शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून महाघोळ दिवसागणिक वाढत चालला आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदाची लॉटरी लागलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला माहिती नाही अशी प्रतिक्रीया देत बाहेरून सेनेत आलेल्यांना ॲडजेस्ट व्हायला वेळ लागेल असा अप्रत्यक्ष टोलाही राऊत यांनी सत्तार यांना लगावला आहे.

खातेवाटपावरून एका बाजूने नाराजीचा गदारोळ सुरु असताना दुसऱ्या बाजूने सत्तारांच्या राजीनाम्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.

खातेवाटपासंदर्भात विचारले असता राऊत यांनी खातेवाटप विलंबाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतिल अशी असे म्हटले आहे. विलंब होण हे काय बरोबर नाही. खातेवाटप हा काय गंमतीशीर विषय असु नये. राज्यातील प्रत्येक खात हे तोलामोलाच असते. प्रत्येक खात्यावर काम करून राज्यच विकास करने हे मंत्र्याचे काम आहे. शिवसेनेच्या कोट्यात जास्त खाती नाहीत असेही राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. कॅबिनेटं मंत्र्याने आपल काम चोख कराव असे मतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच, खातेवाटपाच्या विलंबबावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाचा विचारा असे पुन्हा एकदा राऊत यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here