संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या पंतप्रधान देहूत येत असून पंतप्रधानांच्या दौऱ्याची प्रशासकीय पातळीवरील तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शिळा मंदिराचे लोकार्पण

येत्या २० जून रोजी तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. तत्पूर्वी तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होत आहे. हे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. उद्या पंतप्रधान मोदी देहूत दाखल होत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

देहूला आले पोलीस छावणीचे स्वरूप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत दाखल झाला असून केंद्रीय, तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात येत आहे. यामुळे देहूला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

देहू गावाच्या वेशीवर रस्ते बंद करण्यास सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मुख्य मंदिर परिसर, सभेचे ठिकाण आदी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आलाय. तसेच देहू गावाच्या वेशीवर देखील सर्व बाजूंनी येणारे रस्ते बंद करण्यात सुरुवात करण्यात आली आहे.

असा असेल पोलीस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठीच्या बंदोबस्ताबाबत माहिती देताना पिपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले की, उद्या देहूत बंदोबस्तासाठी १० पोलीस उपायुक्त, २० सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, २९५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि २ हजार २७० पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत

पंतप्रधान मोदी याच मंडपातून करणार वारकऱ्यांना संबोधित

संत तुकोबारायांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी येथे भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. याच मंडपातून पंतप्रधान आपले विचार मांडणार आहेत.

पावसापासून संरक्षण होण्यासाठी वॉटर प्रूफ मंडप

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून पावसामुळे शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी येथे वॉटर प्रूफ मंडप तयार करण्यात आला आहे.

आजचे फोटो – फोटोगॅलरी – Maharashtra Times

20 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here