Tuesday, December 5, 2023
Home Blog Page 8545

CAA मुळे देश किंवा राज्य सोडावं लागेल ही भीती बाळगू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

1

CAA, NRC वरुन मोर्चे निघत आहेत, निदर्शनं केली जात आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की हा कायदा झाल्यानंतर अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये हा कायदा घटनेला धरुन आहे की नाही? हे स्पष्ट व्हायचं आहे. हा कायदा झाला म्हणजे कुणालाही देश सोडून जावा लागेल अशा गैरसमजात कोणीही राहू नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. नागपुरातल्या पत्रकार परिषदेत ही बाब त्यांनी स्पष्ट केली. कोणतीही भीती, कोणतीही दहशत मनात बाळगू नका. तुमच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार समर्थ आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं

अजित पवारांविरोधात देवेंद्र फडणवीस आक्रमक, क्लीन चिटला केला विरोध

1

➡ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एसीबीने क्लीनचिट दिल्यानंतर आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसीबीने कोर्टात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नव्या सरकारचं अधिशवेशन एखादा घरगुती कार्यक्रम वाटतो- नारायण राणे

0

ठाकरे सरकार नाही, महाराष्ट्र सरकार म्हणा, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी ‘ठाकरे सरकार’ शब्दाला आक्षेप घेतला. नव्या सरकारचं अधिशवेशन हे अधिवेशन नाही. एखादा घरगुती कार्यक्रम वाटत असल्याचा, टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. नागपूरमध्ये विधीमंडळ परिसरात राणे बोलत होते.

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी सर्वात श्रीमंत उमेदवार

3

________________
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या राजकीय आखाड्यात उभ्या असलेल्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ८४ लाखाच्या घरात आहे. तर दुसर्‍या स्थानी भाजपचे उमेदवार ऍड. दीपक पटवर्धन हे असून त्यांची मालमत्ता ३ कोटी १५ लाख ८३ हजार रु., राष्ट्रवादीचे मिलिंद कीर यांची ७१ लाख तर मनसेचे रूपेश सावंत यांची १० लाखाची मालमत्ता आहे.

नळपाणी योजना दीड वर्षांत पूर्ण करू …माजी आ.बाळ माने

1

_________________
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना 64 कोटी रुपयांची नळपाणी योजना रत्नागिरी शहरासाठी मंजूर केली. मात्र गेल्या काही वर्षांत ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. या योजनेसह शहरात पाणीवितरणात शिवसेना कमी पडली आहे. विकासनिधी अखर्चिक राहिला असून हा मतदारांचा अपमान आहे. नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजप नक्की विजयी होणार असून रखडलेली पाणी योजना पुढील दीड वर्षात पूर्ण करू, असा विश्‍वास माजी आमदार बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला. शहर विकासाचा रोडमॅप तयार आहे, रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर, देखणे बनवण्यासाठी आमच्याकडे संकल्पचित्र असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते.

*शिवसेनेने मतदारांचा अपमान केला*

पाच वर्षांसाठी रत्नागिरीची थेट नगराध्यक्ष निवडणूक झाली होती. मात्र शिवसेनेने नगराध्यक्षांचा जाणीवपूर्वक राजीनामा घेतला गेला. शिवसेनेने मतदारांचा अपमान केला. विकास योजनांचा बोजवारा उडाला आहे. यात शिवसेना अपयशी ठरली आहे. आम्ही आठवड्याचे 24 तास योजना नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू. मुबलक पाणी मिळाले पाहिजे. पानवल धरणाचे पुनरुज्जीवन करू. शीळ धरणातील पाण्याचा योग्य विनीयोग व्हावा, रस्ते उद्याने यासाठी निधी आणू, असे श्री. माने म्हणाले.

*दुसर्‍या टप्प्यावर प्रचार सुरू*

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले की, पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आता दुसर्‍या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. यापूर्वीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेतला जातो याबाबत नागरिकांमध्ये कमालीचा रोष आहे. शहरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे. 29 ला मतदानातून हा रोष व्यक्त करतील व प्रस्थापितांना नक्कीच धक्का मिळेल. भाजप चांगला विजय मिळवेल.

भाजप वरिष्ठांच्या आदेशानुसार लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांना मताधिक्य मिळाले. परंतु विधानसभेत युतीचे सरकार सत्तेत आले नाही. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. लोकांमध्येही संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावरच लढवणार असल्याचे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले. शिवसेनेने मताधिक्याचा अनादर करून तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील

आम्ही सच्चे मित्रच!

अ‍ॅड. पटवर्धन व मी गेली 40 वर्षे मित्र आहोत. राजकारणात विजयी होण्याकरिता सच्चा मित्राची गरज असते. याकरिता सर्वजण मिळून काम करतोय. ऐतिहासिक विजय मिळवू. दीपक मित्रच आहे, त्यामुळे कोणतेही गटतट नाहीत. तांत्रिक मतभेद होते ते संपले आहेत. हा पक्ष आम्ही सार्‍यांनी वाढवला आहे, त्यामुळे वादाचे कारण नाही. कोणीही उगाच वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये.
www.konkantoday.com

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

59

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

ठाकरे सरकार नाही महाराष्ट्र सरकार, नारायण राणेंचा तिळपापड

1

नागपूर : ‘ठाकरे सरकार नाही, महाराष्ट्र सरकार म्हणा’ अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी ‘ठाकरे सरकार’ शब्दाला आक्षेप घेतला. नव्या सरकारचं अधिशवेशन हे अधिवेशन नाही, एखादा घरगुती कार्यक्रम वाटतो, असा टोला राणेंनी (Narayan Rane on Thackeray Government) लगावला.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारचं पहिलंच अधिवेशन नागपुरात सुरु आहे. त्यावेळी नारायण राणेसुद्धा अधिवेशनस्थळी पोहचले. राणेंना विधीमंडळ परिसरात पाहून पत्रकारांनी गर्दी केली. ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाबद्दल त्यांना विचारलं असता नारायण राणेंनी ‘ठाकरे सरकार’ या शब्दाला आक्षेप घेतला.

‘हे महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आहे. कोणाचंही नाव त्याला जोडू नका,’ असं नारायण राणे म्हणाले. ‘हे अधिवशेन असल्याचं वाटतच नाही. सगळं कसं घरगुती वाटतं. सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरुन होत नाही, अशी टीकाही राणेंनी केली.

हेही वाचा : सर्व आमदारांचं एकत्र फोटोसेशन, फडणवीसांची दांडी, नाना पटोले म्हणाले, आमदारांची झोप झाली नसेल!

सरकारची कामगिरी कशी वाटते, असं विचारलं असता, नेमकं काय चाललंय याची माहिती घेऊन बोलेन, असं उत्तर नारायण राणेंनी दिलं. नारायण राणे दुपारी पत्रकार परिषद घेऊन काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.

वर्गमैत्रिणीवर बलात्कार करुया, मुंबईत आठवीच्या विद्यार्थ्यांची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा

3

मुंबई : वर्गमैत्रिणीवर बलात्कार करुया, अशी भयानक चर्चा मुंबईत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर रंगल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या (आयबी) 13 ते 14 वर्ष वयोगटातील आठ विद्यार्थ्यांचं शाळेतून निलंबन (WhatsApp Chat on Classmate Rape) करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील दोन विद्यार्थिनींच्या आईंच्या वाचनात हे चॅट आल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. धक्का बसलेल्या दोन्ही महिलांनी शाळेत धाव घेत, हा प्रकार शाळा प्रशासनाच्या कानावर घातला. त्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेत जाण्यासही नकार दर्शवला आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नुकतंच हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उमटली आहे. देशातच नव्हे, तर राज्यातही बलात्काराच्या काही घटनांमध्ये आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलेलं आहे. अशातच 13-14 वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलं बलात्कार करण्यारख्या असंवेदनशील गप्पा मारत असतील, तर ते भयावह म्हणायला हवं.

हैदराबाद गँगरेप आरोपींकडून आधी नऊ महिलांची बलात्कार करुन हत्या?

संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये बरंच मोठं चॅट रंगलं होतं. विशेष म्हणजे त्यात ‘गँग बँग’ म्हणजेच सामूहिक बलात्कार आणि ‘रेप’ अशा शब्दांचा भरणा होता. वर्गमित्रांच्या शरीरयष्टीवरील भाष्य (बॉडी शेमिंग) किंवा त्यांना समलिंगी संबोधणं (गे, लेस्बियन) या गोष्टीही संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅटमध्ये सुरु होत्या.

8 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ग्रुपवर या विषयी चॅट झालं होतं. सुरुवातीला अनेक मुलींभोवती रेंगाळणारं चॅट अखेरीस दोघींविषयी झालं. ‘आपण एका रात्री जाऊन बँग करुया’ अशा एका विद्यार्थ्याच्या कमेंटवर दुसऱ्यांनी होकार भरला. ‘मी तिला नष्ट करेन’ आणि ‘मी तिचं अस्तित्वच मिटवेन’ अशी हिंसक भाषाही त्यांच्या तोंडी दिसते. या प्रकरणाची शाळेने गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाईबाबत तपासणी (WhatsApp Chat on Classmate Rape) सुरु आहे.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

353

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Latest posts