Thursday, September 28, 2023
Home Blog Page 7304

२५ हजारांपेक्षा कमी किंमतीत ५ बेस्ट स्मार्टफोन, फीचर्स आहेत जबरदस्त

0

नवी दिल्लीः यावर्षी स्मार्टफोन कंपन्यांनी हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, मोठी बॅटरी, पंचहोल स्क्रीन आणि दमदार हार्डवेयरचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. क्वॉड कॅमेरा सेटअप सुद्धा यावर्षी ट्रेंडमध्ये होते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी खास स्मार्टफोन संबंधी माहिती देत आहोत. जे मिड प्रीमियम कॅटेगरीत येतात. ज्याची किंमत २५ हजारांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या डिटेल्स.

वाचाः

वनप्लस नॉर्ड २०२० मध्ये लाँच झालेला बेस्ट स्मार्टफोनपैकी एक आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये आलेला हा पहिला ५जी स्मार्टफोन आहे. डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 765G 5G प्रोसेसर दिला आहे. फोन वनप्लसच्या ऑक्सीजनओएस वर काम करतो. सर्वात बेस्ट एक्सपीरियन्स ऑफर करणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमपैकी एक आहे. फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड पॅनेल, ३० वॉट फास्ट चार्जर आणि 4115mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

रेडमी नोट ९ प्रो मॅक्स एक ऑल राउंडर स्मार्टफोन आहे. रेडमी नोट सीरीजचा हँडसेट या सेगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त कॅमेरा आणि डे टू डे परफॉर्मन्स देतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये ६.६७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

वाचाः

रियलमी नार्जो २० प्रो २०२० मध्ये लाँच झालेला सर्वात चांगल्या स्मार्टफोन पैकी एक आहे. हा एक जबरदस्त बजेट फोन आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स मिळतात. या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी, ४८ मेगापिक्सलाचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

पोको एक्स ३ सुद्धा २०२० मध्ये लाँच करण्यात आलेला दमदार स्मार्टफोन आहे.यात 6000mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या सेगमेंटमध्ये हा एकमेव फोन आहे जो स्टीरियो स्पीकर्स आणि १२० हर्ट्ज डिस्प्ले ऑफर करतो. पोको एक्स ३ मध्ये जबरदस्त डिस्प्ले आणि पॉवरफुल हार्डवेयर आहे.

वाचाः

विवो व्ही २० स्मार्टफोन २०२० मध्ये आलेल्या जबरदस्त स्मार्टफोनपैकी एक आहे. हा फोन २५ हजारांपेक्षा कमी किंमतीत येणारा बेस्ट सेल्फीचा स्मार्टफोन आहे. सेल्फी प्रेमींसाठी हा फोन जबरदस्त आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

पिंपरी: एअर होस्टेस तरुणीवर मित्राने केला बलात्कार, डेटिंग अॅपवर झाली होती ओळख

0

पिंपरी: डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर मित्राने एअर होस्टेस तरुणीला हॉटेलवर नेऊन जबरदस्ती दारू पाजली. तिला घरी आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिच्यावर केला. या प्रकरणी पीडितेने पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अभिजीत असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो काळेवाडीतील तापकीर नगर चौकात राहतो. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि आरोपीची ओळख एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला शनिवारी दुपारी हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेले. तिथे तिला जबरदस्ती दारू पाजली. आरोपीने तिला त्याच्या घरी नेले. तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मित्राच्या या कृत्याने हादरलेल्या तरुणीने त्याला विरोध केला. त्यावरून आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असेही तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने हिंजवडी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

एअरटेलच्या या दोन प्लानमध्ये १२६ जीबी पर्यंत डेटा आणि फ्री ऑफर्स, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्लीः कंपनी ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. कंपनीकडे Truly Unlimited कॅटेगरीत अनेक सारे प्लान उपलब्ध आहेत. एअरटेलकडे ५९८ रुपये, ५९९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लान आहेत. जवळपास एकाच किंमतीतील या प्लानमध्ये वेगवेगळे बेनिफिट्स दिले जातात. जाणून घ्या दोन प्लानसंबंधी.

वाचाः

५९८ रुपयांचा एअरटेल प्लान
एअरटेलचा ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा रोज दिला जातो. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण १०० एसएमएस ऑफर केले जातात. दुसऱ्या नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते.

वाचाः

या पॅकमध्ये मिळणाऱ्या फ्री ऑफरमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन फ्री आहे. तसेच फ्री हेलोट्यून्स आणि शॉ अकादमी सोबत एक वर्षाचे फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग वर १०० रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जातो.

वाचाः

५९९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्याया प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. या पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. यात युजर्संना एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. या पॅकमध्ये १०० एसएमएस फ्री दिले जाते. एअरटेल व दुसऱ्या नेटवर्कवर व्हाइस कॉलिंग अनलिमिटेड फ्री आहे.

वाचाः

अतिरिक्त बेनिफिटमध्ये ग्राहकांना एक वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री मिळते. एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम आणि विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते. याशिवाय हेलोट्यून्स, शॉ अकादमीचे एक वर्षापर्यंत फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग वर १०० रुपयांचा कॅशबॅक यासारखे ऑफर्स कंपनीकडून दिले जाते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

बिडी पित नसल्यानं ईडीची भीती वाटत नाही; आठवलेंचा राऊतांना टोला

0

म.टा. प्रतिनिधी, नगर: अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) वर्षा राऊत यांना नोटीस आल्यानंतर शिवसेनेचे खासदार यांनी यांनी केलेल्या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री यांनीही काव्यओळीतूनच उत्तर दिले आहे. आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्या इडीची भीती वाटत नाही, अशी मिश्कील टिपण्णीही आठवले यांनी केली. ते आज शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नोटीस आल्याची बातमी आल्यानंतर राऊत यांनी केलेल्या ट्विटची चर्चा झाली. आ देखे जरा किसमे कितना हे दम, असे ट्विट राऊत यांनी केले होते. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले किसमे कितना हैं दम, तो हम भी नही कुछ कम, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ती पक्ष पाहून काम करीत नाही. भाजपच्या लोकांनाही ईडीच्या नोटीसा येतात. मात्र, आपला असा कुठलाही व्यवसाय नाही. त्यामुळे आपल्याला ईडीची भीती नाही. बिडी पित नसल्याने इडीची भीती वाटत नाही. पैसा कमावावा, पण तो सनदशीर मार्गाने कमावावा. योग्य ते कर भरावेत. कागदपत्रे पूर्ण करावीत. असे असेल तर कशाला अशी कारवाई होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ईडीला माहिती देणारे अनेक जण असू शकतात. अंजली दमानिया यांनीही एकनाथ खडसे यांच्यासंबंधी अनेक तक्रारी केल्या आहेत. खडसे यांनी पक्षांतर करायला नको होते. अर्थात त्यांनी पक्षांतर केले म्हणून इडी कारवाई करीत आहे, असेही नाही. त्यांना विधानसभेला संधी मिळाली नाही, म्हणून नाराज होण्याची गरज नव्हती. त्यांच्यासोबत संधी मिळू न शकलेल्या अन्य नेत्यांना आता जशी विविध ठिकाणी संधी मिळाली, तशीच खडसे यांनाही मिळाली असती. त्यांनी थोडे थांबायला हवे होते, असेही आठवले म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Explainer: कोण होते डॉ. महिंद्र वत्स?

0

मुंबई: डॉक्टर आणि रुग्णाचे नाते हे सर्वसाधारणपणे रुग्णाच्या आजारापुरते मर्यादित असते. ‘फॅमिली डॉक्टर’ असेल तर त्यातल्या त्यात संपर्क अधिक असतो. क्वचित काही डॉक्टर-रुग्णांचे नाते मैत्रीतही बदलते. मात्र, त्या पलीकडंही काही डॉक्टर असे असतात, जे रुग्णांना प्रत्यक्ष न भेटताही त्यांचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड होऊन जातात. ” हे त्यापैकीच एक नाव. (Everything about )

भारतातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, लैंगिक तज्ज्ञ, समुपदेशक () व स्तंभलेखक अशी ओळख असलेल्या डॉ. महिंद्र वत्स यांचे आज निधन झाले. वयाच्या ९६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वत्स यांच्या जाण्यामुळं लैंगिक आरोग्याच्या समस्यांशी झगडणाऱ्या व लैंगिक समस्यांची उत्तरं मिळवून उत्तम आयुष्य जगणाऱ्या हजारोंनी आपला मार्गदर्शक गमावला आहे. मूळचे पंजाबी असलेल्या वत्स यांनी मुंबईतील महाविद्यालयातून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. तिथंच त्यांची प्रोमिला यांच्याशी भेट झाली आणि पुढे ते विवाहबद्ध झाले. प्रोमिला या मूळच्या सिंधमधील होत्या. लग्नानंतर ते दोघे काही वर्षे ब्रिटनमध्ये राहिले. तिथं महिंद्र वत्स यांनी एका रुग्णालयात रजिस्ट्रार म्हणून नोकरी केली. मात्र, लष्करात डॉक्टर असलेल्या वडिलांच्या आजारपणामुळं त्यांना भारतात यावं लागलं. कालांतरानं ते इथंच स्थायिक झाले. वत्स यांनी ग्लॅक्सोमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम सुरू केले व सोबत स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय देखील सुरू केला.

आस्क द सेक्सपर्ट

वत्स यांनी डॉक्टरकीच्या पलीकडं जाऊन अनेकांना मार्गदर्शन केले होते. टाइम्स समूहाच्या ‘मुंबई मिरर’ या दैनिकात त्यांनी केलेल्या स्तंभलेखनामुळं त्यांना मुंबईत वेगळी ओळख मिळाली होती हे खरे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी मुंबई मिररमध्ये ‘आस्क द सेक्सपर्ट’ हा स्तंभ सुरू केला होता. तब्बल दहा वर्षे त्यांनी स्तंभ चालवला. या दैनिकातून त्यांनी सुमारे २० हजार वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मात्र, वत्स यांचा म्हणून सुरू झालेला प्रवास त्याही खूप आधीचा. समुपदेशक वा लैंगिक सल्लागार म्हणून त्यांनी ४० हजारांहून अधिक लोकांच्या समस्यांचे निराकरण केले असावे, असा अंदाज आहे.

कार्याची दिशा सापडली!

वत्स यांनी १९६० मध्ये स्तंभलेखन सुरू केले. फेमिना, फ्लेअर आणि ट्रेंड या महिलाविषयक मासिकांसाठी त्यांना वैद्यकीय सल्ला देणारे लेखन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९७० पर्यंत त्यांनी अनेक मासिकांमध्ये लेखन केले. संपादकीय जाच सुरू होताच त्यांनी हे लेखन थांबवले. मात्र, तोवर त्यांना आपल्या पुढील कार्याची दिशा सापडली होती.

लैंगिक शिक्षणाचे पुरस्कर्ते

वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतानाच भारतात लैंगिक समस्यांबाबत अज्ञान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. १९७४ मध्ये ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ सोबत सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांनी देशात लैंगिक शिक्षण कार्यक्रम राबवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांचा प्रस्ताव स्वीकारला गेला आणि त्यानंतर अनेक स्तरांतून विरोध झाल्यानंतरही देशात पहिले सेक्स एज्युकेशन, समुपदेशन व उपचार केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर १९८० मध्ये वैद्यकीय व्यवसाय थांबवून त्यांनी पूर्णवेळ समुपदेशन व लैंगिक शिक्षणाचे काम सुरू केले. सेक्स ही आनंदाची भावना आहे. मात्र, अनेक लेखक अत्यंत गंभीरपणे त्याकडं पाहतात. याउलट वत्स यांनी लैंगिक सल्ले देताना विनोदाचा आधार घेतला. लोकांना समजून घेत त्यांना आधार दिला.

सोशल मीडियात श्रद्धांजलीच्या पोस्ट

डॉ. वत्स यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. सर्वसामान्यांसह समाजातील अनेक मान्यवरांचाही यात समावेश आहे. त्यावरून डॉ. वत्स यांची लोकप्रियता काय होती, हे लक्षात येते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; दिला निर्वाणीचा इशारा

0

अहमदनगर: राज्यातील कृषी विद्यापीठे आणि राज्य कृषी मूल्य आयोगाकडून कृषी मालाचे खर्चावर अधारित भाव ठरवून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे पाठवितात. मात्र, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला केंद्रीय आयोग कारण नसताना या भावांत दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत कपात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. तर दुसरीकडे महागाई वाढत राहते. त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत आंदोलन करण्यावर आपण ठाम असल्याचे सांगणारे पत्र हजारे यांनी केंद्र सकारला पाठविले आहे. त्यामध्ये राज्यातून पाठविण्यात आलेल्या शिफारशींमध्ये केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडून कशी कपात केली जाते, याची उदाहरणे त्यांनी नमूद केली आहेत. यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरून आता यावर फक्त आश्वासन नको, ठोस निर्णय झाला नाही, तर आपण उपोषणावर ठाम असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.

वाचा:

हजारे यांनी म्हटले आहे की, प्रत्येक राज्यात कृषीमूल्य आयोग आहेत. या कृषीमूल्य आयोगामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांचे वेगवेगळ्या पिकांचे शास्त्रज्ञ प्रत्येक पिकांचे नांगरट, पाळी, पेरणी, बियाणे, खते, पाणी, पीक काढणे, पिक तयार करणे यासाठी लागणाऱ्या मजुरीची किंमत, बैल राबतात त्यांची मजुरी किंमत, बैल नसतील तर मशीनरीची किंमत, धान्य बाजारात नेईपर्यंत जो खर्च येतो त्याचा हिशेब काढून राज्यातून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवितात. केंद्रीय कृषीमूल्य आयोग हा केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांच्या आखत्यारीत असल्यामुळे राज्यातून आलेल्या कृषीमूल्य आयोगाच्या अहवालामध्ये दहा टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत कारण नसताना कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक गरजांचे कपडे, भांडी यासारख्या गरजांचे भाव वाढत आहेत आणि शेतीवर होणाऱ्या खर्चाचे भाव कमी होत आहेत. म्हणून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करतात.

वाचा:

केंद्र सरकारने हे जाहीर केले आहे की, २०१८-२०१९ पासून स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे आम्ही प्रत्येक पिकावर सुरुवातीपासून ते पीक बाजारात येईपर्यंत येणारा सर्व खर्च अधिक ५० टक्के आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यात कपात केली जाते. राज्य सरकारच्या कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारून शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या खर्चावर आधारीत झालेला खर्च देऊन अधिक ५० टक्के मिळायला हवा. तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील. तो आत्महत्या करणार नाहीत. अन्नधान्य बरोबरच फळे, फुले, भाजीपाला, दूध यांचा हमी भाव ठरविला नसल्याने शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव मिळायला हवा तो मिळत नाही. म्हणून शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकतो. बटाटे रस्त्यावर फेकतो, दूध रस्त्यावर ओततो. त्यासाठी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र संवैधानिक दर्जा द्या. म्हणजे केंद्रामध्ये राज्यातून आलेल्या राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अहवालात काटछाट होणार नाही. केंद्र सरकारचा हस्तक्षेप होणार नाही. राज्य कृषिमूल्य आयोगाने पाठविलेल्या अहवालाप्रमाणे तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतील. तीन वर्षे आश्वासने आणि चर्चा झाल्या आता ठोस निर्णय घ्या. अन्यथा मी निर्णयावर ठाम आहे, असेही हजारे म्हटले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबई: जमावानं तरुणाला खांबाला बांधून केली मारहाण, २ तासांत मृत्यू

0

मुंबई: मोबाइल चोरीच्या संशयातून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईतील येथील मुक्तानंद पार्कात ही धक्कादायक घटना घडली. सहा जणांनी तरुणाला एका खांबाला बांधले आणि बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

शहजाद खान असे त्याचे नाव आहे. तो पार्कमध्ये करण्यासाठी आल्याचा आरोप परिसरातील काही लोकांनी केला. त्याचदरम्यान काही जणांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या भावाने चोरीचे आरोप फेटाळून लावले. शहजाद हा कधीच चोरी करणार नाही. त्याची हत्या करण्यामागे वेगळे कारण असावे, असे त्याच्या भावाने म्हटले आहे.

पार्कमधील कामगारांचे मोबाइल चार्जिंगसाठी लावले होते. ते मोबाइल चोरण्यासाठी शहजाद तिथे गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांताक्रूझ पोलिसांनी रविवारी सहा जणांना अटक केली आहे. ऋषिकेश पासी, हयात अली, अलिमुद्दीन शेख, मोतिबुर आलम, फिरोजुद्दीन आणि पिंटू कुमार अशी आरोपींची नावे आहेत. हे सहाही जण पार्कात रिपेअरिंगची कामे करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबरला मध्यरात्री साडेबारा ते साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली. काही कामगार अचानक झोपेतून जागे झाले. त्यावेळी तिथे आलेल्या शहजादला त्यांनी पकडले. मोबाइल चोरीचा संशय त्यांनी घेतला आणि त्याला खांबाला बांधून मारहाण केली. बेशुद्धावस्थेत तो घराच्या जवळ पार्क केलेल्या एका रिक्षात आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याला मृत घोषित केले. मारहाणीनंतर दोन तासांत तो मरण पावला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक करून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Realme Q2 लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्लीः स्मार्टफोनला लवकरच भारतात लाँच केले जावू शकते. रियलमीने आता लाँच संबंधी कोणतीही माहिती शेयर केली नाही. परंतु, फोनला ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. यावरुन संकेत मिळत आहेत की, रियलमी क्यू २ लवकरच भारतात एन्ट्री करू शकतो. रियलमी क्यू २ ला चीनमध्ये रियलमी Q2 प्रो सोबत ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. ब्रिटनमध्ये या फोनला Realme 7 5G नावाने आणले होते.

वाचाः

टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी एक फोटो शेयर केला आहे. या फोटोत नवीन रियलमी फोनला बीआयएस लिस्टिंग वर मॉडल नंबर RMX2117 सोबत पाहिले गेले जावू शकते. हे मॉडल नंबर रियलमी क्यू २ लवकरच भारतात लाँच होणार आहे. Realme Q2 च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला चीनमध्ये १२९९ चिनी युआन म्हजणजेच जवळपास १४ हजार ६०० रुपयांत तसेच ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला १३९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास १५ हजार ८०० रुपयांत लाँच केले होते. भारतात या फोनला याच किंमतीत लाँच केले जावू शकते.

वाचाः

Realme Q2 चे खास वैशिष्ट्ये
ड्यूल सिमच्या रियलमी क्यू २ अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआयवर काम करतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायनामेंसिटी 800U चिपसेट व ६ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. हँडसेटमध्ये १२८जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ते वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली जावू शकते. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जावू शकतो.

वाचाः

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. रियलमी क्यू २ मध्ये सेल्फी साठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; राऊतांचा भाजपला 'हा' गंभीर इशारा

0

मुंबईः ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे अनेक लोक पाहिले आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल,’ असा गंभीर इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला आहे. त्याचबरोबर, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला आहे. यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना इडीची नोटिस आल्यानंतर यासंदर्भात आज राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला आहे.

‘कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र, गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक ईडीच्या कार्यालयात चकरा मारत असून तिथून कागदपत्र व माहिती आणतात,’ असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

‘महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय महाराष्ट्रात सरकार बनवण्यात जे आग्रही होते त्यांना अशा नोटीस पाठवल्या जातात,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘भाजपचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत. मागच्या वर्षभरात त्यांनी मला हे सरकार पाडण्यासंदर्भात धमकावले आहे. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असं सांगितलं जातंय. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. शिवाय, सरकारच्या खंदे समर्थकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु आहे,’ असंही राऊतांनी म्हटलं आहे.

‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपनं थांबवावं. तुमच्या कुटुंबाच्या व्यावहाराचाही आमच्याकडे हिशोब आहे. राजकीय सुडानेच याला उत्तर दिलं जाईल. भाजपच्या १२० नेत्यांची यादी तयार आहे. ईडीत्यांच्यावर काय कारवाई करते ते पाहणार आहे,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

लॉकडाऊनच्या संकटात 'या' मराठी तरुणांनी शोधली संधी

0

‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची’, हे जुने मराठी गाणे यावर्षात करोना संकटकाळात अनेकांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. काळाने झडप टाकावी तसे लॉकडाउन आले आणि हजारोंचा रोजगार गेला. पण, याही स्थितीत रडत न बसता अनेकांनी वेगळा व्यवसाय सुरू केला. हिमतीने नव्या क्षेत्रात उभे राहण्याचे कसब दाखविण्याचे काम काही शिलेदारांनी केले असून, ते सरत्या वर्षात अधोरेखीत ठरते.

वर्षाच्या सुरुवातीलाच करोनाचं संकट आलं. त्यातच लॉकडाऊन लागू झाला. लॉकडाऊनच्या या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली, अनेकांचा रोजगार गेला. मात्र, मुंबईतील या तरुणांनी या संकटकाळातही सुवर्णसंधी शोधली आहे. रोजगार ठप्प झाल्यानं खचून न जाता नव्यानं भरारी देत स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. आपल्या आवडीचा छंद जोपासत त्यांनी जोमानं नव्या व्यवसायाची सुरुवात करत उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या तरुणांनी सुरु केलेल्या व्यवसायाचा घेतलेला हा आढावा…

लॉकडाऊनच्या संकटात 'या' मराठी तरुणांनी शोधली संधी

‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची’, हे जुने मराठी गाणे यावर्षात करोना संकटकाळात अनेकांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. काळाने झडप टाकावी तसे लॉकडाउन आले आणि हजारोंचा रोजगार गेला. पण, याही स्थितीत रडत न बसता अनेकांनी वेगळा व्यवसाय सुरू केला. हिमतीने नव्या क्षेत्रात उभे राहण्याचे कसब दाखविण्याचे काम काही शिलेदारांनी केले असून, ते सरत्या वर्षात अधोरेखीत ठरते.

पाककौशल्याला कॅफेचा साज
पाककौशल्याला कॅफेचा साज

प्रभादेवीत राहणारा विनीत देव. निवदेक म्हणून असलेले काम गेल्यानंतर हताश न होता स्वत:मधील पाककौशल्याच्या जोरावर कॅफे सुरू करण्याची हिंमत विनीतने दाखवली.

विनीत अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहे. विविध कार्यक्रमांमध्ये तो निवेदनाचे काम करायचा. पण, लॉकडाउन लागले आणि निवदेन क्षेत्र जागेवरच थांबले, विनीतचे हातचे काम गेले. पण त्या स्थितीत डगमगून न जाता त्याने स्वत:मधील पाककौशल्याला वाव दिला व आज कॅफे क्षेत्रात तो जोमाने उभा आहे.

हातातले काम गेल्यावर सुरुवातीला विनीतने घर चालविण्यासाठी म्हणून घरीच कॅफे सुरू केला. त्याच्या परिसरात राहणाऱ्यांना तसेच बाहेरील लोकांना ऑर्डरनुसार पदार्थ तयार करून देण्यास सुरुवात केली. हे पदार्थ लोकांना आवडू लागले. चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्याने विनीतचा हुरूप वाढला. यामुळे त्याने पाककलेचा अभ्यास केला. त्यात अनेक नवनवीन पदार्थ तो शिकला. आता हे नवीन पदार्थ लोकांना आवडू लागले आहेत. यामुळे ते आता चांगलेच लोकप्रियदेखील ठरत आहेत. यामुळेच विनीतचा उत्साह दुणावला आहे. करोना संकटातील संधीचे एक दमदार सोने त्याने करून दाखवले आहे.

ओळखली काळाची हाक
ओळखली काळाची हाक

रोहन सलून क्षेत्रात कुशल होता. पण, लॉकडाउन लागले अन्‌ कात्री चालवणारे हात थांबले. मात्र, परिस्थितीसमोर न डगमगता रोहन भाटकरने काळाची हाक ओळखली व डिजिटल कन्सलटंट म्हणून त्याने कुशलरित्या काम सुरू केले.

रोहन भाटकर हा मूळ सलून व स्पा क्षेत्रात कुशल आहे. पण करोना लॉकडाउन लागल्याने संसर्गाच्या भीतीने सलून व्यवसाय बंद पडला. अचानक काम गेल्याने काय करावे हे रोहनला सुचत नव्हते. पण, सर्वच क्षेत्रात झपाट्याने होत असलेली डिजिटल हाक त्याने ऐकली व स्वत:चे क्षेत्र बदलून डिजिटल विश्वात उडी घेतली. त्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवादेखील सुरू केली.

लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता. पण, अशा गरजूंना मदत करण्यासाठी अनेक कंपन्यांही सरसावल्या होत्या. अशा कंपन्यांच्या कामाचे डिजिटल पद्धतीने नियोजन करण्याचे काम रोहनने सुरू केले. घरातूनन त्याने हे काम सुरू केले. याच काळात काही राजकीय नेतेदेखील मैदानात उतरून गरजूंना मदत करीत होते. या कामाचे नियोजन करणे, ते डिजिटल व सामाजिक माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविणे, हे काम रोहनने केले. हेच काम आणखी पुढे नेत तो वेगवेगळ्या कंपन्यांसाठी कन्सलटंट म्हणून काम करीत आहे. त्यातून उत्पन्न तर मिळतेच शिवाय सेवादेखील होते. एकूणच काम गेले म्हणून हताश न होता नवीन काम शिकून त्यात रोहनने स्वत:चा जम बसवला आहे.

शिक्षिका ते पर्यवेक्षिका
शिक्षिका ते पर्यवेक्षिका

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षण पूर्णपणे थांबले. पण त्यातून हताश न होता शिक्षक म्हणून असलेल्या अनुभवाचा फायदा हितेश्री शिंदे आता पर्यवेक्षिकेच्या कामासाठी करीत आहेत.

हितेश्री शिंदे ही हॉटेल व्यवस्थापनात कुशल आहेत. हॉटेल व्यवस्थापनाच्याच विद्यार्थ्यांना ती शिकवत होती. पण करोना लॉकडाउन लागले व सर्व प्रकारचे शिक्षण थांबले. आता मागील काही महिन्यांत ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी लॉकडाउनच्या सुरुवातीला सर्व प्रकारचे शिक्षण थांबले होते. त्यामुळे हितेश्रीची नोकरीही धोक्यात आली. अशा स्थितीत करायचे काय, असा प्रश्न समोर होता. पण हॉटेल व्यवस्थापन शिकवण्याचा अनुभव असल्याने तेच काम तिने प्रत्यक्ष करण्याचा निर्णय घेतला.

हितेश्री सध्या हॉटेलमध्ये पर्यवेक्षणाचे काम करते. एरव्ही हेच हॉटेल व्यवस्थापनाचे धडे ती विद्यार्थ्यांना देत होती. आज त्या अनुभवाच्या आधारे ती स्वत: पर्यवेक्षकाचे काम करते. त्याचवेळी स्वत: हॉटेल व्यवस्थापनात कुशल असल्याने पाककलादेखील येतेच. त्याआधारे हितेश्री आता ऑनलाइन केक तयार करण्याचे धडे देते. स्वत: केकच्या ऑर्डरही घेते. अशाप्रकारे हितेश्रीने संकटातून संधी शोधून त्याचा योग्य उपयोग केला.

ग्राहकांना डेली नीड्सचा ‘प्रसाद’
ग्राहकांना डेली नीड्सचा ‘प्रसाद’

पर्यटन व्यवसाय आणि डेली नीड्स यांचा अर्थाअर्थी कुठलाही संबंध नाही. पण प्रसाद पल्लीवाल यांनी स्वत:चे क्षेत्र बदलत डेली नीड्सचे दुकान सुरू केले. केवळ सुरू केले नाही, तर ते यशस्वीरित्या चालवून दाखवले आहे.

प्रसाद पल्लीवाल यांचा पर्यटनाचा व्यवसाय होता. मुंबईतील अनेक पर्यटकांना राज्यातील पर्यटनस्थळे, देश फिरवून आणले. पण पर्यटन मोसमाच्या अगदी तोंडावर लागलेल्या करोना लॉकडाउनने ‘न भुतो न भविष्यती’ असे संकट उभे केले. नियोजित सर्व सहली रद्द झाल्या. पर्यटन पूर्ववत होऊन नवीन सहली कधी सुरू होणार, याची शाश्वतीदेखील नव्हती. त्यामुळे एरव्ही इतरांना सहली घडविणाऱ्या प्रसाद यांना स्वत:लाच घरी बसावे लागले. आता करायचे काय? असा प्रश्न पडला. पण डगमगून न जात स्वत:चा व्यवसायच त्यांनी बदलला.

प्रसाद हे पर्यटन व्यवसाय चालवत असल्याने त्यांचे स्वत:चे एक दुकान आहेच. त्या दुकानात आता पर्यटक बुकिंगसाठी येत नसले, तरी त्यांनी अन्य ग्राहकांना खेचून आणले. त्याची सुरुवात केली ती केक व चॉकलेटच्या साहाय्याने. या दोन वस्तूंची विक्री करून त्यांचे अर्थाजन सुरू झाले. बघता-बघता मागील सहा महिन्यांत हा व्यवसाय खूप वाढला. आज ३७० हून अधिक उत्पादनांची प्रसाद पल्लीवाल हे विक्री करीत आहेत.

​भाजीविक्रीद्वारे हुशारीची ‘चेतना’​
​भाजीविक्रीद्वारे हुशारीची ‘चेतना’​

हाती असलेली माझगाव डॉकची नोकरी गेली. चिंतेचे ढग दाटले तरी थांबून न राहता चेतन पाटील याने भावासह ऑनलाइन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज दररोज ३०० किलो भाजीची विक्री तो करतो.

चेतन पाटीलने आयटीआय केले आहे. माझगाव डॉकमध्ये त्याची नोकरी होती. नोकरी कंत्राटावर असल्याने लॉकडाउन लागताच चेतनचे कंत्राट थांबले. कुटुंबावर अचानक आभाळ कोसळले. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला होता. डोक्यात तांत्रिक हुशारी होतीच. त्याचा योग्य उपयोग करीत चेतनने ऑनलाइन भाजी व्यवसाय सुरू केला.

करोना लॉकडाउन काळात फक्त भाजीपाला, दूध व धान्याचाच व्यवसाय होत होता. त्यामुळे भाजी विक्रीचा निर्णय घेतला. ओळखीतला एक जण आधी भाजीचे लहानसे दुकान चालवत होता. त्याच्याकडून भाजी विक्रीची माहिती घेतली. सुरुवातीला अनेक ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागला. पण प्रत्येकाशी संपर्क साधून विश्वास दिला. आता हेच काम चेतन भावासह जोमाने करीत आहे.

चेतनने त्याच्या भावासह अनेकांशी संपर्क साधला. मेहनत केली. आता त्यांच्याकडे ५० नियमित ग्राहक आहेत. त्यांना ते भाजीपाला धुवून, कापून व निर्जंतूक करून विक्री करतात. रोजची किमान २५० ते ३०० किलो भाजीची उलाढाल आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts