Monday, December 11, 2023
Home Blog Page 7288

Amazon वर 'मेगा सॅलरी डेज सेल' सुरू, उद्या अखेरचा दिवस, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 'बंपर सूट'

0

नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर १ जानेवारी पासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मॉल अँन्ड लार्ज अॅप्लायन्सेज, टीव्ही, फर्निचर, होम अप्लायन्सेस, स्पोर्ट्स, ऑटो प्रोडक्ट्स सह अन्य उत्पादनावर घसघशीत सूट मिळत आहे. अॅमेझॉन मेगा सॅलरी डेज सेल ३ जानेवारी २०२१ पर्यंत चालणार आहे.

वाचाः

बँक ऑफर्स आणि नो कॉस्ट ईएमआयचा फायदा
अॅमेझॉनवर मेगा सॅलरी डेज दरम्यान सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, यासारख्या मोठ्या ब्रँड्सच्या हाय व्हॅल्यू प्रोडक्ट्सवर स्वस्तातील फायनान्स ऑप्शनसारखे नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयचा वापर केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळू शकणार आहे.

वाचाः

मेगा सॅलरी डेज सेलमध्ये कशी मिळणार सूट

>> लार्ज अॅप्लान्सेसवर ४० टक्क्यांपर्यंत सूट

>> बेस्ट सेलिंग वॉशिंग मशीनवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट

>> डॅकिन, एलजी, सॅन्यो, वॉल्टस यासारख्या टॉप ब्रँड्सच्या एसीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट

>> मायक्रोवेववर ४० टक्के डिस्काउंट

>> टीव्हीवर २५ टक्के सूट

>> अँड्रॉयड टीव्हीवर ३० टक्के सूट

>> ३२ इंच टीव्हीवर २५ टक्के सूट

>> प्रीमियम टीव्हीव ३० टक्के डिस्काउंट

वाचाः

लॅपटॉप, टेबलेट, हेडफोन्स व अन्य

>> बोट, जेबीएल, आणि अन्य न्यू साउंड बार्सवर ३० टक्के सूट

>> बोट जेबीएल व अन्य हेडफोन्सवर ५० टक्के डिस्काउंट

>> बोस, सोनी, हरमन कार्डनच्या प्रीमियम हेडफोफोन्स आणि स्पीकर्सवर ९ महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय

>> १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय सोबत २७ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसोबत डीएसएलआर, मिररलेस आणि प्वॉइंट शूट कॅमेरा

>> टॉप ब्रँड्सच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर ३० हजारांपर्यंत सूट

>> ३० टक्क्यापर्यंत सूटसोबत टॉप ब्रँड्सचे टेबलेट्स

>> टॉप ब्रँड्सचे स्मार्ट वॉचेस आणि फिटनेस ट्रॅकर्सवर ४० टक्के सूट

वाचाः

होम अँड डेकोर

>> होम प्रोडक्ट्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट

>> होम फर्निशिंगवर ५० टक्क्यांपर्यंत सूट

>> होम डेकोरवर ५० टक्क्यांपर्यंत सूट

>> होम स्टोरेज आणि ऑर्गनायजेशनवर ५० टक्क्यांपर्यंत सूट

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

औरंगाबादनंतर अहमदनगरच्या नामांतराची मागणी; शिवसेनेनं सुचवलं 'हे' नाव

0

म.टा. प्रतिनिधी, नगरः औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची जुनी मागणीही शिवसेनेने पुढे आणली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे.
शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार लोखंडे यांनी ही मागणी केली.

‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे.’ असे सांगत लोखंडे यांनी या जुन्या मागणीला हवा भरली आहे.

सध्या औरंगाबादच्या नामांतराच्या जुन्याच मागणीला नव्याने फोडणी देण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे या मागणीला विरोधही दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होत असून भाजपच्या नेत्यांनी या प्रश्नात हवा भरण्यास सुरवात केली आहे.
औरंगाबादमध्ये हे सुरू असतानाच शिर्डीचे शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी अहमदनगरच्या नामांतराची जुनीच मागणी पुढे आणली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांकडून अहमदनगरच्या नामांतराची मागणी सुरू आहे. अर्थात त्यावरून काहींमध्ये मतभेद आहे. काहींनी अंबिकानगर तर काहींनी आनंदनगर नाव सूचविले आहे. अंबिकानगर नाव देण्याची मागणी जुनी आहे. यावरून अनेकदा आंदोलनेही झाली आहे. नगरला पूर्वी भरलेल्या ७० व्या साहित्य संमेलनातही हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

औरंगाबादच्या नामांतराची विषय निघाला की अहमदगरचाही पुढे येतो. यावेळी हा पुढे आणण्यात शिवसेनेच्या शिर्डीच्या खासदाराने आघाडी घेतली आहे.
नगरच्या महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे. तर शिवसेना विरोधात आहे. शहराचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत, खासदार भाजपचे आहेत. अशा वेगळ्या राजकीय समीकरणाचे राजकारण असल्याने नामांतराविषयी महानगरपालिकेची भूमिका काय, असेल हेही उत्सुकतेचे आहे. तर दुसरीकडे सरकार आणि सरकारमधील घटक पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. औरंगाबादच्या नामांतरास विरोध असल्याचे सांगणारे महसूलमंत्री थोरात हेही नगरचे आहेत. त्यामुळे नामांतरासंबंधी त्यांची आणि काँग्रेसची भूमिकाही महत्वाची आहे.

अशी झाली अहमदनगरची स्थापना

पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ २८ मे १४९० या दिवशी मलिक अहमदने रोवली. त्याच्या नावावरून शहराला नाव देण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणाचा ब्रॉडबँड प्लान बेस्ट, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ब्रॉडबँड प्लान्समध्ये खूप सारे बदल केलेले आहेत. लॉकडाउन मुळे सुरू झालेला वर्क फ्रॉम होम मध्ये युजर्संना डेटाची कुठलीही कमतरता भासू नये, यासाठी कंपन्यांनी जुन्या प्लान्सला रिवाइज केले आहे. तसेच यासोबत ऑफर्सही दिल्या आहेत. युजर्संना सुद्धा कमी किंमतीत जास्त बेनिफिट ऑफरचे ब्रॉडबँड प्लान पसंत पडत असतात. ग्राहकांची पसंती डोळ्यासमोर ठेवून कंपन्यांनी ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत जबरदस्त प्लान ऑफर केले आहेत. Airtel vs या चार कंपन्यांचा ब्रॉडबँड प्लान विषयी जाणून घ्या सविस्तर…

वाचाः

एअरटेल एक्स्ट्रीम फायबर ४९९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या या प्लानमध्ये 40Mbps ची इंटरनेट स्पीड मिळते. प्लाने खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात अनलिमिटेड इंटरनेट मिळते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला देशभरात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. या प्लानमध्ये कंपनी एअरटेल एक्स्ट्रीम अॅप आणि विंक म्यूझिक सोबत अनेक ओटीटी अॅप्स फ्री सब्सक्रिप्शन देत आहे.

वाचाः

बीएसएनएलचा ४९९ रुपयांचा प्लान
बीएसएनएलच्या या प्लानचे संपूर्ण नाव BSNL Bharat Fibre 100GB CUL आहे. प्लानमध्ये कंपनी 20Mbps च्या स्पीडने एकूण 100GB डेटा ऑफर करते. डाउनलोड साठी या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड डेटा मिळतो. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सब्सक्रायबर्संना देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल करू शकता.

वाचाः

रिलायन्स जिओ फायबरचा ३९९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये ३० एमबीपीएसच्या इंटरनेट स्पीड सोबत अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते.

वाचाः

एक्साइटेलचा ३९९ रुपयांचा प्लान
Excitel च्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये वार्षिक सब्सक्रायबर्संना युजर्संना १०० एमबीपीएसची स्पीड मिळते. कंपनी या प्लानला १ डिसेंबर २०२० पासून ऑफर करीत आहे. हा प्लान अनलिमिटेड डेटा सोबत येतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

हिमालयीन गिधाडाचे मुंबईत दर्शन

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सरत्या वर्षाला निरोप देताना ” प्रजातीच्या गिधाडाचे दर्शन झाले. हिमालय, तिबेटमध्ये आढळणारा हा पक्षी मुंबईत दिसल्याने त्याबद्दल चर्चा रंगली. हे सर्वात मोठ्या गिधाडांपैकी एक आहे. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था अर्थात ‘आययूसीएन’ने या प्रजातीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. सध्या मात्र यांची संख्या स्थिर असल्याचे दिसते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी केंद्रामध्ये काम करणारे कर्मचारी चैत्राल धराधर यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हे गिधाड पहिल्यांदा दिसले. हे ‘हिमालयीन गिफ्रन’ असल्याचे निश्चित झाल्यानंतर, इतर कर्मचाऱ्यांनीही आवर्जून हे गिधाड पाहिले. सुमारे तीन तास हे गिधाड एकाच परिसरात होते. यानंतर शुक्रवारी १ जानेवारी रोजीही ते सकाळी काही काळ दिसले. आता हे गिधाड या परिसरात आणखी दिसत राहील का याचा अधिक अभ्यास केला जाईल, अशी माहिती शैक्षणिक अधिकारी जयेश विश्वकर्मा यांनी दिली. मुंबईमध्ये या आधी हिमालयीन ग्रिफन आढळले होते, असे पक्षी निरीक्षकांकडून सांगितले जाते. मात्र याची कागदोपत्री नोंद आढळत नाही, असेही विश्वकर्मा यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील कावळे या गिधाडाला तेथून उडवून लावण्याचा, हल्ल्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यानंतरही हे गिधाड तिथे सुमारे तीन तास बसून होते. गिधाड हे मृत प्राण्यांच्या अवशेषावर जगते. डायक्लोफिनॅक या औषधाचा वापर वाढल्यानंतर गिधाडांच्या अस्तित्वावर संकट ओढवले. त्यानंतर कावळे, घारी यांनी त्यांची जागा व्यापली. त्यामुळे मुंबईमध्ये हे गिधाड दिसणे ही घटना महत्त्वाची ठरते.

लहान गिधाडांची भटकंती शक्य
ही गिधाडे हिमालय आणि थंड प्रदेशामध्ये आढळतात. तिथेच त्यांचे प्रजनन कार्य चालते. एखादे वयाने लहान असलेले गिधाड मात्र अन्य एखाद्या प्रदेशामध्ये आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिमालय किंवा आजुबाजूचा परिसर सोडून दूर जाऊ शकते, अशीही आत्तापर्यंतची निरीक्षणे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आलेले हे गिधाड तशाच पद्धतीने भटकत आले असावे, अशी शक्यता पक्षीतज्ज्ञ डॉ. गिरीश जठार यांनी वर्तवली. असे गिधाड भटकत जाऊन दक्षिणेकडे गोवा, हैदराबाद येथेही दिसले आहे. तापमानात बदल होऊ लागले किंवा किनापट्टीवर आर्द्रतेची जाणीव होऊ लागली की, हे पक्षी परत आपल्या मूळच्या भूभागामध्ये परत जाण्याची शक्यता अधिक असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Vi युजर्ससाठी बॅड न्यूज, १५ जानेवारीपासून 'या' शहरात सर्विस बंद होणार

0

नवी दिल्लीः वोडाफोन – आयडियाने नवीन वर्षात आपली ३ जीबी सिम सर्विसला आणखा एका शहरात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वोडाफोन-आयडिया १५ जानेवारी पासून दिल्लीतील ३ जी सर्विस बंद करणार आहे, कंपनीने अशी घोषणा केली आहे. १५ जानेवारी पर्यंत आपल्या ३ जी सिमला ४ जी मध्ये पोर्ट करून घ्या. नाही तर १५ जानेवारीपासून सेवा बंद केली जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना नंबर पोर्ट करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत वेळ आहे.

वाचाः

कस्टमर केयर सेंटर जावीन ४ जी मध्ये पोर्ट करा
भारातत अनेक वर्षापासून ४ जी सर्विस सुरू आहे. ज्यात युजर्संना चांगली स्पीड सोबत जास्त डेटा मिळू शकतो. रिलायन्स जिओ नंतर ४ जी सर्विस सेवेत क्रांती आली आहे. वोडाफोन आयडियाने गेल्या वर्षा बेंगळुरू आणि मुंबई सारख्या शहरात ३ जी सिम सेवा बंद केलेली आहे. आता दिल्लीत ही सेवा बंद केली जाणार आहे. २ जी व्हाइस कॉलिंग सर्विस जारी राहणार आहे. वोडाफोन-आयडियाने ४जी कस्टमरवर कंपनीने घोषणा केली आहे. तर २जी कस्टमर व्हाइस कॉलिंगची सुविधा घेवू शकतात. परंतु, जुन्या सिम कार्डवर इंटरनेटची मजा घेवू शकत नाही. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या माहितीनुसार, दिल्ली सर्कल मध्ये वोडाफोन आयडियाचे १ कोटी ६२ लाख हून जास्त सब्सक्राइबर्स आहेत. यात जितकी ३ जी युजर्स आहेत. त्यांना १५ जानेवारी पर्यंत आपले सिम ४ जी मध्ये पोर्ट करावे लागणार आहे.

वाचाः

भारतात जितके जिओ युजर्स आहेत. त्यांना नवीन वर्षात एक जबरदस्त आनंदाची बातमी मिळाली आहे. कंपनीने एक जानेवारी पासून दुसऱ्या नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा दिली आहे. जानेवारी २०२० मध्ये कंपनीने घोषणा केली होती की, जिओ युजर्सला दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी चार्ज द्यावा लागणार, परंतु, बरोबर एक वर्षानंतर जिओने आपल्या सब्सक्रायबर्सला दिलासा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?; शिवसेनेनं दिलं 'हे' उत्तर

0

मुंबईः ‘सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करुन टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळं आता संभाजीनगरमुळं महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कोणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत,’ असं स्पष्ट करतानाच शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतरणाच्या प्रकरणामुळं राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसनं विरोध केला आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं पुन्हा महाविकास आघाडीतील अंतर्गंत वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपनं केलेल्या या टीकेवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसनं विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे,’ असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं आहे.

‘राज्याचे महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला काँग्रेसचा विरोधच असेल, हा दावा त्यांनी केला. यावर भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील वगैरे लोकांनी विचारला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यात भूमिका स्पष्ट करण्याचसारखं काहीच नाही, असे म्हणत शिवसेनेने आपली भूमिका बदललेलीच नसल्याचं तसेच ‘बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले आहे. राहिला प्रश्न कागदपत्रांचा त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे

अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पण पाटलांच्या या बिनतोड सवालास पूरक म्हणून आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत?

बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपावाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे!

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'ही' ग्रामपंचायत पुन्हा बिनविरोध; १९७० पासून मतदान झालेच नाही!

0

जळगाव: जिल्ह्यातील तालुक्यामधील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गेल्या पन्नास वर्षाची परंपरा या गावातील ग्रामस्थांनी यंदाही कायम राखली आहे. धारागीर ग्रामपंचायतीचे विशेष म्हणजे या गावात १९७० पासून एकदाही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही. यंदा देखील धारागीर हे जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध निवडणूक होणारे पहिले गाव ठरले आहे. ( )

वाचा:

एरंडोल तालुक्यातील १३०० लोकसंख्या असलेल्या धारागीर गावात पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. गावातील ग्रामस्थांनी गावात एकी राहावी तसेच गाव सुखी राहावे यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा सुरू केला. १९७० मध्ये सुरू केलेली ही आदर्श परंपरा आज देखील कायम आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी ही संकल्पना राबवली होती. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याचे यंदा पन्नासावे वर्ष आहे. या पंरपरेमुळे गावातील सलोखा व एकोपा आज देखील टिकून आहे.

भाऊबंदकी टाळण्यासाठी सुरू केली पंरपरा

पन्नास वर्षांपूर्वी धारागीर गावात देखील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस पाहायला मिळायची. या निवडणुकीत भाऊबंदकी उफाळून मोठ मोठे वाद होत होते. त्यामुळे पोलीस व कोर्ट-कचेऱ्या फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असे. या सर्व वादांमुळे गावाचा विकास देखील खुंटला होता. हा सर्व प्रकार गावातील तरुण व समजूतदार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकत्र बसून गावाच्या विकासासाठी तसेच वाद- विवाद टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानतंर ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याची पंरपराच सुरू झाली ती आजदेखील सुरु आहे.

वाचा:

प्रत्येकाला मिळते संधी

धारागीर गावातील रहिवासी असलेले माजी आमदार यांच्याच संकल्पनेतून निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा पडला. त्यावेळी तारुण्यात असणाऱ्या महेंद्रसिंग पाटील यांनी गावातील इतर तरुणांच्या मदतीने निवडणूक बिनविरोध करण्याबाबत तत्कालीन गाव पुढाऱ्यांना विनंती केली. ही विनंती मान्य झाली अन् तेव्हापासून धारागीर गाव बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श म्हणून पुढे आले. विशेष म्हणजे, गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्वाची संधी मिळत असल्याने स्पर्धा, हेवेदावे होत नाहीत.

ग्रामस्थांकडून आनंदोत्सव

यंदाच्या निवडणुकीतही जिल्ह्यातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम राहिल्याने ग्रामस्थांनी गावातील विठ्ठल मंदिरात एकत्र येऊन एकमेकांना साखर भरवून आनंदोत्सव साजरा केला. धारागीर ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

महाराष्ट्र पोलिसांची योगींच्या जिल्ह्यात कारवाई; 'तो' आरोपी अखेर जाळ्यात

0

महेश गायकवाड । : मित्राची हत्या करून महाराष्ट्र सोडून फरार झालेल्या एका आरोपीला आठ वर्षानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (युनिट १) उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी नेपाळमध्ये राहत होता. नेपाळवरून गोरखपूरला येताच गुन्हे शाखेने पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी त्याच्या मुसक्या आवळल्या असून या आरोपीला घेऊन गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेश येथून ठाण्याला निघाले आहेत. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी गोरखपूरसह नेपाळमध्ये गुन्हे शाखेने खबरी सक्रीय केले होते. ( Update )

वाचा:

कदम्बूल उर्फ ताजामुल उर्फ ताजाज्यूल हक दुख्खू शेख या तरुणाची १० सप्टेंबर २०१२ रोजी सुऱ्याने गळा कापून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याचा मित्र याचे नाव चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, इनामुल सापडला नाही. गुन्हे शाखा युनिट एक मागील दोन वर्षांपासून या आरोपीचा शोध घेत होते. मूळचा पश्चिम बंगालचा असलेला हा आरोपी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी चार वेळा गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशला जाऊन आले. मात्र तो हाती लागला नाही. तरीही गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती.

वाचा:

गोरखपूर तसेच नेपाळमध्ये खबऱ्यांचे जाळे सक्रीय करत गुन्हे शाखेने माहिती काढण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस पथकाला यश मिळाले. इनामुल नेपाळवरून गोरखपूरला येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांचे पथक गोरखपूरला रवाना झाले. या पथकाने शुक्रवारी उत्तर प्रदेश एसटीएफच्या मदतीने इनामुल याला गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अशाप्रकारे मागील आठ वर्षांपासून फरारी असलेल्या या आरोपीला जेरबंद करण्यामध्ये पोलीस यशस्वी झाले. आरोपी नेपाळमध्ये राहत होता. नेपाळवरुन येणार असल्याचे कळताच आमच्या पथकाने त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मालोजीराजे सहा वर्षांनी पुन्हा आखाड्यात!; कोल्हापुरात काय होणार?

0

कोल्हापूर: सहा वर्षांपासून राजकारणापासून काही प्रमाणात दूर राहिलेले माजी आमदार व पुण्यातील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव हे निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत काही कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच काही भागांत त्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते स्वत: किंवा उमेदवारीचा झेंडा हाती घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ( )

वाचा:

पंधरा वर्षापूर्वी माजी आमदार मालोजीराजे राजकारणात सक्रीय झाले. महापालिकेत त्यांनी काही काळ काँग्रेस आघाडीचे नेतृत्व केले. त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांचा एक मोठा गटही होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्याने यांनीच त्यांना काँग्रेसमध्ये पाठवले. कोल्हापूरकरांनी त्यांना आमदार करत तरुण चेहऱ्याला जनसेवेची संधी दिली. २००९ मध्ये नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मैदानातच न उतरण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सत्यजीत कदम यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. पण, क्षीरसागर पुन्हा विजयी झाले.

वाचा:

क्षीरसागर यांच्या विषयी निर्माण झालेली नाराजी आणि भाजपमध्ये त्यांच्या विषयी असलेला राग या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, असे चित्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तयार झाले होते. याच वेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मालोजीराजे व त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्या नावाची बरीच चर्चा झाली. शेवटच्या क्षणापर्यंत नाव चर्चेत होते. शेवटी दोघांनीही नकार दिल्याने उमेदवारीची माळ चंद्रकांत जाधव यांच्या गळ्यात पडली आणि ते आमदार झाले.
या सर्व पार्श्वभूमीवर दहा वर्षे कोल्हापूरच्या आणि विशेषत: महापालिकेच्या राजकारणापासून काही प्रमाणात दूर राहिलेले मालोजीराजे यावेळी मात्र पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. पुण्यातील संस्थेत पूर्णपणे लक्ष घातलेल्या मालोजीराजेंनी अचानक महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातल्याने त्याची शहरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा शहरात मोठा गट आहे. त्यांना मानणारे अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आहेत. यामुळे मालोजीराजेंची ताकद त्यांना मिळाल्यास त्यांच्या गटाचे अनेक नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होणार आहे. विधानसभा निवडणुकीला अवकाश आहे, तरीही आतापासून ते तयारीला लागले आहेत. त्यांना मानणाऱ्या काही इच्छूकांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

सध्या काँग्रेस आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हे करत आहेत. राज्यातील सत्ता आणि पालकमंत्र्यांनी शहरात बांधलेला गट, आमदार ऋतुराज पाटील यांची नव्याने निर्माण झालेली ताकद या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अधिक गर्दी होत आहे. अशावेळी मालोजीराजे सक्रीय झाल्यास या पक्षाला अधिक फायदा होण्याची चिन्हे आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

आकाश जाधवचे मारेकरी कुठे आहेत?; आठवलेंनी सरकारकडे केली 'ही' मागणी

0

मुंबई: दलित तरुण खून प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी केली आहे. ( )

वाचा:

सांताक्रूझ पूर्व वाकोला येथे २ नोव्हेंबर रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आकाश जाधव याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीररित्या जखमी झालेल्या आकाशचा नंतर ४ डिसेंबर रोजी कुपर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा हल्ला जातीयवाद्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी कारवाईसाठी वांद्रे, खार, सांताक्रूझ, पार्ले भागातील नागरिकांनी वाकोला पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चाही काढला होता. याप्रकरणी आता रामदास आठवले यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

वाचा:

आकाश जाधवच्या खूनातील आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करावी व आकाशच्या पीडित कुटुंबीयांना अनुसूचीत जाती- जमाती प्रतिबंधक (सुधारित) कायदा २०१५ नुसार तात्काळ आर्थिक व कायदेशीर मदत देण्यात यावी आणि पीडितांना न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे लेखी पत्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांना लिहिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे जातीअंत संघर्ष समितीचे नेते कॉ. शैलेन्द्र कांबळे व कॉ. यांनी रामदास आठवले यांची त्यांच्या मुंबईतील संविधान बंगल्यावर भेट घेतली. यावेळी आपण सांताक्रूझ येथे पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, रामदास आठवले आज किंवा उद्या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts