रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.तानाजीराव चोरगे व उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे.

बँकेच्या सभागृहात सहकारचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी डॉ. सोपान शिंदे यांनी जाहीर केले.

निवडणुकीपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सौ. नेहा माने या गैरहजर राहिल्या होत्या. याबाबतची कल्पना त्यांनी सहकार पॅनेलप्रमुखांना दिली होती. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक सुनील गुरव, सरव्यवस्थापक अजय चव्हाण, सुधीर गिम्हवणेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश कीर, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, जॉईंट जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी, कर्मचारी नेते सुधाकर सावंत आदींनी डॉ. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

21 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here