हायलाइट्स:

  • तीन मुलींच्या हत्या प्रकरणात पित्यालाच अडकवलं होतं
  • १९ वर्षांनंतर दुर्दैवी बापाची तुरुंगातून सुटका
  • अखेर न्याय मिळाला, आरोपींना झाली शिक्षा
  • उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील २००२ मधील प्रकरण

शाहजहांपूर: १९ वर्षांनंतर शाहजहांपूर येथील अवधेश सिंहला न्यायालयाकडून न्याय मिळाला. तुरुंगातून सुटल्यानंतर पत्नी दरवाजामध्ये मुलींचे फोटो घेऊन उभी होती. फोटो पाहून दोघा पती-पत्नीला रडू कोसळले. अवधेशला त्याच्याच तीन मुलींच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. तब्बल १९ वर्षे अवधेशचे कुटुंब न्याय मिळवण्यासाठी दारोदार भटकत होते. अखेर बुधवारी या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.

सन २००२ मध्ये ही घटना घडली होती. १५ ऑक्टोबर २००२ रोजी अवधेश शाहजहांपूर येथील आपल्या घरी जनावरांना चारा घातल्यानंतर खाटेवर झोपला होता. बाजूलाच दुसऱ्या खाटेवर त्याच्या तीन मुली झोपल्या होत्या. काही वेळानंतर अचानक छुटकन्नू आणि इतर आरोपी घरात घुसले होते. त्यांनी गोळीबार केला. अवधेशने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. मात्र, त्याच्या मुलींचा जीव वाचू शकला नाही. त्यानंतर जे घडले त्याचा विचारही अवधेश आणि त्याच्या कुटुंबानं केला नसेल. अवधेशच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, पोलिसांनी मुलींच्या हत्येच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेतले. जवळपास १० दिवस अवधेशला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. विनंत्या करूनही पोलिसांनी त्याला मुलींना शेवटचे बघूही दिले नाही. त्यानंतर अवधेशची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

मध्यरात्री धावत्या कारमध्ये सुरू होता भयानक प्रकार, किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर…
निर्दयी बाप! होमवर्क न केल्यानं ८ वर्षीय मुलाला पंख्याला उलटं टांगून बेदम मारहाण

आम्ही न्यायासाठी लढा दिला. अखेर आम्हाला न्याय मिळाला. मला आजही माझ्या मुलींचे चेहरे डोळ्यांसमोर दिसतात, अशी प्रतिक्रिया देताना अवधेशच्या पत्नीचे डोळे पाणावले होते.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिद्धार्थ कुमार वाघव यांनी या खटल्याचा निकाल देतानाच तत्कालीन तपास अधिकारी होशियार सिंह आणि एक आणखी साक्षीदार दिनेश कुमार याच्याविरोधात गुन्हेगारांशी संगनमत आणि निर्दोष पित्याला मुलींच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली अडकवल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. अधिकाऱ्याने साक्षीदाराने दिलेल्या साक्षीच्या आधारे अवधेशविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मुलींच्या हत्येनंतर अवधेशने आपला गुन्हा कबुल केला होता आणि गरिबी हे कारण त्याने दिले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने त्यावेळी सांगितले होते.

१५ ऑक्टोबर २००२ रोजी अवधेशच्या तीन मुली रोहिणी (वय ९), नीता (वय ८) आणि सुर्मी (वय ७) या तिघींची घरात घुसून हत्या केली होती. छुटकन्नू उर्फ नथ्थूलाल, त्याचा भाऊ राजेंद्र आणि मुलगा नरवेश यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. अवधेश कसाबसा वाचला होता.

पत्नीच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस बघितलं, संतापलेला पती रात्री उशिरा घरी गेला अन्…
भयंकर! प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर, काही मिनिटांतच सर्व काही उद्ध्वस्त झालं

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here