद पडलेला कारखाना सुरू झाला. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे यांना राहुरी तालुक्यात चांगला फायदा झाला. त्यानंतरही विखे यांनी हा कारखाना सुरळीत चालू ठेवण्यावर भर दिला. पदाधिकाऱ्यांमध्ये अवश्यक ते बदल केले. स्वत: विखे तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत.

वाचा:

यावर्षीही कारखाना सुरू झाला आहे. मात्र, वारंवार व्यत्यय येऊन गाळप बंद पडून नुकसान होत आहे. पुढील वर्षी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यावेळी याचा फटका बसू शकतो. शिवाय विखे यांनी लोकसभा निवडणुकीपुरतेच लक्ष घातले होते, असे आरोपही मधल्या काळात होऊ लागला होता. त्यामुळेच नेमकी काय अडचण होत आहे, याची पाहणी करण्यासाठी डॉ. विखे यांनी शनिवारी कारखान्याला भेट दिली. पदाधिकारी आणि कामगारांची बैठक घेतली. त्यानंतर बॉयलरमध्ये त्यांना साखरेची पोती आढळून आली. हा प्रकार आपोआप किंवा तांत्रिक बिघाडामुळे मुळीच होऊ शकत नाही. हा कोणी तरी केलेला खोडसाळपणा आहे. याची चौकशी करा, संबंधितांवर कारवाई करा, कारखाना सुरळीत सुरू करा, अन्यथा आपण कारखान्याच्या पदाधिकारी, संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशा इशाराच विखे यांनी दिला आहे. एवढे प्रयत्न करूनही कारखाना सुरळीत चालत नसल्याने विखे यांचा हा संताप झाल्याचे पहायला मिळाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

महाराष्ट्रातील 'या' भागात भूकंपाचे धक्के; कोणतीही हानी झाली नसली तरी…

0

धुळे: जिल्ह्यातील शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवारी दुपारी एक वाजून २४ व २६ मिनिटांनी अनुक्रमे ३.२ व २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू शहादा तालुक्यातील येथून २४ कि.मी. अंतरावर असलेल्या व महाराष्ट्रच्या सीमेवरील पानसेमल व खेतीया या दोन्ही गावांच्या मध्यभागी असल्याची माहिती भूमापन केंद्र सावळदा यांनी दिली आहे. ( )

वाचा:

शहादा शहरातील सोनार गल्ली भागात शनिवारी दुपारी अचानक मोठा आवाज झाल्याने व्यावसायिकांसह परिसरातील नागरिक घरातून बाहेर रस्त्यावर आले होते. दिवसभर सोशल मीडियावर ग्रामीण भागातही भूकंपाचे धक्के व आवाज जाणवल्याचे मेसेज फिरत होते. तालुक्यातील सावळदा येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली असून, दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी सुमारे ३.२ व दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी २.२६ रिश्टर स्केल असे दोन धक्के जाणवले आहेत. शहरापासून सुमारे २४ किलोमीटर दूर असलेल्या मध्य प्रदेशातील पानसेमल व खेतीया या दोन्ही गावांचा मध्यभाग हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती भूकंपमापन केंद्राने दिली आहे. या धक्क्यामुळे कुठलेही नुकसान झाले नसले तरी दिवसभर प्रशासनाला ग्रामीण भागातील नागरिकांचे फोन येत असल्याची माहिती शहादाचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

वाचा:

भूकंपाची माहिती मिळताच त्वरित परिसराची पाहणी आम्ही केली आहे. स्थानिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये. कोणतीही अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शक्यता जाणवल्यास तातडीने मोकळ्या जागेत यावे आणि इमारती, भिंतीपासून दूर राहावे, असे आवाहनही डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. तर शहादा तालुक्यात काही गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्याचे शहादा येथील भूकंप मापक केंद्राचे अधिकारी दिलीपसिंग ओंकारसिंग जाधव यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवीला पाकिस्तानात अटक

0

लाहोर: मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी ( arrested) याला शनिवारी पाकिस्तानात अटक करण्यात आली. लखवीला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लखवी हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर असून त्याचे हाफिझ सईदनंतर दहशतवादी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. लखवी मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणी (Mumbai Attack) २०१५ पासून जामिनावर आहे. त्याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाने (CTD) अटक केली आहे. (zakiur rehman )

मात्र, लखवीला कोठून अटक करण्यात आली आणि त्याला कोठे ठेवण्यात आले आहे याबाबच पाकिस्तान सरकारची तपास यंत्रणा माहिती द्यायला तयार नाही. पंजाबच्या दहशतवाद विरोधी विभागाने गुप्त माहितीवर आधारित अभियानानंतर प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकी उर रहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली.

कारवाईच्या मागे एफएटीएफचा दबाव तर नाही?
या अटकेमागे दहशतवादी फंडिंगच्या विरोधात काम करणारे जागतिक संघटन फायनॅन्शियल अॅक्शन टास्कफोर्सचा (FATF) दबाव असल्याचेही मानले जात आहे. टेरर फंडिंगच्या विरोधातील पाकिस्तानची कारवाई पुरेशी नसल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. या संघटनेला ग्रे यादीत ठेवले असल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. पाकिस्तानने जर दहशतवादी फंडिंगविरोधात कारवाई केली नाही, तर त्याला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. या अंतर्गत पाकिस्तानला अनेक प्रकारच्या वित्तीय प्रतिबंधांना समोरे जावे लागणार आहे.

दहशतवादी फंडिंगच्या रकमेतून चालवायचा डिस्पेन्सरी

लखवीवर दहशतवादी फंडिंगद्वारे मिळालेल्या पैशांद्वारे एक डिस्पेंसरी चालवण्याचा आरोप असल्याचे सीटीडीचे म्हणणे आहे. तो डिस्पेन्सरी चालवून मिळालेली रक्कम पुन्हा दहशतवादी कारवायांसाठी खर्च करतो. दहशतवादी फंडिंगद्वारे मिळालेली रक्कम तो व्यक्तिगत वापरासाठी देखील खर्च करतो. लखवी प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. तसेच लखवी संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी आहे. त्याच्या विरोधात लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टात खटला चालवला जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोना लशीसंदर्भात महत्त्वाची घोषणा? DCGI नं बोलावली पत्रकार परिषद

1

नवी दिल्ली : देशातील करोना लशीसंबंधी महत्त्वाची माहिती देण्यासाठी ” (DCGI) कडून रविवारी सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी, देशभरात तयारी करण्यात आलेल्या करोना लशीकरणा संदर्भातील महत्त्वाची माहिती जाहीर केली जाऊ शकते.

देशाला मिळाली पहिली स्वदेशी करोना लस

उल्लेखनीय म्हणजे, भारतात सहा वेगवेगळ्या करोना लशींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. यामध्ये आणि यांचाही समावेश आहे. दरम्यान, १ जानेवारी रोजी ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ आणि ‘अॅस्ट्रेजेनेका’ कडून विकसित करण्यात येत असलेल्या ‘कोविशिल्ड’ या लशीला भारतात आपत्कालीन परिस्थितीत वापराची परवानगी देण्यात आलीय. कोविशिल्ड ही लस भारतातील लस निर्माता कंपनी ” (SII) कडून केलं जाणार आहे. त्यानंतर शनिवारी २ जानेवारी रोजी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून (CDSCO) ”च्या ‘कोवॅक्सिन’च्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याची शिफारस केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

लशीसंदर्भातील अखिलेश यादवांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अब्दुल्ला म्हणतात…

0

श्रीनगर : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यावद यांनी शनिवारी करोना लशीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यानंतर एका संवेदनशील विषयाचं राजकारण सुरू झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय. यांनी करोना लशीला उल्लेख ‘भाजपची लस’ असा केला होता. त्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलंय.

‘लशीचा संबंध मानवतेशी…’

‘कोविड १९ लशीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही तर या लशीचा मानवतेशी संबंध आहे’ असं मत उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलंय.

‘मी इतर कुणाबद्दल बोलू शकत नाही परंतु, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी आनंदानं कोविड लस घेईल’ असं ट्विट उमर अब्दुल्ला यांनी केलंय.

जितके जास्त लोक लस घेतील, तेवढंच देश आणि अर्थव्यवस्थेसाठी उत्तम होईल, असं नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

‘कोणत्याही लशीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तर या लशीचा संबंध मानवतेशी आहे. संवेदनशील व्यक्तींना लवकरात लस देण्यात मिळाली तर ते अधिक चांगलं ठरेल’ असं ट्विट अब्दुल्ला यांनी केलंय.

‘आम्ही भाजपकडून लशीकरण करून घेऊ शकत नाही. आम्ही जेव्हा २०२२ मध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून सत्तेवर येऊ तेव्हा मोफत लशीकरण करू. भाजपद्वारे लशीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या लशीवर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही’ असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शिवसेना मुखपत्राची भाषा भाजपला झोंबली; 'ते' नाव टाळून पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र!

0

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधून पंतप्रधान व भाजपच्या अन्य नेत्यांबद्दल वापरण्यात येत असलेल्या भाषेवर प्रदेशाध्यक्ष यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’च्या संपादक यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. दरम्यान, पाटील यांनी शुक्रवारीच माध्यमांशी बोलताना अशाप्रकारची तक्रार आपण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी हे पत्र रश्मी यांना पाठवले आहे. ( Update )

वाचा:

चंद्रकांत पाटील यांनी रश्मी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मोजक्या आणि नेमक्या शब्दांत तक्रार आणि विनंतीही केली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय नेते तसेच भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरण्यात येत आहे. या पत्रातून मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वासाठी आपण संपादक म्हणून जबाबदार आहात. मी आपणास एक व्यक्ती म्हणून चांगला ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल. आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करू इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा’, असे चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे. ‘रश्मी वहिनी’ असा उल्लेख करत पाटील यांनी हे पत्र लिहिलं असून त्यांची तक्रार ‘सामना’चे कार्यकारी संपादक यांच्याबद्दल असली तरी त्यांचा उल्लेख मात्र पाटील यांनी पत्रात केलेला नाही.

वाचा:

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना अशी तक्रार आपण करणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून संजय राऊत यांनी पाटलांना टोलाही लगावला होता. चंद्रकांतदादा जर रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असतील तर विलंब न लावता ताबडतोब त्यांनी ते लिहावे, असे राऊत म्हणाले होते. बापरे ते पत्र लिहित आहेत. मला त्यांची भीती वाटत आहे, अशी खिल्लीही राऊत यांनी उडवली होती. चंद्रकांत पाटील कालपर्यंत सामना वाचत नव्हते. ते आता सामना वाचू लागलेत ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी रोज आमचा पेपर वाचला पाहिजे. त्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, अशी टोलेबाजीही राऊत यांनी केली होती. आता पाटील यांनी रश्मी यांना पत्र लिहिल्यानंतर राऊत कोणती प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोना लशीला राजकीय रंग; अखिलेश यादव यांच्या माफीची मागणी

0

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे () अध्यक्ष यांनी करोना लशीसंबंधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एकच गदारोळ उठलाय.

‘भाजपच्या लशीवर कसा विश्वास ठेवायचा?’

‘आम्ही भाजपकडून लशीकरण करून घेऊ शकत नाही. आम्ही जेव्हा २०२२ मध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून सत्तेवर येऊ तेव्हा मोफत लशीकरण करू. भाजपद्वारे लशीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या लशीवर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही’ असं वक्तव्य करत अखिलेश यादव यांनी लशीचं राजकारण सुरू केलं.

भाजपकडून टीकेची झोड

अखिलेश यादव यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपकडून मात्र कठोर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. आरोग्याशी संबंधीत मुद्यावर राजकारण करण्यावरून नेत्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीकेची झोड उठवली.

‘एक तरुण नेता कोविड लशीला एखाद्या राजकीय पक्षाशी जोडत आहे, हे पाहणं खूपच दुर्दैवी आहे. ते राजकारणाव्यतिरिक्त दुसरं काहीही विचार करू शकत नाहीत, हेच ते दर्शवत आहेत’, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय.

तर, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी हा देशातील डॉक्टरांचा आणि वैज्ञानिकांचा अपमान असल्याचं म्हटलंय. ‘अखिलेश यादव यांना लशीवर विश्वास नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला त्यांच्यवर… देशातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांचा अपमान करण्यासाठी अखिलेश यादव यांनी माफी मागायला हवी’, असं मौर्य यांनी म्हटलंय.


अखिलेश यादव यांचं स्पष्टीकरण

चहुबाजुंनी टीका झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिलंय. ‘आपल्याला देशातील तज्ज्ञांवर पूर्ण विश्वास आहे परंतु, भाजप सरकारच्या उपचार व्यवस्थेवर नाही, जी करोना काळात ठप्प पडली होती. आम्ही भाजपची राजकीय लस टोचून घेणार नाही’ असं म्हणतानाच सपा सत्तेत आल्यनंतर सर्वांना मोफत करोना लस देईल या आपल्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

लशीकरणाच्या हालचालींना वेग

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं मकर संक्रांतीपासून प्रदेशात करोना लशीकरण प्रक्रिया सुरू केलं जाऊ शकतं, असं जाहीर केलंय. राज्यातील सहा जिल्ह्यांत ड्रायरन सुरू आहे आणि मकर संक्रांतीपासून राज्यात जनतेसाठी लशीकरण प्रक्रिया सुरू होऊ शकते, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोनाविरुद्ध खुशखबर, पहिली स्वदेशी लस 'कोवॅक्सिन'ला मंजुरी

0

नवी दिल्ली : देशवासियांना नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच करोना लशीसंबंधी खुशखबर मिळालीय. तज्ज्ञांच्या समितीनं आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी पहिल्या-वहिल्या स्वदेशी देण्याची केलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून () ही शिफारस करण्यात आलीय. ”च्या ”च्या वापरास मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आलीय.

त्यामुळे, मकरसंक्रांतीच्या दिवशी अर्थात १४ जानेवारीपासून देशात करोनाविरुद्ध लशीकरण मोहिमेसाठी सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही शक्यता व्यक्त केली जातेय.

सलग दुसऱ्या दिवशी लशीला मंजुरी

यापूर्वी काल वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ आणि ‘अॅस्ट्रेजेनेका’ कडून विकसित करण्यात येत असलेल्या ‘कोविशिल्ड’ (Oxford University and AstraZeneca’s Covid vaccine Covishield) या लशीला भारतात आपत्कालीन परिस्थितीत वापराची परवानगी देण्यात आलीय. कोविशिल्ड ही लस भारतातील लस निर्माता कंपनी ‘सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ (SII) कडून केलं जाणार आहे.

महाराष्ट्रातील पुणे स्थित सीरम इन्स्टिट्युट लस उत्पादनाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे कोविशिल्ड ही देशात निर्माण होणारी लस आहे तर कोवॅक्सिन ही लस भारतातच विकसितही करण्यात आलीय तसंच त्याचं उत्पादनही भारतातच होणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या सहाय्यानं ‘भारत बायोटेक’कडून ही लस विकसित केली जातेय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अमित शहांवर टिप्पणी, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला अटक

0

इंदूर : मुनव्वर फारुकी (Stand Up Comedian ) याला मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये अटक करण्यात आलीय. इथे आयोजित करण्यात आलेल्या एका कॉमेडी शोमध्ये यानं हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय.

भाजप कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचा व्हिडिओ

उल्लेखनीय म्हणजे, भाजप आमदाराच्या मुलानं या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून हजेरी लावत या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूट केला. तसंच कार्यक्रम मध्येच थांबवून कॉमेडियन आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कार्यक्रमाचा व्हिडिओ पुरावा म्हणून देत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुनव्वर फारुकी आणि इतर चार जणांना अटक केलीय.

काय घडलं नेमकं?

इंदूरच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी नववर्षा निमित्तानं एका कॉमेडी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला स्थानिक भाजप आमदार यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड (३६ वर्ष) हा देखील आपल्या साथीदारांसोबत प्रेक्षक म्हणून कार्यक्रमात उपस्थित झाला होता.

मात्र, कार्यक्रमात हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत एकलव्य सिंह गौड आणि त्याच्या साथीदारांनी कार्यक्रम मध्येच रोखत आपला विरोध दर्शवला.

तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

कार्यक्रमाचं व्हिडिओ फुटेजसोबत एकलव्यनं तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल केली. यात गुजरातच्या जुनागढचा रहिवासी असलेल्या स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सोबत चार स्थानिकांविरुद्ध तक्रार करण्यात आली.

आरोपींत चार स्थानिकांचा समावेश

तुकोगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वरसहीत पाच आरोपींना अटक करण्यात आलीय. यामध्ये अॅडविन एन्थनी, प्रखर व्यास, प्रियम व्यास आणि नलिन यादव या चार स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे.

या पाचही जणांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९५-ए (एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेतूपूर्वक कृती करणे), कलम २६९ (जीवघेण्या आजाराचं संक्रमण फैलावणं) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदाराचा मुलगा म्हणतो…

‘या कार्यक्रमात कॉमेडियनकडून गोध्रा हत्याकांड तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. कॉमेड शोमध्ये अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. त्यामुळे आम्ही त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर कार्यक्रम मध्येच थांबवून श्रोत्यांना कॅफेबाहेर काढलं. त्यानंतर आम्ही कॉमेडियन आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना पकडून तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये नेलं’, असं भाजप आमदाराचा मुलगा एकलव्य यानं म्हटलंय.

एकलव्य हा ” नावाच्या स्थानिक संघटनेचा संयोजक आहे. या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हास्य कलाकलाकारांना मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय. मात्र एकलव्यनं हे आरोप फेटाळले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

प्रेमविवाहानंतर नेमकं काय घडलं?; तिच्यानंतर काही तासांत तरुणाचाही मृत्यू

0

जळगाव: प्रेमविवाह करून घरी परतलेल्या तरुणीचा सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी तालुक्यातील येथे घडली होती. दरम्यान, या घटनेला काही तास उलटत नाही तोच त्या तरुणीच्या पतीचा देखील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत पाटील (रा. पाळधी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ( )

वाचा:

पाळधी (ता. धरणगाव) गावातील आरती भोसले व प्रशांत पाटील यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही काही दिवस बेपत्ता झाले होते. ते थेट विवाह करूनच घरी परतले होते. दोघांच्या पालकांनी पोलिसांसमोर त्यांच्या विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला होता. त्यानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच आरतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. घटनेच्या दिवशी पती प्रशांत पाटील यानेही विषारी औषध प्राशन केले होते. यामुळे त्याची प्रकृतीही खालावली होती. त्याला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा मृत्यू झाला आहे.

वाचा:

आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात जावून विवाह केला होता. यावेळी दोघांनीही देवाला साक्षी ठेऊन सोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली होती. विवाहानंतर अवघ्या तीन-चार दिवसानंतर आरतीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या चोवीस तासातच प्रशांत याची देखील प्राणज्योत मालवली. आरतीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे दिसते. आता तिचा पती प्रशांत याचाही विषबाधेने मृत्यू झाला आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी विवाह पण केला. मग दोघांनी विष का घेतले असावे? हा प्रश्न आहे. पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts